Skip to main content

फरकांडे - झुलते मनोरे (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

 फरकांडे - झुलते मनोरे 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


   जळगाव जिल्हातील एक पर्यटन स्थळ.                                                                                                                                                                                                                                                                      
    एरंडोल पासुन १६ कि मी, कासोद्यापासुन ८ कि मी 
   उतावळी नदीच्या काठी. इथुन थोडं पुढे अंजनी आणि उतावळी नदीचा संगम आहे. 
  उतावळी नदीच्या काठावर एक तीन घुमटांची मशीद आहे. या मशिदी समोर हे दोन मनोरे आहेत. 
आता मात्र यातील एक मनोरा ढासळला आहे. या मनोऱ्यात वरपर्यंत चढून जात येते. पण पायऱ्या खूपच अरुंद आणि उंच आहे. एका वेळी एकच माणूस कुठेही न वळता फक्त सरळ वर चढत जाता येईल इतकीच रुंदी आहे त्यातील सर्पाकार (spiral) जिन्याची. खालून आत जाण्यासाठी एक छोटा दरवाजा आणि त्यानंतर एकदम वर चढल्यावरच छोटे झरोके आहे. बाकी मधल्या भाग पूर्णपणे बंदीस्त आहे. 
ते सगळे बघून मी फक्त ढासळलेल्या मनोऱ्यावर चढून आले. दुसऱ्या मनोऱ्यावर चढायची मात्र माझी काही हिम्मत झाली नाही. वाटले घुसमटले आता तर... पण आता वाटते आहे चढायला हवे होते. फार उंच नसल्याने काही अडचण आली नसती. तुम्ही जाल तेव्हा मात्र नक्की चढून बघा त्या मनोऱ्यावर वर पर्यंत. 
  या प्रत्येक मनोऱ्याची उंची १५ मी आहे. या दोन्ही मनोऱ्याच्या मध्ये एक १५ मी लांबीची महीरपीची भिंत आहे. 
  एक मनोरा हलविल्यास दुसराही हलतो. पुर्वी या दोन मनोऱ्यामधील भिंत सुद्धा हलत होती असे म्हणतात. 
  वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. 
 २५० वर्षापुर्वी चांद मोमीन ने ही मशीद बांधली. मशिदीचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे. आणि इमारतीची चकाकी अजुनही आहे. पण इतक्या सुंदर भिंतीवर अतिशय वाईट पद्धतीने चितारून ठेवले आहेत. किती वाईट आणि दुःखाची गोष्ट आहे. इथेच नाही तर बऱ्याच ठिकाणी हे असले प्रकार आढळतात. 
 काहींचे म्हणणे आहे ४०० वर्षापुर्वी फारुकी राजवटीत बांधली गेली. फारुकी नावावरून फरकांडे नाव पडले असावे. 
 येथे हत्तींचा बाजार प्रसिद्ध होता. मशिदीच्या वास्तुत प्रवेश केला की डाव्या बाजुला एक बांधीव हौद आहे. 
                             
दोन तीन हत्ती क्रीडा करू शकतील इतका मोठ्ठा आहे हा हौद. मशिदीच्या मागच्या बाजुला चिंचेच्या झाडाखाली एक विहीर आहे. 
 या विहिरीतुन हौदात पाणी आणण्यासाठी एक विटांची बांधीव नाली आहे. पण आता ही नाली मध्यभागी तुटलेली आहे. 
 त्यामुळे हौद आता कायमच कोरडा असतो. 

  मशिदीबाहेर उजव्या बाजुला एक पागशाळा आहे. 
 यातील फक्त एक तबेला शाबूत आहे. बाकी सर्व पागशाळा ढासळलेली आहे.
 मशिदीसमोर पायविहिरीचे अवशेष आहेत. या विहिरीतील भुयार खुप लांबवर जाते. कुठे जाते याचा अंदाज लागत नाही. 
तसेच या गावाभोवती चारही बाजुंनी भग्नावस्थेत तटबंदी आहे. या तटबंदीतील चारही दरवाज्याचे अवशेष दिसतात. 
उत्तरेकडील दरवाजा शाबूत आहे. याचा लाकडी दरवाजा हल्लीच काढला आहे. 
या दरवाज्याजवळच तटबंदी मध्ये एक सुस्थितीतील उंच बुरुज आहे. 
या गावात अजून एक मशीद आणि चार देवळे आणि पाच लहान मोठी मारुतीची देवळे आहेत.                         

©आनंदी पाऊस 
(गोष्टी पर्यटनाच्या...)
नोव्हेंबर २०२०




बाहेरून दिसणारे दृश्य 



मुख्य प्रवेशद्वारातून बघितल्यावर 



हाच तो पाण्याचा हौद 



मनोऱ्यावर चढण्यासाठी प्रवेश 



मुख्य भागावरील तीन घुमट 




शाबूत असलेला एक मनोरा 



आतल्या बाजूने प्रवेश द्वाराच्या 
दिशेने बघितल्यावर असे दृश्य दिसते 




हीच ती बाहेरच्या बाजूला असलेली पायऱ्यांची विहीर 
अतिशय वाईट अवस्थेत आहे 













Comments

  1. मला शाळेत आपला जळगाव जिल्हा असे भूगोलाचे पुस्तक होते 3री किंवा 4थी त्यात फरकांडे येथील झुलते मनोरे असा उल्लेख होता व परीक्षेत नेहमी या वर प्रश्न असायचा आज अधिक माहिती मिळाली
    तसेच उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे पण अभ्यासात होते सध्या पाण्याची पातळी कमी झाल्याने झरा आटलेला आहे पण छान बांधीव कुंड व मंदिर दुर्लक्षित रुपात आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हो , आपल्या वेळी परीक्षकांचा हा अगदी लाडका प्रश्न होता , मलाही आठवतो आहे , आता तू उल्लेख केल्यावर ! खूप सारे धन्यवाद ही छान आठवण करून दिल्याबद्दल !🤩😊

      Delete
  2. खूप छान माहिती..

    ReplyDelete
  3. छानच झालाय लेख

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!😇
      आपली इथली सहल पण छानच झाली होती , आठवतंय ना सगळं !🤩🤩

      Delete
  4. स्वाती प्रभुणेApril 10, 2021 6:51 am

    जळगांव ला मुक्काम करून जवळपास ची ठिकाणे बघायला हवीत
    उतावळी नदी नाव कधी ऐकले नव्हते

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी नक्की , खूप ठिकाण आहेत आवर्जून भेट द्यावी अशी ! पण खूप प्रसिद्धी न मिळाल्याने , फार लोकांना माहिती नाही त्याबद्दल . माझ्या या उपक्रमाचा उद्देशच तो आहे , थोडी आडवळणाची आणि लोकांना फारशी माहीती नसलेल्या स्थळांची माहीती करून देणे !

      Delete
  5. जनार्दन चौधरीApril 10, 2021 6:52 am

    अप्रतिम सादरीकरण नविन पिढीला कळेल हेच याच महत्व

    ReplyDelete
    Replies
    1. हो , पुढच्या पिढीसाठी सुद्धा ही सगळी माहिती खूप उपयोगी आहे . ज्यांना यात विशेष आवड असेल त्यांना नक्कीच या लिखाणाची मदत होईल ! 🤩😇

      Delete
  6. New generation ? Not interested to read or to know more and more .
    Since we are all born and brought up in village .we are aware of
    शेती .... बैल .गाई. म्हसी चारणे . शेतीतील उत्पन्न .. आपल्या जवळ चा इतिहास .historical places etc etc not interested .. गावातून गेलेला विद्यार्थी व पुणे मुंबई मधून गेलेला विद्यार्थी यात फार फरक आहे
    I have seen and children are facing in lAS examination ..
    Any how l got many more to say .
    Things are changing and keep on changing .. beyond repair

    ReplyDelete
    Replies
    1. very true ! but situation is changing , at least we should be hopeful always .
      सगळ्यांना नाही पण काहींना नक्कीच उत्साह असतो अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ! धन्यवाद !

      Delete
  7. Khupach chan varnan keley tai ....

    ReplyDelete
  8. प्रतिभा अमृतेApril 13, 2021 12:07 pm

    लेख उत्तम. नवीन माहिती मिळाली. मनोरा चढतानाचे वर्णन वाचताना गोलघुमटाची आठवण झाली. तिथे वर चढताना अशीच दमछाक होते. आपल्या जवळपास किती पर्यटन स्थळे असतात. त्यांना भेट देण्याचा तुझा उपक्रम खरच स्तुत्य आहे. फोटो ही छान आलेत. ��

    ReplyDelete
    Replies
    1. unfortunately still i couldnt visit gol ghumat....
      खरंय , जवळपासची सोडून आपण कुठली कुठली लांबवरच्या ठिकाणांना भेटी देत असतो पण आजूबाजूला बघत नाही आणि तेच फार गरजेचे आहे , त्यासाठीच माझा हा एक छोटासा प्रयत्न . 🤩😇

      Delete
  9. Very nice information...very good article

    ReplyDelete
  10. उतावळी नदी नाव पहिल्यांदा ऐकले.Whitish-Greyish Rustiq finished Architectural features सुरेख वर्णिलेले आहे.
    पायऱ्याची विहीर व घुमट मस्तच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ही ठिकाणं फारशी माहीतीची नसल्याने , या छोट्या छोट्या नद्यांची नाव सुद्धा फारशी प्रचलित नसतात . पण खरंच फारच सुंदर स्थापत्य आहे ! मला पण हे घुमट फारच आवडले आहेत !😍😍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...