Skip to main content

आनंदाचा झरा (वारसा स्पर्धा २)

 आनंदाचा झरा 

(वारसा स्पर्धा २)


                                            आज मी माझ्या थोड्या वेगळ्या वारस्या बद्दल सांगणार आहे . या स्पर्धेतील कुठल्याही सदरात न मोडणारा . माझ्या सतत आनंदाने झिरपत असणाऱ्या झऱ्याबद्दल . हा वारसा भौतिक स्वरूपाचा नसल्याने अर्थातच याचा फोटो मी देऊ शकणार नाही . 
                                           एकदा मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते . काही एक गोष्ट मला तिच्यासारखी जमत नव्हती , बहुतेक त्याबद्दल . आणि मी एकदम बोलून गेले , काय ग तुझ्यातले माझ्यात काही उतरले नाही . तू इतकं काय काय आणि उत्तमच करत असते आणि मला त्यातलं फारस काही जमत नाही . तर ती म्हणाली , उतरली आहे की एक महत्वाची गोष्ट , माझ्यातील उत्साह आणि कायम आनंदी रहाणे . काय खुश झाले खरंच मी त्या क्षणी ! आणि जसजसा विचार करत गेले किंवा आजही करते , तेव्हा जाणवते खरंच हे किती खरं आहे . 
                                            माझ्या आईला अमुक एक गोष्टीची आवड नाही , अशी गोष्ट सापडणे फारच कठीण . काय काय , शक्य ते सगळे ती करत गेली , अगदी आजतागायत करतच असते. अगदी लग्न झाल्याच्या क्षणापासून बऱ्याच मोठ्या एकत्र कुटुंबाचा भार सांभाळला , अगदी आजतागायत . ही सगळी काम काही फार सोप्पी आणि हवीहवीशी नसतात खरंतर . पण तिने प्रत्येक काम उत्साहानेच केले . त्यामुळे अगदी लहानपणापासून आम्हीसुद्धा झेपेल तसे एक एक काम शिकत/ करत गेलो . पण ते काम कधी काम वाटलेच नाही . 
                                            तिने वेगवेगळी , हर तऱ्हेची काम केली , छंद जोपासले . आणि आता मला पण जाणवते , मी पण सारखे काय काय करतच असते आणि त्याच उत्साहाने . फार भाग्यवान आहे मी असे वाटते मला , हा वारसा तिच्याकडून मला मिळाल्याबद्दल ! तिच्या अडचणी वेगळ्या , माझ्या वेगळ्या , पण खूप ! तिचे छंद वेगळे , माझे वेगळे पण उत्साह तोच ! तिच्या कामाचे स्वरूप वेगळे , माझे वेगळे , पण पार पडण्याचा आनंद तोच ! कायम स्वतः तर आनंदी राहायचेच , पण तोच आनंद सगळ्यांनाही वाटत राहायचे आणि सगळ्यांना आपल्याबरोबर आनंदी ठेवायचे ! देवाचे शतशः आभार हा अमूल्य वारसा दिल्याबद्दल ......सतत नव्या उत्साहाने आणि आनंदाने सतत कार्यशील राहण्याचा वारसा ....... 

(ही माझी सगळ्यात आवडती प्रवेशिका आणि सगळ्यात आवडता वारसा!)

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०


मला स्वतःला , चित्र असलेले लिखाण वाचायला जास्त आवडते .
अजूनही मी चित्र आधी बघते , मग वाचते . 
या प्रवेशिकेला फोटो नाही म्हटल्यावर मलाच पटले नाही . 
मग मीच हे आई-मुलीचे 👩‍👦 प्रतीकात्मक चित्र काढले 
आणि इथे चिटकविले !😍🥰



Comments

  1. Nice. I remember this picture you had drawn seeing one of the kids dress. Am I right.

    ReplyDelete
    Replies
    1. oh my god !! i too remembered her n tempted to post her foto here......but ....
      such a sweet memories we share!!! tons of love !🤩😍🥰🤗

      Delete
  2. जनार्दन चौधरीOctober 23, 2020 12:45 pm

    वास्तविकाचे यथार्थ कथाकथन हे सुद्धा प्रत्येकाला साधतेच अस मला वाटते पण ते तुला समर्थ पणे साधलेले आहे कुठलाहि विषय असो त्याच मर्म साधण फार कठिण आहे त्या शिवाय विषदिकरण करताच येत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आभाळभर...........ब्रह्माण्डभर प्रेम ....... 🥰😍🤗😇

      Delete
  3. आई आणि मुलीचे चित्र खूप छान आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!🥰😍🤩

      Delete
  4. पहिला लेख खुप छान झाला आहे. आणि त्यामुळे भुसावळ च्या बाबांच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या.आणि मन भुतकाळात रमुन गेले.दुसरा लेखही उत्तमच आहे.आणि वास्तविकतेशी मिळता आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांच्या आठवणी मनात असतातच , त्यासाठी कुठल्या वस्तूची गरज नसते ,  एकमेकांशी त्याबद्दल बोलले की जास्त छान वाटते ! प्रेमळ धन्यवाद !😇😇🥰

      Delete
  5. स्वाती चौधरीOctober 23, 2020 3:16 pm

    आनंदाचा झरा खूप मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद , माऊली  !!🥰😍😇😇

      Delete
  6. Vastavata tuzhe anubhav ya sarv goshti likhanat mandane hey sarvana jamel ase nahi pan tu tey agadi sahajatene, sadha shabadhat mandates fharach surekh
    Varasa ha asa wawa
    Ani agadi khare kharach amulaya varasa aanand denacha, utchahacha jo aahamala tuzhakadun bhettoy

    ReplyDelete
    Replies
    1. काय बोलू मी यावर , अगदी निःशब्द केलेस तू मला ! खूप सारे , अगदी आभाळभर प्रेम !!!😍🥰🤩😇

      Delete
  7. Aai ani muliche chitra 👌👌

    ReplyDelete
  8. खरे तर प्रत्येक मुलगी आईकडूनच शिकत असते पण ती आईवढे छान काही करू शकत नाही असेच तिला वाटते.अगदी मला आणि आता माझ्या मुलीला नेहाला सुद्धा असेच वाटते. पण मुली आपल्यासारखेच किंबहुना जास्त छान सर्व गोष्टी करतात तेव्हा आईला किती बरे छान वाटत असावे .तुझे लिखाण वाचून मंदाताईला ही असेच वाटत असणार.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा , किती छान सांगितलीस तू दुसरी बाजू सुद्धा ! मी अगदी शंभर टक्के सहमत आहे तुझ्याशी !! खूप सारे प्रेम !😍😇

      Delete
  9. स्वाती प्रभुणेOctober 23, 2020 7:13 pm

    खरे आहे तुझी आई म्हणाल्या ते अग प्रत्येक व्यक्ती ला प्रत्येक गोष्ट कशी जमेल? माझी आई म्हणायची अग प्रत्येक जण वेगवेगळे आणि म्हणून तर मजा आहे ना?माझे आईला पोलिओ झाला होता उजवा हात नव्हता पण तिने कधीच रडगाणं गायली नाही त्याचं कौतुक करून घेतलं नाही. कायम आनंदी सर्व गोष्टी करायची त्यांची आठवण झाली

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच आई ही आईच असते  फक्त आई असते ! शब्दांच्या पलीकडे ! सप्रेम धन्यवाद !😍😍

      Delete
  10. Kay chan lihites tu heva vatato g love you

    ReplyDelete
    Replies
    1. नीता , खूप सारे अगदी आभाळभर प्रेम !!!😍🤩😇❤

      Delete
  11. Aai cha varasa sarvch mulina hava asto tichi pratek gost kamachi dhatni lahan panapasun pahat asto v aaplyat te yayla have hi dhadpad aste ����

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , आई  मुलीचे नाते असतेच खास ! आधी आपण मुलगी असतो नंतर आई होतो , खूप छान असतो हा प्रवास !
      😇❤😇

      Delete
  12. प्रतीकात्मक चित्र आणि लेखनरुपी आनंदाचा झरा कायम असुदे.अप्रतिमच.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम !खूप धन्यवाद !😊🤩

      Delete
  13. Khup chan.pn Kahi goshti aaisarkhya jamtach nahit. Kitihi praytn kela tri.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय , काही गोष्टी नाहीच जमत आईसारख्या , मनःपुर्वक धन्यवाद !😊

      Delete
  14. सुप्रभात
    आई मुलीचा शाब्दिक संवाद खूपच सुंदर साधला
    व आईची प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहिली 👍🌹🌝

    ReplyDelete
  15. वणीकर काकुMay 09, 2021 1:57 pm

    वर्षाली तु नशीबवान तुलाआईचे चांगले गुण मिळौले खरच तुझी आई धन्य!

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय काकू तुमचे म्हणणं , एकच नाही तर तुमच्या रूपात मला अजून एक छान प्रेमळ  मिळालीय ! खूप खूप प्रेम ! 😍🤩😇

      Delete
  16. मला वाचून खुप आनंद झाला आणि हेवा पण वाटला .मला माझ्या आई बद्द्ल काहीच लिहीता येत नाही. तुला खुप आशिर्वाद.
    मंदा चौथरी.

    ReplyDelete
    Replies
    1. काही लिहिता आले नाही म्हणून काही बिघडत नाही ....... बाकी कितीतरी प्रकार आहेत व्यक्त व्हायला ........ असो ......खूप खूप प्रेम !

      Delete
  17. जनार्दन चौधरीMay 09, 2021 3:22 pm

    मझ्या मनातल जे मि व्यक्त कधिहि करु शकलो नाही ते तु शब्द रुपात लिहून टाकून मि भरुन पा्वलो

    ReplyDelete
    Replies
    1. शब्दांच्या पलीकडे आहे खरं तर हे सगळे ! खूप सारे प्रेम !!😍🥰💖

      Delete
  18. आई हा विषयच असा आहे की त्या वर कितीही भरभरून लिहिलं तरी कमीच पडेल. कित्येक लेखकांनी आणि विशेषतः मुलींनी, त्यांच्या आई बद्दल लिहून ठेवल आहेच. पण तुझा हा लेख अगदी नेमका आणि अर्थपूर्ण आहे. प्रत्येक मुलीची आई ही तिची रोल मॉडेल असते आणि तिच्यातले सगळे गुण आपल्या अंगी यावेत ही त्यांची मनीषा असतेच. तुझ्या लिखाणावरून आईचा तू बेस्ट गुण घेतलेला दिसतोय . मला स्वतःला पण त्याचा अनुभव आहेच . तुझा आनंदी आणी उत्साही स्वभाव अगदी अचंबित करणारा आहे, त्याचे नैसर्गिक उगमस्थान आता कळले. आईचा उत्साह घेऊन सभोवतीच्या संपर्कातल्या व्यक्तींना तो वाटणे हा तुझ्या बाबतीत सगळ्यांनाच अनुभव येतो. आईचे अंशतः तरी ऋण तू हा लेख लिहून आणि तिचा कौतुक पूर्ण उल्लेख करून फेडलेस त्याबद्दल तुझे खरोखरीचे कौतुक आहे . अशीच आनंदी आणी उत्साही रहात जा हाच तुला आशिर्वाद .सोबत जोडलेले आई आणी लेकीचे स्केच अप्रतीम 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...