Skip to main content

देवनाहळ्ळी आणि परीसर (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या)

 देवनाहळ्ळी आणि परीसर 

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)



                                    बंगळुरू पासुन ३५ कि मी  आणि बंगळुरू विमानतळापासुन १५ कि मी 
                                   हा भुईकोट किल्ला आहे. 
                                  हा किल्ला अवथी च्या गौडा यांनी १५०१ मध्ये बांधलेला एक मातीचा किल्ला आहे. 
                                  
                                  अठराव्या शतकात हैदर अली ने हल्ला केला आणि हा किल्ला काबीज केला. 
                                  आणि परत बांधला . नंतर टिपु सुलतानच्या ताब्यात . 
                                  
                                 आता या किल्ल्याचेफक्त दोन बुरुज शिल्लक आहेत आणि तटबंदीचा काही भाग. 
                                 पण हे बुरुज आणि तटबंदी फारच देखणी आणि भक्कम आहे. एक प्रवेशद्वार पण आहे तेही फारच देखणे आहे. 
                                 या तटबंदी पाशी आतल्या बाजूने काही छोटी छोटी पुरातन देवालय आहेत. 
                                 बाकी मात्र नेहमी सारखे आधुनिक शहर वसलेले आहे. 
                                
                                 येथुन अगदी जवळच टिपु सुलतान चे जन्मस्थळ आहे. इथे एक स्मारक आहे. 
                                 हे स्मारक म्हणजे चार खांबांवर एक चौकोनी छत आहे आणि या भोवती एक कमी उंचीची भिंत बांधलेली आहे. 
                                या परिसराला खास बाग म्हणुन ओळखले जाते. 
                                 इथे एक सुकून गेलेले दगडी तळे आहे. तसेच केळी, चिंच आणि आंब्याची झाड आहेत. 
                                   आणि दगडी पाटी लावलेली आहे. 
                                 त्यावर टिपु सुलतानाचे जन्मस्थळ असे कन्नड, देवनागरी आणि इंग्रजी लिपीत लिहिलेले आहे. 

                                  या परिसरात बरीच मंदीर आहेत. त्यापैकी वेणुगोपाल हे सगळ्यात जुने मंदीर आहे. 
                                 एक गरुड स्तंभ आहे. द्राविडीयन पद्धतीचे मंदीर आहे. 
                                 मंदीर थोडे लहान असले तरी तेथे प्राकार, नवरंग, मुखमंडप, आणि गर्भगृह आहे. 
                                प्राकारावर छान अगदी किचकट कोरीवकाम आहे. मुखमंटपाचे खांब सुद्धा छान कोरीव आहे. 
                               बाहेरील प्रकारावर रामायणातील दृश्ये आणि बालकांडम कोरलेली आहेत. 
                                दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे उत्सव असतो. 
                                 
                                तटबंदी च्या अगदी जवळच एक छोटीशी कल्याणी सुद्धा आहे. ह्या मूळ कल्याणीची पूर्ण पडझड झालेली होती. 
                                 पण आता ती परत नव्याने बांधली आहे. साधीच आहे काही कोरीव काम वगैरे नाही. 
                               तरी खुप छान आहे. एकदा तरी भेट द्यावी अशी. माझ्या तर फार आवडीची आहे!


  ©आनंदी पाऊस 
 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
  नोव्हेंबर २०२०






मुख्य प्रवेश 




आतली बाजू 



बुरुज 



बुरुज आतल्या बाजूने 




एका बुरुजावरून दिसणारा दुसरा बुरुज 




कल्याणी 




कल्याणी 












Comments

  1. reading something in marathi after long time. नवरंग , मुखमंटपा , गर्भगृह , बालकांडम , he visara lele shabd recollect zale.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच , सप्रेम धन्यवाद !🤩

      Delete
  2. History । खुप शिकन्या सारखे आहे ।।
    I have seen this when l was doing my training at Jallahalli in 1964.but the things which you have shown is good ।। Thanks

    ReplyDelete
    Replies
    1. can i know who is this pl? did u too document this place ? if yes , i would like to thro it , thnk u so much !

      Delete
  3. sanjitashrikantMarch 14, 2021 7:09 pm

    I have never visited before dis place..टोकदारकमानासारखी भासणारी पण अर्धवर्तुळाकार असणारं दगडीकमानीचे प्रवेशद्वार,भक्कम तटबंदी बुरुज,folded पायऱ्यांची symmetry टिपलेली कल्याणी, बुरुजाची भिंत व humanbeing scale proprtion...खुपच मस्त वर्णीलेलं आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. yes i m madly in love with this place !
      ते बुरुज तर फारच सुंदर , देखणे आणि भक्कम आहेत !

      Delete
  4. Wa sunder mahiti aahe
    Buruj, tatabadi v kalyani chi varan pan chan kele aahes ��

    ReplyDelete
    Replies
    1. प्रेम पूर्वक धन्यवाद !!!🤩😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...