मेथीची भाजी - २(पोपटी भाजी)
(घरातील गमती जमती)
आज मेथीची भाजी भाग दोन मध्ये मेथीच्या पाले भाजीच्या खास खान्देशी पाककृती. त्यापैकी सगळ्यात खास आणि सगळ्यांची लाडकी पोपटी/हिरवी भाजी किंवा दाणे लावून भाजी असा सुद्धा उल्लेख केला जातो या भाजीचा. आम्ही लहान असतांना जवळ जवळ प्रत्येक घरात दिवसातून एक वेळेला पोपटी भाजी होतच असे. त्यामुळे आम्हा मुलांना कधी कधी नको सुद्धा वाटे थोडं मोठं झाल्यावर. पण आणखी थोडं मोठं झाल्यावर शिक्षणासाठी वसतीगृहात जाऊन राहावे लागले. मग मात्र फार आठवण येत असे, आमच्या या लाडक्या पोपटी भाजीची! मग सुट्टीचे घरी गेले की आम्ही चक्क फर्माईश करत असू पोपटी भाजीची आणि खूप आवडीने आणि मनापासून खात असू. ताट अगदी चाटून पुसून साफ. हे करण्याची सुद्धा एक खास पद्धत होती आमची, पुढे ती पद्धत अगदी सविस्तर दिली आहे. नक्की करून बघा. आणि सांगा आवडली की नाही? किंवा किती आवडली आणि किती आवडली नाही. ही भाजी म्हणजे सगळ्यांची लाडकी तर होतीच, पण अतिशय स्वादिष्ट, चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा! चला तर मग आज मेथीची पोपटी भाजी करू या.
यासाठी थोडा वेळ आधी थोडी म्हणजे साधारण मूठभर तुरीची डाळ पाण्यात भिजत घालून ठेवावी. असे केल्याने ती थोडी मऊ होते आणि पटकन शिजते. मग या भाजीसाठी लागणारी चटणी (वाटण) तयार करून घ्यावी. या चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता असे साहित्य लागते. पैकी कढीपत्ता मी सरळ वाटूनच घेते, यामुळे तो वाया न जाता सरळ पोटात जातोच, पण भाजीला पण एक छान स्वाद आणि सुगंध येतो. तसेच यात पुदिना सुद्धा वाटून टाकला तर त्याची सुद्धा चव, अगदी अहाहा!मी बऱ्याच वेळा टाकते पुदिना सुद्धा ह्या भाजीच्या चटणी मध्ये . दुसरे म्हणजे ज्यांना हिरवी मिरचीचा त्रास होतो, त्यांनी सरळ लाल मिरच्या भाजून घातल्या तरी चालतात (फक्त ह्या लाल मिरच्या जरा तिखट हव्या, जेणे करून दोन-तीन मिरच्यांतच काम भागावे. मद्रास चपाटा किंवा रसगुल्ला या सारख्या भरपूर गर असणाऱ्या आणि भरपूर लाल रंग येणाऱ्या मिरच्या वापरू नये. अन्यथा भाजीचा पोपटी रंग येणार नाह ). अलीकडे मी असेच करते. पण भरपूर कोथिंबीर घातल्याने भाजीचा रंग छान पोपटीच येतो. फक्त त्यात मध्येमध्ये लाल रंगाचे सूक्ष्म ठिपके दिसतात. माझ्या दृष्टीने तो पोपटी रंग फार महत्वाचा. तो रंग बघूनच मन हरखून जाते.
तेव्हा आमच्याकडे मिक्सर नसल्याने ही चटणी पाट्या-वरवंट्यावर वाटली जात असे. त्यामुळे भाजीची चव सुद्धा एकदम स्वर्गीय होत असे हल्ली पेक्षा. कारण हल्ली ही चटणी मिक्सरवर वाटली जाते. तर हे वर दिलेले सगळे जिन्नस एकत्र वाटले, की झाली चटणी तयार. एका बाजूला भाजी छान धुवून बारीक चिरून ठेवावी. मग एका भांड्यात तेलात मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करावी . त्यात वरील चटणी घालून, त्यावर हळद आणि भिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालावी आणि छान तेल सुटे पर्यंत कलसवून घ्यावे. हल्ली चटणी मिक्सर मध्ये वाटल्याने, सगळ्या चटणीची घनता सारखीच असते. पण पाट्यावर वाटतांना मात्र असे होत नसे. चटणीचा एक घट्ट गोळा होत असे. तो आधी एका वाडग्यात काढून घेतला जात असे . मग पाट्याला चिटकलेली चटणी थोडे थोडे पाणी घालून काढली जात असे. मग हे पाणी सुद्धा त्या वाडग्यात काढून घेतले जात असे. फोडणी घातली की त्यात आधी हा घट्ट गोळा घातला जात असे. त्यात पाण्याचा अंश कमी असल्याने पटकन कलसवुन होत असे. आता मिक्सर मधील चटणी असते, त्यात बऱ्यापैकी पाणी असते. मग ही तेलात कलसवुन घ्यायला थोडा जास्त वेळ लागतो. असो.
ती चटणी फोडणीत घालतानाच त्यात डाळ घातल्याने, ती चटणी कलसवून घेत असतांनाच डाळ सुद्धा शिजायला सुरुवात होते. भाजी पूर्ण तयार होईपर्यंत डाळ सुद्धा नीट पूर्णपणे शिजते. अन्यथा एकतर डाळ कच्ची राहण्याची शक्यता, नाही तर भाजी जास्तच शिजून, त्यातील सगळे जीवनसत्व नष्ट होण्याची शक्यता. ह्या चटणीला छान तेल सुटले की त्यात चटणीचे पाणी (मिक्सर धुवून घेतल्यावरच) आणि डाळ भिजवून ठेवलेले पाणी घालावे. भाजी हवी तितकी पातळ होण्यासाठी गरजेप्रमाणे पाणी घालावे. त्यात चारलेली भाजी घालावी. उकळी आली की चवीप्रमाणे मीठ घालावे आणि भाजी शिजू द्यावी. भाजी आणि डाळ शिजल्याची खात्री करून आच बंद करावी. आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे.
आता ही पोपटी भाजी मेथीचीच करता येते असे नाही. कितीतरी वेगवेगळ्या भाज्या वापरून अशी पोपटी भाजी करता येते . सगळे सारखेच फक्त मेथीच्या भाजीच्या जागी हवी ती भाजी घालता येते. पण त्या त्या भाजी मुळे त्यात थोडासा बदल करावा लागतो. पालेभाजी पटकन शिजते, त्यामुळे ती चिरून सरळ भांड्यात घालता येते. पण काही भाज्या शिजायला वेळ लागतो. त्यामुळे त्या भाज्या आधीच वेगळ्या भांड्यात डाळीसोबत शिजवून घ्याव्या लागतात. एका बाजूला चटणी कलसवून होईपर्यंत ती भाजी आणि डाळ शिजून जाते. मग ही शिजलेली डाळ आणि भाजी घालून, मीठ घालून एक उकळी काढली की झाली भाजी तयार. यामुळे वेळही वाचतो. ही झाली माझी पद्धत. पण बऱ्याच घरात चटणी कलसवुन झाली की त्यातच चिरलेली भाजी आणि डाळ घालून शिजू दिले जाते, मंद आचेवर. भाजी आणि डाळ शिजल्याची खात्री करून आच बंद केली की झाली भाजी तयार.
या पद्धतीने बऱ्याच भाज्या करता येतात. त्या म्हणजे गवारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा किंवा त्यातील दाणे काढून त्या दाण्यांची, कच्चे टमाटे, कारले, गिलके (घोसाळं), दोडके (शिराळं), पोकळा (पाले भाजी ), पालक, ढेमसे (गोल भोपळा ), दुधी भोपळा. ह्यात फक्त शेवटच्या दोन भाज्या, ढेमसे आणि दुधी भोपळा करताना त्यात तूर डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ घातली जाते.
आता ही भाजी खायची कशी आणि कश्यासोबत? या सगळ्या भाज्या पोळी, भाकरी, भात या सगळ्या सोबतच छान लागतात. पोळी/भाकरीचा एक एक घास तोडून भाजीत कुस्करून-कुस्करून खाल्ला तरी छान लागतो. पण तसे कारण्याएवजी पोळी केव्हा भाकरी मोडून भाजी सोबत कुस्करून काला करावा, अक्षरशः स्वर्ग! त्या काल्यात लोणच्याचा खार घालून कालवायचा, मग तर शब्दा पलीकडेच...! ज्यांना खार काल्यात आवडत नाही, त्यांनी लोणचं तोंडी लावायला घ्यावे ल्याचा खुळा(याची साहित्य आणि कृती अशाच एखाद्या लेखात मिळेलच) आणि पापड घ्यावे. उडीद पापड, ज्वारी पापड, बिबडे, नागली अशा सगळ्याच प्रकारचे पापड या सोबत छान लागतात. जो उपलब्ध असेल तो घ्यावा.
काही वेळा जेवता जेवता पोळी/भाकरी संपून जात असे. मग यावर एक फारच छान आणि माझ्या एकदम आवडीचा तोडगा निघत असे. पोळी/भाकरी ऐवजी ज्वारीचा पापड. मग अशा वेळी आमचा पापडाचा डबा खाली उतरत असे. त्याला पाहून माझी भूक अजूनच वाढत असे. या पापडाचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर भाजी घालायची आणि कालवून घ्यायचे. पापड कुरकुरीत राहिलेलाच आवडत असेल तर अगदी थोडी भाजी घेऊन कालवयाचे आणि लगेचच खायचे. थोडा मऊ आवडत असेल तर भाजी जरा मोकळ्या हाताने घेऊन थोडे कालवून घ्यावे, पापड थोडा मऊ झालेला असतो. अगदीच पोळी/भाकरी सारखा मुरलेला हवा असेल तर पापडावर भरपूर भाजी घालून काही क्षण कालवावा आणि काही क्षण मुरू द्यावा, मग खावा. अगदी छान पोळी/भाकरी सारखा मऊ झालेला असतो. यात सुद्धा लोणच्याचा खार घालून छान लागतो. किंबहुना माझा तर आग्रहच आहे, प्रत्येकाने खार घालूनच खावा!
सरते शेवटी सगळा काला खाऊन झाला की एक मस्त कैरीच्या लोणच्याची फोड घ्यायची आणि या फोडीने ताट पुसत जायचे आणि ती फोड चाटायची. सगळे ताट छान स्वच्छ होईपर्यंत ही कृती करत राहावे . 'पाणी पुरी' खाऊन झाल्यावर, 'सुखी पुरी' खाल्ल्यावर जी काय चव आणि तृप्ती मिळते ना जिभेला, मनाला, आत्म्याला अगदी तशीच तृप्ती मिळते, असे लोणच्याच्या फोडीने पुसून चाटून खाल्ल्यावर...!
मेथीच्या पाल्याच्या बाकी पाककृतींसह भेटू परत पुढच्या अजून एका अशाच स्वादिष्ट, चविष्ट आणि पौष्टिक भागात...
© आनंदी पाऊस
(घरातील जमती गमती)
९ नोव्हेंबर २०२१
चटणी साठी लागणारे साहित्य
मेथीची भाजी
तय्यार पोपटी भाजी
तेव्हा या भाजीवर दीड ते दोन इंचाचा
तेलाचा तवंग असे
मेथीची पोपटी भाजी आणि भाकरी
मेथीची पोपटी भाजी आणि भात
चवळीच्या दाण्यांची पोपटी भाजी
दुधी भोपळ्याची पोपटी भाजी
आणि पोळी चा काला केलेला
😋😋😋
भाजी आणि पापड
🤤🤤🤤
भाजी आणि पापड
छान मऊ झालेला
😋🤤😋🤤😋🤤
Tempting
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद! 🤩
Deleteअप्रतिम शब्दांकन आणि सोबतचे फोटोचि मांडणि
ReplyDeleteस्नेहाळ आभार!! 🤩😍😍
Deleteवाचून अगदी खायची इच्छा झाली, आजच्या सकाळ च्या जेवणात हे च बनवते, सुंदर शब्दांत मांडली आहे मेथीची भाजी😋😋
ReplyDeleteवावा मस्तच!
Deleteसप्रेम धन्यवाद 🙏😇
सुंदर लेख. पाणी सुटले. आज मी पण वालाच्या शेंगांची पोपटी भाजी करते आहे.
ReplyDeleteखूपच छान अगदी बरोबर रेसिपी सांगितली आहे मांडणी छान केली .आणि मूख्य म्हणजे पोपटी भाजीत पापड मोडून खायचं हे तर फारच आवडलं कारण माझं आवडत खाणं आहे मी ब-याच वेळा या अशा भाजीबरोबर भाकरी पोळी न मोडता पापड बिबळेच मोडून खाते
ReplyDeleteभाजी च वर्णन मस्त मला आठवले एकदा आई भाऊंना डब्यात भाजी व भरीत दिले होते तुझ्या आई बाबा नी स्टेशन वर आणून
ReplyDeleteते नागपूरला येत होते
क्षणार्धात आपण कुठे लांब भूतकाळात जाऊन पोहोचतो ना?
Deleteहो मलाही अजून नीट स्पष्ट आठवतेय सगळे!
खूप सारे सप्रेम धन्यवाद!! 🙏😍
खुप छान आणि नवीन रेसिपी आहे.तोंडाला पाणी सुटले.मस्त👌👌😋😋
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!! 🙏🤩
Deleteखुपच भारी...आनंदी पाऊसातील पाकदर्पणातील "पोपटी भाजी" ची रेसिपी हि झणझणीत 😍चवीची,काही औरच आहे.
ReplyDeleteपहिल्यांदाच मेथीच्या भाजीतील पा.वं.तील handmade वाटणंच वर्णन वाचून अगदी तोंडाला पाणी सुटतय...👌👍👌👍..पूर्ण लेख हिरव्या वल्कलीसारखा दिसतोय..सारे प्र.चि.भारीच.😍
Popati bhaji navhi chan aahami tyala hirvi bhaji kiva dane lavun bhaji ase mhanto,disailahi chan, chavilahi chan , varnanhi chan
ReplyDeletelekhhi sundar👌👍😋
Khupach chan photos pan suder
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद!! 🙏😊🤩
Deleteलय भारी!याची किंमत कळते फक्त महाराष्ट्राच्या बाहेरी👌👌 Vilas
ReplyDeleteखरय अगदीच! 😀😀
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!
popti bhaji che sagra sangjt likhan rasbharit zanzanit
ReplyDeletevarshali tuze saglech padharth recipeeche Vartan etke bhari aaste ki wactana kalpnet too padarth khalecha anand Milto
ReplyDeleteAasech likhan karat raha
खूप छान. आम्ही अजूनही पापडावर भाजी घेऊन खातो. एक वेगळीच चव असते. आणि अजून एक या भाजीत चुरमुरे टाकून खा मस्त लागते. खूप वेगवेगळे प्रयोग करून baghte मी तर. आत्ता पन पाणी सुटलय तोंडाला.
ReplyDeleteपावसाळा संपला, पण आनंदी पावसाच्या मधून मधून पडत असलेल्या सरींनी मन चिंब होत असते. त्यातच आज मेथीच्या भाजीची मेजवानी मिळाली. आताशा काकूच्या हाताला चवच कशी ती राहिली नाही तुला म्हणून सांगतो, काकू ला सांगू नको ती सदा न कदा भांडणाचं निमित्तच उकरून काढते. अर्थात मीही तिला सढळ हातांनी मदत करतोच, तो भाग निराळा! मेथीची भाजी उत्तम जमली होती. अहाहा, काय तो स्वाद! समोर आयतं ताट आल्यावर खायची जी खुमारी असते ती गृहिणीला कधी अनुभवायला यायची नाही हेच खरं.पण खाताना
ReplyDelete" दंताजींचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, नन्ना करते मान... अवघे पाऊणशे वयमान...!!"
ही कविता आठवली. पाऊणशेपेक्षा तब्बल तीन वर्ष यंग आहे मी. पण तू चटणी मिक्सर मध्ये वाटल्यानं शेंगदाण्याचे कण कण दातांत अडकायचेच. लोणचे तर अप्रतिमच, पण आता दंताजींना आंबटपणा ची एलर्जी आहे, त्यामुळे सांभाळूनच चव घ्यावी लागली. म्हणून पुढे ज्यावेळेस बाजी पाठवशील त्यावेळेस पाट्यावर वाटलेली चटणी घाल. आणि हो, आम्ही शुगर तपासली नसल्याने शुगर आवडीने खातो, म्हणून लोणच्यात गूळ जरा जास्तीचा घाल. असो, एकंदरीत मेथीच्या भाजीवर जरा जास्तच ताव मारला गेला. आत्ताच तृप्तीचा ढेकर देऊन अन् वामकुक्षी घेऊन उठलो नी म्हटलं, अभिप्राय पाठवावा म्हणून लिहायला बसलो. कालच शोध लागला की, आपण बोलतो ते लिहिलेही जाते, म्हणून तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आनंदाच्या भरात काही कमी-जास्त लिहिले गेले असेल तर तो या a.p.p. चा दोष नसून त्या app चा दोष समजावा. कळावे. आपला नाना, अरुण.
Hi dear , sagale blogs aaj read kelet... ekdam mast watle... methichi bhaji apratim ����������
ReplyDeleteखूप सारे सप्रेम धन्यवाद!!! 😊
Deleteअपेक्षेप्रमाणे मेथीच्या भाजीचा चवदार लेख पाठोपाठ आलाच. मला पाकशास्त्र ह्या प्रकारात काहीही गती नाही. पण जरी मला काहीही येत नसलं तरी मी खानसेन आहे . खानदेशी डिश असल्यामूळे नक्कीच खानसेन म्हणायला हरकत नाही.😁😁 मेथीची भाजी खरं तर लहानपणी बिलकुल आवडायची नाही , पण नंतर मोठं झाल्यावर तिच्याबद्दल रुची निर्माण झाली. मेथीची भाजी दोन्ही प्रकारात छान होते, कोरडी आणि ओली पण. आई च्या मेथीच्या भाजीची चव आयुष्यभर जिभेवर रेंगळणारच. तू एवढया उत्साहाने complete recipy describe केलेली आहे ती माझ्या अज्ञानामुळे मला अगम्य आहे. पण पोपटी भाजीचे एकंदरीत वर्णन अतिशय रसदार झाले आहे , त्यामुळे आपोआप तोंडाला पाणी सुटले . विशेष म्हणजे सोबत जोडलेले फोटो इतके समर्पक आणि जिवंत आहेत, की अगदी रसभरित आस्वादाचा अनुभव येतो. असेच बहुविध विषय घेऊन आम्हाला ज्ञात करत जा . पुढील लिखाणाच्या वाटचालीसाठी शुभेछा . 👍👍👍
ReplyDelete