चार तास , माटुंग्यातील
(काही अनुभवलेलं...)

माणूस जो पर्यंत काही काळ मुंबईत राहत नाही , तो पर्यंत त्याला मुंबई समजत नाही . फक्त ऐकीव गोष्टींवरूनच तो मुंबई चे चित्र रंगवत असतो . माझ्याबाबतीत तेच झाले होते . मुंबई म्हणजे फक्त खूप धकाधकीचे जीवन . त्यामुळे मुंबई नकोच वाटे . पण मुंबईत काही वर्ष राहिले आणि आज पर्यंत कामानिमित्ताने नियमित मुंबईत जात आहे . दिवसेंदिवस अगदी आकंठ मुंबईच्या प्रेमात बुडून जात आहे मी ! खूप वेगवेगळ्या भागात जात असते मुंबईच्या , कामानिमित्त आणि त्यांच्या प्रेमातही पडत असते . मग हा प्रत्येक भाग मला पायी चालत जाऊन , तिथे काही काळ घालवून अनुभवायचा असतो . अशाच बऱ्याच भागांपैकी एक भाग म्हणजे माटुंगा . प्रत्यक्ष माटुंग्याला मी गेले नसले , तरी माटुंगा ओलांडून इकडे तिकडे बऱ्याच वेळा गेले होते . सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे , अगदी समजायला लागल्यापासून दादांच्या(वडील) तोंडून सारखाच माटुंग्याच्या उल्लेख ऐकलेला . कारण त्यांचे शिक्षण व्ही.जे.टी.आय. मध्ये झालेले . त्यामुळे त्यांना तिथला रस्ता अन् रस्ता , गल्ली अन् गल्ली पाठ होती आणि दक्षिण मुंबई सुद्धा . मला तिथे प्रवेश मिळण्याची काही शक्यताच नव्हती कमी मार्कांमुळे . त्यामुळे तेव्हा तिथे जाऊन पाहण्याची वेळच आली नाही आणि यू.डी.सी.टी च्या बाबतीत तेच . प्रवेश अर्ज भरला होता , पण प्रवेश मिळण्याची शक्यता नसल्याने , प्रत्यक्ष जाऊन पाहिलेच नाही . दोन्ही कॅम्पस शेजारी शेजारी . पण पाहण्याचा योग आलाच नाही .
लग्न झाल्यावर मुंबईत नवीनच होते , तेव्हा माटुंग्याच्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या प्रसिद्ध खानावळीत एकदा जेवायला गेलेलो . पण तेव्हा अगदीच काहीच नाहीत नव्हते , तसेच पुरेसा वेळ सुद्धा नव्हता . त्यामुळे जेवण करून परत आलेलो . तेव्हा नोकरी करत होते , त्यामुळे वेळेअभावी फारसे इकडे तिकडे भटकणे जमतही नव्हते . सरांच्या मनात असेल , तर कामाकरिता कुठे कुठे जावे लागे आणि काम झाले की लगेच परत . पण मग नोकरी बरोबरच छोटी छोटी इंटिरियरची कामं करायला लागले , तसे मग साईट वर , क्लायंट मिटींग्स साठी जावेच लागे . त्यापैकी वरळीला सारखेच जावे लागे . सोबत बाकी सहकारी सुद्धा असतं , मग चहा-खाणं करण्यासाठी म्हणून , येण्या-जाण्याच्या रस्त्यावर असलेल्या , माटुंग्याच्या प्रसिद्ध फूड कॉर्नर ला थांबून फटाफट चहा-खाणं आटोपून पुढे कामाला पळत असू . या कामाच्या धामधुमीत कळले की , माझे एक सहकारी यू.डी.सी.टी. चे विध्यार्थी . त्यांना सुद्धा माटुंगा आणि त्याकाळची सगळी मुंबई पाठ . चालत चालत गेले सगळीकडे की हा फायदा असतो . सगळे रस्ते कायमचे आणि पक्के लक्षात राहतात .
साधारण तीनेक वर्षांपूर्वी घरी गेलेले . माझे सगळे जुने बाड काढले . काय ठेवायचे आहे , काय फेकून द्यायचे आहे वगैरे बघायला . त्यात माझी एक फाईल सापडली . ज्यात माझ्या सगळ्या प्रवेश अर्जांच्या प्रती ठेवलेल्या होत्या . त्यात ह्या दोघी महाविद्यालयांची पण होती . मग पुन्हा माटुंगा आणि ही महाविद्यालयं बघून यायच्या इच्छेने मनात जोरात उसळी मारली . त्यातच मुंबईच्या भाचीची दहावी झाली आणि तिने रुईया ला ऍडमिशन घेतली . परत माटुंगा ! गेले तीन वर्ष तिचे , तिच्या कॉलेज मध्ये काढलेले फोटो बघत होते . तिच्या कडून काय काय ऐकतही होते . त्यामुळे मनातील माटुंगा भेटीची इच्छा अजूनच प्रबळ होत होती .
या मुंबई भेटीत मात्र हो नाही करत करत बहिणीला आणि भाचीला सोबतीला घेतले आणि जीवाचा माटुंगा करून आले ! खरंतरं वेळ फार थोडा होता आणि पर्याय भरपूर . पण शेवटी मी माटुंग्याचाच पर्याय निवडला आणि त्या दोघींनाही निवडायला भाग पाडले . सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड-दोन , इतक्या वेळात ठाणे-माटुंगा-ठाणे करून आलो सुद्धा . सकाळी नाश्ता करून साडे नऊ पर्यंत निघालोही , माटूंग्याच्या वाटेने . भाची आमची गाईड ! तिला अगदी सगळ्यांचीच नीट माहिती आणि सवयही . अगदी तिकिटापासून ते हव्या त्या ट्रेन मध्ये चढण्या - उतारण्यापर्यंत , ते ट्रेन मध्ये बसायला जागा मिळवण्यापर्यंत . उतरल्यावर अर्थातच पहिला स्टॉप रुईया ! ते तिचेच कॉलेज आणि तिला माझ्या आवडी-निवडी ची चांगलीच माहिती आहे . मग तिने अगदी छान सगळा प्रत्येक कानाकोपरा फिरवून दाखविला आणि सोबत सगळी सविस्तर माहिती सुद्धा ! कॉलेजला सुट्टी असल्याने मुलांची फार वर्दळ नव्हती . पण जिथे तिथे दुरुस्तीची काम चालू होती . पण फार भारी वाटत होते . एक तर रुईया कॉलेजला जायला , बघायला मिळाले होते आणि दुसरे महत्वाचे म्हणजे भाची - पुढची पिढी छान गाईड करून सगळं दाखवत आणि सांगत होती म्हणून ! छान भरपूर फोटो काढले , माझे सुद्धा काढून घेतले . एक खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद ! एक छान आठवण निर्माण झाल्याचा आनंद !! निघालो तिथून बाहेर , जवळच तिची खोली असलेली इमारत सुद्धा पहिली बाहेरून , कारण आत जायची परवानगी नव्हती . तीही फारच जुनी इमारत , आर्ट डेको प्रकारातील . म्हणजे माझ्या मनाच्या अगदी जवळच्या प्रकारची इमारत . आता ती सुद्धा आतून बघण्याची इच्छा मनात आहे . पटवीन तिच्या मालकिणीला सुद्धा एकदा नक्की ! भाचीला सांगूनच टाकले , तुला वेळ असेल तेव्हा सांग , दोघी मिळून सगळी मुंबई अशीच हळूहळू करत हिंडू , पाहू आणि अनुभवू .....
घड्याळ पाहिले , अजुनी वेळ होता . मग म्हटलं चला पटकन टॅक्सी करून व्ही.जे.टी.आय. ला पण जाऊन येऊ . त्यांना काही म्हणायची संधी न देता , मी टॅक्सी थांबवली सुद्धा मी . तसेच घेऊन गेले त्यांना . माहिती नव्हते , त्या आवारात आत जायला परवानगी मिळेल की नाही ? पण म्हटलं जाऊ तरी , बघू काय होते ते . बापरे ! टॅक्सितूनच महाविद्यालयाचा फलक दिसला आणि सगळ्या भावना उचंबळून आल्या . काय करू आणि काय नाही कळेच ना . मग सगळ्यात आधी त्या महाविद्यालयाच्या नावाच्या फलकाचा फोटो काढला आणि त्यासोबत एक सेल्फी सुद्धा ! पुढे मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालो आणि अपेक्षेप्रमाणे तिथे हटकलेच , विचारले काय काम आहे ? मग सांगितले मुलांच्या ऍडमिशन घ्यायच्या आहेत , म्हणून बघायला आलो आहोत . भाची होतीच बरोबर . सोबतच हेही सांगून टाकले आमच्या वडिलांचे शिक्षण सुद्धा इथेच झालेय . मग म्हणाले जाऊ शकता , पण बाहेरूनच बघा , कुठे आत जाऊ नका . मग काय निघालो मेन पोर्चच्या दिशेने . काय भारी वाटत होते , लांबून तो पोर्च बघतांना सुद्धा ! खरोखर तिथे गेल्यावर तर , काय विचारायलाच नको . तो पोर्च मस्त दोन गोलाकार आणि दोन एल आकाराच्या खांबांवर वर सपोर्ट केलेला , काय ती भव्यता , काय तो दिमाख ! पायरी चढून आत गेल्यावर सुद्धा असेच चार गोलाकार भव्य खांब . इतके भव्य की , त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला तर अर्धा खांब सुद्धा माझ्या मिठीत मावला नाही ! समोरच , वर जाण्यासाठी जीना जो मधोमध रेलिंग घालून विभागलेला आणि रेलिंग च्या दोन्ही टोकांना पुन्हा दोन गोलाकार खांब आणि त्यावर अशाच छान यासगळ्याला साजेश्या मोठ्या दोन कमळाच्या आकाराच्या कुंड्या , या सगळ्या भव्यतेत अजून भव्यता आणि सौन्दर्य वाढविणाऱ्या ! पहिल्या कुंडीच्या पुढे बरोबर मध्यभागी एक पेडेस्टल म्हणून ठेवलेला खांब आणि त्यावर वीरमाता जिजाबाईचा अर्धपुतळा ! इथे उभं राहिल्यावर काय वाटले , हे शब्दात सांगणे अगदी अशक्य आहे . तो क्षण फक्त फक्त तिथे उभं राहून जगण्याचा होता आणि अनुभवण्याचा होता ! मनात मेंदूत सगळ्या भावनांचा भरपूर गोंधळ ! मनात विचार येत होता , आता मी इथे चालतेय , वावरतेय याच ठिकाणी दादा(वडील) अगदी तरुणपणी इथे वावरत होते . कितीतरी आठवणी असतील त्यांच्या इथे आणि त्याच भावनावेगात शेवटी मी तिथल्या त्या एका खांबालाच मिठी मारली ! अगदी झपाटल्यासारखे झाले होते ! मग त्या जिन्याने कितीतरी वेळा वर खाली केले . शक्य तितके फोटो काढले . वरच्या मजल्यावर जाऊन कॉरीडॉर मधून फिरून आले . त्या जिन्यावरचे छत पण फारच भारी आहे . परत जावे लागेल आणि नीट बघायची परवानगी मिळवावी लागेल म्हणजे ते नीट वर जाऊन पोट भरून बघता येईल . मग खाली आले आणि त्या पोर्च मधून बाहेर पडले तेव्हा कुठे थोडं झपाटलेपण कमी झालं . थोडं पुढे चालत आलो तर वसतिगृहाच्या इमारती दिसल्या परत भारल्यासारखे झाले . दादांबरोबर बाबा(आजोबा) सुद्धा आठवले .....
कारण त्यांनी सांगितलेला एक प्रसंग , दादांच्या वसतिगृहतील . दादा शिकत असतांना , बाबा त्यांना भेटायला गेले तेव्हाचा . तो म्हणजे पाण्याच्या वापरासंबंधीचा . त्यांनी बघितले होते , तेथील मुलं पाण्याचा कसा वापर करत होते , नळ सुद्धा नीट बंद करायची तसदी घेत नव्हते . त्यामुळे पाण्याची खूपच नासाडी होत होती . ते पाहून ते फारच अस्वस्थ झालेले , त्यांनी स्वतः जाऊन ते सगळे नळ नीट बंद केले . हा प्रसंग त्यांनी बऱ्याचदा आम्हाला सांगितलेला . त्याकाळात खरंतरं आजच्या मानाने पाणी अगदी मुबलक प्रमाणात होते , पण तरी त्यांना पाण्याचे महत्व आणि किंमत कळत होती , तसेच ते जपून वापरावे याची जाणं सुद्धा होती . घरात सुद्धा आम्हाला ते वेळोवेळी सांगत असत , पाणी जपून वापरायला .
मग इथून जवळच यू. डी. सी. टी. चे आवर आहे हे माहित होते . मग विचारले . रस्ता पार केला आणि पोहोचलोच यू.डी.सी.टी. ला . पण त्याचे नाव बदलले होते आय सी टी झालेले . इथेही परत हटकलेच गेटवर , परत विनंती केली , कारण सांगितले . परत तेच कुठे आत शिरू नका . बाहेरून फिरून बघू शकता . लांबूनच दगडी पोर्च दिसत होता . हा ही तसाच भव्य . याचे सुद्धा चार खांब पण चौकोनी ! अगदी साधे सरळ पण एक छान भव्य ! इमारतीत आत जायला वळले , मात्र या भागाचे त्यांनी रंग रूप पारच पालटून टाकलेले . अगदी आधुनिकीकरण . एकदम विरोधाभास . मी पाहिल्यानेच जात होते तिथे , पण कुणीही ओळखू शकेल , असा हा बदल होता . आजूबाजूला फिरून कॅम्पस बघत होतो . आणि बहीण सांगू लागली , तिला इथे पीएचडी साठी ऍडमिशन मिळाली होती , पण घराच्या अडचणीमुळे तिला करता आली नाही . मी एकदम आश्चर्यचकित ! मला हे माहीतच नव्हते . या क्षणापर्यंत मला वाटत होते , मला हीचे सगळे काही माहिती आहे . मग हेही स्वीकार केले , अजूनही बऱ्याच गोष्टी असतील , ज्या मला माहित नसतील . माझी अजून एक प्रिय व्यक्ती या महाविद्यालयाशी जोडली गेलेली , पण वेगळ्याप्रकारे हे लक्षात आले . आयुष्याची हीच गम्मत असते , कुठे , काय , कसे सरप्राईझ मिळेल हे सांगता येत नाही !
हे सगळे आनंदी क्षण , आठवणी घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो . या सगळ्या आनंदाची कशातच मोजदाद होऊ शकत नाही ! शब्द तर खूपच तोकडे , फक्त ते क्षण जगाता आले , अनुभवता आले ! या नंतर वेळ होती इथे शिकलेल्याना सरप्राईझ देण्याची . मग मी काढलेले फोटो त्यांना पाठवले . त्यांना आनंदाने आश्चर्यचकित करून टाकले . जाण्या आधी माझेच नक्की नव्हते , त्यामुळे कुणालाच कल्पना नव्हती , मी तिकडे जातेय याची . त्यामुळे ते फोटो बघून , ते आनंदाने पार भारावूनच गेले ! त्यामुळे त्यांच्या तिथल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला आणि काही क्षण आठवून , ते क्षण परत जगण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली !
चार तास , फक्त चार तास ! पण या चार तासात किती अनुभव , किती आनंद , किती सरप्राईझेस ! जायला निघाले तेव्हा , मलाही कल्पना नव्हती या चार तासात मी किती वेगवेगळ्या 'काळात' जाणार आहे आणि तो 'काळ' अनुभवणार आहे . मला किती आनंद मिळणार आहे या सगळ्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे !!!असे क्षण माझ्या आयुष्यात परत परत मला अनुभवायची संधी मिळो .........!!!
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
७जुन २०१९
माटुंगा स्टेशन
रुईया महाविद्यालय -मुख्य प्रवेशद्वार
अर्धपुतळा
बऱ्याच जिन्यांपैकी एक
जिन्याच्या बाजूच्या भिंतीवरील
आधुनिक नोटीस फलक
बऱ्याच कॉरिडॉर पैकी एक
गोलाकार कॉरिडॉर
दुसरा गोलाकार कॉरिडॉर
लांबलचक कॉरिडॉर
इमारतीच्या एका भागातून दिसणारा
इमारतीचा दुसरा भाग
वेगवेगळ्या जिन्यांपैकी
एक जिना नाविन्यपूर्ण रचना असणारा
दुसऱ्या बाजूने असलेले प्रवेशद्वार
व्ही जे टी आय , मुख्य फलक
मुख्य पोर्च
पोर्च मधून प्रवेश केल्यावर
दिसणारे दृश्य
दोन भागात विभागलेला वैशिष्ट्य पूर्ण जिना
जिन्यावर चालून गेल्यावर मागे वळून
बघितल्यावर दिसणारे दृश्य
जिन्यावरील छताचा भाग
पहिल्या मजल्यावर असणारा छोटीसा
गोलाकार जिना
बाहेरच्या बाजूने दिसणारा इमारतीचा
काही भाग , भव्यता दर्शविणारा
वसतिगृहच्या इमारती
ऑटोमोबाइलची आऊट डोअर
प्रयोगशाळा असावी , माझा अंदाज
आय सी टी मुख्य प्रवेशद्वार
मुख्य पोर्च अणि त्याचे चार खांब
मुख्य पोर्च मधून आत गेल्यावर
मुळ स्वरुप पूर्णपणे बदलून टाकलेले
अत्याधुनिक Entrance foyer
इमारतीच्या मुळ बांधकामाच्या
अगदी विरुद्ध अणि अतिशय विसंगत...
पोर्च - आत शिरल्यावर मागे वळून बघितल्यावर
दिसणारे भव्य चौकोनी खांब!
मुख्य इमारत, बाहेरच्या बाजूने
खूप मस्त सैर घडवलीस :)
ReplyDeleteआनंदी धन्यवाद!!
DeleteKhup sensitive ahes tu ❤️
ReplyDeleteAni amchi mumbai chanch ahe
Tu ethe hotis agodar he nawyane kalale mala
Mast as usual
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 🤩🤩🥰
Deletekhup chan ,, majhi pan VJTI chi atvan tazi jhali
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद!!!
DeleteMe UDCT la khup Vela jayche .. athavani parat tajya zalay.. VJTI la me suddha gele nahi pan ata khup iccha hotey visit dyaychi..
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद! 🙏
Deleteनविन ज्ञानात भर पडली मी आज मुंबई कुठेच काही संबंध नाही. लेखाजोखा छान चव आहे नेहमी प्रमाणे.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद!!
Deleteयासर्व फोटो मधिल व्हि.जे. टि. चा मेन पोर्च आणि आमचि होष्टेल बिल्डिंग, तसेच यु. डि. सि. टि.चे प्रवेशद्वार व बाह्य बिल्डिंग चाच भाग ठळक पणे आठवणित राहिलेला दिसतोय
ReplyDeleteWa chan tripch zhali collage bhet
ReplyDeletePic 👌
आनंदी धन्यवाद!
Deleteखूपच मस्त..जणू माझीही एक
ReplyDeleteसाईट-visit झालीय हा लेख वाचताना.
आपलीही"आर्किटेक्चरल फोटोग्राफि"अप्रतिमच....गोलाकार corridor,facade photos,भारीच...verticle coloumns amazing..ह्या प्रत्येक स्पेस च्या आनंदी,आठवणी अनुभव मस्तच वर्णीले आहे.....
��jivachi mumbai tase jivacha matunga char tasat khoop bhari
ReplyDeleteMazi bahin dadarla aaste
so matunga la bazar bhaji shoping sathi phirleSo lekh pics khoopch sunderChar tas phirun tula joo anand zala techi tulna kashashich nahi
So ha lekhan pravas navin subject navin anubhavasah aamhala wachayla milu de
All the best��
मी माटुग्याला माझ्या लहान पणीच्या आठवणी आल्या. मी एका स्टेशनजवळील चाळीत आठ दिवस राहिलेली होती तु लिहीलेले आणि बघितलेले मात्र मला काही माहित नाही. तु केलेले वर्णन ईतके हुबेहुब आहे की आपण ते प्रत्यक्षच बघत आहे असे वाटते .फोटोग्राफी खूप छान आहे. सौ.मंदा चौधरी.
ReplyDeleteखुप छान सैर होती. मी मुंबईची आहे.खुप जुन्या आठवणी परत मनात आल्या.मी Parle Collage ला होते.आजही collage ला गेले की अशीच सर्व collageभर फिरते.तु खुप छान लिहीले आहेस एकदम touchy.👌👌
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद! 😇
Deleteताई तुझ्या मुळे आज vjti ला भेट देता आली ...तिथे फिरू शकलो प्रवेशद्वार ते सगळया जिन्या वरून चालत इमारती बघू शकलो .. नाही तर आम्हला फक्ट नावच माहिती होते VJTI ...
ReplyDeleteमस्तच नेहमी प्रमाणे...
आनंदी पाऊसचे आनंदाचे थेंब आमच्यावर असेच कायम बरसू दे....������आणि यात सर्वात महत्वचे म्हणजे ते सर्व फोटो असता ते पण खुप सूचक असता अँगल परफेक्ट...��
मस्तच छान सहल घडवली. खूप उत्सुकता होती मुंबई बद्दल. एकदाच गेलेले मुंबईला. आज तू दुसर्यांदा घेऊन गेलीस. अशाच सहलीला घेऊन जात जा आम्हाला नवीन ठिकाण अनुभवायला
ReplyDeleteKhupch Chan mahiti Matunga college
ReplyDeleteतुझं लेखन वाचल्यावर त्या ठिकाणी आपण गेल्यासारखे वाटते .वर्णन वास्तवच आहे . लेखन कार्यास शुभेच्छा
ReplyDeleteChan ahe likhan
ReplyDelete
ReplyDeleteLoved your Matunga. Lovely pics and amazingly explained.
I don’t think I will ever visit VJTI or ICT., seeing them through your eyes is enough for me.
I don’t think they changed the porch at all beyond may be paint it. It is just a very severe specimen of Art Deco.
You have given us a very lively experience through the blog.
Bless you dear..