थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे)
(घरातील गमती जमती)
आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.
नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच दिवस आधी म्हणजे श्रावण महीना सुरु झाल्यापासुनच हे कागद बाजारात उपलब्ध असतं. तसेच काही मुलं सायकल वर किंवा चालत फिरुन विकत असतं, सगळीकडे. ओरडत ओरडत जात "नागपंचमीचे कागद", मग कधी आम्ही खाली उतरुन त्यांच्याकडुन, तर कधी बाजारातून घेत असु दरवर्षी. देव्हाऱ्याच्या खाली भिंतीवर चिकटवत असु किंवा तिथे ठेवलेल्या गव्हाच्या कोठीवर ठेवत असु, पूजा आणि नैवेद्यासाठी . तर आजचा खास नैवेद्य म्हणजे नागदीवे आणि खीर. छान वाटे हा कागद बघायला, रंगीत चित्रांचा. आणि थोडी भीती सुद्धा वाटे, आपल्या हातून फाटला तर? पुजेचा कागद तो, फाटला तर पाप लागेल, असे वाटे.
या दिवशी सकाळपासुन जवळ जवळ संध्याकाळपर्यंत बरेच गारुडी येत असतं. पण आज नागाचे खेळ होत नसतं, फक्त पुजेसाठी येत ते. त्यांच्याकडे एक टोपली असे झाकणाची, त्यात कधी एक तर कधी दोन नाग असतं. रस्त्याने फिरत हे लोक असत सगळीकडे, त्यांच्या हातातील डमरू वाजवत वाजवत. तो आवाज आला की कळे नाग आलाय बाहेर. मग जो तो आपापल्या सोयीने बाहेर येऊन नागाची पुजा आणि दुधाचा नैवेद्य देत असतं नागाला. आम्हीपण असेच एखाद्या गारुड्याला थांबवुन पुजा करत असु. मला कुतूहल तर वाटेचं ह्या नागांचे , पण तितकीच भीती सुद्धा वाटे. वाटे झाकण उघडले आणि एकदम तो बाहेर येऊन चावला तर? शिवाय ती टोपलीतील नागाची वळवळ पाहून कसेतरीच वाटे मला. आता तर जास्तच वाईट परिस्थिती आहे माझी , कुठे प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनवर साप पहिले तरी, रात्री माझ्या स्वप्नात येतात ते साप आणि रात्रभर शांत झोप लागतच नाही . त्यामुळे प्राणी संग्रहालयात गेले तरी, तो भाग सोडून बाकी सगळे भाग बघते मी. दूरदर्शन वर कुणी सापांचा कार्यक्रम लावला, तर बदलायला तरी लावते किंवा तिथुन उठून तरी जाते.
आता कायद्यानेच हा सण अशा पद्धतीने साजरा करण्यावर बंदी आलीय त्यामुळे ह्या असल्या पुजेचा वगैरे प्रश्नच येत नाही. पण हल्ली नागांच्या छान छान रांगोळ्या काढून त्यांची पूजा केली जाते. या मात्र मला खुप आवडतात. मी रांगोळी नाही पण, चित्र काढलीत काही सापांची वेगवेगळी. ती सगळी सुद्धा तुम्हा सगळ्यांना या ब्लॉग च्या माध्यमातुन बघायला मिळतील लवकरच.
ही झाली सगळी नागपंचमी या सणाची माहिती. आता पोटोबा, दिवे आणि खीर, तो सगळ्यात जास्त महत्वाचा! आधी दिवे कसे करायचे बघू या, खीर नंतर. कारण आज दिव्यांचे महत्व, खीर तशीही खूप वेळा होते आणि सगळ्यांच्या चांगलीच माहितीची. तर ह्या दिव्यांसाठी ज्वारी आणि गहु चांगले खरपुस भाजुन घ्यावे. प्रमाण साधारण तीन वाट्या ज्वारी घेतली, तर एक वाटी पेक्षा पण थोडे कमी गहु घ्यावे. नंतर हे भाजलेले मिश्रण चरमरीत दळुन घ्यावे. आमच्याकडे तेव्हा साधारण शेरभर तरी ज्वारी लागे हे दिवे करण्यासाठी.
यानंतर या चार वाटी पिठासाठी, साधारण दोन वाट्या पाणी घ्यावे आणि एक ते सव्वा वाटी गुळ घ्यावा. पाणी थोडे कमी झाले तरी चालते, नंतर थोडा पाण्याचा हात लावता येतो. जास्त झाले तर मात्र दिवे घडविणे फारच कठीण होऊन जाते किंवा घडवताच येत नाही. त्या पाण्यातच गुळ घालावा, साधारण चार वाटी पिठासाठी एक सव्वा वाटी गुळ याप्रमाणे. जास्त गोड आवडत असेल तर, जास्त घातला तरी चालतो. हे दिवे साधारणपणे खीरीसोबत खाल्ले जातात. त्यामुळे खीर आणि दिवे यातील गोडवा आवडीप्रमाणे ठेवावा. जर तूप किंवा दुधासोबत खायचे असतील, तर मात्र छान गोड करायला हरकत नाही. तर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे, त्यातच एक चिमुट मीठ आणि गुळ घालावा. पाण्याला उकळी आली की त्यात पीठ घालुन त्याची "खिशी घ्यावी". "खिशी घेणे" हा खास खान्देशी शब्द! "खिशी घेणे" म्हणजे उकड काढणे. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवुन एक छान वाफ काढावी.
त्यानंतर ही "खिशी" परातीत काढुन घ्यावी. त्यात वेलची पुड, जायफळ आणि सुक्या खोबऱ्याचे बारीकबारीक काप किंवा सगळ्यात मोठ्या भोकांमधून किसलेले खोबर घालावे. आणि हे त्यात छान मिसळुन घ्यावे. मग जरा गरम असतांनाच त्याचे दिवे घडवावे. खिशी थोडी कोरडी किंवा कडक वाटली तर थोडा पाण्याचा हात लावावा. मग साधारण दिवा ज्या आकाराचा हवा असेल, त्याप्रमाणे खिशी घेऊन त्याचा गोल गोळा करावा. मग हा गोळा परातीत ठेवून, त्याला वरच्या बाजुने, हाताच्या अंगठ्याने एक छोटा खड्डा करायचा. मग दोन्ही हातात धरून तो गोळा गोलगोल फिरवत, तो खड्डा मोठा मोठा करत जायचा. असे करतांना त्याचा तळ समतल होत जाते, बाजु गोलाकार आणि सगळ्या बाजु सारख्या जाडीच्या करत जाव्या. अगदी कुंभाराप्रमाणे, फक्त कुंभाराचे चाक फिरत असते, त्यामुळे त्यांना त्यांचे भांडे हाताने गोल गोल फिरवावे लागत नाही. आपली परात स्थिर असल्याने, आपल्याला तो गोळा हाताने गोल फिरवावा लागतो. मग कुंभार ज्याप्रमाणे त्या मातीच्या भांड्याचे तोंड छोटे करतो त्याप्रमाणे आपणही थोडे छोटे करावे. हळुहळु सवयीने छान सुबक आकार येतो या दिव्याचा.
मग सगळ्या खिशीचे दिवे घडवुन झाले की एका मोठ्या स्टील किंवा पितळेच्या चाळणीत हे दिवे ठेवायचे. मग ही चाळणी एखाद्या भांड्यावर बसेल असे भांडे घ्यायचे. ते गॅस वर ठेवायचे आणि त्यात पाणी घालायचे. मग ती चाळणी त्या भांड्यावर ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचे . साधारण पंधरा मिनिटे वाफवायचे. झाकण काढून सुरी टोचुन बघायची. सुरीला काही चिटकले नाही म्हणजे दिवे तयार झालेत. आत हे वाफवणे इडली किंवा नेहमीच्या भाताच्या कुकर मध्ये सुद्धा करता येतात. मी इडली कुकर मधेच वाफवते. मात्र नेहमीच्या भाताच्या कुकर मध्ये शिजवतांना, त्याची शिट्टी काढून घ्यावी आणि मगच वाफवावे.
हे दिवे मात्र गरम गरम खाण्यापेक्षा, गार झाल्यावरच छान लागतात खायला. दूध किंवा तुपासोबत खायचे असतील, तर एकदम तय्यार आहेत हे दिवे खाण्यासाठी! दुधात खायचे तर मस्त कुस्करून कुस्करुन खायचे, भाकरी सारखे. तुपासोबत खायचे असेल तर दिवा मस्त उभ्यात चिरून त्याचे दोन भाग करायचे. प्रत्येकी अर्ध्या खोलगट भागात भरपुर घट्ट तूप घालायचे, सगळीकडे पसरावायाचे आणि हल्ला बोल! अहाहा!! आम्ही मुली तर सकाळी दिवे तयार झाल्यापासुन ते दुसऱ्या दिवशी संपेपर्यंत, अगदी येत जाता असे दिव्यावर तुप घालुन खात असु किंवा सरळ आमच्या लाडक्या बाकावर जाऊन बसुन खात असु. दुसऱ्या दिवशी दिवे संपले की फारच वाईट वाटे, कारण परत खायचे म्हणजे तब्बल एक वर्ष वाट बघावी लागे...
आता तांदुळाची खीर. ही तर सगळ्यांच्याच चांगलीच माहितीची आहे. तरी थोडक्यात सांगते इथे. किंचित मीठ घालुन मऊ भात शिजवुन घ्यायचा. वाफ गेल्यावर तो रवीने चांगला लोणून घायचा. त्यात चवीप्रमाणे गुळ, वेलची पुड, जायफळ, किसलेलं सुकं खोबरं आणि आवडत असल्यास हवा तो सुका मेवा घालावा. गुळ कमी आणि भरपूर खारीक पूड घातली तर खुपच चवदार लागते खीर. हे सगळं घालुन परत एक वाफ काढली की खीर तय्यार. मस्त एका ताटलीत घ्यायची, त्यावर दुध घालायचे आणि सढळ हाताने तुप . सगळे छान कालवुन घ्यायचे आणि त्यात दिवा कुस्करून कुस्करून खायचा, स्वर्ग...!!!!
©आनंदी पाऊस
(घरातील जमती)
२८ जुलै २०२०
गारुडी, टोपलीत नाग
शिल्पं, पुष्करिणी,
मंड्या, कर्नाटक
ज्वारी अशी छान खरपुस तांबुस
रंगावर भाजुन घ्यावी
ज्वारी आणि गहू खरपुस भाजुन
चरमरं दळलेले पीठ
अशी खिशी घ्यायची
असा दिवा घडवायचा
दिवे घडवुन असे चाळणीत ठेवायचे
असे भांड्यात पाणी घालुन
त्यावर ही चाळणी ठेवायची
झाकण ठेवुन वाफवायचे
किंवा असे इडली कुकर
मध्ये सुद्धा वाफवता येतात
वाफवुन तयार झालेले दिवे
यांचा रंग सुद्धा बदलतो
खायला पान तय्यार आहे वाढुन !
असा उभ्यात कापून दोन भाग
करायचे तुपासोबत खायला !
सोनेरी तुप , माझे एकदम आवडते !!!
Khupch chhan..gg..MLA pn aawadatat he diwe ..nice ..
ReplyDelete😍 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
DeleteWa tondala ter panich suttale ��
ReplyDeleteMi khallele pan swataha kadhich nahi banavale
Dhanywad receipe sathi mi atta jaroor try karel��
अरे नक्की करून बघ, अणि लगेचच, उगाचच मुहूर्ताची वाट बघु नकोस... 😍
Delete😇😊.... केले की सांग अणि दाखव 😇
😋😋😋
ReplyDeleteMi ajun karun nahi pahiley dive, aata detail kalala kasa kartat re, aata Nakki karun pahil.
अरे करा करा, सगळ्यांनी करून बघा! एकदम भारी अणि healthy 😍😍
DeleteWa khup chan zalay lekh, tondala pani sutale... Dive ani kheer baghun pani sutale tondala 😋😁 Dive aamhi pan karato pan deep fry karun... aata he karun baghen ekada👌👌👌
ReplyDeleteनक्कीच, अणि मला सांग तु कसे करतेस ते 😊😍
Deleteअप्रतिम सचित्रण रेसिपि अफलातुन
ReplyDelete😍😇मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
Delete😋😋😋....Dive karun baghen aata
ReplyDeleteनक्की करून बघ! काही अडले तर मी आहेच 😁 अणि आवडतील सगळ्यांना.....
Delete😃 😅
खिशी काढण दिवा घडवणे असे अनेक नवे शब्द कळले मस्तच खीर लोणून शब्द पण तांदुळाची�� प्रत्येक भागाच्या म्हणा किंवा रितीभाती म्हणा नागपूरकडे किंवा माझे माहेरी असेल तांदुळा ची खीर फक्त 13 किंवा वर्षश्राद्ध ला करतात मला खूप आवडते पण तिकडे करू नाही द्यायचे असो इथे मी करते पण तू पध्दत मस्त सांगितली आहेस
ReplyDeleteआपल्या संस्कृती अणि परंपरा यांची देवाण घेवाण! खुपच सुंदर चालू आहे हा प्रवास!! खुप सारे धन्यवाद 😍 😇
DeleteWa mast pot bharle g deve tup v kheer khaun
ReplyDeleteSarv varnan pan agadi sunder keles janu aapanch banvat aahot ase vatale chan
photo pan
अरे व्वा ही खरी पोट भर पावती माझ्या लिखाणाला!!! खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deleteनागपंचमी आणि नागदिवाळीला दिवे करून खातात. तू दीवा बनविण्याची क्रिया छान वर्णन केली आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteनाग पंचमी ला दिवे करतात माहीत होते पण कसे करतात हेच माहीती नव्हते आपण या दिव्यांवर लेख लिहिला खुप छान. कसे करतात दिवे हे तरी कऴल शोधुन शोधुन लीहीण्याची कमाल हे वा व
ReplyDeleteआता नक्की करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला. नाहीतर मला सांगा मी येईल तुम्हाला मदतीला, खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
DeleteIt sounds very interesting although...i never tried it.....i would definitely try yo make it....
ReplyDeleteYeah very interesting to prepare as well as to eat. N quite easy n very healthy! Pl try.... Thnks a tons 😍
Deleteगोड पदार्थांच्या मालिकेतील हा तिसरा लेख. एकदम वेगळेच पदार्थ आणि ते करायची रसभरीत कृती, हे नेहमीप्रमाणे वेगळं कॉम्बिनेशन वाचायला मिळालं. नागपंचमी आमच्या लहानपणी एव्हढा महत्त्वाचा सण होता ह्याची हल्लीच्या पिढीला कल्पना पण नाही. नागाचा कागद हा खरच त्या काळात खूप attractive वाटायचा. लहानपणी आईने दिवे केल्याचं आणि मला सक्तीने खायला लावल्याच आठवलं. खरं सांगायच तर मला हा पदार्थ नाही आवडायचा बुवा तेंव्हा. पण आता तू इतक खुमासदार शैलीत ते करायची कृती वर्णन की आहेस की ते दिवे आता खाऊन बघणारच आहे. खीर तर सगळ्यांनाच आवडते, त्यात पुन्हा एवढे dry fruits टाकले तर ती एकदम tempting होईल खायला. शिवाय दिवे आणि खीर हे खान्देशी कॉम्बिनेशन नवीनच कळालं. पण तांदळाची खीर फक्त श्राद्धालाच खायला मिळायची.हा आगळा वेगळा आणी चवीष्ट लेख नाग पंचमीचे माधुर्य वाढवणारा आहे. शाब्बास.. 👍👍👍👍
ReplyDeleteहा नावडता पदार्थ, माझ्या लिखाणामुळे तुम्हाला खावासा वाटतोय! या पेक्षा छान पावती असूच शकत नाही माझ्या लिखाणाला!
Deleteबाकी कौतुक करावे तर तुम्हीच.... समोरचा माणुस एकदम खुष होणार याची शंभर टक्के खात्री!!!
आता मीच एकदा करीन दिवे अणि खीर खास तुमच्यासाठी!.
आमच्याकडे खीर तशी बर्याच वेळा होते. तुम्ही सांगितलेली माहिती फारच नवीन आहे माझ्यासाठी, तुमच्या प्रमाणेच ईतर सुद्धा काही जणांनी सांगितली.
शाबासकीची थाप मात्र, कायमच आवडणारी असते! !! 😍😇
नागपंचमीला पूर्वी गारूडी टोपलीमध्ये नाग घेऊन येत असत. वाटेवरही टोपल्या घेऊन बसत. त्यांना दूध दिले जाई. नंतर मात्र घरात फोटोच लावला जाई व त्यााची पूजा केली जा
ReplyDeleteआमच्याकडे दिव्याच्या आवसेला कणकीचे दिवे करत. करायची व खायची पध्दत तिच होती. नागपंचमीला पूरणाचे दिंड करत असत. आताच्या पिढीला नाही आवडत. त्यामुळे करणे होत नाही. तुझ्या लेखामुळे परत त्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळली. खिशी काढणे, लोणून घेणे आणि चरमरं हे खानदेशी शब्द समजले. मस्त मजा आली.
दिंड मी बर्याच वेळा ऐकले आहेत, चित्र पाहिले सुद्धा आहेत, पण अजुन एकदाही खावून पाहिले नाही,हा पदार्थ आमच्याकडे माहितीचा नाही अजिबात, करणे अणि खाणे फार लांबची गोष्ट.
Deleteअजुन असे भरपुर शब्द आहेत खास खानदेशी, या ब्लॉग च्या निमित्ताने कळतील बरेचसे. 😍
सप्रेम धन्यवाद 😍 😇
आपण वर्षातून दोनदा करतो. एक नागपंचमीला आणि नागदिवाळीला.दिव्याची रेसिपी मस्त सांगितली आहे. वर्णन आणि फोटो मस्त.. सौ. मंदा चौथरी.
ReplyDeleteअरेच्च्या, मला तर एकदाच आठवते आहे.
Deleteबर झालं तू सांगितलेस! खूप सारे प्रेम!! 😇😇😍
आमच्या घरीही करायचे यासाठी आई पोहोटे(ओली पक्व ज्वारीची कणसे भाजुन वा उकडून, वाळवून त्याची ज्वारी) करुन ठेवायची. त्याची चव अजुनच सुंदर लागते.
ReplyDeleteखुपच छान लिहीतात तुम्ही ताई💐👏🏻
खूप छान नागपंचमी ची माहिती व दिव्यांविषयी आणि खीर विषयी अफलातून माहिती आहे.👌👌
ReplyDeleteतु खूप छान लिहितेस👌👌👍👍
एक दिवा एक जीन......असे माझे कल्पना रंजन सुरू झाले....हे सर्व पारंपरिक पदार्थ आपण खाल्लेल्या चवीप्रमाणे जसेच्या तसे समोर यावे आणि आपण यथेच्छ ताव मारावा...आणि मी ते लाळ गाळून लगेच अनुभवले सुद्धा..... 😘😘😘
ReplyDeleteखूपच छान झाले आहे दिवे .खाल्ले मी भरपूर तूप घेऊन .👍💐😋
ReplyDeleteखूपच छान, रेसिपी पण अगदी डिटेल मधे दिली आहे ,कसं जमत ग तुला हे !👍👍💐💐🥰
*ताई तुम्ही जे नागपंचमी बद्दल माहिती दिली ती खुपच छान आहेस व तुमच्या लेखातून ज्यांना नागदिवे येत नसतील त्यांनी कृती करून नागदिवे बनवुन खावे नक्कीच ते सर्वाना आवडणार
ReplyDelete*ताई तुम्ही जे नागपंचमी बद्दल माहिती दिली ती खुपच छान आहेस व तुमच्या लेखातून ज्यांना नागदिवे येत नसतील त्यांनी कृती करून नागदिवे बनवुन खावे नक्कीच ते आवडणार
ReplyDeleteLekh chan zalay srawan mahinatla pahila festival
ReplyDeleteMulinsathi baykansathi ha saan aawdta
Nagpanch chi puja nagobala gheun phirnare garudi sagke warnan doliyasamor ubhe rahate maherchi aathwan karun dete
Aani imp mhanje goad dive aani khir aasa khandeshi nagpanchmicha bet tar 👌
Ek wegli Pakkruti kruti pics sah wachli 😋
Maze maheriche rice pithache ukdiche karanji aathwli
Ashich lihiti raha
God bless you
वाह, edible दिवे पहिल्यांदाच पाहिले व पाककृतीही आवडली.माला पाहूनच जाम भूक लागलीय...sequence ने फोटोमांडणीही मस्तच.😘
ReplyDeleteमालातर दिव्यांचा आकार पाहून सिंधु संस्कृतीतील दिव्यांची आठवण झाली..😍असो ..तांदळाची खीर दिव्यात घालून प्यायला काय मजा येत असेल!! मी दिवाळीत नक़्की खिशी काढून दिवे लावेन म्हणजे करेन.😁
हे तु आता ही बनवते सर्व
ReplyDeleteकिती छान तोंडांत पाणी आल पाठव मला पण😋😋
आणि नागपंचमी ची पहिली आठवण सुद्धा छान होती
छानच आहेत दिवे! मी पहिल्यांदाच बघितले.आमच्या कडे सणावाराला पुरणाचे आणि ज्वारीच्या पिठाचे असे वेगवेगळे दिवे करतात. आरती करताना याला ताम्हणात ठेवतात.नंतर पुरणाचे दिवे जेवताना ताटात वाढतात.
ReplyDelete👌🏻👌🏻.....5...6 divasanpurvich aamhi maitrinina नाग दिव्यांची aathawan kadhali .....kunalach detail recipe mahit nahvati....tuzya lekhatun ti milali.....👍🏻🌹
ReplyDeleteखूपच छान माहिती सांगितली .आणि दिव्यांची रेसिपी तर भन्नाट .वाचून आणि फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटटलं खूपच सुंदर .धन्यवाद
Deleteदिवे वाचून जिभेला पाणी सुटत आहे. खूप रसभरित वर्णन आहे.मला माझे बालपण आठवले. मी दिवा भरून तूप खायचो. अगदी आठवणी ताज्या झालाय.
ReplyDeleteआज येथे बंगलोर मध्ये दिवेच्या पीठ साठी तयारी करणार आहे.
व तसेच माझ्या नवीन सादरीकरण श्रावण व खांदेश मध्ये उल्लेख करणार आहे.
खूप शुभेच्छा
🌴🌲🌳🪴🌹🪱
नाग दिवे आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच, आता टोपलीतले नाग तर येत नाहीत ते तर उत्तमच, नागदिवे तर आवडीने खाल्ले जातात वाचल्यावरच तोंडाला पाणी सुटले, रेसिपी लिहिल्यामुळे आताच्या मुलींना पण नागदिवे करता येतील वा मस्त!
ReplyDeleteलहानपणी हे दिवे करण्यासाठी आईला मदत करणं आठवलं 😊 मी स्वतःही करायची. मी ज्वारीचा हुरडा जास्त आणून भाजुन, वाळवून मग त्याचे करायची. चव छान लागते. रेसिपी छान दिली आहे.
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDelete@ दीपक चौधरी
Lahanpanichya aathavani jagya zalya .....gava bhaher nagachya varulachi puja karat asat natar dive khayala bhetat asat khuf Sundar aatavni. Aahet hya... 👌👌👌👌💐🌹💐🌹
ReplyDelete*तुझ्यातला लेखक व लहानपणातलं आठवणी जपून ठेव....*
ReplyDelete*आयुष्यभर आनंदी राहशील व आनंद देत राहशील...*
*ईश्वर तुला असाच निर्मल खळाळत्या झऱ्यासारखं हास्य, आनंद व आयुष्य लाभू दे !🌹*🙏
या सगळ्या लेखनाचे एक पुस्तक प्रकाशित करा ताई, खूप साधं ,सरळ आणि नैसर्गिक लिखाण आहे हे
ReplyDeleteपरत माला दिव्यांचा आकार आणि texture पाहून "सिंधू संस्कृती ची आठवण झाली आहे.
ReplyDeleteहा ही लेख अगदी स्वारस्य पूर्ण झाला आहे.
अगदी सुग्रास लेख झालाय.....
खीर,सोनेरी तूप आणि rustic कणकेचे दिवे
अगदी मस्तच smoked चव लागत असेलच.. पंचमीच्या advance शुभेच्छा:-sanjita
मस्त नागदिवे व खीर.खूप चविष्ट वाटले तुझ्या वर्णनावरून.छान👍
ReplyDeleteखिशी काढून असे नाग दिवे नागपंचमीला करतात याचे खूप छान वर्णन तू केले आहेस.आमच्याकडे नागपंचमीला चपातीचा तवा वापरत नाही आणि कात्री,सुरी याने काही कापत नाही. म्हणून कणकेची उकड काढून असे दिवे करतात.
ReplyDeleteअरेच्चा तुला सर्व आठवलेही आणि करताही येत. मला तर कृतीही आठवत नाही. आणि मी स्वतः केले नाही कधीच.
ReplyDeleteलहानपणी खुप खाल्ल्याने
मात्र आठवते.
डाॅ मनिषा कोल्हे