साय आणि पुढील प्रवास-३
(घरातील गमती जमती)
आता, आज ताकाच्या तिसऱ्या भागाची गोष्ट. हा भाग आमचा, घरातील सगळ्या मुलांचा अगदी सगळ्यात आवडीचा भाग! साधारणपणे सगळीकडे इडली, डोसे, ढोकळे करायचे म्हणजे तांदूळ आणि डाळी बारा तास भिजविल्या जातात. मग बारा तास आंबवण्यासाठी ठेवून, मग ते ते पदार्थ केले जातात. आता तेव्हा आमच्याकडे मिक्सर नव्हते आणि घरात भरपुर सदस्य, त्यामुळे येव्हढे सगळे पाट्यावर वाटणे म्हणजे फारच किचकट काम. दळणाच्या लेखात सांगितलेच आहे, इडली आणि ढोकळ्याचे पीठ सुद्धा दळुन आणले जात असे. हे पीठ अर्थातच बाकी पीठासारखे बारीक पीठ नसे. थोडं चरंमरं दळलेले असे. थोडक्यात आज बाजारात इडली रवा वगैरे मिळतो तसे. तर आज या तिघंही पदार्थांच्या गमती जमती आणि त्याचा ताकाच्या तिसऱ्या भागाशी असलेला संबंध काय हे सगळे सविस्तर सांगते.
खरतरं आम्ही काही मोठ्या महानगरात राहत नव्हतो. पण अगदी लहानपणी सगळेजण पोळी, भात, भाजी जसं नेहमी आणि सहजपणे खातात आणि ते पहिल्यांदा कधी खाल्ले हे माहित नसते, आठवत नसते. तसेच आम्ही इडली, डोसे, ढोकळे सुद्धा अगदी लहानपणापासुन खाल्ले. पहिल्यांदा कधी खाल्ले ते आठवत सुद्धा नाही. बरेच मोठे होईपर्यंत आम्हाला माहीतच नव्हते, हे पदार्थ मुळात दक्षिण भारतीय आहेत म्हणुन. चौधरी सदनात दुसऱ्या मजल्यावर अर्ध्या भागात बँक होती आणि अर्ध्या भागात त्या बँकेचे मॅनेजर राहात असतं. त्यापैकी एक दक्षिण भारतीय होते. त्यांच्या कडे इडली डोस्याचे पीठ वाटण्यासाठी, तो दगडी रगडा होता, हाताने करावे लागे. तेव्हा अजुन विजेवर चालणारे रगडे आले नव्हते. तेव्हाच म्हणजे वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच मी तो रगडा आणि त्यात वाटतांना पहिले होते. मला इतके वर्ष वाटत होते, मम्मी त्यांच्याकडूनच इडली डोसे करायला शिकली. पण आता या ब्लॉगच्या निमित्ताने, या विषयावर चर्चा झाली, तेव्हा समजले, ते येण्याच्या आधी पासुनच हे पदार्थ आमच्याकडे केले जात होते. गमतीचा भाग म्हणजे आता तिलाही आठवत नाही की ती कुठून शिकली हे पदार्थ करायला.
पहिला पदार्थ, इडली, माझ्या अगदी खुप आवडीची, आजतागायत. कधीच मला नकोशी होत नाही, कंटाळा येत नाही, अगदी कितीही वेळा खाल्ली तरी. इकडे कढी भाताचे जेवण झाले की आम्हाला वेध लागत, मम्मी कधी इडलीचे पीठ भिजविते. आमच्याकडे एक मोठा स्टीलचा गंज( उभे भांडे म्हणजे उंची जास्त असलेले ) होता, खरतरं अजुनही आहे. या गंजात हे इडलीचे पीठ भिजविले जात असे. हे पीठ भिजवतांना, ते आंबविण्यासाठी, तो ताकाचा तिसरा भाग वापरला जात असे. बारा तास भिजविले की लगेच इडल्या होत या पिठाच्या. हे पीठ भिजवितांना पाहीले की अर्धा जीव तिथेच सुखावत असे. कारण आता खात्रीने इडल्या खायला मिळणार, ही जाणीव होत असे.
आता यात गम्मत अशी होती की, घरातील पुरुष मंडळींना पोटभर इडलीचे जेवण आवडत नसे. मग त्यांच्यासाठी साधं वरण आणि पोळी केली जात असे. करायला थोडे सोयीचे म्हणुन असावे. कारण सांबार करण्यासाठी तुरीची डाळ शिजवावीच लागे. मग त्यातीलच थोड्या डाळीचे वरण करायचे आणि काही पोळ्या. त्यामुळे नेहमीच आधी डाळीचा कुकर लावला जात असे. ही वेळ रविवार सकाळ किंवा कोणतीही संध्याकाळ असेल, म्हणजे मी घरात असेल, तर मला फारच राग येत असे. मला वाटे मम्मीला कळत कसे नाही, मला इडली खायची किती घाई आहे, का ही आधी डाळीचा कुकर लावते? मग ही शिजलेली डाळ कुकर मधुन काढली की मग त्यात इडली करायला सुरुवात होत असे. इडली करण्यासाठी म्हणुन कुकर लावला की सगळ्या घरात एक मस्त आंबुस वास दरवळत असे. आमचा कुकर मोठ्ठा होताच. पण मम्मीने त्यात बसेल असे मोठ्ठे इडलीचे स्टॅन्ड शोधून आणलेले होते. एका वेळी त्यात वीस इडल्या होत असत. त्या आधी मात्र एक खास इडली ढोकळे कुकर होता. त्यात इडल्या करण्यासाठी छोट्या छोट्या वाट्या होत्या आणि ढोकळे करण्यासाठी पसरट आणि थोड्या कमी उंचीच्या ताटल्या होत्या.
आता डाळीचा कुकर आधी लावला की, मला राग येत असे याचा अर्थ असा नाही की मला सांबर आवडत नसे. उलटपक्षी जेवायला बसल्यावर सांबारशीवाय होतच नसे मला. मम्मी, एका अगदी हाडाच्या वैद्यांची मुलगी . त्यामुळे सगळे पदार्थ अगदी आरोग्यवर्धक असावे, याकडे तिचा कटाक्ष असे. त्यामुळे सांबारात सुद्धा शक्य तितक्या भाज्या ती घालत असे. मग आम्ही खातांना त्या भाज्या बाजूला काढून ठेवत असु. मग ओरडा खात असु आणि मग त्यावर त्या भाज्या पण खाऊन टाकत असु. मग या सगळ्यावर तिनेच एक तोडगा शोधून काढला. सगळ्या भाज्या शिजवून झाल्या की, ती त्यात सरळ रवी घालुन घुसळुन सगळ्या भाज्या डाळीसोबत एकजीव करून टाकत असे. मग भाज्या बाजूला काढून ठेवायचा प्रश्नच येत नसे. सरळ सगळं पोटात जात असे. पण सगळ्या भाज्यांमुळे सांबाराला एक हिरव्या रंगाची छटा येत असे. पण नंतर तोच सांबर खूप आवडायला लागला. आणि आता वर्षानुवर्षे ती चव न मिळाल्याने जीवाची जी काही तडफड होते, ती इथे शब्दात सांगणे केवळ अशक्य!
चटणी. इडली सोबत खायची असली तरी आमच्याकडे ओल्या नारळाची चटणी होत नसे. कायम शेंगादाण्याचीच चटणी होत असे. मी अगदी अजुनसुद्धा शेंगादाण्याचीच चटणी करते इडली सोबत. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसुण, मीठ आणि कोथिंबीर, सगळे एकत्र वाटले की झाली चटणी तय्यार. अर्थातच तेव्हा पाट्यावर वाटली जात असे चटणी.
चटणी. इडली सोबत खायची असली तरी आमच्याकडे ओल्या नारळाची चटणी होत नसे. कायम शेंगादाण्याचीच चटणी होत असे. मी अगदी अजुनसुद्धा शेंगादाण्याचीच चटणी करते इडली सोबत. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसुण, मीठ आणि कोथिंबीर, सगळे एकत्र वाटले की झाली चटणी तय्यार. अर्थातच तेव्हा पाट्यावर वाटली जात असे चटणी.
इडलीचे पहिले स्टॅन्ड वाफवुन तयार झाले, की माझी इडली खायला सुरुवात होत असे. ही आमची खास पद्धत इडली खायची, जेवायला बसेपर्यंत. डावा हात आडवा करायचा आणि पाची बोट उभी करायची . या पाची बोटांवर एक इडली ठेवायची, समतल. मग उजव्या हाताने एका चमच्यात चटणी घ्यायची आणि या इडलीच्या वरच्या पृष्ठभागावर छान सगळीकडे पसरवुन लावायची. (अश्या पद्धतीने खायची असल्यास चटणी जरा घट्ट हवी, अन्यथा ती इडलीच्या गोलाकार पृष्ठभागावरुन खाली पडायची शक्यता जास्त.) अशी ही इडली अगदी येता जाता, चालता फिरता खाता येते. हा सगळा कार्यक्रम जेवायला बसेपर्यंत चालू असे आमचा. हो कारण सगळं तय्यार असले तरी, जोपर्यंत मम्मी जेवायला बसत नाही, तोपर्यंत आम्ही जेवायला बसत नसु, नेहमीच मम्मीसोबतच जेवण करायचे असे. पण इडली पाहील्यावर धीर राहात नसे. मग हा छान मार्ग सापडला होता. अजुनही मला या पद्धतीने इडली खायला आवडते.
शेवटचा टप्पा म्हणजे एका जागी बसुन इडली-चटणी-सांबारचे जेवण, मम्मी सोबत. हे खायची पण एक खास पद्धत . पोहे खायच्या छोट्या पण खोल ताटलीत दोन इडल्या घ्यायच्या. दोन चमच्यांचा मदतीने त्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे. मग त्यावर चटणी घालायची आणि त्यावर भरपुर सांबार घालायचा. मग हे सगळे दोन चमच्यांचा मदतीने छान कालवुन घ्यायचे. सगळं गरम गरम असले की सांबार प्रत्येक इडलीच्या तुकड्यात छान मुरतो, चटणीसोबत. आणि मग एका चमच्यात एक तुकडा घ्यायचा, दुसऱ्या चमच्याने त्यावर परत थोडा सांबार घालायचा, ताटलीमधला आणि मग खायचा. अगदी स्वर्गसुखाच्या पलीकडे! लिहिता लिहिता सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले!
सकाळी इडली केली असेल, तर आम्ही अख्खा दिवस फक्त इडलीच खात असु. संध्याकाळी केली तर दुसऱ्या दिवशी शिळी इडली सुद्धा खुप आवडे आम्हाला. इतकी की काही वेळा आमची त्यावरुन भांडण सुद्धा होत असतं. आम्हालाच नाही तर आमच्या सगळ्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा खुप आवडे, आमच्याकडची इडली. सगळ्या मैत्रिणी आमच्या घरी जमणार असतील, तर त्याची खास फर्माईश असे, इडल्यांची, अगदी प्रत्येक वेळी! इतकेच नाही तर, मध्ये काही काळ एक कुत्री पाळलेली होती. घरात इडली केली की तिला लगेच समजे. त्यादिवशी जर तिच्यासाठी इडली शिल्लक नाही राहिली आणि तिला पोळी खायला दिली, तर ती त्या दिवशी पोळी खात नसे, उपाशीच राहत असे. कारण तिला इडलीच हवी असे.
इडली ही नेहमीच होत असे म्हणजे खुप जास्त वेळा. त्यानंतर थोड्या कमी प्रमाणात होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा. अर्थातच ताकाचा तिसरा भाग, हे ढोकळ्यांचे पीठ भिजविण्यासाठी होत असे. ढोकळे साधारणपणे संध्याकाळीच होत असतं आणि अजुनही संध्याकाळीच होतात घरी. मी मात्र फारच कमी वेळा करते आणि वेळ ठरलेली नसते. ढोकळे करायला परत तीच अडचण, कुकर छोटा पडत असे. मग मम्मी सरळ एक मोठी घमेलीच गॅस वर ठेवतं अस. त्यात पाणी घालून मध्यभागी, ती लोखंडी मांडोळी(खास कामं आणि व्यक्ती-१ या लेखात उल्लेख आलेली) ठेवत असे. मग त्या मांडोळीवर जेवणाचे मोठ्ठे ताट ठेवून, त्यात हे भिजविलेले पीठ घालत असे. आणि मग यावर पितळी परात झाकण म्हणुन ठेवत असे. असे केल्याने भरपुर ढोकळे, कमी वेळात होत असतं. एकदा का वाफवायला ठेवले की परत तसाच आंबुस वास घरभर दरवळायला लागत असे!
मग हे वाफवुन ताटात तयार झालेले ढोकळे सुरीने कापुन त्याचे छोटेछोटे तुकडे केले जात असतं. आणि एक एक मोकळे करून ठेवले जातं. मग एका मोठ्या कढईत किंवा परत दुसऱ्या घमेलीतच तेल हिंग मोहरी आणि कढीपत्ता अशी फोडणी करून त्यात हे ढोकळ्याचे तुकडे घातले जात असतं. अजुनही घरी अशीच फोडणी घातली जाते. पण साधारणपणे बाकी सगळीकडे मात्र, वाफवुन तयार झाले की, ताटातच सुरीने काप करून, त्यावरच फोडणी घातली जाते. मी सुद्धा अशाच प्रकारे फोडणी करते आता.
आता या ढोकळ्यांबरोबर खायला म्हणुन खास खान्देशी निस्त्याची चटणी केली जात असे. निस्त्याची चटणी म्हणजे लाल वाळलेल्या मिरच्या, लसुण आणि मीठ एकत्र वाटायचे. पण आम्हा मुलांना ती चटणी फार तिखट लागे , म्हणुन मग आमच्यासाठी त्याच चटणीत चिंच-गुळ घालुन, आंबट-गोड चटणी केली जात असे. आता तर मी अशीच आंबट-गोड चटणी करते. कारण आता पण सहन होत नाही, ती तिखट निस्त्याची चटणी.
ढोकळ्यांचे इडली सारखे नाही. नुसते ढोकळे तयार झाले की तसेच एक एक घेऊन चालता फिरता खाता येतात. फोडणी केल्यावर अजुन छान चविष्ट लागतात आणि ते सुद्धा असे छान चालता फिरता खाता येतात. मग काय पहिले ताट वाफवून झाले की आमचे सुरु होत असे, एक-एक ढोकळा हातात घेऊन खायला. सरते शेवटी जेवायला बसल्यावर मात्र मस्त आंबट गोड चटणी सोबत खात असु. दुसऱ्या दिवशी शिल्लक राहीलेले असले तर पुन्हा दुसऱ्या दिवशीही खात असु, अगदी आवडीने.
आता तिसरा पदार्थ म्हणजे डोसे. डोसे करण्यासाठी इडलीचेच दळुन आणलेले पीठ वापरले जात असे आणि अर्थातच हे पीठ भिजवायला ताकाचा तिसरा भाग वापरला जात असे. नंतर जेव्हा खालच्या मजल्यावर दक्षिण भारतीय कुटुंब राहायला आले, तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून मम्मी डोस्याचे पीठ भिजवतांना त्यात थोडे मेथीचे पीठ घालत असे. डोसे मात्र वर्षातुन एक किंवा दोनदाच केले जात असतं. कारण घरात सदस्य भरपुर आणि प्रत्येकाला अगदी पातळ आणि कुरकुरीतच डोसा हवा असे. त्यामुळे करायला फारच वेळ लागत असे आणि बरेच त्रासदायक होत असे. पण जेव्हा केव्हा केले जात तेव्हा मात्र अगदी भरपुर पीठ भिजवीले जात असे . अगदी दोन दोन दिवस आम्ही फक्त डोसे आणि डोसेच खात असु. तेही कुरकुरीत! आम्हा सगळ्यांची तोंड आतुन अगदी सोलुन निघत असतं. इतके की काहीही खाल्ले तरी खुप तिखट लागे. पण तरी पीठ संपेपर्यंत आमचे डोसे खाणे काही बंद होत नसे.
डोस्यासोबत मात्र आमच्याकडे ओल्या नारळाची, दही घालुन चटणी केली जात असे . वरून मस्त हिंग मोहरीची फोडणी. खुपच सुंदर चव असे त्या चटणीची! मला तर अजिबात जमत नाही, तशी चटणी आता. बरं या दिवशी सगळ्यांना सोबत जेवता येत नसे. एक किंवा फार तर दोन जण एका वेळेला जेवायला बसु शकत असतं. त्यामुळे आपला नंबर यायची वाट बघायची आणि नंबर आला की जेवायला बसायचे. इडली ढोकळ्या सारखे हातात घेऊन चालता फिरता खाण्याची सोय नव्हती. पण जेवायला बसले अगदी चापून म्हणजे पोट फुटेपर्यन्त खायचे. एव्हढेच नाही तर, शेवटी मम्मी लोक जेवत तेव्हा पुन्हा त्याच्या ताटातील एक एक घास खाणे चालुच असे. असे जवळ जवळ दोन दिवस फक्त आणि फक्त डोसेच खात असु आम्ही, इतके आवडत आम्हाला तेव्हा. आणि मग दोन दिवस फक्त आणि फक्त डोसेच खाऊन आमचे मन आणि पोट एकदम तुडुंब भरुन जात असे.
आता मात्र मी कुरकुरीत वगैरे करत नाही आणि आम्हाला फारसे कुणाला आवडतही नाही कुरकुरीत. मला तर मस्त भरपूर कांदा आणि कोथिंबीर पेरून आणि त्यावर भरपुर तुप घालुन केलेला उत्तप्पा फार आवडतो. खरंतर, ही उत्तप्याची आवड सुद्धा एका मित्राने निर्माण केली माझ्यात. मग हा उत्तप्पा तसाच नुसताही चालतो, शेंगदाण्याच्या किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबतही आवडतो. किंवा सुकी चटणीची भुकटी मस्तपैकी सगळ्या उत्तप्प्यावर भुरकवलेली सुद्धा खूप आवडते! पण दिसावातुन फक्त एका वेळेला, पण खुप आवडीने खायला आवडतो.
खरंतरं साय आणि इडली, ढोकळे, डोसे यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण आमच्याकडे मात्र अगदी जवळचा संबंध होता तेव्हा. भरलेला सायीचं गंज बाहेर निघाला की आम्हाला पुढचे सगळे चित्र लगेच डोळ्यासमोर उभे राहत असे. त्या सायीचा असा छान गोड शेवट होत असे आमच्याकडे तेव्हा . खरंतर आंबट शेवट , पण अगदी हवाहवासा वाटणारा एका वेगळ्या आणि खऱ्या अर्थाने गोड! अशा प्रकारे, आमच्या सायीचा प्रवास इथे पूर्णत्वास जात असे...
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
२६ ऑक्टो २०२०
तय्यार इडल्या
कुकर मध्ये ठेवण्यासाठी तय्यार
इडल्या वाफवुन तय्यार
सांबर आणि चटणी
चालत फिरत इडली चटणी
खायची माझी खास पद्धत
चालत फिरत इडली चटणी
खायची माझी खास पद्धत
इडली खायच्या वेगवेगळ्या पद्धती
इडली खायच्या वेगवेगळ्या पद्धती
जेवायला बसल्यावर माझी इडली खायची पद्धत
पायरी १
इडलीचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर
चटणी घालायची
पायरी २
मग त्यावर भरपुर सांबर घालायचा
पायरी ३
सगळे कालवुन घ्यायचे
आणि
आडवा हात मारुन चापायची
इडली खायच्या वेगवेगळ्या पद्धती
इडली खायच्या वेगवेगळ्या पद्धती
इडली खायच्या वेगवेगळ्या पद्धती
तट्टे इडली करण्याची पद्धत
तट्टे इडली
मुद्दे इडली
रागी (नाचणी) इडली
पूर्वीच्या काळी वापरला जाणारा दगडी रगडा
आणि
दगडी इडली पात्र
अशी घमेली गॅस वर ठेवुन त्यात
ताट ठेवुन ढोकळे वाफवायचे
ढोकळा वाफवुन तयार
कापुन फोडणी देण्यासाठी ढोकळा तय्यार
आमच्या खास पद्धतीने फोडणी दिलेला ढोकळा
ही साधारण सगळ्यांची फोडणी द्यायची पद्धत
लाल मिरच्यांची साधी आणि
आंबट गोड चटणी
वाढून तय्यार आहे !
पुदिना चटणी सोबत
दोन्ही चटण्यांसोबत
फोडणी दिलेला ढोकळा
कुरकुरीत डोसा आणि चटणी
माझी हल्लीची उत्तप्पा आणि चटणी खाण्याची पद्धत
डोस्याचा माझ्या सगळ्यात आवडीचा प्रकार
सेट डोसा
दक्षिण भारतात असा पापडासारखा
कुरकुरीत डोसा मिळतो आणि हा काही महिने टिकतो
हाच तो आमचा गंज !
ज्यात इडली , ढोकळे डोस्याचे
पीठ भिजविले जात असे .
Mastch sagle agdi adviche padarth ani khanyachya vegveglya paddhati. Mansach majja.
ReplyDeleteखुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deletekhup mast warnan agadi tondala pani sutale wachun .
ReplyDeleteहा हा हा!! ते तर व्हायलाच हव!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
👌varnan
ReplyDeleteMala tuzha vadhdivasala tuzya ghari sagala maitrini jamun idali sambar, chatani khalaleli athavali tashi mi tey kadhihi visaru shaknar nahi karan tyachi taste😋 ,ani vishesh mhanje mi idali ha prakar mazha ayushat pahilanda tuzha gharich khalaleli.
हा प्रसंग मला अजिबातच आठवत नाहीये.
Deleteतुझी इडली खायची पहिलीच वेळ असल्याने तुझ्या ते बरोब्बर लक्षात राहिले!
आनंदी क्षणांचे आनंदी धन्यवाद 🙏 😊 😍 💃💃💃
Agadi mast bet jamlay.. khupach chhan 👍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteWow khu chhan Aata lavakarch takate me pan Idali aani dhokala che����������
ReplyDeleteअरे लगेचच टाका, मी तर हा लेख लिहिल्या पासुन सारख्याच इडल्या करत असते!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇
वाचूनच पाणी सुटले तोंडाला, मग कधी बोलावतेस खायला? आता तशीही तू दक्षिणात्य च झाली आहेस....������
ReplyDeleteये अगदी कधीही ये! कायमच स्वागत आहे तुझे, मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteइडली मला पण खूप आवडते ��कधी पण दया पण मऊ हलकी हवी व डोसा कुरकुरीत माझी आई पण पीठ बनवून ठेवायची मी पण बनवून ठेवते त्यात मेथी घातले की छान फरमेट होते असे आई ला कोणीतरी सांगितले होते थंड प्रदेशात त्याचा वापर करतात पण मेथी टाकून काढून घ्यायची आईव तुळशीची 4 पाने ती पण करताना काढून घ्यायची विशेष थंडीत करताना इतर वेळी नाही
ReplyDeleteलेख मस्त झाला आहे��
ढोकळा विशेष आवडत नाही
अरे व्वा, ही हवामान संबंधित माहिती नवीनच माझ्यासाठी, धन्यवाद त्याबद्दल.
Deleteतुळशीची पाने ग्रहणाच्या वेळे ठेवतात हे माहीती होते
मला ढोकळा आवडतो खुप पण आमच्या घरी केलेलाच 😍😇😋
सप्रेम धन्यवाद 😍 😇
Chalat firat idli khayla Mala ajunahi aavdte aani yogayog paha mi aajch idli keliy. Mala tuzya gharchya sambarachi aathvan aali aani tondala pani sutla khup. Malahi idli kadhihi khayla aavdte kantala yet nahi kadhi aani tu dilelya pratyek padhdhatine khayla aavdte.
ReplyDeleteमी सुद्धा अजुनही, इडली तयार झाली की चालत फिरत खाते, जाम आवडते मला तशी इडली खायला.
Deleteआता माझ्याकडच्या सांबाराची आठवण झाली तर तुला यायला पाहीजे माझ्याकडे, मोठ्ठ भांड भरून करून ठेवते. मनभर अणि पोटभर खा 😇😍😇
Tons n tons of love 😍
Idali sarakhach mau mau lekh �� mast vatala vachun majja aali
ReplyDeleteवावा या मऊ मऊ अभिप्राय साठी मऊ मऊ धन्यवाद 🙏 ☺ अणि खुप सारे प्रेम 😍 😇
Deletewa wa swadist lekh aahe sarvana aawdanra dosa, edali, bhokla khup mast lihile aahes g����
ReplyDeletekalach edali khaali pan mamana dosach hava asto ��
photos pan chan v tuzi edli khaychi padhat pan mast��
आमच्याकडेही याला डोसा हवा असतो, हा हा हा 😁😀
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
खरच. दिवाळीत इतक गोड गोड झाल आहे की असा चविष्ट उतारा हवाच होता, तोंडाची चव बदलायला. इडली आणि डोसा आता अख्ख्या भारताची प्रमुख आवड झालेले आहेत. ढोकळा मात्र इतका देशभरात पाय पसरू शकलेला नाही. ह्या सगळ्या mouth watering dishes करण्याच्या पद्धतीबाबत detailing चांगल आहे पण आमचा interest जास्त खाण्याकडे असल्याने तुझी इडली चालत चालत आणि balance करत करत खायची स्टाइल आवडली . लहानपणी आई पापड किंवा कुर्डया तळत असताना असेच हातावर घेऊन खायची मज्जा यायची. Utappa हा एक अतीशय टेस्टी पण माझ्या मताप्रमाणे jara दोडका खाद्य पदार्थ आहे. वरील तिन्ही टेस्टी खाद्य प्रकारापेक्षा भूक भागवायला Utappa Ekdum बेस्ट आहे. असो सगळ्या चविष्ट पदार्थाच्या रसभरित आणि छायाचित्रां सकट केलेल्या वर्णनाबद्दल धन्यवाद. हॅप्पी Deewali again
ReplyDeleteतळलेल्या कुरडया तर अजुनही मी चालत फिरत खात असते. पण चालत फिरत इडली खायची मजा काही और असते. करून बघा एकदा तरी नक्की, मज्जा येईल अणि आवडेल सुद्धा! 😍😀
Deleteउत्तप्पा मला वाटते सगळ्यांनाच आवडतो, माझे मत
अर्थातच व्यक्ति तितक्या प्रवृत्ती!
दिवाळी जोरातच चालु दिसतेय अजुन
मी तर विसरून पण गेले
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Khupach chhàn lekh. Me pan ajunahi idali karte ani aaplya padhatine khate. Ajunahi khup maitrini bhetalya ki mummychya hatachi idli chatani chi khupach chavine aathavan kadhatat. Mazya mulanapan khupach avadte tyamule nehamich hote ghari. Me pratyek veli dal tandul bhijavunach karate. Ani sobar Olya khobaryavhich chatani karte.
ReplyDeleteआपण कुठेही असलो अणि कितीही मोठ्या 😉😉 झालो तरी आपली इडली खायची पद्धत काही बदलणार नाही हे नक्की 😋😍
Deleteहे मात्र खरे, आपल्या सगळ्या मैत्रिणींना मम्मी च्या इडल्या ची खुप आठवण येते!
😍 😇😋😋
छान आंबट गोड आठवणी..
ReplyDelete-संजय कोल्हे
मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏🤩
DeleteIdali,डोसा व ढोकळा मालाही खुप आवडतात..
ReplyDeleteचालत फिरत इडली चटणीचे DISC-सारखे हातात घेऊन खाणे खूपचछान वर्णिले ...पापडात्मक डोसाही कडक वाटतोय..
चालत फिरत इडली खाण्यासारखा आनंद नाही या जगात ! still i love to eat that way n i do eat that way !!
Deleteखूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद !