Skip to main content

माऊली : जीवन घटनाक्रम-५(समाधी पर्व) (featured )

 माऊली : जीवन घटनाक्रम-५  

(समाधी पर्व)

(featured )



छायाचित्र सौजन्य : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी फेसबुक पेज 


चांगदेव गर्वहरण प्रसंगानंतर ज्ञानदेवांच्या मनात समाधीचा विचार आला. परंतु निवृत्तीनाथांनी त्यांना नकार देवून त्यांची समजूत काढली. त्यांना सांगितले समाधीपूर्वी आपण सर्व संत मांदियाळीसह तीर्थयात्रा करावी. तथापि ज्ञानदेवांची इच्छा होती, ही तीर्थयात्रा करतांना नामदेवांची सोबत असावी. मग त्यांना सोबत घेण्यासाठी म्हणून ज्ञानदेवादि भावंडे पुन्हा पंढरपुरास रवाना झाली.
आज तीर्थयात्रा शब्दाचा अर्थ अतिशय संकुचित तर झालाच आहे, पण अर्थ बराच बदललाही आहे. तीर्थयात्रा म्हणजे देवदर्शन तर आहेच. परंतु त्या काळी अशा प्रकारच्या तीर्थयात्रेतून विविध ठिकाणच्या संत मांदियाळीचा सहवास मिळतो, विचार-चिंतनाची देवाण-घेवाण होते. समाजप्रबोधनाचे कार्य होते. समाजाला आपले दुःख, अडचणी व्यक्त करण्याची संधी मिळते. म्हणून तीर्थयात्रा!
पंढरपुरास जाऊन त्यांनी नामदेवांस आपल्या सोबत तीर्थयात्रेला येण्याची विनंती केली. तथापि नामदेवांनी सांगितले, मी पंढरीरायास विकले गेलो आहे. त्यामुळे मी पंढरपूर सोडू शकत नाही. तेव्हा ज्ञानदेवांनी पांडुरंगा कडून परवानगी घेतली. पंढरपूर सोडावयास तयार नसेलेल नामदेव, भागवत धर्माचा भक्तीप्रसार करीत पंजाब पर्यंत पोहोचले. नामदेव, शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब मधील चरित्रकार आहेत. नांदेड येथील गुरुद्वाराला भेट देणारे शीख बांधव आजही नरसी, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र, नामदेवांचे जन्म गाव, येथे आवर्जून भेट देतात. एव्हढेच नाही, तर ही मंडळी नरसी गावाच्या विकासासाठी धडपड करीत आहेत. 
पंढरपूरहून ही सारी संत मांदियाळी तीर्थयात्रेस निघाली. परंतु यांनी आपला प्रवास नेहमीच्या मार्गाने न करता, त्यांनी तापी तीरावरील प्रभास या तीर्थक्षेत्रापासून प्रस्थान ठेवले. ही तीर्थयात्रा साधारण तीन वर्ष चालू होती.  या तीर्थयात्रे नंतर ही संत मांदियाळी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात परतली. पंढरपुरात एकादशीचा अभूतपूर्व सोहळा साजरा  झाला, अगदी न भूतो न भविष्याती असा!
दरम्यानच्या काळात ज्ञानदेवांनी समाधी विचार परत निवृत्तीनाथांना बोलून दाखविला होता. अखेरच्या प्रसंगी निवृत्तीनाथ काहीही बोलले नाही. हीच त्यांची मूक संमती ज्ञानेश्वरांनी गृहीत धरली. मागील काही काळापासून ज्ञानदेवांच्या मनात येणारा समाधी विचार त्यांनी सर्व संत मांदियाळी समोर, पांडुरंग साक्षीने बोलून दाखविला आणि सर्वांची अनुज्ञा/संमती मागितली. कार्तिकी एकादशी नंतरच्या वद्य त्रयोदशीस आळंदीस समाधी घेण्याचे नक्की झाले. ज्ञानदेव आणि भावंडे आळंदीस निघाली. कार्तिकी एकादशी ते वद्य त्रयोदशी या सतरा-अठरा दिवसांत काय झाले असावे?, तो काळ त्यांनी कशा परिस्थितीत आणि कुठल्या विचारांत व्यतीत केला असावा? सारेच कल्पने आणि विचारा पलीकडले आहे. ज्ञानदेवांच्या समाधीची सर्व जबाबदारी नामदेवांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि 'पंढरीचा पोहा' (पोहा म्हणजे जथ्था) घेऊन ते सुद्धा आळंदीत दाखल झाले. 
या समाधी सोहळ्याचे अतिशय सुंदर वर्णन नामदेवांनी सत्तर अभंग रचून केलेले आहे. त्यांनी ते सारे प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने त्या अभंगांतून, त्या प्रसंगाचे चलत चित्रच आपल्या डोळ्यासमोर दिसते. असे म्हणत म्हणत आदरणीय ऋषीतुल्य डॉ. रा श्री मोरवंचीकर यांनी आपल्या 'समाधीतील स्पंदने' या ग्रंथातून समाधी सोहळ्याचे इतके उत्कट चित्रं उभे केले आहे की, आपल्याला वाटते ते सुद्धा या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहे. वाचकाला सुद्धा या सोहळ्यात सहभागी होण्याची संधीच मिळते. सर्वस्पर्शी, सखोल, सूक्ष्म अभ्यास काय चमत्कार घडवू शकतो, याचे प्रत्यक्ष प्रमाणच आहे, आपल्या समोर!
हा समाधी सोहळा प्रत्यक्षात तीन दिवस चालला. दैवी सोहळा, स्वर्गीय सोहळा! दशमीच्या दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल-रुक्मिणी सुद्धा आळंदीस दाखल झाले. दशमीला भजन-कीर्तन झाले. एकादशीला उपवास, रात्री काल्याचे कीर्तन आणि जागरण. कीर्तनात स्वतः पांडुरंग नाचला आणि नाचता नाचता पदर कधी गळून पडला कुणासही भान नव्हते. द्वादशीला पारायण आणि महाभोजने झाली. साऱ्या पंगतीत विठ्ठलांनी तूप वाढले.(तूप वाढणे याचा फार गहन अर्थ आहे.) रुक्मिणीने स्वतः ज्ञानदेवांचे पान तयार केले आणि पांडुरंगाने स्वतःच्या हाताने ज्ञानदेवांना अमृतपान करवले. असे स्वप्न पडल्याचे ज्ञानदेवांनी या पूर्वीच एका अभंगात लिहून ठेवले आहे. त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले.
समाधीचा मुहूर्त निघताच आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातील नंदी खालील गुंफा स्वच्छ करून घेतली गेली. त्यात समाधीचे आसन तयार केले गेले. ज्ञानदेवांची इच्छा होती म्हणून तिथे "भावार्थ-दीपिका" सुद्धा ठेवण्यात आली. प्रत्यक्ष समाधी मुहूर्तावर जो काही कल्लोळ माजला, त्याचे नामदेवांनी अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. "नामा म्हणे देवा पेटला हुताशन l  करा समाधान निवृत्तीचे ll विठ्ठल स्वतः निवृत्तीनाथांचे आणि सोपान-मुक्ताईचे सांत्वन करीत होते, सर्व संत-महंत, ऋषी-मुनी यांची समजूत घालत होते आणि सर्वांना समाधी स्थानाकडे रवाना होण्यास सांगत होते. या सगळ्यात विठ्ठल सुद्धा हळूहळू दुःखी होत जात होते.
ज्ञानदेव, निवृत्तीनाथांची अखेरची भेट घेण्यास येतात आणि त्यांना हात जोडून विनंती करतात, माझी काही चूक झाली असेल, तर माझे अपराध पोटात घेऊन मला क्षमा करावी आणि आपला गुरुकृपेचा हात कायम असू द्या. हे ऐकताच निवृत्तीनाथ अतिशय भावनाविवश झाले, त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ते वारंवार ज्ञानदेवांना आलिंगन देत राहिले आणि त्यांच्या मुखावरून हात फिरवत ढसाढसा रडू लागले. ते पाहून जमलेल्या साऱ्याच मंडळींच्या दुःखाचा बांध फुटला आणि अश्रुधारा वाहू लागल्या. 
पांडुरंगाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आवेग आवरण्याचा थोडा प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानदेवांचा एक हात धरला आणि निवृत्तीनाथांनी दुसरा हात धरून समाधी स्थानाच्या दिशेने प्रस्थान केले. दरम्यानच्या काळात प्रत्येकजण ज्ञानदेवांचे मिळेल तसे दर्शन घेण्यासाठी धडपडत होते. समाधी गुंफेत आधी पांडुरंग उतरले, समाधीस्थळ ठीक असल्याची खात्री केली. त्यानंतर ज्ञानदेवांचा हात धरून त्यांना पायऱ्या उतरवून आत नेले. विठ्ठलानेच ज्ञानदेवांना समाधी आसनावर बसविले, तर समाधीसाठी आवश्यक असलेल्या कुंडलिनीस जागृत करण्याचे काम निवृत्तीनाथांनी करून त्यांचे नेत्र बंद केले. वद्य त्रयोदशी शके १२१५ (इ.स.१२९३)! निवृत्तीनाथांनी सर्व भक्त मंडळीस समाधी स्थानातून बाहेर काढले. तथापि त्यांच्या ध्यान्यात आले, पांडुरंग आताच आहे. मग निवृत्ती स्वतः परत आंत गेले. पांडुरंगाचा हात धरून त्यांना बाहेर काढले आणि स्वःताच्या हाताने समाधीची शीळा लावली. त्यानंतर दुःखाचा जो काही महापूर आला, तो शब्दांत पकडणे केवळ अशक्य...
"नाम म्हणे आता लोपला दिनकर l 
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ll"

🌺🌺🌺
🪔🪔🪔
🌺🌺🌺



 
 ©️आनंदी पाउस 
माऊली : जीवन घटनाक्रम-५
(featured)
६ जुलै २०२३  

Comments

  1. उषा पाटीलJuly 21, 2023 7:12 am

    माऊलींच्या समाधी पर्व सुदंर वर्णन 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  2. गुलाबराव पाथरकरJuly 21, 2023 8:09 am

    माऊलीचे अवघे जीवन केवळ अखिल विश्वाला प्रेमाचा पाठ शिकविण्यासाठीच होते .त्यांचे चरित्र मनाला चटका लावून जाते ......धन्यवाद मॕडमजी.

    ReplyDelete
  3. प्रभात चौधरीJuly 21, 2023 8:21 am

    वृषाली ताई हे लेखन उत्तमच आहे.ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या कुटुंबीयांना खुप हाल ,वेदना, अपमान सहन करत करत जीवन जगावे लागले.मृत्यूनंतर त्यांचे महत्त्व लोकांना पटले.ते ब्राह्मण असूनही स्वजातीय मंडळींनी त्यांना छळले म्हणजे त्याकाळी इतरांवर खुपचं अन्याय झाला असावा.
    माझा त्याविषयी फारसा अभ्यास नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  4. मंजुषा चौधरीJuly 21, 2023 9:25 am

    खूप सुंदर आणि वर्णन पण सुंदर 🥰💐🌹😘

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  5. अप्रतिम

    ReplyDelete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. रुपाली मुतालिकJuly 21, 2023 12:10 pm

    काय बोलणार ? वाचताना भरून आले … डोळे ओले झाले … माऊली माऊली 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. कितीही वेळा वाचले तरी हेच होते...
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  8. कुसुम आत्याJuly 21, 2023 12:19 pm

    मन अगदी हेलावून गेले

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी धन्यवाद आत्या 💜

      Delete
  9. अगदी बरोबर छान

    ReplyDelete
  10. स्वाती चौधरीJuly 21, 2023 2:08 pm

    वाचताना भरून आले खूप छान 🙏🙏

    ReplyDelete
  11. मंदा चौधरीJuly 21, 2023 2:43 pm

    समाधी सोहळ्याचे वर्णन खुपच सुंदर झाले आहे .मस्त.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  12. सोनवटकरJuly 21, 2023 2:44 pm

    शब्दात व्यक्त होता येणार नाही...खूपच सुंदर लिहिलय...जणू मी तिथे प्रत्यक्ष पहिलं अस वाटत होत.👏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏

      Delete
  13. डॉ सुभाष ओरसकरJuly 21, 2023 3:13 pm

    एवढा अभ्यास कसा केलास ? फारच खोल विवेचन केलयस. सुंदर 👌🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  14. खूपच सुंदर वर्णन मनाला हेलावून टाकणारे ,👌🙏

    ReplyDelete
  15. ||Sare खूपच दैवी अनुभव वाचताना माझ्या visual मेमरीमध्ये आपोआप द्रृश्ये उभारली. खूपच मार्मिकपणे वर्णिले आहेस. अगदी गाढा अभ्यासात्मक सिक्वेन्स असून तो खूप भावला माला..संजिता म्हणे अगदी.प्रेरणात्मकच "एक peace ऑफ mind . || -

    ReplyDelete
    Replies
    1. This means a lot to me! 😍
      खूप खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  16. रेखा अत्तरदेJuly 21, 2023 7:24 pm

    समाधी सोहळ्याचे वर्णन किती वेळा वाचले तरी तो सोहळाच इतका ह्रद्य होता की मन आणी डोळे भरून येतात 👌🙏🙏
    तूझ्या लिखाणामूळे पून:प्रत्यय आला 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. हो, अगदी खरंय! 😍
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  17. Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  18. रंजना राणेJuly 23, 2023 9:04 am

    माऊलीच्या समाधी सोहळ्याचे वर्णन ऐकून मन भावुक झाले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

    ReplyDelete
    Replies
    1. स्नेहाळ धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  19. Samadhi parv vachtana man bharun aale g 🙏
    Khup chan lihile aahes samorch sarv chirt ubhe rahate 👌👌
    Gyaneshvar Mauli 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  20. स्मिता पाटीलJuly 23, 2023 10:50 pm

    समाधी चे वर्णन खूपच छान केलेले आहे

    ReplyDelete
  21. प्रा अरुण पाटीलJuly 26, 2023 1:25 pm

    "माऊली: जीवन घटनाक्रम" मधील समाधी पर्व या भागात ज्ञानदेवांच्या समाधीचे खूपच हृदयांगम असे चित्रण मनाला हेलावून जाते. चांगदेव-भेटीपासून तर थेट समाधी पर्यंतचा घटनाक्रम अगदी सविस्तरपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात लेखिकेने आपले लेखन कौशल्य पणाला लावलेले आहे.
    ज्ञानदेवादी चौघं भावंडांबरोबर संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि स्वतः विठ्ठल यांचाही तीर्थयात्रेतील सहभाग हा आषाढी एकादशीच्या वारीत वारकऱ्यांना सर्वांमध्ये कसा विठ्ठल दिसतो, याची आठवण करून देतो, तसेच "निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी .... नामा करांगुळी धरी" यात संत जनाबाईंनी आपल्या अभंगातून किती सुंदर रीतीने वर्णन केले आहे याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही.
    "समाधीतील स्पंदने" कार डॉ. मोरवंचीकर यांनी समाधी सोहळ्याचे इतके उत्कट चित्र उभे केले आहे, की आपल्याला वाटते ते सुद्धा या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, या ओळींतून तर लेखिकेच्या गुरुभक्तीच्या पातळीच्या उंचीची कल्पना करता येते.
    गुरूंचा असा वरदहस्त असल्याशिवाय इतकं सहज लिखाण होत नाही हेच खरं!
    ज्ञानदेवांना समाधीस्थळाकडे नेताना निवृत्तीनाथांना झालेले दुःख, तसेच प्रत्यक्ष पांडुरंगाला झालेला भावनांचा आवेग यांचे वर्णन वाचून तर वाचकांच्या डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहत नाही. निवृत्तीनाथांनी स्वतःच्या हाताने अशा या संजीवनी समाधीच्या विवराची शिळा बसवली याचे वर्णन नामदेवांनी "लोपला दिनकर" असे का केलेले आहे हे लक्षात येते आणि "आनंदी पावसा"तील ही "दुःखद" सर मनाला काही वेळ का होईना विषण्ण करून सोडते.
    लेखिकेला खरंच खूप खूप धन्यवाद!🙏🏼

    ReplyDelete
  22. अतिशय सुंदर, भावपूर्ण व भक्तिपूर्ण वर्णन.
    श्री ज्ञानेश्वर माऊली...!! 🙏🙏🚩🚩🙏🙏

    ReplyDelete
  23. अभ्यासपूर्ण लेख.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  24. अनिता पाठकAugust 04, 2023 7:32 am

    आज सकाळी फार गडबड नसल्याने what's app मधले pending लेख ,माहिती वाचायचीच..असं ठरवलं होतं .🙂 म्हणून आज राहिलेलं सर्व पाहून झालं.
    माऊली ....पण सगळे भाग सुंदर लिहीलेत.आधी एकच भाग वाचून झाला होता..आता बाकीचे पण वाचले..छानच..खरं तर हे आधी माहित होतंच ..पण तरीही वाचताना..परत छान वाटलं.🙏

    ReplyDelete
  25. ज्ञानदेवांच्या लेखमालिकेतील हे शेवटचं पुष्प तितकंच वेधक झालेलं आहे. ह्या लेखाचे दोन स्थूल असे मला जाणवणारे भाग म्हणजे , एक तर तीर्थ यात्रा, आणी दुसरे व महत्त्वाचे म्हणजे समाधीचा प्रसंग. तीर्थ यात्रेच्या वर्णनात संत नामदेवांचा पंजाब पर्यंतचा प्रवास वर्णन केला आहेस, पण त्यावेळी ज्ञानदेव त्यांच्या बरोबर नव्हते का?, कारण पंजाब मध्ये संत नामदेव जास्ती प्रसिद्ध आहेत. तीर्थ यात्रेची कल्पना म्हणजे ज्ञानदेवांनी समाधी आधी ठरवून केलेली नीरवानिरव वाटते. तीर्थ यात्रेचा तत्कालीन अर्थ खरच वेगळा आणी संतांच्या दृष्टीकोनातून अतिशय विचारपूर्ण वाटला.

    समाधी प्रसंग तर फारच उठावदार आणी भावनिक झाला आहे.समाधीतील स्पंदने वाचायचा योग नाही आला पण तो दैवी प्रसंग अगदी हुबेहूब उभा केला आहेस. त्या दैवी सोहोळ्याचा प्रत्यक्षपूर्ती आनंद तू नेमक्या शब्दात आम्हा वाचकापर्यंत पोहोचवला आहेस. नामदेवांना प्रयाण करताना जसे वैकुंठातून विमान आल़े होते , तसे समाधी सोहोळ्यात विठ्ठल आणी रखुमाईनी जातीने हजेरी लावली असणार. सगळ्यांचे दुःखाचे कढ लिखाणात अगदी जाणवले. धाकटा भाऊ जिवंत समाधी घेतोय त्यामुळे निवृत्ती नाथांच्या मनाची काय घालमेल झाली असेल ह्याची कल्पना आली. दुःखाच्या त्या महापुरात त्या ज्ञान तेजस्वी दिनकराने हसत हसत घेतलेली समाधी चटका लाऊन गेली. एकंदरीत लिखाण फारच अप्रतिम उठलेले आहे. ज्ञानदेवांच्या आयुष्य क्रमातील सगळ्या पर्वांची सांगता त्याच उत्कटतेने तू केली आहेस. ही सगळीच लेख मालिका तुझ्या लेखन , अभ्यास आणी सादरीकरण कौशल्याने स्मरणात राहील. Good luck

    ReplyDelete
  26. भारती फेगडेNovember 28, 2024 3:41 pm

    शब्दातीत!!! आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो अशी प्रचीती आली! खूप खूप हृदयस्पर्शी वर्णन 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻💐

    ReplyDelete
  27. कोकिळा ढाकेNovember 28, 2024 3:43 pm

    नमस्कार ताई मनोहरा पुराण पर्यंत सर्व भाग वाचून झाले . खूप छान सहज ओघवत्या भाषेत लिखाण आहे . विसोबा खेचर मला फक्त , नामदेवांचे गुरू व पिंडी वर पाय ठेवून झोपलेले एवढंच माहिती होतं . मुक्ताई व विसोबा आणि हे विसोबा खेचर म्हणजे ज्ञानदेव भावंडांना त्रास देणारे माहिती नव्हते . खूप दिवसांपूर्वी वाचलेले , वाचनात आले असेल पण आता लक्षात नव्हते .
    आपल्या लिखाणातून पुन्हा काही गोष्टी नव्याने उमगल्या .
    मनःपूर्वक धन्यवाद व पुढील लेखन प्रवासासाठी शुभेच्छा .

    ReplyDelete
  28. उषा पाटीलNovember 29, 2024 7:13 am

    ज्ञानेश्वर यांच्या समाधी सोहळ्याचे खूपच सुंदर वर्णन, तू जे वर्णन रेखाटले आहेस त्याला तोड नाही, पूर्ण सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला खूपच छान मन भरून आले, वयाने अतिशय कमी असलेल्या ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...