Skip to main content

जनपद लोक (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 जनपद लोक 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


                              बंगळुरू-म्हैसूर महामार्ग! कायमच वाहतुकीची कोंडी! किंबहुना वाहतुकीच्या कोंडी साठीच प्रसिद्ध! एक तर रहदारी खूप . त्यातच आधी रस्त्यांची कामं, मग उड्डाण पुलांची कामं नंतर मेट्रोच्या पुलाची कामं. अशी एक ना अनेक कारणं त्यात सतत भर घालतच असतात , वाहतुकीची कोंडी होण्यासाठी! अर्थातच आम्ही सुद्धा बऱ्याचवेळा वाहतूक कोंडीचा भाग असतोच. आणि या वाहतूक कोंडी मधील बरेचसे हौशी पर्यटक न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, संध्याकाळचा चहा-खाणं या सगळ्यासाठी या महामार्गावरील एका कामात उपहार गृहात थांबतात, अगदी आम्ही सुद्धा! तिथे गेले की आधी गाडी लावायला जागा मिळायची मारामार. ती मिळालीच तर बसायला टेबल खुर्ची मिळायची मारामार! पण तरी बहुतेक सगळ्यांना तिथेच आवडते. तिथले अन्नपदार्थ तर छान असतातच आणि तिथले एकंदरीत वातावरण सुद्धा खूप छान असते! असो. 
                              आम्ही नेहमीच तिथे सकाळच्या न्याहारीला थांबतो. छान नैसर्गिक वातावरण आणि त्यात माणसांचा गलबला. पण एक दोनदा आम्हाला तिथे, सुरवातीला अगदी हळूहळू आणि नंतर अगदी जोरजोरात, कानठळ्या बसवणारे ढोल वाजविण्याचे आवाज ऐकू येत होते. एक दोनदा असे झाल्यावर, वाटले नको इकडे यायला. दुसरी शांत आणि छान जागा शोधायला हवी. पण मग वाटले बघावे तरी नक्की काय आहे हे. मग आवाजाच्या दिशेने गेलो. या उपहार गृहाच्या कुंपणालाच एक छोटेसे फाटक होते. मग त्यातून पलीकडे गेलो तर, समोरच काही मंडळी लोक नृत्य आणि संगीताचा सराव करीत होते. तिथले वातावरण तर फारच सुंदर होते. ते सगळे पाहून मनातील वैताग कुठल्याकुठे निघून गेला आणि त्याच्या जागी एक छान प्रसन्नता आली! मग हळूहळू कानोसा घेत बघू लागलो आणि डावीकडे वळून तिकडे चालू लागलो. तर तिकडे एक छोटेसे ग्रीक शैलीतील खुले थिएटर दिसले. समोरच काही पायऱ्या दिसल्या वर चढून जायला. मग वाटले बघू तरी काय आहे नक्की तिकडे. 
                               पायऱ्या चढून वर गेल्यावर पाहिले तर समोर जे दृष्य दिसले ते इतके सुंदर, शांत आणि प्रसन्न होते की आम्ही त्या जागेच्या प्रेमातच पडलो! समोर एक छोटेसे शांत तळं, तळ्यात एका बाजूला छोट्या छोट्या २-३ बोटी होत्या जलविहारासाठी. तळे सगळ्या बाजूंनी छान विविध प्रकारच्या हिरव्यागार झाडांनी वेढलेले! हिरव्या रंगाच्या अगदी अगणित छटा! आणि या सगळ्याचे आकाशाच्या निळ्या रंगाच्या साथीने तळ्यात पडलेले प्रतिबिंब!  सगळे वातावरण एकदम मोहून टाकणारे, प्रेमात पडणारे! आम्ही गेलो तेव्हा मात्र तळ्यात पाणी कमी असल्याने जलविहार बंद होता. मग आम्ही चालतच तळ्याभोवती एक चक्कर मारली. पाहीले तर तिथेच एक वाचनालयाची इमारत दिसली. बाजूलाच मोठ्ठा हॉल. नेेहमीसारखा सिमेंट कॉंक्रिटचा नाही. आकाराने गोल. या गोलाच्या परिघावर सारख्या अंतरावर लाकडी खांब आणि वर्तुळाच्या केंद्र बिंदूशी एक लाकडी खांब. या खांबांवर एक मोठे शंकूच्या आकाराचे उतरते छत! गवताने आणि झावळ्यांनी शाकारलेली! भिंती नाहीतच, फक्त संपूर्ण परिघावर एक सलग कट्ट्यासारखी भिंत, ज्यावर तुम्ही बसू शकता. हा कट्टा किंवा भिंत आणि संपूर्ण जमीन मातीची आणि सारवलेली! मस्त छान शांत आणि थंड वाटतं होते तिथे. अगदी वाटले हे वाचनालय आता उघडे हवे होते. म्हणजे तिथून पुस्तक आणि इथे बसून वाचता आले असते. वाचनासाठी अगदी योग्य ठिकाण आणि वातावरण! 
                              तिथे थोडावेळ घालवून, खाली उतरून आलो. नीट बघितल्यावर लक्षात आले, त्या आवारात बऱ्याचश्या आणि वेगवेगळ्या आकाराची रचना असलेली बांधकामं आहेत. मग पाय आपोआपच तिकडे वळले. वाटतेच एक भव्य लाकडी अर्धवट जळालेला रथ दिसला, पण नक्की कळेना काय ते, असा अर्धवट जळका रथ इथे कसा? इतका सुंदर आणि भव्य आणि तो जळाला कसा? वगैरे प्रश्न मनात आले. आणि आजूबाजूला अनेक नाविन्यपूर्ण दगडाच्या वस्तू सुद्धा दिसल्या . मग त्या झोपडीवजा रचनांकडे गेलो. तिकडे गेलो तर काय काय खजिनाच बघायला मिळाला! उसाचा रस काढण्याचे भले मोठे लाकडी यंत्र, गुऱ्हाळ, लोहाराचा भाता, सोनाराची काम करण्याची अवजारं, शेतीची, मासेमारीची पारंपरिक अवजारं आणि असेच बरेच काय काय. एका ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची आणि मापाची मातीची भांडी, कुंड्या, फुलदाण्या वगैरे वगैरे. थोडे बाजूलाच पाहिले तर एक काका चाकावर ही मातीची भांडी प्रत्यक्ष बनवत होते! माझ्यासाठी मातीची भांडी बनवतांना पाहणे म्हणजे आनंदाची पर्वणीच ! कितीही वेळा बघितले तर मन भरतच नाही माझे. तिथे तर प्रत्यक्ष तुम्हाला बनवून बघायची संधी सुद्धा मिळत होती . ते मात्र मी काही करून बघितले नाही. अशा सगळ्या विविध प्रकारच्या आणि रंगाच्या आनंदाने मन अगदी तुडुंब भरून ओसंडत होते आणि तशाच त्या आनंदाने चिंब भिजलेल्या मनानी  आम्ही घरी परतलो सोबत काही मातीची भांडी आणि कुंड्या घेऊन... 
                          पण हा रस्ता नेहमीचाच, त्यामुळे तिथे वारंवार जाणे होतेच. आणि या नंतरच्या भेटीत बऱ्याच गोष्टी कळल्या, बरीच माहिती मिळाली याबद्दल . तीही सांगते जमेल तशी आणि जमेल तितकी. "वेड घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही" या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो इथे. लोक साहित्यक, श्री एच एल नागे गौडा यांनी १२ मार्च १९४४ ला या प्रकल्पाची छोटीशी सुरुवात केली होती. अर्थातच त्यांना बऱ्याच अडचनींना सामोरे जावे लागले होते. त्यांचा मुख्य उद्देश होता कर्नाटकातील लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार. कर्नाटकातील सर्व लोककला एकाच ठिकाणी बघायला मिळाव्या आणि या सगळ्या लोककलाकारांना त्यांची कला जगासमोर सादर करण्याची संधी मिळावी आणि ती कायम जिवंत राहावी. 
                            हा प्रकल्प जवळजवळ १५ एकर परिसरात पसरलेला आहे. मुख्य प्रवेशद्वार अगदी उपाहारगृहच्या प्रवेशद्वाराला लागूनच आहे. आधी वाटले होते ह्या सुप्रसिद्ध उपहारगृहामुळे कुणीतरी त्याच्या बाजूला हे केंद्र उभे केले आहे, पटकन प्रसिद्धी मिळावी म्हणून. पण खरी परिस्थिती अगदी उलटच आहे. या प्रकल्पाच्या जागेतच या उपाहारगृहाला जागा दिलेली आहे आणि या उपहारगृहात सगळे पारंपरिक पदार्थ, पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात. इतकेच नाही तर तिथले सगळे सेवक अगदी पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून सेवा देतात. म्हणजेच पारंपरिक खाद्य संस्कृतीची आणि पोशाख संस्कृतीची ओळख, प्रचार आणि संवर्धन होते!
                            तर मुख्य प्रवेशद्वार. अतिशय भव्य . जवळ जवळ वीस फूट. आणि हे प्रवेशद्वार शिंग, रणशिंग, हरिज, सूर्याची मंडल स्वरूपात प्रतिमा वगैरे सारख्या पारंपरिक गोष्टींनी सजविलेले आहे. आणि अगदी झळाळत्या रंगात! तिथेच प्रवेशमूल्य देऊन प्रवेश परवाना मिळतो. हे शुल्क अगदी नाममात्र आहे. मुख्य संग्रहालय वगळता बाकी सगळीकडे तुम्ही छायाचित्र घेऊ शकता. फक्त मुख्य संग्रहालयात छायाचित्र घ्यायचे असतील तर त्याचा परवानाही थोडे अधिक शुल्क देऊन इथंच मिळतो. हा प्रकल्प म्हणजे एक सांस्कृतिक आणि संशोधन केंद्र आहे . इथे आपापपली कला सादर करणारे कलाकार इथेच राहतात. त्यांची निवासी सोय आहे इथे केलेली. एव्हढेच नाही तर इथे विविध प्रकारच्या जनपद संशोधन कार्यशाळा, विकास शिबीर, चर्चा सत्र अगदी नियमित होता. या सगळ्यासाठी सुद्धा इथे निवासी सोय आहे. सुसज्ज स्वयंपाकघर सुद्धा आहे. एक मोठ्ठे अतिशय सुसज्ज असे ग्रंथालय सुद्धा आहे. तसेच यांचे स्वतःचे असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत आणि हे सगळे बंगळुरू विद्यापीठाशी सलग्न आहेत. 
                          याव्यतिरिक्त इथे यांचे काही वार्षिक उत्सव सुद्धा आहेत, जे अगदी नियमितपणे साजरे केले जातात. जसे की फेब्रुवारी महिन्यात लोकोत्सव, जुलै मध्ये पतंग महोत्सव, तर ऑक्टोबर महिन्यात दसरा! उत्सवावरून आठवले सुरुवातीला एका लाकडी भव्य रथाचा मी उल्लेख केलेला आहे . त्याबद्दल समजलेली माहिती अशी . हा रथ बंगळुरू येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदीरातील आहे. हे मंदीर चोळ राजवटीत बांधले गेलेले आहे. या मंदीरातील हा रथ. काही कारणाने आग लागून त्याचा काही भाग जळून गेला. त्यामुळे त्याला निवृत्त करण्यात आले. म्हणून मग हा रथ इथे आणला गेला. काही भाग जळालेला असला तरी त्याची भव्यता आणि त्यावरील कोरीव काम आपल्याला त्याच्या मूळ सौंदर्याची जाणीव करून देते. 
                         अजून एक गंमत म्हणजे हल्ली अधून मधून आणि वरचेवर व्हॉटस अप वर फिरणारे विविध जीवंत शिल्प !ती सगळी शिल्प इथलीच आहेत. या शिल्पांमुळे इथले वातावरण अगदी जीवंत झाले आहे. इतके की बऱ्याचदा दचकायला होते, की पाठीमागे कोण आले एकदम ? पण नीट पहिले की कळते अरे ही तर शिल्प आहेत. इतकी जीवंत आहेत ती! अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचे इथे उल्लेख आलेले नाहीत. जरूर भेट द्या. खूप सारा आगळा वेगळा आनंद मिळेल या भेटीतून. मी तर कितीवेळा तरी भेट दिलीय तरी माझे मन भारत नाही. सारखेच परत परत जावेसे वाटते. आत या क्षणी सुद्धा लगेचच जावेसे वाटते आहे, जे अजिबातच शक्य नाहीये. पण या लिखाणाच्या निमित्ताने मात्र माझी छान आभासी भेट  देता आली ! सध्या तुम्ही सुद्धा माझ्या या लिखाणातूनच आनंद लुटा, या सुंदर ठिकाणाचा! "A BEAUTIFUL VIRTUAL VISIT!"

©आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१९मे२०२१


हेच ते छोटंसं तळं !



सोमेश्वर मंदीरातील रथ



जीवंत शिल्प -पारावर गप्पांचा फड जमलेला 



अजून एक शिल्प-एक प्रकारचे नृत्य करतांना 




इथे तर मी जोरातच दचकले होते 
इतका जीवंत शिल्प कोंबडा 



एका अखंड दगडातून कोरलेला पाण्याचा हौद 
छान कमळ लावलेत त्यात 
याची उंची साधारण अडीच फूट असेल 



एकदा गेलो तेव्हा हे मातीची भांडी तयार 
करणारे काका नव्हते . 
सगळे व्यवस्थित झाकपाक करून ठेवलेले होते 



इथे तर हा लाकडाचा ओंडका सुद्धा एकदम 
खराखुरा वाटतो , पण यात दिसणाऱ्या 
सगळ्याच गोष्टी म्हणजे शिल्पच आहेत !



हाच तो तळ्याकाठचा हॉल 



घराच्या भिंतीवर काढलेली रांगोळी 



घरातील आतील रचना/मांडणी 



भिंतीत मातीची भांडी चीणवलेली 
साठवणुकीचे धान्य ठेवण्यासाठी 



दगडी रगडा आणि इडली/आप्पे पात्र 



हे पण दगडात कोरलेले 😄😆


































Comments

  1. Khupach chhan..pics baghun TR ase watate ki kharach Jivant aahet te...mast...baghyala milale TR nakkich aawdel..chhan varshali .. lockdown madhe aamhala firwun aanatea tyabaddal

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आनंद वाटला , तुझा अभिप्राय वाचून ! सप्रेम धन्यवाद !😍💃🤩

      Delete
  2. खुप छान लिहीले आहे असे वाटले प्रत्यक्ष तिथे जाऊन आपण हे बघतो आहोत👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद!😇

      Delete
  3. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  4. The places shown here are really amazing...i feel like going there to watch it all....the things shown are unique

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच , आहेच ते ठिकाण सुंदर ! नाव नसल्याने कोण ते कळत नाहीये . पण नक्की भेट द्या , आवडेल तुम्हाला सुद्धा ! 

      Delete
  5. Khupach sundar ase watale aattach uthave ani tithe javun firun yave.Apratim

    ReplyDelete
    Replies
    1. वाट कसली बघतेय मग ? निघ पटकन तिथे भेट द्यायला !🤩😆😇

      Delete
  6. खूपच सुंदर शिल्पा आणि प्रवास वर्णन खूप छान झाले असं वाटत होतं की आपण च तुमच्या बरोबर फिरत आहोत ट्रीपला लव डाऊन असल्यावरही बेंगलोर च्या जनपथ मध्ये फिरून आलो 👌👌👏👏🌷

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद!😇

      Delete
  7. Your language of description is so immensely effective that as one goes on reading, he/she feels to be actually visiting those places.
    It is great quality that you possess.
    Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. मामा , असेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असू द्या ! खूप छान वाटते आणि आत्मविश्वास वाढतो , खूप हुरूप येतो पुढच्या कामासाठी ! खूप सारे प्रेम आणि धन्यवाद !🤩😍😇🙏

      Delete
  8. अप्रतिम वर्णन केले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  9. Very nice ...
    Sweet remembrance ..

    ReplyDelete
  10. Khup chan v durmil mahiti dilis khup sunder aahet shilp agadi khare vatatat
    Tuzi mahiti vachun tikade firun aalya sarkhe vatale ��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !😍🤩🙏

      Delete
  11. Zhandancha Hirwa chatta, aakashacha neela rangacha sathine talat padalele pratibib ahaha sunder varnan kharach hey sarv premat padnare
    Tu varnan etake jivat mandales ki ek Chan trip ch zhali. Shilp agadi sajiv vattat pics 👌

    ReplyDelete
    Replies
    1. आहेच ते ठिकाण सुंदर !
      खूप सारे सप्रेम धन्यवाद !😍🤩😇

      Delete
  12. वर्षा, तुझ्या लिखाणाला आता एक छान स्टाईल येऊ लागली आहे. अशीच लिहिती रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद!!! 😇😇

      Delete
  13. Prajkta DongareMay 23, 2021 10:17 pm

    Khup chan Virtual trip zali g tujhyamule��... Mast lihilay, ekada jayala hawe baghayala...

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की जाऊन ये! आवडेल तुलाही!
      सप्रेम धन्यवाद 😍! ❤

      Delete
  14. घर बसल्या पिकनिक झाली धन्यवाद... वर्षा ताई

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  15. कसलं भारीच..अप्रतिम वर्णन Travelougeमधुन केलय..Realstic शिल्पं,Rockcut हौद..aappe patra..भित्ति-कोलम..सारेच natural and cool..walkthrough Red soil..hoping will do sketches soon...
    Thanks for virtual tour taking us there...

    ReplyDelete
    Replies
    1. तितकाच किंवा त्यापेक्षा जास्तच छान तुझा अभिप्राय आहे , किंबहुना नेहमीच असतो ! आभाळभर प्रेम आणि आभार !!🤩😍💃

      Delete
  16. खुप छान वर्णन 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !! 🤩🤩

      Delete
  17. व पु होले सरFebruary 11, 2022 4:39 pm

    नमस्कार ,आपलं जनपद लोक पर्यटन खुपच आनंद देवून गेलं."वेड घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही " हे पटलं.सोमेश्वर मंदिरातील काही भाग जळालेला रथ,त्याचं संवर्धन करणं ही पुढच्या पिढ्यांसाठी अनमोल भेट आहे.वैशिष्ट्यपूर्ण विविध जिवंत शिल्प हा तर कला क्षेत्रातील अद्भूत प्रकार वाटतो.आपल्या ह्या सहलीचा मी खूप आनंद लुटला.धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. सर खूप सारे आनंदी धन्यवाद!! 😇🙏

      Delete
  18. लीला गाजरेFebruary 12, 2022 11:36 am

    खूपच सुंदर वर्णन केलाय .किती बारकाईनं निरीक्षण केलाय !बापरे ! कौतुकास्पद असतो तुझा आनंदी पाऊस

    ReplyDelete
    Replies
    1. काकु खूप खूप मनःपूर्वक सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😇😇😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...