Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

द्विलक्ष पूर्ती (featured...)

  द्विलक्ष पूर्ती   (featured...) 🪻आनंदी पाऊस... 🌿आनंदी प्रवास... 🌾एक आनंदी प्रवास... ☘️कितीतरी आनंदी क्षण... 🌷अजून एक अतिशय आनंदाचा क्षण!🌷  आनंदी पावसाच्या प्रवासाच्या वाटेवर!  आज आनंदी पावसाचे दोन लक्ष वेळा वाचन झालेले आहे!  हे वाचक जगभरातील ७० पेक्षा जास्त देशातून आहेत. या देशांची यादी खालील प्रमाणे आहे - १. भारत 🇮🇳 २. अमेरिका 🇺🇸  ३. इस्राईल  🇮🇱 ४. चीन 🇨🇳 ५. नेदरलँड 🇳🇱 ६. इंग्लंड 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 ७. जर्मनी 🇩🇪 ८. इंडोनेशिया 🇮🇩 ९. सिंगापोर 🇸🇬 १०. हाँग काँग  ११. फ्रांस 🇫🇷 १२. रशिया  १३. तुर्की ☪️ १४. दुबई  १५. जपान 🇯🇵 १६. कॅनडा 🇨🇦 १७. आयर्लंड 🇮🇪 १८. स्वित्झर्लंड 🇨🇭 १९. कतार 🇶🇦 २०. ऑस्ट्रेलिया 🇦🇺 २१. म्यानमार 🇲🇲 २२. न्यूझीलंड  २३. स्विडन🇸🇪  २४. कुवेत 🇰🇼 २५. सौदी अरेबिया  २६. युक्रेन 🇺🇦 २७. ओमान 🇴🇲 २८. साउथ आफ्रिका   २९. फिनलँड 🇫🇮 ३०. नेपाळ 🇳🇵 ३१. पेरू 🇵🇪 ३२. नॉर्वे 🇳🇴 ३३. तैवान 🇹🇼  ३४. केमन आयलंड 🏝️ ३५. ब्राझील 🇧🇷 ३६. उगांडा 🇺🇬 ३७. जाॅर्डन 🇯🇴 ३८. सर्...

🪔शुभ चिन्हं आणि प्रतिकं🪔 (featured)

🪔🪔शुभ चिन्हं आणि प्रतिकं🪔 (featured)  गोपद्म  अंगणात किंवा देवाजवळ किंवा  अन्य कुठे रांगोळी काढतो त्या ठिकाणी  रांगोळीच्या वरच्या बाजूला डाव्या अणि  उजव्या बाजूला ही गोपद्म अशा पद्धतीने  किंवा दोन उभ्या रेषा, एक गोपद्म आणि परत  दोन उभ्या रेषा किंवा दोन दोन उभ्या रेषांच्या  मध्ये बाजू बाजूला किंवा वर खाली एक एक  गोपद्म काढली जातात.  कारण प्राचीन काळापासून गोमातेचे एक  आगळे अणि महत्त्वाचे स्थान आहे, मानवी जीवनात.  तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा एक मुख्य हेतू!  लक्ष्मीची पावलं निरनिराळ्या पद्धतीने रेखाटलेली  लक्ष्मीची पावलं निरनिराळ्या पद्धतीने रेखाटलेली  लक्ष्मीची पावलं साधारणपणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी  काढली जातात.  हल्ली तर फक्त लक्ष्मीच सर्वांच्या प्रेमाची झालीये,  त्यामुळे या लक्ष्मी पावलांचा अनेक माध्यमातून  सुळसुळाट झालेला दिसतो...  सूर्य  सूर्याचे प्रतीक म्हणुन असे सूर्य-मंडल  रेखाटले जाते.  अर्थातच सूर्या बद्द्ल आपला आदरभाव  व्यक्त करून त्याचे पूजन करण्...

🌀🌀पारंपारिक भाजणीची चकली🌀 (थोडं चविष्ट)

🌀🌀पारंपारिक भाजणीची चकली🌀  (थोडं चविष्ट)                दिवाळी! दिवाळी म्हटलं की दिवे, झगमगाट, दिवाळी अंक, कपडेलत्ते, दाग-दागिने वगैरे येतेच. तथापि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे फराळ! कारण याचा थेट संबंध पोटाशी, भुकेशी येतो. मानवाचीच नाही तर या विश्वातील प्रत्येक महाकाय जीवापासून ते अगदी सूक्ष्म जीवापर्यंत सगळ्यात पहिली जाणीव असते, ती म्हणजे भूक! बाकीच्या सगळ्या जाणीवा नंतर म्हणजे पोट भरल्यावर... त्यामुळे मानवाची सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गरज म्हणजे अन्न. अगदी सुरवातीला वानारावस्थेत असतांना मानवाने कंद-मुळे आणि शिकार करून आपली भूक भागविली. पुढे पुढे जसा मानवाची आणि मानवी मेंदूचा विकास होत गेला तसतसा त्याचा इतर गोष्टीत जसा फरक पडत गेला, तसाच त्याच्या अन्ना मध्येही फरक पडत गेला. मुख्य कारण म्हणजे अग्नी आणि त्यानंतर शेतीचा शोध. मेंदू विकसित होत गेला तसा तो वेगवेगळे प्रयोग करू लागला. आणि आज तर अगदी वाट्टेल तसे प्रयोग करतो आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अर्थातच हा प्रवास थोड्या काळाचा नव्हता, करोडो वर्षांचा प्रवास आहे. खर तर ...

🌱🌱खानदेशी शु-पालकाचं पिठलं🌱🌱 (थोडं चविष्ट)

🌱🌱  खानदेशी शु-पालकाचं पिठलं🌱🌱  (थोडं चविष्ट!)                 पिठलं! महाराष्ट्राच्या प्रत्येक भागांत, अगदी कानाकोपऱ्यात केला जाणारा पदार्थ. नाव एकच, पदार्थ एकच तथापि प्रत्येक भागातील पद्धत, चव मात्र अगदी खास आणि आगळी वेगळी. आज अर्थातच खानदेशातील एक खास पिठल्याची गोष्ट! शु-पालकाच्या पिठल्याची!                 बाकी सगळ्यांप्रमाणे कांदा-लसूण घालून पिठलं केलेच जाते. त्याचेही पोट प्रकार आहेतच. एक म्हणजे अगदी पातळ पिठलं, जे फक्त भातासोबत खाता येते. दुसरे म्हणजे यापेक्षा थोडे घट्ट, जे भाकरी, पोळी, भात अशा सगळ्यांसोबत खाता येते. तिसरे म्हणजे अगदी कोरडे, तव्यावरचं पिठलं, जे ज्वारीच्या भाकरी सोबत खाल्ले जाते. आमच्याकडे एक म्हण आहे, पिठलं आणि डोकं उठलं! माझे तसेच होते, अगदी लहानपणी. नंतर थोडे मोठं झाल्यावर पहिल्या प्रकारचं पिठलं खूप आवडू लागले, ते अगदी आजतागायत! मस्त थंडी पडलीये किंवा पाऊस पडतोय, मग गरम गरम पिठलं, वाफाळता भात आणि त्यावर साजूक तुपाची धार आहाहा, स्वर...