कौशल्य - सुताचे गोळे आणि वाती
(वारसा स्पर्धा २)
हे कौशल्य माझ्या आजीचे , वडिलांच्या आईचे . आता ती नाही या जगात , पण या सुताच्या गोळ्यांच्या आणि वरातीच्या रूपात मात्र कायमची आहे माझ्यासोबत . शेतातुन मुळ स्थितीत असेल , तसा कापूस येत असे तिच्याकडे , घराचा किंवा कोणी ओळखीच्या लोकांकडून . ज्यांना वाती हव्या आहेत ते किंवा ज्यांच्याकडे कापूस आहे ते , असे सगळे लोक तिला कापूस आणून देत , पुण्य्याचे काम वाटे लोकांना .
मग ती आधी हाताने वेचून वेचून त्या कापसावरील सगळा अगदी बारीक बारीक कचरा सुद्धा काढून टाके . नंतर त्यातील एक एक करून सगळी सरकी(कापसाचे बी) काढून घेत असे . कधी कधी आम्हा मुलींना पण म्हणे , बघा बर , यात एखादी सरकी राहिली आहे का? मग आम्ही सुद्धा बघत असू . काय छान वाटे त्या मऊ-मुलायम कापसातून हात फिरवायला ! एकदा का सगळ्या सरकी काढून झाल्या की , ती तो कापूस हातानेच छान पिंजून काढे . हा पिंजून ठेवलेला कापूस इतका छान मुलायम आणि पांढरा शुभ्र दिसे की असे वाटे टोपलीत एक छोटासा ढगच येऊन बसलाय .
त्यानंतर लागत असतील , गरज असेल , मागणी असेल त्याप्रमाणे त्याच्या फुल वाती करे किंवा त्याचे सूत काढत असे हातानेच , अगदी बारीक . मग या सुताचे गुंडाळून गोळे बनवून ठेवत असे . या सुताच्या मग हव्या तेव्हा , हव्या तशा , हव्या तितक्या धाग्याच्या वाती बनवता येत असत . आजी म्हटली की मला तशीच मूर्ती आठवते , एका टोपलीत कापूस , सोबत एका छोट्या वाटीत दूध , फुलवतींना लावायला आणि सोबत विभुती एका वाटीत , सुत काढतांना बोटांना लावायला घेऊन बसलीय , डाव्या हातात सुताचा गोळा आहे आणि उजव्या हाताने सुत काढून , डाव्या हाताने त्या गोळ्या भोवती गुंडाळते आहे !
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०
सुताचे गोळे आणि फुल वाती
फुलवाती
तुपात भिजवलेल्या फुलवाती
सुताच्या गोळ्या पासुन वाती तयार करण्याची पद्धत
एका हातात सुताचा गोळा धरायचा आणि दुसऱ्या
हाताच्या चार बोटांभोवती सुत गुंडाळायचे
गरजे प्रमाणे ३, ५, ७, ९,..... पदरी वाती
आजी
खुप छान झाला आहे लेख. अगदी तु वर्णन केल्याप्रमाणे आजीची मुर्ती अजुन ही डोळ्यासमोर येते. विशेषतः दिवाळीच्या दिवसात तिची वाता करायची धांदल असे. खुप वाती लागतात नं पणत्यांत लावायला. शिवाय दिवाळीत सगळ्यांना द्यायच्या पण असत, मला, तिच्या भाच्यांना, आणि कुणी गल्लीतील कोणी मागितल्या तर किंवा तिच्या मंदीरातील मैत्रीणीना.
ReplyDeleteखरंय , तिने कुणाकुणाला आणि किती प्रकारच्या आणि किती किती वाती करून दिल्या आहेत याची काही गणतीच नाही . अगदी जो मागेल त्याला करून देत असे . ते ही अगदी सुबक आणि अगदी न कंटाळता आणि खुप आवडीने , अगदी मनापासुन !
DeleteKhup chhan aathwan....chhan lekh
ReplyDeleteमनिषा मनःपूर्वक धन्यवाद ! 🥰
Deleteअगदी खरच! लेख वाचल्यावर वाता करणारी आजी डोळ्यासमोर आली.
ReplyDeleteखरंय , आजी म्हटलं की वातींची आठवण होते आणि वाती पाहिल्या की आजीची आठवण होतेच !
DeleteAg mazyajaval ajunahi aaichya hatacha sutacha gola aahe. Mi sambhalun thevlay. Aai kadhich thakaychi nahi vata kartanna khup tas houn Jayche tari ti tashich aka thikanavar vata karat basleli asaychi. Khup patience hota tichyamadhe .
ReplyDeleteतुझ्या आणि माझ्याकडेच काय आपण आपल्या सगळ्यांकडेच असतील हे सुताचे गोळे आणि काही फुलवाती सुद्धा ! वाती करणे खरं म्हणजे तिच्यासाठी एकप्रकारचे मेडिटेशन होते असे मला वाटते ! त्या मुले ती तासंतास त्यात हरवुन जात असे . किती वेळ झाला याचे सुद्धा तिला भान राहत नसे .
DeleteChan varnan, chan athavan, chan sutacha golache, vatiche pic
ReplyDeleteAni tyahunhi sunder tey varnan chotasha topalit janu chota sa dhag👌
Aajiche pic 👌
हो ग , खरंच फारच सुंदर दिसे तो छोटासा ढग तिच्या टोपलीत ! मला तर फारच आवडे तो बघायला आणि त्याला हात लावायला सुद्धा . पण सारखेच हात लावायला परवानगी नसे . कारण सारखा सारखा हात लावला तर तो पांढरा शुभ्र ढग काळवंडून जायची शक्यता असे . मनःपुर्वक धन्यवाद !
Deleteत्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे या वाती लागणार कधी कधी आजी मंडळी छोटी धनुकली वापरायच्या काहींचा संकल्प असायचा
ReplyDeleteहे धनुकली प्रकरण काय आहे ? मला याबद्दल अजीबातच माहिती नाही . तु जरा सविस्तर माहिती सांगशील का याबद्दल .?
Deleteखरोखर आजही आईची मुर्ती डोळ्यासमोर उभी राहते. कितीतरी प्रकारच्यावाती कुणालाही करून द्यायची अनंत वात अखंड वात देहवात त्रिपुरीवात भागवतवात अशा अनेक याप्रकारच्या वाती बनवून देत असे. मंदा चौथरी.
ReplyDeleteहो ना कितीतरी प्रकारच्या वाती ! छान तू इथे जवळ जवळ सगळ्याच वातींचा उल्लेख केलास . या सगळ्या वाती , त्यांची नाव आणि त्या कशा करायच्या यावर सविस्तर लिहिले तर अजुन एक मोठ्ठा लेख लिहिला जाईल !
Deleteअग, मीपण या वाती आई कडून शकले नाही आणी आता येत नाही त्यामूळे खूप पश्चाताप होतो तेव्हा आईची खूप आठवण येते
ReplyDeleteहोते असे बऱ्याच वेळा . पण आपण त्याची खंत करण्यापेक्षा , आपण बाकी जे काय तिच्याकडून शिकलो त्याबद्दल आनंद मानु या असे मला वाटते .
Deleteपण तिचि आठवण ठेऊन तिच्या कार्याला ऊजाळा देऊन सर्वांन समोर ठेऊन तिला ऊपक्रुत केल्या बद्दल अभिनंदन करावे तेवढे थोडे
ReplyDeleteती आणि तिचे कार्य कायमच आठवणीत असणार आहे , याबद्दल काही शंकाच नाही . पण या स्पर्धेच्या निमित्ताने त्याचे दस्तावेजीकरण ही जास्त आनंदाची आणि महत्वाची बाब आहे . त्याबद्दल आयोजकांचे अगदी मनःपुर्वक आभार मानु या , आपण सगळेच !
DeleteHo aaji vati karatana pahilya aahet mi pan chan karaychya
ReplyDeleteVarangavchi aai pan same ashich vati karane v sarvana dene mag tyat shravan mahinyachya lavaychya, vitthalachya ase prakar pan asayche.
Ajun pan vati baherun aantana yanchya subak vatinchi aathavan yete����
ज्यांनी ज्यांनी आजीला पाहिलेले आहे त्यांनी तिला वाती करतांना पाहिलेलेच आहे . वारणगावच्या आईच्या वाती मात्र मी कधी पहिल्या नाहीत . पण चला या निमित्ताने ह्या माहितीतही भर पडली हे ही नसे थोडके !त्याबद्दल खुप सप्रेम आभार !
Deleteखूप सुन्दर आठवण खरे ते दिसते तितके सोपे नाही बारीक दोरा काढणे
ReplyDeleteसुंदर आठवण तसेच निगुतीने करावे लागते मला तर फुलंवाती अजूनही जमत नाही��
लेख मस्त झाला आहे
खरंच खुपच सुंदर आठवण आहे ही तिची आणि तिच्या वातींची ! आणि नाहीच हे सगळे दिसते तितके सोप्पे . एक दुर्मीळ कौश्यल्य ! मनःपुर्वक धन्यवाद !धन्यवाद !
Deleteअतिशय वेगळा विषय घेतला आहेस ह्या लेखासाठी. कापसाच्या वाती वळणे हा प्रकार मागच्या पिढी बरोबरच अस्तंगत झाला आहे. नव्या पिढीला ह्याची माहिती असायची काही शक्यता नाही कारण हल्ली वाती रेडीमेड मिळतातच. पण तू हे डॉक्युमेंटेशन करून ठेवते आहेस त्याचा पुढील पिढ्यांना नक्कीच फायदा होईल. आम्हाला पण लहानपणी कापूस स्वछ्छ करून, सरकीच्या बिया काढून, पिंजून सुत कताई केल्याची आठवण झाली. त्या काळी दुसरा कोणासाठी शारीरिक कष्ट करणे काही वाटायचेही नाही. हा त्यांच्या दिनक्रमाचा एक भागच होता. तुझ्या आजीने सगळ्यांना वाती करून देऊन खूप पुण्य जमवले होते आणि ते पण तिने अतिशय आस्थेने अणि जाणीवपूर्वक केले होते. एका वेगळ्या मऊ सूत विषयाचा तुझा हा लेख आजीच्या आठवणीने आणि मायेने तेवढाच उबदार झाला आहे
ReplyDeleteहो या सगळ्या दस्तावेजीकरणामुळे आमच्या सगळ्या आठवणी तर जपल्या जातच आहेत . पण बऱ्यचश्या गोष्टी ज्या पुढच्या पिढीला बघायला मिळणार नाही त्यांच्या साठी सुद्धा हे सगळे लिखाण खुप उपयोगाचे आणि महत्वाचे आहे . शारीरिक कष्टाचे खर्च मागच्या पिढ्यांना काहीच वाटत नसे . खरं तर हीच त्यांच्या निरोगी जीवनाची गुरुकिल्ली होती , जी आपण पूर्णपणे डोळ्याआड करतो पण तुम्ही कुठे जात होता सुत कताई करायला ? ही नवीनच माहीती मिळाली . मनःपुर्वक धन्यवाद !!
Deleteआजीचा फोटो पाहून आजीची आठवण झाली घरी आल्यावर आजी नेहमी विचारपूस करत असे
ReplyDeleteआजीच्या या आठवणीने आणि फोटो पाहुन सगळेच जरा भावुक झालेत . सगळ्यांच्याच मनात तिच्या आठवणी उचंबळुन आल्यात .....
Deleteआमच्या माहेरी पण धार्मिक वातावरण असल्यामुळे आजी आणि आत्या घरी आल्या की असेच अशाच वाती बनवून देत असत
ReplyDeleteवावा , फारच सुंदर आठवण तुमची ! 😊
Deleteतुझे लिखाण अतिशय छान असते तुझी आजी माझ्या सुद्धा लक्षात आहे.खुपच छान होती बालपणाच्या आठवणीत तू खूपच रममाण होते.
ReplyDeleteसगळ्या सगळ्या साठी तुझे खुप खुप मनःपुर्वक आभार ! आणि खुप सारे प्रेम !
DeleteFrom Chhaya Birhade
ReplyDeleteतुझी माझी इथे अशी आभासी का होईना भेट होते याचा खुप खुप आनंद होतो मला !
Deletei really feel very happy n blessed !
aatyachya vaati khupch chan
ReplyDeletetichya sarkhe koni bhagavat aikanar nahi ani vaati pan karnar nahi
खरंच ग , तिच्या वाती सारख्या सुबक वाती मी आज पर्यंत कुठेही आणि कधीही पाहील्या नाहीत . आणि इतक्या वेळा भागवत सुद्धा कोणी ऐकले नसेल आयुष्यात !
Delete