Skip to main content

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...२ (चित्रं मालिका)

  वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...२ 

(चित्रं मालिका)



 अनिल अवचट यांच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर
 चित्र आहे, तेच बघून तसेच चित्र काढण्याचा प्रयत्न! 




 त्याच पुस्तकातील एक चित्र, 
आवडले, मग तेही काढण्याचा प्रयत्न केला! 




एकदा असेच विचार करता वाटले, 
झाडाची जमीनीवर जशी रचना असते, 
तशीच जमीनीच्या खाली सुद्धा असते 
थोडक्यात प्रतिबिंब! 
(फक्त जमीनीच्या वरच्या भागात 
पानं, फूलं, फळं असतात 
तर जमीनी खाली, यातील काहीही नसते.)
मग ते लगेचच काढून सुद्धा पाहिले! 




वारली शैलीतील झाड




वारली शैलीतील अजून एक झाड! 


आनंदी पाऊस 
(चित्रं मालिका )
 मे २०२३

Comments

  1. खूपच सुंदर आहेत सर्व चित्र

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  2. खूप मस्त ताई सगळेच चित्र ...
    प्रतिबिंब सूपर ... 👌

    ReplyDelete
  3. खूप छान 👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर माझ आवडता विषय 🌳🥰

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  5. मस्त छायाचित्रे....कलाकार आहेसच तू...👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  6. सर्व चित्रे छानच👌👌
    जमिनीखालील प्रतिबिंब चित्र,👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  7. व्वा! मस्तच!
    जमिनीखालचे प्रतिबिंब तर खूपच सुंदर!
    वारली मलापण आवडते पण शिकून घ्यायचे जमलेच नाही .
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  8. दिनेशJuly 29, 2023 9:10 am

    छान आहेत चिमणी पण खूप मस्त आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  9. सुंदर👌🏼

    ReplyDelete
  10. 👌👌👍👍

    ReplyDelete
  11. किती सुरेखाक्रृती रेखाटलेली आहेत सगळी चित्रें...प्रतिबिंबातील symmetrical झाडाक्रृती व वारली शैलीतील रेखाटलेली पर्णाक्रृती फारच आवडल्या... एकरंगसंगतीतील चित्रे रेखाटली त्यामूळे मस्तच वाटतात...पुढील चित्रमालिकेचे भाग पाहण्यास उत्सुक आहेच...(ता.क.: काही फुलेपण रेखाटावी.....उदा.गुलाब,सोन चाफा,निशिगंध,जास्वंद,चाफा, इ.आपल्या आवडीचं रेखाटा)-
    -स.न.वि.वि. संजिता

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की प्रयत्न करीन ☺️
      कधी ते मात्र सांगू शकत नाही
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  12. मनीषा पाटीलJuly 31, 2023 12:57 pm

    खूप सुंदर आहेत सर्व चित्र 👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  13. 😊hirwa gar nisarg pahatana nehmich Maan prasann hote
    Tuzi zadanchi Chitra khoop sunder kadhli aahes vishes jamikhalil zadache pratibimb Chita surekh👌
    Zadawar pakshi baslet udat aahet apratim sunder
    Tuzetil kalakarala👏

    ReplyDelete
  14. सगळीच रेखाचित्रे एका पेक्षा एक सरस आहेत. नुसत्या रेखांच्या माध्यामातून झाडे उभी करायची म्हणजे त्या ताकदीची अंगात कला असावी लागते, आणी ती तू तुझ्या चित्रांनी सिद्ध केलेली आहेस. झाडांची पाने, फांद्या आणी जमिनीखालची मुळे अगदी जिवंत काढलेली आहेस. जमिनी खालची मुळे आणी वारली शैली हे प्रकार वेगळेपणामुळे उठून दिसतात. लेखिका ही उत्तम चित्रकार पण आह़े हा मुद्दा पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...