Skip to main content

भेटवस्तू आणि आनंद (काही अनुभवलेलं.....)

 भेटवस्तू आणि आनंद

 (काही अनुभवलेलं.....)


                                                                                      आजकाल  तर भेटवस्तू म्हणजे अगदी प्रत्येक छोटे मोठे निमित्त साधून येत असते किंवा दिली जात असते . दररोज हा ना तो दिवस असतो , वाढदिवस असतात , लग्नाचे वाढदिवस असतात , वर्धापन दिवस असतात , निरोप समारंभ असतात , उद्घाटनं असतात , सत्कार समारंभ असतात , या ना त्या कारणाने अभिनंदन करणे असते . बाकी नेहमीचे तर आहेच , डोहाळजेवणं , बारशी , मुंजी , लग्न , स्वागत समारंभ , एकसष्टी , सहस्त्र चंद्रदर्शन , सेवानिवृत्ती , हळदीकुंकू आणि यावं ना त्यावं . हे सगळे कमीच म्हणून हल्ली बहुतांशी सगळ्या कंपन्यांमध्ये कुटुंब दिवस साजरे केले जातात . वर्षभर कौटुंबिक आनंदाचा पुरता बट्ट्याबोळ करून मग एक दिवस कुटुंबाला बोलावून अगदी वर्षभराचं एक दिवसात खायला घालून आणि वर काहीतरी झकपक भेटवस्तू दिली जाते .अगदी दिवसाच्या शेवटी तर बऱ्याच लोकांच्या मोठाल्या पिशव्या या भेटवस्तुंनी भरून जातात ..... हा एक स्वतंत्र विषय आहे खरतर ....... पण या दोन ओळी लिहायच्या मात्र मी टाळू शकले नाही . 
                                मग या भेटवस्तूंना चिटकून अनेक भावना असतात . सगळ्यात मूलभूत भावना म्हणजे ज्याला भेटवस्तू मिळते किमान त्याला तरी आनंद व्हावा अशी अपेक्षा असते  आणि बहुदा तसे घडतांनाही दिसते किंवा दर्शविले जाते , किंवा दर्शविले जावे अशी अपेक्षा तरी असते . 
                           पण या व्यतिरिक्त बऱ्याच भावना असतात . ज्याने दिली , ज्याला मिळाली आणि ज्यांनी दिली नाही किंवा ज्यांना मिळाली नाही अशा सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना उचंबळून येतात . 
नाराजी , नापसंती , तुलना , असूया आणि अशा कितीतरी नको वाटणाऱ्या भावना बघायला , अनुभवायला मिळतात . अगदी जीव गर्भात असल्यापासून ते तेराव्या पर्यंत हे सगळे अव्याहत चालू असते . या असल्या विकृत भावना व्यक्त करतांना कुणीही काळ वेळ प्रसंग यापैकी कसलेही भान ठेवत नाही .  हे सगळे पाहून मन खुपच उदास , खिन्न आणि सैरभैर होऊन जाते . आणि वाटतं आपण खरंच माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत का?! खरेच सुशिक्षित , सुसंकृत आहोत का?  
                            पण आज मला भेटवस्तुशी निगडीत असे जरी सांगायचे असले तरी ते या सगळ्यांपेक्षा  फारच वेगळे आहे ....... जे मी स्वतः अनुभवले आहे , ते अनुभवणे आणि त्या भावना , या सगळ्यांपेक्षा  फारच निराळ्या आहेत . म्हणून लिहिण्याचा हा खटाटोप ...... 
                            तर त्या आमच्या शाळेचा त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता ! सकाळी पालकांची सभा आणि संध्याकाळी पदवीदान समारंभ . सगळं अगदी छोटेखानी .कारण शाळा तशी लहान आणि विद्यार्थी संख्याही साधारणच आणि त्यातच हा पहिलाच पदवीदान समारंभ शाळेचा ! त्यामुळे ही मुलं शाळा सोडून जाणार आणि इतर काही मुलांची पण काही कारणाने शाळा बदलणार होती , म्हणून तीही शाळा सोडून जाणार होती . हे कमीच की काय म्हणून , भरीत भर सोबतच्या दोन शिक्षिका सुद्धा ही शाळा सोडून जाणार होत्या . गेल्या दोन वर्षांचा सहवास आमचा , अगदी दररोज ४-५ तासांचा . दररोज सोबतचे वावरणे , सोबतीने खाणे , सुखदुःखाची , विचारांची , संस्कृतीची देवाण घेवाण . हो संस्कृतीची सुद्धा कारण मी मराठी , एक तामिळ , एक मल्याळी , एक तेलगू , एक कानडी , एक ओडिसी , बाकी अजून निरनिराळ्या . त्यामुळे आमच्या नकळत आमच्यात एक घट्ट मैत्रीचे नाते विणले गेलं होतं ! हे सगळं खुप स्पष्ट आणि उघड चित्र होते , बऱ्याच दिवस आधीपासून माहित होते आणि यात अनपेक्षित असे काही नव्हते . 
                             पण आदल्याच दिवशी एका विद्यार्थ्याच्या आईने एक मोठ्ठं काजूकतलीचं पुडकं आणून दिलं , सगळ्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी . काजूकतली म्हणजे माझा जीव की प्राण . पण त्यादिवशी काही त्यावर उड्या मारून खावीशी वाटली नाही ... घरीच घेऊन आले मी ... कारण त्या काजूकतलीला वियोगाचा(departing) गंध  लागला होता   ........ 
                          शेवटच्या दिवशी मात्र पालक सभेत मला धक्काच  बसला .... कारण माझा लाडका श्याम पण शाळा सोडून जाणार ....... माझा लाडका म्हणण्यापेक्षा आम्ही एकमेकांचे खूप लाडके !!! घरी निघायला लागले तर अचानकपणे एका शिक्षक मैत्रिणीने एक जाडशी आणि जडशी भेटवस्तू माझ्या बॅगेत सरकवली ..... आणि त्यावर मला व्यक्तच होता आले नाही ....... कारण मग जाणवले की  माझ्या मनाची चलबिचल अगदी स्पष्टपणे चालू झालीये . मग संध्याकाळच्या पदवीदान समारंभाला जाईपर्यंत सारखेच डोळे भरून येत होते 
                            समारंभ संपला ..... फक्त जेवणं बाकी होती . थोडा वेळ होता , तेव्हढ्यात माझं लाडका श्याम आला माझ्याजवळ . मला वाटलं माझी आठवण झाली किंवा पूर्ण संध्याकाळ माझ्याजवळ येता आले नाही म्हणून , तो माझ्याकडे आला . पण तसे नव्हते ..... त्याने जवळ येऊन एक चॉकोलेट आणि एक छोटीशी गणपतीची मूर्ती माझ्या हातावर ठेवली ...... मग मात्र वियोगाची जाणीव चांगलीच तीव्र झाली ...त्याला जवळ घेतले , त्याच्या सोबत स्वप्रतिमा(सेल्फी) काढल्या आणि तो गेला . त्याला मात्र यातले काहीच कळले नसणार .... जेमतेम चार वर्षाचा जीव तो..... 
                           तो त्याच्या आईकडे गेला.........आणि मी माझ्या विचारात इतकी गुंतले होते की , दुसरी शिक्षक मैत्रीण माझ्या शेजारी केव्हा येऊन बसली , ते कळलच नाही .......आणि "धिस इज फॉर यू , मॅम " असे कानात हळूच पुटपुटली आणि मग जाणीव झाली , तिने माझ्या मांडीवर हळूच , एक झळाळत्या रंगाच्या कागदात गुंडाळलेलं पुडकं ठेवल होतं....... आणि म्हणाली , "मॅम , होप यू विल लाइक इट !"  या सगळ्यावर व्यक्तच होता आलं नाही ..... माझ्या वाढदिवशी सुद्धा यांनी मला भेटवस्तू दिल्या होत्या  ..... तेव्हाही मला त्या भेटवस्तूंचे दडपण आले होते  आणि मी त्यांना सांगितले , विचाराने आणि मनाने मी एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे . माझे मन या सगळ्याचा स्वीकार करण्यास परवानगी देत नाही , पण तुम्हाला वाईट वाटू नये , म्हणून तुमच्या या प्रेमाचा स्वीकार करते आणि माझे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करते ! 
                             दुसरे म्हणजे एक दडपण येते भेटवस्तू घेतांना . काय असेल भेटवस्तू? , वापरली जाईल की  नाही?, की उगाच पडून राहील ? पण तोपर्यंत त्यांनी मला पुरते ओळखले होते ......माझी चित्रकलेची आणि लिखाणाची आवड त्यांच्या चांगलीच माहितीची झाली होती ..... त्यासंबंधी मला वापरता येतील अशाच भेटवस्तू त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या  ..... आणि खऱ्या अर्थाने सगळे दडपण जाऊन त्यातून मला आनंद मिळाला होता !!! , आणि अजूनही त्यांचा वापर करताना आनंद मिळत असतो ..... किंबहुना मी आता तर म्हणते त्या भेटवस्तू मिळाल्या आणि तेव्हा वाटल्या त्यापेक्षा हजारो पटींनी मला  उपयोग झाला आणि कोट्ट्याने आनंद दिला त्या भेटवस्तूनी , तणाव मुक्त करण्याचे काम करून , मला त्यातून खुप खुप सकारात्मकता मिळाली !!! 
                             मग आता परत काय ? असे परत दडपण आले . पण घरी आल्यावर उघडून पाहिल्यावर परत दिसले .....त्या भेट वस्तू मी नक्कीच वापरणार अशाच होत्या आणि खुप झकपक दिखाऊ आणि महागड्या नव्हत्या . मग मनावरचे सगळे दडपण कुठल्याकुठे पळून जाऊन मनात फक्त एक प्रेमळ आनंद भरून राहिला .......!!!
                             पण त्याकडे पाहून मात्र परत परत विचार येत होता , या वियोगात्मक भेटवस्तू आहेत आणि त्यामुळे फारच वाईट वाटत होते  ......... 
                              वाटले भेटवस्तू प्रत्येकवेळी आनंदच देऊन जाते असे नाही .....अतीव दुःख सुद्धा असते त्यात   ........ पण अर्थातच या अतीव दुःखात आणिक एक खुप मोठ्ठा आनंद दडलेला 
असतो ......... आपल्याला पूर्ण ओळखणारी आणि आपल्यावर अतीव प्रेम करणारी माणसं जोडले गेल्याचा ........ 
                              
© आनंदी पाऊस 
 (काही अनुभवलेलं.......) 
३/४/२०१९. 


याच लेखाची ही ध्वनिफीत 



लाडका बाप्पा 



श्यामने त्याच्या हाताने तयार केलेले 
शुभेच्छा पत्र !







एका भेटवस्तु वरील
सुंदर संदेश !






Comments

  1. खूप छान शब्दात भावना मांडल्यायेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनापासुन धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  2. Ag kiti chan lihiles , mazya dolyat ptkn pani ale
    Bhtvastu dili mhanjech prem ahe he mala manya nai
    Jewa jewa aathwan yete ti anand dewun janari asawi he maze bhabde mt
    After all need 2 express or show affection through gifts
    Last greeting card ����������������
    Oh pn far sparsh karun gela manala

    ReplyDelete
    Replies
    1. भेटवस्तू दिली म्हणजेच प्रेम आहे , असे माझेही म्हणणे नाही .  ती फक्त प्रेम व्यक्त करायची एक पद्धत आहे . फार फार मोठी पावती दिलीस माझ्या लिखाणाला , आभाळभर प्रेम आणि धन्यवाद !

      Delete
  3. Aajacha lekh fharach bhavanik
    chan mandales bhetvastu magil vegvegala bhavana ani tuzha svatacha ter hrudhaila sparsh karun gela
    Mazya sathi ter asha kahi bhetvastu amulaya khazinach mi tya sambhalun thevala

    ReplyDelete
    Replies
    1. फार  सुंदर पावती दिलीस माझ्या लिखाणाला ! खर तर अगदी सहजच  अनुभवले ते लिहिले , पण सगळ्यांच्याच मना ह्रदयाला स्पर्शुन गेले माझे हे लिखाण ! हृदयस्पर्शी धन्यवाद !!!

      Delete
  4. Very heart touching . No words

    ReplyDelete
  5. भेटवस्तू...
    केशव उवाचं..
    छानच ..नेहमीप्रमाणे वेगळा विषय.... भेटवस्तू घेण्यात जसा एक आनंद असतो ..तसा देण्यात ही मोठा आनंद असतो... तुलना होऊ शकत नाही....
    तयाची तुलना कैची...

    ReplyDelete
    Replies
    1. मी तर म्हणते घेण्या पेक्षा देण्यात जास्त आनंद असतो! आणि हा आनंद घ्यायला मला फार आवडते अणि मी तो घेते ही!
      शेवटचे कौतुकाची ओळ.... 😍 पण जरा थोडे जास्तच आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. खुप सारे धन्यवाद 😍 😇
      ईतक्या थोड्या काळात ईतकी छान मैत्री अणि ईतक्या सगळ्या भेटवस्तू... याचे उत्तम उदाहरण 'केशव'

      Delete
  6. खूप छान👌..खरेच भेटवस्तू अनमोल असतात.. कधी आनंद तर कधी आनंदाश्रू..!! भेटवस्तू बघून आठवणी ताज्या होतात.. ते क्षण कायम स्मरणात राहतात. 😊👍

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय भेटवस्तु , ते आनंदी क्षण परत परत जगायची आणि अनुभवायची संधी देतात ! खुप धन्यवाद !

      Delete
  7. Khup chaan shabdad lihle aahe ����

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏 😇😍

      Delete
  8. लीला ताई वानखेडेSeptember 19, 2020 4:25 pm

    भेटवस्तू बद्दल खुप्उत्साह पूर्ती लेख लिहिला आहे जरा वेगळाच विषय घेतला आहे या विषयावर सहसा कोणी बोलत नाही काही वाटले तरी पण तुम्ही छान मनोगत लिहिलं चांगलं वाटलं आणि तो खरंच प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे��������������������‍♀️

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप सप्रेम धन्यवाद !

      Delete
  9. Farach sunder v manala bhidanara lekh lihila aahes. Bhetvastuchi utsukta pan aste aawdali ki aanad pan asto
    Likhan khup chan ��������

    ReplyDelete
    Replies
    1. या छान कौतुकासाठी , अगदी मनाला भिडणारे धन्यवाद !

      Delete
  10. अप्रतिम वर्णन केले आहे ताई ....👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. गोड गोड सप्रेम धन्यवाद 😍 😇!!!

      Delete
  11. स्वाती प्रभुणेSeptember 20, 2020 10:38 pm

    Wow खूपच मस्त भेटवस्तू त्यामागील भावना प्रेम खरेच किती मस्त छान वर्णन केले आहे वाचताना आनंदाचे अश्रू आले मन हळवे झाले खरंच किती भावना दाटून येतात नाही
    प्रेम व्यक्त कारण्याच्या वेगवेगळ्या कृती

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यांचे अभिप्राय वाचतांना माझ्यापण सर्वांगावर शहारे आले ...... खुप प्रेमळ धन्यवाद ......!

      Delete
  12. भेट वस्तू म्हणजे आठवणीचा गोतावळा असतो त्यात आनंद असतो पण काही वियोगाच्या आठवणी असतात खूप छान वर्णन केलेले आहे
    मंदा चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच भेट वस्तू म्हणजे आठवणीचा गोतावळा असतो त्यात आनंद असतो पण काही वियोगाच्या आठवणी !
      आठवणीचा गोतावळा.....माझ्यापेक्षा तुच जास्त  शब्दात सांगितलेस , फारच आवडला मला हा शब्दप्रयोग !!

      Delete
  13. जनार्दन चौधरीSeptember 21, 2020 6:35 pm

    मुळ विषयांतर झालेले वाटले भावनांचा कल्लोड होणे हे प्रसंगानुरूप असणे स्वाभाविक च आहे प्रस्तुती छानच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो , आता हळुहळु सगळेच विषय येतीलच , कधीच सुरु करायचे होते ....... 

      Delete
  14. खुप छान लेख ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

    ReplyDelete
  15. अनमोल आणि भेटवस्तुतून मिळणारा आनंद आणि देताना मिळणारं समाधान and अमुल्य अनुभव अप्रतिम रेखाटले आहे .. आठवणी मंत्र मुग्ध करणारा हा लेख फारच आवडलाय..
    Apart from occasionally gifts ,I like to give the gifts thorough "SecretSanta" game which is nowdays popular.

    ReplyDelete
    Replies
    1. मंत्र मुग्घ करणारे धन्यवाद ! हो या सगळ्या नवीन पद्धती भेटवस्तु देण्याच्या . मला लेकींकडून ओळख झाली या सगळ्याची . आमच्या वेळी आम्ही संक्रांत भेट देत असु एकमेकींना संक्रांतीच्या वेळी !

      Delete
  16. Ha lekh farach bhavanik ani
    chan zalay❤️☺️

    ReplyDelete
  17. मलाही माझ्या आवडत्या व्यक्तींना भेटवस्तू द्यायला प्रचंड आवडते... त्यांची आवड निवड लक्षात ठेवून खास हाताने बनवलेली किंवा जरी विकत आणली असेली तरी हाताने सजवलेली तरी असतेच... खूप आनंद भरलेला अ या साऱ्या क्रियेत... आणि हो... कुणी जास्त परिचय नसलेल्या व्यक्ती कडून भेटवस्तू घेताना दडपण येते हे ही तितकेच खरे. लेख खूपच सुंदर.

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही आहे हा अनुभव ! तू पाठवलेल्या , तुझ्या हाताने तयार केलेल्या सगळ्या भेटवस्तू मी नीट जपून ठेवल्या आहेत ! खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!😍🤩😇

      Delete
  18. Ha lekh mhanaje amachya junya athavanichi bhetavastuch janu

    ReplyDelete
  19. भेटवस्तू खूपच छान👍🏻🖋️💝 होती भेटवस्तू आनंदाने दिले जाते त्या मागच्या भावना आणि देणार्यांचे व्यक्तिमत्व असते
    आणि भावनिक प्रेम असते घेणाऱ्या आणि देणाऱ्या च

    ReplyDelete
    Replies
    1. हो, खरय!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...