मुंबई - १ माझ्या मनातील बदलते चित्र
(काही अनुभवलेलं ...)
आज माझ्या कामाने मुंबईत आलेय . आज दिवसभराची सगळी कामं , सगळी धावपळ संपली आहे .... थोडा निवांत वेळ आहे .... लिहिण्याचा मूड पण आला एकदम . मनात विचार आला मुंबईवरच लिहावे आणि एकदम मस्त वाटले मनात हा विचार येताक्षणी ! मला समजायला लागल्या पासून ते आत्ता या क्षणापर्यंत वेगवेगळ्या कारणाने मुंबईचा संदर्भ येत होता आणि मुंबई बद्दल चे माझ्या मनातले विचार आणि मनातले स्थान कसेकसे बदलत गेले , याची एक शॉर्ट फिल्मचं डोळ्यासमोर तरळून गेली ! ती आता शब्द रूपात तुमच्या समोर मांडते .
अगदी लहानपणी सर्वात पहिली ओळख आठवते मुंबईची ती म्हणजे .... माझी ताई अगदी लहान असताना तिला घेऊन माझे मम्मी -दादा (आई वडील ) मुंबई ला घेऊन गेलेले . तिथे तिला राणीच्या बागेत फिरायला घेऊन गेलेले . तेव्हा तिथे लहान मुलांसाठी एक टॉय ट्रेन होती . त्यात तिला बसविलेले . त्यात तिला इतकी मज्जा आली की , ती त्या टॉय ट्रेन मधून खाली उतारायलाच तयार नव्हती ! अर्थातच हे सगळं मम्मी दादांच्या तोंडून ऐकीव . पण तेव्हा ते ऐकत असताना डोळ्यासमोर मुंबई म्हणजे राणीचा बाग ..... त्यातील ती छोटी टॉय ट्रेन आणि त्यात बसलेली ताई ! हेच दृष्य डोळ्यासमोर येत असे . आज सुद्धा तेव्हा ते कल्पित केलेले दृष्य माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते . एक सांगायचे या बद्दल म्हणजे तेव्हा ताई बद्दल ते कौतुकवजा बोलणे ऐकून मनात एक प्रकारची असूया वाटायची आणि राग सुद्धा यायचा , मम्मी दादा तिलाच घेऊन गेले मला नाही .
थोडं मोठं झाल्यावर आणि थोडं समजायला लागल्यावर कळले की माझ्या दादांच शिक्षण मुंबईत झालाय . ते त्या काळचे व्ही . जे . टी . आय . चे विध्यार्थी ! त्याचा अभिमान वाटू लागला आणि दिवसागणिक आज पर्यंत तो वाढतच आहे ! मग मुंबई चे मनात एक वेगळेच आत्मीय आदराचे स्थान निर्माण झाले . त्या दिवसांची त्यांच्या अनुभवाची फारशी माहिती नव्हती आणि आजही माहिती नाहीये !( प्रयत्न चालूच आहेत माझे .......आशा करू या हे वाचल्यानंतर तरी ते सांगतील थोडे फार अनुभव ) पण एक आठवण आहे आणि ती आजही माझ्या ती चांगलीच आठवणीत आहे . ही आठवण माझ्या बाबांनी (माझे आजोबा ) सांगितलेली ! एकदा ते काही कारणाने , दादा मुंबईला शिकत असताना त्यांना भेटायला त्याच्या होस्टेलवर गेलेले . तेथे मुलांची पाणी वापरायची पद्धत , नळ नीट बंद न केल्याने पाण्याची होत असलेली नासाडी बघून ते फारच अस्वस्थ झालेले आणि वैतागलेही होते ...... आणि या बद्दल माझ्याशी बऱ्याचदा ते बोललेले . त्या काळात सुद्धा त्यांना पाण्याची किती किंमत होती आणि ते जपून वापरले पाहिजे याची जण सुद्धा ! घरात सुद्धा पाणी जपून वापरण्याबद्दल वेळोवेळी सांगत असत ........
मग नववीत असताना आमच्या शाळेची मुंबई सहल ठरलेली . मी सुद्धा गेलेले त्या सहलीला . तेव्हा दादर ला 'माहेर ' लॉज होते , त्यात आम्ही राहिलेलो . या सहलीत सगळ्यात ठळक गोष्ट म्हणजे टी व्ही ...... तोपर्यंत टी व्ही कधीच प्रत्यक्ष पाहिलेला नव्हता ....फक्त ऐकून माहित होता . या सहलीत मात्र प्रत्यक्ष खराखुरा टी व्ही बघायला मिळालेला आणि तेव्हा त्यावर 'छोटा जवान ' सिनेमा चालू होता ! तसेच पहिला बोटीचा समुद्रातून प्रवास 'गेट वे ऑफ इंडिया' ते 'घारापुरी लेणी' चा ! पहिला डबल डेकर चा वरच्या मजल्यावर बसून केलेला प्रवास ! असे एक ना दोन कितीतरी पहिले अनुभव आयुष्यातले , सुखद धक्का देणारे ! परत त्या गगनचुंबी इमारती आणि लिफ्ट ! अजून एक म्हणजे मला तेव्हा शहाळे प्यायचे फार मनात होते . मुंबई ला नक्कीच मिळणार आणि ते मी पिणारच हे ठरले होते माझे . सोबत शाळेतल्या मॅडम होत्या , त्यांनी किंमत विचारली त्या म्हणाल्या फार महाग आहे .....आणि त्यांनी मला घेऊ दिले नाही ...... माझी आठवण बरोबर असेल तर तेव्हा त्याची किंमत सव्वा रुपया म्हणजे एक रुपया पंचवीस पैसे होती!!! अशी ही मैत्रीणीबरोबरची धमाल - मज्जा - मस्ती मुंबई मनात घर करून राहिली .......
त्यानंतर म्हणजे ताईची बारावी झाली आणि ती दणदणीत मार्क्स मिळवून मुलीत पहिली आली . तिची इच्छा डॉक्टर होण्याची ! इतके दणदणीत मार्क्स म्हटल्यावर तिची मुंबई ग्रॅण्ट मेडिकल चा प्रवेश पक्की होती ! पण , मुलगी आणि ती पण पाहिल्यानेच घर सोडून राहणार , मग तिची सोय आणि सुरक्षितता या सगळ्याचा विचार करता, पुण्यात प्रवेश घेतली . तोपर्यंत आम्हालाही मुंबई च्या जीवनाची थोडीफार माहिती झालेली , विशेषतः लोकल ट्रेन चा प्रवास , तिथली धावपळ आणि दगदग . एक प्रकारची भीती पण वाटत होती या सगळ्याची .
माझ्या प्रवेशाची वेळ आली , तेव्हा मात्र मला जे जे ला प्रवेश मिळालाच नाही , त्यामुळे मी पुण्यातच . मग पुण्यात असताना काही काही कारणाने मुंबई च्या तीन - चार वेळा चकरा झाल्या . पण त्या आठवणी नंतर कधीतरी एका खास लेखात . एक आठवण मात्र आहे . माझ्या मैत्रिणींची एम बी ए ची कसली तरी सेमिनार मुंबई ला होती आणि त्यांच्या बरोबर जायची मला संधी मिळाली . कुठे राहिलो ते काही आठवत नाही . पण सेमिनार मात्र ओबेरॉय टॉवर्स ला होती ! बहु तारांकित हॉटेल ला जायची आयुष्यात पहिलीच वेळ ! त्याशिवाय खाली उतरल्यावर ती सुंदर आणि लयबद्ध रहदारी आणि त्यात सुंदर सुंदर वेगवेगळ्या ब्रँड च्या मनमोहक गाड्या ! मी तर प्रेमातच पडले , या सगळ्याच्या ! एक रात्र उशिरा , मरीन ड्राईव्ह ला गेलेलो सगळे मित्र मैत्रिणी . एकदम धमाल ! नंतर उशिरा आलो म्हणून शिक्षकांचा ओरडा पण खाल्ला . अशी एक एकदम भारी मुंबई भेटली या भेटीत ......अगदी हवीहवीशी वाटणारी ......मोहात पडणारी !!!!
मग लग्नाची वेळ ....... मी ठामपणे सांगितलेले मुंबई चा मुलगा नको आणि शेवटी मलाच , मुंबईचाच मुलगा आवडला ........आणि मी झाले एक मुंबईकर ! सुरवातीचे काही महिने खऱ्या मुंबई च्या जीवनाशी माझा अजिबात संबंध नव्हता . माझी पहिली नोकरी सुरु झाली ती अगदी घरा जवळच , अगदी चालत जाता येईल इतक्या अंतरावर ! रस्ता इतका सुंदर वेगवेगळ्या झाडांनी नटलेला , एका बाजूला एक तळ , खूप सारे पक्षी , त्यांचे आवाज , रस्ता कधी संपे कळतच नसे . तो रस्ताच नाही तर , कार्यालय आणि त्याचे सगळे आवर फार सुंदर , इमारती सुद्धा खूप सुंदर , दगडी ! खूपच मोहात आणि प्रेमात पडले मी या सगळ्याच्या ! आणि आजतागायत आहे ! माझ्या आयुष्यातील काही खूप सुंदर क्षणा पैकी एक स्वर्गीय परी क्षण तिथला आहे ! या मुंबई च्या धकाधकीच्या जीवनापेक्षा एक फार वेगळे आणि फार सुंदर जीवन मुंबईतच आहे , यावर माझा विश्वास बसला, कारण ते जीवन मी स्वतः जगले , अन्यथा कुणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेवणे केवळ अशक्य !!!
काही महिन्यांनी , मग तळ्यांच्या गावात राहायला आले . मग मुंबई च्या खऱ्या जीवनाची ओळख झाली . आता कार्यालयात जायचे म्हणजे आधी चालत जाऊन बस पकडायची , मग बस मधून उतरून स्टेशन गाठायचे आणि ट्रेन पकडून इच्छित स्टेशन वर उतरायचे, मग शेअर्ड ऑटो पकडून मुख्य प्रवेशद्वार पर्यंत जायचे आणि तेथून परत चालत कार्यालयाच्या इमारती पर्यंत जायचे ! घरी परत येताना , हेच सगळे परत उलट्या क्रमाने . पहिल्याच दिवशी स्लो ट्रेन च्या ऐवजी फास्ट ट्रेन पकडली आणि ती माझ्या स्टेशन वर न थांबता पुढे निघून जाऊ लागली , तेव्हा लक्षात आले . पण काही अंतर जाऊन काही कारणाने मधेच थांबली आणि मग माझ्यात झाशीची राणी संचारली ! क्षणात मी ट्रेन मधून उडी मारली , पहिल्याच दिवशी ! मग मागे चालत येऊन शेअर्ड ऑटो पकडून कार्यालयात गेले .
यातल्या रोजच्या बस च्या प्रवासात एक तळ दिसत असे आणि फार छान वाटत असे मला ते बघतांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला ! हळूहळू करत मी कधी त्याच्या प्रेमात पडले माझे मलाच कळले नाही . बाकीही तळी जमेल तसे बघत गेले आणि त्यांच्याही प्रेमात पडत गेले आणि पूर्ण गावाच्या आणि मुंबईच्या सुद्धा खूपच प्रेमात पडले . पण याची पूरती जाणीव झाली , जेव्हा मला मुंबई सोडून जायची वेळ आली तेव्हा ! मग मला मुंबई सोडून जावेसेच वाटेना ....... पण काही पर्याय नव्हता .....
पण मुंबई म्हणजे माझी खऱ्या अर्थाने कर्मभूमी ! माझे काम खऱ्या अर्थाने मुंबईतच चालू झाले . माझ्या या कामानीच , माझी मुंबई शी कायमची नाळ जोडली गेलीय, ते अगदी आजता गायत . त्यामुळेच मी मुंबई सोडली असली, तरी वरचे वर मुंबईत येऊ लागले आणि अजूनही येतेय . प्रत्येक भेटीत मागल्या भेटीपेक्षा जास्त जास्त आणि नव्याने मुंबई च्या प्रेमात पडू लागले !
सगळ्यात महत्वाचे म्हणजे छान छान काम मिळत गेली , त्यामुळे मन हृदय , मेंदू , बुद्धी या सगळ्याला छान खाद्य आणि समाधान मिळत होतेच . पण मला मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र सोडून जावे लागलेले .त्यामुळे मराठी भाषा , संस्कृती , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाद्यपदार्थ या सगळ्यालाच मी पारखी झालेली . कामाच्या निमित्ताने येण्याने , माझ्या बाकी गरजाही आपोआपच पूर्ण होऊ लागल्या . त्यात मराठी वाचनाची आवड . मग दिवसभराचे काम संपले की , एखाद्या दारुड्या माणसाचे पाय जसे गुत्त्याकडे वळतात, तसे माझे पाय आपोआपच मॅजेस्टिक कडे वळत . मग उरलेला वेळ तिथेच जात असे आणि सोबत नेलेल्या यादीतील छानश्या पुस्तकांची खरेदी करूनच मी तिथून बाहेर पडत असे . खाद्यपदार्थांची यादी म्हणाल तर ती संपतच नसे . त्या यादीत अगदी पापड , कुरडया , सुरळी वड्या , मोंगिनीज केक , कुकीज, वडापाव, या सगळ्या पासून ते अगदी मौसमी फळं हापूस, तुती , ओले अंजीर , चिकू पर्यंत सगळे सगळे असे . मग त्याची खरेदी आणि ते घरापर्यंत काळजीपूर्वक पोहोचवणे . एक मोठ्ठे कामाचं होऊन बसे . पण ही सगळी धावपळ करण्यात एक वेगळाच आनंद मिळत असे ! आता बऱ्याचश्या गोष्टी इथेही मिळू लागल्या आहेत . त्यामुळे ही यादी थोडी छोटी झालीय . पण अजूनही थोड्याफार प्रमाणात हे सगळे चालूच असते आणि त्यातला आनंद लुटानेही !
सर्वांचे अगदी पूर्वापार असलेले आकर्षण म्हणजे गगनचुंबी इमारती ! मलाही लहान पणापासून या इमारती आकर्षित आणि आश्चर्यचकित करत असत ! कितीही इमारती , कितीही वेळा पहिल्या तरी पोटाचं भरत नाही . वास्तूकलेची अभ्यासक अणि आता पुरातत्वाची अभ्यासक म्हणून तर , ही भूक प्रचंडच वाढली आहे . ही भूक गगनचुंबी इमारती पर्यंतच सीमित राहिलेली नाही . तर जुन्या अगदी साध्या साध्या इमारती सुद्धा मला पुढे जाऊ देत नाही . सारख्या बोलावत असतात मला . असे वाटते वर्षानुवर्षे त्या इथे उभ्या आहेत आणि त्यांनी खूप काही पाहिले आहे आणि अनुभवले आहे . त्यासगळ्या बद्दल त्यांना खूप काही सांगायचे आहे . विशेष करून दक्षिण मुंबई आणि दादर भागातील . हल्ली मोबाइल कॅमेऱ्यामुळे फोटो काढायची उत्तम आणि सहज सोय झालीय . मग रस्त्याने जाताना काय काय करू असे होऊन जाते . प्रत्यक्ष ही बघायचे असते , फोटो ही काढायचे असतात . सगळे अगदी अधाश्या सारखे होऊन जाते . बरोबर असलेला माणूस , कितीही सहशील असला , तरी त्याचा सहनशीलपणा संपून जातो आणि अगदी शंभर टक्के तो माणूस वैतागून जातोच . पण खरंच खूप दिवसापासून मनात आहे , सलग खूप दिवस नाही तर जमेल तसे जमेल तेव्हा एकेक दिवस चालत चालत जाऊन त्या इमारती नीट जवळून बघाव्या , शक्य झाले तर आत जाऊनही . थोडा फार तरी प्रयत्न करावा , त्या काय सांगू पाहत आहे त्याचा .......बघू कधी शक्य होते ते !
मुंबई आणि समुद्र ....... समुद्र आणि मुंबई ! दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे . त्यामुळे बाकी कितीही बोलले लिहिले , तरी समुद्राशिवाय मुंबई ला मज्जा नाही . हा समुद्र तर मला फार वेड लावतो . समुद्र म्हणजे नुसते पाणी नव्हे माझ्यामते . समुद्र म्हणजे ते पाणी , त्या पाण्याच्या किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटा , त्याचा आवाज , तो समुद्र किनारा , तो वारा , त्या वाऱ्याचा आवाज, त्या वाऱ्याचा अनुभव म्हणजे त्याच्या वेगाचा आणि स्पर्शाचा अनुभव आणि त्या पाण्याचा आणि वाऱ्याचा एक विशिष्ट वास ! हे सगळे म्हणजे समुद्र अनुभवणे !! N I JUST LOVE ALL THIS . N MOST OF THE TIME I MAKE SURE THAT AT LEAST FOR FEW MINS I CAN BE THERE TO EXPIRENCE ALL THIS . मग जाते , समुद्र अनुभवते , समुद्राचा आवाज कानात भरून घेते , वास नाकात भरून घेते , वारा छान अनुभवून घेते , त्याच्या आवाजा-वासा सहित आणि डोळ्यात अख्खा समुद्र साठवून घेते ! आणि दिवसागणिक या सगळ्यात जास्त जास्त आकंठ बुडत जातेय .
हा समुद्र , या इमारती आणि अशा कित्येक गोष्टी माझ्या मनाच्या एका मोठ्ठ्या कप्प्यात घर करून आहे . मुंबई म्हणजे आनंदाचा महासागर ! फारच सुंदर आणि आनंदी आहे , या महासागरात आकंठ बुडून जाणे !!!
(आजचा लेख म्हणजे एक धावता आढावा आहे. यातील सगळ्याच गोष्टींच्या सविस्तर रंजक गोष्टी पुढे खास लेखांत वाचायला मिळतीलच.)
(खालील बरीचशी छायाचित्रं धावत्या गाडीतून काढलेली आहेत . त्यामुळे थोडी अस्पष्ट दिसत आहेत .)
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
२८ एप्रिल२०१८
माझी खूप जास्त आवडती गगनचुंबी इमारत
कांचनजुंगा
रचनाकार चार्ल्स कोरिया
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज इमारत
माझी लाडकी
आर्ट डेको
मागच्या बाजूला प्रसिद्ध हॉटेल
अँबेसेडर
आर्ट डेको इमारत वेगवेगळ्या बाजूने
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज इमारत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
ATC टॉवर , विमानतळ
आर्मी नेव्ही इमारत , काळा घोडा
गिरगांव
काही गगनचुंबी इमारती
मिनी ट्रेन
(छायाचित्र गूगल च्या सौजन्याने )
सदाशिव - घारापुरी लेणे
अरबी समुद्र
नरिमन पॉईंट
अरबी समुद्र
वरळी
मागे बांद्रा वरळी सी लिंक
मुंबईच्या छान स्मृती जागृत ठेवून वर्णन केले आहे. धावपळीच्या जीवनात सौंदर्य शोधण्यात तू खरा आनंद घेतला आहेस.😄👍🏻👍🏻
ReplyDeleteआनंद शोधणे महत्त्वाचे, माझ्या दृष्टीने!
Deleteखूप सारे आनंदी धन्यवाद सर!
Agadi chan ahe yatali tren, garden,imart ,samudar tya Lata chan ahe
ReplyDeleteMast vathale
Sakal sakali vachat asalya mule agali titumcha vavrat asalyache vthat
आरती खूप खूप आनंदी धन्यवाद! 😍😇
Delete
ReplyDeleteआपण मुंबई, चे खुप सुंदर असे वर्णन केले आहे ते वाचून जनू काही मी माझ्या नजरेने मुंबई पाहत आहे, स्वतः अनुभवत आहे असे वाटून गेले.
मुंबई तेथील इमारती, रस्ते, लोक, खाणे, समुद्र हा माझा पण आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय . गेले 15 वर्ष महिन्यातून 12 दिवस मुंबई मध्ये असायचो .मी अर्धा मुंबई कर होतो .
पण गेले ते दिवस ,उरल्या त्या आठवणी .
पण निश्चितच जुन पासून महिन्यातून 4 दिवस का असेना मुंबई ला जाणार.
माझे कोहिनूर square Dadar opp sena bhavan येथे प्रशस्त असे office आहे.
Sea view .
जवळच शिवाजी पार्क येथे घर आहे ते पण sea view.
तुमचा लेख वाचून मुंबई तील सुंदर दिवस आठवले.
तेथील मित्र, लोक, फूड, buildinds,roads,hotels,kiti
तुमचे article vachun mi mumbai sick झालो.
Dhanyawad
मुंबई चे एक सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे केल्याबद्दल.मुंबई माझे पण खूप आवडते शहर आहे.मी ३३% कोल्हापूर कर,३३% पुणे कर व ३३% मुंबई कर आहे.व्यवसायानिमित्त
आयुष्यातील बराच काळ मी मुंबई मध्ये व्यतीत केला आहे.
Really I love mumbai.
Mumbai people's,buildings and mumbai food . किती आणि काय बोलावे?
धन्यवाद
आपण असेच लिहित चला व शेअर करा.
वावा सुंदर अनुभव कथन!! खूप सारे आनंदी धन्यवाद! 🙏
Deleteछान आहे.
ReplyDeleteमस्तच. तुझे लेख वाचतो. छान असतात. विशेषतः आनंदी, उत्साही असतात.
This means a lot for me!
Deleteसर अगदी मनःपूर्वक आनंदी धन्यवाद!!! 🙏🙏😇😇
खपच सुंदर वर्णनं केलेले आहे मुब ईचे आणि तेथील समुर्दाचे .वाचुन प्रत्यक्ष अनुभवत असल्यासारखं वाटले. .......... .......... सौ.मंदा चौधरी... मुब
ReplyDeleteखूप सारे प्रेम!! 😍😇😍😇
Deleteमुंबई-१ हा लेख भर ऊन्हाळ्यात वाचताना आणी त्यातून मुंबईचं गुणगान ..अजूनच फारच उकडतय....असो ....
ReplyDeleteआपल्या मुंबईच्या आठवणीच वर्णनं कमाल...😍
मुंबईच्या वास्तुकलेची टिपलेलि सर्व प्रकाशचित्रे
१नंबर..वाखाणण्याजोगी...especially..कांचनजुंगा,आर्ट डेको,मरिन ड्राइव्ह चा किनारा, काला घोडा,घारापूरी लेणि..भाRich..🙏...मुंबईच्या समुद्राच्या azure पाण्याबद्दल वर्णन वाचून थोडा थंडावा मिळाला...मग काय आता आम्हाला समुद्र पाहयचा म्हणजे सारख उठून मुंबईलाच यावे लागतं..😁..मुंबईच्या ह्याseries लेखाची घोडदौड कायम राहो हिच सदिच्छा
हा हा हा....
DeleteA real पुणेकर......
खूपच धूर धूर....
मुंबई चा ईतिहास, भूगोल, वास्तूकला सारंच खूप अप्रतिम सुंदर, प्रत्येकाने बघाव, अनुभव घ्यावा असेच आहे!
असो
सरतेशेवटी का होईना आपल्याला आनंद मिळाला, हे वाचून आनंद झाला!
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍😇😍😇
माझ्या मुंबईचे खुप छान सुरेख वर्णन केले आहेस तु.
ReplyDeleteलहानपणाच्या खुप आठवणी जाग्या झाल्या.खुप खुप धन्यवाद🙏😊
सोनाली, खूप खूप आनंदी धन्यवाद!
DeleteI salute you ..R S Rade
ReplyDeleteखूप सारे मनःपूर्वक सप्रेम आनंदी धन्यवाद!!!
DeleteWawa chan varnan tya dhavpalata mumbaiche.
ReplyDeleteMumbai tripcha athvani jagi zhale kahi dolasamor tarale, kahi..
आनंदी धन्यवाद!
ReplyDeleteमुंबईच्या प्रेमात पडलेली तू प्रथम किंवा अखेरची व्यक्ती नाहीस .मुंबई हे खरंच प्रेमात पडायला लावणारं शहर आहे. जी व्यक्ती ह्या शहरात येते, ती वेगवेगळ्या कारणाने का होईना, पण ह्या शहरात गुंतून पडतेच.ह्या विषयावर बरेच लिखाण पण झालेले आहेच. तूझ्या ह्या लेखातला outlook एकदम वेगळा आणि फ्रेश आहे. तुझ्या बालपण ते व्यावसायिक स्थिती ह्या प्रवासात, मुंबईची तुला भावलेली स्थित्यंतरं तू छान बोलकी केली आहेत. मुंबईचा समुद्र, लोकल, गर्दी, माणसे, वाचन संस्कृती, खाद्य संस्कृती वगैरे सगळे मुद्दे तू cover केलेले आहेतच . तू उल्लेखल्या प्रमाणे गगनचुंबी इमारती ही मात्र मुंबईची खासियत आहे. मला पण त्यांचे खास आकर्षण आहेच. एकंदरीत तुझा लेख वाचताना समस्त मुंबईकरांच्या आठवणी रिफ्रेश होतात आणि एक सुखाची अनुभूती देऊन जातात. मुंबई हे जबरदस्त वेड लावणारं शहर आहे. इतकी वर्षं तू लांब राहून सुद्धा तुझं मुंबईप्रेम कमी झालेलं नाही, ही त्याचीच प्रचिती आहे.तुझा हा धावता आढावा एकदम emotional आणि रंजक झाला आहे.सोबत जोडलेले photoes नेहेमीप्रमाणेच हटके आहेत....👍👍👍👍👍
ReplyDeleteमुंबईच्या रमणीय आठवणीं
ReplyDelete