खजिना-३
(घरातील गमती जमती)
खजिना-४ लिहायचा मोह मी आवरू शकले नाही, त्यामुळे हा खजिना-३ लिहायचा राहून गेला. तर आज या खजिन्याची गोष्ट, मजेशीर खजिन्याची गोष्ट. मजेशीर म्हणजे कधी खूप हवासा वाटणारा, खूप आवडीचा वाटणारा, तर कधी खूप नावडीचा वाटणारा, तर कधी अगदी नकोसाच वाटणारा!
तर हा खजिना म्हणजे खजिना-१-२ या कपाटाच्या अगदी बाजूच्याच कपाटातील. हे कपाट सुद्धा भिंतीतच असलेले आणि कप्पे सुद्धा अगदी त्या कपाटासारखेच. म्हणजे वरच्या दोन भागांपैकी एका भागाला एकच दार आणि दुसऱ्या भागाला दोन दार उघडणारी. पैकी एक दार असलेल्या भागाची फारशी स्पष्ट अशी काही आठवण नाही मला. पण दुसरा भाग ज्याला दोन उडणारी दार असलेला. यात मात्र खूप छान आणि आवडीच्या काही गोष्टी होत्या. त्यापैकी एका गोष्टीचा उल्लेख 'उन्ह दाखविणे' या लेखात आलेलाच आहे. तो म्हणजे आमच्या मधल्या काकूचा थंडीचा काश्मिरी कोट! माझा अतिशय लाडका. तसेच काकूंच्या दोन साड्या सुद्धा होत्या माझ्या खास आवडीच्या. खूप भरजरी आणि भारी वगैरे नव्हत्या त्या अजिबात. उलट त्यांच्या काहीश्या वेगळ्याच साधेपणामुळे मला त्या फार आवडतं. एक छान पिवळ्या रंगाची दुर्मिळ छटा असलेली आणि त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेली. ह्या दोन रंगांची रंगसंगती फारच सुंदर दिसे त्यामुळेच ही साडी मला आवडे. मला वाटते आणि आठवते त्याप्रमाणे ती सॅटीन पट्टा असलेली साडी होती.
दुसरी साडी तर यापेक्षाही खूपच साधी. अगदी फिक्कट अबोली रंगाची आणि त्यावर भली मोठ्ठाली फक्त पाच फुलं असलेली. निऱ्यांमध्ये खालच्या बाजूला एक फुल येत असे, दुसरे पदर खांद्यावरून मागे जातो त्या आधी येत असे आणि बाकीची पदरावर. फारच सुंदर दिसे ती साडी या अशा सध्या वेगळेपणामुळे! मला तर इतकी आवडे ती साडी, की मी माझ्या चहा-पोह्यांच्या कार्यक्रमाला तीच साडी नेसले होते. मुख्य म्हणजे ती टिकली सुद्धा इतके वर्ष, त्यामुळे मला नेसायला मिळाली. तसं साड्यांचं आणि माझे जरा वाकडेच आहे, आजही मला साडी नेसता येत नाही नीटपणे, कुणाच्या मदतीशिवाय. पण ती साडी मात्र आवडीने नेसले होते मी!
एक अतिशय आवडीचा भाग म्हणजे छायाचित्रं, वेगवेगळ्या पण खास निमित्ताने काढलेली . या कपाटात तर चांगलाच खजिना होता. पप्पा आणि नाना दोघांच्या लग्नाच्या छायाचित्रांच्या पुस्तिका, म्हणजे पर्वणीच होती. आजच्या सारखे उठता बसता छायाचित्र काढली जात नव्हती तेव्हा आणि ते शक्यही नसे बऱ्याच कारणांमुळे. त्यामुळे काही मोजकीच छायाचित्र असत घरात आणि अगदी नीट जपून ठेवलेली असतं. कधीतरी काही निमित्तानेच बघायला मिळत, साधारणपणे कपाटाची साफसफाई करायला काढली की हमखास मिळत बघायला. या आधीची सगळी छायाचित्र कृष्ण धवल होती. पण यांच्या लग्नापर्यंत रंगीत छायाचित्र काढण्याचे तंत्र आमच्या पर्यन्त येऊन पोहोचले होते. त्यामुळे त्या रंगीत छायाचित्रांचे एक वेगळेच आकर्षण वाटे. ही छायाचित्रं बघण्याची संधी मिळाली की आम्ही अजिबात दवडत नसू. अगदी हळुवार एक एक पान उलटून बघत असू. आम्ही बघत असतांना मोठ्या लोकांचे लक्ष असेच आमच्याकडे. त्यांच्या सूचना चालूच असतं, हळू उलटावा पानं, छायाचित्राला मध्ये हात/बोटं नका, छायाचित्रं खराब होतील अशाने, वगैरे वगैरे. पण जाम धम्माल यायची आम्हाला तेच तेच फोटो परत परत बघायला!
आता याच्या खाली असलेला भाग म्हणजे दोन सरकत्या दार असलेला भाग. पैकी एका दाराचा भाग म्हणजे आम्हा बहिणींचा होता. दुसऱ्या दाराचा भाग मात्र मला अगदी कधीही नको वाटणारा होता. तो भाग बघायलाही नको वाटे आणि त्याच्या वासाच्या आठवणीने आता सुद्धा माझ्या पोटात डचमळायला लागले आहे . तर या भागात घरात अगदी छोट्या बाळा पासून ते मोठ्ठ्या व्यक्तींना लागणारी सगळी औषध ठेवलेली असतं. त्यामुळे हे दार थोडेही सरकले किंवा उघडले गेले की, एक भयंकर, नको वाटणारा वास येत असे, त्या सगळ्या औषधांचा. मला अगदी आजही हा वास सहन होत नाही. आज सुद्धा माझ्या घरातील हा कप्पा उघडायला नको वाटतो. मला औषध घ्यायला अजिबातच आवडत नाही. मी कितीतरी मोठी होईपर्यंत जाम त्रास देत असे औषध घ्यायला. याची गोष्ट माझ्यापेक्षा मम्मी कडूनच ऐकलेली बरी. तिच्या संयमाला आणि चिकाटीला अगदी त्रिवार सलाम!
आता शेवटचा कप्पा म्हणजे आम्हा बहिणींचा कप्पा. सुरवातीला उल्लेख आहे तो याच भागाबद्दलचा. कारण हा कप्पा म्हणजे आमच्या कपड्यांचा वगैरे नव्हता, तर आमची शाळेची वह्या-पुस्तके ठेवण्याचा कप्पा होता. नवीन शैक्षणिक वर्ष चालू होणार असले की, खूप धमाल वाटायची . कारण नवीन वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल वगैरे वगैरे मिळे. चौथी पर्यंत आम्हाला पाटी सुद्धा होती. पण दगडी घेतली की ती फुटून जाण्याची शक्यता असे. त्यामुळे आम्हाला पत्री पाटीच मिळे, एकच पुरत असे चौथीपर्यंत. पाटीवरची आणि वहीवरची अशा दोन प्रकारच्या पेन्सिल लागत असतं. याचा एक पुडाच आणला जात असे. पण तो मम्मीच्या ताब्यात असे. खूप जपून वापराव्या लागत पेन्सिल. कंपास पेटी 'कॅमल' ची एकदाच पाचवीत मिळे, सगळ्यांना. तीच पुढे दहावी पर्यंत वापरायची. अगदीच त्यातील कर्कटक, पट्टी किंवा कोनमापक खराब झाले तर तेव्हढेच दुसरे आणले जात असे. ते सुटे एक एक मिळत असे. दुसरी आवडती गोष्ट म्हणजे 'कॅमल' चे ट्यूब चे रंग. हे सुद्धा एकदाच मिळत आणि पुरतही ते दहावीपर्यंत. फक्त यातील पांढरा आणि पिवळा रंग लवकर संपे. पैकी पांढरा आणि काळ मिळत असे सुटा एक एक. ब्रश मात्र अधून मधून खराब होत. मग ते आणले जातं, एक जाड ब्रश आणि एक बारीक. अशी ही नवी नवी खरेदी असली की फार आवडे हा कप्पा.
नवीन वर्ष चालू झाले की नवे संकल्प, वेळेवर गृहपाठ करण्याचे, अभ्यास करण्याचे आणि छान अक्षर काढण्याचे! दरवर्षी माझ्या सगळ्याच वह्यांवर पहिल्या काही पानांवर शक्य तितके नीटनेटके आणि वळणदार अक्षर असे. मग हळू हळू बिघडत जात असे आणि शेवटी शेवटी तर काही वेळा माझेच मला वाचता येत नसे, काय लिहिले आहे ते! सगळे संकल्प फक्त संकल्पच राहून जात, त्यातील सत्यात काहीच उतरत नसे . तरी दरवर्षी, अगदी नव्या उत्साहाने संकल्प केले जात. काही वेळा गृहपाठ करायला विसरणे, काही वेळा कंटाळा आणि काही वेळा तर केलेला असून वह्या घरी विसरणे. अभ्यासाचा तर आनंद दिसेच निकाल जाहीर झाल्यावर! तेव्हा कमी गुण मिळाले तर, समजावून सांगण्याची वगैरे पद्धत नव्हती. त्यामुळे भरपूर ओरडा आणि येता जाता टोमणे ऐकावे लागतं. कधी कधी तर प्रगती पुस्तकावर दादांची सही मिळण्यासाठी रडारड होत असे. अशा वेळी वाटे मग, का ही शाळा असते, का हा अभ्यास, का ह्या परीक्षा आणि नकोच हा निकाल! या कपाटापासूनच नाही तर या सलगळ्या पासून दूर कुठे तरी पळून जावेसे वाटे. पण कुठे ते माहित नसे, त्यामुळे सगळे रहाट गाडगे परत पुढच्या वर्षी चालू होत असे, कायमचे राहिले!
पण आज इथपर्यंत येऊन पोहोचले मी. तेव्हा कुणी मला सांगितले असते, पुढे तू भरपूर लिखाण करशील आणि ते लिखाण जगभरातून वाचले जाईल. तर त्यावर माझा अजिबातच विश्वास बसला नसता. पण आज हे सगळे सत्यात उतरले आहे. दरम्यानच्या काळात नीट समजले आहे, हे आयुष्य सुंदर आहे! त्याला आनंदानेच सामोरे गेले पहिले. प्रत्येक चांगला, वाईट क्षण पूर्णपणे जगून त्यातील आस्वाद घेतला पाहिजे. आनंदाने जगत, गात राहायचे, " या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..."
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
६जुलै २०२१
फोटोची पुस्तिका/अल्बम
त्यातील कृष्ण-धवल फोटो
त्यावेळी रंगीत छायाचित्राचे तंत्र
नव्यानेच आमच्यापर्यंत पोहोचले होते
माझा अगदी नावडता कप्पा
औषधाचा कप्पा
शाईच्या पेनात शाई भरायला आम्ही हे
औषधाच्या बाटलीचे ड्रॉपरच वापरात होतो
वेगवेगळे ड्रॉपर
शाई भरायचे योग्य ड्रॉपर
शाईचा पेन
शाईचे पेन
कॅमल ची शाईची दौत
कॅमल ची कंपास पेटी
कर्कटक आणि पट्टी
कोनमापक
नटराज शिसपेंसिल
कॅमल चे ट्युब चे रंग
पाटीवरची पेन्सिल
पाटी
एवढे सगळे फोटो कसे मिळाले तपशीलवार कथन आणि फोटो मुळे एक प्रकारचि घडण आलि आहे
ReplyDeleteईच्छा तिथे मार्ग!!!
Deleteखुप सारे प्रेम 😍!!!
खर आहे ती पाटीवरची पेन्सिल बोटात बसेपर्यंत vapravi लागायची. दगडी पाटी फुटली तरी तशीच वापरायची. Water colour तर पिळून काढायचे. पण त्यात ही एक veglich मज्जा होती
ReplyDeleteहो खरंय दगडी पाटी अणि पेन्सिल अशा प्रकारे वापरावीच लागे
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरच खूप छान माहिती दिली आहे त्यावेळच्या गमती जमती खूप छान होत्या
ReplyDeleteखरंय त्या वेळ च्या गमती जमती काही औरच होत्या!! खूप सारे धन्यवाद 😍
Deleteखुप छान आहे लेख
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇 😍
Deleteखुपच सुंदर वर्णनं केलेले आहे
ReplyDeleteऐवढी सगळी कपाट आणि त्यतील सामान सर्व रंगा सकट आठवणीत राहिले. मस्त आहे लेख.
सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteN for Nostalgia...खुपच छान..अजुनही पाटि पेन्सिल ह्या सर्व Richest वस्तूंचा खजिना जपलाय हे अप्रुपच.बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला.
ReplyDelete$$Dil Chahta Hai..न बिते ये चमकिले दिन $$
आता वाटते हे सगळे, तेव्हा मात्र कधी एकदा मोठे होतो याची घाई होती 😁😜
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
Khupch Chan lekh aahe,,👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteलेख वाचून बालपणीचे ते रम्य दिवस आठवले. शाईच्या पेनात कँमल इंक भरताना सगळी बोटं नीळी व्हायची आणि शाळेचा गणवेषही कलरफूल व्हायचा. पुस्तकं, कंपास पेटी मोठ्या भावंडाकून लहानाकडे पास होत असे. पाटी- दप्तराची मजा तर काही औरच होती. ह्या सर्व जुन्या आणि कालबाह्य झालेल्या साहित्याचे फोटो बघून मजा वाटली. वर्षाली, कुठून मिळवलेस हे फोटो? धम्माल लेख.
ReplyDeleteशाई, त्यामुळे रंगलेले हात अणि गणवेश बर्याच वेळा वह्या पुस्तक सुद्धा, सगळेच अविस्मरणीय अनुभव!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇 या छान कथना बद्दल!
घरातील कानाकोपरा, घरातील सर्व वस्तू, जुना अल्बम, पाटी पेन्सिल, रंग- ब्रश,शाईचापेन - डापर इ. सर्व वाचकासमोर उभे केले. तुझ्या स्मरणशक्तीच कौतुक करावेसे वाटते.
ReplyDeleteमनातील काना कोपरा दाखवते आहे मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या शब्दांतून!!
Deleteखुप सारे धन्यवाद 😍 😇