थोडं (खुप सारं ?) गोडाचं -२(गुलाबजाम)
(घरातील गमती जमती)
आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी नाही खरंतरं. पण आमच्याकडचा माझ्या खुप आवडता सोहोळा! त्यामुळे याचा दुसरा क्रमांक. तर आजचा गोडाचा पदार्थ "गुलाबजाम". आता आज त्याची अथ पासुन इति पर्यंत सगळी कथा.
आमच्या भागात 'कडगांव' नावाचे एक छोटेसे गावं, खेडंच म्हणा ना. त्या गावाचे पेढे आणि खवा फारच प्रसिद्ध होता आणि आहे अजुनही, हे आत्ताच एका मित्राकडुन कळाले काही दिवसापुर्वीच. त्या पेढ्यांचा त्याच्या तोंडुन उल्लेख येताच माझ्या तोंडाला जाम पाणी सुटले. खरंतरं मी ते पेढे खाऊन जवळजवळ २५-२६ वर्ष झालीत पण तरी वाटुन गेले, आत्ता या क्षणी पेढा मिळावा! पण ते अगदीच अशक्य आहे . आता फक्त आठवणी त्या कडगांव च्या पेढ्यांच्या. तर या गावातुन बरेच लोक येत खवा आणि पेढे विकायला. त्यापैकीच एक काका आमच्या बाबांकडे येत दुकानात. काही ओळखीत किंवा लांबच्या नात्यातील होते बहुतेक ते. त्यांना माहिती होते , यांचे कुटुंब मोठे आहे आणि खाण्याचे फार शौकीन आहे. मग आमचे बाबा त्यांना घरी पाठवत खवा द्यायला.
हे काका घरी आले की मी जाम खुष! या सगळ्या लोकांची खवा आणायची एक खास पद्धत होती. घरुन हे लोक साधारण अर्धा-अर्धा किलोचे गोल गोल गोळे करुन, एका स्टीलच्या बादलीत घालुन, त्यावर एक स्टीलच्या झाकणीने झाकुन आणत. या बादल्या सायकलवर टांगुन आणि मागे कॅरिअरला लावुन आणत असतं. आम्ही मुली गॅलरीत असलो आणि हे काका सायकलवर येतांना दिसले की, आम्ही लगेच ओरडुन सांगत असु , मम्मी , खव्यावाले काका आले. आणि जीन्याच्या दिशेने धुम ठोकत असु, त्यांच्यासाठी दार उघडायला. आम्ही शाळेत गेलेलो असलो तर, ते वर येत आणि दारावरची घंटी वाजवत असतं. मग कुणीतरी जाऊन दार उघडे त्यांच्यासाठी. साधारण पाच-सहा खव्याचे गोळे असतं, त्यांच्या बादलीत आमच्यासाठी. त्यांनी त्या बादलीवरचे झाकण काढले की माझ्या तोंडाला फारच पाणी सुटे! असं वाटे सरळ त्या बादलीतील एक मोठ्ठा गोळा घ्यावा आणि खावा . पण अर्थातच तसे करता येत नसे. काहीवेळा लहान मोठे गोळे असत. पण आमच्याकडे एक लोखंडी तराजुकाटा आणि अर्धा, एक किलोची वजनं सुद्धा होती. मग या काट्याने तो खवा नीट मोजुन घेतला जात असे.
आधीच मी सांगितल्याप्रमाणे, मला त्यांच्या बादलीत हात घालुन खवा खावासा वाटे . पण मम्मीने ते तसे कधीच करू दिले नाही. तो नीट मोजुन घेतल्यावर, मग त्यातील खव्याचे छोटे छोटे गोळे करुन आम्हाला देत असे. माझा एकदम आवडीचा हा खवा, त्या छोट्या गोळ्याने माझं कधीच मन भरले नाही. आम्ही शाळेत गेलेलो असलो आणि मम्मीला आमच्यासाठी खवा काढुन ठेवायची आठवण नाही राहीली, की मला प्रचंड राग यायचा, चिडायचे मी जोरात मम्मीवर. मग गुलाबजाम साठी कणकेत मिसळुन भिजवलेल्या छोटा गोळा घेऊन खायची मी, पण फारच वाईट लागे तो चवीला. मग अजुन राग आणि चीडचीड.
पण हेच तिने जर आधी आमच्यासाठी आठवणीने खवा काढून ठेवला असला, भिजवायच्या आधी की मग सगळी परिथिती एकदमच उलटी होत असे. शाळेतुन आल्यावर ती गुलाबजाम करतांना दिसली की आम्ही लगेच विचारात असु, खवा काढून ठेवलाय का आमच्यासाठी? मग ती सांगे आधी कपडे बदला, हातपाय धुवा, जाळीच्या कपाटात ठेवल्या आहे तुमच्या वाट्या! काय आनंद होत असे हे वाक्य ऐकले की! आम्ही लगेच फटाफट कपडे बदलुन, हातपाय धुवुन येत असु. मग आपापल्या वाट्या घेतल्या आणि फटकन खाऊन टाकले असे होत नसे. आम्ही आपापल्या खव्याच्या वाट्या घेऊन साधारणपणे आमच्या लाडक्या बाकावर बसत असु. मग रस्त्यावरची गम्मत बघत गप्पा मारत, खायला सुरुवात करत असु. खायची सुद्धा खास पद्धत! खव्याचा अगदी थोडासा म्हणजे साधारण मोठ्या छर्रा तयार होईल एव्हढा भाग हातात घ्यायचा आणि बोटांनी त्याचा गोल गोळा करायचा आणि तोंडात टाकायचा, अहाहा स्वर्ग! आता लिहितानाही तो क्षण परत यावा असे वाटुन गेले. आणि हे सगळे शक्य तितक्या हळुहळु करायचे. अगदी पुरवून पुरवून, एकमेकींच्या वाट्यांकडे बघुन खायचा. सगळ्यात आधी जीचा संपत असे ती अगदी बिचारी होऊन जात असे. कारण बाकी दोघींच्या वाट्यांमध्ये अजुन खवा शिल्लक असे आणि त्या खात पण असतं.
अर्थातच सकाळची सगळी कामं आणि जेवणं आटोपली की मग या कामाला सुरुवात होत असे. आमच्याकडे कुठलाच पदार्थ करायला कधीच मैदा वापरला जात नसे, मी अजुनही वापरात नाही. तर सगळ्यात आधी खवा आणि कणिक एकत्र मिसळुन, छान एकजीव केली जात असे. तेव्हा असाधारण एक किलो खव्याला दीड वाटी कणिक असे प्रमाण होते. पण आमच्या ह्या वाटीचा आकार पण चांगलाच मोठ्ठा होता, खरंतर अजुन आहेत या वाट्या. तर कणिक आणि खवा फक्त एकत्र मिसळुन चालत नाही. ते चांगलेच मळुन घ्यावे लागते, आपण भाकरीचे पीठ जसे खुप मळुन घेतो तसे.
आता एव्हढे गुलाबजाम करायचे म्हणजे खुप वेळ लागणार, म्हणुन गॅस शेगडी ओट्यावरुन खाली उतरवुन घेतली जात असे. जमिनीवर पाटावर बसुन हे काम केले जात असे. यानंतर वेळ येते ती गुलाबजाम साठी लागणारा पाक करण्याची. आमच्याकडे तेव्हा एव्हढ्या खव्यासाठी साधारण तीन-साडे तीन किलो साखरेचा पाक लागे. आमच्याकडे एक मोठं स्टील चे ठोक्यांचे भांडे होते, अजुन असेल, त्यात हा पाक तयार केला जात असे. एक तारी पाक लागतो गुलाबजाम साठी. पण जर कोरडे गुलाबजाम हवे असतील तर मात्र दोन तारी पाक करावा. कोरडे म्हणजे काहीवेळ पाकात मुरले की पाकातुन बाहेर काढुन ठेवायचे. असे केलेले असले की अगदी मस्त येता जाता खाता येतात. वाटी चमच्याची गरज लागत नाही. धम्माल एकदम!
या भांड्यात तयार झाला की तो आमच्या पाणी गाळण्याच्या पांढऱ्या शुभ्र, सुती कापडातुन, एका मोठ्या पितळी घमेलीत गाळुन घेतला जात असे. दोघीजणी दोन्ही हातांनी चार कोपरे पकडत आणि मग त्यातून तो पाक गाळुन घेतला जात असे. हे काम खुपच जबाबदारीने आणि काळजीपुर्वक करावे लागे. चुकून जरी एखादा कोपरा हातातू सुटला तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. यात मला एक भाग फार गमतीचा वाटे. सगळा पाक गाळुन झाला तरी, थोडा पाक या कापडात शिल्लक राहात असे. ते कापड पिळुन काढण्याशिवाय तो पाक खाली पडणे शक्यच नसे. मग मम्मी त्या कापडाचे चारही कोपरे एका हातात धरे आणि दुसऱ्या हाताने एक स्वच्छ साणशीने त्या कापडाचा मध्यभाग पकडत असे. मग ती साणशी गोल गोल फिरवत असे, जेणे करून ते कापड पिळले जाईल. मग सगळा स्वच्छ पाक खाली घमेलीत पडुन जात असे आणि साखरेची मळी त्या कापडात अडकुन रहात असे. तर मला वाटे ती साणशी हातात घ्यावी आणि पिळावं ते कापड. पण अर्थातच शक्य नसे. आणि मग हा त्या पाकचा छान गोडसर वास घरभर दरवळे.
मग कढईत तूप घालुन, गॅस शेगडीवर ठेवायची आणि तूप चांगले कडकडीत तापु द्यायचे. तोपर्यंत एका बाजुला त्या मळलेल्या खव्याचे छोटे छोटे, गोल गोल गोळे करायचे. मला हे काम पण फार आवडे करायला. पण आधी हात साबणाने स्वच्छ धुवावे लागत. धुतले नाहीत किंवा खोटं बोलले की पहिला गोळा लगेच, ते खोटं उघकीस आणत असे. बाकी गोळे एकदम पांढरे शुभ्र आणि एकच गोळा काळपट दिसे रंगाला. मग मम्मीचा ओरडा खायचा आणि हात साबणाने धुवायला पळायचे.
तुप कडकडीत तापले की गॅस बारीक करायचा आणि मग त्यात हे गोळे हळुवार सोडायचे, अगदी काळजीपुर्वक. अन्यथा कडकडीत तुप हातावर उडणार आणि हाताची पार वाट लागणार. मग हे गोळे असेच बारीक गॅस वर तळायचे. मोठ्या गॅस वर तळले तर बाहेरचे आवरण जळुन जाणार आणि आतुन कच्चाच राहणार. त्यामुळे अगदी संयमाने बारीक गॅस वरच तळायचे आणि त्याचा रंग तांबुस झाला की झाऱ्याने काढुन, त्याचे तुप निपटुन, सरळ पाकात सोडायचे. हे तळलेले गुलाबजाम, झाऱ्यावर असतांना त्याला छान तांबुस रंग येतो आणि एक छान मॅट टेक्सचर आलेले असते. मला फार आवडते हे बघायला. तुम्ही बघितलेले नसेल तर एकदा नक्की बघा, नक्की आवडेल तुम्हाला सुद्धा. आत्ता वाचुन झाले की खाली छायाचित्रात बघायला मिळेलच तुम्हाला! तर हे तळलेले गुलाबजाम हळुहळु पाकात सोडायला सुरुवात झाली की गुलाबजाम चा सुंदर वास सगळ्या घरभर दरवळायला सुरुवात होते आणि थोडाच वेळात सगळं घर या वासाने भरुन जात असे . आणि मग या क्षणापासुन माझा संयम सुटायला सुरुवात होत असे! काही क्षणातच अगदी शंभर टक्के संयम सुटत असे आणि माझा गुलाबजाम साठी हट्ट सुरु होत असे. तो पाक कडकडीत गरम आणि त्यात हे नुकतेच कढईतून काढलेले गुलाबजाम, किती गरम असणार याची कल्पना करा. पण मला तसेच ताजे ताजे, गरम गरम गुलाबजाम हवे असतं. अर्थात नंतर थंड झालेलेही आवडतंच हे सांगणे न लागे. पण या गरम गरम ताज्या ताज्या गुलाबजाम ची मजा काही औरच असते. ज्यांनी चाखुन पाहिले नसतील, त्यांनी नक्की चाखुन बघा हे ताजे आणि गरम गुलाबजाम!
तळलेले गुलाबजाम त्या पाकच्या घमेलीत टाकले जात. ते छान तरंगत पाकवर आणि त्याचे मॅट टेक्सचर जाऊन त्याला छान चकाकी येत असे या पाकामुळे. त्याच्याशी चमच्याने खेळायला फार मस्त वाटतं. थोडा वेळाने पाकचा सगळा पृष्ठभाग भरून जात असे गुलाबजामने. पुढचे गुलाबजाम त्यात टाकायला, मम्मीला दुसऱ्या एका चमच्याने ते थोडे बाजुला करून थोडी जागा करावी लागे. कारण सगळे गुलाबजाम पाकात बुडून मुरत नाही, तो पर्यंत त्याची छान चव येत नाही. सगळे गुलाबजाम तळायला काही तास सहजच लागत. करणाऱ्यांची पुरती वाट लागे पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक, जेवणं ही कामं असतंच. मला अजुन एक आठवते तेव्हा सगळं घर सुद्धा दिवसातुन दोनदा झाडाले जात असे. सकाळी पाच वाजल्यापासुन ते रात्री जवळ जवळ नऊ वाजेपर्यंत अखंड कामं चालतं, मध्ये थोडीही उसंत न घेता. असा एकच दिवस नाही, बऱ्याच वेळा होत असे. सारखी काय काय कामं चालुच असतं . मला तर आत्ताही नुसते विचार करुन दमायला होतेय.
मग हे गुलाबजाम थंड झाले की डब्यात भरुन ठेवले जात, पाकासहीत. मध्येच काही काळ आम्हाला वेगळीच लहर आली होती. कोरडे गुलाबजाम खायची. काही तास पाकात मुरले की पाकातुन काढुन ठेवायचे. मग हे सुके किंवा कोरडे गुलाबजाम खायचे. हे असे गुलाबजाम केले की फार सोयीचे होते. येता जाता, खेळाता खेळता अगदी केव्हाही एक एक हातात घेऊन तोंडात टाकता येतात, वाटी चमचा घेऊन एका ठिकाणी बसुन खायची गरज नसते. पण हे करण्यासाठी पाक अगदी पक्का दोन तारी हवा, तरच काही काळ टिकतात हे अन्यथा लगेच खराब होतात. तसेही हे गुलाबजाम पाकातल्या गुलाबजाम पेक्षा कमी काळ टिकतात.
गुलाबजाम घरात असले की दररोज सकाळी, घरात जीतके सदस्य, तितक्या वाट्या काढुन त्यात प्रत्येकीची पाच-सहा गुलाबजाम घालुन ठेवले जात. त्यातही काहींना पाक अजिबात नको असे, काहींना थोडा, तर काहींना भरपुर पाक हवा असे . मग त्याप्रमाणे पाक सुद्धा घातला जात असे. पण आमची सकाळी शाळा असल्याने आम्हाला सकाळी खायला वेळा मिळत नसे. मग शाळेतुन घरी चालत येता येता खुप भूक लागल्याची जाणीव होत असे. पाठोपाठ गुलाबजामची आठवण येत असे. त्या आनंदात पायाखालचा रस्ता पटकन संपुन जात असे! असे रोज खातांना मात्र थंडच गुलाबजाम खावे लागत, पण तेही खुप आवडीचे. काही वर्षांपासुन मात्र मी एक छान मार्ग शोधून काढलाय. प्रत्येकवेळी गुलाबजाम खातांना स्टील च्या वाटीत न घेता, काचेच्या वाटीत घ्यायचे आणि मायक्रो वेव्ह मध्ये दहा सेकंद गरम करायचे आणि मग खायचे, प्रत्येक वेळा खातांना छान गरम गरम गुलाबजाम!
काही दिवस पुरत हे गुलाबजाम. संपले की डब्यात पाक तेव्हढा शिल्लक रहात असे. मग आम्हाला वेगळेच वेध लागत. ते म्हणजे गोड दशम्या खाण्याचे! कारण आमच्याकडे पद्धतच होती, गुलाबजाम संपले की त्याच्या उरलेल्या पाकात गोड दशम्या करायच्या. एरवी ही केल्या जात, साधारणपणे सहलीला जातांना किंवा प्रवासात खाण्यासाठी म्हणुन. आता गुलाबजामचा पाक शिल्लक असल्याने त्यातच केल्या जात. पण जास्त दिवस टिकायला हव्या असतील तर दुधात आणि तुपात भिजवायच्या. घरातच खायच्या असतील आणि खुप दिवस टिकायचा प्रश्न नसेल तर मस्तपैकी गुळ, पाणी आणि तुपात भिजवायच्या, फारच छान चव येते. गुळ छान गोड असेल, त्यात जराही आंबटपणा नसेल तर दुधात भिजवल्या तरी चालतात. अन्यथा गुळ आंबट असेल तर दुध नसण्याची शक्यता असते . मग तव्यावर भाजतांना थोडे तूप घालुन भाजायची. हवी तेव्हा, कधी सरळ जेवणात, कधी मधल्या खाण्यासाठी किंवा प्रवासात, सहलीला मित्र मैत्रिणीं सोबत चटणी बरोबर खायची, स्वर्ग!!! आमच्याकडे दाण्याची किंवा तिळाची लसुण घालुन चटणी करतात, ती फारच छान लागते या गोड दशम्यांबरोबर. सोबतीला कैरीचे लोणचं असले की मग... आई शप्पत लिहिता लिहिताच तोंडाला पाणी सुटले आणि ती चव आलीच माझ्या जीभेवर!!!
आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१४ जुलै २०२०
खवा
हा खवा पण घरी बनवलेला आहे .
खव्यात कणीक मिसळायची
छान भरपुर मळुन मळुन तयार
गुलाबजाम करण्यासाठी
पाक करतांना
तय्यार पाक
गुलाबजाम चे गोळे
गुलाबजाम तळतांना
तळुन झालेले गुलाबजाम
किती सुंदर रंग आणि मॅट टेक्सचर
नुकतेच पाकात सोडलेले गुलाबजाम
थोडा वेळ पाकात मुरल्याने छान
अशी मस्त चकाकी येते ते पाकात
मुरल्यावर ,
ग्लॉसी लुक !!!
वाट्यात घालुन खाण्यासाठी तय्यार
पाक नसेल तेव्हा गुळ असा आधी पाण्यात
घालुन ठेवायचा आणि त्यात तुप घालुन
कणिक भिजवायची
गोड दशमी
छान तुपाने भाजुन घ्यायची
दशमी आणि चटणी
चटणीचं असं मस्त आळं करायच
आणि त्या आळ्यात तेल घालायचं 😋😋😋















Khup chhàn. Khupàch tondala pani sutàle. Gulab jam sathi aàni god dashàmisathi
ReplyDeleteअरे आश्चर्य आहे, खव्याच्या उल्लेख पण नाही, तुझ्याकडून?! 😳
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
गोड असा गुलाबजाम प्रमाणे लेख जमलाय.
ReplyDeleteLike the Mat textured Gulabjama as well as glossy finish.
गुलाबाच्या पाकळ्या थोड्या मिक्स करावे it will give little bit pinkish-tambus color Texture.
तू करून पाहिलेस का हे? तसे सांग म्हणजे मी पण करून पाहीन अणि घरी सुद्धा सांगेन तसेच करायला!
Deleteकल्पना छान आहे पण!!
😍 धन्यवाद 🙏 ☺ 😇
Agg tondala Pani sutale agoder wachun mug pics baghun..agadi chhan warnan..
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!:-)
Deleteसचित्र गुलाब जाम अति ऊत्तम जमून आलेला असल्यामुळे खरच तोंडाला पाणी सुटल
ReplyDeleteआभाळभर प्रेम!! आपली उपस्थिती हाच आशिर्वाद माझ्यासाठी!! ❤ 😇😇
Deleteखुपच छान गुलाबजामचे वर्णन केले आहे. गुलाबजाम पण छान तोंडाला पाणी सुटते
ReplyDeleteसौ.मंदाकिनी चौधरी
अरे तु ईतके छान करायचीस म्हणुन मला आज ईतके छान लिहिता आले!
DeleteTons of love 😍 ❤ 😇
कडगावचा खवा प्रसिद्ध तोंडाला पाणी सुटले
ReplyDeleteखास गोड पदार्थ आहे सर्वांचा लाडका गुलाब जाम
मला दे बर एकदा तरी खायला, खरा मित्र असशील तर! 😉😂
Deleteधन्यवाद 🙏
छान वाटले तुला ईथे भेटुन!!
गुलाबजाम माझा ही आवडता पदार्थ आहे... लेख त्याप्रमाणेच गोड जमलाय. आम्ही पाक उरला की त्यात छोट्या छोट्या पुऱ्या करून सोडायचो (चिरोटे प्रमाणे) आणि एक दोन दिवसात संपवयचो...
ReplyDeleteचिरोटे प्रकार आम्हाला फार उशिरा कळला, आमच्याकडे अजुनही केला जात नाही! पण एक छान पर्याय आहे! 😊 😍
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Kharach to khava tyachi chav ahaha swarg😋👌👌varnan vachun jibhevar ti chav. .
ReplyDeleteअरे खरच तो खवा!! मला कुणीतरी देईल का खायला कृपया? मी कायमची ऋणी राहीन... 😍 😇💖
Deleteखूपच गोड लुसलुशीत लेख.. याची चव दीर्घकाळ आठवणीत राहील..
ReplyDeleteतु पण कोरडे गुलाबजाम चाखले आहेत की, आठवतात की विसरलीस?
Deleteस्नेहपूर्ण धन्यवाद 🙏 ☺ 😇
Gulabjam sarkhach god lekh aahe tuza vachun kharach todala pani sutle g khupch sunder likhan v kruti sahit mahiti pan
ReplyDeleteDada bharun gulabjam pahile v khaale aahet mi tumchya kade yekadam tondat virghalnare
खरच मी हा मुद्दा विसरूनच गेले.... तोंडात टाकला गुलाबजाम की विरघळून जात असे, ईतका सुंदर, मऊ अणि लुसलुशीत!!
Deleteस्नेहाळ धन्यवाद 🙏 😊 😍
गुलाबजाम ❤😍 तोंडाला पानी सुटल ही वाचून 😍
ReplyDeleteखुप प्रेम सार! ! ❤ 😍😇
Deleteखूप गोड लेख आहे.. आमच्याकडे अजून सुद्धा kadgaon चा माणुस ch khawa आणतो.Vilas Kinge
ReplyDeleteअरे व्वा! M feeling so jealous 😬... मला पण हवाय 😊😍😇
DeleteKhupach sweet
ReplyDeleteChchan
Pan tuzha peksha kami
Sweet!!
आई शप्पथ!!!
Deleteखुप सारे सप्रेम धन्यवाद 😍
खुप छान गुलाब जाम मस्त लीहीलखरच गंमत वाटते आहे
ReplyDeleteखुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
DeleteAs usual awesome very nice written by you dear... Tondala pani sutlay ya week madhe karate khavyache Gulabjam
ReplyDeleteवावा मस्तच! मला पण दे थोडे..
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
गुलाब जाम आवडला आणि लेखही गोड गोड लिहिलेला आहे. ����
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteNanda wagle gulagjam lekh khoop sunder warnan tondala pani sutle pan gulamjam pakat murlenantarcha glossy look hi titkach doliyana anand deun gela pics nehmipranech zakkas
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇 😍
DeleteKadgaon cha khava , Gulab jamun n Dashmi khupach chan varnan keley tai ..,,,😋😋😋
ReplyDelete😍😊 खुप सारे धन्यवाद! 😇
Deleteलहान पण ची आठवण करून दिलीस गुलाबजाम ��नागपूर ला पण हा एक सोहळा असायचा नागपूर ला तर खवा मार्केट होते आता माहीत नाही पण MP तुन खवा विकायला यायचा मग तो घ्यायला आम्ही जात असू हातावर थोडा दाबून बघायचा तूप आले तर तो गुलाबजाम ला योग्य नाहीतर बर्फी ला पांढरा व थोडा डार्क ब्राऊन असे दोन प्रकार मिळायचे 10 ते15 दुकानात हिडून मग तो आई घेत असे एक एक पेढा इतका म्हणजे 10 एक पेढे खायला मिळत आम्ही शाळेत असताना आणला की मला पण वाईट वाटायचं नागपूर ला खव्याची जिलबी पण करतात मस्त लागते लेख मस्त झाला आहे आता मागचे आठवले की गेले ते दिवस असे वाटते
ReplyDeleteगुलाबजॅम करताना गोळ्या मध्ये माझी आई खडीसाखर घालत असे आरवार होतात मग ती पण खायला मजा येत असे
अजुन आहे का ते खवा मार्केट? असेल तर मी नक्किच जाईन बघायला. खरंय पूर्वी भाज्या, फळं सुद्धा सगळ्या बाजारात हिंडून चांगली अणि स्वस्त असेल तिथुन घेतल्या जात. पण ह्या खवा मार्केट ची फारच गम्मत वाटतेय मला.
Deleteशाळा म्हणजे सगळ्यांचीच मोठी अडचण 😁😝
खडी साखर घालुन, भारी आयडीया!!
खुप खुप धन्यवाद, हे सगळे छान छान अनुभव शेअर केल्याबद्दल!!! 😍😇🙏
तुझा हा ‘गोड’ लेख आज वाचला... इतके वर्ष आपण शेजारी होतो, पण तू कधी गुलाबजाम खाऊ घातल्याचे लक्षांत नाही माझ्या. मला आठवते, लहानपणी आम्ही अकोल्याला असतांना मुद्दाम स्टेशनवर जाऊन खवा आणायचो. हावडा एक्स्प्रेसनी तुझ्या जळगांव ची माणसे खूप सारा खवा आणायची विकायला. तिथले हाॅटेल्स/हलवाई मुख्य गिर्हाईक असायचे, परंतु आमच्यासारखे ‘अभ्यासू’ गिर्हाईक स्टेशनवरच त्यांचा अर्धा माल संपवायचे. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे हाॅटेल किंवा हलवायापेक्षा खवा ताजा मिळायचा व दुसरे म्हणजे माझ्यासारख्या लहान मुलाला थोडा फार भाव पण कमी करून मिळायचा. असो !
ReplyDeleteतुझ्याहातचे गुलाबजाम कधी खायला मिळणार आता?
नक्कीच खाल्ले असणार अणि तेही घरून आलेले... विसरला असशील...
Deleteअकोल्याच्या खव्याची माहिती मला एकदम नवीन, मनःपूर्वक धन्यवाद सांगितल्या बद्दल 😊😇