कोजागिरी - २
(गच्चीवरील गमती जमती)
हा भाग म्हणजे आम्हा बहिणींचा आणि मैत्रिणींचा खूप आवडीचा .अगदी आतुरतेने वाट बघत असू आम्ही सगळ्या, या दिवसाची . कारण हा दिवस म्हणजे आमच्या गुलाबाई च्या विसर्जनाचा दिवस , म्हणजे खूप धम्माल ! खूप खूप आनंद !! आणि मनाच्या एका कोपऱ्यात थोडेसे वाईट सुध्दा वाटे . महिन्याभराची ही धमाल संपून जाणार म्हणून .
अनंत चतुर्दशी ला गणपती बाप्पा चे विसर्जन झाले की मग दोन दिवसांनी आमच्या गुलाबाईचे आगमन होत असे . बाप्पा सारख्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका नसत गावभर . पण अगदीच एखाद्-दुसरीच मिरवणूक असे . त्यांचा मुक्काम सगळ्यांच्या घरी तब्बल एक महिन्याचा . पण कधी परीक्षा, अभ्यास या प्रकरणांमुळे कमी जास्त होई, जरा मोठे झाल्यावर . गुलाबाई गुलोजी म्हणजे शंकर पार्वती चे प्रतीकात्मक रूप खरे तर . पण पोशाख मात्र वेगळा असतो. ही मूर्ती म्हणजे , टीपिकली ते दोघे एका खडकावर बसलेले असतात आणि त्यांच्या बरोबर त्यांचे एक मूल मांडीवर किंवा शेजारी बसलेलं असतं . गुलाबाई पातळ नेसलेली आणि गुलोजी फेटा, कोट आणि धोतर घातलेले असतात . पण हे सगळं एकदम रंगीबेरंगी असतं . प्रत्येकीच्या घराच्या गुलाबाईचे कपड्यांचे रंग वेगवेगळे असत . नीट बघावं लागे, कुठले रंग ते , कारण मग हे रंग गुंफून , एक गाणं म्हणत असू आम्ही रोज, प्रत्येकीच्या घरी . सोबत एक छोटंसं वेगळं सुटं बाळ सुद्धा मिळे त्यांचं . पण ते फारसं कुणी घेत नसे आणि सोबत प्रत्येक मुलीचा एक टिपऱ्यांचा जोड असे . या टिपऱ्या सुद्धा अगदी रंगीबेरंगी असत . बाप्पा सारखी आरास वगैरे करण्याची फारशी पद्धत नव्हती . फारच एखाद्या ठिकाणी सार्वजनिक असे. तिथेच असे थोडीफार आरास आणि त्यांचीच मिरवणूक असे . आमच्या घराजवळच एक अशीच सार्वजनिक गुलाबाई असे, ते नक्की आठवतंय कारण आमच्या एका मैत्रिणीच्या गल्लीतच असे ही सार्वजनिक गुलाबाई .
मग महिनाभर संध्याकाळी , आम्हा मैत्रिणींचा गट प्रत्येकी कडे जात असे . तिच्या गुलाबाई समोर छान गोलाकार करून टिपऱ्या खेळत , खास गुलाबाईची गाणी आम्ही म्हणत असू . मग सगळी गाणी झाली, की आम्हा सगळ्यांच्या , सगळ्या टिपऱ्या जमिनीवर रचून , एक छान पाळणा तयार करायचो . त्यात ते छोटे बाळ असेल तर ते ठेवायचे, नाही तर रिकामाच पाळणा हलवून ते पाळण्याचं गाणं म्हणत असू . मग वेळ असे खाऊची ! या खाऊची पण एक गम्मत असायची . झाली गाणी , आता आणा खाऊ आणि वाटा सगळ्यांना , असा साधा सोपा प्रकार नव्हता . पाळणा सुरु झाल्यापासूनच आमचे सगळ्यांचे नाक, कान , डोळे स्वयंपाकघराकडे लागलेले असत . खाऊ खायची घाई तर असेच . पण तो खाऊ काही सहजासहजी मिळत नसे . बरेच बौद्धिक कष्ट घ्यावे लागत असत . तो खाऊ बंद डब्यातून किंवा घट्ट झाकलेल्या भांड्यातून येत असे , स्वयंपाकघरातून आमच्यापर्यंत . मग तो डबा किंवा झाकलेले भांडं जोरजोरात हलवले जाई . मग त्याच्या आवाजावरून आत काय असेल ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा . आवाज फारसा येत नसेल तर मग वास घ्यायचा प्रयत्न करून त्यावरून ओळखण्याचा प्रयत्न करावा लागे आणि एवढ्यावरून सुद्धा भागत नसेल , तर जिचे घर असेल ती मैत्रीण किंवा तिची आई एखादी खूण किंवा सूचना देत असे खाऊ ओळखण्यासाठी . मग प्रत्येक जण आपापले अंदाज सांगत असे . मग एकदाचा का तो पदार्थ बरोबर ओळखला, की मग डब्याचे झाकण उघडे आणि आम्हाला तो खाऊ मिळे ! मग तो खाऊ खाऊन झाला की पुन्हा पुढचे घर ......
मग अख्खा महिनाभर रोज संध्याकाळी ही धम्माल चाले . मुली सगळ्या खुश ,रोज टिपऱ्या खेळत गाणी म्हणायची ,सगळ्या मैत्रिणीकडे जायचे आणि वेगवेगळे खाऊ खायचे ! आयांना मात्र रोजचा त्रास, रोज नवीन नवीन आणि ओळखायला कठीण असा खाऊ करून ठेवायचा . उशीर झाला घरी यायला, तर चौकशी करायची, कार्ट्या कुठे आहेत त्याची , किती घरं राहिलीत त्यांची ,अजून किती वेळ लागणार , वगैरे वगैरे.
विसर्जनाच्या दिवशी तर अजूनच धम्माल ! मी मघापासून विसर्जन, विसर्जन म्हणतेय खरं पण आम्ही कधीच विसर्जन करत नव्हतो त्या मूर्तीचं . ती तशीच नीट ठेवून देत असू आणि पुढच्या वर्षी तीच बसवली जाई . अगदीच हाताळतांना फुटली, की मगच नवीन घेतली जाई . तर विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकीने पाच-सात-नऊ-अकरा अशा संख्येने खाऊ आणायचे असत . बऱ्याचदा आम्ही मुलीमुली आपसात थोडेफार ठरवून घेत असू जेणे करून कुठलाही खाऊ डबल होऊ नये आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ खायला मिळावे म्हणून . शक्यतो प्रत्येकी कडून पाच किंवा जास्तीत जास्त सात खाऊ येत असत . पण आता खरंच आठवत नाहीये इतके काय काय खाऊ येत ते ! आणि दुसरे म्हणजे अगदी पाच मैत्रिणी जरी धरल्या तरी गुणिले पाच म्हणजे पंचवीस खाऊ येणार ! मग ते खाऊन संपवायलाही हवेत की नाही ? हा झाला खाऊ चा भाग .......
दुसरा महत्वाचा आणि आवडीचा भाग म्हणजे आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून बसवलेले सामूहिक नाच ! दररोजच्या गुलाबाईच्या गाण्यां व्यतिरिक्त ह्या नाचांची सुद्धा प्रॅक्टिस चाले . हे सगळे नाच बहुतेक आमच्या शाळेत वार्षिकोत्सवात सादर केलेले असत . त्याची थोडी प्रॅक्टिस केली की झाले . शाळेत ज्या नाचात भाग घेता आला नसे, ते सुद्धा इथे सादर करण्याची संधी मिळे , आम्हाला तेही एक वेगळे समाधान मिळत असे . मग कोजागिरीच्या दिवशी आमच्या सगळ्या पालकांसमोर आम्ही हे नाच सादर करीत असू .
कोजागोरीच्या दिवशी आम्हा सगळ्या मुलींची कोण लगबग . आधी सगळ्यांच्या गुलाबाई चौधरी सदनच्या गच्चीवर विराजमान होत . मग त्या छान मांडून ठेवल्या जात मग त्यांच्या समोर प्रत्येकीच्या घरून आलेले पाच-पाच खाऊ म्हणून आलेले पदार्थ मांडले जात . काय लोभस दिसे ते दृश्य ! आणि वरून छान चांदणं पडलेलं असे पौर्णिमेचं ! त्या काळी छायाचित्र , कॅमेरा अगदीच नव्हते . त्यामुळे तुम्हा वाचकांना नाही दाखवता येणार हे सगळं फोटो मधून . पण मला मात्र नक्कीच बघता येते अगदी हवे तेव्हा . कारण माझ्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने फोटो काढून मी माझ्या मेंदूच्या स्मरणशक्ती मध्ये कायमचे साठवून ठेवले आहे !
ही सगळी मांडामांड मार्गी लागली , की मग आमच्या नाचाच्या तयारीची लगबग ! वेगवेगळे सात-आठ तरी नाच असतं , मग त्या प्रत्येक नाचासाठी वेगवेगळे पोशाख . त्याची आधीच जमवाजमव केलेली असेच, पण परत वेळेवर थोडे फार गोंधळ असतच् . मग ते सगळे सोडविणे आणि पुढच्या सादरीकरणाच्या तयारीला लागणे . आमच्या गच्चीवर माझ्या दोन्ही काकांच्या दोन खोल्या होत्या . मग या खोल्याच आमच्या ग्रीन रूम होत असत . कारण ह्या सात-आठ नाचांपैकी प्रत्येक नाचाला वेगवेगळा पोशाख असे, मग एक झाला की तो बदला आणि पुढचा चढवा . त्याकाळी सामूहीक नाच म्हणजे दोन उभ्या रांगा असत . बुटक्या मुलीपासून सुरु होत असे आणि सगळ्यात उंच मुलगी सगळ्यात शेवटी . तर या दोन रांगांपैकी एक रांगेमधील मुली एका खोलीमध्ये आणि दुसऱ्या रांगेमधील मुली दुसऱ्या खोलीमध्ये . सगळे अगदी पद्धतशीर आणि अगदी शिस्तीत ! कुठे काही गडबड नाही की गोंधळ नाही . सगळ्या नाचांचे पालकांच्या समोर छान सादरीकरण होत असे . आणि मग पालक सुद्धा आम्हाला बक्षीस म्हणून गोळ्या , चॉकोलेट, फारच मजल म्हणजे सगळ्यात मिळून एक डेअरी मिल्क कॅडबरी ! आणि आम्ही मुली सुद्धा त्यातच एकदम खुश .......
मग आम्ही थकल्या भागल्या सगळ्या मुली आमच्या खाऊ वर तुटून पडत असू . हो आज काही खाऊ ओळखण्याचे वगैरे बौद्धिक कष्ट घ्यावे लागत नसतं . कारण सगळे खाऊ आणून छान मांडून ठेवलेले असत सगळ्या गुलाबायांसमोर . मग आम्ही सगळ्या खाऊचा फडशा पाडून झोपायला आपापल्या घरी जात असू . एक छान आनंदी कोजागिरी रात्रीच्या आनंदी आठवणी घेऊन ! आणि लगेचच पुढच्या कोजागिरीची वाट बघायला सुरवात करत असू ........
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
१५ मे २०१९
ध्वनिफीत
वा !!! काय योगायोग आहे ! आजच गुलाबाई बसते आहे आणि हा लेख वाचनात आला. मन बालपणात हरवून गेले.सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
ReplyDeleteवा छानच योगायोग !!! भारीच ! मला पण छान वाटले हे वाचून आणि एकदम जाणीव झाली .....खरंच की ..... गुलाबाई आजच बसते आणि योग योगायोगाने आज हाच लेख प्रकाशित झाला इथे !!!...... लयीच भारी ...... !!!!😁❤💕💖👌👌💃💃💃😍😍😍
DeleteGulabai हा एक नवाच प्रकार तुझ्यामुळे कळला. तुझ लेखन मस्तपैकी descriptive असल्याने मला तो सगळा सोहोळा अगदी involve होऊन अनुभवता आला. एकंदरीत Gulabai च्या निमित्ताने तुम्ही मुली मुली खूपच एन्जॉय करत होता हे वाचताना मस्त वाटत होत....
ReplyDeleteफारच भारी आन्या , फार आनंद झाला मला मी कुणाच्या तरी ज्ञानात थोडी का होईना भर टाकू शकले ...... 😉😉😆आणि हो मुलगी असल्याचे खूप फायदे असतात दिसतात त्यापेक्षा खूप जास्त .....आणि आयुष्य एकदम धमाल असते मुलींचे 💃💃💃!!!! खूप खूप आभार अभिप्रायाबद्दल 🙏
Deleteनागपूर कडे भूलाबाई म्हणतात. आणि सर्व काही असेच असते. सर्व मुली मिळून रोज संध्याकाळी भूलाबाई ची गाणी म्हणतात. आम्हाला पण पाठ झाली होती. प्रसादाच्या वेळी तर मजाच यायची. कारण प्रसाद ओळखावा लागायचा. अजूनही नागपूर कडे ही प्रथा सुरू आहे. पुण्याकडे यालाच भोंडला म्हणतात. बाकी लेख छान झाला आहे. थोडा वेळ लहानपणीच्या आठवणीत मन रमले. Best luck for future blog.
ReplyDeleteवावा काका ! मस्तच ! मला वाटते खाऊ च्या गमती जमती मुळे मुलं सुद्धा या मुलींच्या सणात सामील होत असत , असे वाटतेय ....... 😁😁😁त्या काळातील बऱ्याच मुलांचे तुमच्या सारखेच अभिप्राय आलेत मला ....... खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!!
Deleteकाय छान.. वाटत आहे हे सगळ वाचताना..,आणि गुलाबाई तर माझ्या मनात घरच करुन बसली आहे.इतकी की पुढच्या वर्षी मी जूईसाठी गुलाबाई बसवणारच.पण इथे ती मजा नाहिच येणार जे आपण अनुभवले आहे.तरी प्रयत्न करून बघेन कस जमतय ते.खूपच छान....
ReplyDeleteसौ.सोनल चौधरी
Deleteसगळ्यात छान बाजू या सगळ्या लिखाणाची ...... ती म्हणजे प्रत्येक लेख वाचकाला आपापल्या बालपणात घेऊन जातो आणि काही क्षण हा होईना जे क्षण जगायची परत संधी मिळते 💖💖💖!!! असे अभिप्राय वाचून मला तर खूपच आनंद होतो 💃💃💃!!! मनःपूर्वक धन्यवाद सोनल ...... गुलाबाई बसवायची कल्पना मस्तच आहे ....आपण आपल्या बाजूने होईल तितके प्रयत्न करत राहायचे बाकीचे वरच्यावर सोडून द्यायचे ...... 😊😊😊
Deleteछान, लेख वाचून मला सुध्दा Devashri चे लहानपण आठवले.
ReplyDeleteवा वा😍 ! विलास हा एक आणिक विलक्षण आणि आनंदी अनुभव💖 !!! आपल्या बालपणातील क्षण अनुभवणे हा एक आनंदी अनुभव असतोच , पण आपल्या मुलांचे बालपण आणि त्यांच्या आठवणी अनुभवणे हा पण एक अभूतपूर्व आनंद असतो 💖!!! मनःपूर्वक धन्यवाद !😊
ReplyDeleteमला असे वाटते मेन title आनंदी पाऊस च्या ऐवजी आनंदी वर्षा हवे होते.
Deleteआनंदी वर्षा म्हणजेच आनंदी पाऊस ना ! वर्षा म्हणजे पाऊस . 🌧🌨⛈
DeleteKhup chhan. भुतकाळात फिरुन आले
ReplyDeleteरम्य तो भूतकाळ आणि रम्य ते बालपण 💃💃💃!!!मी तर बऱ्याच महिन्यांपासून चौधरी सदनातच राहते आहे आणि ते बालपण परत जगतेय😍💖💕!!
Deleteलहानपणी आई सोबत कधीतरी गुलाबाई च्या कार्यक्रमात गेलो होतो... तेव्हाच एक गाणं आठवते... अडकित जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता टीव्ही, भुलोजी ला मुलगा झाला नाव ठेवा रवी... चिवडा, मटकी न बरंच काही.
ReplyDeleteवा वा 😊! मस्तच😍 ! उत्सव एकच पण प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या 💃!!! छान छान ! धन्यवाद परेश तुझ्या आठवणी शेअर केल्याबद्दल 💖!!
Deleteछान विस्तृत आणि तपशीलवार वर्णन..
ReplyDeleteगाणीही छान असत गुलाबाईची.
अडकीत जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता साबू
गुलाबाईला मुलगा झाला
नाव ठेवा बाबू....
अशी यमकं जुळवत गंमत चाले.
मोठ्या बहिणींसोबत आम्ही पण खाऊ ओळखायला आणि खायला रोज जात असू.
अविस्मरणीय आठवणी..
धन्यवाद
छान छान आठवणी ! मनःपूर्वक धन्यवाद !😊
Deleteगुलाबाईची गाणी संकलित करून शेअर करावी
ReplyDeleteमला वाटतंय तुम्ही प्रस्तावना वाचली असावी आणि या लिखाणाचा विषय तुम्हाला नीट कळला असावा . तुमच्या सूचना अगदीच छान आहेत . यावर सगळी माहिती संकलीत केलेलीच आहे मी . पण ते सगळे एका वेगळ्या ब्लॉग वर येणार . हा जो नवीन ब्लॉग येणार आहे लवकरच तो अशा सगळ्या विविध विषयांनी नटलेला असेल . त्यात हा विषय नक्कीच सामील होईल
Deleteयातच लिहिले तर मूळ विषयापासून भरकटल्यासारखे होईल
मेंदुचि जमा करुन ठेवण्याचि ताकद जीबि मधे मोज दाद होऊ शकेल का झालिच तर तुझ्या मेंदुचि मेमरिचे मोज माप काय आहे हे कळेल का
ReplyDeleteकाय बोलू यावर ! tons n tons of love💖💖💖💖💖 !!!! m speechless!!!
Delete1dam mast��������vachtana gchit gele
ReplyDeleteyesss!!! मी तर केव्हाच गेलेय चौधरी सदनात राहायला ! या सगळे एक एक करून पटापट !!!😍😇
Deleteजळगाव जनता बॅंक दरवर्षी भुलाबाई उत्सव साजरा करते.तुमचा गुलाबाई तर त्यांचा भुलाबा़ई या शब्दामुळे संभ्रम हाेताे.
ReplyDeleteतुम्ही खान्देश संस्कृती जतन करीत हाेत्या.व मनसाेक्त आनंद लुटत हाेता.वाचूनआनंद वाटला.
गुलाबाई हा आपला खान्देशी शब्द , तर भुलाबाई विदर्भातील शब्द . खान्देशात साजरा करतात तर गुलाबाई हाच शब्द वापरायला हवाय खरतर . तो शब्द चुकीचा नाही पण त्यांची गल्लत होतेय आणि कुणाच्याच हे लक्षात येत नाही याची गम्मत वाटली मला , पण मी कुणाला बोलले नाही , आता तुम्ही विषय काढला म्हणून हे सविस्तर विवरण केले . असो मनःपूर्वक धन्यवाद !🙏😊
DeleteNice
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !😊
Deleteहे तर फारच भारी. केवढी धमाल करायचात तुम्ही. आमच्या पंढरपुरात आम्ही हादगा खेळायचो, नवरात्रीचे नऊ दिवस.. पुण्यात त्याला भोंडला म्हणतात. पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरून सात, नऊ किंवा सोळा गाणी म्हणायची.. सगळी पारंपारिक.. दरवर्षी हादग्यात किंवा गाण्याच्या भेंड्यात म्हणायची फक्त.. शेवटी खिरापत ओळखून खायची.. ओळखणार्या मुलीला थोडी जास्त मिळायची..��
ReplyDeleteतुझ्या लेखाने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या..
आपल्या रूम च्या मागे भिडेंच्या गच्चीवर मुली भोंडला खेळत ..... आठवते का तुला ? आम्हीखूप धम्माल करायचो हे मात्र अगदी खरंय !😍💃💃💃🤩
Deleteमग काय आज कोजागिरी 😁 त्या निमित्ताने लेख वाचायला मिळाला.खूप सारे क्षण अप्रतिम बारकाव्याने वर्णिले आहेत.वाचून मजा आली....आम्ही आताही कॉलेजरूपी school madhye hi हादगा enjoy karto. पूण्यात भोंडला म्हणतात गुलाबाईला.माला तर बुवा खिरापत जाम आवडते.
DeleteLekh khup sundar zalay... Vachun punha junya aathvani tajya zalya... Aamhi dekhil ashach prakare Bhulabai ani kojagiri sajari karayacho��
ReplyDeleteअरे तेच तर ते जगलेले सुंदर क्षण वाचून आठवून परत अनुभवणे अणि त्यातील आनंद परत लुटणे!
Deleteयासाठीच चालू आहे हा सगळा प्रपंच!
खूप आनंद होतो मला जेव्हा वाचक सुद्धा ते क्षण आठवून त्यातील आनंद परत उपभोगत असतात 😍
सप्रेम धन्यवाद 😍 🙏
वर्णन खूपच उत्कृष्ट आहे.तुम्हास असे हुबेहूब वर्णन करायला कसे जमते ? तो मी विचार करत आहे.
ReplyDeleteफार काही नाही, भूतकाळातील जगलेले क्षण नीट आठवायचे अणि ते तसेच्या तसे लिहून काढायचे!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
छान उत्कृष्ट वर्णन केले आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏!!
Deleteवा हे तर फारच भारी आम्हीपण गुलाबाई बसवायचं लहानपणी त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या अगदी असेच आम्ही करायचो खूप छान
ReplyDeleteछान होते ना ते दिवस खुप!! धन्यवाद 🙏
DeleteKhup chan. lahan astana me pn bhulabai bhuloji anayche ghari . Mjjja yaychi khup saglya friends chya ghri jaun gani mhanaychi n khauchi vat bghaychi. Khau olkhayla tr khup majja yaychi. Mhinabhar nusta gondhal. N mg kojagirila udyapn tehi saadi ghalib. Khup dhamal keleli laganpni
ReplyDeleteरम्य ते दिवस रम्य त्या आठवणी 😊😍
DeleteWowww.....gulabai amhi pn khup majja karaycho lahanpani👌👌👌😍😍😍
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Deleteगच्चीवरील गमतीजमती कोजागिरी गुलाबाई खूप खूप जुन्या आठवणी करून मन आनंदी झाले आणि आनंदी पावसासारखा आठवणीचा आनंदी पाऊस झाला👍🌹
ReplyDeleteआनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहीकडे .....हेच अपेक्षित आहे मला या लिखाणातुन , खुप सारे धन्यवाद !!🙏🤩
Deleteखूप मस्त वर्णन केलात मला तर गुलाबाई हे नव्यानेच माहीत झालय, त्यात मसाला दूध आणी फरसाण तर अप्रतिमच
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteवर्षाली तुझ्यामुळे मला गुलाबाई काय ते कळले खुप छान संकल्पना अगदी लहानपणीचा भातुकली सारखा.खुपच छान लिहीले आहे.👌👌
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 😍🤩
Deleteभारीच..अगदीं नाविण्यपूर्ण वर्णन केले आहे. हादगा आम्ही schooldays मध्ये खेळायचो.ह्याला आपल्या देशात गुलाबाई म्हणतात it sounds different..मस्तch📝लिहलय.आपल्या डान्सचे काही फोटोज पाहण्यास मिळाले असते तर अजुन आनंद झाला असता.
ReplyDeleteतेव्हा फोटो वगैरे प्रकार नव्हते फारसे, त्यामुळे ते फोटो नव्हतेच so ते दाखवूच शकत नाही 😄
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
वाचलं मी .खूपच सुंदर .अगदी गावची गच्ची आठवली .परकर पोलक्यातल्या बालमैत्रीणी आठवल्या .अगदी क्षणभर गच्चीवर फिरून आली लहान बालिका होवून .छान वाटलं वाचून .इतक्या छान छान गोष्टी वाचायला मिळतात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteवावा फारच सुंदर आठवणी!! आनंदी धन्यवाद, या आठवण आम्हाला सांगितल्याबद्दल 🙏🤩😍
Deleteनेहमी प्रमाणे सुक्ष्म निरिक्षणातून व आपल्या दांडग्या स्मरणशक्तीमुळे कोजागिरी भाग १ व २ उत्तम प्रकारे मांडले गेले आहेत . आम्ही फरसाणच्या ऐवजी भजी व धनजी शेठ यांचे सुप्रसिद्ध गाठी शेव आताही खातो.अभिनंदन ��������������
ReplyDeleteवावा खूपच नशिबवान आहात! धनाजी शेठ कडचे गाठी शेव खायला मिळतात तुम्हाला!
Deleteआनंदी धन्यवाद 🙏
दोन्ही भाग खूप छान. आमच्याही अशाच आठवणी आहेत फक्त फरसाण ऐवजी कचोरी किंवा समोसा सोबतीला असे. नेहमी लवकर झोपायची शिस्त होती त्याला हा दिवस सुद्धा अपवाद नसे. नेमकी यावेळी सहामाही परीक्षा असे त्यामुळे फार काही जागता येत नसे. पण आजोबा, आजी, मामा , मामी आणि आमची फॅमिली मिळून कोजागिरी करत असू.
ReplyDeleteलेखामुळे त्या आठवणी वर आल्या म्हणून तुम्हाला खुप धन्यवाद
वावा छानच आठवणी! आनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteकोजागिरी गमती जमती वाचून छान वाटले.गुलाबाईची गाणी ही खास खानदेशी असावी.माहिती नवीन आहे.तू वर्णन सविस्तर व चित्रदर्शी केले आहेस.खूप छान.आवडले.आनंद वाटला.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫 💐
DeleteNostalgic☺️
ReplyDeleteI hv done all this in childhood.
I hv stayed with grandparents at Bhusawal till 4th std
छान छान भुतकाळ नजरेसमोर येतो .धन्यवाद मॕडमजी
ReplyDeleteमी पण माझ्या बालपणात गेली मस्त
ReplyDeleteभुलवणारी भुलाबाई अन भूलोजी शिवशंकर बालपणीच्या सुंदर आठवणी🌷
ReplyDeleteताई जुन्या आठवणी जागवल्यात. आम्ही पण मोठे होईपर्यंत हा आनंद लुटला आहे. आता ही मजा नाही. खुप छान लिहिले
ReplyDeleteखूप छान. मलापण आमच्या ईथे खेळलेल्या भोंडलाची आठवण आली. गेले ते दिवस पण आठवणी खूप आनंद देऊन जातात.👌🏼
ReplyDeleteलेख वाचून बालपणी च्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता तर मुलांना गुलाबाई माहितच नाही. त्यानी ती कधी बघितलीच नाही. पण मी त्याना गाणे म्हणून दाखवते.त्यामुळे गाणे त्याना माहिती आहे. आता चित्र दाखवील 🙏🙏
ReplyDeleteभुलवणारी भुलाबाई अन भूलोजी शिवशंकर ...भुलाबाईचे गाणी, खाऊ, टिपऱ्या आणि मजा बालपणीच्या सुंदर आठवणी जाग्या केल्यात छानच
ReplyDeleteआमच्या शिवाजी नगरच्या घरात देखील माझी बहिण गुलाबाई बसवायची रोज तिच्या मैत्रीणी मिळून संध्याकाळी भूलाबाई ची गाणी म्हणत. त्यामुळे ब-याचदा मी देखील तेथेच असायचो यामुळे आम्हाला पण गाणी पाठ झाली होती. प्रसादाच्या वेळी तर मजाच यायची. कारण प्रसाद ओळखावा लागायचा आई लहानपणी तो खाऊचा डबा माझ्या हातात देऊन हलवायला लावायची. खाऊ खायची घाई तर सर्वानाच असायची. सर्वाची खाऊ ओळखण्याची धरपड टिप-या खेळणे, गाणी म्हाणणे आज आपल्या लेख वाचल्या मुळे जसच्या तस चित्र माझ्या डोळ्या समोर उभे राहीले एक दोन गाणी आठवण्याचा प्रयत्न देखील झाला दोन तिन लाईन आठवल्या छान ताई लेख फार सुंदर रेखाटला 🙏
ReplyDelete