Skip to main content

परीचा महाल (माझा वारसा)

 परीचा महाल 

(माझा वारसा)

                   याबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहायचे मनात होते. पण मुख्य अडचण म्हणजे त्याची छायाचित्रं माझ्याजवळ नव्हती. याचा सांभाळ ज्या काकूने केला, ती अगदी सगळ्यात अलीकडच्या काळात चौधरी सदनातच राहात होती. त्यामुळे हा चौधरी सदनातच होता. मध्यंतरी काकू बरोबर इथे-तिथे स्थलांतरित झाला. पण परत शेवटी चौधरी सदनातच येऊन विसावला. फरक असा की तो प्रथम चौधरी सदनात आला. तेव्हा घर माणसांनी अगदी गजबजलेले होते. आता तो एकाकी आहे तिथे आणि वापरात सुद्धा नाही ... 
                   या लेखाचे शीर्षक आहे परीचा महाल! पण ही गोष्ट आहे माझ्या लाडक्या प्रसाधन/शृंगार मेजची. थोडक्यात ड्रेसींग टेबलची. याचा उलगडा होईलच पुढे. विकत घेतलेला आहे. आमच्या दादांना त्या दुकानाचे नाव वगैरे पासून त्याच्या खरेदीचा पूर्ण प्रसंग अगदी नीट आठवतोय आजही. अर्थातच माझ्या खूप आवडीचा, मना-हृदयाचा एक कोपरा कायमचा व्यापलेला आहे, त्याने. आज त्याबद्दल व्यक्त व्हायची संधी घेते आणि त्याची गोष्ट सांगते, माझी व्यक्तिगत अशी. ही सगळी गोष्ट तो सुद्धा ऐकतोय आणि सुखावून मला घट्ट मिठीच मारतोय जणू, अगदी जाणवतेय मला! दोन अगदी बालपणीचे जिवाभावाचे मित्र खूप काळाने भेटल्यावर जशा भावना उचंबळून येतात, तसेच झालेय माझे आज अक्षरशः! 
                सौंदर्य, माया, प्रेम वगैरे बघणाऱ्याच्या डोळ्यात असते म्हणतात. माझे काहीसे तसेच झालेय याच्या बाबतीत. हा छान लाकडापासून बनवलेला आहे. पण फार कोरीव काम वगैरे नाही त्यावर. मी आज पर्यंत बरेच उंची कोरीव काम केलेले शृंगार मेज पाहिलेत कुठे-कुठे. पण याच्या इतका सुंदर मला कुठेच बघायला मिळाला नाही. इतके माझे प्रेम आहे यावर, याचा अजून एक दाखला मिळेलच पुढे! तर यावर सजावट म्हणून थोडेफार लाकडी नक्षीकाम केलेले आहे. काही छान अगदी गोड असे छोटे छोटे खांब सुद्धा आहेत याला. पण त्यापेक्षा त्याची जी काही मजल्या-मजल्यांची रचना आहे ना, ती मला फार आवडत असे आणि अजुनही आवडते! तिथे राहात असतांना, अगदी लहान असतांना काही वेळा त्यावर चढल्याचे आणि त्यावर चढले म्हणून ओरडा खाल्ल्याचे पण अंधुक आठवते आहे. मला तेव्हा वाटे, अजुन लहान व्हावे आणि या मजल्यांच्या रचनेत चढावे वर-वर. तसेच वाटे प्रत्येक त्याच्या दोन खांबांच्या मध्ये रेलिंग हवे होते, म्हणजे गॅलरीत उभं राहातो तसेच तिथे उभं राहाता आले असते. थोडक्यात काय तर, मला तो एक परीचा महालच वाटे, वेगवेगळे मजले असलेला! हल्ली डॉल्स हाऊस असतात तसे. आणि वाटून जाई पटकन एखादी छान गोड परी येईल आपल्याला भेटायला तिथे, हातात जादूची छडी घेऊन. म्हणेल काय हवं ते माग आणि आपल्या जादूच्या छडीने हवे ते देईल मला! पण तेव्हा काही व्यक्त होता येत नव्हते, त्यामुळे हे कधीच कोणाला बोलले नाही मी कधी. आणि व्यक्त होऊनही काही उपयोग नव्हताच. कारण मला काही छोटीशी बाहुली होऊन तिथे वावरता आले नसते. पण मनातल्या मनात मात्र मी नेहमीच करत असे. थोडक्यात आभासी अनुभव! ती संधी कायमच उपलब्ध असे किंवा अजूनही आहेच! 
                         दुसरी गोष्ट म्हणजे थोडे मोठं झाल्यावर मी जेव्हा अजिंठ्याची चित्र पाहिली, तेव्हा त्यातील घरे आणि त्याच्या गॅलरी, त्यात उभी असलेली माणसे पाहिल्यावर परत या माझ्या परी च्या महालाच्या मजल्यांच्या रचनेची आठवण झाली. तसेच आता परत त्याचा सविस्तर अभ्यास करतांना सुद्धा परत सगळे आठवले आणि कुठे तरी सारखेपणा वाटला. 
                     आता हा खरं म्हणजे शृंगार मेज आहे. पण गम्मत म्हणजे त्याच्या खऱ्या उपयोगाशी संबंधित माझ्या व्यक्तिगत काहीही आठवणी नाहीत. एकतर आरसा बराच उंच असल्याने आम्हाला त्यात दिसायचा काही प्रश्नच येत नव्हता त्यावेळी. तेव्हा तयारी म्हणजे काय तर फक्त केसांना तेल लावायचे आणि भांग पडायचा. बाहेर जातांना पावडर-गंध लावायचे. पण नटण्याची अजिबात आवड नव्हती. त्यामुळे त्या अर्थाने या शृंगार मेज शी फारसा संबंध नाहीच आला. आता तर तेव्हढाही नाही, कारण आता पावडर-गंध सुद्धा लावत नाही. असो. 
                     तर मूळ मुद्दा, याची छायाचित्रं नव्हती. काकू म्हणाली , मी तिथे गेले की नक्की फोटो काढून तुला पाठवते. पण ही टाळेबंदी आणि करोना यामुळे ती जाऊच शकली नाही तिथे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. माझ्यासाठी काहीतरी खास नियोजन होते. माझी आणि माझ्या लाडक्या बाल मित्राच्या भेटीचे नियोजन! इतक्या वर्षांनी प्रत्यक्ष भेटण्याची, बघण्याची, स्पर्श करण्याची अगदी अनपेक्षित संधी मिळाली आणि अर्थातच छायाचित्र काढण्याची सुद्धा . आता लिहितानाही माझ्या सर्वांगावर शहारे आलेत. चौधरी सदनात याच्या सोबत अजून काही सामान काकूने एका खोलीत ठेवलेले आहे. चावी पाटील काकांकडे. तसे तिने सांगितले होते. मग मी तिथे जाऊन त्यांना सांगितले आणि त्यांनी उघडून दिले. 
                        दार उघडले आणि हा समोरच दिसला. काय करावे समजेना. आधी सगळीकडून त्याला नीट बघितले, अगदी डोळेभरून ! अजुनही अगदी जसाच्या तसा आहे. त्याची पॉलिश सुद्धा तशीच चकाकती आहे. फक्त त्याच्या वरच्या भागातील नक्षीचा थोडा भाग तुटलेला होता. इकडून तिकडे नेता आणता तुटले असावे. मग मी तो थोडा सरकवला आणि ती नक्षी जागच्या जागी ठेवली. भरपूर छायाचित्रं काढली! पाटील काका माझ्या सगळ्या हालचाली, गोष्टी बघत होते, मी काय बोलते ते ऐकत होते. माझं लक्षच नव्हतं त्यांच्याकडे. माझा काम झालं, निघण्याची वेळ आली. पाय निघेना, पण पर्याय नव्हता. त्याला भेटल्याचा आनंद आणि लगेचच त्याला सोडून जाण्याचे दुःख, अशा संमिश्र भावना झाल्या होत्या. पाटील काकांना सांगितले बंद करून घ्या. पण अगदी अनपेक्षितपणे ते म्हणाले, ताई फक्त फोटो का काढून नेताय, त्यापेक्षा तुमच्याकडे घेऊनच जा ना हा. मी एकदम दचकलेच. आम्ही एकमेकांना ओळखत नाही, अगदी पहिल्यांदाच भेटलो होतो. पण त्या काही मिनिटात त्यांना लक्षात आले, माझे त्याच्याशी किती जवळचे नाते आहे! एकदम डोळे भरून आले. त्यांना ते शक्य नाही असे उत्तर देऊन तेथून बाहेर पडले. 
                        आता हे घरात ठेवायची एक जागा होती. चौधरी सदनाचा एक कोपरा जिथे दोन्ही रस्ते मिळतात, तो गोलाकार केलेला आहे. हा कोपरा घरात मोठ्ठ्या हॉल मध्ये येतो. अगदी सुरवाती पासून हा, या कोपऱ्यात हा ठेवलेला होता. भिंत गोलाकार आणि हा मेज सरळ, त्यामुळे त्याच्या मागे एक पोकळी राहत आहे. मग लपाछपी खेळतांना हा आपल्या मागे छान लपवून ठेवत असे. किंवा त्याच्या बाजूलाच दार होते, त्या दाराच्या आणि या मेज च्या मध्ये सुद्धा छान लपता येत असे. असा खेळतांना सुद्धा हा आमच्या खेळात सामील होत असे, अप्रत्यक्षरित्या. 
                            घरातील प्रत्येक व्यक्ती अगदी दररोज त्याच्या जवळ जाऊन काही मिनिटं उभं राहत असेच. तसेच या जागेवरून जवळ-जवळ सगळं घर दृष्टीक्षेपात येते. म्हणजे एका अर्थी त्याचे स्थान घरातील जेष्ठ व्यक्ती सारखेच होते. जसे घरातील जेष्ठ व्यक्तीशी घरातील प्रत्येक व्यक्ती दिवसातून एकदा तरी बोलतेच-भेटतेच आणि घरातील जेष्ठ व्यक्तीची घरावर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवर नजर असते, अगदी तसेच! एव्हढेच नाही तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातील चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींची जाणीव घरातील जेष्ठ व्यक्ती करून देते. त्याच प्रमाणे हा सुद्धा एका अर्थी तेच काम करत असतो (आरशातील प्रतिबिंब ). म्हणजे अगदी आमच्या बाबांसारखाच(आजोबा). 
                            याला अर्थातच आमच्या घरातील सगळ्यात जेष्ठ आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बाबांनीच घरात आणले . आज ते या जगात नाहीत. पण हे लिखाण चालू केल्यापासून, मी चौधरी सदनातच राहतेय. त्यामुळे ते कायम माझ्या आजूबाजूला वावरत असतात म्हणण्यापेक्षा मी कायम त्यांच्या अवती-भवतीच  वावरत असते. योगायोग असा की आज एक फेब्रुवारी! आजच हे लिखाण झाले माझ्या हातून, ठरवून नाही, अगदी शंभर टक्के यायोगायोगाने. माझ्या मनातील श्रेष्ठ स्थानावर असलेली व्यक्ती आणि वस्तू यांचा एका वेगळ्याच प्रकारे आलेला असा हा संबंध, योगायोगानेच! एक फेब्रुवारी म्हणजे आमच्या बाबांचा वाढदिवस! त्याची वेगळी सविस्तर गोष्ट सांगेनच. पण आज मन अगदी आतून आनंदी झालेय, या योगायोगामुळे!
बाबा, वाढदिवसाच्या हजारो, लाखो, 
अगदी आभाळभर शुभेच्छा!!!
©आनंदी पाऊस 
परीचा महाल (माझा वारसा)
१ फेब्रुवारी२०२२











नुकताच डागडुजी करून धाकट्या लाडक्या काकाच्या घरात 
दिमाखात उभा आहे आता परी चा महाल!!! 💃💃💃










Comments

  1. जनार्दन चौधरीFebruary 04, 2022 7:53 am

    एवढा छोटासा विषय जो आमच्या ध्यानि मनि सुध्दा राहिला नाही त्या बद्दल एवढे सारे लिखाण तेहि मायेने ओत प्रोत भरलेले .यातच लेखिकेचे प्रमाण पत्र दडलेले आहे असे वाटते.

    ReplyDelete
  2. फार सुंदर मांडलाय आपण आपला वारसा असलेला परीचा महाल....

    ReplyDelete
  3. आता ह्या वस्तू घरामध्ये नसतीलच...
    इतकं बारीक लिखाण तू कस करतेस ..
    Really l salute you ..
    पण ह्या वस्तू जर तेथे असतील तर तुला बक्षीस
    सर्वच म्हणतील हे सर्व घेऊन जा ...
    And open exibition ..

    ReplyDelete
  4. भारती फेगडेFebruary 04, 2022 12:33 pm

    खुपच सुंदर आठवणी लिहील्या आहेत बारीकसारीक तपशीलासह, खुपच छान

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!!

      Delete
  5. एव्हढ्या जुन्या परीच्या महालावरील आपलं प्रेम बघून मला आपल्या स्वभावातील एखाद्या गोष्टी बद्दलची आपुलकी किती पराकोटीची असु शकते याचं खुपच कौतुक वाटत आहे.अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. सर खूप खूप मनःपूर्वक आनंदी धन्यवाद!!! 😇😇

      Delete
  6. Paricha mahal fharach sunder
    Dressing table tyacha vishaichihe likhan vachun kharach to adhikach parisarkha sunder disu lagala tyabadalche prem ani tyache varnan kaitukaspad

    ReplyDelete
  7. बीना काकुFebruary 04, 2022 4:03 pm

    परी च्या महालाची डागडुजी होऊन पुन्हा दिमाखात उभा आहे, धाकट्या, लाडक्या काकाच्या घरात!!!

    ReplyDelete
  8. स्वाती चौधरीFebruary 04, 2022 5:21 pm

    परीचा महाल बदल तू येवढे लिहलेस मला तर वाचताना मला तर खूप दाटून आले किती छान लिहिले

    ReplyDelete
  9. लीला गाजरेFebruary 04, 2022 6:48 pm

    अग बाई खूपच सुंदर आहे गं तुझा परीचा महाल .अस वाटतं जाऊन भेट देऊन यावी त्या महालाला !किती छान लिहितेस तु!मला खूप हेवा वाटतो तुझ्या लिखाणाचा .असाच सतत आनंदी पाऊस बसरत राहो तुझ्या दारात

    ReplyDelete
  10. संपदा टीपरेFebruary 04, 2022 6:53 pm

    खूप सुंदर लिहले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!

      Delete
  11. Khup chan aahe tuza paricha mahal aawdala mala khup ����chan tapashil var lihile aahes mast

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!! 😇

      Delete
  12. पूजा पाटीलFebruary 04, 2022 8:40 pm

    खूपच छान लिखाण��������������

    ReplyDelete
  13. Vachata vachata pari jhalyasarkhe vathale
    khupcha mast ahe

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम आनंदी धन्यवाद!!!

      Delete
  14. रंजना राणेFebruary 05, 2022 7:24 am

    खरंच खुपच छानच आठवणी��������������������������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद!

      Delete
  15. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात छान लिहिले आहे

    ReplyDelete
  16. अप्रुपच...नक्षीदार परीमहालाचं सौंदर्य टिपताना व‌ त्याच्या आठवीणी,लहान ‌होऊन वर चढण्याचं creative imagination वाचनाता..जणू spiral जिन्यातून वर नेणारी 'परी' माझ्या डोळ्यासमोर चित्र उभ राहतय..
    धुळ बसलेल्या चित्रांपासून ते चकचकीत आरसे असलेला चमकणारा महल फोटोjourney भारीच.....चौधरी सदनातील सारयांच रूप खुलवाणरया हया परीमहलाला मालाही भेट द्यायला आवडेल.

    ReplyDelete
  17. रेवती डींगरेFebruary 05, 2022 7:13 pm

    वर्षा, तुझा परीचा महाल प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा केलास खूप सुरेख वर्णन केलेस.एखाद्या निर्जीव वस्तूवर तुझे आत्मीय नाते पाहून छान वाटले.खूप आवडला महाल.अभिनंदन ��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍😍😇

      Delete
  18. शैलजा चौधरीFebruary 05, 2022 10:25 pm

    मस्तपरीचा महाल हे नावच मला खुप आवडल
    खुपच छान लेखणी केली तु
    मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!! 😍😍

      Delete
  19. मालती चौधरीFebruary 07, 2022 6:27 am

    खूप खूप आवडला परी चा महाल ����❤️❤️मला पण खूप आवडायचा परी चा महाल हॉल खूप शोभा यायची मस्त
    ������अप्रतिम लिहले आहे

    ReplyDelete
  20. Paricha mahal khoop ch aawdla aash Maher gharatil wapratil waste tet dressing table hi jivalachi gost
    Mi lekh wachun mahercha dressing table jo maze aajobani banwla hota
    Belgaumla aajoba Kala pasun saw mill aani furniture making pan hote so table khuchi cot sagle gharech ����
    Mi jara tuzeshi share kele

    ReplyDelete
  21. Khupach chan aathavani aahet tuza kade👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद!! 😇

      Delete
  22. चौधरी परिवारातील सुंदर परी चा सुंदर परी महाल खूप सुंदर तंत्रशुद्ध शब्दलेखन बहुत खूब

    ReplyDelete
  23. प्रा वैशाली चौधरीFebruary 18, 2022 12:06 pm

    परीच्या महालातील शृंगार मेज ��������
    ड्रेसिंग टेबलचा मराठीतील शब्द वाचायला मस्त वाटला , कारण तो कधीच आपण वापरत नाही .

    ReplyDelete
  24. खूप सुंदर परिचा महाल....छान लिहिले आहे की मी त्याची कल्पना करायला लागले.

    ReplyDelete
  25. उदय बोरगावेNovember 14, 2024 4:51 pm

    🙏🏻😊
    आपल्या मधील खोडकर आणि निरागसपणाला बाल दिनाच्या शुभेच्छा....

    ReplyDelete
  26. निता कुलकर्णीNovember 14, 2024 8:21 pm

    छान आठवणी लिहिल्या आहेत..
    👌👌👌👍👍🌹🌹

    ReplyDelete
  27. नरेंद्र नंदेNovember 16, 2024 12:53 pm

    वाह सुरेख झाला आहे लेख 💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...