आनंदी सोहळा-१ !
स्वागत ! स्नेहाळ स्वागत !! सगळ्यांचे , अगदी प्रत्येकाचे , आजच्या या आनंद सोहोळ्यात !!! आजचा लेख आणि दिवस दोन्हीही खूप खास ! आज बरोब्बर एक वर्ष झाले , हा ब्लॉग सुरु करुन . आजच्या दिवशी बरोब्बर एक वर्षापूर्वी प्रस्तावना प्रकाशित केली होती . त्यानंतर आजपर्यंत पन्नास लेख प्रकाशित झाले आणि हा एक्कावन्नावा !
प्रस्तावना प्रकाशित केली आणि काही जवळच्या मंडळींना कळविले त्याबद्दल . मग प्रस्तावना वाचुन , काहींचे ब्लॉगवर अभिप्राय आले , काहींनी व्हाट्सअप , मेसन्जर वर संदेश पाठविले , काहींनी फोन सुद्धा केले . पण एक मित्र , त्याच चौधरी सदनाच्या गल्लीत राहत होता तेव्हा . पण तेव्हा त्याच्याशी आमची मैत्री नव्हती . त्याने तर प्रस्तावना वाचुन फोनच केला . प्रस्तावना वाचुन तो खुपच भारावून गेला होता आणि त्याच्या सगळ्या तिथल्या आठवणी उचंबळुन आल्या होत्या . अखंड बोलत होता , शब्दांचा धबधबाच जणु ! फारच छान वाटत होते ते सगळे ऐकायला . माझे घर असलेली इमारत आणि भोवतालची त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती होती ! त्याचे बोलणे संपल्यावर वाटले , अरे रेकॉर्ड करून घ्यायला हवे होते . असो . अजूनही लेख वाचुन झाले की त्याचे अधुन मधुन फोन येतंच असतात !
जवळ जवळ बारावी झाल्यापासुन मी शिक्षणासाठी घर सोडले , नंतर लग्न वगैरे कारणांमुळे बाहेरच आहे . तेव्हा तर भ्रमणध्वनीच काय पण दूरध्वनी सुद्धा नव्हता घरी . त्यामुळे घरी , आईवडिलांशी संपर्क ठेवण्यासाठी एकमेव साधन म्हणजे पत्र . ते पोहोचायला आणि त्याचे उत्तर यायला सुद्धा किती तरी वेळ लागे तेव्हा . नंतर काही वर्षांनी दुरध्वनी आले आणि नंतर भ्रमणध्वनी . अलीकडे तर व्हॅट्सऍप , फेसबुक सारखे सोशिअल मीडिया सुद्धा उपलब्ध आहेत . या सगळया माध्यमातुन शक्य असे , तसा संपर्क मी साधत गेले घरी आणि आईवडिलांशी . पण चौधरी सदनाचे दस्तावेजीकरण सुरु केल्यापासुन मात्र माझे आईवडिलांशी अगदी सतत बोलणे , सवांद चालू असतात . अगदी कधीकधी तर दिवसातुन तीन-चार वेळा सुद्धा . या पूर्वी मी कधीच इतका संवाद साधला नव्हता त्यांच्याशी . खूप मजा येते , हा सगळा संवाद चालू असतांना , सगळ्या जुन्या आठवणी , काही ते विसरुन गेलेले असतात , तर काही मी . काही तर मला माहीतच नसलेल्या गोष्टी कळतात आणि मजा , आश्चर्य वाटते . आमच्यात आधीच छान असलेली मैत्री , अजुनच दाट आणि घट्ट झालीय !
या दस्तावेजीकरणाचा लेखन हा मुख्य भाग असला तरी , विषय वाचकाला नीट समजावा , बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्याआड गडप झाल्या आहेत , त्या बघता याव्या , यासाठी छायाचित्रं फार महत्वाची ! या दस्तावेजीकरणाला खूप मजबुत खांबांचा आधार आहे , त्यामुळे तो असा डौलात उभा आहे . जी छायाचित्रं चित्रीत करणे इथे शक्य असते , ती सगळी छायाचित्रं 'तो' चित्रीत करुन देतो ! जी इथे चित्रित करणे शक्य नसते , अनेक कारणांमुळे . ती सगळी छायाचित्रं , माझा भाऊ , वहिनी , बहीण , मम्मी नंबर दोन , एक सख्खी मैत्रीण आणि दोन व्यक्ती (अगदी थोरल्या भावांसारख्या असलेल्या , अगदी प्रत्येक प्रसंगात यांचा खूप हातभार असतो ) , चित्रीत करून मला पाठवतात ! वेळी अवेळी मी यांना फक्त सांगते मला अशी अशी छायाचित्रं हवी आहेत आणि ही मंडळी लगेचच ती ती छायाचित्रं काढुन माझ्यासाठी उपलब्ध करून देतात .
मी काही छायाचित्रं मागितली की , ती तर मला लगेचच मिळतातच . पण त्याव्यतिरीक्त सुद्धा पुष्कळ छायाचित्रांचा पाऊस माझ्यावर पडत असतो कायम . कुणाला लेख वाचुन झाल्यावर त्याच्याशी निगडित काही दिसले की , माझी आठवण होते आणि मग लगेचच त्या त्या गोष्टींची छायाचित्रं काढुन पाठविली जातात . तर काहींना यातील खाद्य पदार्थांचे लेख वाचुन , ते पदार्थ खायची इच्छा होते . मग ते पदार्थ केले आणि खाल्ले जातात आणि माझ्याकडे त्यांचे छायाचित्रं येतात . टाळेबंदीमुळे काही पदार्थ मिळणे कठीण होते , मग असे लेख वाचून कसा त्रास झाला , हे कळविणारे काही संदेश सुद्धा येतात . किंवा कुणी दुसरे काही खास पदार्थ केले , तरी त्याची छायाचित्रं मला अगदी आठवणीने पाठविली जातात . आज या खास लेखासोबत मी शक्य तितकी सगळी छायाचित्रं प्रकाशित करत आहे .
काहींना काही वस्तू पहिल्या की , माझी आठवण येते आणि कदाचित ते माझ्या उपयोगी पडेल असे त्यांना वाटते . मग त्याची सुद्धा छायाचित्रं काढुन मला पाठविली जातात . कुणी चौधरी सदनाच्या बाजुला गेले की , चौधरी सदनाची छायाचित्रं काढून मला पाठविली जातात . "गच्चीवरील बाग" लेख वाचल्यापासुन आणि माझी फुलांची आवड माहिती झाल्यामुळे सगळेच जण , आपापल्या बागेतील छानछान फुलझाडांचे फोटो काढुन मला पाठवत असतात . अगदी अखंडपणे हा आनंदाचा झरा सगळ्या बाजूंनी झिरपत माझ्याकडे येत असतो . अशी सुद्धा सगळी शक्य तितकी छायाचित्रं मी आज इथे तुम्हा सगळ्यांना पहायला उपलब्ध करून देत आहे .
असा सगळ्या बाजुंनी , वेगवेगळ्या रूपात आनंदाचा , प्रमाचा वर्षाव चालुच आहे माझ्यावर . या ब्लॉगच्या निमित्ताने कितीतरी जुनी नाती , नव्याने जोडली गेली . काही नवीन नाती जोडली गेली . विशेष करुन लहान बहीणभावंडं , ज्यांचा जन्मच मी तिकडून बाहेर पडल्यावर झाला , त्यांची माझी ओळख सुद्धा या ब्लॉग मुळेच झाली , केव्हढा हा आनंद ! मैत्रीच्या बाबतीत सुद्धा तसेच . मधल्या काळात आपापल्या व्यापांमुळे आणि या ना त्या कारणाने बऱ्याच मित्र-मैत्रिणीशी संपर्क खंडीत होता . आता या ब्लॉगच्या निमित्ताने परत सगळ्यांचा संपर्क झाला . जुनीच मैत्री नव्याने उजळून निघाली . एव्हढेच नाही तर या ब्लॉगमुळे कितीतरी नवीन मित्र-मैत्रिणी जोडले गेले . गेले कित्तेक वर्षांपासून मी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतेय , पण मला काही हे जमले नव्हते . पण या नवीन जोडल्या गेलेल्या एका मित्रामुळे , मी मेडिटेशन करायला शिकले आणि बऱ्यापैकी नियमित मी करते सुद्धा आता ! आणि मैत्री तर इतकी छान झालीय की आठ-दहा दिवसात बोलणे नाही झाले ,की चुकल्यासारखे वाटते . हे एक वर्ष या सगळ्या आनंदी वर्षावात कुठे भुर्रकन उडून गेले समजलेच नाही !
मराठी वाचन माझे नेहमी चालुच असते . पण मराठी लिखाण दहावी झाल्यापासुन बरेच कमी झाले . पण नंतर काही काळ , नियमित पत्र लिहायच्या सवयीमुळे काही प्रमाणात चालू होते . हळुहळु कमी कमी होत ते सुद्धा जवळजवळ बंदच झालेले होते अलीकडे . महाराष्ट्र सुटल्यापासुन संभाषणाची मुख्य भाषा इंग्रजी . त्यामुळे अगदी शंभर टक्के नाही तरी पंच्याहत्तर टक्के विचार सुद्धा इंग्रजीतच करायची सवय झालीय मला . परत सोशिअल मीडिया , त्यावर सुद्धा इंग्रजी सोप्पे जाते म्हणून जास्त संभाषण इंग्रजीमध्येच . त्यामुळे मला वाटले होते हे सगळे लिखाण माझ्याकडून आता इंग्रजीतच होणार , सुरुवात सुद्धा झाली होती इंग्रजीतच आणि हे मला काही फारसे आवडत नव्हते . पण कसे आणि केव्हा , माझ्याही नकळत हे सगळे लिखाण परत मराठीत सुरु झाले ! अगदी खूप वर्षांनी माहेरी/आजोळी आल्यासारखे वाटले !
फारच सुंदर चालू आहे हा माझा प्रवास ! यामुळे माझा मराठी शब्द संग्रह खूपच समृद्ध होत आहे . पण अधून मधून वाटुन जाते निव्वळ मराठीत असल्यामुळे , खूप कमी लोकांना या आनंदात सामील होता येतंय . कारण महाराष्ट्राबाहेर काय पण महाराष्ट्रात सुद्धा मराठीचा वापर बराच कमी होतोय . पुढची पिढी तर मराठी वाचन सोडा , दोन वाक्य मराठीत बोलली तरी खूप झाले असे वाटते .तसेच मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर राहिल्याने , माझा अमराठी परिवार सुद्धा खुप मोठ्ठा आहे . त्यांना सगळ्यांना सुद्धा खुप आपुलकीने आणि आत्मीयतेने माझे सगळे लिखाण वाचायची खुपच इच्छा आहे . त्यामुळे आता हे लिखाण इंग्रजीत भाषांतर करण्याची फारच गरज वाटते आहे . ते लवकरच करण्याचा विचार आहे माझा . तसेच सोबत ध्वनीमुद्रित लेख पण लवकरच आपल्याला ऐकायला मिळतील . आता ब्लॉग मराठीत असला तरी सांगायला आनंद होतोय , हा ब्लॉग जगाच्या अगदी कानाकोपऱ्यातून , जवळ जवळ तीस देशातुन वाचला गेलाय आज पर्यंत ! वाचला गेल्याबद्दल तर आनंद आहेच , पण आपला मराठी माणुस आणि मराठी भाषा जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचल्याचा आनंद खुप जास्त आहे !
या निमित्ताने खूप जणांचे बालपणातील अनुभव वाचायला मिळाले . त्यांच्या आठवणी आणि आनंद मला त्यांच्या शब्दांमधुन अनुभवायला मिळाला , मिळत आहे . तो शब्दाशब्दांतून ओसंडुन वाहणारा आनंद बघुन , माझाही आनंद कित्तेक पटीने वाढतोय . आणि परत परत प्रत्यय येतोय , जितका आपण आनंद वाटत राहू त्याच्या कितीतरी पटीने जास्त आनंद आपल्या वाट्याला येतो ! हा आनंदाच्या पावसाचा शिडकावा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कायम होत राहो .........!
प्रत्येकजण आपापल्या सोयीने , सवडीने ब्लॉग वाचत असतो . काही असे आहेत लिंक मिळताक्षणी वाचतात , काही नंतर जमेल तसे वाचतात . पण काही मंडळी आवर्जुन शक्य तितक्या उशिरा वाचतात . याचे कारण विचारल्यावर , समजले , जीतके उशिरा वाचले तितके जास्त अभिप्राय सुद्धा वाचायला मिळतात ! लेख वाचायला तर आवडतोच , पण त्यावरील अभिप्राय वाचायला सुद्धा तितकेच आवडतात . हे तितकेच खरे आहे . मला सुद्धा सगळ्यांचे अभिप्राय , आठवणी , अनुभव वाचायला फार आवडतात . या माझ्या दस्तावेजीकरणाला , तुम्हा सगळ्यांच्या अभिप्राय , आठवणी आणि अनुभवांची खुपच छान जोड मिळते आहे ! बरीच अशीही मंडळी आहे , एकदा वाचुन समाधान होत नाही , त्यामुळे परत परत वाचत असतात , त्यांना आवडलेले लेख . त्यात भर म्हणजे एक एक मित्र मैत्रिणी , त्यांना आवडणारे विषय सांगुन , त्यावर लिहायला सांगतात . मग ते विषय लिहायला , अजुनच मजा येते मला . या सगळ्या गोष्टींमुळे माझा आनंद अजुनच कित्येक पटीने वाढतो !
ह्या सगळ्या आनंदी लिखाणाचा उगम , चंद्रमोहन सर , लिहितांना कायम त्यांची आठवण आणि सुचना मनात असतातच ! तसेच लिहुन झाल्यावर , मला काही गडबड वाटली , काही शंका असली तर , एक माझ्या गुरुस्थानी असलेली व्यक्ती , ज्यांना मी तर जीवनगुरू(असा शब्द आहे की नाही माहित नाही , पण मला मात्र हाच शब्द योग्य वाटतो ) म्हणते , कायमच माझ्या पाठीशी खंबीरपणे असते , मला प्रोत्साहन द्यायला आणि माझा आत्मविश्वास वाढवायला ! माझे मन आणि भावना इतक्या उचंबळुन आल्या आहेत आज हे सगळे लिहितांना की , अगदी काय लिहू आणि काय नको असे होऊन गेले आहे . जसे जसे मनात येत गेले , तसे तसे लिहिले आहे ...... आपण सगळे , म्हणजे आपल्या या चौधरी सदनातील विस्तारित कुटुंबातील प्रत्येक सदस्य मिळून हा आपला आनंदाचा झरा , असाच ठेवूया........ कायम आनंदाने खळाळता.........! या आनंदी पावसात , असेच कायम चिंब भिजत राहु या ...... !! आपले बालपण परत अनुभवुया या ......!!!
सगळ्यांना खुप सारे , अगदी आभाळभर प्रेम . . . . . . . . . . . . . . 😊😍❤️💖💝💞
©आनंदी पाऊस
१२ ऑगस्ट २०२०
माझ्याच बाल्कनी मध्ये फुललेली ही लीली
घराच्या बागेतील केळाच्या घडाची सुरुवात
पुर्ण वाढलेला घड
आणि ही इतर काही फुल झाड
pc आमचे दादा
एका मामीच्या गच्चीवरील फुलं
एका काकुच्या गच्चीवरील फ़ुलं
एक सहकारी मैत्रीण
एक मैत्रीण
एका भावाच्या बाल्कनीमध्ये
एक ताई , आमच्या
एक काकु , माझ्या
नारळाच्या झाडाचे कणीस/तुरा
गच्चीवरील बाग
टाळेबंदी मुळे मिळालेला एक
सुंदर क्षण !
माझे एक मित्र
मेथी
चिवळ ची भाजी
याची पानं फार सुंदर
माझ्या खुप आवडीची
एक मैत्रीण
गव्हाची खीर
माझ्या खूप आवडीची
अगदी लहानपणापासुन
आवडणारे हे फुल
एक सख्खी मैत्रीण
चौधरी सदन च्या बाजुने
जात असतांना
चौधरी सदन
गल्लीच्या बाजूने
एक मित्र
किलवरचे राजा राणी 😊😍
मावा कुल्फी
मँगो आईस क्रिम
तळणीचे मोदक
एक मामी
एका वाहिनीने केलेले नागदिवे
भावाने फोटो पाठवले
ताज्या मुगाच्या कचोऱ्या
एक बहीण
एक थोरला भाऊ
एका वाहिनीने केलेले
गुलाबजाम
कडगावच्या खव्यापासुन !
पावसाळी हवा
आंबे अतिशय मनापासुन
आवडणारा मित्र
एका मित्राने स्वतः केलेली
ठेचा भाकरी !
चटपटीत लोणचं
एक बहीण
लाजाळु
भुईमुगाचे फुल
एका मित्राच्या बाल्कनीत
उकडीचे मोदक
माझ्या एक मैत्रीण
इंद्रधनुष्य
अशाच एका आनंदी पावसा नंतर
माझ्या बाल्कनीतुन ........
मस्तच लिहल आहेस. छान तुझा लिखाण प्रवास छान चालू आहे.असे लिहीत रहा काही वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या काहींनी तोंडाला पाणी सुटले . मला स्वतःला र्हस्व दीर्घ व अनुस्वार टाईप टायपिंग करताना जमले नाही तू ते समजून घेतले माझे मनातले भाव ती पण एक कलाच आहे. पुढच्या लेखाची वाट बघत आहे वेगवेगळ्या विषयांवर तुझे कॉलेज विश्व असेल किंवा इतर अनुभव
ReplyDeleteहो हो भरपुर अनुभव आहेत, हळु हळु सगळे वाचायला मिळतीलच. तुमच्या कडून कायमच खुप प्रोत्साहन मिळते मला अणि माझा आत्मविश्वास अजुनच वाढतो! त्यामुळे लिहायला अजुनच हुरूप येतो, मजा येते
Deleteसगळ्या गोष्टी साठी खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
अतिशय उत्साही आणि प्रसन्न वार्षिक लेखाजोखा मांडणी. प्रत्येक शब्दात आनंद ओसंडून चाललेला दिसतोय. वर्षभर इतक्या नेटाने लिहित जाणे आणि ते पण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर, शिवाय वाचकांना गुंतुन ठेवणे, हे येरागबाळ्याचे काम नोहे. तरी पण तू हे शिवधनुष्य उचलले आहेस आणि समर्थपणे पेलले आहेस ह्याचे कौतुक करायलाच पाहिजे. शब्दरचना सोपी अणि उत्साहवर्धक आहे त्यामुळे वाचक लगेच तुझ्या लिखाणाला कनेक्ट होतात. शिवाय ह्या तुझ्या लेखनामुळे आम्हाला पण आमच्या बालपणीच्या आठवणींत यथेच्च डुंबता आलं. लेखाबरोबर सादर केलेले photoes पण तेवढेच समर्पक आणी परिणामकारक आहेत. तुझ्या ह्या आनंदी सोहोळ्यात सामील होऊन आमच्यावर पण तेवढाच आनंदाचा वर्षाव झाला हे मात्र नक्की. तुझ्या पुढील लिखाणाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेछा... 👍👍👍👍
ReplyDeleteलेखाच्या प्रत्येक शब्दातून आनंद अगदी ओसंडून वाहत आहे हे अगदी खरे आहे, बरोबर आहे
Deleteपण त्याच्या कितीतरी पटीने जास्त तुमच्या प्रत्येक शब्दातून कौतुक ओसंडून वाहत आहे
त्याबद्दल किती आभार मानले तरी कमीच आहेत. पण खरतर मी ईतक्या कौतुकास पात्र नाही, माझ्या मते....
लेखनातून वाचकालाही आपापले बालपण जगता यावे, अनुभवता यावे अणि त्या आनंदात यथेच्छ डुंबता यायला हवे असे मला वाटते आणि तसे झाले तर मला फार आनंद होतो!
Spread happiness 😊 माझा अगदी आवडता छंद आहे हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही....
केशव उवाचं
ReplyDeleteपाऊस खरेच आनंदी होता...
विषय साधेच असतात..पण साहित्यिक अलंकार चढले की अलंकृत होतात ... छान...
मोजक्या शब्दात पुरेपूर व्यक्त होण्याची कला छान साधली आहे तुम्ही!
Deleteअसच कायम तुमच्याकडून प्रोत्साहन अणि शुभेच्छा मिळत राहो हीच ईच्छा! 😇😇
तुझे लेख खुपच वाचनीय आणि ओघवत्या भाषेत अनुवादित केलेले आहे वाचूनकधी तोंडाला पाणी सुटले तर कधी परत अनुभवाया मिळावे असे वाटले मंदा चौधरी .
ReplyDeleteतुझेच संस्कार आहे, त्याचे शब्द स्वरूप प्रकट होते आहे माझ्या लिखाणातून
Deleteआभाळभर प्रेम ❤ 😍😇
सर्व लेख खूप छान.काही लेखातुन बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.काही प्रसंग आठवले.
ReplyDeleteअशीच छान छान लिहीत जा.
खुप खुप शुभेच्छा.
रत्ना भोरे.
खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Deleteअसेच तुमचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असु द्या!
खुप सारे प्रेम 😍
खूप खूप अभिनंदन ताई, सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात तुझे ब्लॉग्स वाचून..
ReplyDeleteतुझ्या पुढील लिखाणाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेछा...
- निखिल महाजन
खुप सारे प्रेम अणि मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊 😇
Deleteखुप छान लेखाजोखा! नेहमीच वाटत पहायला लावलेलं लिखाण. आणि जवळजवळ प्रत्येक लेखात माझा अनुभवलेला क्षण असल्यामुळे वाचायला वेगळाच आनंद मिळतो व परत ते क्षण जगायला मिळालां हे माझ्या साठी अमृताहुन गोड. बालपणी चा काळ सुखाचा आणि तो अशारितीने परत अनुभवायला मिळाला हे स्वर्ग सुख.
ReplyDeleteअशीच लिहीत राहा.
खरच ते गोड अणि छान क्षण परत परत जाण्याची नामी संधी आहे आपल्याला. ते क्षण जगताना गोड वाटतच होतेच पण आता परत जगतांना जास्त गोड वाटत आहेत!!!
DeleteV all are really blessed souls 😇😇😇
Congratulations.. on complete a year of commitment to your blog..here is to many more
ReplyDeleteThnk you sooooooo much n tons of love 😍
Deleteनेहमीप्रमाणे खूप छान ताईखरच छान वाटते लहानपण डोळ्यासमोर उभ राहत
ReplyDeleteखुप सारे प्रेम अणि धन्यवाद 😍 😇
Deleteआजच्या स्पेशल दिवशी स्पेशल व्यक्तीला स्पेशल शुभेच्छा.......तू अशीच लिहिती रहा. असा छंद जोपासणे सर्वांना जमतेच असे नाही.
ReplyDeleteतुझी तू वाढवी कला.....
अणि या खास व्यक्ति कडुन तुला खास धन्यवाद 🙏 ☺
DeleteGreat collection.. Again and again all the best for further new Lekh. Vilas Kinge
ReplyDeletethnk u so much n tons of love !
DeleteKharach aaj aanadi sohala
ReplyDeleteAnandi sohalacha hardik shubhechchha.
Aanandi paus asach padatraho
Aanandache dohi aanad tarang. .
Indradhanushacha ranganpramane tuzhe hey lekh kadhi balpanicha athawani, kadhi kahi gamti jamati, kadhi vegvegale utshav, kadhi vegvegale padaarth banavanach prakriya, chitre������
chothota vishainvar vistrut likhan wa
��
अगदी खरंय, इंद्रधनुष्य च्या छान झळाळत्या रंगांचा रंगीत आनंद!
Deleteफारच सुंदर आहेत हे सगळे रंग, मनाला एक खुप छान आनंद अणि तृप्ती देणारे क्षण!
खुप सारे रंगीत धन्यवाद 🙏 तुला! 💝💛💚💙💜
Khup khub Abhinandan tai,saglya lahanpanichya athavnina ujala milto....tuzya pudil vatchalikarta khup khup shubhechya tai
ReplyDeleteकिती गोड! लहान बहीण मोठ्या बहिणीचे कौतुक करते! आभाळभर प्रेम अणि धन्यवाद 😍 😇
Deleteया आनंदी सोहळ्याचे भागिदार व्हावेसे वाटणे सहाजिकच आहे पण ति मिळणे महत्वाचे नाहि का असो आनंदि आनंद गडे
ReplyDeleteखरच आनंदी आनंद गडे....
Deleteआपण सगळेच आहोत भागीदार या सोहोळ्याचे!
पण आपल्या या आनंदी जादूगाराने हा आनंदी सोहळा आपल्या साठी घडवून आणला....
अणि हा निर्माता आज आपल्यात नाही याची टोचणी आहे.....
Chchan lihile aahe
ReplyDeleteAsech lihine suru thev te pan aaplya marrhati madhe
अरे व्वा, छान पद्धत आहे आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्याची आपल्या मराठी बद्दल अणि माझ्या बद्दल. अरे मराठीत चालुच राहणार लिखाण, या बद्दल काही शंकाच नको! सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deleteमस्तच ग!
ReplyDeleteमनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
Deleteमस्तच लिहीले आहे. लहान पणी च्या सर्व आटवनी जागे होतात.👌👏
ReplyDeleteअगदी मनापासुन सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteCongratulations on the first anniversary of your blog maam
ReplyDeleteFirst of all heartiest welcome in Chaudhary sadan!
DeleteTons n tons of love 😍
Ur wishes means a lot to me! N I really mean it!
लेख खुप छान
ReplyDeleteजुन्या आठवणी जाग्या झाल्या
खुप खुप स्वागत तुझे चौधरी सदनात!!
Deleteसप्रेम धन्यवाद 😍 😇
Ani खुप सार प्रेम माझ्या गोड छोटू मैत्रिणीला!
Congratulations tuzya aanadi sohalyache tuze sarch lekh tyatil mahiti vachun man prasanna hote sahaj v oghavati bhasha yamule dolya samor sarv prasang udhe rahatat
ReplyDeleteValavaniche,godache ,miravnuki,lahanpaniche khel, sanvar sarvch tu khup uttam lihile aahes ashich sunder lihit raha v aamhala vachanala aanad det raha asha shubhechaa!!
काय बोलु मी आता यावर?! असच तुझ्याकडून प्रेम शुभेछा आशिर्वाद अणि प्रोत्साहन मिळत राहो! ❤ 😇😍
Deleteखुप सारे सप्रेम धन्यवाद 😍
सर्व प्रथम तुझे अभिनंदन....अखंडीत&उत्साहाने स्वतः च्या लेखणीला समृद्ध केल्याबद्दल....आज एक्कावनावा लेख प्रकाशित करताना एक्कावनाव्या वर्षात पदार्पण करणारया वर्षालीस (अक्कास)खूप शुभेच्छा....हा तर एक दुग्धशर्करा योगच म्हणायचा....तुझे लिखाण म्हणजे नवीन पिढीसाठी परंपरागत गोष्टीच्या आठवणींचा खजिनाच....&आपल्यासाठी तर प्रत्येक क्षण पुन्हा जगणे होय....हे जीवनानुभव नक्कीच प्रेरणा देणारे आहेत....हा सुवर्णोत्सवी आनंदी सोहळा शतकोत्तर जावो ही सदिच्छा.....लेखणी &कुंचला यांचा वरदहस्त लाभलेल्या फुलराणीस खूप खूप शुभेच्छा ����
ReplyDeleteकाय बोलु?... . शब्दच नाहीत माझ्याकडे यावर उत्तर द्यायला.....
Deleteएक मात्र खरे आहे, या निमित्ताने आपल्याला हे सगळे सुंदर क्षण परत जगण्याची, अनुभव करण्यासाठी एक छान संधी मिळाली आहे.
In a way we r very blessed souls 😇
तुझ्या या सगळ्या कौतुकाबद्दल मी आभार न मानता, ते ऋण तसेच राहु देते.
तुला खुप सारे अगदी आभाळभर प्रेम! 😍❤️💖
Amazing collection pictures recipe get more successful on your own way. I wish you all the best you are always special to me
ReplyDeleteheartiest welcome in chaudhary sadan !
Deleteu too r very special to me.......
without ur blessings n wishes i feel incomplete...
tons of love......n thnk u veryyyyyyyyyyyyyyyyy much!!!
����
ReplyDeleteफ़ा ₹च सुदंर varsha wish यू all Best on this eve
Your blessingsn wishes means a lot to me, n I really mean it 😍 tons n tons of love to you both!!
DeleteCongratulations n wish u all the best��
ReplyDeleteFeeling blessed 😇!! Tons of love 😍 n thnk you so much 😊
DeleteVarsha tu far chhan lihite,sarva lekh surekh,junya athavani tazya zhalyat. Keep it up.����
ReplyDeleteखुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇 ! अशीच तुझी सोबत असु दे माझ्या या वाटचालीत!
DeleteOh wow...
ReplyDeleteMy wishes always with u.....
Goes without saying
Can c ur happy face thro ur words! M blesses to have friend like you 😊! U r always there in my mind n heart! Tons of love 😍 n thnks!!!
DeleteWish you all the best, success n prosperity. It's not easy to write n publish so regularly.
ReplyDeleteU r so creative
U r blessed!
Heartiest welcome in Chaudhary sadan!
DeleteFeeling so happy to see you here ☺
Thnk you so much 😊
Ur wishes means a lot to me and I really mean it.
U have seen n expirience this whole journey with me very closely.... Almost every day we used to talk about this.
Feeling blessed 😇 n very happy Thnk you so much for everything n for being there always for me! ❤ Tons of love 😍
Khup chan dear ❤️ sagale photospan mast select keles����
ReplyDeleteखुप खुप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
Delete������������
ReplyDelete,जे जे लेख वाचले , वाचल्यानंतर दरवेळी कमेंट द्यायला जमले नाही पण बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला��.
खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍
DeleteMany congratulations mavsi.....
ReplyDeleteMany many thanks!!
DeleteVery happy to c u here! 😍☺️
ताई तुमचे सर्व प्रथम सहर्ष स्वागत या आनंदी सोहळा आणि आनंदी पावसाचा आणि प्रत्येक लेख वाचताना समोर साक्षात समोर दृष्य चित्र दिसते व अनुभव होतो
ReplyDeleteदुर्मिळ संग्रहित फोटो विषयाला धरून मांडणी खूपच छान प्रदर्शित केली आहे
सर्व लेख खूपच छान आहे माझे स्वतःचे बालपण आणि अनुभव असेच काहीतरी साम्य वाटते तुमच्या इतक्या लहानपणाच्या गोष्टी आठवून जिवंत केल्या आणि दुसऱ्याच्या जीवनातला भूतकाळ परत जागा केला
सर्व लेख फारच भारी आहे तुमचे कुठून आणि कोणत्या शब्दात कौतुक करावे त्याला शब्द अपुरे पडतात तुम्ही या लेखनासाठी घेतलेली मेहनत खूप कौतुकास्पद आहे आणि आपल्या आठवणीच्या कप्प्यात आपण काय काय दडवून ठेवले याचा थांगपत्ता लागत नाही या निमित्याने आपण मोबाईलवर संवाद करून भेटलो आणि तुम्ही मला आपलेसे करून घेतले मनःपूर्वक धन्यवाद��
सगळ्यात आधी तुमचे अगदी मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!
Deleteअणि खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏 या सगळ्या सविस्तर अभिप्राय बद्दल अणि कौतुकाबद्दल!! 😇😇
😍😍😍😍 too many tastyyy things posted here 🤤🤤🤤🤤🤤
ReplyDeletetons n tons of love , darling!!!
Deleteअसाच लेखनाचा पाऊस बरसुदे...आम्हाला वाचनाचा आनंद मिळू दे.🙏
ReplyDeleteCongratualtions for completing one year
खुप खुप सप्रेम धन्यवाद 🙏
Deleteखुप छान लिहिले आहे.मनापासून अभिनंदन 💐 असेच लिहीत रहा.फोटो पण खुप छान आहेत.लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.असेच छान लिहीत रहा.👍👍👌👌
ReplyDeleteमनापासून धन्यवाद !🙏🙏😊
Delete