थोडं (खूप सारं?) गोडाचं -५(श्रीखंड) (घरातील गमती-जमती) थोडं गोडाचं मालिकेतील आज पाचवा लेख, खास मराठी नूतन वर्षारंभा निमित्त, अर्थातच गुढी पाडवा विशेष! गुढी पाडवा म्हटलं की घराघरात श्रीखंड-पुरीचा बेत असतो. पण बऱ्याच घरात बाजारातून विकत आणलेलं श्रीखंड असतं. बऱ्याच वेळा ते कितीतरी जुनं असतं. विकत आणलेलं म्हणजे ते जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात काय काय रसायनं घातलेली असतात. ती शरीराला घातकच असतात. तसेच चव सुद्धा कशी असेल याची खात्री नसते. खायला घेतल्यावर कळते. मग जेवणातील सगळी मजा आणि आनंद निघून जातो. बऱ्याचदा ते जास्त टिकावे म्हणून त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे बरीच मंडळी त्यात थोडं दूध घालून ते चांगलं मिसळून घेतात आणि मग खातात. तसेच त्यात रंग सुद्धा घातलेले असतातच. ते सुद्धा हानिकारकच. घरी करायचे म्हटलं तर बऱ्याच जणांना ते किचकट वाटते. म्हणून आज हा "श्रीखंड प्रपंच!" श्रीखंडाची गोष्ट, माझी वैयक्तिक. ...