गॉड्स ब्युटीफूल गिफ्ट
(काही अनुभवलेलं ...)
गेल्या वर्षी काही अगदीच किरकोळ कारणाने माझ्या पायाची दोन बोटं फ्रॅक्चर झालेली. शेवटची दोन बोटं ....प्लास्टर ही न करता येण्यासारखी जागा. मग डॉक्टरांनी त्याला खालून थोडा कडक आधार देऊन बांधून दिलेली चार-सहा आठवड्यासाठी. पण मग फार वेळ नीट उभं राहता येत नव्हते. त्यामुळे जवळ जवळ सगळ्याच कामांचा खोळंबा. त्यात सगळ्यात मूलभूत आणि अतिशय गरजेचे काम म्हणजे स्वयंपाक. बाकीची सगळी काम वाट बघू शकतात. पण हे नाही. मग त्यावर काही चौकशीअंती तोडगा मिळाला. आमच्याच भागात एक बाई डबे देत होत्या. त्यांच्या कडून डबा आणायचे ठरले. पण आणून द्यायला कुणी नसल्याने परत ते काम माझ्यावरच आले. जवळ होते आणि कामापुरती दुचाकी चालवता येत होती, त्यामुळे जरा सोपे झाले. बरं त्या डबा देणाऱ्या बाई वयस्क. मला डबा द्यायला त्या दोन मजले उतरून खाली येत. परत त्या एकट्या ..... विधवा .... काही दिवसातच त्यांना माझ्या बडबड्या आणि हसऱ्या स्वभावाची कल्पना आली. मग त्या हक्कानेच मला थांबवून दररोज माझ्याशी दहा-पंधरा मिनट बोलत आणि नंतर थँक यू आणि सॉरी म्हणून परत वर जात आणि मी घरी येत असे.
एके दिवशी अशाच त्या बोलत होत्या. म्हणाल्या त्या बाकी लोकांनी मला फसवले म्हणून मी त्यांचे डबे बंद केले आणि म्हणाल्या मी माझ्या मुलीला सांगितले, मी आता फक्त एका टीचर साठी डबा बनवते. त्यात माझा वेळ जातो आणि पैसे पण मिळतात थोडे.
मला मात्र काही संदर्भ लागेना, कुणाबद्दल बोलत होत्या त्या. कारण डबा फक्त माझा एकटीचाच चालू होता. मी त्यांना विचारणार, तेव्हढ्यात माझ्याच लक्षात आले की, त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या. कारण आज पर्यन्त माझा उल्लेख मॅम, मॅडम अशा पद्द्धतीने नेहमीच होत आलेला. पण टीचर म्हणून पहिलांदाच उल्लेख झालेला. कारण गेले दोन वर्ष मी एका प्रीस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम करत होते, अर्धवेळ.
खरंतरं शिक्षक होणे किंवा शिक्षक म्हणून काम करणे ही माझी अगदी शेवटची सुद्धा प्रायॉरीटी नव्हती कधीच. बऱ्याच वेळा हा विषय समोर आला, पण मी ठाम होते, ते काम न करण्यावर. पण बहुतांशी अगदी जे नको असते किंवा करायचे नसते, तेच काम करावे लागते हा माझा अनुभव आहे.
माझी एक मैत्रीण आहे, आर्टिस्ट आहे, ते दोघेही. पूर्वी ते काही कार्यशाळा घेत, भारतातल्या निरनिराळ्या प्रकारच्या लोकचित्रकलेच्या. मी त्या सगळ्या कार्यशाळेत सहभागी झाले होते आणि खूप आनंद सुद्धा लुटला होता. नंतर त्यांनी प्रीस्कूल सुरु करण्याचा निर्णय घेतला. चार-पाच वर्षांपूर्वी चालूही केले. त्याच वेळी त्यांनी मला खूप आग्रह केलेला, मी थोडा वेळ तरी यावे म्हणून. पण अर्थातच मी नाही गेले तेव्हा. अधून मधून सहज म्हणून भेटून येत असे शाळेत जाऊन.
पण दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात तिचे सारखेच फोन येत होते. तुझी फार गरज आहे. रोज तीन तास तरी येत जा वगैरे वगैरे. नीट सगळ्या चौकशी अंती कळले की एक स्लो लर्नर मुलगी आहे चार वर्षांची तिची शॅडो टीचर म्हणून काम करायचे होते.
शेवटी जून च्या पहिल्या आठवड्यात माझी काही महत्वाची कामं मार्गी लावून एके दिवशी गेले शाळेत, त्या मुलीला भेटायला. मनात बरीच धाकधूक होती. कारण अशी ही पहिलीच वेळ होती आणि खरंच जरा घाबरलेच तिच्या पहिल्या नजरेला.......
सुरवातीला सगळे जरा अवघडच गेले. कारण मला या पूर्वीचा असे काम करण्याचा अनुभव शून्य. मला कानडी फारसे समजत नव्हते. तसेच तिचे शब्दोच्चार सुद्धा स्पष्ट नव्हते तेव्हा. तिची कानडी, शाळेची इंग्रज़ी, आणि मधूनच माझी मराठी. अशी सगळी गम्मत जम्मतच होती. पण थोड्याच दिवसांत आमची दोघींची छान गट्टी जमली. इतकी गट्टी जमली की..... शाळेत काही वर्कशॉप होत, पालक सभा होत, काही समारंभ होत, अशा बऱ्याच कार्यक्रमांना सगळे शिक्षक, मुलं, त्यांचे पालक आणि काही पाहुणे मंडळी असे सगळे लोक जमत. पण ही अशा वेळी सुद्धा तिच्या अम्मा-अप्पां सोबत न बसता कायम मला चिकटलेली. खायचे असेल तरी मला भरवायला सांगे. मग तिची अम्मा तिला भरवत असे, पण मी तिच्या बसायला हवे. मुलं पालक मिळून काही खेळ असले तरी तिला ते ही माझ्यासोबतच खेळायचे असे. मग तिला समजावून सांगून, बाकी मुलं आणि सोबत त्यांचे पालक दाखवून, तिला तिच्या अम्मा सोबत खेळायाला तयार करावं लागे.
तर अशा या गोड आणि प्रेमळ मुलीने मला टीचर व्हायची संधी दिली! काम खूप वेगळे आणि खूप आव्हानात्मक. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघावे आणि विचार करावा लागे. प्रत्येक गोष्ट शिकवतांना खूप वेगवेगळे पर्याय शोधावे लागत होते. हे सगळे मलाच नवनवीन शिकण्यासारखे होते. आणि खूप काही नवीन शिकले मी या सगळ्या प्रक्रियेत!!
सगळ्यात आव्हानात्मक, अवघड ठरले ते म्हणजे तिला रंगांची नावं शिकविणे आणि ते ओळखणे नावासहित. जवळ जवळ दीड वर्ष मी तिला वेगवेगळ्या माध्यमांतून, वेगवेगळ्या प्रकारे शिकवत राहिले. बरोब्बर दीड वर्षांनी माझ्या प्रयत्नांना यश आले आणि ती सगळे रंग ओळखू लागली आणि नाव ही अगदी अचूक सांगू लागली!! त्या आनंदाचे वर्णन शब्दात करणे केवळ अश्यक्य!! एक सुरेख रंगीत आनंद!!!
असेच एक नी अनेक अनुभव दिले तिने मला. मी तिला काय शिकविले, यापेक्षा तीच मला खूप काही शिकवून गेली. महत्वाचे म्हणजे माझी कानडी बरीच सुधारली, कानडीचे शब्दभांडार वाढले. ती एकदम पक्की, आधी कानडीतच बोलणार, इंग्रजी शब्द माहित असले तरी. मग मी म्हटल्यावर, परत मला इंग्रजीत सांगे. त्यामुळे मला आयतेच भाषांतर करून मिळे! आणि मला नवीन नवीन शब्द समजत.
भाषेवर तिचे कायमच चांगलेच प्रभुत्व. कानडी तिची मातृभाषा त्यामुळे त्याबद्दल बोलायलाच नको. पण इंग्रजी मुळाक्षरांचे सुद्धा हळूहळू करत सगळे सव्वीस फोनिक साऊंड शिकविले आणि अक्षर ओळख करून दिली मी तिला. तर ती, तीन अक्षरी शब्द सहजच वाचून काढू लागली!!
तिचे पाठांतर तर बोलायलाच नको. एकदा का एखाद गाणं, कविता, अभंग, श्लोक ऐकला हीने, की तिचा तो तोंडपाठ झालाच म्हणून समजा. कुणी काही गाणं, अभंग, वगैरे म्हणू दे, की ही लगेच मांडी घालून बसणार आणि उजव्या हाताने उजव्या मांडीवर ताल देणार सहजपणे. मी तिला काही ऍक्टिव्हिटी करून घेतांना मराठी गणपतीची आरती ऐकवत असे तर तिची ती सुद्धा पाठ....
तिचा विषय चालूय आणि 'हाऊ ' बद्दल न बोलणे शक्यच नाही. 'हाऊ ' कानडी शब्द. त्याचा अर्थ साप. तिचा अतिशय लाडका. तिच्या बोलण्याची सुरवात सुद्धा 'हाऊ' ने होणार आणि शेवट सुद्धा 'हाऊ' नेच होणार. 'हाऊ ' ची गाणी कविता पण तिला फारच प्रिय. एकदम खूष होणार! गोष्ट सांगितली हिने, तरी ती 'हाऊ' चीच सांगणार..... तिच्या मुळे 'हाऊ ' चे माझ्या मनात वेगळेच स्थान निर्माण झाले!
तिच्या सहवासाने सगळ्यात कठीण आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे संयम आणि रागावर नियंत्रण, याबाबत मी स्वतः वर खूप काम करू शकले. मी प्रीस्कूलला जॉईन झाल्याचे जेव्हा माझ्या मैत्रिणींना कळले, तेव्हा त्या म्हणाल्या बापरे फारच संयम आहे वाटत तुझ्यात. आमची तर स्वतःची एक-एक मुलंच सांभाळून दमछाक झालीये वगैरे वगैरे. तरी तेव्हा त्यांना माहित नव्हतेच, मी नक्की काय काम करणार आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्या सहवासात असतांना काही वेळेला तिची आई सुद्धा व्हावे लागले आणि तिच्या आईच्या जागी स्वतः ला ठेवून बघता आले आणि त्याप्रमाणे विचार करण्याची संधी मिळाली. या सगळ्या प्रक्रियेत/कार्यपद्धती मध्ये समोरच्या माणसाबद्दल गैरसमज न करता त्या माणसाला जास्त चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याची समज आणि सवय मनाला लागली! किती मोठ्ठ देणं आहे हे देवाकडून, एक माणूस म्हणून मिळालेलं! याबद्दल खरंच देवाचे शतशः आभार!
अगदी नकळत, अनपेक्षित आणि आश्चर्यकारक रित्या मिळालेलं!!!
माझ्या "भेटवस्तू आणि आनंद" या लेखात मी माणसाकडून माणसाला मिळालेल्या भेटी बद्दल लिहिलेले आहे. पण हिच्या रूपाने देवाने किती सुंदर भेट दिली आहे मला......... खरंच शब्दच नाहीत माझ्या जवळ, तिच्या बद्दल बोलायला ........
गॉड्स ब्युटीफुल गिफ्ट !!!
फक्त हेच शब्द आहेत माझ्या पाशी.......आणि योगायोगाने तिच्या नावाचा अर्थ सुद्धा हाच होतो....... "देवाकडून सुंदर भेट" !!!
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
१० एप्रिल २०१९
आम्ही सोबत घालवलेले काही
अविस्मरणीय आणि आनंदी
क्षण !
मध्येच काही काळ योगायोगाने आमचे
बूट सुद्धा सारखेच होते 🤩😍
खूप मस्त काम केले. शिक्षक म्हणुन आपल्या विद्यार्थ्यांना थोड जरी समजल tr एक प्रकारच मानसिक समाधान मिळते. तुम्ही tr तिच्या साठी ईतके काही केल. खरच वाचून हुरूप आला.
ReplyDeleteकिती छान पावती दिलीस गं माझ्या लिखाणाला ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !😇😇
DeleteKiti chan lihata tumhi
ReplyDeleteLykracha ata ek chan book write kara avadel vachayala.
Tumachi lekhani atishay sundar ani ramaniy aahe janu kahi sagal samorach ghadatay
खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!🤗🤗
Deleteखरं तर हीच आयुष्य जगण्याची कला भल्या भल्यांना अवगत होती नाही पण तू आत्मसात करून घेतली हीच खुप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने तीची देखील प्रगती करवली हे खुप अभिमानास्पद आहे.
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!😇😇
Deletevery nice article.. I just read it & it provoked many memories of mine when I was working in school , some students do teach us many things which we didn’t know lacking ❤️
ReplyDeletenice to c u here ! thnk u so much !😍
DeleteManasakadun manasala bhetaleli bhet wa farch chan varnan 👌
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद!!☺🙂
DeleteAse teacher jar sarvanna bhetle tar...narmadetle gote (je ki master aamhala mhanayche)aamhi rahilo nasto..Vilas Kinge
ReplyDelete😊😀अरे मी काही फार ग्रेट वगैरे नाही रे, असो त्या मागील तुझे प्रेम मात्र आनंदाने स्विकारते!
Deleteसप्रेम धन्यवाद!! 😍🤩
एखादयच्या आयुष्यात प्रकाश देणे ही कल्पना नाही तर ती वास्तवात आणणे हे खूपमोठ कार्य आहे ताई ����������
ReplyDeleteअरे बापरे! ईतके मोठ्ठे काही ही केलेले नाही मी. पुढ्यात आलेली जबाबदारी पूर्ण केली मनापासून.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!!!
Wa khup chan aathavani v tuzi shikavnyachi mehanat pan
ReplyDeleteAsha mulana shikavnyala kharech patience lagato
सप्रेम धन्यवाद !😍
DeleteKhupch chhan
ReplyDeleteAti sundar likha hai
Aapko book likhkar published krna chahiye
खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!🥰🤩🤗
Deleteखुपच छान अनुभव आणि मांडलाय देखील खुप सुंदर. खरं आहे या वयोगटाला शिकवणं मुळातच कठीण, फोटो वरून कळतय काय मेहनत घेतली असेल ते. घटना घडतात त्या सहेतूकच असं माझं मानणं आहे आणि अशी सकारात्मक घटना जी ऊर्जा देवून जाते तिला तोड नाही
ReplyDeleteअगदीच सहमत आहे तुमच्याशी! त्याचे सगळे प्लॅनिंग एकदम परफेक्ट असते. बर्याच वेळा आपल्याला समजायला वेळ लागतो. असो
Deleteमनःपूर्वक धन्यवाद! 🙏🤩
खुपच स्तुत्यप्रिय"गोड गिफ्ट"लेख.खरोखरच गुरू शिष्य एकमेकांस पूरक असतात.आपणही त्या विद्यार्थिनीस 'Godरूपी'शिक्षक भेटले आणी तीच्यासाठी'एक creative परी जणु प्रकट झाली आणी आपल्या creative learning द्वारे तीला शिकविले...खुप कौतुक.
ReplyDeleteदरवेळी मला मोठ्ठा प्रश्न पडतो, तुझ्या Creative अणि उत्साहाने भरलेल्या अभिप्रायला काय अणि कसे उत्तर द्यावे! मन अगदी तृप्त होते तुझे अभिप्राय वाचून!
Deleteखूप सारे creative अणि उत्साही धन्यवाद!! 🤩😍
सवडीने वाचायला मला तेवढा धीर तर निघाला पाहिजे .लगेच लिंक ओपन केली .आवाचायला सूरवात केली .केवढी उत्सूकता !पुढे काय पुढे काय! पूर्ण वाचल्यावर खूप छान वाटलं काही काही वेळेस आपल्याला नावडणा-या गोष्टीतून पण आपल्याला बरच काही मिळून जातं .खरच ."गाॕड्स ब्युटीफूल गिफ्ट" यथायोग्य नाव .मिळालं आणि परमेश्वरी इच्छेने,कृपेने आनंदी पाऊसाची बरसात झाली .खूप आवडला मला स्वानूभव .मला असा छान आनूभव वाचायला मिळाला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा .निशब्द . मनःपूर्वक आभिनंदन .
ReplyDeleteखूप खूप आनंद वाटला तुमचा अभिप्राय वाचून. तुमच्या सारख्याची कौतुकाची थाप मिळाली की अजूनच उत्साह, ऊर्जा अणि प्रेरणा मिळते पुढच्या कामासाठी.
Deleteखूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद!!!
मनाची सुंदरता आणि अनुभव शब्दांनी व्यक्त करणे म्हणजे आपण आनंद घेऊन दुसऱ्याला आनंद देणे होय . पावसाचा खूप आनंद वाटला ....धन्यवाद मॕडमजी.
ReplyDeleteअतिशय सुंदर अनुभव🌹🙏🌹
ReplyDeleteखुपच छान तुम्ही त्या मुलीला मॅम सोबत आई च प्रेम दिल म्हणून दोघांच मन रमल
ReplyDeleteशब्दांचे मांडणी तर नेहमीच छान असते वा मस्त👌👌👍
ReplyDeleteसुदर लिखाण आणि ओघवती भाषा यामुळे वाचायला कंटाळा येत नाही .अनुभव तर खुप सुदर . आणि आपल्याला आयुष्यभर काहीकाही शिकायला मिळतच असते प्रत्येक कामातून .मस्त.
ReplyDelete*आपण खरोखरीच आपल्या लेखनातुन विद्यार्थी, शिक्षण, शिकवणे व शिक्षक याचा अनुभव छान मांडला आहे.*
ReplyDeleteएक चांगला शिक्षक त्यांचे विचार विद्यार्थीनां चांगल्या प्रकारे समजुन सांगतो. ते खरोखरीच आव्हानात्मक असते. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघावे आणि विचार करावा लागतो. प्रत्येक गोष्ट शिकवतांना खूप वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात. हे त्याच्या आयुष्यात विद्यार्थी प्रमाणेच तो देखील आत्मसात करत असातो त्याच्यासाठी देखील सगळे नवनवीन शिकण्यासारखे असते. तो देखील खूप काही नवीन शिकतो.
"काही अनुभवलेल्या"तून "गॉड'ज ब्युटीफूल गिफ्ट" हे शीर्षक सदर प्रसंगाला किती समर्पक आहे हे लगेच लक्षात आले. तुला झालेल्या फ्रॅक्चरच्या निमित्ताने डबे देणाऱ्या बाईचा परिचय काय झाला, नंतर तुझ्या मैत्रिणीनं तुला शाळेत शिकवायला आग्रह काय केला आणि त्यातूनच महत्त्वाचे म्हणजे त्या मतिमंद मुलीची "आई" होऊन तिला आपल्या अपत्याप्रमाणे प्रेम देऊन तिच्यात घडवून आणलेले परिवर्तन, या बाबींसारखे सारखे पवित्र कार्य कोणते असू शकेल?
ReplyDeleteशारीरिक व्यंगापेक्षाही मतिमंद मुलांच्या पालकांचे दुःख काय असते हे फक्त त्यांच्या आई-वडिलांनाच माहीत असते. अशा मुलांना बोलते करणे, त्यांच्या बुद्धीला काही प्रमाणात का होईना जागृत करणे, हे पवित्र कार्य करण्याचे भाग्य तुला लाभले हीच मुळात तुला मिळालेली गॉड'ज गिफ्ट आहे. त्यांहूनही त्या मुलांत पडलेला सकारात्मक फरक पाहून त्यांच्या आई वडिलांना किती किती आनंद होत असेल याची कल्पनाही करवत नाही. असो, एका आगळावेगळ्या अनुभवाचे शब्दचित्र तू अगदी छान रेखाटले आहे. गुड लक!
खरोखर काही प्रसंग, दिवस देवाने दिलेली अमुल्य, सुंदर भेटच असतात. लेखाला सार्थ नाव दिले आहे. तुमचे लेख नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत
ReplyDeleteखूपच सुंदर अनुभव कथन केलं आहे आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन, वाचताना डोळ्यासमोर सर्व प्रसंग घडत आहेत असा भास झाला
ReplyDeleteईतक्या सुंदर पध्दतीने आपण तिला तिच्या कलाने शिक्षण दिले व प्रसंगी तिची आई बनुन तिच्या प्रत्येक उपक्रमात योग्य ती साथ देऊन तिला प्रशिक्षण दिले खरच खुप मोठे योगदान आहे हे व एक जागरूक शिक्षक च हे करू शकतो. आपल्या दोघींनी एक सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लावला आहे.
Delete