भाग-५ (निवडक रा श्री मो) 🪔🪔🪔 🌷🌷🌷 🪔संत आणि संतकार्य 🪔 🪔मातृभूमी साठी संतांचे योगदान-एक वेगळा दृष्टीकोन!🪔 🌷🌷🌷 🪔🪔🪔 ज्ञानदेवांच्या व्यक्तीमत्वात तत्त्वज्ञान(इंटरप्रिटेटिव्ह) व काव्य(क्रिएटिव्ह) ह्या परस्परविरोधी प्रवाहांचा विहंगम संगम झाल्याचे स्पष्ट होते. सच्चं भण गोदावरी 🌷🌷🌷 🪔🪔🪔 🌷🌷🌷 नामदेवांनी ज्ञानोत्तर भक्तीचा प्रसार पंढरपूर तथा महाराष्ट्रभर केला एवढेच नसून त्यांनी भक्ती धर्माची पताका पंजाब मधील अमृतसर (घुमन) पर्यंत पोहोचविली. म्हणून शीख धर्म संस्थापक गुरु नानकांनी आपल्या लिखाणातून (गुरु ग्रंथ साहिब) त्यांना अमर केले आहे आणि आजही शिखांमध्ये नामदेवांचे स्थान अत्यंत पुजनिय आहे. नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट देणारे यात्रेकरू आवर्जून नामदेवांच्या नरसी गावाला भेट देतात हे विशेष होय. सच्चं भण गोदावरी 🌷🌷🌷 🪔🪔🪔 🌷🌷🌷 ज्ञानदेवांनी एकनाथांच्या स्वप्नात जाऊन आळंदी येथील समाधी अवस्थेमध्ये आपल्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळीचा फास आवळला जात असून त्या त्रासातून आपली मुक्तता करावी असा दृष्टांत दिला. याचाच अर्थ समाजातील ज्ञानदेवां...