गोष्टी-पापड खाण्याच्या-१
(घरातील गमती जमती)
आतापर्यंत आपण बरेच पापड बनविण्याच्या पद्धती आणि सोबतच्या गमती जमती अनुभवल्या. काही बाकी आहेत, त्याही लवकरच अनुभवायला मिळतीलच. त्यानंतर ते पापड भाजण्याच्या गमती जमती सुद्धा अनुभवल्या. आता महत्वाची वेळ आलीय, ती म्हणजे हे पापड खाण्याची. तर आजची गोष्ट आहे, हे सगळे पापड खाण्याच्या आमच्या वेगवेगळ्या पद्धती आणि गमती जमती!
बीबडे, हा जे प्रकार आहे, त्याचे ओले पापड किंवा ओले बीबडे खाण्याची मजा काही औरच असते. आणि सगळ्यांच्याच खुप आवडीचे. पण ही मजा मात्र फक्त उन्हाळ्यातच लुटता येते, जेव्हा बीबडे केले जातात तेव्हा. पण त्यावर एक तोडगा आहे. यामुळे वर्षभर हवे तेव्हा, ओले बीबडे खाण्याची मजा लुटता येते. तर हे बीबडे वाळवून कोठ्यांमध्ये किं वा डब्यांमध्ये भरून ठेवलेले असतात, वर्षभर. त्यापैकी हवे तेव्हढे बीबडे काढायचे. हे बीबडे मावतील अशा बेताने एक मोठे भांडे घ्यायचे. त्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालायचे . मग या मीठाच्या पाण्यात, हे बीबडे भिजत घालायचे. थोड्यावेळातच हे बीबडे ओल्या बीबड्यांसारखे मऊ होतात. मग हे पाण्यातुन काढायचे आणि खायचे. तसेच खाऊ शकता किंवा साग्रसंगीत त्यावर तेल लावुन, सोबत भाजलेले शेंगदाणे घेऊन खाऊ शकता. किंवा त्यावर छान बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालुन सुद्धा भारी लागते. मला तर ओले बीबडे नुसतेच खायला आवडतात.
दुसरे म्हणजे बऱ्याचवेळा डब्यात/कोठीत बीबडे ठेवतांना, काढतांना बरेच तुकडे पडतात, काही वेळा तर भुगाच असतो तळाशी. हे तुकडे काही शेगडीवर किंवा गॅस वर भाजणे शक्य नसते. त्यावर रामबाण उपाय म्हणजे हे असे पाण्यात भिजवुन खायचे. भिजवलेला भुगा असेल तर त्यावर मस्त कोरडी चटणी, कांदा, कोथिंबीर, तेल खार घालुन छान कालवुन घ्यायचे,..एक नंबर चवीला! असे खायचे नसेल तर सरळ हे तळुन घ्यायचे तेलात. छान लागतात तसे सुद्धा. भुगा तळायचा नसेल तर त्याला अजून एक पर्याय आहे. पोळ्या-भाकरी झाल्या की त्या गरम तव्यावर हा भुगा टाकायचा, त्यावर थोडे तेल घालायचे आणि सराट्याने हलवायचे, छान भाजला जातो हा भुगा, आणि चव तर फारच छान आणि एकदम कुरकुरीत. हा सुद्धा असाच खाऊ शकता किंवा परत त्यावर कोरडी चटणी, तेल, खार, शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे घालुन खाऊ शकता. हल्ली या तुकड्यांना आणि आणि भुग्याला भाजण्याचा अजुन एक पर्याय उपलब्ध झालाय. तो म्हणजे मायक्रोवेव्ह! कितीही बारीक तुकडे-भुगा असो, छान भाजला जातो. किंवा पॉप कॉर्न मशीन असेल तर, त्यात सुद्धा भाजला जातो. मी मायक्रो वेव्ह मधुनच भाजुन घेते सगळेच पापड.
आता पुढची गोष्ट, पापड भाजल्यापासून सुरु करते. त्या लेखात सांगितल्याप्रमाणे हे काम साधारण तीन वाजेच्या आसपास सुरु होत असे. बीबडे भाजताना ते गरम असतांनाच त्यावर तेल घातले जात असे, प्रत्येक पापडावर अगदी सगळीकडे पसरवुन. मग ते छान मुरते थोडाच वेळात. मग हे मुरलेले बीबडे खायचे , एकदम भारी. त्यामुळे पापड भाजायला सुरुवात झाली की आमची भुणभुण चालू होत असे. मम्मीने बीबड्यावर तेल टाकून द्यावे म्हणुन. हा प्रकार घरात लहान-मोठ्या सगळ्यांनाच फार आवडे, अजुनही खुप आवडतो. त्यामुळे बऱ्याच पापडांवर अशा प्रकारे तेल घातले जात असे. एक उंच चळतच तयार होते असे या बीबड्यांची! आणि आम्हा मुलांचे चालत फिरत किंवा गॅलरीत बाकावर बसुन, हे बीबडे खाणे सुरु होत असे, अगदी अखंडपणे. या दिवशी साधारणपणे संध्याकाळच्या जेवणाला मुगाची खिचडी केली जात असे. ती पण भांड्यात आणि या शेगडीवरच शिजवलेली. कारण पापड भाजुन झाले की त्यात बरीच आच असे, मग या आचेवर खिचडी सहजच शिजुन जात असे. आम्हा मुलांचे तर या दिवशी पापड खाऊनच पोट भरुन जात असे. त्यामुळे आमचा जेवण करण्याचा प्रश्नच नसे. तेव्हा तर मला ही मुगाची खिचडी अजिबातच आवडत नसे.
याचप्रमाणे ज्वारीचा पापड. या पापडात फक्त मीठ असते, त्याव्यतिरिक्त काहीही मसाला नसतो. मग हा पापड भाजल्या भाजल्या त्यावर कोरडी चटणी आणि तेल घालुन सगळीकडे छान परसावयाचे. आवडत असेल तर खार सुद्धा घालायचा. अगदी स्वर्ग सुख! हा प्रकार सुद्धा सगळ्यांनाच खुप आवडे. पण हा पापड खायला एक अडचण येत असे आम्हा मुलांना. कारण हा चालता फिरता खाता येत नसे. एका जागी बसुन नीट ताटलीत घेऊन खावा लागे. एवढेच नाही तर याचा तुकडा तोडतांना सुद्धा जरा काळजी घ्यावी लागे. जोरात तोडला तर त्यावरील चटणी इकडेतिकडे उडण्याची शक्यता. आणि नशीब एकदमच वाईट असले त्यादिवशी तर सरळ डोळ्यात उडते ही चटणी. मग पापड खाण्याची मजा तर सोडूनच द्या, पण तो खाणे सुद्धा अशक्य! त्यामुळे आम्ही हा पापड ताटलीत घेऊन तिथेच मम्मीजवळ किंवा गॅलरीत बाकावर बसुन खात असु.
नंतर मात्र अशा पद्धतीने पापड खाल्ला तर इतका चविष्ट लागत नाही. त्याची खरी चव पापड गरम असतांनाच. आमच्याकडे तर ते शक्यही नसे . कारण डब्यात भरपुर पापड मावण्यासाठी, भाजलेले अख्खे पापड डब्यात ठेवले की त्यावर हलक्या हाताने दाब दिला जात असे. असे केल्याने अख्ख्या पापडाचे तुकडे होत असतं आणि डब्यात अजुन पापड ठेवण्यासाठी जागा तयार होत असे. त्यामुळे डब्यात शक्यतो अख्खा पापड शिल्लकच राहत नसे.
डबे भरतांना साधारणपणे वेगवेगळ्या डब्यात वेगवेगळे पापड भरले जात नसतं. प्रत्येक डब्यात सगळ्या प्रकारचे थोडे थोडे पापड भरले जात असतं. याची तीन कारणं. एक म्हणजे एकच डबा काढल्यावर सगळ्या प्रकारचे पापड मिळतं. कारण हे सगळे डब्या माळ्यावर ठेवलेले असतं. खुर्चीवर किंवा स्टुलवर चढल्याशिवाय काढता येत नसतं. दुसरे म्हणजे एक डबा काढुन खाल्ल्यावर एकाच प्रकारचे पापड संपुन जाऊ नये. तिसरे म्हणजे हेच पापड घरातील लहान मोठे सगळ्यांचेच मधल्या वेळचे खाणे असे . आणि हे खाण्याची एक खास पद्धत होती, सगळ्यांच्या आवडीची. खरतरं अजुनही आहे. मी पण अजुनही खाते या पद्धतीने पापड. ह्या पद्धतीने खाण्यासाठी शक्यतो हे सगळे पापड एकत्र हवेत. एकाच डब्यात सगळे पापड असल्याने सोयीचे जात असे. फक्त उडीदाचे पापड वेगळ्या डब्यात भरले जात आणि हा डबा खालीच ठेवला जात असे. याचे मुख्य कारण म्हणजे उडीद पापड जेवतांना तोंडी लावणं म्हणुन खाल्ला जात असे, जवळ जवळ रोजच. माळ्यावर ठेवला तर रोजच वर चढुन डबा काढावा लागला असता. त्यामुळे तो खालीच ठेवणे सोयीचे होते. पण अर्थातच आम्हा मुलांचे हे मधल्या वेळातील खाणे सुद्धा होतेच.
हे सगळे पापड मधल्या वेळातील खाणं असलं, तरी त्याच्या खाण्याच्या पद्धती बऱ्याच होत्या. साधारण वेळ आणि लहर यावर अवलंबुन असतं. तसेच भुक किती यावर सुद्धा. कधी कधी पापड डब्यातुन काढायचे. जसे आणि जे जे पापड येतील ते तसेच खायचे. हे म्हणजे जेव्हा वेळ नाही किंवा सगळे साग्रसंगीत करायची इच्छा नाही, पण भूक तर लागलीय अशा वेळी हा पर्याय. तर कधी पापड हाताने बारीक मोडुन घ्यायचे आणि त्यावर कधी फक्त तेल घालुन कालवुन खायचे तर कधी कोरडी चटणी, तेल खार घालुन कालवुन खायचे. कधी सगळ्यांनी एकत्र तर कधी एकट्याने सुद्धा.
पण कधी कधी घरात लहान मोठे सगळ्यांनाच लहर येत असे, दुपारी पापड खायची. मग काय सगळेच मस्त साग्रसंगीत होत असे. मोठे ताट वगैरेने काम भागतच नसे, मोठी परातच लागे त्यासाठी. वरून डबे काढले जात पापडाचे. त्यातून परातीत पापड काढले जातं. मग हातानेच छान बारीक मोडले जातं. एकीकडे बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरली जात असे. मग ती या मोडलेल्या पापडावर घातली जात असे, मग त्यावर कोरडी चटणी, खार आणि तेल सुद्धा घातले जात असे. मम्मी मग हे सगळं हाताने छान कालवुन घेत असे. हे सगळे होत असतानां पोटातील भूक जाम खवळत असे आणि तोंडाला इतके पाणी सुटत असे की केव्हा एकदा खायला मिळते असे होऊन जात असे. मग सगळे त्या परतीभोवतीच गोल करून बसत असु. ज्यांना तिथे जागा मिळत नसे, त्यांना मग वेगळ्या ताटलीत घेऊन खावे लागे. सगळे तयार होईपर्यंत बराच वेळ लागे. पण एकदा का आमची टोळधाड पडली त्यावर की, काही मिनिटातच होत्याचं नव्हतं होऊन जात असे . सगळ्यांची पोटं तुडुंब भरुन जात असत . पण मला नाही वाटत, आजही कुणाचे मन तुडुंब भरले असेल. कितीही वेळा आणि कितीही खाल्ले तरी परत खायची ओढ लागुनच राहते किंबहुना मी तर म्हणेल वाढतेच!
शाळेला सुट्टी असली की तर आम्हा मुलींचे खुपच उद्योग चालत असतं. पापड हाताने मोडण्यापेक्षा, ते खलबत्त्यात टाकुन कुटायला आम्हाला जास्त आवडे आणि मजाही येत असे. आमच्याकडे एक लोखंडी खलबत्ता होता, अजुनही आहे खरतरं. तो घेऊन त्यात पापडाचे मोठे मोठे तुकडे घालुन त्याचा बारीक चुरा करत असु. हा कुटणे प्रकार आम्हाला फारच आवडे, इतका की सुटण्यासाठी आमची भांडणं होतं. खरतरं कुटता कुटता बऱ्याचदा आमची बोटं दाबली जातं, चेमटली जातं. चांगलेच लागे आणि खुप वेदना सुद्धा होत असे. अगदी रडण्यापर्यंत सुद्धा प्रकरण जात असे या वेदनेमुळे. पण तरीही आमचे पापड कुटणे कधीही थांबले नाही किंवा ती आवड कमी झाली नाही. कधी कधी तर इतके कुटत असु की त्या पापडाचे पार पीठ होऊन जात असे! मग हा कुटलेला पापड ताटात काढायचा आणि त्यावर लहरीप्रमाणे हवे ते ते टाकायचे आणि छान कालवुन घ्यायचे. मग तिथेच स्वयंपाक घरात नाहीतर लाडक्या बाकावर बसुन खायचे. कधी कधी मोठ्या मंडळींना लहर यायची, मग तेही आमच्या पापडातील थोडा थोडा पापड खात आणि कधी कौतुक करत, किती छान झालाय म्हणुन. तर कधी कधी हसत आणि म्हणत किती बारीक कुटून टाकलाय पापड, वेड्या आहेत या मुली अगदी. आता मलाही हे सगळे आठवुन फारच हसायला येतेय! खरंच काय काय करतो ना आपण लहान असतांना. काहीही आवडत असते आणि कशातही मजा वाटते! निरागसता!! जी मोठं झालं की आपण पुर्णपणे गमावुन बसतो!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
३ डिसेंबर २०२०
नुकतेच भाजलेले पापड
गरम गरम बीबड्या वर
तेल घातलेले
गरम गरम ज्वारीच्या पापडावर
कोरडी चटणी आणि तेल घातलेले
अगदी बारीक झालेला भुगा , तव्यावर भाजताना
तव्यावर भाजलेला भुगा
मायक्रो वेव्ह मध्ये पापडाचे तुकडे भाजताना
मायक्रो वेव्ह मध्ये भाजलेले पापडाचे तुकडे
पापडाचा साग्रसंगीत कांदा , टमाटे ,
कोरडी चटणी , खार आणि तेल घालुन
केलेला कुस्करा 🤤🤤🤤😋😋😋
हाच तो आमचा खल
पण हा सोबतच बत्ता मात्र तो नाही
फार छान सुबक होता आमचा बत्ता
पण कुणीतरी काही कामासाठी नेला
आणि बदलुन हा आणुन दिला
खूपच छान पापड़ म्हटले की मला नशीराबादचे खालच्या आळीचे जूने दिवस आठवतात, तेव्हा आम्ही हायस्कूल ला जायचो सगळ्या गल्ली मध्ये खाटाँची लाइन लागलेली असायची सगळी कड़े महिलांची पापड़ बनवायची स्पर्धा लागलेली वाटायची आमचे घर ब्राह्मणाचे असल्याने आम्हाला ते खूपच आश्चर्य वाटायचे तेव्हा त्या गल्लीतील आमचे मित्र नितिन खाचने रवि पचपांडे सोपान नेहते प्रवीण सावदेकर विलास माळी यांचे कड़े खिशी खाण्याची बिबड़ी चा घाटा खाण्याची एक वेगळीच मजा यायची आता तर नौकरी मुळे सगळे विभक्त झालो असल्याने तिकडे जाणे फार क्वचित होते पण आज ताइची कथा वाचून खुप आठवणी जाग्या झाल्या खरोखर ताई डोळ्यात पानी आले आता असच म्हणाव लागेल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी।
ReplyDeleteMast athvan. Pani al tondala. Ya lockdown madhe kelele me. Majja ali khup vachun. Thank you.��
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteMala bibade khup aavadatat mi tar korade bibade pandit takun kate mala bibade cha ghata pan aavadato tu kharach tondala pani sodate
ReplyDeleteअगदी स्वर्ग सुख!!! मनःपूर्वक धन्यवाद 🙏
DeleteKhupach pani sutale tondala. Aatta khup divas zale aahet papad khalle nahi ase tukade karun ani lal kordi chatani ani kanda tomato ani kothimbir takun. Korde bobade panyat takun kahi khallyache aathavat nahi. Aata khvun baghave lagel.
ReplyDeletePapdancha lekh khoop Chhan, MI lagech aaj bibde bhajle.
ReplyDeleteवावा फारच छान ! मी पण या ब्लॉगच्या लिखाणामुळे असे काय काय करत असते . बालपण परत जगण्याची खुपच सुंदर संधी मिळते मला !
DeleteAg Kay bharri aathwan dili Tu bibdyanchi..old ask ki sukke..sarwanchyach aawadiche..khalbatyat takun kutlela TR ajunch bharri..mast jamun aaley metkut papdanche..👍👍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 😇
DeleteKhup chan bibade v papad yanche varanan tondala pani sutle g�� mast sarvanchyach aawdiche aahet bibade v papad��
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद 😍
DeleteMy mouth was watering while reading the whole article....
ReplyDeletetons of thnks for this !!!
Deleteबिबडे हा नवीन शब्द कळला. पापड कुस्करून त्यावर कांदा, �� टोमॅटो व तिखटमीठ टाकले की झाला मसाला पापड. पापड भिजवला की बोटी सारखा लागतो ना? ज्वारीचा पापड मात्र मी खाल्लेला नाही. एकदा खाऊन बघायला हवा. लेख वाचून कधी एकदा पापड भाजून खाते असे झाले आहे. ��
ReplyDeleteबोटी कशी लागते मला माहीती नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही 😝
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
अस्सल खांदेशी टेस्टी टेस्टी लेख... Vilas Kinge
ReplyDeleteअस्सल खानदेशी चविष्ट धन्यवाद 🙏 😀😁
DeleteBibadanchi bhel mhanat hoto aahami kanda, kothimbir, tomato chatani, tail mix khoopach chan 😋 ya lekhacha nimitane athawan aali ani tonadala pani sutale
ReplyDeleteWawa मस्तच नामकरण...... बीबड्याची भेळ!!!❤
ReplyDelete