Skip to main content

गोष्टी बागेतल्या - ३ (काही अनुभवलेलं...)

                  

गोष्टी अनुभवलेल्या - ३

(काही अनुभवलेलं...)


                        लहान असल्यापासून घरात सगळ्या मोठ्या लोकांचे  या ना त्या प्रकारचे व्यायाम बघत आलेय . त्यामुळे अगदी लहानपणापासून मनावर व्यायामाचे संस्कार होत होते . त्यापैकी मुख्य म्हणजे चालणे . बाबा (माझे आजोबा ) भल्या पहाटे ५ वाजता उठून फिरायला जात नव्या पेठेतल्या घरापासून ते थेट ओंकारश्वराच्या मंदिरापर्यंत ! तेव्हा फारशी वस्ती नसल्याने मुख्य रस्त्यावरूनच मंदिर दिसत असे . मग मुख्य रस्त्यावरूनच नमस्कार करायचा आणि तेथूनच परतायचे . असा त्यांचा नेम . मग शाळेला सुट्टी लागली की आम्ही बहिणी सुद्धा जात असू त्यांच्या सोबत . मग मोठी होत गेले तशी माझ्या बदलत्या वेळापत्रकानुसार आणि घरातल्यांच्या वेळापत्रकानुसार मी काही काळ माझ्या नानांसोबत (माझे सगळ्यात लहान काका) , दादांसोबत (माझे वडील) सुद्धा सकाळी फिरायला जात असे . तेव्हा फिरायला जाणे असाच शब्द प्रचलित होता . अजून मॉर्निंग वॉक चा प्रवेश झालेला नव्हता . आणि सकाळी शाळा कॉलेज क्लास लवकर असत . मग रात्रीच्या जेवणानंतर मम्मी (माझी आई) बरोबर फिरायला जाऊ लागले . काही काळाने दादा सुद्धा आमच्यासोबत येऊ लागले . सगळ्यात जास्त काळ मी मम्मी बरोबर फिरायला गेलेले , रात्री जेवणानंतर . कारण ती भल्या पहाटे उठत असे , पण उठल्या क्षणापासून ती अखंड कामात बुडालेली असे . आमचं कायम एकत्र कुटुंब . त्यामुळे कामही खूप . पुन्हा येणाजाणाऱ्यांच इतका राबता होता , की ती कामं  सुद्धा दैनंदिन जीवनाचा भागच होता . तर या सगळ्यामुळे भल्या पहाटे उठून सुद्धा तिला कधी फिरायला जाण्याची संधी मिळाली नाही .

                      पुढे शिक्षणाकरिता , लग्नानंतर , कामानिमित्त गावही बदलली आणि दिनक्रमही . पण तरी त्या त्या वेळी शक्य तसतसा व्यायाम करत आले आणि अजून सुद्धा करते आहे . मुख्य म्हणजे चालणे . पूर्वीच्या काळी रस्ते मोठ्ठे नसत , पण एकंदरीतच वाहतूक कमी आणि त्या काळात आजच्या सारखे खूप सारे बगीचे नव्हते. त्यामुळे रस्त्याने अगदी निवांत फिरायला जाता येत असे आणि रस्त्यानेच जावे लागे . मग रस्त्याने आमच्या सारखे फिरायला येणारे नित्य नेमाने भेटत .

                       आता मात्र तसे करताच येत नाही , सकाळी आणि रात्री सुद्धा . कारण हल्ली वाहतूक अगदी भल्या पहाटे पासूनच सुरु होते आणि जवळ जवळ मध्य रात्री पर्यंत सुरूच असते . मग त्याची भीती , कर्णकर्कश्य आवाज , रस्ते इतके धोकेदायक की  नकोच  वाटते रस्त्याने फिरायला जाणे आणि मुख्य म्हणजे इथे सगळ्या ओपनस्पेसेस छान पब्लिक पार्क  म्हणून विकसित केल्या आहेत. त्यात छान पेव्हिंग करून वॉकिंग ट्रॅक केलेले आहेत , व्यायामाची उपकरणं बसवली आहेत . लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यासाठी काही उपकरणं बसवली आहेत. आणि मुख्य म्हणजे स्वच्छता आणि शिस्त पाळली जाते . त्यामुळे कुठल्या तरी एका बागेत जाऊन निवांत चालून येता येते . 
                    अजूनसुद्धा दिनक्रमाप्रमाणे जसे जमेल तसे फिरून येतेच . म्हणजे मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक किंवा दोन्ही . 
                    अशीच एकदा मी संध्याकाळी माझ्या घराजवळच्या बागेमध्ये गेले होते , संध्याकाळची चालण्यासाठी . काही कारणाने मी फारच अस्वस्थ आणि बेचैन होते . वाटलं छान चालून आले , कुणाशी बोलले की  बरं वाटेल . पण त्यादिवशी नेहमीचे कुणीच भेटले नाही . मग चालून झाल्यावर एक चांगलासा बाक शोधला आणि बसले एकटीच . 
                   थोड्यावेळाने समोरच्या मुख्य प्रवेश द्वारातून मधून एक बाई आत आल्या आणि एकदा माझ्याकडे आणि एकदा बाजूच्या रिकाम्या जागेकडे बघत होत्या . मी ताडले त्यांना या बाकावर माझ्या बाजूला बसायचे आहे आणि तसेच झाले त्या आल्या , इथे बसू का विचारू लागल्या . मी हो म्हणाले आणि त्या बसल्या . मी माझ्या बेचैनीत आणि त्यात त्या अनोळखी बाई बाजूला बसल्याने माझी बेचैनी अजूनच वाढली . 
                   आणि काही कळण्याच्या आतच .... अगदी क्षणार्धात जोरजोरात हुंदके देऊन रडण्याचा आवाज येऊ लागला बाजूने . वळून बघितले तर त्याच बाई रडत होत्या . मी तर पुरती भांबावून गेले . काय करावे सुचेना . मग म्हटले त्यांना निदान विचारावे तरी , काय झाले ? विचारले तर म्हणाल्या मला समस्या आहे , घरी रडता येत नाही म्हणून मी इथे आले रडायला . मला तर समजेचना काय करावे . थोडं त्यांना रडू दिले , मग पुन्हा बोलायचा प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा बोलायचेच होते ........ 
                   मग त्या सांगू लागल्या इथे मी मुलीकडे आलीय , ती गरोदर होती . पण काल अचानक तिचा गर्भपात झालाय . खालच्या मजल्यावर सासू-सासरे आणि वरच्या मजल्यावर मुलगी आणि तिचा नवरा राहतात . असे झाल्याने सगळेच त्यामुलीला बोल लावत आहेत . त्याचा तिला फार त्रास होतोय आणि मला सुद्धा . पण घरात तिच्यासमोर आणि घरातल्यांसमोर माझे दुःख दाखवता येत नाही म्हणून मी इथे आले बागेमध्ये ........ 
                  त्यांचा दुःखाचा थोडा निचरा झाल्यावर मग मी मुलीविषयी थोडी माहिती विचारली . काय करते वगैरे . माझा अंदाज बरोबर होता ती सॉफ्ट वेअर इंजिनिअर होती . खरतर मला खूप माहिती नाही या विषयातली की मी त्यावर बोलावे किंवा समजवावे . पण कसे माहित नाही , मी त्यांना समजावू लागले आणि मी म्हटले हे फार नॉर्मल आहे . काही महिन्यांनी तुम्ही येऊन मला सांगाल , गोड बातमी आहे म्हणून . त्यांना माझ्या शब्दांनी फारच धीर आला आणि त्यांचा मूड पालटून , त्या एकदम आनंदी होऊन गेल्या . मला म्हणाल्या तुमच्या रूपाने मला देवच भेटला . मला तुम्ही छान धीर दिलात वगैरे वगैरे ...... मला तर फारच अवघडल्यासारखे झाले त्यांचे हे सगळे बोलणे ऐकून . 
                   मग हळूहळू त्या अजून मोकळ्या झाल्या . बाकी बोलू लागल्या इकडचे तिकडचे . म्हणाल्या तुमचा चेहरा पहिल्यासारखा वाटतो . मी म्हटले सकाळ संध्याकाळ इथेच येते मी चालायला , तेव्हा तुम्ही पाहिले असणार . म्हणाल्या , मी नाही येत बागेमध्ये . तो पर्यंत मलाही आठवेना कुठे पाहिले याना आणि एकदम आठवले काही दिवसापूर्वी त्या मला तिथल्याच मल्ल्याळ्याच्या दुकानात (आपल्याकडे वाण्याची दुकानं , तशी इकडे मल्ल्याळ्याची दुकानं ) भेटलेल्या . दुकानात खूप लोक येतात , पण सगळीच आपल्या लक्षात रहात नाही . या लक्षात राहण्याचे कारणही तसेच होते . त्या त्यांना हवे ते सामान घेऊन बिलाची वाट बघत होत्या आणि मी सुद्धा . माझ्या सामानात मॅग्गीचे पाकीट होते . ते त्यांनी उचलून बघितले आणि विचारले काय हे , कसं करायचे ? मी तर उडालेच या प्रश्नावर ! मी म्हटले तुम्हाला माहित नाही का? तुमच्या घरात लहान मुलं नाही का? नाही दोन मुली आहेत आणि दोन्ही इंजिनिअर आहेत . एकीचे लग्न झालाय . मग त्या दोघी हमखासच खात असाव्या असे वाटले . पण त्यांना अजिबातच माहित नव्हते . मला फारच आश्चर्य वाटले या सगळ्याचे आणि याच कारणाने त्या एकदम लक्षात राहिल्या . 
                 तर मोठ्या बहिणीच्या या प्रॉब्लेम मुळे लहान बहीण सुद्धा तिथे आलेली होती . बराच वेळ झाला तरी आई घरी का परत आली  नाही , या काळजीने तिने आईला फोन केला . मग त्यांनी तिला सगळे थोडक्यात सांगितले आणि तिला सुद्धा पार्क मध्ये बोलावून घेतले , मला भेटायला म्हणून . आई इतकी आनंदी बघून ती सुद्धा तयार होऊन भर्रकन आली . त्यांनी माझी ओळख करून दिली आणि सांगितले यांच्यामुळेच मी माझे दुःख विसरू शकले आणि आनंदी झाले ! तिनेही माझे आभार मानले . 
                 मात्र निघता निघता त्या म्हणाल्या मी तुमच्याकडे बघून बराच विचार केला , तुमच्या शेजारी बसावे की नाही ? तुम्ही फार हायफाय दिसताय , नीट बोलाल की नाही माझ्याशी , अशी शंका होती . पण आता असे वाटतेय मी योग्यच केले . मी असा विचार केला याचे वाईट वाटून घेऊ नका प्लिज . मग मात्र मला फारच   हसू आले . त्या म्हणाल्या काय झाले ? मी म्हटले फार काही नाही , मला हे सगळं ऐकण्याची चांगलीच सवय आहे . तुमचीच नाही तर खूप साऱ्या लोकांची हीच प्रतिक्रिया असते माझ्याबद्दल ! आणि हसत हसत परत एकदा माझे आभार मानून  दोघी माय लेकी निघून गेल्या ..... 
                मला तर कळेच ना , काय चालले आहे हे सगळे ...... 
               मी खरंतरं माझी बेचैनी , अस्वस्थता कमी व्हावी म्हणून पार्क मध्ये आलेली . पण त्या जेव्हा रडायला लागल्या तेव्हा म्हटलं , हे भगवान माझी अस्वस्थता कमी व्हायच्या ऐवजी वाढतेच आहे. 
               पण शेवटी जेव्हा दोघी मायलेकी माझे आभार मानून आनंदाने परत गेल्या , तेव्हा मात्र एक वेगळेच समाधान आणि आनंद वाटून गेला  मनाला की ....... मी कुणाला तरी त्यांचे दुःख विसरून , आनंद देऊ शकले ! आणि  शांत समाधानी मनानं घरी परतले . 
              सगळे एव्हढ्यावरच थांबले नाही . आम्हाला एकमेकींचे नाव-पत्ता-फोन या पैकी काहीही माहीती नव्हते आणि अचानक काही महिन्यांनी त्या परत  भेटल्या आणि म्हणाल्या तुमचे बोलणे खरे झालेय माझ्या मुलीकडे गोड बातमी आहे !!!
                                                                                                                                                                                        
©आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
१४ एप्रील २०१९

🤩😍😆


मुख्य प्रवेशद्वार 


मुख्य प्रवेशद्वार 


हाच तो बाक !


बागेतील दृश्य 


बागेतील दृश्य 


बागेतील दृश्य 
बागेत इतकी दाट झाडी आहेत की 
सूर्यप्रकाश पण फारसा येत नाही !














                                                                                                                                                                                            
                                                                                                                                                                                               

Comments

  1. अतिशय सुंदर अनुभव शेअर केला खूप छान वाटले आणि तुमच्याविषयी जसं म्हणतात तसं ते खरोखरच तुम्ही तशा तुम्ही तुमच्या आईसारखे आहात कोणालाही मदत करणाऱ्या आहात.
    मी माझ्यावरून सांगतो तुमची मदत मला आयुष्यभर पुरेल आयुष्यभर लक्षात राहील माझा आनंद तुम्ही मला मिळवून दिला आहे काही फेस ओळख नसताना. आपलेपणाने मदत केली ब्लॉग ओपन करून दिला.
    👏👏👍🏻🌷🎉❤️🙋

    ReplyDelete
    Replies
    1. This means a lot for me, n i really mean it!
      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  2. जनार्दन चौधरीJune 25, 2021 10:54 am

    कोण कुठे कसे कशासाठी भेटेल आणि त्यातुन काय ओघळेल याचा काही धरबंधच नसतो

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय!
      खूप सारे प्रेम 😍 😇

      Delete
  3. Garden is the one of the Space where all type of age group people will come...आपला‌ अनुभव सुखदरित्या वर्णिले आहे.सर्व garden furnitures, pathways,trees etc.Built Spaces(निर्जीव),etc.things only दोन सजीवांना(human being)
    एकत्रीत जोडतात.

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरच बाग असे ठिकाण आहे जिथे सगळ्या वयोगटातील लोक भेटतात अणि एकमेकांशी कायमचे जोडले जातात! माझ्या आयुष्यात अश्या कितीतरी व्यक्ती आहेत निरनिराळ्या वयाच्या, भाषेच्या ani प्रांताच्या सुद्धा, अगदी कायमच्या जोडल्या गेलेल्या 😇😍 अगदी Feeling blessed 😇 😇!!!

      Delete
  4. छान आहे लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  5. Chan anubhav varnan
    Kharach ekhadala appalamule bhetalela aanad ya peksha dusara aanand nahi

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना, खरय अगदी!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  6. I want to say one thing...you express everything so deeply...amd you feel the things as you go through it...i experience a nice flow of thoughts in your every article....

    ReplyDelete
    Replies
    1. This is really a lot! N i really mean it!
      Thnks a tons!! 🙏😇😇

      Delete
  7. Khup chhan lihile aahe👌👌

    ReplyDelete
  8. ��good morning vershali lekh sunder zalay
    Tu te radat aasnare bai na tiche mulila jo mansik aadhar dilas tuze rupane dev ch bhetla
    Life madhe aasch kon kaddhi kuthe bhetel he pan ek vidhi likht aaste
    Aase aamhi pan baget bhetlo sare janinchi olahk karun dilis aani aamcha hi indira nsgar bagetil rojcha pherphatka aanadi zala
    Ti bag ek divas tuzeshi mansokt gappa aani tuzesobat aamhi pahileli ganichi meeiphil
    Sare aathwani ajun maant taje tavtavit aahet
    Indira nsgar bageche pics pahun aathwani tajiya zale
    Corona kalat wachan ha motha virungala zalay so tuze likhan aawdine anubhavte ��god bless you

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वावा, छान आठवण करून दिली तुम्ही. लगेचच सगळे आठवले अणि डोळ्या समोर तरळले!
      मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇😍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...