Skip to main content

वस्तु - शेवयांचा घडीचा (घोडीचा) पाट (वारसा स्पर्धा २)

 वस्तु  - शेवयांचा घडीचा (घोडीचा) पाट 

(वारसा स्पर्धा २)


                                 अलीकडे आपल्या पारंपरिक भारतीय शेवया अगदी नामशेष झाल्या आहेत . पण परदेशी न्युडल्सनी मात्र चांगलाच धुमाकूळ घातलाय आणि अतिशय लोकप्रिय सुद्धा झाल्यात आपल्या भारतात . आपल्या आजच्या पिढीला शेवया माहितीच नाही म्हटले तरी त्यात काही वावगे होणार नाही . 
                                  आता शेवयाच नामशेष झाल्यात म्हटल्यावर , त्या करण्याच्या पद्धती आणि उपकरणे सुद्धा पूर्णपणे काळाच्या आड गेली आहेत . मधल्या काळात शेवया करायचे साचे(मशीन) आले होते , मी तेव्हा ते पाहिल्याचे स्पष्ट आठवते आहे . फार कमी वेळात भरपूर शेवया होत त्यात . पण खूप शक्ती लागे आणि शेवया एकदम जाड . त्या तुलनेत पाटावर केलेल्या शेवया फारच बारीक आणि नाजूक . डब्यात भरून ठेवतांनाही हळुवार भराव्या लागत , नाहीतर तुटून चुरा होण्याची शक्यता . टु मिनिट्स न्युडल्स पेक्षा लवकर शिजत आणि पौष्टीक . 
                                   तर हे शेवया बनवायचे पाट सुद्धा दोन प्रकारचे , एक म्हणजे नुसती फळी , त्याला वरच्या बाजूला काही भागात एकमेकींना समांतर वीस-पंचवीस बारीक बारीक खाचा केलेल्या असत . त्या भागावरच सोजीचा भिजवलेला गोळा ठेवून "शेवया वळायच्या" असतात . पण हा पाट खाटेवर किंवा खुर्चीवर ठेवून बसावे लागे आणि पायात घट्ट पकडून ठेवून "शेवया वळव्या" लागत . पण हे फारच गैरसोयीचे आहे . तरी पण बायका तासन् तास बसून त्यावर शेवया करत , काही ठिकाणी अजूनही करतात . 
                                   पण आमच्या कडे मात्र हा घडीचा/घोडीचा पाट होता , अजुनही आहे . या पाटाची घडी होते आणि त्यावर घोड्यावर बसतो , तसे दोन बाजूला दोन पाय टाकून बसावे लागते म्हणून घडीचा किंवा घोडीचा पाट असे दोन्ही शब्द वापरले जातात . हा एकदम आरामदायी , यावर बसून अगदी सुलभतेने "शेवया वळता" येतात . आमच्या चौधरी सदनाचे काम चालू असतांना , त्या सुतारांकडून बनवून घेतला होता . अगदी लांबी , रुंदी , उंची एकदम बरोब्बर , कुणी डिझायनर ने ड्रॉइंग न देता . इतके वर्ष घरी आणि शेजारी-पाजारी वापरून सुद्धा अगदी जसाचा तसा आहे . माझं आणि या पाटाचे वय जवळ जवळ सारखेच असावे. 

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्ध २)
मे २०२०


घडीचा किंवा घोडीचा शेवया
करायचा पाट 



असे बसुन शेवयाला 
वळल्या जातात 



घडी करून ठेवलेला 
शेवया पाट 



फळीचा पाट 



फळीचा पाट वापरला तर 
असे खाटेवर किंवा खुर्चीवर 
बसावे लागते 
पण अजिबात सोयीचे नसते 















Comments

  1. Wa chan photo ase etake june photo durmilach
    Shevaicha pat 👌
    Juna athavani jagi zhala mi pan mazha aajila tya shevaya karta na bhaghitale ani mi chalupan lagala mala khoop awadaiche tey karaila

    ReplyDelete
    Replies
    1. जुन्या फोटोंची गोडी काही औरच असते !आपल्या पिढीत बहुतेक सगळ्यांनी चाळण्याचे काम करून आपल्या आई आणि आजीला मदत केलीय ! खुप सारे धन्यवाद !! 😇🤩

      Delete
  2. Khupach chan photos aahe shevya patacha aata disat nahi log machine madhe banavatat

    ReplyDelete
  3. आमच्या कडच्या फळीच्या पाताची आठवण झाली...

    ReplyDelete
    Replies
    1. छान !  फळीचा पाटच असे सगळ्यांकडे !

      Delete
  4. shevaya v tyacha ghadicha paat sarv mahiti khup chaan . amhi pan karun pahayacho , pan kadhich jamlya nahit
    awadatat dudh shevaya khayala

    ReplyDelete
    Replies
    1. मला मात्र अजिबात आवडत नाहीत दूध शेवया खायला किंबहुना मलातर त्या खाताच येत नाहीत 😁😂🤣 !लहानपणी सगळ्यानांच सगळे करून बघायची हौस असते , पण जमत मात्र नाही . पण त्या दांडग्या हौसेला दाद द्यायलाच हवी !😍🥰😇

      Delete
  5. स्वाती प्रभुणे October 11, 2020 5:27 pm

    मस्तच ग असा पाट मी पहिल्यांदाच पहिला wow आमच्याकडे पाटावर करत काही सुगरण बायका मला आठवत नाही पण हात शेवया करत व दोऱ्या बांधून त्यावर टाकत अजूनही खेडे गावात बघायला मिळतात नाहीतर मशीनच्या सरसकट मिळतात

    ReplyDelete
    Replies
    1. हो , साधारण सगळ्यांकडे तो फळीचाच पाट असे . हा खास आमचा ! माझा तर खुप आवडीचा आहे . मशीन नवीन आले तेव्हा मला फारच कौतुक वाटले होते त्याचे , बरीच लहान होते ना मी तेव्हा !!😍🤩
      अजूनही बऱ्याच ठिकाणी दोरीवर वाळत टाकलेल्या दिसतात , सगळ्यांना sun dried हव्या असतात ना !😁😁

      Delete
  6. अप्रतिमच शेवया बनवण्याची प्रक्रिया वर्णिली आहे,
    I liked the design of घोडीचा पाट and grooved textured on it.
    शेवयाचा सुरकुंबा आणि गव्ह्याच्या शेवया चा उपमा आवडतो माला.

    ReplyDelete
    Replies
    1. शेवयांची सविस्तर माहिती बाकी आहे अजून . मला सुद्धा उपमा आवडतो ! खुप धन्यवाद !😍🥰

      Delete
  7. पाटावरच्या शेवाया ची चव खुपच छान लागते आता मशीन च्या शेवाया कराव पण येवढी मजा नाही छान. लेख शेवाया न विषयी आवडा मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. हा फक्त पाटाबद्दलचा लेख आहे . शेवयांबद्दल चा येईलच लवकर , तो तुम्हाला नक्कीच आवडेल ! धन्यवाद !

      Delete
  8. विकास गायकवाड October 13, 2020 6:33 pm

    ताई हे सर्व काही खुप छान लिहिले आहे पण पाटावर बसुन शेवया बनवून पहिले आहे ,  मात्र खाण्यालायक नव्हत्या 

    ReplyDelete
    Replies
    1. बालपणीच्या गोड आणि मजेशीर आठवणी ! धन्यवाद सांगितल्याबद्दल !😍😍🤩🤩

      Delete
  9. I have never seen shewaicha path..only heard about it.....very informative article....

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे धन्यवाद !! 😇🤩

      Delete
  10. Chchan lihiles
    Shevyanche varnan khup chchan aahe

    ReplyDelete
  11. Wa mi first time baghitala ha paat... Lekh pan mast...chan mahiti milali����

    ReplyDelete
  12. तो पाट तुझ्यापेक्षा मोठा असेल वयाने शेवया करायला बन्सी गहू लागायचे त्याची पण एक लांबलचक प्रोसेस असायची मॅगीच्या जमान्यात त्या शेवया लुप्त होत आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. असेलही माझ्यापेक्षा वयाचे मोठा . ती शेवयांची सगळी पद्धत सविस्तर वाचायला मिळेलच लवकरच एका खास लेखात . खुप धन्यवाद !😃😄🙏😇

      Delete
  13. किती unique विषय आहे हा. तू लेखात म्हणाल्या प्रमाणे एक तर शेवया हाच प्रकार आता इतिहासजमा होतो आहे त्यात त्या करायचा पाट म्हणजे माहीत असण्याचा संभवच नाही. पुरुष असल्याचा advantage असल्यामुळे शेवयांची खीर मस्तपैकी ओरपणे ह्या पलिकडे त्यांची माहिती नव्हती. तुझ्या लेखनामुळे ह्या अनोळखी दुनियाची माहिती कळली. खर तर इतक सोपं आणी functionally suitable डिझाईन आहे त्या पाटाचं पण ज्याने ते केलं असेल त्याने किती डोकं चालवलं असेल. असो. तुला असेच नवे नवे आणि मुलुखावेगळे विषय सुचत जावो आणि आम्हाला त्या अनोळखी दालनात नवी नवी माहिती मिळो अशी शुभेछा. 👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. आपण भारतीय आपली संस्कृती विसरत चाललो आहोत , त्यामुळे ती पुढच्या पिढीला माहिती असणे शक्यच नाही . ती किमान माहिती असावी यासाठीचा माझा हा छोटासा प्रयत्नच आहे . पुढील पिढीतील काही लोक नक्कीच असतील ज्यांना हे सगळे अभ्यासण्याची गरज वाटेल , त्यांच्या साठी ही थोडीशी मदत . मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...