काही खास कामं आणि व्यक्ती-३
(घरातील गमती जमती)
आजचे काम आहे "पाटा टाकावणे". पाटा म्हणजे पाटा वरवंटा. जवळ जवळ नामशेष झालाय. पण तरी काही गृहीणी हौसेने छोटा का होईना घेऊन येतात आणि वापरतात. ही फारच कौतुकाची बाब आहे. अगदी भारतातच नाही, तर भारताबाहेर कुठल्या कुठल्या देशात सुद्धा घेऊन जातात आणि वापरतात . मी पण बराच प्रयत्न केला, पण अजूनही मला काही शक्य झाले नाही, पाटा माझ्या घरात आणणे. आता या निमित्ताने का होईना मला मनावर घ्यायला उत्तम संधी आहे. बघू कसे काय जमतेय.
पूर्वी मिक्सर वगैरे नव्हते तेव्हा, सर्रास सगळ्यांच्या घरात अगदी हमखास असेच पाटा वरवंटा! पाट्या वर वाटलेल्या वाटणाच्या भाज्या आणि सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट! सगळ्या भाज्यांना लागणारी वाटणं, वड्यांसाठी आणि इतर काय काय करण्यासाठी वाटायला लागणाऱ्या डाळी, थोडक्या त सगळ्या प्रकारचे ओले वाटणं, पाट्यावरच वाटले जात असे. दिवसातून कमीत कमी एका तरी वेळेला वापरलाच जात असे पाटा. थोडक्यात वापर अगदी भरपूर. या भरपूर वापरामुळे पाटा आणि वरवंटा दोन्हीही एकदम गुळगुळीत होऊन जात असत. त्यामुळे वाटण हवे तसे बारीक करता येत नाही . मग अशावेळी हा पाटा आणि वरवंटा "टाकवुन" घ्यावा लागतो. तर आजची गोष्ट आहे पाटा टाकवयाची आणि ते टाकवणाऱ्या आजींची.
तर हे काम साधारण सहा महिन्यातून एकदा करावे लागे. हे पाटा टाकवण्याचे काम करण्याकरिता आमच्याकडे एक आजी येत असतं. अगदी म्हाताऱ्या वाटत, मला तरी त्या. अंगावरची संपूर्ण त्वचा सुरकुताळलेली, उन्हातान्हात फिरून फिरून रंग एकदम रापलेला. अंगकाठी एकदम शिडशिडीत आणि उंचीही एकदम बेताचीच. फक्त पातळ नेसलेल्या, पदर सगळे अंग झाकत एका खांद्यावरून, डोक्यावरून दुसऱ्या खांद्यावर आलेला. एका खांद्यावर त्यांचे पाटा टाकवण्याचे इंग्रजी एल आकाराचे हत्यार विसावलेले. त्यांनाही सवयीचे आणि माहितीचे झालेले असल्याने, साधारण ठराविक महिन्यांनंतर त्या आपणच येत असत, आमचा पाटा टाकवण्यासाठी. किंवा कधी फार जास्त उशीर झाला तर, त्या खाली रस्त्यावरून आवाज देत जात असत, तेव्हा त्यांना बोलावून घेतले जात असे.
माझ्या आठवणीत, तेव्हा आमच्याकडे दोन पाटे आणि दोन वरवंटे. एक मोठा पाटा वरवंटा होता तो नेहमीच्या म्हणजे रोजच्या वापराचा होता. दुसरा थोडा लहान होता, तो निमित्ताने वापरला जात असे, जेव्हा खुप वाटायचे असे तेव्हा. म्हणजे साधारण खूप पाहुणे आहेत आणि वडे करायचे आहेत, गव्हाचा चीक करायचा आहे वगैरे वगैरे. अशा वेळी दोन्ही पाटे वापरले जात. दोन पाट्यांवर दोन जणी बसत आणि वाटण्याचे काम करत म्हणजे हे काम लवकर होत असे. त्यामुळे मोठा पाटा, जो रोज वापरला जात असे, तो जरा लवकर लवकर टाकवून घ्यावा लागे. लहान पाटा त्या मानाने जरा जास्त वेळाने टाकवून घ्यावा लागत असे . तसेच एक छोटेस जातं सुद्धा होतं आमच्याकडे, हे सुद्धा अधुन मधुन टाकवुन घ्यावे लागे.
त्या आजी वर आल्या की, काय काय टाकावुन घ्यायचे आहे ते त्यांना सांगून, त्याचा दर ठरवून घेतला जात असे. पण फारशी घासाघीस झाल्याचे माझ्या तरी आठवणीत नाही. एव्हढेच काय पण मी त्या आजींचा आवाज सुद्धा कधी ऐकल्याचे मला आठवत नाही. अजिबात न बोलता आणि एकाग्रतेने त्या त्यांचे काम करत असत. पाटा वापरात नसताना, तो भिंतीला टेकून तिरका उभा करून ठेवलेला असे आणि वरवंटा, भिंत आणि पाटा यांच्यात जमीनीलगत जी थोडीशी मोकळी जागा असे त्यात ठेवला जात असे. असे ठेवल्याने तो वरवंटा घरंगळून जात नसे. या पाट्याला टेकून एक लाकडी पाट सुद्धा उभा करून ठेवलेला असे. जेव्हा वाटायचे असेल तेव्हा, हा पाट बसायला वापरला जात असे आणि पाटा आडवा करून जमीनीवर ठेवला जात असे. मग वाटण्याचे काम केले जात असे.
या आजी आल्या की तो पाट बाजूला ठेवून देत, कारण त्या जमीनीवरच बसून त्यांचे काम करत असत. मग त्या तो पाटा आडवा करून जमिनीवर ठेवून घेत. त्यांचे इंग्रजी एल आकाराचे हत्यार घेऊन टाकवण्याचे काम सुरु करत असत. हे एल आकाराचे हत्यार म्हणजे एल अक्षराची एक बाजू हातात पकडण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूच्या टोकाला छिन्नी सारखे पाते असे. हे टाकवणे, रुंदीच्या बाजूला समांतर असे, पण सरळ रेषेत नाही, अगदी हलकीशी वक्र रेषा असे . मोठ्या बाजूकडून सुरुवात करून हळू हळू निमुळत्या बाजूकडे येत त्या टाकवतांना. टाकवतांना, या वक्र रेषा एकमेकांना अगदी समांतर कुठेही काहीही गडबड नाही की जराशीही चूक नाही. अगदी पट्टीने मोजून घेतले तरी! एकदम अचूकपणे करत, कसलेही मोज माप न करता! आणि आपल्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांची गम्मत, इतक्या सगळ्या सोडून द्या, पण अगदी दोन-चार समांतर वक्र रेषा जरी काढायला सांगितल्या त्या जमणार नाही इतक्या अचूक.
त्यांनी काम सुरु केले की, अगदी ते बघत बसावेसे वाटत असे आणि मी ते बघतही असे. एव्हढेच नाही तर ते त्यांचे ते हत्यार माझ्या हातात घेऊन त्यांच्या सारखे टाकवून बघावेसे वाटे. त्या अगदीच बोलत नसत, त्यामुळे त्यांना गोड गोड बोलून पटविणे सुद्धा शक्य नसे. आता मला पाटा वरवंटा आणायलाच हवा, म्हणजे मला माझी ही इच्छा सुद्धा पूर्ण करून घेता येईल. या लिखाणाच्या निमित्ताने आठवण झाली या लहानपणीच्या अपुऱ्या इच्छेची! मनावर घेऊन करूनच बघीन म्हणते. तर त्यांचे काम चालू होत असे, अगदी शिस्तीत. त्या सगळ्या वक्र रेषा तर शिस्तीत असतंच, पण टाकवतांना एक विशिष्ठ आवाज होत असे, साधारण टकटक आणि ठकठक याच्या अगदी बरोबर मधला आवाज असे तो, मला अजूनही स्पष्ट ऐकू येतोय! हा आवाजही एकदम तालात आणि लयीत. तिथे नाही बसले तरी सगळी घरात कुठेही ऐकू येत असे. टाकवण्याचे काम चालू असल्याची सतत जाणीव असे. मला हा आवाज सुद्धा खूप आवडे, आता कित्तेक वर्षात ऐकायला नाही मिळाला.
असे करत करत त्यांचा पाटा टाकवून झाला की मग वरवंट्याची पाळी येत असे टाकवण्याची. आता याचा आकार म्हणजे साधारण दंडगोल . त्यामुळे ठेवला आणि टाकवला असे करता येत नसे . कारण तो सारखं घरंगळून जाणार. मग हा वरवंटा, त्या आजी त्यांच्या दोन्ही पावला मध्ये घट्ट पकडून ठेवत आणि त्यांचे काम चालू करत. थोडा भाग टाकवून झाला की थोडा गोल फिरवून घ्यावा लागे, पुढचा भाग टाकवून घेण्यासाठी. पूर्ण होईपर्यंत हे असेच चालत असे. पुन्हा तोच लयबद्ध आवाज थोडा थोडा वेळाने चालू राही. एकदा का सगळे काम झाले की तो आवाज थांबे. मग घरात आपोआपच कळे, काम पूर्ण झाल्याचे. मग मम्मी बाहेर येऊन एकदा सगळ्या कामावर नजर फिरवून घेत असे. सहसा कुठे काही गडबड नसे.
मग घरात जे काय केलेलं असे पोळी/भाकरी आणि भाजी, तेच त्यांना जेवायला देत असे एका ताटात वाढून , सोबत पाण्याचा पेला. त्यांचे जेवण झाले की सांगितलेले नसे, तरी त्या त्यांचे ताट आणि पेला धुवून ठेवत. मग त्यांना त्यांचे ठरलेले पैसे दिले जात, अगदीच मामुली रक्कम असावी माझ्यामते. त्या ते पैसे घेऊन जीना उतरून खाली जात आणि रस्त्याने परत फिरत आवाज देत जात असत, दुसरे काम मिळवण्यासाठी.
आता हा पाटा वरवंटा टाकवून तर घेतला. पण हा लगेच असाच किंवा धुवून वापरता येत नसे. कारण टाकवल्यामुळे त्या पाट्याच्या दगडाचे अगदी बारीक बारीक तुकडे झालेले असत त्यावर. हे स्वच्छ होऊन तो वापरण्याजोगा होण्यासाठी त्यावर थोडी थोडी ज्वारी दोनदा तरी भरड वाटून घ्यावी लागे. असे केल्याने सगळे बारीबारीक दगडाचे तुकडे त्यात निघून जात. हे सगळे वाटून झाले की परत स्वच्छ पाण्याने धुवून टाकला की मग हा वापरायला तय्यार!!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१४ मे २०२०
अशा पद्धतीने पाटा टाकवला
जात असे
अशा पद्धतीने वरवंटा टाकवला जातो
आमच्याकडे पाटा असा उभा करून ठेवला जात असे
आणि भिंत आणि पाट्याच्या जागेत
वरवंटा ठेवला जात असे .
पाटा उभा करून ठेवण्याच्या
वेगवेगळ्या पद्धती
काय तो लिखाणासाठी चा विषय आणि काय त्या आठवणि सर्वच कौतुकास्पद आहे
ReplyDeleteTons n tons of love 😍 ❤ 😇
DeleteKhup Chchan
ReplyDeletePic tar khupch chan
आनंदी धन्यवाद 🙏 अगदी मनापासुन 😇😍
Deleteपाटा व वरवंटा लहान पण ची आठवण झाली आमच्या भागात तो छान मिळत असे त्यात देखील प्रकार होते .उत्तर प्रदेशी Mp चा व जबलपूर असे पाटा व वरवट्याचे दगड असत आमच्या कडे ते तिन्ही प्रकारचे होते रंग वेगळे असायचे त्यावर वाटण खरेच खूप चविष्ठ लागायचे खरडा ठेचा मस्त�� भाकरी बरोबर आजकाल टाकवणारे व कलही भाड्या ना करून देणारी लोक पण येत नाही
ReplyDeleteतेव्हा माहिती नव्हते हे सगळे प्रकार.
Deleteछान ही सगळी माहिती सांगितलय बद्दल धन्यवाद 🙏 😇
Waa waa tondala panich suto nuste patyavr vatayche padarth athvle tri. Mazya aaikde pn hota pata-vrvanta. Aaila vat tana baghun mlahi moh vhaycha vatyacha pn thodya belaying lakshat yaych ki ye apne bas ki baat nahi��. Khup chan lekh����
ReplyDeleteअगदी खरंय, लहानपणी बहुतेक सगळ्या मुलींना यायचा हा अनुभव!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
बापरे किती जुनी आठवण झाली आता मिक्सरच्या जमान्यात पाटा आणि वरवंटाची आठवण पार विसरून गेले तुझ्या लेखामुले आठवण झाली
ReplyDeleteमंदा चौधरी
खरच खुप जुनी आठवण आहे पण खुप छान आहे, माझ्या खुप आवडीची ! ❤ 😍😇
Deleteआता तर कुणाकडे बघायलाही मिळत नाही.. माझ्याकडे आहे छोटासा..वापरात नाही पण आहे एक जुनी आठवण.
ReplyDeleteआता तू ईथे सगळ्यांसमोर सांगितलेस. आता मी आली की नक्की पळवणार तुझा तो छोटा पाटा 😉😊 so mentally be prepared to loose it 😍
DeleteTons of love 😍
तुझ्या या पाटा वरवंटा मुळे त्या आजि डोळ्या समोर उभ्या राहिल्या
ReplyDeleteतुला विषय कसा सुचतो
तुमच्या सगळ्यांचे प्रेम अणि आशिर्वाद आहेत ना माझ्यापाशी, त्यामुळे सुचते काय काय!
Deleteखुप सारे प्रेम अणि धन्यवाद 😍
Tula bare sarv barik sarik athavate. Pata takavaiche varnan khoop chan.pics pan chan. To badala ter panich sutale pics pahun nistachi chatani😋
ReplyDeleteमला मात्र भीती वाटते आता निस्ताची चटणी बघुन 😉😂 खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍
DeletePata varwanta var kasa suchalag tula lihayala�� tehi agadi vyavasthit muddesud pane ������ khup aawadala lekh... Junya aathvani tajhya zalya ��
ReplyDeleteमला पण खुप आवडले तुझे कौतुक 😍 खुप सारे प्रेम अणि धन्यवाद 🙏
DeletePata takavne chi mahiti ati uttam aahe khup chan lihile aahes agadi jase bai pata takavite aahe v aapan pahat aahot��
ReplyDeleteaata maza pata mi dunyasathi use karte g�� aadhi khup vaparla mixer bighadla ki toch bichara kamala yaycha ��
असु दे, काळाप्रमाणे बदलणे सुद्धा आवश्यक असते.
Deleteहो mixer खराब झाले की काम अडते
पाट्याचे तसे नव्हते, तो कधीही नादुरूस्त होत नसे, फार महत्वाचा मुद्दा मांडलाय
खुप सारे धन्यवाद!!!
Gavakadcha memories lahanpani cha refresh zalya ase watle... excellent article
ReplyDeleteमनःपूर्वक स्वागत आपले अणि खुप खुप धन्यवाद 🙏 😊
DeleteGreat to know abt पाटा वरवंटा, आकृतीसह लेख आवडलेला आहे. टाकावण्याची पद्धत आवडली आहे which gives antiskid and aesthetic properties to पाटा. Loved various typology of pata-varvanta.
ReplyDeleteतुझाही अभिप्राय पाहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंत आवडलेला आहे, नेहमीप्रमाणेच....
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
लेख खुप आवडला,इतक्या लहान बाबींवरसुध्दा अप्रतिम लेखन केले आहे.आपल्या स्मरणशक्तीची कमालच आहे किती लहानसहान गोष्टी लक्षात आहेत आपल्या..
ReplyDeleteखुप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
Deleteमस्तच लिहिलाय लेख. पाटा varvanta एकदम जुनी आठवण. माझ्या माहेरी पन होता. खूप वेळा प्रयत्न केला पन jamlach नाही काही वाटायला. आई bibdyanch पन वाटण करायची tyavr, nistyachi चटणी tr ahhaha mastach����
ReplyDeleteमला मात्र छान वाटता येत असे तेव्हा! आता खूप वर्षात पाट्यावर वाटले नाहीये, त्यामूळे आता वाटता येईल की नाही सांगता येत नाही, असो
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुझ्या आठवणी सांगितल्या बद्दल!
लिखाणाचे विषय पण भारी आणि बारकावे पण 👌
ReplyDeleteखरंच खूप छान आठवण... पाटा वरवंटा... बघून खूपच छान वाटते👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐🎉😊
ReplyDeletePata varavanta Kay bhari vishay .....tula tyawar lihhayla bar suchal.......Mazi sasu ter tyana jamat hot topryant patyawarch chatani vatat hoti.....👌🏻🌹
ReplyDelete