आनंदी सोहळा-२
( उत्तरार्ध )
💧💦
"आनंदी पाऊस" वर्षावातील सारे लेख वाचत असताना 'आपल्या आठवणीची बरसात माला ही visualise होतेय.😍🤩🤓
ह्या आनंदी वर्षावाचे थेंब हे 'गारेगार icecream व तिखट गोड दिवाळीच्या फराळाप्रमाणे असो वा दिव्याच्या सणाच्या आठवणी................
सारे आल्हदायकच!!!!😘🤩
'चौधरीसदनातील' बाल्कनीतील गंमतीजमती व बागेतील मऊ आठवणी,चरखा पेटी व स्वातंत्र्यसैनिकांसाठी केलेला नित्यउपवास........हे Greatच.👏🏻
दराब्याचे पहिल्यांदाच पाहिलेली पाककृती व डोसा,इडली चटणी🍽️ खाण्याच्या पाककृती....आहा हा !आहा हा😍😋
✈️🚊"गोष्टी आपल्या पर्यटनाच्या मधील आठवणीचे थेंब आपसुकच त्या ठिकाणी घेऊन जातात.
"भेटवस्तूंची ध्वनीफित ऐकताना,प्रासंगिक भेटवस्तुंचे महत्व व त्यामागच्या आठवणी अप्रुप वर्णिलेआहे.. खरोखरच भेटवस्तूरूपी आठवणी ह्या जास्त मौल्यवान असतात हे खरे मर्म."
असाच सर्वांच्या मनात बरसणारा 'आनंदी पाऊस वर्षाव ',☔🌧️ कोणत्याही'instrument'मध्ये अमापनीय आहे.
|| पुढील लेखन-वाट चालीस माझ्याकडून शुभेच्छा ||
💐
संजीता
माझी एक छान मैत्रीण
हीची प्रत्येक रेष अणि शब्द अतिशय कल्पक!
दोन्हीही अगदी आपल्या आत खोलवर जाऊन भिडतात अगदी क्षणार्धात!
(प्रत्यक्ष सहवास फक्त एक आठवडा)
💧💦
ह्या माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला , 'आनंदी पाऊस ' ह्या माझ्या ब्लॉग बद्दल काय वाटते ते लिहा .
मी जसजशी विचार करू लागले , तशी सर्व लेखांनी मनात एकच गर्दी केली . कोणत्या लेखाबद्दल आधी लिहू ? असा विचार करते न करतेय , तोच सर्वांनी 'माझ्याबद्दल माझ्याबद्दल ' म्हणत मनाभोवती फेर धरला .
मी आनंदी पाऊस वाचू लागले तेव्हा 'गच्चीवरच्या गोष्टी' चालू होत्या . कोजागिरी पौर्णिमेच्या गरम गरम दुधापासून थंडगार आईस क्रिम ची चव चाखून मन अगदी तृप्त झाले . नंतरच्या लेखात असे कितीतरी पदार्थ चाखायला मिळाले . चौधरी सदनाच्या वेगवेगळ्या जागांबाबतचे (गच्ची , गॅलरी ) तपशीलवार वर्णन वाचून आपणही त्या घराचे एक सभासद आहोत . असे वाटू लागले . आता कालबाह्य झालेले रसना सरबत , घरी केलेले पापड , पापड्या , लोणची असे पदार्थ पुनर्प्रत्ययाचा आनंद देऊन गेले .
लेखिका फक्त घरातच न रमता , आपल्याला शाळेतही घेऊन जाते . त्याकाळचे साहित्य कॅमल रंग , इंक , पाटी , पेन्सिल , कर्कटक ह्यांचे फोटो सहित वर्णन वाचून खरोखरच शाळा आठवते . तर शालेय जीवनातील शेवटचा निरोप समारंभ वाचून शाळा संपल्यावर वाटणारी हुरहूर आठवून आताही मन भरून येते .
बागेतल्या विहारातून तर आताच राक्षसाच्या तोंडातल्या घसरगुंडी वरून घसरल्यासारखे वाटते . अशाच एका घसरगुंडीवरून मी पडल्याचे आठवते . तेव्हा पासून मीही घसरगुंडीला घाबरत असे . त्या वेळी आऊटींग ला जायचे फॅड नसल्यामुळे वडिलधाऱ्यांबरोबर जवळपासच्या बागेतच (महात्मा गांधी उद्यान) पिकनिक असायची व घरी केलेला फराळ तिथे सतरंजीवर बसून खाल्ला जायचा .
जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची कल्पना तर एकदम भारी होती . त्यामुळे जळगावच्या आसपासची आणि कर्नाटकातील खूप छोटी छोटी ठिकाणे माहिती झाली . श्री विश्वेवरय्या यांच्या संग्रहालयाचे आणि स्थळाचे वर्णन वाचून आपणही त्यांना आदरांजली वाहायला तिथे जावेसे वाटले . तीच गोष्ट उतावळी नदीकाठी असलेल्या तीन घुमटाच्या मस्जिदीसमोरील झुलत्या मनोऱ्यांची !
लेखिकेने पूर्वजांबद्दल आणि माझा वारसा बद्दल लिहून प्रति असलेला आदर , अभिमान वेळोवेळी प्रगट आहे . पणजोबा , आजोबा , त्यांचे साने गुरुजींबरोबर असलेले नाते . तसेच शास्त्रींच्या सांगण्यावरून जवानांसाठी सोमवारचा एक वेळेचा उपास करणे हे पाहून आपणही नतमस्तक होतो .
लेखिकेचा ध्वनिफीत बनविण्याचा उपक्रमही स्तुत्य वाटतो . त्यामुळे लेखिकेशी प्रत्यक्ष संवाद साधल्याचे आनंद मिळतो .
सर्व लेख एका ओघवत्या शैलीत उतरले आहेत . आपली एक मैत्रिणीचं आपल्याशी बोलतेय असे वाटते . त्यात कुठलेही उपमा , अलंकार किंवा कोणतीही साहित्यिक अभिनिवेश नाहीत . त्यामुळे ते अधिक जवळचे वाटते .
खरंतरं सर्व लेखांबद्दल सविस्तर लिहायचे तर हाच एक मोठा लेख होईल . (तसा तो झालाच आहे .) म्हणून आवरते घेते आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते . तू लिहीत राहा . ह्या आनंदी पावसात भिजायला आम्हाला नेहमीच आवडेल .
💐
प्रतिभा
माझ्या एक मैत्रीण
अतिशय उत्साही अणि प्रेरक,
आयुष्यातील सगळ्याच बाबतीत भक्कम आधार!!!
(प्रत्यक्ष सहवास फक्त दहा दिवस )
💧💦
घरातील माणसांपासून ते अगदी घरातले वेगवेगळे खाद्यपदार्थ, गोड आठवणी, खेळ, जागा, गमती जमती, वस्तू, अनुभव आणि खूप वेगवेगळ्या जागा, त्या जागांची माहिती यांचा एकत्रित खजिना म्हणजे आनंदी पाऊस. प्रत्येक वेळी नवनवीन विषय ,माहिती असणारे लेख वाचताना खूप छान वाटत. आपल्या आजुबाजुला असणाऱ्या बर्याच गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते. काळानुसार खूप गोष्टी बदलत जातात आणि त्या जुन्या गोष्टी नव्याने वाचल्या की वेगळाच आनंद मिळतो. हे लेख सातत्याने दोन वर्ष आम्हा सर्वांना वाचायला मिळत आहेत आणि असेच सुंदर सुंदर लेख पुढे वाचायला मिळतीलच हे तर माहितीच आहे. खूप प्रेम !
💐
लुप्ता
माझी एक लाडकी लेक !
💧💦
जितकी शिते ..तितकी भुते
जितकी डोके ..तितकी मते
कोणी मवाळ.. कोणी जहाल
पण तू सुरू ठेव तुझी वाटचाल
लेखनात आहेत तुझ्या मनीच्या भावना
त्याचा वेलू गगनावरी जावो हीच कामना
आठवणींचा हा खजिना आहे अनमोल
किती कौतुक करू सुचेनासे झाले बोल
आनंदी वर्षावास खूप खूप शुभेच्छा 

💐
बीना
माझी सगळ्यात धाकटी काकू आणि मैत्रीण !
(वयाने माझ्यापेक्षा थोडीशी लहान )
💧💦
आनंदी पाऊस - आनंदाचा आणि आठवणींचा पाऊस
शब्दात सांगता येणार नाही असे आठवणींचे प्रत्येक लेखातील वर्णन बालपणात घेऊन जाते आणि मग आपण पण लहान होऊन जातो परत एकदा त्या आठवणी अनुभवायला.
काय लिहू आणि किती????
तुमचा प्रत्येक लेख अप्रतिम



अगदी बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख केलेला. आठवणीतला खजिना, उन्हाळ्यातील वळवण, गच्ची वरील गमती जमती आणि खूप काही
एक एक प्रसंगाचे वर्णन अगदी तपशिलवार आहे तुमच्या प्रत्येक लेखात. कधी कधी तर त्या आठवणी मुळे भावूक व्हायला होत. अस वाटत उगाच मोठे झालो. ते म्हणतात ना " लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" तसच काहीतरी.आता तर आपल्या मुलांना असल काही अनुभवायला पण मिळत नाही.
💐
दीपाली
माझी एक मैत्रीण
(अजून प्रत्यक्षात भेटलोच नाही आम्ही )
💧💦
आनंदी पाऊस या तुझ्या लेख मालेतील प्रत्येक लेख , त्यातील सूक्ष्म निरीक्षणाचे निर्देशक बारीक सारीक तपशील युक्त टिपण , सुबोध ओघवती भाषा इत्यादी वाचून मन प्रसन्न होते .
तुझा प्रत्येक लेख वाचत असताना , त्या त्या स्थळ काळ सुसंगत सर्व घटना जणू काही मूर्तीमंत समोर उभ्या राहतात . हीच तुझ्या लेखनातील किमया आहे .
तुझ्या लेख संग्रहातील कोजागिरी पौर्णिमा , त्यातील आटीव-घोटीव दूध , बागेतील गमती जमती , आराम खुर्ची , विणलेली खाट , खजिना , आईसक्रीम पार्टी अशा अनेक , खरे म्हणजे सर्वच लेख मनाला भावतात . एकादशीच्या फराळाने तर पोटच तुडुंब भरले
तुझ्या लेखमालेतील प्रत्येक लेखाच्या माध्यमातून विषयाचे वस्तुस्थिती निदर्शक वास्तववादी व मूर्तिमंत जिवंत सादरीकरण व्हावे यासाठी लागणारी आनुवंशिक सामुग्रीची (माहिती , वस्तू , फोटो ) जमवाजमव करण्यासाठी , तू केलेली अविरत धडपड तर केवळ लाजवाबच म्हणावी लागेल .
अशीच नियमित आणि सतत लिहीत राहा . उत्तरोत्तर अधिकाधिक सरस कामगिरीसाठी आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद !
💐
अरुण - नीलिमा - माझे एक मामा-मामी
(मामी अगदी लिंक मिळताच लेख वाचते आणि ताबडतोब अभिप्राय देते )
💧💦
गेले दोन वर्ष ‘आनंदी पाऊस’ वाचतो आहे. लेखिका आमची एकेकाळची शेजारीण. नोकरी/व्यवसायाने एक आर्कीटेक्ट म्हणून माहिती होती. तिची आणि माझी वाचनाची आवड एक असल्यामुळे जरा आदानप्रदान होत होते. यामुळे तिची उपजतच असलेली कलात्मक दृष्टी पण ठाऊक होती. गेले कित्येक वर्ष त्यांचे कुटूंब दुसऱ्या गावात स्थायिक झाल्यामुळे प्रत्यक्ष संपर्क कमी झाला होता. एक दिवस तिचा संदेश आला, ‘असे असे लिहिण्याचा विचार आहे, वाचायला आवडेल काय?’ उत्तर अर्थातच होकारार्थी होते व सुरू झाला एका पाठोपाठ एक सरस लेखांचा ओघ.
तिची स्मरणशक्ती व इंग्रजीमधे म्हणतात तसे an eye for the detail तिच्या प्रत्येक लेखातून प्रत्ययास येत होते. सुरूवातीला कुतुहलापोटी वाचत गेलो व एक गोष्ट लक्षांत आली की तिला लिहिण्याचे कसब आहे. मी जरी तज्ञ नसलो तरी मराठी साहित्यात रूची असल्या कारणाने व थोडेफार वाचले असल्यामुळे चांगले लिखाण समजू शकतो. तिच्या लिखाणांत, सर्व गोष्टी बारकाईने लक्षांत ठेवण्याची तिची सवय मला प्रकर्षांने जाणवली. उदा. लहानपणी खेळतांना दोन खाटा बाजूबाजूला ठेवून व त्यांवर चादर टाकून त्याचे घर बनवणे, किंवा पापड, लोणचे बनवतांनाची पूर्वतयारी या बाबत तिने खूप छान वर्णन केले आहे. गोष्टीचा ओघ कायम ठेवत वाचकांना त्यात गुंतवून ठेवणे तिला नीट जमू लागले आहे.
बहुतेकांनी (किमान मी तरी) तिने वर्णन केलेल्या गोष्टी थोड्याफार फरकाने अनुभवलेल्या आहेत, परंतु त्या इतक्या बारकाईने व मनोरंजकपणे कागदावर उतरवण्यासाठी लागणारा धीर कमी लोकांजवळ असतो. तिने नेटाने हे काम केल्यामुळे तिचे विशेष अभिनंदन. तिच्या पुढील वाटचालीसाठी व लेखनकार्यासाठी अनेक शुभेच्छा.
💐
रमेश - माझा एक शेजारी मित्र
💧💦
आनंदी पाऊस.... खास करून अनुभवले ते बालपण.. बऱ्याच इतिहासकालीन वस्तू, त्या काळातील खेळ, एकत्रित कुटुंबातील संस्कृती, घरबसल्या पर्यटन अनुभवले.Arch.Engg. असून सुध्दा तेही मराठी मध्ये लिखाण... आणि विशेष म्हणजे अगदी लहान लहान गोष्टींचे अचूक निरीक्षण... Hats off to tai for a strong memory and all the best for your new projects.
💐
विलास - एक धाकटा भाऊ
💧💦
मला खरोखर तुमचे सगळे लेख आवडले आहेत त्यामुळे परत काय मत मांडावे हे आताच कळत नाही परंतु प्रत्येक लेखातील अतिशय ओघवती लेखणी आणि काही गोष्टी तर आपल्या समोरच घडत आहेत असे वाटते
ताई खरंच आनंदी पाऊस प्रकाशित करा खूप आनंद होईल आणि परत पहिल्यापासून वाचण्याचा सगळा आनंद परत मिळेल लवकरात लवकर प्रसिद्ध करा आम्ही खरोखर आतुर आहोत मध्यंतरी माझ्या डोळ्यांचे प्रॉब्लेम झाल्यामुळे म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस बिलकुल वाचता येत नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी जास्त बारीक वाचण्यास तीन चार महिन्यापासून मनाई केली होती त्यामुळे लेख थोडे लेट वाचले गेले त्याबद्दल क्षमस्व पण सगळे लेख मी वाचत आहे आणि खूप मजा देखील येत आहे आज जवळजवळ 35 वर्षापासून चौधरी परिवार बरोबर खूपच जवळचे संबंध किंवा घरोब्याचे संबंध त्यात अजून एक ते माझे घरच आहे असं नातं निर्माण झाला आहे त्यामुळे वाचण्यास खूप आनंद मिळतो आणि जुन्या गोष्टी आम्हाला देखील आठवतात त्यामुळे तो आनंद द्विगुणीत होतो तरी मी आपले लेख वाचण्यास खूप आतुर आहे धन्यवाद !
💐
अजय - एक थोरला भाऊ !
(अगदी प्रत्येक प्रसंगात याचा भक्कम आधार असतो .
या ब्लॉग साठी सुद्धा याचाच भक्कम आधार आहे .)
💧💦
I have gone through your blog and find it very interesting. It is a nice compilation of memories and old habits we often ignore in our daily lives. I would suggest using Instagram and You tube more in addition to your blog. Also a suggestion would be to try and translate the website in Hindi or English for further viewership not just for popularity but to educate people how they themselves can document their lives.
💐
हनोज सर
एथोनॉलॉजी स्कॉलर
💧💦
सर्वप्रथम मॅम थँक्यू सो मच इतके सुंदर ब्लॉग तुम्ही मला वाचायला पाठवता. शक्यतो मी मोबाइल वर वाचण् टाळायचे ब्लॉग वगैरे तर नाहीच पण तुम्ही इतके अभ्यासपूर्ण व मनोरंजक ब्लॉग लिहता की मी वाट पाहते कि कधी तुम्ही मला ब्लॉग वाचायला पाठवता, तुमचे ब्लॉग खूप माहितीपूर्ण असतात त्यात ज्ञान आणी कौशल्य यांचा परिपूर्ण मेळ घालून लिहलेले असतात ब्लॉग बद्दल मला आवडणारी वैयक्तिक बाब म्हणजे तुम्ही साध्या साध्या गोष्टी वर खूप सखोल लिहिता, तुमचे लेखनकौशल्य अप्रतिम आहे. ज्या जुन्या आणी पारंपरिक गोष्टी नवीन पिढी ला माहिती नाहीत त्या तुमचे ब्लॉग वाचून सहज समजू शकतात, सो वन्स अगेन् थँक्यू 🙏असेच वैशिष्टय़ पूर्ण ब्लॉग पुढे ही लिहीत रहा.💐
स्नेहल
माझी सध्याची एक छोटीशी वर्गमैत्रीण
💧💦
आनंदी पावसाच्या चार थेंबांनी अंगावर शहारे आणले . पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले , आनंदी पावसाने आठवल्या साऱ्या जुन्या आठवणी . मन पुन्हा आले मस्त भरुनी ...... आज आहे पाऊस नव्या आठवणींचा पुन्हा तरी डोळ्यात साठून बसता पाऊस मात्र जुनाच
आनंदी पाऊस आहे इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे त्यात वेगवेगळे रंग जसे की गच्चीवरील गमती जमती , गॅलरीतील गमती जमती , निरनिराळे सण , चौधरी सदनातील गोष्टी , बागेतील गोष्टी , काही अनुभव , प्रत्येक रंगात वेगळाच आनंद , मजा , माहीती .
सर्व लिखाण वास्तव दैनंदिन जीवनातील लहाना पासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना टिकवून म्हणजेच involve करणारे . या लेखांपासून खूप नवनवीन गोष्टी माहीती पडल्या , पुष्कळ वस्तूंची नावं , recipe , बारीक सारीक घरातील वर्णनं , जे स्मृतीतून गेले होते .
सोमवारचा उपवास करण्यामागील उद्देश फारच छान . उपवासाचे पदार्थ बनवण्याची पद्धत , दळण या छोट्याश्या गोष्टींवरील विस्तृत लिखाण , पाळणा या विषयावरील लिखाण . दराबा बनविण्याची पद्धत , साय व पुढील प्रवास , इडली खाण्याच्या पद्धती , वाती या विषयावरील लिखाण , चरखा व त्याविषयी माहिती , गच्चीवरील कामे , फुलझाडे , बागेतील गोष्टी हे सगळे लिखाण व त्याबरोबर छायाचित्रांनी अजूनच मजा आली , माहिती भेटली , सर्व वर्णन वास्तववादी व सुंदर .
वारसा स्पर्धेतील आनंदाचा झरा हा लेख विशेष भावाला . काही अनुभव पण छान मांडले . या करोना च्या काळात काही पर्यटन स्थळांना पण घरबसल्या फिरून आल्याचा आनंद भेटला , पर्यटन स्थळांच्या वर्णनाने आणि तेथील छायाचित्रांनी . भेटवस्तू या विषयावरील लेख पण आवडला , त्यामागील भावना अप्रतिम .
लेख वाचून पुन्हा एकदा बालपण अनुभवले . सर्व लेख कधी चटपटीत , तर कधी माहीती देणारे . शब्द समूह या वाचनाने वाढला . नवनवीन बारीकसारीक गोष्टी माहीती पडल्या . हा असा आनंदी पाऊस कायम पडत राहो आणि त्यापावसात आम्ही सतत भिजत राहो आणि आनंदाने तरंगत तरंगत हा आनंदी सोहळा कायम चालू राहो ही सदिच्छा !
💐
वर्षा
इयत्ता चौथी पासूनची मैत्री , सगळ्यात जुनी मैत्री !
आणि
💧💦
तुमचे आतापर्यंतचे सर्वच लिखाण खूपच सुंदर आहे . वाचताना अगदी स्वतः अनुभव घेतल्या चा आभास होतो . हे लिखाण वाचून मला तर खूपच गंमत आली कारण मी या घरात येण्याच्या आधीच्या सर्व गमतीजमती मला यामुळे कळल्या आणि इतके सविस्तर वर्णन आहे की मला पण तुमच्या सोबत बालपण घालवण्याचा अनुभव घेता आला. खूपच मजा आली. आणि वेगवेगळ्या रेसिपी चे आणि वस्तूंचे फोटो काढायला पण खूप छान वाटले . तुमचे लिखाण असेच बहरत राहो याच खूप खूप शुभेच्छा! शंभर लेख पूर्ण झाल्याबद्दल शत शत अभिनंदन💐💐
💐
आमची हिमाली
ब्लॉग च्या पाकक्रियांच्या छायाचित्रांचा भक्कम आधार !
🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
आज दुसर्या आनंदी सोहळ्याचा
दुसरा अणि समारोपाचा दिवस!
गेली दोन वर्षे तुमच्या सगळ्यांच्या
प्रेमाच्या वर्षावात भुर्रकन केव्हा
संपली ते कळलेच नाही!
असेच तुमचे सगळ्यांचे प्रेम मला
कायम मिळत राहो!
सगळ्यांचे स्नेहाळ आभार !
या सोहोळ्यात सामील होऊन ,
आनंद शत गुणीत केल्याबद्दल !!!
🌺🌺🌺
खूप छान माहिती दिली आहे
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !🙏😇
DeleteThank you dear. असच लिहित रहा आणि हा आठवणीचा खजिना आम्हाला देत जा ����
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!😍😇
Deleteफारच मनोवेधि सविस्तर रसपूर्णु भाषा शैलित मिळालेले प्रतिसाद वाचून मन भरून आले आणि मेहनतीची गोड फळांचा मधूर रस चाखायला मिळाला
ReplyDeleteखूप खूप सारे प्रेम 😍 😇
Deleteअसच लिहित राहा आम्हाला असाच आठवणिचा खजिना देत राहा����
ReplyDeleteयाच सगळया शब्दांतून मला पुढच्या लिखाणासाठी बळ अणि प्रोत्साहना मिळते! आभाळभर प्रेम!! 😇 😇 😇
Deleteखुपच सुंदर. सगळ्यांनी तुझ्था लेखनाचे खुप कौतुक केले आहे. खरेच लेख सुध्दा तसेच आहे. असे तुला प्रोत्साहन सगळ्याकडून मिळाल राहो. प्रेम आणि शुभ आशिर्वाद सुध्दा. सौ. मंदा चौथरी.
ReplyDeleteखूप सारे अगदी आभाळभर प्रेम!!! ❤ 😍😇
Delete