Skip to main content

एक मायाळू अभ्यासक (काही अनुभवलेलं...)

 एक मायाळू अभ्यासक

(काही अनुभवलेलं...) 



निमित्त, धरोहर यात्रा.

भोपाळ शहरातील छोट्याश्या हाॅटेल मधील पिटुकली खोली. 
पहाटे ४-५ दरम्यानची वेळ.
खोलीत मी एकटीच झोपलेली. ठरल्या प्रमाणे, दोन विद्यार्थिनी आल्या. एक माझ्या बाजूला झोपणार अणि एक जमिनीवर घातलेल्या गादीवर झोपणार असे ठरलेले. तथापि आलेल्या दोघींनाही जमिनीवर घातलेल्या गादीवरच झोपायचे होते. त्यांचा झोपण्याचा अजिबातच मूड नव्हता, त्यांना गप्पा मारायच्या होत्या. त्यांना थोडे समजावले, पुढचा अख्खा दिवस खूप थकवणारा असणार आहे, तेव्हा आता जे काय दोन-तीन तास मिळाले आहेत, तेव्हढा वेळ झोपून घ्या, विश्रांती घ्या. झोपल्या मग. काही मिनिटातच हळूच दार वाजले. दरवाजा उघडला, एक महिला आत आल्या. त्या दोघींना अगदी हळू आवाजात सांगितले, ही आपली खोली नाही. झोपलेल्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या आणि बाहेर या. त्यांनी मला नीटसे पाहिलेही नसावे, ओळखणे तर फारच दूर. कारण या आधी आम्ही कधी भेटलोच नव्हतो. 
                              मी मात्र त्याक्षणीच ओळखले होते! डॉ माया पाटील मॅम! कारण मला आधीच कल्पना होती, त्या, त्यांच्या विद्यार्थ्यांसह या धरोहर यात्रेत सहभागी होणार आहेत. या पूर्वी मी त्यांच्याबद्दल, त्यांच्या विषयाबद्दल, त्यातील त्यांच्या कामाबद्दल, अभ्यासाबद्दल ऐकून होते. त्यातल्या त्यात ठळक काम म्हणजे त्यांना नरखेड येथे उत्खननात सापडलेला मानवी सांगाडा! या सगळ्यांमुळे त्यांना भेटायची, त्यांच्याशी मैत्री करण्याची, त्यांच्या विषयाबद्दल आणि कामाबद्दल जाणून घेण्याची, शक्य असेल तर त्यांच्या कामात सहभागी होण्याची मनापासून इच्छा होती. 
                        आता या धरोहर यात्रेमुळे त्यांना फक्त, बघण्याची, भेटण्याची, मैत्री करण्याची नाही तर अख्खा एक आठवडा त्यांच्या सहवासात घालविण्याची, त्यांच्या विषयांतील अनेक स्थळांना भेट देऊन, त्यावर त्यांचे मार्गदर्शन मिळण्याची नामी संधी मिळणार होती! 
                         धरोहर यात्रेतील सर्व स्थळांना भेट दिली आणि त्यांचे मार्गदर्शन तर लाभलेच, तथापि त्यांच्यातील एक शिक्षिका, एक महिला, एक मैत्रीण, त्यांच्यातील माणुसकी या आणि अशा अनेक पैलूंचे दर्शन झाले. त्यांच्याकडे असलेले ज्ञान, त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्याची तळमळ, त्यांची आई होऊन त्यांची काळजी घेणे, सोबतच त्यांना योग्य ती शिस्त लावणे अशा किती तरी गोष्टी प्रत्यक्ष बघायला, अनुभवायला मिळाल्या. अगदी साधी जेवण्याची गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष, म्हणजे त्याने जेवायच्या आधी हात धुतलेत की नाही?, प्रत्येकाने जेवायला घेतले की नाही ह्या सगळ्याची खात्री करून मगच या हातात ताट घेत असतं! काय हेवा वाटला होता, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा! अशा शिक्षिका मिळण्यासाठी भाग्यवानच असावे लागते. वाटून गेले अशा शिक्षिका आपल्याला सुद्धा लाभल्या तर...
                                  ही धरोहर यात्रा संपवून घरी आलो आणि काही काळातच सर्वत्र टाळेबंदी लागली. कारण सर्वज्ञात आहेच, कोरोना. जगभरच सगळ्यांचेच जीवन विस्कळीत झाले. कुणालाच नीटसे कळेना, नेमके काय करावे, कसे करावे, हे सगळे किती काळ चालणार? वगैरे वगैरे. मी सुद्धा याला अपवाद नव्हते. पार गोंधळून गेले, खूप घाबरायला झाले. वेळ भरपूर, पण काय करावे कळेना. कुठूनसे कळले, अमक्या विषयावर वेबिनार आहे. मग तिथे हजर राहण्याचे ठरविले आणि केले तसे. हळूहळू करत सगळ्याच विषयांवर वेबिनार सुरु झाल्या आणि ज्ञानार्जनाची आयातीच, तेही घर बसल्या संधी मिळाली, ज्ञानगंगा घरातच आली. मग काय त्यात मनसोक्त डुंबून जाता आले. यातच एके दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची जाहिरात आली, पुरातत्व विषयात पदवीत्तर अभ्यास क्रमाची. चौथीत असल्यापासून हा विषय शिकण्याची इच्छा होती, तथापि या अभ्यासक्रमाची माहिती नसल्याने, ते शक्य झाले नाही. आता मात्र ते शक्य होणार होते तेही, काही काळासाठी तरी, घरातूनच. 
                                  लगेचच दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळविली. एक म्हणजे मी त्यासाठी पात्र आहे का? आणि दुसरे म्हणजे मी प्रवेश घेतल्याने कुणा विद्यार्थ्याची जागा तर जाणार नाही ना?
सकारात्मक प्रतिसाद आल्या बरोब्बर लगेचच प्रवेश घेतला. काही महिन्यापूर्वीच त्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटला होता, त्यांना डॉ माया पाटील शिक्षिका म्हणून लाभल्यामुळे. आता तर काय त्या माझ्या सुद्धा शिक्षिका, काय आनंद झाला म्हणून सांगू! जे सगळे पाहिले, ते आता मला स्वतःला अनुभवायला मिळणार होते. 
                               अभ्यासक्रम सुरु झाला, सगळे तास ऑनलाईन प्रणाली द्वारे सुरु झाले. अगदी नियमित प्रत्यक्ष नाही, पण आभासी भेटीची संधी अगदी दररोज मिळू लागली. आधी त्यांचे शिकविणे, मग त्यावरील शंका निरसन, चर्चा. अतिशय सुंदर अनुभव! कुणालाही एखादा मुद्दा समजला नाही तर, त्या अगदी न कंटाळता कितीही वेळा समजावून सांगत. तास ऑनलाईन प्रणाली द्वारे होत, तरी सुद्धा शक्य असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला प्रत्यक्ष दाखवून, समजावून सांगत. तसेच अधून मधून परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, क्षेत्र भेट, अभ्यास सहल अशा विविध कारणांनी प्रत्यक्ष भेटीची सुद्धा संधी उपलब्ध झाली. 
                             या प्रत्येक वेळी प्रवास, राहणे, जेवण-खाणे, विद्यापीठात येणे-जाणे अशा अगदी बारीक-सारीक गोष्टींबद्दल सुद्धा त्या विचारणा करीत. एका क्षेत्र-भेटीच्या वेळी आमची राहण्याची सोय होऊ शकत नव्हती, तर त्यांनी आमची सगळीच सोय त्यांच्या घरीच केली, आमचे सगळ्या प्रकारचे लाड पुरविले, आमच्या आवडीचे खायला घालून. रात्री घरी आल्यावर सुद्धा आम्हाला शिकवीत, आमच्या शंका निरसन करीत. मला, माझ्या शोध-प्रबंधासाठी एक पुस्तकं हवे होते. ते त्यांच्याकडे होते. रात्री बारा वाजून गेलेले, तरीही त्यांनी ते शोधून काढले, मला दिले, त्यानंतरच त्या झोपल्या. परत पहाटे लवकर उठून क्षेत्र-भेटीस जायचे होतेच. त्यांच्याकडे असलेले ज्ञान त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्याची तळमळ कायमच दिसते, अनुभवायला मिळते! 
                                   दररोजचा तास असो की अभ्यास सहल असो, कुठलाही विषय असो, अगदी तन्मयतेने शिकवत, तहान-भूक विसरून शिकवीत. आम्ही फक्त ऐकण्याचे काम करत असू, पण आम्हाला वेळोवेळी तहान लागे. पण त्या तास संपेपर्यंत पाणी पिण्यासाठी सुद्धा थांबत नसत.
                                   अभ्यास सहल असताना सुद्धा तेच. विद्यार्थी थकून जात, नुसते बघूनच, बसून जात, पाणी पीत. तथापि मॅम न कधी थकत, न कधी त्यांना तहान लागे. शक्य तितका प्रत्येक विषय क्षेत्रीय भेटीतून समजावून सांगत. माझ्या शोध-प्रबंधासाठी सुद्धा त्या प्रत्यक्ष क्षेत्र-भेटीस आल्या, माझ्या सगळ्या शंकांचे निरसन केले, विषय छान समजावून दिला. किती आणि काय सांगावे त्यांच्या बद्दल! लीनता काय असते? त्यांच्याकडूनच शिकावे. विद्यार्थ्यांबद्दल प्रेम, काळजी, शिस्त, सतर्कता! मी तर प्रत्येक वेळी नव्याने अचंबित होत असते, त्यांच्या बरोबर असतांना. ज्या विद्यार्थ्यांना फी भरणे अतिशय कठीण असते, त्यांच्यासाठी त्या स्वतः त्यांची फी भरून त्यांना शिक्षण घेण्याचा मार्ग उपलब्ध करून देतात. इतकेच नाही तर ज्यांना अभ्यास सहलीसाठी अडचणी येतात, त्यांचे सहल-शुल्क स्वतः भरतात. शब्दा पलीकडले आहे सगळे!
                                   हे सगळे करत असतांना, पुरातत्व, वारसा नुसते शिकवून थांबत नाहीत. ते सगळे त्या स्वतः आचरणात सुद्धा आणतात, अगदी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा! त्यांच्या अभ्यास विषयातच नाही तर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा सगळ्या आघाड्यांवर, सर्व जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलतात. संपूर्ण यश! हाच जणू त्यांचा मंत्र आहे. या सगळ्या बरोबर त्यांचे अनेक छंद सुद्धा त्या जोपासत असतात. त्यांच्या घरी गेलेली व्यक्ती, त्यांच्या बैठकीच्या भिंतीवर लावलेली चित्रं विसरूच शकत नाही. ती त्यांनी स्वतः केलेली आहेत. त्यातील एका चित्राचा विषय आहे, सर्व पुरातत्व अभ्यासकांचा लाडका "प्रिस्ट"! 
                                  त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी दिलेले नाव. त्यांनी सर्वार्थाने सार्थ ठरविले. सर्वांवर, अगदी सजीव-निर्जीवावर मनापासून, जीव तोडून माया करून! अशा मायाळू शिक्षिका सर्वांना लाभो!
अशा या माझ्या मायाळू शिक्षिकेला, मैत्रिणीला, थोरल्या बहिणीला, एका समर्थ महिलेला, सर्वार्थाने यशस्वी स्त्रीला माझा अगदी मनापासून मायाळू नमस्कार!

(त्यांच्या सेवा-निवृत्ती दिवशी गौरवग्रंथ प्रकाशित झाला. त्यातील हा माझा लेख. )

©️आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
२८ जून २०२४ 




लाडका "प्रिस्ट किंग"
त्यांचा आणि आम्हा सर्वांचाच !
 त्यांनी चित्रित केलेला  
"प्रिस्ट किंग"



त्यांच्या सोबतीने अनुभवलेली काही स्थळं!


बीबी का मकबरा, संभाजी नगर 



औरंगाबाद गुंफा, संभाजी नगर 




सोनेरी महाल, संभाजी नगर




भोजेश्वर मंदिर, मध्य प्रदेश 




भीमबेटका, मध्य प्रदेश 



उदयपुर गुंफा, मध्य प्रदेश 



हेलीओडोरास स्तंभ, विदिशा, मध्य प्रदेश 




त्यांनी स्वतः केलेल्या 'सुशीला'ची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे!





स्वर्ग मंडपातील एक अविस्मरणीय क्षण!
हत्तर संग कुडल, सोलापूर 










Comments

  1. प्रथमेश साळुंकेJuly 05, 2024 6:53 am

    Khup sunder likhan... Waaa
    Junya athavani tajya zalya

    ReplyDelete
  2. प्रफुल्ल पाटीलJuly 05, 2024 7:12 am

    नमस्कार
    मी हा लेख वाचला. आमच्या शालेय जीवनात श्री. साने गुरुजी चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थी घडविणारे अनेक शिक्षक होते. याच परंपरेतील माया पाटील आहेत. उत्कृष्ट शब्द चित्रण आहे. सविनय नमस्कार.
    असो,.माझ्या पिढीतील डाॅ. सुभाष राणे. विद्यार्थी सहायक समिती .जळगाव यांची पण आठवण झाली. धन्यवाद

    ReplyDelete
  3. ज्योतीJuly 05, 2024 7:13 am

    Khup chhan lihly

    ReplyDelete
  4. स्वाती मोहितेJuly 05, 2024 7:14 am

    👌👌🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  5. विकास पाटीलJuly 05, 2024 7:16 am

    खूपच सुंदर लिहिलंय.

    ReplyDelete
  6. गुलाबराव पाथरकरJuly 05, 2024 7:17 am

    अशा व्यक्ती आहेत म्हणुनच अजुनही जग चालतेआहे

    ReplyDelete
  7. Khup chan lekh🙂

    ReplyDelete
  8. योग्य मार्गदर्शन मिळायला भाग्य लागते आणि ते तुम्हाला मिळाले. लिखाण खुप छान आहे आहे तुमचे 👌👌👌

    ReplyDelete
  9. भाग्यवान आहेस तू !!!!इतक्या मायाळू शिक्षिका तुला लाभल्या. पण हल्ली chya पिढीला बघता शिक्षक जरी त्याच ज्ञान देणारा असला तरी विद्यार्थी ही घेणारे दिसत नाही. त्यामुळे तुम्हा विद्यार्थी लोकांचं ही विशेष कौतुक!!!

    ReplyDelete
  10. छान आदर्श शिक्षिका..@दीपक चौधरी

    ReplyDelete
  11. सुंदर शब्दांकन... मनापासून लिहिलेले असल्यामुळे लगेच मनाशी पोहचते...

    ReplyDelete
  12. छान व्यक्तिमत्व , छान लेख 👌👌

    ReplyDelete
  13. मंदा चौधरीJuly 05, 2024 5:05 pm

    खरोखर असे शिक्षक मिळायला भाग्य लागते.मायामडमचे वर्णन खुप छान केले आहेस.

    ReplyDelete
  14. Dr Atul GajareJuly 05, 2024 5:06 pm

    Dr.Maya Patil...great personality
    You too are very lucky.

    ReplyDelete
  15. जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!

    उत्तम व्यक्तिमत्त्व व तू लिहिलेले चित्रण....असे शिक्षक खरंच अपवादानेच बघायला मिळतात. माझे ही काही शिक्षक असे होते/आहेत. त्यांच्याबद्दल आदराशिवाय दुसरी भावना नाही. 🙏🙏
    लिहिती रहा.....
    तुझ्या डॉक्टरेट चे काम कुठवर आले? ✌️✌️😀😀👌👌

    ReplyDelete
  16. व पु होलेJuly 05, 2024 5:08 pm

    असे मायाळू शिक्षक/शिक्षिका फारच अत्यल्प असतात.ते ज्यांना लाभतात ते भाग्यवान असतात.जशी की तू.

    ReplyDelete
  17. अमोल चाफळकरJuly 05, 2024 5:10 pm

    उत्तम. छान शब्दचित्र.

    ReplyDelete
  18. साकेत पाटीलJuly 05, 2024 5:12 pm

    योग्य मार्गदर्शन मिळायला भाग्य लागते आणि ते तुम्हाला मिळाले. लिखाण खुप छान आहे तुमचे

    ReplyDelete
  19. Wa sunder likhan aahe, tuzi shiknyachi echha v shikavnari pan tashich mayalu nav pan Maya 👍
    Sarv photos pan chan 👌

    ReplyDelete
  20. भारती फेगडेJuly 05, 2024 5:57 pm

    खरच हाडाच्या शिक्षिका आहेत त्या! असे शिक्षक फार दुर्मिळ 🙏🏻 खुप सुंदर व्यक्तिचित्रण.

    ReplyDelete
  21. Ek number "M.P."मय हा लेख खूपच आवडला.मायाळू शिक्षकांना आपल्या सारखं मायाळू अभ्यासू शिष्या मिळणं हे ही भाग्याचं.
    धरोहरचे सारे glimpses आवडले...
    Conservationचा त्यांचा अभ्यास गाढा आहेच.."सुशीला"all time favouriteच खरोखरच..Ek निर्जीव वस्तूच दोन सजीवांना जोडते..जुळवते...अगदी हेरिटेज structure प्रमाणे ..आजच्या काळाशी समरूप होऊन...
    अशीच मायेची सावली(साया) सर्वांना मिळू दे.-.संजिता

    ReplyDelete
  22. योगेंद्र आरेकरJuly 05, 2024 9:25 pm

    खूपछान

    ReplyDelete
  23. प्रसाद लोणकरJuly 06, 2024 6:17 am

    सुंदर झाला आहे लेख
    आपल्याला यांनी शिकवलं हे आपलं पुण्य

    ReplyDelete
  24. डॉ सुभाष ओरसकरJuly 06, 2024 6:17 am

    छान

    ReplyDelete
  25. जितेंद्र महाजनJuly 06, 2024 11:52 am

    नेहमी प्रमाणे छान 👍👍

    ReplyDelete
  26. Narendra NandeJuly 06, 2024 5:37 pm

    Very nicely penned indeed 👌🏼👌🏼👍🏻

    ReplyDelete
  27. खूप छान लिहल आहे

    ReplyDelete
  28. सुषमा माळीJuly 06, 2024 7:13 pm

    खुप छान 👌

    ReplyDelete
  29. खूप छान लेख

    ReplyDelete
  30. खूप उत्तम लिखाण

    ReplyDelete
  31. प्रा ए पी पाटीलJuly 08, 2024 6:36 pm

    माया पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रकाशित झालेल्या गौरव ग्रंथात तुझा जो लेख प्रकाशित झाला, तो आत्ताच मी वाचला. अशा निस्पृह व्यक्तिमत्त्वाच्या गौरव ग्रंथात लेख प्रसिद्ध होणं यालाही भाग्य लागतं, लायकी लागते. ती तुझ्याकडे आहे, ही खरंच समाधानाची गोष्ट आहे. माया पाटील यांची माया हस्तगत करण्याकरता तुझ्याजवळही तेवढीच ज्ञानपिपासा आणि कष्ट करण्याची तयारी आहे. हेही तितकेच खरे आहे.
    मूळ विषय सोडून, तुला जी इतिहास, पुरातत्व शास्त्र, उत्खनन यांसारख्या दुर्मिळ विषयात गोडी निर्माण झाली, हीच मुळात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व प्रपंच सांभाळून ह्या गोष्टी करणं सोपी गोष्ट नाही. परंतु तुझे धैर्य, चिकाटी, अभ्यासू वृत्ती या सर्व बाबी पाहता, तू तुझे लक्ष्य गाठशीलच, यात शंका नाही, त्यासाठी आमच्याही शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच.
    माया पाटील यांच्यासारख्या आदर्श शिक्षिकेच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा जो मायाळू स्वभाव, विद्यार्थ्यांना काय हवे, काय नको, त्यांच्या हिताचे काय आहे, विद्यार्थ्यांवर त्यांची आईप्रमाणे असलेली माया या सर्व गोष्टी वाचायला मिळाल्या, याप्रसंगी त्या किती समाधानी असतील हे मी जाणू शकतो आणि अशा प्रभृतीचा तुला सहवास लाभला, म्हणून तूही किती भाग्यवान आहेस हे ओघाने आलेच. असो, त्यांच्या निवृत्तीच्या प्रसंगी मीही त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे उर्वरित आयुष्य अत्यंत सुख समाधानाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. "राम, कृष्ण, हरी🙏🏼

    ReplyDelete
  32. Sangeeta MaratheJuly 09, 2024 1:38 pm

    You r blessed to have such teacher in today's virtual world
    Best wishes to you for the journey to become such teacher who can share her knowledge to the future students

    ReplyDelete
  33. Ar Shrikant BhateJuly 11, 2024 8:01 am

    Too good. It shows how good a teacher is and also how receptive the student is. Both of you deserve all the praise. Pl convey my respectful NMASKAR to Maya tai. 💐🙏Great teacher. Very rarely we get to study under the guidence of such loving and compassionate teacher. You are really lucky. Where does Maya tai stay. Give my regards to her and lots of love and blessings to you. Try to give what you have to the young generation. All the best. 💐🙏

    ReplyDelete
  34. खूप छान लेख लिहिला आहेस.आपले खरेच खूप भाग्य आहे.आपणाला त्या गुरू म्हणून लाभल्या.त्यांनी आपणाला खूप छान पद्धतीने शिकविले आहे.एक प्रभावी आणि सुंदर व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे.आपण खरेच खूप भाग्यवान आहोत.

    ReplyDelete
  35. राधिका टिपरेJuly 15, 2024 7:26 pm

    छान झाला आहे लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...