वस्तू - पेटी चरखा
(वारसा स्पर्धा २)
गांधीजींनी २४ जुलै १९३० रोजी चरखा तयार करण्याची देशपातळीवर स्पर्धा घेतली होती . ३० ऑक्टोबर पर्यंत देशाच्या विविध कारागीरांनी यात भाग घेतला होता . या साठी अटीही बऱ्याच होत्या . जसे वजन , बजेट , वापरण्यासाठी सोप्पा वगैरे वगैरे आणि विजेत्याला त्याकाळी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते . तेव्हा देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळ जवळ २० वेगवेगळे चरखे आले होते . त्यापैकी काही म्हणजे अंबर चरखा , पेटी चरखा , सावली चरखा , किसान चरखा , बांबूचा चरखा , बांबूच्या पेटीचा चरखा ,राजस्थान चरखा , पंजाब चरखा , येरवड्याचा चरखा .
माझे आजोबा तेव्हा स्वातंत्र चळवळीत बरेच सक्रीय होते . तेव्हाच त्यांनी हा पेटी चरखा आणला होता . त्यांनी स्वतः अगदी आयुष्यभर खादीच वापरली . काही काळानंतर एक खादीचे दुकान चालू केले आणि अगदी शेवट पर्यंत चालवले . हा चरखा आमच्या मुळच्या गावातल्या घरात आहे . तेथे माझे फारसे येणे जाणे नव्हतेच , कळते झाल्यावर . त्यामुळे त्याबद्दल काहीच माहिती नव्हती . गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून मी आमच्या घरांचे दस्तवेजीकरण सुरु केले आहे . त्यामुळे मला याची माहिती झाली आणि त्याबद्दल माझ्या वडिलांशी चर्चा केली तेव्हा त्यातून कळले , या चरख्याला पूज्य साने गुरुजींचा सुद्धा स्पर्श झालेला आहे . ज्या वेळीं ते आमच्या मुळ गावी आले होते आणि आमच्याकडेच राहिले होते , तेव्हा त्यांनी सुद्धा यावर सूत कताई केलेली आहे ! असा हा आमचा , साने गुरुजींच्या स्पर्शाने पावन झालेला पेटी चरखा !!!
(पेटी चरखा आणि आमचे घर या दोन्ही प्रवेशिकांना मिळुन पहीले बक्षीस मिळाले आहे )
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०
पेटी चरखा
पेटी चरखा
सद्ध्या माझ्या कडे गांधी चरख्याची ही प्रतीकृती आहे
काठियावाडी -गुजराथी चरखा
(गांधी चरखा )
पंजाबी चरखा
सावली चरखा
फोटो - आदरणीय भुजंग बोबडे सर
Infomative
ReplyDeleteThnk you so much 😊
DeleteChan 👌pics ani mahiti, charkhache prakar pan prathamach vachale
ReplyDeleteखरतर या लिखाणामुळे माझा सुद्धा विविध प्रकारच्या विषयांवर छान सखोल अभ्यास होतो आहे 😊
Deleteमनःपूर्वक धन्यवाद
खुपच छान,चरख्याच्या एवढया प्रकाराची माहिती पहिल्यांदाच मिळाली..पेटी चरखा seems me innovative & हार्दिक अभिनंदन!! आमच्याकडेही गांधी चरख्याची प्रतिकृती आहे.
ReplyDeleteमनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!🤩😍
Deleteपुन्हा एकदा मुलूख वेगळा विषय. हल्लीच्या पिढीला अगदी अनभिज्ञ असा हा विषय. हल्लीच्या ह्या पिढीला हातमाग पण माहीत नाही, तेंव्हा चरखा कसा माहीत असणार. असो, आमच्या लहानपणी आम्ही शाळेत सूत कताई केलेली होती त्यामुळे चरखा हा प्रकार एकदम माहितीतला आहे. मात्र आम्ही सूत टकळी वर काढायचो. तुमच्याकडे असलेला चरखा जरी जुन्या काळातला असला तरी technically खूप advance वाटतो आहे. शिवाय पेटी चरखा असल्यामुळे छान portable पण आहे . शिवाय साने गुरुजींच्या स्पर्शाने पुनित पण झालेला आहे. अशा मुलुखावेगळ्या गोष्टी तू हुडकून प्रकाशात आणतेस त्या बद्दल तुझे कौतुक करावे तेवढे कमीच. शिवाय आजोबांची सामाजिक कार्याची आठवण जतन केलीस ते पण अभिमानास्पद आहे. हा अमोल ठेवा तू जतन करून दस्तावेज केलास त्याचे तुला rightly पारितोषिक मिळालेले आहे. शुभाशीर्वाद.
ReplyDeleteहल्लीची पिढीचं काय मला सुद्धा माहिती नव्हती ही सगळी . पण आता हे दस्तावेजीकरणाचे काम सुरु केल्यामुळे , थोडा अभ्यास सुद्धा होतो आणि काय काय माहिती मिळत असते . पण फार छान वाटते हा सगळा अभ्यास करतांना आणि वाटुन जाते फार उशीर झालाय या सगळ्या कामाला आणि अभ्यासाला . फार पुर्वीच हे सगळे करायला हवे होते . आजोबा असतांनाच हे काम सुरु केले असते तर अजून खूप खूप माहिती मिळाली असती ..... असो आता तरी हे काम सुरु केले यात आनंद मानायला हवा आता . कारण त्यामुळेच या सगळ्या गोष्टी समजल्या , त्या थोड्या प्रमाणात अभ्यासता आल्या आणि त्याचे हे दस्तावेजीकरण करून ठेवता आले . मनःपुर्वक धन्यवाद !🙏😊
Deleteतुला लिहायचा छंद असल्यामुळे वाचणार्यांच्या जुन्या आठ वणी जाग्या होतात ��
ReplyDeleteतुझं अभिनंदन ��
खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍
Deleteखूप छान:-)
ReplyDeleteखुप सारे प्रेम 😍 😇!!
Deleteमाला माहिती नव्हते की आपल्या कडे चरखा होता फारच छान माहिती सांगितली
ReplyDeleteहो ग , मलाही माहीती नव्हती या दस्तावेजीकरणाच्या कामामुळे मला ही माहीती मिळाली आणि मी ती इथे मांडली .😊
Deleteवॉव मस्तच
ReplyDeleteचरख्याचे वेगवेगळे प्रकार कळले काही ठरावीक माहीत होते
एखाद्या विषयाचा अभ्यास करायला घेतला की बरीच छान छान माहीती मिळते . तेच माझे झालेय . खुप आनंद मिळतो 😍
DeleteWa charkyache prakar aaj mahit zale chan aathavni aahet tuzya ���� likhan pan sunder ����
ReplyDeletephotos pan mast
स्नेहाळ धन्यवाद !!😊🥰
DeleteSonal Chaudhari
ReplyDeleteWa मस्तच... चरख्याचे एवढे प्रकार असतात हे नव्यानेच माहीत झालं. खूप छान लिखाण, आणि फोटो सुद्धा खूप छान.
खूप धन्यवाद !😍🤩
Deleteसर्वप्रथम आपले अभिनंदन! चरखा इतिहासातला महत्त्वपूर्ण अधोरेखित विषय! मात्र,या आधी आपल्याला इतकी काही माहिती नव्हती याची अनुभूती मला आपला ब्लॉग वाचल्यावर झाली.छान माहिती आपण करून दिली आहे. प्रकार तेही छान फोटोंसाहित!नवीन माहितीत भर झाली. मनापासून आवडला आपला हा ब्लॉग! धन्यवाद!!
ReplyDeleteअरेव्वा! मस्तच
ReplyDeleteएवढे प्रकार प्रथमच कळले. १९३० सालात १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्या मागचा गांधीजींचा उद्देश लक्ष्यात आला. बक्षीसाच्या लोभान् का होईना लोक त्याकडे आकर्षित झाले असणार आणि पर्यायानं स्वदेशीचा प्रचार झाला असणार .
मला दोन तीनच प्रकार माहित होते.मस्त आहे लिखाण आणि चरख्याचे फोटो. सौ.मंदा चौथरी.
ReplyDeleteचि. वर्षा,
ReplyDelete गच्चीवरील गमती जमती काय, गॅलरीतील गमती जमती काय, अशा भूतकाळातील इतक्या सर्व गोष्टी आठवून आठवून त्यांची अगदी सूक्ष्म पद्धतीने शब्दबद्ध मांडणी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. मी साधं बाजारात दोन हजार रुपये नेले तर घरी आल्यावर उरलेले पैसे आणि खर्च केलेले पैसे यांचा ताळमेळ बसत नाही, तर इतक्या वर्षांच्या जुन्या आठवणी स्मृती केंद्रातून डाउनलोड करणं किती दिव्य असेल याची मला कल्पना आहे. नाही म्हणायला आम्हालाही काही गोष्टी अगदी काल घडून गेल्यासारख्या आठवतात. उदाहरणार्थ, अमुक अमुक पाटील साहेबांनी पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या लग्नात फाटक्या नोटांचा तब्बल एकवीस रुपयांचा कसा आहेर केला होता वगैरे.
तर काय मुद्दा होता बरं ? पहा हे असं होतं, तर चरख्यांचे विविध प्रकार, स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आजोबांचे खादी वरील पर्यायाने गांधीजींवरील प्रेम आणि निष्ठा, पूज्य साने गुरुजींच्या करकमलांनी पुनीत झालेला तो पेटी चरखा यांचं इत्यंभूत वर्णन वाचून खूप आनंद झाला. हा सर्व इतिहास शब्दबद्ध करून एक प्रकारे स्वर्गीय आजोबांप्रति वाहिलेली खरी श्रद्धांजलीच आहे. तू केलेल्या या कार्याबद्दल आजोबांच्या स्वर्गस्थ आत्म्याला नक्कीच आनंद आणि अभिमान वाटत असेल. असो तुझे पुनश्च अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. (आपला नाना)
सुप्रभात ��
ReplyDeleteअरेव्वा! मस्तच
एवढे प्रकार प्रथमच कळले. १९३० सालात १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्या मागचा गांधीजींचा उद्देश लक्ष्यात आला. बक्षीसाच्या लोभान् का होईना लोक त्याकडे आकर्षित झाले असणार आणि पर्यायानं स्वदेशीचा प्रचार झाला असणार .
आमच्या लहानपणी माझ्या चरखा घरी होता. आता तो माझ्या मुलीचा वस्तू संग्रहालयात आहे.
ReplyDeleteमी पण अमंळनेर येथे होते. त्या वेळचे माध्यमिक शिक्षक सानेगुरुजी चा वारसा जतन करीत शिकवत असत.
मी पण दिपस्तंभ आयोजित स्पर्धा परीक्षा दिली होती. त्या अभ्यासक्रम साने गुरुजी वर आधारित पुस्तक होते.
आपला लेख छान आहे
अरे वाह मला तर माहीतच नव्हते की आपल्याकडे हा पेटी चरखा आहे हे.
ReplyDeleteछान
साने गुरुजी यांचा हस्तस्पर्श!
भारी