एन् आय वेन्ट व्हायरल !
(काही अनुभवलेलं...)
हल्ली बकेट लीस्ट वगैरेची लहर फारच फोफावलेली आहे . माधुरी दीक्षित च्या 'बकेट लीस्ट' मुळे असेल कदाचित ! खरं म्हटलं तर माणूस म्हटला की त्याची काही स्वप्न , काही इच्छा , काही आशा-आकांक्षा असणारच . आणि त्या असायलाही हव्यात . मग त्यातील काही सहजासहजी पूर्ण होत असतील किंवा काही फारच कठीण असतील पूर्ण व्हायला किंवा काही अगदी कल्पनेत किंवा स्वप्नातच पूर्ण होणाऱ्या असतील . थोड्या पूर्वी मी ऐकले होते -- माय टॉप टेन विशेश आणि आता काही काळापासून बकेट लीस्ट !
तर मी काही माझ्या माय टॉप टेन विशेश किंवा बकेट लिस्ट कधीच लिहून काढली नव्हती . पण मनात बऱ्याच अशा इच्छा - आकांशा होत्या , आहेत , कायम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असतीलच ! अर्थातच यातील काही पूर्ण झाल्या , काही नाही झाल्या . तर बऱ्याच अशा काही गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती , अशा कित्येक गोष्टी आश्चर्यकारकरित्या अनुभवायला मिळाल्या आणि त्यातुन मिळालेला आनंद अगदी अवर्णनीय होता , आहे ! कधी या आशा -आकांशा -इच्छा , काळ वेळ परिस्थिती नुसार बदलत असतात . पण खरंच ज्याची तुम्ही कधी इच्छा किंवा कल्पना न करता काही गोष्टी अनुभवायला मिळतात त्या आनंदाला तोड नसते आणि असेच खूप आनंद मला अनुभवायला मिळाले !
माधुरी दीक्षित च्या बकेट लीस्ट मुळेच कळले की काही जणांच्या बकेट लीस्ट मध्ये 'व्हायरल व्हायचंय' अशी सुद्धा एक इच्छा असते . ते सगळं पाहिलं किंवा तेव्हा त्याबद्दल फारसे काही वाटलेही नाही किंवा त्याबद्दल मनात काही विचार सुद्धा आला नाही आणि आज अचानक मी म्हणतेय , "एन् आय वेन्ट व्हायरल !" मलाही कल्पना नव्हती असे काही घडेल माझ्या बाबतीत . आणि मी हे वाक्य उच्चारेल ! तर अर्थातच आज मी माझ्या व्हायरल होण्याची गोष्ट सांगणार आहे !
आत्ता पर्यंत माझे फुलांचे वेड माझ्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यानाच चांगलेच माहितीचे झालेय . सगळ्यांना दिसतच असते ज्या ज्या फुलांचा सिझन आहे ती ती फुलं मी कुठून ना कुठून वेचून आणतच असते . या माझ्या फुलांच्या प्रेमामुळे कोण ना कोण कुठेही असले तरी माझी आठवण करतच असते . आणि फुलंही देतच असतात . प्रत्यक्ष किंवा व्हाट्सअँप मधून छायाचित्र किंवा चित्रफीत पाठवून .
सकाळ संध्याकाळ या-नी त्या बागेत फिरायला जाण्यामुळे माझ्या बऱ्याच ओळखीही झाल्यात आणि त्यांच्याशी छान मैत्रीही झालीय . वय , भाषा असल्या कुठल्याही गोष्टीचा अडथळा न येता . तर त्यादिवशी अशाच माझ्या परिसरात राहणाऱ्या एका आंटीनी व्हाट्सअँप मधून मोगऱ्याच्या फुलांनी भरलेल्या भांड्यांचे फोटो पाठवले . मी लगेच विचारले तुमच्या कडची का ही फुलं ? तर त्या हो म्हणाल्या . मी लगेच , केव्हा येऊ फुलं घ्यायला ? म्हणून विचारले . एनी टाइम , त्या म्हणाल्या . मग माझ्या मनानेही चंगच बांधला एक तरी दिवस जाऊन थोडी फुलं घेऊन येण्याचा ! बरं त्याच दिवशी , त्याच ग्रुप मधील दुसऱ्या दोन आंटी कडे जायचे आधीच ठरलेले होते . तिथे गेल्यावर , मी सहजच हा विषय त्यांच्याकडे काढला . तेव्हा त्यांच्या कडून कळले त्या आंटी(ज्यांच्या कडे ती मोगऱ्याची फुलं आलेली होती ) इथे नाहीतच . त्या म्हैसूरु ला गेलेल्या होत्या . आणि त्यांनी जी फुलं दाखवली , ती म्हैसूरु च्या घराच्या बागेतील होती . मी म्हटलं हा तर मोठा गोंधळ होऊन बसला . मग मनात विचार आला ...त्याची जरा चेष्टा करूया . मग त्यांना मेसेज टाकला--मी तुमच्या घरी आलेले पण घराला कुलूप असल्याने मला परत जावे लागले . तर म्हणाल्या अरे तू खरंच म्हणालेलीस का ? मला वाटलं तू चेष्टा करत होतीस . मी तर आता म्हैसूरु ला आहे . आणि ती फुलं सुद्धा इथलीच आहेत . पण मला तुझे फुलांचे वेड माहिती आहे . तुला हवं असेल तर , तू तिथे माझ्या घरी जाऊन , फुलं तोडून घेऊ जाऊ शकतेस . मला वाटलं त्या इकडे येत आहेत . पण तसे नव्हते , त्यांचा मुलगा इथेच राहतो आणि तो आहे घरी , सो मी जाऊन घेऊ येऊ शकते फुलं . असं त्यांचं म्हणणं . पण मग या सगळ्यात मी जरा अनकंफोर्टबल झालेली वाटली त्यांना . मग म्हणाल्या जा , तो काही तुला खाणार नाही . फक्त मला सांग कुठल्या दिवशी जाणार म्हणजे त्याप्रमाणे मी त्याला सांगेन गेट लॉक करू नकोस . मी म्हटलं तस नको , तो ऑफिस ला जायच्या आत मी जाऊन तोडून आणीन म्हणजे तो गेट लॉक करून जाऊ शकेल .
बऱ्याच सावळ्या गोंधळानंतर मी एक दिवशी सकाळी ७ वाजता त्यांच्या घरी जायचे ठरले . तसे त्याला ही कळवले . पण परत संध्याकाळी माझी अस्वस्थता सुरु झाली . असे कसे जायचे . तेही त्या घरी नसताना आणि फुलं , तीही झाडावरून तोडून आणायची . वगैरे वगैरे अशी एक ना अनेक कारण येत होती माझ्या मनात , तिथे जाणे रहित करण्यासाठी . पण शेवटी मन घट्ट केले . विचार केला जाऊन तर बघू . गेल्याशिवाय कसे कळेल , कसे वाटते ते . आणि त्याशिवाय ती सुंदर फुलं कशी मिळतील? आणि त्याचा सुगंध घरभर कसा दरवळेल ? मग घरातही सांगून टाकले उद्या सकाळी ७-८ वाजता मी फुलं तोडायला जाणार आहे .
सकाळी थोडे लवकरच उठले , म्हटलं वेळेत आवरून जावे . माझ्यामुळे त्याला ऑफिस ला जायला उशीर नको . भराभरा आवरून बरोबर ७ वाजता गेले . तिथे पोहोचले तर तो गेट मध्ये उभं राहून कुणाशी तरी बोलत उभा होता . बरेच झाले . त्याला विश करून गेटमधून आत शिरले . बरं त्यांच्या कडे जायची पहिलीच वेळ . त्यामुळे मोगऱ्याचे झाड कुठे आहे हे माहित नव्हते . पण विचारायची वेळच आली नाही . कारण समोरच हिरवेगार मोगऱ्याचे झुडूप असंख्य पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेले दिसले . मग काय गेले लगेच त्या झुडुपाजवळ . आनंदाने वेड लागल्यासारखे झाले . अधाशासारखे झाले . किती फुलं तोडू आणि किती नको असे होऊन गेलेलं . या सगळ्या गडबडीत फोन दुचाकीच्या डिक्कीतच राहून गेला . पण फोटो तर काढायचे होते , झाडाचे आणि झाडासोबत सेल्फी सुद्धा ! मग काय गेले परत आणि आणला फोन काढून . पण लाज वाटत होती , त्याच्यासमोर सेल्फी काढण्याची . त्या पठ्ठाच्या गप्पा काही संपेनात . मग विचार केला थोडी फुल तोडू या , हा आत जाईपर्यंत . मग एकदा का हा आत गेला की काढू या सेल्फी . हुश्श्श ... थोडा वेळाने त्याच्या गप्पा संपल्या आणि तो आत गेला आणि ती दुसरी व्यक्ती सुद्धा गेली . पण घरात जाण्याआधी मला सांगून गेला , काही हवे असल्यास सांग. मग मी खुश ! , भराभरा भरपूर सेल्फी आणि झाडाचे फोटो काढले . आणि परत फुल तोडायच्या कामाला लागले . बरं वाटत नव्हतं फुलं तोडायला . पण तसेही ते सुकून जातील , त्याकडे बघायलाही कोणी नाही आणि आंटी असत्या तर त्यांनीही तोडलीच असती , अशी मनाची समजूत काढून शक्य तितकी सगळी फुलं तोडली . फुलं तोडायची सवय नाही मला . आठवतही नाही या पूर्वी अशी कधी फुलं तोडली होती झाडावरून . बहुशः १९-२० वर्षांपूर्वी असेल . मम्मी च्या बागेत कुंदाचे झुडूप होते , ते ही असेच खूप बहरत असे . त्याच्या कळ्या , फुलं तोडली होती . त्यानंतर आजच ! त्यामुळे चुकून फुलांबरोबर काही काळ्या सुद्धा खुडल्या गेल्या . त्याचे आणिक वाईट वाटत होते . माझे काम होत आले आणि त्याची ऑफिस ला जायची वेळ सुद्धा झाली . पण तरी तो म्हणाला तू तोडून घे हवी तेव्हढी फुलं मी गेट लॉक करत नाही . म्हटलं तेच नकोय मला , म्हणून मी लवकर आले आणि झालीत माझी फुलं तोडून , म्हणून मी निघाले आणि तो ही निघाला .
निघताना लक्षात आले , आज सोमवार . वणीकर काका सोमवारी पूजा करतात महादेवाची आणि महादेवाला पांढरी फुलं अति प्रिय ! मग त्यांना फोन केला आणि ते घरी असल्याची खात्री केली . मग त्यांना नेवून दिली थोडी फुलं . फारच खुश झाले ते . आठवणीने त्यांना फुल दिली म्हणून आणि मी खूप दिवसात त्यांच्या कडे गेले नव्हते आणि या कारणाने का होईना पण मी गेले होते म्हणून . शिवाय काकूंनी खोबऱ्याच्या वडया आणि लाडू दिले ते वेगळेच ! जाम मस्त वाटले मलाही .
घरी आले . आधी बाकीची काम आवरायला लागणार होती फुलांकडे पाहण्याआधी . पण तरी सगळी फुलं पिशवीतून काढून एका मोठ्या ताटली मध्ये काढून ठेवली . अरे काय भारी वाटत होतं , एव्हढी सगळी फुलं घरात बघून . आणि त्यांचा सुगंध तर घरभर दरवळला होता . पण आधी हातात ती फुलांनी भरलेली ताटली घेऊन एक सेल्फी काढला आणि त्या आंटीना पाठवून दिला . म्हटलं सगळं आवरलं की निवांत फोन करू . पण फोटो पाहताच क्षणी त्यांनीच फोन केला . त्या सुद्धा खुश होऊन गेलेल्या माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून .
माझी सकाळची सगळी काम आवरून झाल्यावर मग मी माझा मोर्चा फुलांकडे वळवला . या दोन दिवसात जेव्हाजेव्हा त्यांच्याशी बोलणे झालेले तेव्हातेव्हा त्यांनी सांगितलेलं हार किंवा गजरा करायचा असेल तर तुला सुई दोराच वापरावा लागेल . नुसत्या दोऱ्याने भागणार नाही . कारण फुल जवळजवळ ७ पदरी आहेत . पण मी हार किंवा गजरा करणार नव्हते हे नक्की . मी रोजच सिझन असेल ती फुलं कुठून ना कुठून वेचून आणत असतेच . आणि बाउल किंवा पसरट भांड्यात पाणी घालून त्यात छान रचून ठवते . दिसायलाही छान दिसतात आणि छान टिकतात २-३ दिवस . तसेच सुगंध असल्यास तोही छान घरभर दरवळत असतो ! तसेच आजही करणार होते मी आणि लागले त्या कामाला . ७५% काम होत आले होते . पण तेव्हढ्यात त्यांचा सरळ व्हिडीओ कॉलच आला . त्यांना उत्सुकता आणि कुतूहल होते मी काय करते त्या फुलांचे . ते बघायला त्यांनी व्हिडीओ कॉल केलेला .त्यांच्याशी बोलत माझे काम चालूच होते .
त्या घाई करत होत्या ...मला दाखव तू काय केलंस म्हणून . मी काही पूर्ण झाल्याशिवाय दाखवणार नव्हते . मग बोलता बोलता त्या हसत हसत म्हणाल्या मी माझ्या मुलाला सांगितले होते , एक इंदिरा गांधी येणार आहे फुलं घ्यायला . मी तर हसतच सुटले . त्या मला इंदिरा गांधी म्हणतात आणि बरेच इतर लोकही . पण त्यांच्या मुलाला माझी अशी ओळख करून दिलेली म्हणून जास्तच हसू आले मला ! मग म्हणाल्या मी तुझा फुलांसोबतचा फोटो माझ्या म्हैसूर आणि तिथल्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवला . सगळे विचारात आहे ही सुंदर आणि गोड मुलगी कोण आहे ? आणि मी एकदम बोलून गेले मीन्स टुडे आय वेन्ट व्हायरल ऑन व्हाट्सअँप ! त्या म्हणाल्या , येस्स्स्स ! मला आणिच हसू येत होते .
तेव्हढयात माझी फुलं रचून झालेली . मग त्यांना ती दाखवली . ती फुल बघून त्या फारच खुश होऊन गेल्या , म्हणाल्या बापरे एक एक फुल नीट रचून ठेवलेले दिसतेय ! बट इट्स लूकिंग सो ब्युटीफुल ! आणि मग माझे हे सगळे फोटो बघून ग्रुप मधल्या दुसऱ्या आंटी जाणार होत्या फुलं तोडायला .
सकाळी जवळ जवळ ४०-४५ मिनिटं मी फुलं तोडत होते , त्या पूर्ण बहरलेल्या झाडावरून . फुलं तर सुंदर होतीच पण त्यांचा तो छानसा सुगंध इतका दरवळत होता
की थोड्यावेळाने त्याची एक मधुर चव जिभेवर सुद्धा जाणवत होती आणि त्यामुळे लहानपणीची एक मधुर आठवण मनात जागी झाली ! मोगऱ्याचा सीझन म्हणजे उन्हाळा . आमच्या कडचा उन्हाळा म्हणजे फारच भयंकर . अश्या उन्हाळ्यात माठाच्या थंडगार पाण्याला पर्यायच नाही . आमच्याकडे सुद्धा होते एक मोगऱ्याचे झाड . त्याची काही फुलं देवाला , काही गजऱ्याला वापरली जात . मात्र दररोज ४-५ ताजी फुलं माझी मम्मी माठात टाकत असे आठवणीने ! त्या थंडगार पाण्याला अशीच छान मधुर चव असे ! धावपळीच्या जीवनात हे सगळे माझ्या आठवणीत सुद्धा नव्हते . आणि अचानक त्या फुलांनी ही आठवण सुद्धा ताजी आणि सुगंधित करून टाकली ! आणि ते छान क्षण आठवून परत जगण्याची संधी दिली .
आणि आज सकाळी ती फुल तोडत असताना मनात सारख्या काही ओळी घोळत होत्या .....
मोगरा फुलला ...मोगरा फुलला ...
फुले वेचिता बहरू कळीयांसी ...
मोगरा फुलला ... मोगरा फुलला ...
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
१३ मे २०१९
Good morning, it is nicely written. You have a good penchant for simplistic but realistic writing style.
ReplyDeleteHappy..fulvedi..nice post..
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद!! 😇😍
Deleteखूप सहज सुंदर अवर्णनिय लेखन मस्त
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!! 🤩🤩
Deleteखूपच सुंदर आहे .फूलांची आवड ,छंद जोपायसाचा खूपच छान वाटलं वाचून .त्याच्यामूळेच आनंदी पावसाची बरसात होते तुझ्या वर .असाच आनंदी पाऊस सततच पडत राहो तुझ्या जीवनात!
ReplyDeleteलेखनाचे शीर्षक आवडले
ReplyDeleteअन इंदिरा गांधी तर फर्स्ट क्लासच आहेत
😀😀खूप सारे सप्रेम धन्यवाद!!
Deleteखुप छान आहे लेख.👌सहज आणि खुप छान पद्धतीने लिखाण केले आहे व शीर्षक ही सुंदर आहे.फुलांची आवड अप्रतिम👌
ReplyDeleteChanch👌likhan,mogarache phoolancha rachana, ani phulvedi pan
ReplyDeleteआपल्या आनंदीपाऊसाच्या "आठवणीच्या अंगणात" फुललेला मोगरा व गुंफलेले मजेशीर लिहलेले अनुभव वेचताना माला 'सुखद गारवा'व "मोहकमय सुगंध"मनात दरवळून जातात.Mysore-मल्लिगे पण आवडलं..मोगऱ्याची सारेच प्र.चि. एकच नंबर...😍😍😍
ReplyDeleteवर्षाली ताई आपली फुलांनची बास्केट आपल्या इच्छेने छान बहरली आणि मोगर्याच्या सुगंधा ने मनात घमघमाट सुटला
ReplyDeleteआणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या ते म्हणजे आमच्याकडे पण भुसावळ ला कडक उन्हाळ्यात***
काळ्या माठातल थंडगार पाण्यात पांढरीशुभ्र फुलांचा वास खूप सुंदर आत्ताही मनात आठवण झाली तर त्याचा पाण्याला वास येतो.
खूप सुंदर अनुभव लिहिला👍🎉🌹🙋
खुप छान आणि सुवासिक लेख थंडगार मोगरा वासाचे पाणी.
ReplyDeleteछान सुवासिक अणि थंडगार धन्यवाद!! 😍😍
Deleteखुप छान लेख.लेखनातून मनात आणि घरात छानसुगंध दरवळला.खुप मस्त लेख आणि आठवणी. सौ.मंदा चौधरी.
ReplyDeleteदरवळत्या सुगंधाचे धन्यवाद!!!
Deleteसुगंधी लेख आणि फोटो तर अफलातूनच ��
ReplyDeleteसुगंधित पाण्याची आईडिया मस्तं आहे
सुगंधित धन्यवाद!!
Deleteरिझर्व्ह बँकेत नोकरी करत असतांना एकदा स्टाफ ट्रेनिंग कॉलेज चेन्नई ला जायचा योग आला होता संध्याकाळी फिरायला गेलो आणि भरपूर वासाचे मोगऱ्याचे गजरे अगदी स्वस्त मिळत होते चांगले ८ त १० घोस घेतले संध्याकाळी ४ आमच्या खोलीत AC समोर व ५ ते ६ कॉम्पुटर लॅब मध्ये आम्ही प्रॅक्टिकल करत होतो तेथे लावले सर्वाना हि आयडियाची कल्पना आवडली व सर्वानी माझे कौतुक केले. नंतरच्या काळात माझी सहकारी कामाक्षी व तिचा नवरा न चुकता चेन्नई वरून गजरे आणत असतात
ReplyDeleteअसाच एक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही.
महिंद्रा रिसर्च सेंटर मध्ये एक ट्रेनींग प्रोग्रॅम द्यायला २ वर्षा पूर्वी गेलो होतो. श्री जोशी आमचे चांगले मित्र तिकडे नाशिक वरून बदलीवर गेलेले. ट्रेनिंग संपले आणि गप्पांच्या ओघात त्यांना सांगितले चेन्नई म्हटले कि मोगऱ्याची फुले व गजरे आठवतात. परत जातांना चेंगळपट्टू स्टेशन वरून गच्च पिशवीभर मोगऱ्याची फुले + गजरे (मल्लीगे) घेतली. प्लॅस्टिक पिशवी असल्याने (व वासाच्या मोहाने सुद्धा) ती पिशवी मी विमानात सोबत (कॅबिन लगेज म्हणून) घेतली. विमानात खिडकी आवडते म्हणून अगदी शेवटून ३ नंबर ओळींमधील सीट घेतली. जागेवर जातांना मद्रासी मोगऱ्याचा घमघमाट घेऊनच प्रवेश केला. बहुतेक सर्व प्रवासी मोगऱ्याचा वासाने धुंद झाले पण विमानातील क्लास मुळे प्रतीक्रिया कुणीच दिली नाही पण सर्वांच्या डोळ्यात मी ती वाचत होतो
मी खिडकीत स्थानापन्न झालो फुलांची पिशवी मांडीवर. थोड्या वेळात शेजारी १ लहान मुलगा व त्याचे वडील आले बाजूच्या आईल सीट वर त्याची आई आणि लहान बहीण होती मुलाला खिडकीचे आकर्षण पाहून मी त्याला माझी खिडकी दिली व आईल सीट वर शिफ्ट झालो एकंदर राग रंग बघता ते कुटुंब आपल्या सारखेच मध्यमवर्गीय दिसत होते. त्या बाई माझ्या बहिणीपेक्षा ४/५ वर्ष तरी लहान असाव्यात आता त्यांच्या डोळ्यात मला गजऱ्याबद्दल ओढ व एवढी फुले मी का घेतली असतील असे कुतूहल स्पष्ट दिसू लागले. मधल्या काळात मी त्या माणसाशी गप्पा सुरु करून त्यांना सहज केले व नंतर ४/६ गजरे काढून त्यांना दिले आधी जरा त्यांना थोडे ऑकवर्ड वाटले व त्या म्हणाल्या दादा किती पैसे झाले? पण मी सहजपणे सांगितले कि मला आवडले म्हणून मी खूप फुले घेतली घरी फक्त पत्नी फुल वापरणार आहे व एवढी फुले आम्हाला ८/१० दिवस तरी पुरतील. तुम्ही लहान बहिणीसारख्या असून हि फुले भेट म्हणून ठेवा आणि मी हि फुले फुलबाजारातून फारच स्वस्त आणली आहेत. मग मात्र त्यांनी ती फुले आंनदाने स्विकारली त्या बाईच्या डोळ्यातील आनंद बघून समाधान पावलो.
लेखाची सुरवात वाचतांना हा लेख बहुतेक bucket list ह्या विषयावर बेतलेला असावा असं वाटत होतं,पण तो पुष्प प्रेमी निघाला. सगळ्यांच्या आयुष्यात, बर्याच गोष्टी होतात किंवा व्हायच्या राहून जातात पण त्या कधी तरी व्हाव्यात अशी सगळ्यांचीच लांबच लांब bucket list ही असतेच . असो, पण लेख जरी तुझ्या viral होण्याच्या wish बद्दल असला तरी त्याला फुलांचा मस्त घमघमाट आला आहे . फुलांची तुझी आवड माहीत आहेच, पण त्यांची मस्त मांडणी करून ते मस्त presentable करायची तुझी कला तुझ्या अंगभूत गुणांमुळे शक्य होत आहे . त्या aunti नी तुला अनुमती दिल्या बरोब्बर लगेच जाऊन तू फुलं घेऊन पण आलीस, ह्यात तुझी अधीरता आणी पुष्प प्रेम स्पष्ट दिसते आहे. इंदिरा गांधींचे साधर्म्य मात्र त्यांनी परफेक्ट जोखलं आहे. फुलांची मांडणी आणि त्यांचे photoes खरच मस्त आहेत. एकंदरीत लेख फुलांच्या टवटवीत वर्णनाने आणी वेधक photoes मुळे एकदम सुगंधित झाला आहे. Viral झाल्याबद्दल अभिनंदन 😄😄😄😄
ReplyDeleteखुप छान आहे.मनातील कितीतरी bucket list असतात.लेख खुप छान आहे.फोटोपण खुप खुपच छान आले आहेत.एक छान सुगंधात लेख वर्षा👌👌
ReplyDeleteखूप सारे सप्रेम धन्यवाद!! 😍😇
Deleteबकेट लिस्ट आमच्या ताईची�� तयार
ReplyDeleteहाभाऊ पण हहह त्या लिस्ट मध्ये
माझ्या बागेतील फुल चे pic पण बघावे लागतील .. आणि जलगाव आले तर भावा कडे यावे