Skip to main content

पदार्थ - काटेरी हलवा (वारसा स्पर्धा)


पदार्थ - काटेरी हलवा 
(वारसा स्पर्धा)

                        आपले सगळेच पारंपरिक पदार्थ खूप कष्टाचे आणि बऱ्याच क्रिये-प्रक्रियेतून तयार होणारे असतात . याच कारणाने आजकाल काहीतरी सोप्पा मार्ग शोधून पदार्थ केले जातात . पण मग त्या पदार्थांतील आरोग्य मूल्य कमी होतात किंवा नष्टच होऊन जातात . पारंपरिक पदार्थ शरीराला कुठलीही इजा पोहचवत नाहीतच पण उलट पक्षी ते जर वेळोवेळी त्या त्या मौसमात केले आणि खाल्ले तर  औषधपाण्याची पण गरज पडत नाही . कारण त्या सगळ्यातच तितके औषधी गुण असतात . आणि चवीचा तर प्रश्नच नाही , एकदम अप्रतिमच ! 
                        हे झाले शारीरिक आरोग्य . पण हे मानसिक रित्या सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवतात आणि जास्त बळकट करतात . कारण तो तो पदार्थ करायला वेगवेगळ्या प्रकारची चिकाटी , संयम , स्वच्छता , एकाग्रता गरजेची असते . ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मानसिकरीत्या निरोगी राहण्यास गरजेच्या आहेत , ज्या आजकाल अजिबातच बघायला मिळत नाही आणि खूप गरजेच्या आहेत . ह्याच सगळ्या गोष्टी शिकविणारा एक पदार्थ म्हणजे काटेरी हलवा !
                          अगदी समजायला लागल्यापासून मी घरात हा काटेरी हलवा होत असताना बघत आलेय आणि थोडं मोठं झाल्यावर मी सुद्धा केलाय बऱ्याच वेळा ! आता करावासा वाटतो पण न करण्यासाठी बरीच कारण मी पुढे करते . पण या उपक्रमाच्या निमित्ताने मी मात्र मनाशी ठरविले आहे नक्की करून बघण्याचे ! आजकाल हा पदार्थ आणि शब्द ही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि तो घरी करता येतो हे सुद्धा ! हा फक्त संक्रांतीच्या वेळी केला जातो . संक्रांत म्हणजे थंडीचे दिवस , या दिवसात गरम पदार्थ खायला हवेत . त्यातील एक मुख्य म्हणजे तीळ . हा हलवा साधारणपणे तीळेवरच साखरेचा पाक चढवून केला जातो . आरोग्य मूल्याचा भाग .  
                         हा हलवा पूर्णपणे तयार होण्यासाठी रोज जर चार-पाच तास बसले , तर पाच-सहा दिवसात पूर्ण होते . खूपच हळू होणारी क्रिया आहे ही . दुसरा भाग म्हणजे अगदी छोट्या चमच्याने तीळा वर पाक चढवून अगदी हळुवार आणि सतत हलवत राहावे लागते याला . त्यामुळे सगळ्या तिळाला सारखे काटे येतात आणि तुटून जात नाही . जोरजोरात हलविले तर मात्र हे काटे नक्कीच तुटून जातात . आणि त्याची सुबकता निघून जाते . या सगळ्यासाठी खूप संयम , चिकाटी आणि बांधिलकी असावी लागते तुमच्याकडे . ती नसेल आणि हा पदार्थ केला की तो पदार्थचं हे सगळे शिकवून जातो .. मानसिक आरोग्य अन बळकटता !
                         पाक चढवताना हळुवार हाताने सतत हलवत राहावे लागते . तुमचे हात जर स्वच्छ नसतील तर तो हलवा पूर्णपणे काळवंडून जातो . स्वच्छता ! जे आज सगळीकडे कानीकपाळी ओरडून सांगितले जात आहे . पण हे तर आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे . आपली ती परंपराच आहे . वारसा-परंपरेला पर्याय नाही . परंपरा आणि वारसा जपा आणि आरोग्यपुर्ण ,आनंदी आयुष्य जगा !

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा)
एप्रील २०२०









Comments

  1. स्वाती प्रभुणेSeptember 11, 2020 1:17 pm

    हलवा मस्त वर्णन खरे आहे माझे माहेरी पण बनवायचे त्याला मुख्य म्हणजे खाली बसून करावे लागायचे व आई कडे मला आठवते आजी स्टोव्ह वर करायची व वेगवेगळे हळवे लवंग वेलदोडे वर चढवा यची कारण दरवर्षी कोण न कोणाचा सण असायचा त्यांचे दागिने बनवायची व पोस्टा ने पिशव्या वेगवेगळ्या आकारा च्या पाठवायची आज काल ई-मेल व्हॉट अँप मुळे हे सर्वच हळूहळू लोप होत चालले आहे मी मागच्या वर्षी नाते वाईकांना पिशव्या पाठवल्या कार्ड ला लावून तुझा पत्ता पाठव या वर्षी तुला नक्कीच पाठवीन
    लाह्या पण घरीच बनवल्या जायच्या किंवा भडगुजा नागपूर ला म्हणतात भट्टीमध्ये आपण आपलं समान नेऊन द्यायचं
    व बनवून आणायचे

    ReplyDelete
    Replies
    1. पुर्वी हलव्याच्या दागिन्यांचे फार प्रस्थ नव्हते आमच्याकडे . आता मात्र आहे . त्यामुळे तेव्हा फक्त खाण्यासाठी हलवा बनविला जात असे आमच्याकडे , तो ही फक्त तीळेवर , फारतर साखरेवर . पण पोस्टाने मात्र आम्हीही पाठवत असु . बाजारात संक्रांतीची शुभेच्छा पत्र मिळत , त्यात आतल्या बाजुला एक छोटेसे कागदाचे बनविलेले पाकीट असे . त्यात थोडासा हलवा घालुन , पोस्ट करत असु . छान आठवण करून दिलीत तुम्ही . सप्रेम धन्यवाद !

      Delete
  2. जनार्दन चौधरीSeptember 11, 2020 1:18 pm

    दोन्हि लेख वैचारिक आवडितून प्रसवलेले आहेत असे माझे मत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  3. संजय दीक्षितSeptember 11, 2020 1:22 pm

    काटेरी हलवा,राजाची जोडी����

    ReplyDelete
  4. Mala nai bai jmt najuk goshti
    Pn tu lihite n krtes chan��

    ReplyDelete
    Replies
    1. आग बाई किती ते कौतुक, माझ्या पेक्षा तुच सगळे छान करतेस की....
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  5. Agadi chhan najuk warnan..mala Nahi jamat gg banwayla

    ReplyDelete
    Replies
    1. मी आले की आपण बनवू सोबत..
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  6. Paramparik padarth kharach shararik ani maansik aarogya japnare hote👍
    Chan varnan 👌halwa banavane
    Kharach halwa ghari banavanache mala khar ter kahich athawat nahi

    ReplyDelete
    Replies
    1. जुने ते सोने. . . 😍
      सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  7. 👍 सुंदर वर्णन केले आहे 👌😊 मला तर माहित नव्हते हलवा अशा प्रकारे बनवतात...

    ReplyDelete
  8. मंदाकिनी चौथरी
    खूपच सुंदर लेख पारंपारिक आणि स्वछतेचे महत्त्व सांगणारे आहे तसेच एकाग्रताआणि चिकाटी हेगुण असले तर नाजुक काम छान होतात.

    ReplyDelete
    Replies
    1. मला तर अजुन आठवतात तुझी लांब लांब बोट हळुवारपणे हलवा करतानाची!!!
      तुझ्यामुळेच हे सगळे बघायला अणि करायला मिळाले आम्हाला!
      या बद्दल देवाचे अगणित आभार 🙏😍😇

      Delete
  9. लीला वानखेडेSeptember 11, 2020 5:01 pm

    काटेरी हलवा बघून तर खूपच छान ��������
    मीसुद्धा करायची पूर्वी हलव्याचे दागिने ते वाचल्यावर नव्याने आठवण झाली परत करायला लागावे असे वाटले
    आणि त्याच्यासाठी वातीचा स्टो वापरायचे नाही तर छोटीशी शेगडी त्याच्यात लाकडी कोळसा त्यावर छोटी टाकली आणि चमचा घेऊन एकेक थेंब तिळावर टाकायचा व हलक्या हाताने हलवायचा म्हणून तो हलवा
    रंगीत पाहिजे असेल तर पाकात थोडासा खाण्याचा रंग टाकायचा किती प्रकारचे हलवे ��
    साबुदाणा खसखस चा तर एकदम कठीण असे खूप प्रकार चेक करायचं
    आता तो
    इतिहासात जमा होऊ लागला आहे
    लेख खूप खूप छान लिहिलेले आहे ��������

    ReplyDelete
    Replies
    1. पुर्वी हलव्याच्या दागिन्यांचे फार प्रस्थ नव्हते आमच्याकडे . आता मात्र आहे . त्यामुळे तेव्हा फक्त खाण्यासाठी हलवा बनविला जात असे आमच्याकडे , तो ही फक्त तीळेवर , फारतर साखरेवर . हो आमच्याकडे  तर खास  एक छोटीशी शेगडी होती कोळश्यावर चालणारी , हलवा तयार करण्यासाठी ! खूप खूप धन्यवाद !

      Delete
  10. Equisite काटेरी हलवा आणि पारंपरिक पदार्थ यांचे वर्णन वाखाणण्याजोगी आहे. मोस्टली रिक्वायर्ड in this pandemic situation.
    One of college friend Risbud in their home we used to visit yearly to see the process of making of हलवा.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय बघणे अणि बनवणे दोन्ही खुप सुंदर अनुभव! आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच! सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  11. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  12. हलवा म्हटलं तर आता कोनी घरी बनवत नाही आता च्या मुलीनां तर नाही च नाही छान लीहील मुलीनां माहीती मिळाली आमची फुल तयारी असायची तुझा काटेदार आहे का माझा हौशिनी करायचो

    ReplyDelete
    Replies
    1. वावा किती सुंदर आठवण!!
      धन्यवाद 🙏 आम्हाला सांगितल्या बद्द्ल 😍😇🙏

      Delete
  13. Wow...ashi process aste halwa banwaychi he mahitich navhte!

    Ashya... ajoon kititari goshti halu halu lupt hot ahet...our future generations will never know...
    Thank you for penning it down so beautifully!

    ReplyDelete
    Replies
    1. हो पुढच्या पिढीला हे सगळे कळावे म्हणुन हा सगळा खटाटोप, दस्तावेज करून ठेवण्याचा.
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  14. Khup sunder वर्णन....me kadhich nahi banaun baghitalay 😜.....pn aata tuza lekh vachun banun baghanyacha vichar karatey ....pn aadhi recipe shodhavi lagel....

    ReplyDelete
  15. उषा पाटीलJanuary 09, 2024 10:15 am

    वा छान खरंच वारसा जपायलाच हवा पण आता रस्त्यावर गाडीवर हलवा मिळतो आणला घरी आणि केली संक्रांत साजरी: पूर्वी हलवा घरी करण्यात काय मजा होती*तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आनंदी राहा

    ReplyDelete
  16. प्रफुल्ल पाटीलJanuary 09, 2024 10:17 am

    माझी आई जी आज ९७ वर्षाची आहे. तिचा काटेरी हलवा व तिळगुळ बनविण्यात कोणीही हात धरत नसत.

    ReplyDelete
  17. सुभाष ओरसकरJanuary 09, 2024 10:45 am

    This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  18. सुभाष ओरसकरJanuary 09, 2024 11:03 am

    वर्षा काटेरी हलव्याचा साखरेचा पाक बनवण्यापासून ते अगदी चण्याच्या दाण्याएवढा मोठा होईपर्यंतचा माझा स्वतः चा अनुभव फारच गोड आहे. इयत्ता पाचवी ला मी नाशिकला आत्त्याकडे शाळेत शिकायला होतो तेव्हा पासून मी त्यातली प्रत्त्येक कृती पहिली आणि अनुभवली आहे. हलवा वाढताना बघणं हा सुखद अनुभव आहे. आता ही कला दुर्मिळ होत आहे
    पहाटे पाच साडे पाच ला ऊठुन आंघोळ करून शेगडीवर परातीवर एक चमचा खसखस टाकून त्यावर पावपाव चमचा पाक टाकून बोटानी परतत बसायचं. बोटांचे शेंडे लाल व्हायचे.
    पाक बनवणं पण एक कला आहे. येरा गबाळ्याचे काम नाही
    जेवढी थंडी जास्त तेवढा हलव्याला काटा सुंदर येतो. मी हलवा बनवण्यावर एक क्लास घेऊ शकतो

    ReplyDelete
  19. डॉ सुनील पुरीJanuary 09, 2024 1:14 pm

    सुंदर वर्णन आहे .काटेरी हलव्याचे, स्वच्छतेचे महत्व सांगणारे,परंपरा सांगणारे🙏💐🌷🌹

    ReplyDelete
  20. नलिनी चाफळकरNovember 24, 2024 8:27 am

    माझ्या लहानपणी मी हलवा करत होते .कोळशाच्या शेगडीवर, स्वच्छता खूप लागते. आई पाक करून देत असे. पाक अगदी पारदर्शी लागतो . त्यावेळी स्पर्धा असायच्या खसखस,चुरमुरे,साबुदाणा ह्यांचा हलवा होत असे,तिळाचा हलवा तर असायचा, हलव्याचे दागिने धाग्यात गुंफवून केले जात होते. मी खसखसचा हलवा केला होता.

    ReplyDelete
  21. मनिषा चिंचोलकरNovember 24, 2024 8:28 am

    माझ्या सासुबाई खुप छान हलवा बनवत होत्या . . फार मेहनत घेऊन बनवत होत्या हलवा . त्याची आठवण झाली .🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...