गोष्टी -पापड खाण्याच्या-२
(घरातील गमती जमती)
आज आणखी काही गोष्टी पापड खाण्याच्या. बीबड्याच्या जशा काही खास पद्धती आहेत खायच्या, तशाच ज्वारीच्या पापडाच्या सुद्धा आहेत. एक वेगळ्या दृष्टीने हा पापड फारच महत्वाचा आहे. आणीबाणीच्या वेळी मदतीला धावुन येणारा आहे. फक्त मदतीला धावुन येणाराच नाही तर जेवणाची लज्जत वाढवणारा आहे. माझ्या खुप आवडीचा आहे खरतरं हा भाग! तर एखादे वेळी पोळी किंवा भाकरी कमी पडली जेवतांना, तर ज्वारीचा पापड, पोळी-भाकरीला पर्याय म्हणुन कामी येतो आणि जेवण एकदम चवीष्ट होऊन जाते. खान्देशातील काही खास रस्सा भाज्या आहेत. त्या म्हणजे फौजदारी डाळ/उडदाची डाळ, गंडोरी मिरची, डाळ मेथ्या आणि लाडकी पोपटी भाजी किंवा हिरवी भाजी किंवा दाणे लावुन भाजी. याच्याही चवी लवकरच चाखायला मिळतील, खास चमचमीत लेखात. तर या सगळ्या रस्सा भाज्या. यातील काही भाज्यांसोबत भाकरीच केली जाते तर काही भाज्यांसोबत पोळ्याही केल्या जातात. पण कधीतरी पोळ्या किंवा भाकरी कमी पडत असे. मग माळ्यावरुन पापडाचा डबा खाली उतरत असे. मग सगळ्यांनाच पोळी किंवा भाकरी असली तरी नको होई. सगळ्यांना ज्वारीचा पापडच हवा असे. कधीकधी पोळी भाकरी असली तरी, पापडाची आठवण होत असे, या भाज्यांसोबत खायला. इतका भारी लागतो आणि आम्हाला अजुनही आवडतो या भाज्यांबरोबर ज्वारीचा पापड खायला! ज्वारीच्या पापडाचे असतील तसे तुकडे डब्यातुन काढायचे आणि त्याचे थोडे छोटे तुकडे करायचे, साधारण आपण घास घेऊ शकु इतक्या आकाराचे. आणि यावर यापैकी कुठल्याही भाजीचा रस्सा त्या त्या भाजीसहीत घालायचा. वरुन छान खार सुद्धा घालायचा आणि सगळे नीट कालवुन घ्यायचे. इतके होईपर्यंत पापड थोडा मऊ होतो. मग तो अर्धवट कुरकुरीत, अर्धवट मऊ झालेला, भाजी आणि खारात भिजलेला पापड खायचा, स्वर्गसुखाच्या पलीकडे पोहोचतो खाणारा! आणि त्याचा परिणाम म्हणजे दोन घास जास्तीच खाल्ले जातात, अगदी खात्रीने!!
अजुन एक माझ्या अतिशय आवडीचा प्रकार. यासाठी पापडाचे कितीही लहान मोठे तुकडे असले तरी चालते. पण जितका तुकडा मोठा तितके जरा सोयीचे होते. बीबडे असो किंवा ज्वारीचा पापड, दोन्हीही पापड चालतो यासाठी. काही नाही फक्त कैरीच्या लोणच्याचा खार घ्यायचा आणि पापडावर टाकायचा आणि बोटाने छान सगळ्या कान्याकोपऱ्यात लावायचा. एव्हढे होईपर्यंत पापड थोडा मऊ होतो आणि पापडात खार छान मुरतो. आणि मग लगेच खायचा. अतिशय सुंदर चव आणि पोत सुद्धा... खाणारा एका पापडावर थांबुच शकत नाही. दुसरा खाण्याचा मोह आवरलाच जात नाही.
शिक्षणासाठी म्हणुन बाहेर पडलो तेव्हा, तर हा आणखी जास्तच आवडीचा झाला. एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी भरून घेऊन जात असु, आम्ही घरुन वसतीगृहात जातांना. पण लगेचच संपे तो. कारण सगळ्या मैत्रिणींना सुद्धा खुप आवडत हे पापड खायला. खरंतर तिथे काहीच नसे तेल, चटणी, खार वगैरे. कोरडाच खात असु, पण तरी खुप चवीष्ट लागे. तसेच सहलीला जातांना सगळे लाडू, चिवडा असले प्रकार आणतात. मग सारखं तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी पापड नेलेले असले की मस्तच. चवीत एकदम रुचकर बदल अनुभवायला मिळतो. तेव्हा तर तो सगळ्यात चविष्ट लागतो!
आता राहता राहीला उडीदाचा पापड. हा पापड सगळ्यांप्रमाणे आमच्याकडे सुद्धा जेवतांना तोंडी लावणं म्हणुन वापरला जात असे. अजुनही खाल्ला जातो. पण पुर्वी पापड भाजुन त्याच्या घड्या करुन डब्यात भरून ठेवले जात असतं. आता तसे नाही. वेळच्यावेळी हवे तितके भाजुन खाल्ले जातात. त्यामुळे घड्या घालण्याचा प्रश्नच येत नाही. घड्या घालणे शक्यही नसते आता, कारण पापड गॅस वर भाजला जातो. पापड शेगडीवर भाजला, तरच त्याची छान घडी घालता येते, अन्यथा नाही. तर जेवतेवेळी पापड भाजुन तसाच खाल्ला जातो किंवा बारीक मोडुन त्यावर फक्त तेल घालुन तर कधी कोरडी चटणी आणि तेल घालुन खाल्ला जातो. काही वेळा यावर अगदी बारीक चिरलेला लसुण सुद्धा घातला जातो. हे सगळे नीट कालवुन एकत्र केले जाते. त्याला खास शब्द आहे 'खुडा'. हा खुडा जास्त करुन उन्हाळ्यात जास्तवेळा होतो. कारणं दोन. एक म्हणजे उन्हाळ्यात भाज्या फारशा मिळत नाही. आणि दुसरे म्हणजे आंब्याच्या मौसमात जवळ जवळ दररोज दिवसातुन एकदा तरी आंब्याचा रस आणि पोळीचे जेवण असते. बहुतेक सगळ्यांना रस पोळी बरोबर तोंडी लावायला हा खुडाच आवडतो.
हे सगळे जरी असले तरी हा पापड सुद्धा आमच्या मुलांचा मधल्या वेळेच्या भुकेसाठीचा खाऊ होता. असाच हाताने मोडायचा बारीक आणि कधी त्यावर फक्त तेल तर कधी कोरडी चटणी आणि तेल घालुन कालवुन खायचा. उडीद पापड तसाही खुप बारीक असतो. त्यात आमच्या घरी केलेला तर फारच बारीक! त्याचा तुकडा तोडायला दातांची गरजच लागत नाही. पण आम्ही म्हणजे आम्ही! आणि आम्हाला खलबत्ता आणि त्यात कुटणे फार आवडे. मग हा पापड सुद्धा आम्ही खलबत्त्यात टाकुन कुटून काढत असु. त्याचे पार बारीक पीठ होऊन जात असे. मग हे पीठ एका ताटात काढायचे त्यावर कोरडी चटणी, खार आणि तेल घालायचे. छान हातानी कुस्करून कुस्करून नीट कालवुन घायचे आणि मग हल्ला बोल, नेहमी प्रमाणे. फार आवडे आम्हाला हा प्रकार तेव्हा. पण अलीकडे जेव्हा केव्हा या प्रकारची आठवण होते, तेव्हा तेव्हा खुपच हसु येते, अगदी आवरतच नाही, हसणे किती वेळ.
मध्यंतरी एक अजुन आवड निर्माण झाली होती. पण ही आवड बाहेर जेवल्याने निर्माण झालेली होती. ती म्हणजे मसाला पापड खायची. कामामुळे बराच प्रवास आणि बाहेरचे खाणे. आवड आणि सवयच लागली होती, जेवणाच्या आधी मसाला पापड खायची. मग लेकीला पण आवडायला लागला, हा मसाला पापड. मग घरी सुद्धा प्रयोग झाले मसाला पापड करण्याचे. पण बाहेरचा पापड जाड असल्याने, त्यावर मसाला टाकला तरी तो लगेच मऊ होत नाही. घरचे पापड म्हणजे एकदम बारीक. मसाला टाकेपर्यंतच तो पार मऊ होऊन जात असे. अगदी हाताने उचलणे सुद्धा कठीण. मग आम्ही यावर एक तोडगा काढला. एक पापडाऐवजी दोन पापड घेऊन मसाला पापड बनवू लागलो घरी, मग तो नीट खाता येत असे. बऱ्याच दिवस चालले हे सगळे. कधी ही आवड निर्माण झाली आणि नक्की कधी मसाला पापड करणे आणि खाणे सुरु आणि बंद झाले ते मात्र आता अजिबातच आठवत नाही. या लिखाणाच्या निमित्ताने आठवण झाली या प्रकारची!
आता मला उडीद पापड फारसा आवडत नाही. खातच नाही म्हटले तरी चालेल. पण बीबडे आणि ज्वारीचे पापड मात्र अजुनही खूप्पप्पप्प आवडतात. उल्लेख आलेल्या सगळ्या पद्धतींनी मी अजुनही खात असते. फक्त कुटायचे कुटाणे करत नाही. कुटायला तसा मोठा खलबत्ताही नाही आता माझ्याकडे. आता बाकी पापड आणि वाळवणांच्या खायच्या पद्धतींच्या गोष्टी अशाच परत एका नवीन लेखात.
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
३ डिसेंबर २०२०
ज्वारीच्या पापडाचे तुकडे
ज्वारीचा पापड आणि फौजदारी डाळ
किंवा उडीद डाळ
ज्वारीचा पापड आणि फौजदारी डाळ
किंवा उडीद डाळ
मेथीची पोपटी भाजी
आणि ज्वारीचा पापड
लोणच्याचा खार घालुन
हाताने बारीक मोडलेला उडीदाचा पापड
उडीदाचा पापड आणि तेल
उडीद पापड कोरडी चटणी आणि तेल
उडीद पापड कोरडी चटणी आणि तेल (खुडा )
आंब्याचा रस , पोळी आणि खुडा
ज्वारीचा पापड आम्ही कधी खाल्ला नाही, लेखातील खमंग वर्णनातुन आणि चित्रे पाहून खावंसं वाटतंय. अहाहा!! आंब्याचा रस!!! season नसला तरीही माला आंब्याचा रस १२ महिने आवडतच.
ReplyDeleteगारवात्मक लेख.....
आंब्याच्या रसाबद्दल येथे न बोललेच बरे 😁
Deleteज्वारी पापड प्रत्येकानी एकदा तरी खाऊन बघावा!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तोंडाला पाणी सुटले. असे प्रकार करून आता खाणं होत नाही. पण लेख वाचून खायची इच्छा झाली
ReplyDeleteहोय , खरंय अगदी . खूपच धावपळीचे झालेय आयुष्य , त्यामुळे अशा आवडी जपणे फार कठीण जाते , बाकी लोकांच्या आवडी निवडी जपतांना आपल्या स्वतःच्या आवडी निवडी विसरायलाच होते . या निमत्ताने होत आहेत .😍🤩
DeleteWow����वेगवेगळी नावे कळली हिरवी पोपटी अनेक भाज्यांची नवनवी नावे����
ReplyDeleteमस्त पापड भाजून खातात का कच्चा खातात
सोलापूर कडे कडक भाकरी करतात
हल्ली , मला इकडे मिळतात ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरी , अगदी आवडीने खाते मी त्या सुद्धा ! मनःपूर्वक धन्यवाद !!
DeleteVarshali tuze khandeshi khadya sanskruti saglech lekh chan khuskhushit tondala pani sute wegliya rassa bhaji papdasobat chura karun taklele pics mastch mi tuze lekh enjoy karte aasech lihit jaa shubhecha
ReplyDeleteखूप खूप आनंद झाला , तुमचा अभिप्राय वाचून . सप्रेम धन्यवाद ! 😍😇
DeleteWaril abhipray nanda wagle kadun aahe
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद!
DeleteKhup chan aamhi javaricha papadavar tel aani shegdane takun khato khilaph chan papada cha khuda pan khato
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!
Deleteएकदम चमचमीत आणी कुरकुरीत लेख. रसभरित वर्णन वाचतांना तोंडाला अगदी पाणी सुटले. ज्वारीचा पापड कधी खाल्ला नाही त्यामुळे तो भुकेच्या वेळी पण खातात हे माहीत नव्हते. साधारणपणे मेक्सिकन tacos असे खाल्ले जातात. पापडावर तेल आणि चटणी टाकून खाणे फारच छान वाटले आणि ते नक्कीच खूप टेस्टी असणार. पापड तोंडी लावायच्या नाना तर्हा असतात पण पापड कुटून, कुस्करून आणी चटणी व तेल टाकून खायची गम्मत नवीनच कळली. मी एवढा खास पापड शौकीन नाही पण मसाला पापड मला चेंज म्हणुन खायला खूप आवडतो आणि मी जेवताना तो हमखास आवर्जून मागवतोच. अजून एक चमचमीत आणी कुरकुरीत लेख जिभेला चविष्ट तरंग देवून गेला. 👌👌👌👌
ReplyDeleteप्रत्येक भागात संस्कृती वेगळी , खाद्यपदार्थ वेगळे . त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक भागातील प्रत्येक पदार्थ माहिती असणे शक्यच नाही . त्यात खान्देश चे फारसे कौतुक नाही महाराष्ट्रात कुणाला , त्यामुळे तिथले पदार्थ , भाषा सुद्धा फारशी कुणाला माहितीची नाही . हे मनाला जरा सलते नेहमीच माझ्या . माझ्या या प्रयत्नामुळे तरी या गोष्टींची माहिती होईल असे वाटते . असो . हे सगळे पापड खाण्याची खरी धमाल खान्देशातच आहे . खान्देशी माणसाला हे पापड अती प्रिय , त्याशिवाय तो जगूच शकत नाही कुठेही असला तरी . ते मिळण्यासाठी कितीही धडपड करावी लागली तरी करणारच आणि अगदी आनंदाने .
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !
Sagale varnan vachata vachata todat ti chan chav taralali 😋
ReplyDeletechan varnan
खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद !🤩😇
Deleteमस्तच. खूप छान. उडीद पापडाच्या khuda. अहाहा. एकदम छान वर्णन
ReplyDeleteखूप हें लिखाण
खुप सारे धन्यवाद 😍
Deleteतू इतके सुंदर हुबेहूब लिखाण करतेस चौधरी सदन मधल्या आठवणी तुझ्या मनात ठासून भरल्या आहेत खरच खूपच छान वाचतानाच तोंडाला पाणी सुटले आणि वाचून झाल्यावर मन तृप्त झाल्या सारखे वाटते
ReplyDeleteहो, आठवणीच काय, मी तर हल्ली या लिखाणाच्या माध्यामातून ते आयुष्यच परत जगतेय!! 😇😇😍
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
पापड आणि त्यावर खार...स्वर्गसुख...तू फार जुन्या आठवणी काढून तोंडाला पाणी आणते..वर्षाली..bharriii..एकदम
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!🤩
Deleteपापड खायला सगळ्यांनाच आवडे आणि आवडतो. तुझा फारच आवडता दिसतोय.
ReplyDeleteअरे पापड म्हणजे अगदी जीव की प्राण आहे माझ्या साठी!!!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Aaj tuza lekha vachala vachun v chitre pahunch tondala pani sutale g �� mi pan aaj jwaricha papad bhajun bhajit churun khaala mast�� ��
ReplyDeleteSunder likhan aahe ����
खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
DeleteTruely my mouth is watering after reading this article....there are so many hidden memories...of childhood that blushed out of mind afyer readin...
ReplyDeleteTons n tons of thnks 😍 😇
DeletePapadachi majja aikun tar tondala pani sutale����
ReplyDeleteKiti chan diwas hote te... Aata kahich nahi rahili ti majja��
खरंय खूपच छान दिवस...
Deleteकधीही परतून न येणारे...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏