Skip to main content

गुढी संमेलन (featured )

गुढी संमेलन 

(featured ) 

                                   कुठलाही बदल एकदम होत नसतो. मग तो नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित. कुठेतरी अगदी बारीकशी सुरुवात होते आणि हळूहळू वाढत जाते. थोड्या काळानंतर मागे वळून पाहिले किंवा विचार केला, की मग मोठ्ठा बदल झाल्याचे जाणवते. तसेच काहीसे होतांना मला जाणवले. कारण यावर्षी मीच थोडा बदल केला, गुढी च्या बाबतीत. अर्थातच या आधीच ह्या बदलाची, समाजात सुरुवात झालेली होती. पण हा बदल जेव्हा मी स्वतः सुद्धा अंगीकारला, तेव्हा मला त्याची जागृत जाणीव झाली. अर्थातच तेव्हा पासून माझ्या मनात, मेंदूत, हृदयात, विचारात एक अवस्थता सुरु झाली, सुरूच आहे अद्याप. अजूनही खूप काळ ही सगळी अस्वस्थता असेलच, याबाबतीत. या सगळ्याचा उकल होईपर्यंत. म्हणजे गुढीचा उगम कुठे, कसा झाला? त्याची कारणं काय? त्यासंबंधीची प्रत्येक गोष्ट समजे पर्यंत. मग पुढे जाऊन त्यात काय बदल होत गेले आता पर्यंत, त्याची कारणं काय वगैरे. 

                                              पण, तूर्तास वेगळेच मनात आले, या सगळ्या विचारचक्रामुळे.  गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने, तसेच या लिखाणामुळे बऱ्याच मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी आपापल्या गुढीची छायाचित्रं  पाठवली मला, पाडव्याच्या दिवशी. ज्यांनी छायाचित्रं पाठविली नव्हती, त्यांना मी मागितले. सण, गुढी पाडवा. त्यासाठी सगळ्यांनी गुढी उभारली आपापल्या घरी. प्रत्येकाने वापरलेले साहित्य सुद्धा जवळ-जवळ सारखेच. पण तरी प्रत्येक गुढी वेगळी दिसते, पण तितकीच सुंदर! तसेच गुढी उभारण्यासाठी प्रत्येकाला उपलब्ध असलेली जागा सुद्धा वेगवेगळी. अगदी शक्य असेल त्या जागेत, गुढी उभारलेली. एकत्रित विचार केल्यावर हे सारेच खूप सुंदर भासले. मग वाटले हा सगळा आनंद आपल्या सगळ्यांपर्यंत पोहचवावा, म्हणून हा प्रपंच! 
                                              तसेच दुसरे असे की, मी गुढी बाबत जो काही बदल स्वीकारला आहे. हाच बदल हळूहळू करत सगळ्यांनीच स्वीकारला तर, गुढी ची ही सगळी  छायाचित्रं म्हणजे दस्तावेजीकरणाचा एक फार महत्वाचा भाग होईल, असे मला वाटले. मग हा भाग सुद्धा या सगळ्या दस्तावेजीकरणात सामील करावासा वाटला. त्याच वेळी एक आशेचा किरण सुद्धा मनात आहेच! या सगळ्या गुढी बघून वाटले, प्रत्येकाला जसे शक्य होईल, जिथे जागा उपलब्ध असेल, तिथे अगदी उत्साहाने गुढी उभारली आहे! त्यामुळे ही गुढीची परंपरा लोप पावणार नाही, याची एक खात्रीच मनाला पटली. पण तरी ह्या सगळ्यातून मला एक खूप छान प्रसन्न आनंद मिळाला. तसाच तुम्हा सगळ्यांना तो मिळेलच आणि तो आनंद तुम्हालाही द्यावा म्हणून हा एक प्रयत्न! या निमित्ताने, हे एक छान संमेलनचं भरले आहे, विविध प्रकारच्या गुढीचे, विविध रंगांचे, विविध रूपाचे, विविध जागेमधील, विविध ठिकाणचे. प्रत्येक गुढी काही सांगू इच्छिते आहे मला, असे वाटले. बघा, त्यातून आनंद लुटा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही त्यांना काही सांगण्याची इच्छा असेलच. ऐका मनापासून आणि तुम्हालाही त्यांना काही सांगायचे असेल तर तेही सांगा. त्यांनाही ऐकायला नक्कीच आवडेल तुमच्याकडून. तसेच ह्या सगळ्यातून तुमच्या मनात वेगवेगळ्या विचार, भावना, आठवणी येतीलच. इच्छा असली आणि माझ्याशी चर्चा केलीत तर मला फार आवडेल! 

आनंदी पाऊस 
(featured)
७एप्रील२०२२


महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गुढी 

एका अतिशय कल्पक आणि सर्जनशील मैत्रिणीची 



धाकट्या आत्याची 



घरी, वाहिनीची 



सख्ख्या मैत्रिणीची 



एका वाहिनीची 



एका जावेची! 



एका उत्कृष्ट अभिवाचक मैत्रिणीची 



सध्याच्या , एका वर्गमैत्रीणीची 



ताईची 


आमच्या अभिवाचन परीक्षक 
ताईंच्या घरी 



माझ्यापेक्षाही लहान असलेल्या आत्याची 



जीवन गुरूंच्या घरची 



एका धाकट्या भावाकडची 



शाळेतील एका वर्ग मैत्रिणीची  


सध्याच्या वर्गमित्राची 



एका मित्राची 



एका मैत्रिणीची 



एका धाकट्या भावाकडे 



एका मैत्रिणीच्या लेकीकडे  



एका धाकट्या बहिणीकडे 



एका धाकट्या भावाकडे



एका धाकट्या बहिणीकडे




शाळेतील एका मैत्रिणीच्या घरी 



एका उत्कृष्ट अभिवाचक मित्राकडे 




काही महाराष्ट्राबाहेरील गुढी 



शाळेतील एक वर्ग मैत्रिणी
 


एका धाकट्या जावेची 



दुसऱ्या धाकट्या जावेची 



एका थोरल्या बहिणीकडे 


एका मित्राच्या मित्राकडे 


भारता बाहेरील गुढी 




एका सहकारी मैत्रिणीकडे 



एका धाकट्या बहिणीकडे 


सगळ्यात पिल्लू आणि लाडक्या बहिणीकडे !





































 



 


 









Comments

  1. जनार्दन चौधरीApril 08, 2022 11:47 am

    विषयाचि निवड त्याला अनचसरून कल्पनेचा विलाशि प्रस्तुतिकरण ,मांडणि आणि त्या विषयाला पाहिजे असलेले वैचारिक शब्दांकनातुन पाहिजे असलेला सारांश सगळच कौतुकास्पद च आहे

    ReplyDelete
  2. खूप छान वाटले गुढी संमेलन. सर्वात हटके विषय. आणि विषय विवरण पन हटके. खरच प्रत्येकाची गुढी वेगळी तरीही बरीच सारखी. खूप काही सांगून जाणारी.

    ReplyDelete
    Replies
    1. वा छान वाटले, हा विषय आवडल्याचे वाचून!
      खूप खूप आनंदी धन्यवाद!

      Delete
  3. तुमची शुद्ध मराठी वाचून ..मी चकित होतो .
    ब्राम्हीन वाड्यात राहिलेलं दिसतात.
    आमची भाषा खिचडी आहे . सर्वच मिक्स आहे
    असो.. Any how ..every thing changing ...in this fast moving educated changing world .and that shoud be ...Am l right ?

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राह्मण वाड्यात नाही, पण शिक्षणासाठी सदाशिव पेठेत राहीले आहे मी पाच वर्ष ☺️😀
      आता लिखाणाच्या निमित्ताने माझी मराठी सुधारत आहे
      हो बदल हा निसर्ग नियमच आहे, पण तो योग्य प्रकारे व्हायला हवा, आंधळेपणाने नाही. अगदी समजून उमजून करायला हवा
      खूप सारे आनंदी धन्यवाद! 🙏

      Delete
  4. सुंदर खुप छान गुढ्यांचे संमेलन. तु अगदी कुठल्याही विषयावर रसभरीत लिहू शकतेस यांचा दर्जेदार नमुना. लेखनाचा हेतू ही छानच दस्तावेजीकरण.....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!

      Delete
  5. मंदा चौधरीApril 08, 2022 4:52 pm

    अभिप्रायचे लिखाणाचे क,ख,ग,उघडले नाही. म्हणून हा प्रपंच. खर मस्त विषय आहे गुढीचे संमेलन. तसेच गुढीची चित्र सुध्दा. खुपच आनंद माळाला निरनिराळ्या गुढ्या बघून .
    मंदा चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. तांत्रिक गमती जमती!
      लिखाणा साठी छान विषय आहे
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! ❤️

      Delete
  6. Gudhiche samelan 👌pratek gudhi vegvegali pan tyamagil hetu ekach Anand bhetala vegvegala gudhiche chiyra baghun

    ReplyDelete
  7. सहीच..😍सारेच गुढ्या ह्या कलरफुल..विविधतेने नटलेल्या..it seems me like "नुतन वर्षाचे सारे कलरफुल flag.विविध "gps locations"ची.पण आपल्या blogमुळे एकत्रितरीत्या बांधलेली आहेत.🙏Too far with distance but closed together.....

    ReplyDelete
    Replies
    1. Yess totally!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  8. सुमधुर प्रस्तुती

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर पहिल्यांदाच एवढ्या गुढ्या पाहायला मिळाले आपले मनापासून धन्यवाद 💐

    ReplyDelete
  10. उषा बोबडेApril 11, 2022 3:13 pm

    खूपच सुंदर एवढ्या गुढ्या पहिल्यांदाच पहायला मिळाले
    धन्यवाद

    ReplyDelete
  11. प्रा वैशाली चौधरीApril 15, 2022 10:06 am

    गुढीसंमेलन मस्त नाविन्यपूर्ण कल्पना��������
    गुढ्या कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरी शेवटी भावना महत्वाचीच ... उत्साह तोच...
    श्रीखंडपुरीचा बेतही तोच����...

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरय! 😀😀
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  12. उदय बोरगावेApril 06, 2025 7:17 am

    सुंदर संकलन...
    सुप्रभात 😊

    ReplyDelete
  13. गुलाबराव पाथरकरApril 08, 2025 7:19 am

    छान आहेत सर्व गुढ्या,एखाद्या गावात गेल्यासारखा आनंद वाटला .

    ReplyDelete
  14. अर्चना पाटीलApril 08, 2025 11:42 am

    गुढी सम्मेलन फारच भारी आहे... छान छान गुढ्या जमल्यात सम्मेलनाला.....👌🏻🌹

    ReplyDelete
  15. गुढी चे अप्रतिम फोटो आहेत.खूप छान लिहिले आहेस.

    ReplyDelete
  16. 😊gudhi padwa lekh aani aani wewegle natewaik Mitra yanche kadil sarech gudhi khoop sunder aahe
    Te pratek gudhichi sajawat aaras sunder rangoli gudhina neswleliya saries sagle baghnet ek weglach nirmal pavitra aanad milto
    आनंदी Asach aanandi paus pudhe chalu rahu de
    Aani too anand tu serwana tuze lekhatun aani pics madhun dilas
    God bless you

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...