आमचा चाट कॉर्नर, घरातला!-२
(घरातील गमती जमती)
पहिल्या भागात फक्त पहिला पदार्थ म्हणजे भेळेची गोष्ट झाली. तर आजच्या भागात उरलेल्या दोन पदार्थांची गोष्ट सांगते. आधी पाणीपुरीची. तेव्हा मला पाणीपुरीपेक्षा भेळच जास्त आवडे. पण आता मात्र भेळ कमी आणि पाणीपुरी जास्त आवडते. मी आता भेळ पेक्षा पाणीपुरीच जास्तवेळा आणि नियमित करते आणि खातेही. कधीतरी लहर आली आणि सोबत असेल तर बाहेर सुद्धा खाते. पण बाधायची भीती वाटते, त्यामुळे अगदी एखादीच प्लेट खाल्ली जाते. भीती तर असतेच, पण पाण्याची चव आपल्याला हवी तशी होईपर्यंत एक प्लेट संपलेली सुद्धा असते. कारण एका प्लेट मध्ये जेमतेम पाच-सहा पुऱ्या येतात. थोडा मीठा डालो, थोडा कम करो, थोडा तिखा कम करो वगैरे वगैरे करे पर्यंत, त्या पाच सहा पुऱ्या केव्हाच संपून जातात. गर्दी असेल तर एक पुरी खाल्ल्यावर दुसरी पुरी मिळेपर्यंत बरीच वाट बघावी लागते. या उलट कुणी नसले तरी तो भैय्या इतक्या घाईने पाणीपुरी बनवतो आणि देतो की एक पुरी आपल्या तोंडात, एक आपल्या हातातील द्रोण मध्ये , त्याच्या उजव्या हातात एक तयार पुरी आणि डाव्या हातात एक सुकी पुरी वरून भोक पाडून तयार असते. त्यामुळे इतके घाईने खावे लागते की त्यातील सगळी मजाच निघून जाते. अशा बऱ्याच कारणांनी बाहेर खायलाच नको वाटते.
तेव्हा मात्र पाणीपुरी वर्षातून एकदाच बाहेर खायला मिळे असे आम्हाला. आमच्या गावात वर्षातून एकदा जत्रा भरत असे. मग ही जत्रा बघायला, मम्मी आम्हा मुलांना घेऊन जात असे एक दिवस. फक्त याच दिवशी पाणीपुरी बाहेर खायला मिळे आम्हाला. मात्र बाकी खूप सारी धमाल असे, त्याची सविस्तर गोष्ट एका खास लेखात सांगेनच . तेव्हा म्हणजे फक्त आणि शब्दशः पाणीपुरी मिळत असे आणि खाल्ली जात असे. म्हणजे पुरी वरच्या बाजूने थोडी फोडायची आणि त्यात पाणीपुरी साठी तयार केलेले पाणी घालायचे, की झाली पाणीपुरी खायला तयार! तेव्हा ते भैय्या लोक एकाच चवीचे पाणी, माठात तयार करून आणत. तेव्हा एका प्लेट मध्ये जवळ जवळ दहा-बारा पुऱ्या येत असतं. एक प्लेट खाल्ली की आमचे पोट एकदम टुम्म भरून जात असे . हल्ली ते भैय्या एक एक पुरी भरून देतात, आपली एक एक खाऊन झाली की. तेव्हा तसे नसे, एकदाच एक प्लेट भरून देत असतं. म्हणजे एकाच वेळी दहा-बारा पुऱ्यात एकदाच पाणी भरून मिळत असे. मग आपली प्लेट घ्यायची आणि खायचे. आता हे आठवल्यावर फारच गंमत वाटली आणि बरेच प्रश्नही पडले. इतक्या पुऱ्या खायला वेळ बराच लागणार मग त्या पुऱ्या मऊ पडून, त्यातील पाणी गळून जात असेल. मग त्या कशा खाल्ल्या जात, त्याची चव कशी लागे वगैरे वगैरे. कारण या सगळ्याबद्दल आता फारसे काहीच आठवत नाहीये. बहुतेक आम्ही दोघी दोघी एका प्लेट मध्ये खात असू, त्यामुळे त्या पाणीपुऱ्या लवकर संपत असाव्या.
ही झाली बाहेर पाणीपुरी खाण्याची गोष्ट. आता घरी केल्या जाणाऱ्या पाणीपुरीची गोष्ट. घरी सुद्धा वर्षातून एकदाच केली जात असे पाणीपुरी, माझ्या आठवणी प्रमाणे किंवा क्वचित दोनदाही असेल. पण नक्की कधी हे मात्र अजिबातच आठवत नाही मला. खरं आमच्या घरी सर्वच खास खाद्यपदार्थांचे वर्षभराचे वेळापत्रक ठरलेले होते . या गोष्टीची गंमत वाटेल आता तुम्हाला. पण सखोल विचार केला, तर त्याचे कितीतरी फायदे आहेत असे माझ्या लक्षात आले आहे. मुख्य म्हणजे आज अमका दिवस किंवा सण आहे, मग आज जेवायला काय करायचे? हा आपल्याला नेहमी छळणारा आणि अतिशय अवघड वाटणारा प्रश्न सहजच सुटलेला असे, किंबहुना तसा प्रश्न पडतच नसावा. दुसरे म्हणजे प्रत्येक पदार्थ वर्षातून एकदा होतच असे, त्यामुळे प्रत्येक पदार्थ वर्षातून एकदा तरी खायला मिळत असेच आणि खाल्लाच जात असे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या त्या पदार्थाची अगदी आतुरतेने वाट बघितली जात असे आणि केल्यावर अगदी मनापासून पोटभर, मनसोक्त खाल्ला जात असे. असो अजून सविस्तर लिहायला बसले यावर, तर हा एक लेख यावरच खर्ची पडेल आणि मुख्य विषय राहूनच जाईल.
तर पाणीपुरी, घरी केलेली. अर्थातच पाणीपुरी सुद्धा आजच्या सारखी अगदी खूप साग्रसंगीत आणि तपशीलवार केली जात नसे. अगदी साधेपणाने, म्हणजे वर सांगितले, त्याप्रमाणे शब्दशः पाणीपुरी! पण हल्ली आपण पुऱ्या विकत आणून घेतो किंवा कच्च्या पुऱ्या म्हणजे पाणीपुरी पापड विकत आणून घरी तळून घेतो. पण हे सगळे पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हते. तसेच मम्मीचा कटाक्ष असे, प्रत्येक गोष्ट घरीच करून खाण्याचा. मग या पुऱ्या सुद्धा मम्मी घरीच करत असे. आता इथे किती पुऱ्या कराव्या लागत असतील, याचे प्रमाण विसरून चालणारच नाही. आता या पुऱ्या म्हणजे नेहमीच्या पुऱ्यासारख्या, उंडे करून लाटणे शक्य नसे. कारण पाणीपुरीसाठी छोट्या-छोट्या आणि भरपूर पुऱ्या लागणार, त्यात आम्ही खूप लहान होतो तेव्हा. मग ती पुरी आमच्या तोंडांत मावयाला सुद्धा हवी. मग मम्मीने यावर एक छान युक्ती काढली. आमच्याकडे दररोज देवाला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जात असे, सकाळची पूजा आरती झाली की. दूध फुलपात्रात आणि साखर वाटीत. पण ही दोन्ही भांडी अगदी छोटी-छोटी होती. मग मम्मी या देवाच्या छोट्या वाटीचा उपयोग करून घेत असे या पुऱ्या करण्यासाठी. एक मोठ्ठी पोळी लाटून घ्यायची आणि त्यातून या वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कापून काढायच्या. या तळल्या की झाल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार!
भेळ सारखेच चिंच आणि गूळ पाण्यात भिजवून ठेवला जात असे, आधीच. त्यापासून आंबट-गोड पाणी तयार करून त्यात काळं मीठ, लाल तिखट, थोडं साधं मीठ घातले की झाले पाणीपुरीचे पाणी तयार. परत काही मोठ्या मंडळींना थोडे तिखट पाणी आवडे. मग ते याच पाण्यात थोडे जास्त लाल तिखट घालून घेत असतं. परत खाण्याची पद्दत बाहेरच्या सारखीच. पुऱ्या तयार होतील तशा, एकेकाला पाणीपुरी तयार करून दिली जात असे, ताटलीत. म्हणजे पुरी वरून थोडी फोडायची, त्यात हे पाणी घालायचे की झाली पाणीपुरी तयार. घरातील एका ताटलीत पुऱ्या मावतील तितक्या भरायच्या आणि एकेकाला द्यायची. अशाच प्रकारे सगळ्यांना दिल्या जात एक-एक करून. सगळं साधं सुटसुटीत आजच्या सारखे साग्रसंगीत नाही. पण त्यातून मिळणारे समाधान आणि आनंद अगदी उच्च कोटीचा!
आता तिसरा आणि शेवटचा पदार्थ आमच्या त्यावेळेच्या यादीतला, तो म्हणजे कचोरी! ही वर्षातून एकदाच होत असे. जेव्हा ताज्या, ओल्या मुगाच्या शेंगा उपलब्ध होत तेव्हाच. काहीवेळा आमच्याच शेतातील असत, तर काही वेळा बाजारातून आणल्या जात. थोडक्यात सांगते कचोरीची कृती. आधी कणकेत थोडे मीठ घालून ती भिजवून ठेवायची. आमच्याकडे कधीच कुठल्याच पदार्थाकरिता मैदा वापरला जात नसे, अगदी आजही वापरला जात नाही. मुगाच्या ओल्या शेंगा सोलून त्यातील दाणे काढून घ्यायचे. हे दाणे जरा जाडसर असे वाटून घ्यायचे . हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर चे वाटणं करायचे. ते तेलात छान परतून घ्यायचे, मग त्यात ते मुगाचे जाडसर वाटलेले दाणे घालायचे . छान परतून घ्यायचे अगदी कोरडे होईपर्यंत. हे सारण तयार झाले याचे छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे . इतक्या वेळात ती भिजवलेली कणिक छान मुरते. मग ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून, त्याची पारी करायची आणि त्यात ते सारणाचे गोळे भरून, नीट बंद करायची. पूर्णपणे बंद झाली नाही तर कचोरी तळतांनाच फुटून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर ती लाटून घ्यायची आणि तेलात तळायची . झाली कचोरी तयार! पूर्णपणे घरी बनवलेली आणि शंभर टक्के आरोग्यवर्धक!
आता यात घालायला तिखट, आंबट, गोड पाणी हवेच. ते तसेच म्हणजे पाणीपुरीच्या पाण्यासारखेच बनवले जात असे. कचोरीला वरच्या बाजूला एक छोटेसे भोक पडायचे आणि त्यात हे पाणी घालून खायची. अशी आमची साधी सरळ पद्धत. त्यात बाकी काहीच नाही. पण एकदम चटपटीत चविष्ट! माझी एक खास पद्धत कचोरी खायची. मी कचोरीत पाणी घातले की तसेच ठेवत असे, थोडा वेळ. मग कचोरी सगळ्या बाजूने थोडी थोडी तिरकी करत जायची. म्हणजे कचोरीच्या सगळ्या कान्याकोपऱ्यात पाणी जाते आणि मुरते. मग थोडा वेळाने ती खायची. याचे दोन फायदे. कचोरी काही पाणीपुरीसारखी छोटीशी नसते. त्यामुळे अख्खीच्या अख्खी तोंडात टाकता येत नाही. छोटे छोटे घास तोडून खावी लागते. त्यामुळे त्यातील पाणी तोंडात येण्यापेक्षा सांडून जाण्याचीच शक्यता असते. असे झाल्याने ती छान चटपटीत लागत नाही आणि कचोरी खाण्याची सगळी मजाच निघून जाते. पाणी घालून थोडा वेळ ठेवल्याने, ते आतील सारणात छान मुरते . त्यामुळे खातांना, ते खाली सांडून जाण्याची शक्यता तर नसतेच, परंतु ते चटपटीत पाणी सगळ्या भागातील सारणात छान मुरल्याने कचोरीचा प्रत्येक घास छान चविष्ट आणि चटपटीत लागतो. कचोरी खाण्याचा छान आनंद लुटता येतो!
आता मात्र खूप वर्षात म्हणजे जवळ जवळ शिक्षणासाठी घराबाहेर पडल्यापासून अशी कचोरी खाल्लीच नाही. कारण मुगाच्या मौसमात मी घरी नसे. बाहेरची खायचा प्रश्नच येत नव्हता माझ्या बाबतीत . कारण मला बाहेरची कचोरी अजिबातच खावीशी वाटत नाही. अगदी आजतागायत मी कधीही खाल्लेली नाही. गेल्या दोन-चार वर्षांपासून खूप इच्छा होतेय करून खाण्याची. पण ओल्या मुगाच्या शेंगाच मिळत नसल्याने शक्य झाले नाही. यावरही मम्मीने तोडगा सांगितला. ओले मूग नाही तर घरातील मूग भिजवून ठेव आणि त्याच्या कर कचोऱ्या, त्यापण छान होतात. पण त्याही करण्याचा अजून मुहूर्त लागला नाही माझा.
तर इथे आमच्या घरातल्या त्या वेळच्या चाट कॉर्नरची गोष्ट संपते. त्यानंतर चाट करण्याच्या पद्धती बदलल्या. या यादीत आणखी काही पदार्थ आले. ते पदार्थ कधी कसे कुठे शिकायला मिळाले वगैरे च्या गोष्टी अशाच वेगवेगळ्या खास लेखातून वाचायला मिळतीलच. कारण चाट अशी गोष्ट आहे की, त्याशिवाय आयुष्य अगदी मिळमिळीत, सप्पक आणि बेचव वाटते. चाट म्हणजे आयुष्य एकदम चटपटीत बनवून टाकते! नुसते नाव काढले , तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम एक खास प्रकारची चमक येते!! चेहऱ्यावर अशी चमक कुठल्याही ब्युटी पार्लर मध्ये कितीही पैसे आणि वेळ खर्च केला तरी येत नाही!!!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१२जुलै २०२१
हीच ती आमची देवाची छोटी वाटी !
देवाच्या नैवेद्याची छोटी वाटी आणि फुलपात्र
पाणीपुरीच्या पुऱ्या
ह्या अर्थातच हल्लीच्या आहेत
बाजारातून विकत आणलेल्या
कचोरी साठी दाणे साधारण असे वाटून घ्यायचे
त्याला वाटण लावून असे परतून घ्यायचे
सारण साधारण इतके कोरडे व्हायला हवे
सारण भरून , लाटून , छान तळून घ्यायच्या
तयार कचोऱ्या
तिखट-आंबट-गोड-पाणी
आणि प्लेट पण तय्यार लगेच !










आज सकाळी सकाळी तुझा लेख वाचला आणि पहिली कमेंट देते आहे. लेख खूप चटपटीत आहे तोंडाला पाणी सोडणारा. लहानपणी च्या आठवणीत हरवून गेले. त्यामुळे सकाळीही प्रसन्न झाली.
ReplyDeleteचटपटीत सकाळ झाली म्हणायची तुझी!
Deleteलहानपण देवा देगा!!!
😍 😍 😍
Wa wa mast aahe chat party aadhi bhel chi majja lutali v aata panipuri
ReplyDeleteSarvache varanan yekadam chan.vachun pan tondala pani sutale
sunder!!
तू एकदा तरी चव चाखली असशील या पदार्थांची असे वाटते, त्याबद्दल आठवत मात्र नाही फारसे!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
Sarvanchi aawadicha padarth..chhan chatpatit lihilay Varsha lekh..👍
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteअरे बापरे मॅम तुम्ही असे लेख लिहिताय की लगेच खायची इच्छा होतेय, मस्त भारी ��
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद 😍 😇
Deleteसुरवातीला बाहेरच्या पदार्थांचे वर्णन थोडे लांबले. पण बाकी लेख चटपटीत आहे.घरच्या चाट काॅर्नर चे वर्णन छान आहे.
ReplyDeleteखरंय अगदी, पण मला मोह आवरला नाही ते सांगण्याचा. आठवणीत वहावत जाते मी बर्याच वेळा.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
😋tondala panich sutale lekh vachun.
ReplyDeleteAse vattey ki atta lagech pamipuri, kachori khavi.
Kanakepasun Kachori banavanachi receipe chan kadhi yeikale pan navhte ani khallipan navhati atta jaroor try karel
Ekandarit lekh chatpatit 👌
कचोरी अशी करायची ऐकली नसशील, पण एकदा तरी आमच्याकडे चव चाखली असशील याची खात्री वाट्ते.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
Pani sutal tondala majeshir chat party jali
ReplyDeleteधन्यवाद 🙏☺️
DeleteTondala pani sutal agadi ani majeshir party jali vachanachi
ReplyDeleteखूप धन्यवाद 🙏😊
DeleteTondala pani sutal agadi ani majeshir party jali vachanachi
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteचाट पार्टीची चागली आठवण आहे असे दिसते. तेव्हा खूपच साधेपणाने चाट पार्टी होत असे .पण खुप मजा येत अस.खायला आणि करायला उत्साह पण येत असे .खुप दिवसांनी मिळाल्या मुळे आनंद पण होत असे सौ.मंदा चौथरी.
ReplyDeleteहीच काय सगळ्याच आठवणी छान आहेत अणि मनात पक्क्या कोरलेल्या आहेत. खूपच मौल्यवान क्षण अणि आठवणी आहेत, तू दिलेल्या! खूप सारे, आभाळभर प्रेम 😍 😇
Deleteआल्यावर हे srv पदार्थ बनवून खावू घालावे लागतील.
ReplyDeleteहा हा हा हा 😁 😂 🤣
Deleteवा लेख वाचून तर तोंडाला पाणी सुटलं.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Delete����mast chatpatit lekh tondala warnan wachun pani sutle
ReplyDeletePics mast
सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
DeleteKharch khup chan ahe 🙏🏻
Deleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺
Deleteखमंग हा चाट corner..पाणीपुरीच्या क्रुतीसह मुगाच्या कचोरीच्या सारणापर्यंत सारेच चटपटीत झालय.फोटोतील kachorya hya माला गरमगरम वाटताहेत.माला मुगाच्या व कांदाकचोरी जाम आवडते.Lightweight टम्म फुगलेल्या पुरयांचे Texture कुरकुरीत झालय.
ReplyDeleteमस्तच!!!!
माझ्या लेखा पेक्षा तुझा अभिप्राय जास्त चटपटीत वाटतोय मला! अणि texture पण एकदम भारी!!
Deleteकुरकुरीत धन्यवाद 🙏 😊
Mouthwatering article and the flow of the article is too good....
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteआरोग्यवर्धक कचोरी एक नंबर👌 पाणीपुरी मस्तच👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏🤩😍
Delete