वस्तु - तुपाच्या वाढया
(वारसा स्पर्धा)
मानव अगदी सुरवातीपासूनच समुदायांनी, टोळ्याटोळ्यांनी राहत असे. नंतर एकत्र कुटुंब पद्धती . आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती, त्यातही प्रत्येक वस्तू प्रत्येकाची वैयक्तिक. त्यामुळे घरातीलच सदस्यांचा एकमेकांशी संबंध फारच कमी, नगण्य. शिवाय आर्थिक सुबत्ता, नको वाटावी इतकी जास्त. त्यामुळे एकमेकांची गरजच नसल्यात जमा, रोजच्या दैनंदिन जीवनात आणि सण-समारंभात सुद्धा.
पूर्वी तसे नव्हते. हे पूर्वी म्हणजे फार पूर्वीही नाही, अगदी दोन पिढ्या आधी. कुटुंब तर एकत्र होतीच आणि आजच्या इतकी आर्थिक सुबत्ताही नव्हती. त्यामुळे सगळेच सगळ्यांवर कुठल्या नी कुठल्या कारणाने अवलंबून असत. त्यामुळे सगळेच एकमेकांना धरून राहत असत. हेच सांगतात माझ्याजवळ असलेल्या या दोन तुपाच्या वाढ्या! एक आईची आणि एक आजेसासूबाईंची, त्यांना त्यांच्या वडिलांनी लग्नात अंदाणात दिलेली.
तर आमच्याकडे म्हणजे खान्देशात लग्नामध्ये मुलीला माहेरहून आंदण देण्याची प्रथा आहे. आंदण म्हणजे तिच्या नव्या संसारासाठी रोजच्या साठी लागणारी भांडीकुंडी . त्यात ताटं, वाट्या, पातेली, हंडा, कळशी, बंब वगैरे वगैरे. ह्यात अजून ही एक तुपाची वाढी आणि इतर काही खास भांडी सुद्धा दिली जात असत. ही तुपाची वाढी आणि खास भांडी वगळता, सगळी भांडी घरात वापरली जात असत, कारण तेलातुपाची दररोज वापाराची भांडी असतंच. मग ह्या तुपाच्या वाढीचे काम काय?
पूर्वी कुणाकडेही काहीही कार्य-समारंभ असले तर आजच्या सारखे जेवणावळीचे पानाच्या हिशोबाने कंत्राट देण्याची सोय तर नव्हतीच. पण अन्न शिजवण्यासाठी आणि वाढण्यासाठी लागणारी भांडी सुद्धा भाड्याने मिळत नसत. आणि हे सगळे भाड्यानी घेण्यासाठी तेव्हढी आर्थिक सुबत्ता ही नसे. मग सगळी भांडी शेजार-पाजारून आणि नातेवाईकांकडून गोळा केली जात असत आणि वेळ साजरी केली जात असे. आणि प्रत्येकालाच हे करावे लागे त्यामुळे कुणालाही हे सगळे करणे कमीपणाचे पण वाटत नसे. तर ही तुपाची वाढी अगदी नावाप्रमाणे तूप वाढण्याचे काम करत असे. पंगतीत तुप वाढण्यासाठी सगळ्यांच्या घरी जात असे. मला अजूनही आठवते आहे, मी लहान असतांना कोणी कोणी ही तुपाची वाढी आमच्याकडून मागून नेलेली, त्यांच्या कडे कार्य आहे म्हणून. त्यामुळे माणसं एकमेकांना बांधली जात आणि धरून राहत असत .
सौंदर्य मूल्याबाबत तर बोलायलाच नको . किती तो सुंदर घाट! पितळी असल्याने बाहेरून सोनेरी चकचकीत आणि आतून कल्हई केल्याने चंदेरी चकचकीत परत त्यातील तूप खाल्ल्याने अन्नाची आरोग्य मूल्य कितीतरी पटीने जास्त आजकालच्या स्टील आणि कुठल्याकुठल्या भांड्यापेक्षा!
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा)
एप्रिल २०२०
Ag baiee kiti chhan..wadhya aahet..
ReplyDelete😍 खरच खुपच गोड आहेत!!
DeleteI just love it!!!
केशव उवाचं...
ReplyDeleteआमच्या लहानपणी सुट्टीत गावी गेल्ययावर आम्हाला कामच असायचे... वाड्यात गावजेवणाचा स्वयंपाक करायची भांडी होती ...ती मागायला आलेल्यांना काढुन देणे... आणलेली ठेवुन घेणे...! भारदस्त भांडी होती....
वावा मस्तच आठवण!!!
Deleteभांडी मात्र एकदम भारदस्त. ... प्रश्नच नाही!!
खुप सारे धन्यवाद 🙏🙏😊
त्यावेळेस सर्व एकमेकांना धरून असल्यामुळे सर्व आपल्या घरातील भाडी व इतर सामान काढून देत असत आणि कामात पण साहाय्य करीत. पूर्वी सगळे एकोप्याने राहात असत. पुर्वीच्या भाड्याचे आकार पण खूप मस्त असत. मंदा चौधरी.
ReplyDeleteहो ना सगळे एकमेकांना धरून राहत!
Deleteपूर्वीच्या भांड्यांचे आकार घाट सगळेच फार सुंदर असत!! ❤ 😍😇
Wa Chan 👌
ReplyDeletekiti chan aakar hote purvicha bhandanche
अगदी खरंय.. .
Deleteभांडी त्याचा आकार, घाट, सगळेच फार सुंदर ! 😊
तुझ्या लेखातन कळते पूर्वी लोक कसे एकत्र रहात होते
ReplyDeleteखूप छान मस्त
पुढील लेखास.खूप खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteMastach...तेल व तुप पात्रं महत्त्वाचे व त्या काळात जड व वजनदार असायची ... हाताळण्यासाठी सावकाश व emotionally operated while pouring oil or ghee or water.Liked form and shape of this वाढ्या.
ReplyDeleteYeah totally!!!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
Mast Lihlay tai..
ReplyDeleteMazya shabdkoshat vadhya shabdachi vadh zali, Mala mahitch navhata. Kiti Chan dista het tya. Tup tel vadhayla agdi yogya aakar aahe tyancha.
☺️ पिल्लू आहेस ना तु म्हणुन तुला या काही वस्तु शब्द माहितीचे नाहीत
Deleteआभाळभर प्रेम तूला 😍😇
Mast Lihlay tai..
ReplyDeleteMazya shabdkoshat vadhya shabdachi vadh zali, Mala mahitch navhata. Kiti Chan dista het tya. Tup tel vadhayla agdi yogya aakar aahe tyancha.
सप्रेम धन्यवाद 🙏 😇
DeleteSagal kahi lakkh athvaty. Panktit jevnyachi majhach kahitri vegli hoti.
ReplyDeleteवावा मस्तच!
Deleteचला पंगत मध्ये बसुन जेवू या 😍
😇 💃💃
खुप छान लेखाजोखा.त्या निमित्ताने पुर्वीच्या काळाची आठवण करून दिली. वाढीचा आकार व ठेवणं जबरदस्त आहे.
ReplyDelete🙏😇 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
DeleteKhup chan likhan ahe tai....kiti chan hoti na purvichi bhandi
ReplyDeleteखरय, पूर्वीची भांडी म्हणजे काय बोलायलाच नको.... 😍 ❤️
Deleteलिखाण फारच सुंदर असते आणि तू इतकी त्या लिखाण कामात एकरूप होते पूर्वीच्या आठवणी खूपच छान आहेत
ReplyDeleteFrom Chhaya Birhade
Deleteखुप खुप आनंद झाला तुला ईथे भेटून!
Deleteसगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत!!! ❤
सप्रेम धन्यवाद 😍 ईतक्या सगळ्या कौतुकाबद्दल 🙏😇
Excellent superlative....ani shape khupach sunder ahet purviche bhandhynche
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteKhup goad Vadhya...do you still have it?
ReplyDeleteहो, आता माझ्या घरात आहे. या एकदा माझ्याकडे, मी दाखवते तुम्हाला!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇
लेखनाबद्दल प्रश्नच नाही.
ReplyDeleteपण ही तुपवाढी मी पहिल्यांदाच पाहिली... किंबहुना अशी काही वस्तू असते हे ही आज प्रथमच कळलं.त्या ज्ञानवृद्धीसाठी आभार !
फार ज्ञानात भर वगैरे नाही काही...
Deleteप्रत्त्येक भागाची संस्कृती वेगळी....
त्यामुळे असे, बाकी काही नाही 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
गावाची पंगत आठवली. वरण पोळी वांग्याची भाजी अन तुपाची वाढी एकदम छान समीकरण. पितळेची पाहिलेली. नंतर स्टील chi पन वापरायला लागलेले पंगतीत. खूप majja असायची पंगतीत जेवायची.
ReplyDeleteवावा मस्तच! गावची पंगत म्हणजे तोंडाला तर पाणी सुटतेच पण डोळ्यातून अणि नाकातून पण पाणी यायला लागते 😁😁
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
खूपच सुंदर अगदी लहानपण आठवले आणि लहानपणी लग्नातली किंवा कुठल्याही कार्यक्रमातली ती पंगत आठवली सगळे नातेवाईक एकत्र बसून जेवणावळीची पंगत वा
ReplyDeleteमस्तच वा खूप छान मजाआणि एकमेकांशी केलेले हितगुज मला किंवा मस्ती मला आणि जेव्हा मोठे आपल्याला पालखीत बसून
लग्नात पाच शगुनाची भांडी देत असत .जसे की परात समई त्यात तुपाची वाढी पण असायची. मला ही आंदणात दिलेली आहे .आता त्याचा उपयोग शोकेसमधे आणि एक अंत्यक्रियेमधे पित्रांना वाढण्यासाठी पित्रांच्या पानावरून तुपाची धार नेण्यासाठी होतो .लिखाण खूप छान आहे .
ReplyDeleteआजकालच्या बफे नावाच्या घोडजेवणाच्या प्रकारात तुप आणि वाढ्या हा प्रकार कालबाह्य होत चालला आहे
ReplyDeleteसुंदर आणि स्निग्ध! 😊
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteमला जास्त विशेष वाटतं ते वाढणाऱ्यांचं आणि खाणाऱ्यांचं. मस्त धारच लावायची तुपाची! पुरणपोळी असो की मसालेभात वाढणं आणि खाण्यात कंजूसपण नाहीच. आणि अर्थातच पचवण्यातही! 😃
सुप्रभात
ReplyDeleteखूप सुंदर.. ह्या सर्व जुन्या गोष्टी खरंच कित्ती छान.. माझ्या माहेरी आमचे मोठे घरी हे सर्व खूप होते..
पूर्वीचे लोक एकत्र असणे खरंच मी खूप अनुभवले..
माझी आई जाऊन आज दहा दिवस झाले, आणि माझे साताऱ्यातील खूप थकलेले काका काकू, चुलत मंडळी भेटली आणि इतक्या त्या जुन्या आठवणी बोलत राहिलो..
तुझे इथे वाचले आणि परत आठवण आली..
खूप छान.. ग
या तुपाच्या वाढ्या आता पंगती मध्ये दिसत नाही
ReplyDeleteऐक काळ होता की या वाढ्या पंगती ची शान व ओढ लागली असायची
खूप छान माहिती.माझ्यासाठी नवीन..मला हे माहित नव्हतं..👌👌👌
ReplyDeleteमाझ्याकडे गोड छोटीशी तुपाची वाढी आहे , ती मला खूपच आवडते, पूर्वीची भांडी खूपच छान होती, आता मी ती शोकेस मध्ये ठेवली आहेत, छान लेख,
ReplyDeleteKhoopach Chan Mahiti.
ReplyDeleteकिती छान जुने ते सोन
ReplyDeleteखूप छान. अगदी अशीच तुपाची वाढी आजी कडे होती. सणासुदीला आणि श्राद्ध वगैरे असेल तर घासून लख्ख होवून वाढपा साठी तयार असे. आठवणी ताज्या झाल्या
ReplyDeleteवा छान तुपाच्या वाढ्या सुरेख लेखन एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद वेगळाच असतो हे तुमच्या लेखनातून दिसून येतो 🙏🌹
ReplyDeleteआहाहा... तेल आणि तूपाशिवाय माझे पान काही हलत नाही बरं..... लेख अगदीं साजूक zahalay tupasarkhach.Goldench... भांडी खूप भावल्या... किती antique aahet..
ReplyDelete..Varan+ Bhaat+ Metkut Toop..all time favouritech...sanjitala far आवडतं.....
विशिष्ट आकाराची तुपाची भांडी मस्तच. ही भांडी बघून बंब, घंगाळं अशा अनेक काळाच्या आड गेलेल्या भांड्यांची आठवण झाली. एकंदर भांड्यांचा आकार लक्षात घेता किती भरभरून तूप वाढले आणि खाल्ले जायचे याचा अंदाज येतो. समृध्दीचे प्रतीकच वाटायची अशी भांडी. वर्षाली, तू बरे शोधून काढतेस एकेक प्रतीके.
ReplyDeleteतूप वाढीचा लेख खूप छान लिहिला आहे.पूर्वी आमच्या गावाला अशी जुनी पात्र वापरत होती.अप्रतिम लिखाण.
ReplyDelete✅
ReplyDeleteखरय...
आदान प्रदान सामूहिक जीवनाचा अविभाज्य भाग होता.