Skip to main content

पुष्करीणी , हुळीकेरे (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 पुष्करीणी, हुळीकेरे 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

                             तो दिवस खास दिवस होता, म्हणून आम्ही कुठेतरी लांबवर गाडीने चक्कर मारून एखाद्या छानशा स्थळ भेट द्यावी, असे ठरविले. घरून निघतांना मनात ठरविले होते, की श्रावणबेळगोळा येथे जाऊ या. तिथे दोन डोंगर आहेत, मुख्य विंध्यगिरी आणि दुसरा चंद्रगिरी. मुख्य डोंगर छान आहेच, पण मला चंद्रगिरी वर चढून, तिथून विंध्यगिरीचे सौंदर्य न्याहाळायला आवडते. तसेच काहीसे मनात ठरवून निघालो. पण न्याहारी करायला थांबलो तेव्हा अचानक लक्षात आले, बऱ्याच दिवसापासून पुष्करीणी बघायला जायचे होते आणि तिथे एकदाही गेलेलो नव्हतो. त्यामानाने श्रावणबेळगोळा येथे बऱ्याचदा भेट दिलेली होती. मग आमचे ठरले, पुष्करीणीला जायचे आणि  मार्गाला लागलो. 
                                ही पुष्करीणी प्रसिद्ध हाळेबिडूच्या मंदिरापासून फक्त पाच किमी अंतरावर आहे. हसन पासून एकोणतीस किमी अंतरावर आहे, म्हैसुरू पासून एकशे चाळीस किमी आणि नम्मा बंगळुरू पासून २२० किमी. 
                              आता हे पुष्करीणी काय प्रकार आहे?  भारतात बऱ्याच मंदिराच्या आवारात बांधीव पायऱ्या पायऱ्यांचे जलाशय असतात. या जलाशयांना भारताच्या वेगवेगळ्या भागात आणि भाषेत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे कल्याणी, पुष्करीणी, कुंड, तीर्थ, पुखुरी, सरोवर, तलाव इत्यादी नावांनी संबोधले जाते. या जलाशयांमध्ये अंघोळ केल्याने बरेच आजार, विशेषतः त्वचेचे आजार बरे होतात अशी समजूत आहे. पण हे सगळ्या जलायशांच्या बाबतीत खरे नाही. दुसरे म्हणजे यात अंघोळ केल्याने पाप क्षालन होते असेही मानले जाते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण मंदिरात जायच्या आधी हात पाय स्वच्छ धुवून जावे, यासाठी या जलाशयांचे प्रयोजन केलेले असते. आता या करोना च्या काळात तर या सगळ्याचे महत्व सगळ्यांनाच पटले आहे. पण आपली फार पूर्वापार अगदी कित्तेक शतकांपासून चालत आलेली ही संस्कृती आणि संस्कार आहेत. हे जलाशय साधारण जमीनीच्या पातळीच्या खालीच बांधलेले असतात. 
                                ही हुळीकेरे ची पुष्करीणी मात्र बऱ्याच अर्थाने वेगळी आहे, खास आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही कुठल्याही मंदिराच्या आवारात नाही. अगदी लांब लांब पर्यंत कुठलेही मंदिर असल्याचा पुरावा नाही. कारण या पुष्करिणीचा संबंध कुठल्याही मंदिराशी नाहीच मुळी. अगदी जवळ जाईपर्यंत समजत सुद्धा नाही, इथे स्थापत्य कलेचा इतका सुंदर अविष्कार आहे ते! तिथ अगदी कच्चा मातीचा रस्ता आहे. तिथून फक्त जमिनीच्यावर असलेला असलेला बांधीव कठडा तेव्हढा दिसतो. जसजसे जवळ चालत गेले तसतसे हळूहळू तिचे सौंदर्य आपल्या दृष्टीस पडते. 
                                 मी तर म्हणेल भारतातील सगळ्यात सुंदर पुष्करीणी आहे ही! ही प्रसिद्ध होयसळेश्वर मंदिरापासून अगदी पाच किमी अंतरावर पण फारशी प्रसिद्धीच्या झोतात नाही, फारच थोड्या लोकांना या बद्दल माहिती आहे. बाराव्या शतकात बांधली गेलेली आहे. होयसळा स्थापत्याचा एक अतिशय सुंदर नमुना! होयसळा स्थापत्य म्हणजे अगदी वेड लावणारे आहे. मी तर नेहमीच म्हणते "i m very badly n madly in love with hoyasala!" इतकी मी प्रेमात आहे होयसळांच्या की प्रत्येक वेळी मंदिरात गेल्यावर तेथून निघतांना मी, माझ्याही नकळत मी, तिथल्या एखाद्या खांबाला मिठी मारते! असो. 
                                इथे काही मंदिर वगैरे नाही, मग आहे काय ही पुष्करीणी?  होयसळा राजवटीत बाराव्या शतकात बांधली गेली आहे. तर ही पुष्करीणी म्हणजे राणी शांतला देवी हीचे वैयक्तिक अंघोळीसाठीचे तळे आहे. राणी शांतला देवी म्हणजे राजा विष्णूवर्धनची पत्नी. कन्नड भाषेत हुळी म्हणजे वाघ आणि केरे म्हणजे तळे. येथील स्थानिक लोक सांगतात या तळ्यावर सुरक्षा इतकी कडक होती की, वाघ सुद्धा येऊ शकत नसे तिला बघायला, त्यामुळेच याचे नाव हुळीकेरे असे पडले. या तळ्याची जमिनीपासून खोली साधारण पन्नास मीटर आहे. तळापासून साधारण अर्ध्या उंचीपर्यंत चारही बाजूने दगडी पायऱ्या आहेत. यांच्या वर अकरा शिखर असलेले गाभारे आहेत, त्याशिवाय सोळा शिखर नसलेले गाभारे आहेत. बाकी शिखर असलेल्या बाराव्या गाभाऱ्याच्या जागी जमीनीपासून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. एकंदरीत सत्तावीस गाभारे आहे, ते म्हणजे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. ही अकरा शिखरं छान कोरीव कामाने सुशोभित केलेली आहेत. तसेच गाभाऱ्याच्या बाहेरील भिंती सुद्धा छान सुशोभित केलेल्या आहेत. याशिवाय या सगळ्या गाभाऱ्यांचा पाया सुद्धा छान हत्ती, घोडे आणि वेगवेगळी दृश्य कोरून सुशोभित केलेली आहेत. 
                             पावसाळ्यात हे तळे साधारण ७५% पाण्याने भरलेले असते. त्यामुळे त्याचे सगळे सौंदर्य नीट बघायचे असले तर उन्हाळ्यात भेट देणे अगदी योग्य ठरते. पण मी या बाबतीत फार भाग्यवान ठरले, पहिल्यांदा गेले तेव्हा . मी भर पावसाळ्यात गेले होते पण त्यावर्षी अजिबात पाऊस न झाल्याने, मला या पुष्करीणीच्या सगळ्या सौंदर्याचा आनंद पूर्णपणे लुटता आला! अर्थातच पूर्ण पाण्याने भरलेली असेल तेव्हा एक वेगळेच सौंदर्य अनुभवास येते. होयसाळा स्थापत्याचा एक अगदी अप्रतिम आणि अतिशय सुंदर असा हा अविष्कार आहे. हसनच्या बाजूने गेलात तर नक्की भेट द्या आणि त्या सौंदर्याचा छान आस्वाद घ्या!

©आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
१८ एप्रील २०२१







































Comments

  1. Khup chan.photo atishay sundar kadale ahet.vachanatun tithe asanyacha abhas jala.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !🙏😊

      Delete
  2. Khup chhan photo kadhale aahet lihile pan chhan aahe

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद!🙏😊

      Delete
  3. स्वाती प्रभुणेApril 23, 2021 12:56 pm

    हुळीकेरे खूप छान वर्णन मला असे जाणवले तू आर्किटेक्ट च्या दृष्टीने त्याकडे बघीतले असावेस मुळात एखाद्या कलाकारांना त्यातील खोलात जाऊन अभ्यास करूनच तू ते लिहले आहेस असे वाटले .मस्त त्यातील सौंदर्य व इतिहास मस्त वर्णन केले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. काही पर्याय नाही आता , आर्किटेक्ट  दृष्टीनेच दिसते आता सगळे 😆😄! बाकी दृष्टिकोनातून बघताच येत नाही काहीही !

      Delete
  4. एल झेड कोल्हेApril 23, 2021 12:58 pm

    आज लिहिलेले खोल जमीनीत आहे खूपच छान आहे. नक्षत्र मंदिरेही चांगली दिसत आहेत.
    तुझ्या या उपक्रमाला शुभेच्छा... ��

    ReplyDelete
    Replies
    1. हो , खूपच सुंदर आहे सगळे , कलेच्या संबंधित व्यक्तीला तर फारच आवडण्यासारखे आहे ! धन्यवाद !🙏

      Delete
  5. जनार्दन चौधरीApril 23, 2021 2:53 pm

    एरिएल फोटो कसे घेतले पाणि असल्यावर अधिक सुंदर परिसर अनुभवता एईल असे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. सगळे जमिनीच्या खाली असल्याने अगदी जमिनीवर उभे राहून छान आणि सहजच फोटो काढता येतात , . त्यासाठी फारसे वेगळे  करावे लागत नाही .
      tons of love!

      Delete
  6. खुपच छान आहे पुष्करणी आणि र्वणन सुरेखच केलेआहे फोटो पण सुंदर काढ
    लेले आह
    मंदा चौधरी.

    ReplyDelete
  7. Photos ani varnan vachun pratekshat pushkrani la bhet dilacha anubhavale
    Photos 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. वावा ! अशा छान पावत्या मिळाल्या माझ्या लिखाणाला की पुढचे लिहायला अजून खूप उत्साह आणि हुरूप येतो !
      tons of love n wishes!

      Delete
  8. खुप छान लेख. नंदिनी माहिती मिळाली छान असंच लिहीत रहा!

    ReplyDelete
    Replies
    1. येस्स्स्स ! असेच तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या !!

      Delete
  9. रेखा अत्तरदेApril 25, 2021 10:44 pm

    वर्षा ,खूप छान वर्णन केले आहेस !फोटोपण छान!

    ReplyDelete
    Replies
    1. आत्या खूप सारे प्रेम !!😍🥰💖

      Delete
  10. Khup chan sangitalay ani details mast❤️ wacharach rahave watate..�� waiting for next part of your another trips and experience����

    ReplyDelete
    Replies
    1. वावा ! किती छान पावती दिलीस गं माझ्या लिखाणाला ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद प्राजक्ता  आभाळभर प्रेम ! 🤩😇😍

      Delete
  11. हुऴीकेरे छान कुठेतरी नाव ऐकले होते वर्णन पण चांगले केले खुप मस्त वषॊ

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !

      Delete
  12. .भारीच.. होयसाळ architectutre चे सौंदर्यपूर्ण वर्णन व प्रकाशचित्रें अप्रुपच.Especially that corner view...make me also fall in luv with this architectural style.
    Corner view मधील step स् ह्या parallel line draft केल्यासारख्या भासताहेत....

    ReplyDelete
    Replies
    1. yesss ! even i loved that corner view !
      खूप सारे सप्रेम धन्यवाद !

      Delete
  13. फारच सुंदर वर्णन आणी पुष्करणी पण..👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. भारीच आहे पुष्करिणी ! धन्यवाद !

      Delete
  14. Khupch sakol v chan mahiti dili aahes tu varan pan v photos pan sunder
    Pushkrini chi sarv varan vachun chan vatale

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...