कोजागिरी - १
(गच्चीवरील गमती जमती )
अगदी लहान पणापासून म्हणजे अगदी मला समजायला लागल्यापासून आठवते ..... आमच्याकडे कायमच अगदी न चुकता दर वर्षी कोजागिरी साजरी केली जात असे . अर्थातच माझ्या आयुष्यातील पहिली कोजागिरी साजरी झाली ती 'चौधरी सदन' च्याच गच्चीवर ! अगदी जन्मापासून ते माझं लग्न होऊन चार-पाच वर्ष होईपर्यंत आमचे एकत्र कुटुंब होते . त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो घरातलीच सगळी मंडळी असली तरी खूप मज्जा येत असे .
कोजागिरीचा बेत म्हणजे आटवलेले दूध - बासुंदी आणि त्या गोडाने तोंड बोळू नये म्हणून सोबतीला दुकानातून आयते विकत आणलेले फरसाण असे . हे फक्त आजच्या म्हणजे कोजागिरीच्या दिवशी वर्षातून एकदाच आणले जात असे !
दुसरे, खरं म्हणजे पहिले आणि महत्वाचे म्हणजे आटवलेले दूध - बासुंदी . हे सुद्धा आजच्या दिवशी वर्षातील इतर दिवसापेक्षा एका अर्थाने फार वेगळे असे . बाकी दिवशी केलेली बासुंदी ही घरातच गॅस वर आटवलेली असे . सगळ्यांच्या गच्चीवर पाण्याच्या टाक्या बांधून घेतलेल्या असतं ,अजूनही असतात किंवा सिंटेक्सच्या आणून ठेवलेल्या असतात . अशा आमच्याही गच्चीवर बांधून घेतलेल्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या . पण अजून एक खास आणि खूप अद्वितीय गोष्ट होती , ती म्हणजे एक भली मोठ्ठी भट्टी सुध्दा बांधून घेतली होती . ही शक्कल आमच्या आईने(आजीने) लढवलेली ! बांधकाम चालू असतानाच तिने बाबांना(आजोबा) सांगून बांधून घेतली होती . भट्टी म्हणजे मातीची चूल असते तशीच फक्त मोठ्ठ्या आकाराची आणि माती न वापरता बांधकामात केलेली . मग या भट्टीचा उपयोग अशा एक एक खास कारणाने होत असे . जे खूप सोयीचे होत असे . त्यातील एक खास कारण म्हणजे कोजागिरी ! तर हे कोजागिरी चे दूध आटवण्याचे काम या भट्टीवर होत असे . एव्हढे मोठे एकत्र कुटुंब असल्याने काहीच थोड्याथोडक्याने भागत नसे . कोजागिरीचे दूध सुद्धा अगदी दहा लिटर किंवा त्यापेक्षा जास्तच लागत असे . मग ते तिथेच गच्चीवरच्या भट्टीवरच आटवले जात असे आणि मग ते तिथेच गार केले जात असे , त्यातच चंद्र बघून , चंद्र किरणं त्यात पडू दिले जात असत पिण्यापुर्वी . बरं दूध आटविणायचे भांडे सुद्धा साधे सुधे नाहीच . एक भले मोठे पितळीचे भांडे बाहेरून छान पितळी पिवळे चकचकीत शिवाय आतून कल्हई केल्यामुळे चंदेरी चकचकीत !
दरवर्षी या दुधात सुका मेवा घातला जात असे . पण सगळ्या सुक्यामेव्याचे बारीक काप किंवा तुकडे करून घातले जात असत. एका वर्षी मात्र काय कसे कुणास ठाऊक पण हा सगळा सुका मेवा , थोडे दूध आणि खवा सुद्धा, बहुशः सगळे मिक्सर मध्ये घालून त्यांची पेस्ट केली होती . बहुशः त्या वेळीच नवीन मिक्सर घरात आलं असावं , म्हणून त्याचा वापर झाला असावा . मग ही पेस्ट दुधात उकळतांना घातली . त्या वर्षी मग ती बासुंदी किंवा आटवलेले दूध न होता त्याची चक्क रबडीच झाली होती . आमच्या घरात सगळेच रबडीचे सुद्धा चाहते . मग काय त्या वर्षी रबडीवरच ताव मारला सगळ्यांनी कोजागिरीच्या दिवशी !
ही अशी सगळी साग्र संगीत तयारी झाली की मुख्य कार्यक्रम म्हणजे चांदण्यात सगळ्यांनी एकत्र बसून छान हसत खेळत , गप्पा मारत दूध पिणे आणि सोबत फरसाण . घरातील मोठी मंडळी छान आवडीने त्या दुधावर ताव मारत . पण मुलं ती मुलंच . तशीच आम्ही सुध्दा मुलं . आम्हाला त्या दुधापेक्षा फरसाण मध्ये जास्त इंटरेस्ट ! कारण ते वर्षातून एकदाच येई घरी आणि एकदाच खायला मिळे. बासुंदी चे तसे नव्हते . ती वर्षातून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणाने होतच असे . तेव्हा ती मिळतच असे . आणि ती खूप आवडत पण असे. अजूनही आठवते ती छान घट्ट पण पांढरी शुभ्र बासुंदी, त्यात छान सढळ हाताने, भांड्यानेच ओतलेलं तूप आणि मग त्यात पोळी कुस्करून खायची .....अहाहा....आत्ता सुध्दा नजरेसमोर येतेय आणि जिभेवर चवही रेंगाळते आहे . पण आज कोजागिरी आणि फरसाण खायची वर्षातील एकमेव संधी . मग आम्ही त्या संधी चा पुरेपूर फायदा करून घेत असू . मग आमचे दादा म्हणत वेड्या आहेत या मुली छान माल माल सोडून भुस्सा खाताय भुस्सा !
मग मोठ्या मंडळींच्या बराच वेळ गप्पा गोष्टी चालत असतं . पण आम्ही मात्र फरसाण खाऊन आणि दूध पिऊन झाल्यावर गच्चीवरच पेंगायला लागून तिथेच झोपी जात असू . मग रात्री सगळे आटोपले की मम्मी आम्हाला उठवीत असे, खाली जाऊन झोपण्यासाठी . मग तश्याच अर्धवट झोपेत जीना उतरून खाली जाऊन झोपून जात असू .......
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
१५ मे २०१९
याच लेखाची ही ध्वनिफीत
Rabdi n farsan😋
ReplyDeleteKhup chan likhan kele aahes tai. Asech chan chan lekh takat ja. Vachayla khup maja yete.
Bhumika
भूमी ...... काय काय व्हायला लागले वाचल्या बरोब्बर !!?? मस्तच वाटले तुझा अभिप्राय वाचून .....!!!
Deleteआठवणीतील कोजागिरी बालपणी वेगळीच मज्जा असायची ताई काळाच्या पडद्याआड बऱ्याच गोष्टी हातातून निघून जातात आणि उरतात फक्त आठवणी त्या आठवणींचा सुखद आनंद मात्र मनाला गारवा देणाऱ्या असतो.
DeleteCongratulations.Very nice writing akka.waiting for next .
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद !!! नाव नाहीये , पण तू सोनुच ना?
Delete😍😍
ReplyDeleteताई !!! आठवणींच्या लाल लाल बदामांची डोळ्यात फारच गर्दी झालेली दिसतेय !!!
DeleteChan Kojagiri Celebration.Ata ti maja nahich.
ReplyDeleteSonal Chaudhari
Deleteसोनल , खरंय तू म्हणतेस ते !!! फारच श्रीमंत होते आपले बालपण ......
Delete👌varanan 👍
ReplyDeleteTya pitali bhadatil basundi ti pan chulivaril ,🌕 natil basundi aahaha😋
खूप सारे धन्यवाद ! पण कोण हे ? मला वाटतंय तू वर्षा , हो ना ??
Delete😊
Deleteछान...
ReplyDeleteमनःपूर्वक आभार !!! कोण आपण ? नाव कळेल?
DeleteI am sure now you know wiseness of our parents. शुक्रवारी फक्त मिळणारे शेव मुरमुरे आठवतात अजून विठ्ठल मंदिराच्या ओट्यावर उभा राहून पाहिलेला पोळा
ReplyDeleteकिती आठवणी नशिराबाद च्या
तुम्ही लिहीत रहा छान लिहताय
yeah definietly our ancestors were wise , no doubt about it........तुम्ही नशिराबाद मध्ये खूपच हरवून गेलेले दिसत आहात , पण खरंच त्या लिखाणाला खूप वेळ लागेल अजून .... चौधरी सदन लिहून पूर्ण झाल्यावर मगच सुरुवात होईल ...... मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteखूप छान.. भट्टी चे pic असते तर बासुंदी मध्ये केशर पडले असते.... 🙂
ReplyDeleteकोणाचा अभिप्राय आहे माहित नाही , पण एकदम छान ! पण तितकाच त्रासदायक सुद्धा आहे मनाला . आधीच ही भट्टी माझ्या मनाच्या फार जवळची , पण अगदी आताच ३-४ महिन्यापूर्वीच मला एक धक्काच बसला , आता ती भट्टी नाहीच तिथे हे कळले आणि आधी तिचे कधीच फोटो काढलेले नाहीत ..... मी ती कोणालाच दाखवू शकत नाही .... क्षमस्व .......
Delete😍😍😋😋😋
ReplyDelete:-) :-) :-)
DeletePurn dekhawa ubha kelas dolyasamor
ReplyDeleteMast
खूप सारे धन्यवाद ! पण कोण आपण , नाव कळेल?
Delete😍😍😍😍😍
ReplyDeletethnk q !!!
DeleteHy vrushali tuze donhi lekh khoop chan lihiles wachun mi pan maze maherche gharatil aathwanit gele mazi pan maheri joint family hoti àasech chan jaa tula khoop shubhecha
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !!! पण परत कुणाचा अभिप्राय ? ते न कळल्याने नीट कनेक्ट होता येत नाहीये , आणि संवाद पूर्ण झाल्याचे समाधान नाही मिळत .....तरी कृपया प्रत्येकाने न विसरता आपले नाव नमूद करावे ही विनंती
ReplyDeleteKhup chan Tai, Kojagiri chya aathvani tajya zalya 😊
ReplyDelete- Nikhil
Deleteमनःपूर्वक धन्यवाद ! निखिल ,प्रस्तावनेत नमूद केलंय ना , वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलावे .... माझा हेतू सफळ संपूर्ण !!! :-)
Deleteखूप छान हुबेहुब कोजागरी चे वातावरण निर्माण झाल्या सारखे वाटले
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !!! कुणाचा अभिप्राय ? नाव सांगाल का कृपया ?
Delete😍😍😍😋😋
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !आपले नाव नमूद करावे ही विनंती
Deleteखूप सुंदर लिखाण आहे ... सगळे कसे डोळ्यासमोर उभे राहिले... लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ... परत एकदा लहानपण यावे असे वाटु लागले ...
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद !!! कोण आपण ? नाव?
DeletePallavi Patil Ingle
Deleteखूप खूप मनापासून धन्यवाद , पल्लवी , खूप खूप आनंद झाला तुला इकडे बघून !!!
Deleteआनंदी पावसात बासुंदी चा स्वाद घेत कोजागिरीच्या चांदण्यात न्हाहुन निघालो.... रत्ना काकू
ReplyDeleteवा वा ! मस्तच काकू ! खूप खूप मनापासून धन्यवाद
Deleteआनंदी पावसात बासुंदी चा स्वाद घेत कोजागिरीच्या चांदण्यात न्हाहुन निघालो खुप छान लिहिले आहेस.
ReplyDeleteरत्ना भोरे
वा वा ! मस्तच काकू ! खूप खूप मनापासून धन्यवाद !!!!
DeleteKhupch chan varnan kele ahe akka
ReplyDeleteखूप खूप मनापासून धन्यवाद !!!!
DeleteAgadi lekh vachun samor chitra ubhe rahile. Balapanachya aatha vani malahi aathavaly. Khup chan varnan keles. Tya veli kharach kahi padarth, farsan ekadach milat ase. Explain very nicely, feeling real
ReplyDelete💖❤💕खूप खूप छान वाटले आणि आनंद झाला हा अभिप्राय वाचून !!! पण नाव नसल्याने कळलं नाही कुणाचा ते , नाव कळेल का प्लिज ... 😍
Deleteखूप सुंदर वर्णन !! वाचत असतानाच बासुंदी चा स्वाद जिभेवर रेंगाळत होता. फारच छान !! पुन्हा एकदा तुझे अभिनंदन !!! मकरंद
Deleteवावा ! आत्ता खऱ्या अर्थाने बासुंदी मधुर झाली , ग्लास मधील बासुंदीवर मकरंदच्या (मधाच्या ) दोन मधुर रेषा घातल्यावर !!! मकरंद 😍💕💖
ReplyDeleteमस्त लेख आहे. कोजागिरी चे वर्णन अगदी हुबेहुब केले आहेस. माझ्या पण जुन्या आठवणी त्यामुळे जागृत झाल्या. तुम्ही लोक एकत्र कुटुंब असल्यामुळे छान एन्जॉय करत होता. Rabdi च्या वर्णनामुळे तोंडाला पाणी आले . तुझी लेखन पद्धती मस्त असल्याने आम्हाला पण तुमच्या celebration मध्ये सहभागी होता आले, त्या बद्दल धन्यवाद
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद साहेब ! लेखनातून सर्वत्र आनंद पसरविणे , मुख्य हेतू ! 😊😍💖
Delete'आनंदी पाऊस' वाचून चिंब भिजून निघालो! चला मास्तर आणि इंजिनिअर असलेल्या पाटील घराण्यात पहिलीच लेखिका उदयास आली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! संसारात गुरफटून लेखन करणं काही सोपी गोष्ट नाही.वाचन आणि अनुभव जेवढं जास्त तितकं लिखाण सशक्त होतं.लिखाण करून त्याला ब्लॉगवर प्रसिद्ध करणं ही मोठ्या धाडसाची बाब आहे.लिखाणाचं सातत्य टिकून राहो हीच आमच्याकडून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
ReplyDeleteआपला नाना एपीपी.
नाना , नमस्कार ......तुमचा अभिप्राय वाचाता वाचताच डोळ्यात पाणीच आले , पुढचे नीट वाचता येईना ...... खूप खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली ...... आत्मविश्वास वाढला ......असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या ! 🙏🙏🙏
ReplyDeleteखूपच छान वर्णन..
ReplyDeleteमनिषा मनःपूर्वक धन्यवाद!!!
DeleteKhoop chhan tai, mala pan athvate aamhi lahan astanna jevha tumchya junya ghari yet hoto, tevha mavshi chya hatachi idli, dosa khoop khaycho.
ReplyDeleteJitu, varangaon
व्वा गुड्डू ! तुला इथे बघून खूप आनंद झाला ! तुझी स्मरण शक्ती फारच छान आहे ......सगळं नीट आठवतेय तुला !!!
DeleteHey , khup Chaan Varsha , please keep writing . ....Vanita
ReplyDeleteवनिता खूप आनंद झाला तुला इथे बघून ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!!💖💖💖💃💃💃
Deleteछान वर्षा आता खरंच तुझ्या या लिखाणाचे वाचन करुन आम्हाला ही आमचे बामणोदच्या घरातील सर्व आठवणी ताज्या झाल्या आज आबा असते तर त्यांना ही अभिमान वाटला असता तुझा छान लिहितेस असेच लिहित रहा
Deleteरवी मामा खूप खूप आनंद झाला तुम्हाला इथे भेटून😇😍 !! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 ! असेच इथे नियमीत भेटाल अशी आशा करते !!! आबांचाही उल्लेख आला , या सगळ्या जेष्ठ मंडळींचे आशीर्वादाची सकारात्मकता सोबत असतेच कायम , त्यामुळे कायम आत्मविश्वास वाटतो !!!😇😇😇
Deleteअगं कल्पना मावशी आहे फैजपूरची
Deleteओह नो ! माफ करा मावशी😢 , नाव नसल्याने मला नीट कळले नाही आणि मला वाटले रवी मामांनीच अभिप्राय दिलाय ! खूपच आनंद झाला तुम्हाला इकडे भेटून😇😍💖 ! अशाच नियमित भेटत जा इकडे !!! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
Deleteवॉव
ReplyDeleteकोजागिरीच्या मजा औरच होती करायला पण मजा येत होती
ReplyDeleteU SAID IT PAPPA!!! खरंच खूपच मज्जा येत होती करायला सुद्धा !!😍😍😍
Deleteकोजागिरी वर्णन खूपच छान केले आहेस माझे माहेरी पण कोजागिरी असायची पण तुमच्या कडची कोजागिरी काही वेगळीच वाटली मोठी चूल बांधून घेणं किती हौस असेल ना? छान लिहतेस लिहीत रहा
ReplyDeleteसगळ्यात आधी तुमचे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनातात🙏 !! आणि मनःपूर्वक धन्यवाद 🙏!! हो खरंय घरात सगळेच हौशी आणि खाण्याचे शौकीन !!! 😊😃😍
Deleteएकत्र कुटुंबाची गच्चीतील "आनंदमय काेजागिरीचे "वास्तव वर्णन खूपच छान��हे वर्णन आपल्याला बालपणात घेऊन जाते.ती काेप-यातील चुल ,पातेल्यातील खदखदणारे दूध,हास्य विनाेदातून उडणारे फवारे,गच्चीवरील कलकलाट,सारे आनंदमय वातावरण वर्षा तू अनुभवून वर्णन केले आहे.खूपच छान������
ReplyDeleteहो , हे सगळे मी बरीच वर्ष अनुभवलेले आहे . मुख्य म्हणजे इतक्या लहानपणी अनुभवलेले मला आता सुद्धा नीट आठवते आहे . त्यामुळे जणू मला माझे बालपण जगण्याची , अनुभवण्याची एक संधीच मिळाली आहे . आणि शिवाय जोडीला हा कौतुकाचा वर्षाव ! चंद्रमोहन सरांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे ! तुमचेही अगदी मनापासून आभार इतक्या साऱ्या कौतुकाबद्दल !🙏🙏😇😇
DeleteNice lekh
ReplyDeletethnk u so much!!
Deleteअरे वा.. मलाही फरसाण खायला यावंसं वाटतंय..
ReplyDeleteये ये , लगेच ये . मस्त मज्जा करू या
Deleteकोजागिरी पोर्णिमेबद्दल छान लिहिले आहेस.
ReplyDeleteआज काल सोशल मीडिया मुळे ही सर्व मजा आणि कुटुंब बांधिलकी सर्व जवळपास बंद झाले आहे.
हो अगदी खरंय!
Deleteसगळेच सोशल मीडिया वर जास्तच सोशल झालेत अणि आयुष्य जगतांना पूर्णपणे अॅण्टी सोशल....
धन्यवाद 🙏 ☺
कोजागिरी पौर्णिमा बाबतीत खुप छान वर्णन केले आहे वर्षा ताई 👍👍
ReplyDeleteमामा खुप मनःपूर्वक स्वागत आहे तुमचे या चौधरी सदनात 🙏 खुप खुप आनंद झाला तुम्हाला ईथे भेटून...
Deleteखुप आभार 🙏 😇 😍
Khup chan. Hostel chya kojagiri pornimechi athavn zali. Evdh moth dudhach patel nvt so dudhachya pudhchya ch chandrachya prakashat thevle kya amhi����.n 12 vajta te ts dudh pilel amhi. Khup majja aleli. Khup chan athvan krun dili tumhi. Thank you
ReplyDeleteवावा धम्माल गम्मत केलीत की तुम्ही ! मज्जा आली वाचायला ! धन्यवाद , ही आगळी वेगळी गम्मत सांगितल्याबद्दल !!🤩🤩🤩
Deleteवाह क्या बात है खरच खूपच छान
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!😍😇
Deleteकोजागिरी पौर्णिमेला मजाच यायची मला माझे घर बघून खूप बरे वाटते
ReplyDeleteकिती गोड! खुप सारे प्रेम! 😍 ❤️
DeleteKhup chan lekh lihilay tai...saglya junya lahanpanichya athvani athavlya👌👌😍😍😍😍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteKhup apratim lekh ahe....balpanicha athwani punha athawalya....
ReplyDeleteमनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
DeleteKhup chhan lihile ahe tai.Apratim lekh
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteकोजागिरी पौर्णिमेचे खुप छान वर्णन केले आहे.असे वाटले समोरच सर्व घडले आहे.👌👌👍👍
ReplyDeleteकोजागिरी पोर्णिमेतील चंद्राच्या दुधात पडणाऱ्या "शितल प्रतिबिंबा'प्रमाणे ह्या आपल्या आठवणीरूपी लेखही थंडावा देतोय.आहाहा...फरसाण,रबडी-बासुंदी,दुधाने भरलेले ग्लास its lipsmacking..& cheers full लेख.....������
ReplyDeleteवर्षा खुप खुप छान आठवणी सांगतांना तू पुन्हा आम्हां सर्वांनाच बालपणात घेऊन जाते खरचं तुझं कौतुकास्पद लिखाण फारच सुंदर असतं असेंच लिहीत रहा
ReplyDeleteहे सारे खूप कमाल आहे...ह्या कोजागरीतील जागरण वर्णन,नुसती धमाल आहे...आनंदीरूपी आठवणी बालपणीच्या काळात घेऊन जातात.बासुंदी,फरसाण एक नंबर. ही 'आनंदीकोजागिरी 'तुमच्या माझ्या मनात कायमची राहू दे.
ReplyDeleteमस्त वर्णन. दूध आटवण्यासाठी गच्चीवराल भट्टीचा उपयोग बिबड्यांचा घाटा शिजवण्यासाठीही केला गेला असेल न… कारण माझ्या आईकडे लोखंडी शेगडी गच्चीवर नेऊन घाटा शिजवत असे. पूर्वी खरच फरसाण फारच क्वचितच घरी. आणत.
ReplyDeleteखूपच छान कोजागिरी मस्तच आठवंणी👌👍😋
ReplyDeleteवर्षाताई, आपण गोजागिरी निमित्ताने आपल्या आठवणी सांगून आम्हालाही भूतकाळात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार. येणारी कोजागिरी अशीच संस्मरणीय ठरावी यासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभंभवतु
ReplyDeleteआनंदी कोजागिरी.!
--प्रा.डाॅ.राम नेमाडे डोंबिवली.
हा लेख "कितीदा नव्याने वाचला तरीही" पुन्हा वाचावासा वाटतो...तोच चंद्रमा नभात,दूधाचा पेला,त्यात चंद्रबिंब आणी फरसाण यांचा आनंद कसा लुटावा..हे सुरेख वर्णिले आहे.
ReplyDelete.."प्रतिक्षणी असा आनंद लुटला तर कोजागिरी ही कालातीत राहते."ती मावळत नाही."-संजिता.
खुप छान लेखन. आजच कोजागिरी आहे अस वाटतय
ReplyDeleteखुप सुंदर वर्णन! आम्ही आमच्या गच्चीवर 5-6कुटुंब साजरी करत त्याची आठवण झाली.
ReplyDeleteताई आम्ही 7-8परिवार मिळुन आमच्या गच्चीवर साजरी करायचो. 25 लिटर दूध आठवायचं. खुपच उत्साह सकाळपासून. त्याबरोबर घरीच खूप सारी भेळ बनवायचो रात्री. अविस्मरणीय आठवणी आहेत त्या! आता मुलांकडे शहरात आल्याने ह्या आनंदाला मुकलो. आता घरातल्या घरात कोजागरी 😊
ReplyDeleteअमृततुल्य
ReplyDeleteशुभ्र चंद्रकिरणे चमचमत्या तारका आणि अमृततुल्य दूध मस्तच
ReplyDeleteस्मरणाच्या अवकाशातून झरे स्मृतींचा नित्य झरा
ReplyDeleteचला भरा रे चला भरा कलश स्मृतींचे चला भरा.
काही स्मृती सुखदायी असतात व त्या आपल्या इतिहासाचा भाग असतात.पुढच्या पिढ्यांना तो कळला पाहिजे.आमचे ही एकत्र परिवार असतांनाच आम्ही पाच वर्षे दिवाळीला एक आमच्या लेखांचा अंक काढायचो.त्यात आजोबा,आजी,कुटुंबाशी निगडीत लोक यांच्याबद्दलची लेख लिहायचो.त्यामुळे ती माणसे नव्या पिढीला कळली.तुमचा प्रयास त्याच दिशेने असावा असे वाटते.
खुप छान वाटले वाचून.