भोग नंदीश्वर मंदिर संकुल
(गोष्टी, माझ्या पर्यटनाच्या...)
भोग नंदीश्वर मंदीर संकुल.
बंगळुरू पासून साधारण ६० कि मी अंतरावर आहे.
तर बंगळुरू विमानतळापासून ३२ कि मी अंतरावर आहे.
अगदी नंदी दुर्ग/बेट्टा/हिल्स च्या पायथ्याशी.
नंदी दुर्ग वर गेल्यावर बघितल्यास हे संकुल अगदी नजरेच्या टप्प्यात आहे /दिसते.
कर्नाटक मधील सगळ्यात जुने मंदीर संकुल. नवव्या शतकातील शीव मंदीर.
नोलांबा राजवटीत बांधले गेले गेले.
नंतर गंगा, चोळा, होयसला, विजयनगर राजवटीत भर घातली गेली.
द्रविडीय पद्धतीचे मंदीर आहे.
मुख्य दोन तीर्थस्थान आहेत.
एक अरुणाचलेश्वर, दक्षीणेला. गंगा राजवटीत बांधले गेले.
दुसरे भोग नंदीश्वर, उत्तरेला. चोळा राजवटीत बांधले गेले.
या दोन्ही गर्भगृहाच्या वर खास द्रविडीयन प्रकारचे पिरॅमिड च्या आकाराचे शिखर आहे.
या दोघांच्या मध्ये अजुन एक छोटेसे देवस्थान आहे.
उमा महेश्वर. या सोबत एक कल्याण मंटपा आहे. जो चार खांबांवर उभा आहे.
हे चारही खांब काळ्या दगडात, खूप सुंदर आणि किचकट कोरीव काम असलेले आहेत.
यावर शीव, पार्वती, ब्रह्मा, सरस्वती, विष्णु, लक्ष्मी अग्नी, स्वाहा देवी, वेल, पक्षी कोरलेले आहे.
हे म्हणजे वैशिष्ट्यपुर्ण होयसाला पद्धतीचे .
दोन्ही मोठ्या गर्भगृहात प्रत्येकी मोठ्ठे लिंग असुन त्यांच्या समोर बाहेरच्या बाजुला नंदी आहे, लिंगभिमुख.
तसेच या संकुलात एक कल्याण मंडप आहे. वसंथ मंडप.
याला सुंदर याली खांब आहेत.
या व्यतिरिक्त अजून एक मंडप आहे. पण याचे खांब त्यामानाने फारसे कोरीव नाहीत.
पण फारच उंच आहे इतर मंडपाच्या तुलनेत.
आणि या संकुलातील माझ्या सगळ्यात आवडता भाग, कल्याणी!
या संकुलात एक मोठ्ठी पायऱ्यांची कल्याणी आहे. चारही बाजुंनी बंदिस्त भिंत आहे
ही कल्याणी राजा कृष्णदेवराया यांनी बांधली आहे.
ही कल्याणी म्हणजे नंदी ने शिंगाचा प्रहार करून गंगा नदीचे पाणी काढले.
आणि पिनाकीनी नदीचा उगम असल्याची दंतकथा आहे.
वर्षातुन तीन वेळा, एक लाख दिवे लावले जातात मुख्य सणांच्या वेळी.
या कल्याणीच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात पाय सोडले की अगदी छोटे छोटे खूप मासे आपल्या पायाशी येतात.
हे खरंच त्वचा रोगावर गुणकारी आहेत की नाही याबद्दल मात्र माहिती नाही.
पण एकंदरीत हे सगळे फार मजेशीर वाटते पायाला हळुवार गुदगुल्या होतात!
खूप सुंदर आहे ही कल्याणी. पण त्याचा दुरुपयोग केला जातो.
लोक तिथे लग्नाचे आधीचे आणि नंतरचे शुटींग करायला येतात.
आणि हे सगळे विनामुल्य असल्याने सगळ्यांना सोप्पे आणि सोयीचे जाते.
हे सगळे थांबवावे किंवा त्यांना भरभक्कम शुल्क आकारावे.
त्यामुळे या लोकांची संख्या कमी होईल आणि आलेल्या निघी संकुलाच्या देखभाली साठी वापरता येईल.
असे माझे प्रामाणिक मत आहे.
या कल्याणीला श्रींगी तीर्थ असे म्हटले जाते.
दुसरी एक छोटी कल्याणी आहे याच संकुलात. ती मात्र खुली आहे, त्याला बंदिस्त भिंत वगैरे नाही.
पण सुंदर आणि मोहक आहे.
तसेच या आवारात एक जुना भव्य लाकडी रथ आहे. त्याची बरीचशी पडझड झालीय.
पुर्वी वापरला जात असे पण आता मात्र वापरात नाही.
भरपूर मोठ्ठे आहे हे संकुल आणि खुप सुंदरही.
या व्यतिरिक्त अजून खुप गोष्टी बघायला मिळतात.
हे सगळे संकुल चारही बाजुंनी एक सौरक्षक भिंतीने वेढलेले आहे, याला प्राकार म्हणतात.
(नंदी दुर्ग भोग नंदीश्वर मंदिर संकुल आणि मुद्देनहळ्ळी ही तिन्ही ठिकाण अगदी जवळ जवळ आहे.
एकाच भेटीत तिन्ही ठिकाणी भेट देऊ शकता.
पण निवांत सविस्तर भेट द्यायची असेल तर मात्र दोन दिवस नक्कीच हवेत.)
©आनंदी पाऊस
(गोष्टी, माझ्या पर्यटनाच्या...)
नोव्हेंबर २०२०
द्वार आणि कोरीव द्वारशाखा
लिंगभिमुख नंदी
शिवलिंग
किचकट आणि सुंदर कोरीव काम
कल्याण मंडपाचे खांब
मुख्य मंदिराचे कोरीवकाम केलेले खांब
दगडात कोरलेली छत्री
मकर प्रणाली
याली खांब
संकुलातील एक कल्याण मंडप
कल्याणीचे प्रवेशद्वार आणि प्राकार
कल्याणी - श्रींगी तीर्थ
पाय पाण्यात सोडल्यावर असे मासे येतात पायापाशी
लाकडी रथाचा शिल्लक राहिलेला अवशेष
त्यावरून सुद्धा त्याच्या भव्यतेची कल्पना येते !
संकुलातील दुसरी कल्याणी
आणि मागे थोडे लांब दिसत आहे ते प्राकार
म्हणजे संकुलाची संरक्षक भिंत
कुठलेही देवस्थान असो
झळाळते रंग असतातच !
इथे हे गोड झळाळते रंग !!
कोरिवकाम खूपच सुंदर आहे.
ReplyDeleteचोल.,गंगवंश,होयसाळ.ही घराणी द. भारतात होऊन गेलीत. येथे फारशी. नासधूस दिसत नाही. ��छान लेखन ����
हो ना , आपले मंदिर स्थापत्य फारच सुरेख आहे , पण बरेच ठिकाणी नासधूस झालेली असल्याने आपल्याला ते नीट बघता नयेत नाही , पण इथे मात्र तसे झालेले नाही . त्यामुळे सगळे जसेच्या तसे छान आहे !
Deleteमंदिर खूप छान आहे व माहिती पणछानदिली आहे ������
ReplyDeleteखूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद !!😍😍
DeleteTighehi thikanache varnan ani pics 👌
ReplyDeleteMandirache kam khoopach chan👌
सप्रेम धन्यवाद ! 🤩
Delete९व्या शतकातील भव्य मंदीराचे वर्णन शब्दातुन तसेच Architectural Photography मधुन अप्रतिमच टिपले आहे. panoramic कल्याणी,फिश्-स्पा,दगडी खांबाच्या अगणित भासणाऱ्या प्रतिमा..दगडी कोरीव छत्री..मस्त असा Rustique finish लेख झालाय.
ReplyDeleterustique finish सप्रेम धन्यवाद ! 🤩
ReplyDelete