गोष्टी बागेतल्या - १
(काही अनुभवलेलं ...)
बाग ! हो बागच , कारण पार्क , गार्डन वगैरे फिरंगी शब्दांनी बाग या शब्दातील खरा आनंद आणि सुख नाही अनुभवता येत , असे माझे मत . तर बाग हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग , अगदी आजही . किंबहुना बऱ्याच वर्षांपासून बाग हा माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झालाय . त्यामुळे बागेतील खूप विविध प्रकारच्या गोष्टी आहेत माझ्याकडे , सांगण्यासारख्या . आता लहानपणापासूनच सुरुवात करते , बागेतील गोष्टी सांगायला . त्यापैकी गच्चीवरील बागेच्या गोष्टी सांगून झाल्याच आहेत आधीच . पण त्या चौधरी सदनातील बागेच्या होत्या . आता त्या व्यतिरिक्त बाकीच्या बागेतील गोष्टी सांगते .
सगळ्या कथा आणि गोष्टींमध्ये एक आटपाट नगर असते , त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात , एक महात्मा गांधी रस्ता (एम जी रोड) आणि गांधी बाग असतेच . तसेच आमच्या गावात सुद्धा आहे . तर आजची गोष्ट आमच्या या गांधी बागेतील ! कधी कधी खेळायला म्हणून जात होतो , आम्ही या बागेत संध्याकाळच्या . घरून चालत चालत बागेपर्यंत जायचे . या बागेच्या समोरच "चिमुकले राम मंदीर" आहे . नाव चिमुकले असे असले तरी , या मंदिराचे आवर बरेच मोठे आहे आणि त्या आवारात दोन-तीन मंदीरं आहेत . आमच्या गच्चीवर जो मोर आला होता , तो याच मंदिरातील होता . असे पाच मोर या मंदिराच्या आवारात होते , तेव्हा . मला हे मंदिर आणि त्याचे आवर तर आवडत होतेच , पण त्या मोरांचे पण खूप आकर्षण होते . कारण आयुष्यात खरेखुरे मोर पहिल्यांदा पहिले ते हेच ! तिथे गेले म्हणजे त्यातील एखादा तरी मोर दिसावा अशी इच्छा असे . कधी दिसत असे , तर कधी नाही . दिसला की आनंद गगनात मावेना होई , पण दिसला नाही की मन थोडे खट्टुही होऊन जात असे . कधी कधी बागेत सुद्धा दिसत हे मोर .
थोडा वेळ मंदिराच्या आवारात काढून , मग समोरचा रस्ता पार करून पलीकडे बागेत धूम ठोकायची . रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी थोडी गर्दी असे बागेत , एरवी बऱ्यापैकी शांतता . खरं तर आजच्या सारखी खूप साधनं नव्हती , तेव्हा आमच्या या गांधी बागेत . पण एक खास गोष्ट होती , किंबहुना अजूनही आहे . एकदम वेगळी , आवडणारी आणि थोडी भीती सुद्धा वाटणारी . ती म्हणजे एक घसरगुंडी . तर ही घसरगुंडी म्हणजे नेहमीसारखी एक शिडी आणि समोर घसरगुंडी असा प्रकार नाही , अर्थातच . ही घसरगुंडी बांधीव आहे , राक्षसाच्या तोंडाच्या आकाराची . म्हणजे एक दंडगोल , वरच्या बाजूला डोक्यावर असते तशी टोपी , दोन बाजूला दोन कान , समोरच्या बाजूने डोळे , नाक , तोंड आणि या तोंडातून निघणाऱ्या दोन जीभ , खूप लांब लचक अगदी जमिनीला टेकलेल्या . या दोन जीभ म्हणजे दोन घसरगुंड्या आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूने आत जायला दार आहे . आतून संपूर्ण पोकळ , फक्त त्यात डाव्या आणि उजव्या बाजूने पायऱ्या , वर चढून जायला . या पायऱ्या वर चढून गेले की चढणारा सरळ राक्षसाच्या तोंडात पोहोचतो . तेथूनच या दोन जीभरुपी घसरगुंड्यांची सुरुवात होते . मग तिथे बसायचे किंवा उभे राहायचे आणि घसरत घसरत किंवा धावत खाली जायचे , धम्माल !
अगदी लहान होते , तेव्हा मला भीती वाटे , गोष्टीतल्या राक्षसासारखा हा राक्षस आपल्याला खाऊन तर घेणार नाही ना ? नंतर हळूहळू भीती कमी झाली . मला , घसरगुंडी खेळायची तर असे , पण वेगाने खाली घसरत आले की खाली येतांना माझ्या पोटात 'कसेतरी' होत असे , त्यामुळे नको सुद्धा वाटे . मग मी स्वतः वेगावर नियंत्रण मिळवत हळूहळू खाली येत असे . घसरत असतांना दोन्ही बाजूला असलेला कठडा हातांनी धरायचा , तसेच मध्ये मध्ये पाय सुद्धा या कठड्यावर रोवत गेले की वेगावर पूर्ण नियंत्रण मिळवता येते . ही झाली माझी पद्धत घसरगुंडी खेळण्याची . बाकी वेगाने घसरायला आवडणाऱ्यांचा काही प्रश्नच नसतो .
अजून एक मोठ्ठी अडचण असे , ही घसरगुंडी खेळायला . ही बाग सार्वजनिक , त्यामुळे सगळ्यांसाठी खुली , विना प्रवेशमूल्य . व्यवस्थित वापरणारे लोक तर होतेच , पण काही गैरवापर करणारे सुद्धा होतेच . ही घसरगुंडी बांधीव होती आणि आत मोठ्ठी पोकळी असल्याचा काही लोक फायदा घेत आणि आत जाऊन घाण करून ठेवतं . त्यामुळे तिथे प्रचंड घाण आणि दुर्गंध असे , की त्याच्या आसपास जाणे सुद्धा शक्य होत नसे , त्यामुळे तिथे जाऊन खेळणे तर लांबची गोष्ट .
याव्यतिरिक्त या बागेत एक लोखंडी घसरगुंडी होती , नेहमीसारखी . काहीवेळा सतत उन्हापावसात राहील्याने , तिचा पत्रा गंजत असे , झिजत असे . मग तो खेळतांना लागण्याची शक्यता असे . मग खूप काळजीपूर्वक खेळावे लागे अशावेळी . एकतर खालच्या टोकापर्यंत पोहोचण्या आधीच वेगावर नियंत्रण मिळवून , वेग अगदी शून्य करून टाकायचा आणि तिथून सरळ खाली उडी मारायची . नाहीतर हळूच काळजीपूर्वक खाली उतरायचे . हल्ली सगळीकडे साधारणपणे प्लॅस्टीच्याच असतात , छान झळाळत्या रंगाच्या , त्यामुळे अशी लागण्याची वगैरे शक्यता नसते . दिसायलाही छान , एव्हढेच नाही तर त्यांच्या रचनाही खूप वेगवेगळ्या , मनोरंजक आणि चित्तवेधक असतात . मला तर त्या इतक्या आवडतात की , लगेचच जाऊन खेळावेसे वाटते त्यावर . पण त्यावर वयाची अट तर लिहिलेली असतेच , पण आताच्या आकारमानाचा पण मोठ्ठा प्रश्न असतोच . ;-) ;-)
बाकी नेहमीप्रमाणे सगळ्या बागेत जसे असतात तसे झोपाळेही होते आमच्या या बागेत . माझ्या आठवणीप्रमाणे दोन ठिकाणी होते . अर्थातच लोखंडी . दोन टोकांना दोन इंग्रजी अक्षर व्ही च्या उलट्या आकाराचे खांब , त्यावर एक आडवा खांब आणि या खांबाला प्रत्येकी तीन झोपाळे टांगलेले . हे झोपाळे म्हणजे लोखंडी साखळीने टांगलेले असत आणि त्याच्या खालच्या बाजूला लोखंडी चौकटीवर लाकडी फळ्या बसवलेल्या असतं . झोपाळा खेळतांना माझी परत तीच परिस्थिती , माझ्या पोटात 'कसेतरी' होत असे . हल्ली मात्र काही वर्षांपासून मला छान जमते झोपाळा खेळायला . :-) :-)
याबरोबरच हल्लीही सगळीकडे असणारी लोखंडी पाईप वापरून केलेली रचना होती . फारच छान असतो हा प्रकार , गोल किंवा चौकोनी आकाराचा . कुठूनही आत घुसता येते , कुठूनही बाहेर पडत येते किंवा आतल्या पोकळीत जायचे , वर चढायचे , खाली उतरायचे नाही तर मध्यभागी असलेल्या पाईप ला लटकून झोके घ्यायचे . एक ना अनेक कितीतरी प्रकारे खेळता येते यावर . पण याला काय म्हणतात हे आजही माहिती नाही मला . कुठेतरी जंगल जिम ऐकल्याचे आठवते आहे . नक्कीचे माहिती नाही . मराठीत तर याचे नाव आजतागायत कुठेही ऐकले नाहीये . तुम्हा कुणाला माहिती असेल तर सांगा कृपया .
गांधी बाग म्हटल्यावर , गांधीजींचा पुतळा ओघाने आलाच . एका बांधीव चौथऱ्यावर , नेहमी प्रमाणे त्यांच्या हातात काठी असलेला , वेगाने चालतांनाचा एक पुतळा होता , अजूनही आहे . पण त्याची रचना बदललेली आहे . या पुतळ्यासमोर सरळ रेषेत पाण्याची कारंजी होती , एका लांबलचक आयतामध्ये . या आयताच्या दोन्ही लांबीच्या बाजूला ओळीने रंगीत विद्युत दिवे लावलेले होते . पण हे स्थिर होते म्हणजे चालू बंद होणारे नव्हते . या कारंज्यांच्या दोन्ही लांबीच्या बाजूंनी चालण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फारशा लावलेले फलाट होते . खूपच भारी वाटे , या फलाटावर चालतांना , कारंजी चालू असली की . आयुष्यात सगळ्यात पहिल्याने पाहिलेला एकमेव कारंजा ! त्यामुळे फारच अप्रूप वाटे आम्हाला त्याचे . तिथे गेलो की कधी एकदा चालू होतेय याची अगदी आतुरतेने वाट बघत असू आम्ही .
बाग म्हणजे विविध फुलझाडं आलीच , छोटी मोठी सगळीच . पण सगळी देशी असावी . आत्ता मात्र सगळी फुलझाडं आठवत नाहीये . तसेही तेव्हा फारच लहान असल्याने फुलझाडे कुठली , त्यांची नावे , शास्त्रीय नावे वगैरे तपशील माहिती असण्याचे काही कारणच नाही . पण दोन प्रकारची मात्र ठळक आठवणीत आहेत . एक प्रकार म्हणजे नारळाची झाडं . ही झाडं गांधीजींचा पुतळा आणि कारंजी याच्या दोन्ही बाजूंना होती . आणि हे सगळे दृश्य मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच दिसे . एक अतिशय रमणीय सुंदर फ्रेमच जणू ! दुसरी म्हणजे विद्येची झाडं . हे आम्ही ठेवलेलं नाव , या झाडाचं . त्याचे शास्त्रीय नाव थुजा . दोन कारणांनी आवडे हे झाड मला . एक म्हणजे ते वाढूऊन , त्याला हवा तो आकार देता येतो . हा आकार आणि त्याचा गर्द हिरवा रंग यामुळे फारच सुंदर दिसते हे झाड ! दुसरे कारण म्हणजे ह्या झाडाची पाने जर पुस्तकांत ठेवली की विद्या येते , अशी आमची भाबडी समजूत होती . त्यामुळे ही पाने मिळवायला आमची ही धडपड चाले . पण झाडाची पानं तोडायची हिम्मत नसे , कारण समोरच गेटवर ते काका बसलेले असत , ते बघतील याची भीती वाटे . कधी कधी या झाडांची नुकतीच कापणी झालेली असली की मात्र मोठ्ठ घबाड मिळाल्याचा आनंद होई !
बागेचे वेगवेगळे भाग पाडलेले होते , जसे चालायला वाटा , काही भागात वाळू , काही भागात गवत , काही भागात मूळची काळी माती तशीच ठेवलेली . सगळे अगदी साधे म्हणजे वाळू म्हणजे नेहमीची बांधकामावरील वाळू , गवतही जवळजवळ आपोआप वाढते तेच , फक्त खूप वाढले की ते कापले जात असे . पण तरी खूपच छान वाटे त्या गवतावरून चालायला , बसायला , क्वचित लोळायलाही ! शेवटी काय रम्य ते बालपण ....
सगळ्यात शेवटी , पण फार महत्वाचे आणि खरं तर सगळ्यात पहिले म्हणजे बागेचे मुख्य प्रवेशद्वार ! माझे खूप लाडके , अगदी लहानपणापासून . बांधीव होते , बऱ्यापैकी उंच . समजायला लागल्यावर खास करून इयत्ता आठवीत असतांना , कलेचा इतिहास शिकतांना सांची स्तूप आणि त्याचे तोरण शिकले तेव्हा लक्षात आले , हे म्हणजे अगदी त्या तोरणासारखेच होते . कुणी त्याची रचना केली , कुणी बांधले वगैरे माहिती नाही त्यामुळे त्याची रचना तशी करण्यामागचा हेतू सुद्धा माहिती नाही . पण त्यावरील अभ्यास आणि माहिती संकलित करणे चालू आहेच . मला जर याची सविस्तर माहिती कळली तर नक्की सांगीनच , अशाच एका छानशा लेखात !
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं ...)
८ जून २०२१
मूळचे मुख्यप्रवेशद्वार !
ह्या प्रवेशद्वाराची रचना
आदरणीय नामदेव खुशाल बोंडे (एन के बोंडे)
यांनी केलेली आहे. त्यांनी आपली स्थापत्य अभियांत्रिकी
शाखेची पदवी (B E civil) पुण्याच्या अभियांत्रिकी(COEP)
महाविद्यालयातून १९२४ मध्ये पूर्ण केली.
तोरण , सांची स्तूप , मध्य प्रदेश
(इ स पूर्व तिसरे शतक )
हल्लीचे आधुनिक प्रवेशद्वार
हल्लीचे आधुनिक प्रवेशद्वार
हाच तो राक्षस
राक्षसाची मागची बाजू
गांधीजींचा पुतळा आणि कारंजी
पण आता या पुतळ्याची बैठकीची रचना
बदलली आहे , पुतळा मात्र तोच आहे .
गांधीजींचा पुतळा
आधुनिक प्लॅस्टिकची घसरगुंडी
आधुनिक लोखंडी घसरगुंडी
चिमुकले राम मंदीर
मुख्य गाभारा
राम , सीता , लक्ष्मण
मंदिराचे आवर आणि सभा मंडप
Khup msta !! Lahan pan chya Aathvani jagya zalyat..👌🤗
ReplyDeleteखूप धन्यवाद ! 🙏
Deleteखुप छान कथा.. लहानपणीचे जगच न्यारे.अगदी बारकावे, सुंदरतेने गुंफलेले आहेत...
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏😀
DeleteKhoop chhan Gandhi bagechi aathawan tazzi zali
ReplyDelete😀🤩वावा किती छान ! धन्यवाद !🙏
Deleteकाय मजा होती वेगळी
ReplyDelete५ पैशाची शेंगा दाणे पुडी,भेळ������
बाग तेव्हा गावाबाहेर वाटायची आणि नवीन बसस्थानक झाले होते
एकच ठिकाण होते तेव्हा
पाच पैशाची होती तरही फारच क्वचितच मिळे आम्हाला.
Deleteखरय तेव्हा अगदी गावाबाहेर वाटे, गांधी बाग!!
Wa khoopach chan varnan 👌
ReplyDeletelahanpanicha aathwani jaga zhala
Barik sarik goshti tu mandalamule parat ekada Ghandhi baget fhirun aale
Ani ti rakshaschi gasargundi photo 👌mi pan aadhi aadhi khoop ghabaraiche tya madhe jaila
Ani tethil karanje 👌
Khare ter tya kali tyapeksha sunder thikan navhate baghitalele
आपल्या पिढीतील सगळ्यांच्या आठवणी अणि अनुभव सारखेच असावेत बहुतेक....
Deleteखास करुन राक्षसाच्या बाबतीत... 😍 😜
हा लेख एकदम spiritual आनंद देतोय..गांधी बाग ,Stupa-Gate,रम्य ते बालपण.थुजाही .खरोखरच लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.😘..गवतावरही आम्हीही खुप लोळलोय..😍..अशा वर्षाऋतूतही गारवा देतोय...राक्षसाची घसरगुंडी मस्तच..its too unique garden I feel..where spiritual spaces+ playful spaces came together.
ReplyDeleteTrue...
DeleteA very innocent spirituality!!
अगदी छान, पवित्र, निर्मळ वातावरण अणि जागा!
U said it rightly!!!
निर्मळ अणि पवित्र धन्यवाद 🙏 ☺ 😇
Mazi aawadati bag khup chan watale g wachun sagalya junya aathavani tajya zalya... Thanks a lot barkawe agadi subak mandalet nehami pramane
ReplyDeleteखूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deleteखुप छान कथा लहाणपणीचे दिवस आठवले.👌
ReplyDeleteधन्यवाद !🙏🤩
DeleteMany of the places mentioned are unique and i had never been there...nice collection of information
ReplyDeleteThnks a tons!!!
DeleteKhup mast varnan keley tai ...lahanpanichya athvani tazzi zalya👌👌👌
ReplyDeleteबालपणीचा काळ सुखाचा , हेच खरे ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏😀
Deleteखुपच सुंदर वर्णनं केलेले आहे. तुला एवढ्य सगळ्या आठवणी आठवतातम्हणजे खुप झाले खरे तर तेव्हा तू खुप लहान होतीस. सौ.मंदा चौधरी
ReplyDeleteबघ ना, ईतक्या लहान वयात अनुभवलेले सुद्धा सगळे स्पष्ट आठवते मला! God gift!!
DeleteA blessed soul 😇 😇
Kay chan v sunder mahiti agdi barik sarik pan tu chan lihile aahes.
ReplyDeleteRam mandir, bagh sarvch khup mast gandhi putla
Photos pan chan
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteगांधी उद्यानाची माहिती छान आहे. पण बऱ्याच गोष्टी इतिहास जमा आहेत. ही माहिती नव्या पिढीला उपयुक्त आहे.
ReplyDeleteखरय, पुढे कधी तरी कुणालातरी यावर अभ्यास करायचा झाल्यास, त्याबद्दल पूर्ण अणि समाधानकारक माहिती मिळावी, हीच माझी ईच्छा!
Deleteकारण आता मी बर्याच गोष्टी अभ्यासत असते, pan पुरेशी समाधानकारक माहीती मिळवायला खूपच धडपड करावी लागते, तरीही काही वेळा काही हाती लागत नाही.
पुढे असे कुणाचे होऊ नये म्हणुन.....
वर्षा प्रथम तुझे खुप खुप धन्यवाद कारण
ReplyDeleteतु माझे आजोबा श्री एन.के.बोंडे ( 1924 साली सिविल इंजिनिअर )यांचा उल्लेख केलाय
त्यामुळे खुप आनंद वाटत आहे.
लेख वाचून खूप छान वाटतंय कारण सर्व बालपण आठविले.खुप छान होता तो काळ
वर्षा प्रथम तुझे खुप खुप धन्यवाद कारण
ReplyDeleteतु माझे आजोबा श्री एन.के.बोंडे ( 1924 साली सिविल इंजिनिअर )यांचा उल्लेख केलाय
त्यामुळे खुप आनंद वाटत आहे.
लेख वाचून खूप छान वाटतंय कारण सर्व बालपण आठविले.खुप छान होता तो काळ