उन्हाळी फळं आणि आम्ही-३
(घरातील गमती जमती)
आता तिसरे आणि उन्हाळी फळांतील माझे सगळ्यात आवडते फळ, डांगर(musk melon)! अगदी लहानपणापासुन ते अगदी आजतागायत. तेव्हा चांगले मोठमोठाले डांगर मिळत असतं. याच्या खरेदीच्या मात्र काहीच गमती जमती, युक्त्या माहीती नाही मला. कधी कुठे वाचनात सुद्धा आल्या नाहीत. तसेच या प्रकारचे डांगर खरेदी करण्याची वेळ सुद्धा माझ्यावर कधी आलेली नाही, त्यामुळे अनुभव सुद्धा नाहीत. मी ज्याप्रकारचे डांगर बाजारातून आणते, ते आकाराने फारच लहान असते त्या मानाने, एव्हढेच नाही तर त्याचे रंग, रूप आणि पोत सुद्धा खुप वेगळे असते. एकंदरीत ही जातच वेगळी. ती मोठ्ठाली डांगरं चवीला गोडच निघतील याची खात्री नसे, जवळ जवळ सगळं भगवान भरोसे! मी आणते त्या डांगरांचे तसे नाही, ते छान पिकलेले असले तर छान गोड लागणारच, याची अगदी शंभर टक्के खात्री. त्यामुळे या खरेदीला फारसे कौशल्य नाही लागत. छान ताजे आणि आपल्याला हवे तसे आकाराला लहान मोठे घेतले की झाले. आणून घरात साधारण एक दोन दिवस मुरू दिले की झाले. तरी त्या डांगारांची आठवण होतेच आणि ते मिळत नाही याची खंत सुद्धा! कितीतरी वर्ष झाली मला ते खायला मिळाले नाही.
तर हे डांगर सुद्धा शनिवारच्या आठवडे बाजारातूनच खरेदी केले जात असे, बाकी उन्हाळी फळांप्रमाणेच. अर्थातच डांगर सुद्धा घरी आले की ते पाण्यात जाणार भिजण्यासाठी. टरबुजासारखी याला काही चीर मारलेली नसे किंवा गड्डा काढलेला नसे, त्यामुळे मस्त बादलीत पाणी भरायचे आणि मोकळेपणे त्यात सोडून द्यायचे. पण याचे सुद्धा टरबुजासारखेच असे, पाण्यात अर्धा पाऊण तास भिजले की लगेच मिळत नसे खायला. पाण्यात टाकल्यावर विसरून जावे लागे की घरात डांगर आहे. पण याचा छान वास घरात दरवळत राही आणि सारखी आठवण करत राही, मी आलोय घरात!
डांगर सुद्धा सगळी पुरुष मंडळी घरी येऊन, त्यांची जेवणं वगैरे उरकल्यावरच कापले जात असे. डांगर कितीही मोठे असले तरी टरबुजाच्या मानाने लहानच. त्यामुळे पावशीनेच कापण्याजोगे असे, विळ्याची गरज पडत नसे. डांगर आधी उभ्यात चिरून त्याचे दोन भाग केले जात. याच्या बीया, गराच्या आत असलेल्या मोठ्या पोकळीत, त्यामुळे त्या दोन भागात विभागल्या जात या दोन अर्धगोलांमध्ये. पण काढून टाकायला एकदम सोप्प्या, टरबुजासारखे किचकट काम नाही. बीया काढल्या की उभ्यातच कापून लांब लांब फोडी कापल्या जात सालासकट. घरात जितके सदस्य, बरोब्बर तितक्या आणि एकसमान फोडी कापाव्या लागतं. मला अजून कोडं पडते, कस जमत असे मम्मीला हे बरोब्बर! मला तर आज सुद्धा सांगितले तर जमणार नाही, असे पद्धशीर कापायला. आणि अशी वेळ येत पण नाही, आता आम्ही इन-मीन-तीन माणसं घरात, त्यात डांगरही छोटे. तर तेव्हा आम्हाला प्रत्येकाला एक एक फोड मिळे. पण सगळे एकत्र बसून खात असु, त्याचा स्वाद घेत घेत, गप्पा गोष्टी करत करत. तर कधी गोड निघाले नाही, तर हसत हसत किंवा तोंड वेडे वाकडे करत आणि पोटभरू डांगर निघाले म्हणत खात असु.
कधी कधी दोन डांगर आणली जात. मग प्रत्येक डांगराची एक एक फोड अशा प्रत्येकी दोन दोन फोडी मिळतं. मग अशा वेळी कुणीतरी एक जण दोन्ही फोडींची एका बाजूने थोडे थोडे खाऊन चव बघत असे आणि सगळ्यांना सांगत असे, कुठले जास्त गोड आहे आणि कुठले कमी गोड आहे. मग प्रत्येक जण कमी गोड असलेली फोड आधी खात असे आणि छान गोड असलेली फोड नंतर. म्हणजे खाऊन झाल्यावर एक छान समाधान आणि नंतर बराच वेळ ती मधुर चव तोंडात रेंगाळत असे.
आता माझे मात्र असे होत नाही. घरात सदस्य कमी, डांगर सुद्धा छोटे. आम्ही साधारण आता सकाळीच खातो. दोन तीन डांगर आणलेली असली, तरी एकच कापावे लागते. कारण जास्त कापली तर ती संपविणे कठीण. आधी लांब लांबच फोडी करतो पण नंतर त्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करतो. त्याचे समसमान दोन किंवा तीन भाग करतो आणि मोठ्ठ्या स्टीलच्या काट्यानेच खातो. रोज सकाळी एक कापतो आणि खातो. पण ती सगळी मज्जा येत नाही आता, भरपुर खायला मिळते तरी...
आता डांगर तर खाऊन झाले, पण आमचं सगळं लक्ष त्याच्या बीयांकडे. आम्हाला तो जास्त महत्वाचा वाटणारा आणि जास्त आवडणारा भाग ! डांगर रात्री खाल्ले जात असे, त्यामुळे त्या बीया लगेच धुण्याचा प्रश्नच येत नसे. दुसरा दिवस रविवार. मग रविवारी सकाळी होत असे हा बीया धुण्याचा कार्यक्रम. टरबुजाच्या बीया एक दोन पाण्याने धुतल्या की लगेच स्वच्छ होतात. डांगराच्या बियांचे तसे नाही. या बीया गराच्या आतल्या पोकळीत असतात पण त्या एकमेकांना अतिशय चिकट पदार्थाने आणि अतिशय चिवट अशा तंतुंनी एकत्र जोडलेल्या असतात, हा चिकट पदार्थ आणि चिवट तंतु त्या बियांपासून सोडवून वेगळे करण्याचे काम फार किचकट आणि सयंमाचे असते. कोणी सांगे चाळणीत धुवायच्या, कुणी म्हणे हाताने चोळून धुवायच्या, कुणी सांगे राखेने घासून घासून धुवायच्या. मग आम्हीही तसे निरनिराळे प्रयोग करून पाहत असु, त्या बिया धुण्यासाठी. पण बऱ्याचदा आमच्याकडुन हे काम नीट पूर्ण होत नसे. पण मम्मीचा जादूचा हात लागला की त्या बिया एकदम स्वच्छ!
या ब्लॉग च्या निमित्ताने, माझे प्रत्येक विषयावर कुणाकुणाशी बोलणे होतंच असते सारखे आणि काय काय नवीन माहिती मिळतच असते. असेच या डांगराचे फोटो हवे होते मला या ब्लॉग यासाठी, म्हणून फोन केला माझ्या एका दादाला. या विषयावर बोलणे सुरु होते, साधारणपणे भोई लोक, या मौसमात ही फळं पिकवायचे काम करतात. बाकी वर्षभर चणे, दाणे, लाह्या, मुरमुरे करून विकतात. तर दादाने असे सांगितले की, जेव्हा यांच्याकडून चांगल्या प्रतीचे, एकदम गोड डांगर विकत घेतले जात असे, त्यावेळी ते सांगत डांगर खाऊन त्याच्या बीया आम्हाला परत करा. मग डांगर खाऊन झाले की त्यातील बीया त्यांना परत कराव्या लागत. कारण पुढच्या हंगामात ते त्याच बीया पेरत असत, नवीन पीक घेण्यासाठी. मला पण ही माहीती नवीनच कळली, म्हटलं हे सुद्धा तुम्हाला पण सांगावी, मग लगेच इथे लिहुन टाकली. पण अजून तरी या डांगरांचे फोटो मिळाले नाहीत. पण प्रयत्न चालु आहेत. मिळाले की पोस्ट करीन ताबडतोब.
त्यानंतर त्या कडकडीत उन्हात वाळायला ठेवायच्या. वाळल्या की मग त्याचे वाटे करून देणार मम्मी. मग आपापले वाटे घेऊन आपापल्या लहरी नुसार खायचे. बीया खायला आम्ही नेहमीच त्या आमच्या गॅलरीतील, आमच्या लाडक्या बाकावर बसत असु. म्हणजे बियांची सालं फेकायला सोप्पे जात असे. या बीया सोलायला बऱ्यापैकी सोप्या असतात . मला तेव्हा बऱ्यापैकी जमत सुद्धा सोलायला. सोलायची पद्धत टरबुजाच्या बीयांसारखीच. ही बी सुद्धा सोलून तोंडात टाकली आणि दाताखाली चावली की अहाहा..! मस्त मधुर चव सगळ्या तोंडात पसरते. पण सोलुन सोलुन दहा पंधरा बीया जमवुन एकदम खाल्ल्या की अजुनच स्वर्गसुख! पण अर्थातच त्यासाठी खुप संयम हवा.
डांगर आणि बीया खाण्याची आवड लग्नानंतर आजतागायत तशीच आहे, माझी एकटीचीच नाही तर आम्हा दोघांचीही. डांगर खाणे अगदी नियमित आहे आमचे. पण बीया धुणे आणि खाणे खूप नियमित नाही, अर्थातच वेळेअभावी. पण धुवून वाळवुन ठेवलेल्या बीया मात्र कायम असतातच घरात. आता या टाळेबंदी मुळे एक छान पर्वणीच मिळाली आहे, अशा सगळ्या गोष्टी करुन बालपणातील ते क्षण परत जगण्याची. त्यातील एक म्हणजे या बीया धुणे आणि खाणे. अगदी दररोज एक डांगर कापले जातेच आणि त्यातील बीया धुणे, वाळवणे आणि खाणे सुद्धा अगदी नियमित होत असते. फक्त थोडा फरक आहे, आता बीया धुण्याचे काम मी करत नाही, 'तो' करतो, त्याच्या पद्धतीने, आणि अगदी आवडीने! त्याच्या बीया धुण्याच्या पद्धतीचे सुद्धा खाली फोटो देत आहे. खातोही तितक्याच आवडीने. नेहमीपेक्षा वेळ जास्त मिळतोच रिकामा, त्यामुळे वेळ मारून न्यायला, हा एक मधुर मार्ग सापडलाय आम्हाला.
आता या बीया सोलाण्याची आमची पद्धत तुम्हा सगळ्यांना टरबुजाच्या लेखापासुन नीट माहितीची आहेच. पण अजून एक नवीन पद्धती बद्दल सांगते. पण ही पद्धत फक्त डांगराच्या बीयांनाच लागू पडते. ही पद्धत खास माझ्या धाकट्या भावाची, मला मात्र नाही जमत ह्या पद्धतीने बीया सोलून खाणे. तो कधी शिकला, कोणाकडून शिकला वगैरे काहीही तपशील माहिती नाही मला. पण गेल्या बऱ्याच वर्षांपासून आम्ही सगळे बघत असतो कौतुकाने तो या बीया खातो तेव्हा. तो फक्त एका हाताने फटाफट खातो, दुसऱ्या हाताची गरजच पडत नाही त्याला. एका हातात बी घेतो, ती दातात धरून टीचवतो आणि दोन्ही सालं थोडी उचकवतो आणि आतील बी तोंडात ओढून घेतो. हातातील साल खाली टाकून देतो. पण त्याने ही खाली टाकलेली सालं फारच छान दिसतात, फक्त निमुळत्या टोकाकडचा भाग टिचवुन थोडा उघडलेला असतो आणि पसरट बाजू तशीच जोडलेली असते. त्यामुळे ती खाली पडलेली सालं म्हणजे पक्षांच्या पांढऱ्या शुभ्र उघडलेल्या चोचींसारख्या दिसतात. सोबत खाली याचे सुद्धा फोटो जोडलेले आहेत.
ही एक एक बी खाण्यापेक्षा दहा पंधरा बीया सोलून एकदम तोंडात टाकून खाल्ल्या तर फारच बहार येते हे मी सांगितलेच आहे. पण आम्हाला या बीया खातांना बघून आमचे बाबा(आजोबा) बऱ्याचदा एक गोष्ट सांगत जैन साध्वीची. एकदा म्हणे त्यांचे महिनाभराचे उपास संपल्यावर त्यांनी प्रसादासाठी या बीयांचे लाडू वाटले होते. आजकाल या सोललेल्या बीया बाजारात विकत मिळतात सगळीकडे. तेव्हा तसे नव्हते. प्रसादासाठी म्हणजे भरपूर बीया लागणार आणि त्या तोंडात घालुन सोलणे शक्य नव्हते. मग त्यांनी एका छोट्याश्या हातोडीने टिचवुन टिचवुन त्या बीया सोलल्या होत्या म्हणे. मग आम्ही सुद्धा काही वेळा बीया सोलून साठवून ठेवायचो, आमच्याकडे असलेल्या भातुकलीच्या छोट्या छोट्या पिंपात, कुकर मध्ये, झाकणाच्या भांड्यांमध्ये. अर्थातच आम्ही दातानेच टीचवुन सोलत असु. मग खूप जमल्या की त्याचे परत सारखे वाटे करायचो, बऱ्याचदा एक एक बी मोजून मोजून सुद्धा! मग आपल्या वाटणीचा बीयांचा एकदम बोकणा भरायचा तोंडात आणि खायचा. अहाहा, तोंडात ती मधुर चव मस्त सगळीकडे पसरायची! तो आनंद शब्दात सांगता येत नाही, त्याचा अनुभवच हवा! कधी कधी या सोललेल्या बीयांपैकीं थोड्या थोड्या बीया, घरातील सगळ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा वाटत असू. तेही सगळे कौतुकाने आणि आनंदाने खात! फारच छान वाटे.
या करोना मुळे सगळे बरेच जागरूक झालेत, आपल्या प्रतिकार शक्तीच्या बाबतीत. एका मित्राला सांगितले आणि दाखवले मी या बिया खाते म्हणून तर कळले, या बीया म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फारच उत्तम! अजून एक फारच गोड गोष्ट, या टाळेबंदीच्या निमित्ताने घडलेली. बीया खात असतांना मी ह्या गमती लेकीला सांगितल्या. तर तिने मला दोनदा अशा भरपुर बीया सोलून दिल्या. त्या बीयांचा तोंडात बोकणा भरून खातांना, तर स्वर्गसुखाच्या पलीकडला आनंद अनुभवला मी!!!
©आनंदी पाऊस
घरातील गमती जमती)
१० जुन २०२०
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
हल्ली बाजारात मिळणारी डांगरं
मी हल्ली ही डांगरं आणते
'त्याची' बीया धुवायची पद्धत
धुवून स्वच्छ झालेल्या बीया
वाळलेल्या बीया
हल्ली मी दररोज इतक्या बीया खाते
धाकट्या भावाची बीया खाण्याची पद्धत
डांगराच्या बीया खाल्ल्यामुळे होणारे फायदे
muskmelon seeds has carbohyadrates,
protiens, good fats, high fiber content,
minerals, vitamin A,C,E,K, zinc,magneshium, potassium etc.
1. lowes your blood pressure
2. good for ur eyes
3 . keep your hair n nails healthy
4. strengthen your immune system
5. beneficial for pregnant woman
6. relieve stress
7. helpful in acidity n constipation
8 . maintain a healthy heart
9. keep summer cold at bay
10. weight loss
11. stronger bones.
लेख उत्तम उतरलाय. डांगर म्हणजे खरबूज का? मुंबईला छोट्या आकारातच मिळते. आम्ही बिया मात्र खात नाही. पण आता खाऊन बघणार आहे. पावशी शब्द नवीन आहे.
ReplyDeleteहो डांगर म्हणजे खरबूज!!!
Deleteआता बिया नक्की खावून बघा, नक्की आवडतील तुम्हाला अणि साध्या खूप गरजेचे आहे
😍😇🙏
Potbharu aaji che word ahet
ReplyDelete😀 mustt
Biya khaneche khup chan varnan ahe
Nice
"पोटभरू" आपला खास शब्द!! Nice to c u here! Tons of love 😍 ❤
DeleteKhup Chan lekh. Malahi danger chya biya khayla khup aavadtat.
ReplyDeleteडांगर च्या बिया ना तोड नाही या जगात!!!
Delete😍!!! ❤
लेख खूप सुंदर
ReplyDeleteकाका अजून पण खातात
टुचु टुचु चालू असते
मी पण खूप घायायची
नशिराबाद ला अंगणात सारूवून टाकायचे
I just loved that टुचु टुचु 😍❤️ keep it up सुधीर काका!!
Deleteअंगण सारवून टाकणे हे नवीनच कळले, छान reinforcement होत असेल बिया च्या साला चे!!! धन्यवाद हा छान अणि माहिती पूर्ण मुद्दा मांडल्या बद्दल 😇😍
��मस्त भोई लोक दाणे फुटाणे लाह्या घेऊन पूर्वी दारावर येत ते डांगर पिकवतात हे माहीत नव्हते आमच्या कडे नागपूर ला उन्हाळ्यात भाजी मिळत नसे मग आंबा रस व कधीकधी डांगर कापून बिया काढून किसणीने कीसायचे व थोडी चवीला साखर घालायची व पोळी बरोबर खायचे मस्त लागते व ढेणस भाजी फक्त ढेणस व बटाटे मिळत
ReplyDeleteचिबुड टरबूज असे म्हणतात नागपूर कडे
डांगर अणि पोळी नविनच कॉम्बिनेशन कळले. ट्राय करून बघायला हवे
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Mast zalay lekh khup samadhan hota vachun ani tu je explain kartesna tyamule vachatach rahawa watata
ReplyDeleteकिती गोड अभिप्राय !! आभाळभर सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deleteतोंडाला पाणी सोडणारा रस rashit लेख.. Vilas Kinge
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteअगदी थंडावा देणारा लेख कोवळ्या काकडी पासून अबोली रंगाच्या डांगरापर्यंत रसरशीत झालाय. बीयांच Texture अप्रतिम आहेच. हनुमान जयंती आली की सुर्यरूपी डांगराची आठवण येते.
ReplyDeleteMy favourite n unique अभिप्राय! Tons of love 😍
Deleteखूपच छान लिहीले आहेस.
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏
Deleteखुप छान लिहिले आहेस
ReplyDeleteआम्ही पण भांडतो बिया खाण्यासाठी!
बिया खाण्यासाठी भांडणं झालीच पाहिजे 😂😍😝
DeleteVery informative .
ReplyDeleteKhup chan ahe lekh❤❤
खुप सारे प्रेम!!!!! 😊😍
DeleteMazya pan aawdiche aahe dangar tuze varanan yekadam afalatun aahe khup chan lihile aahes sarv lahan paniche god aathavni pan
ReplyDeleteगोड गोड धन्यवाद 🙏 तुझे!! ❤
DeleteMazhe awadata fhalan madhil ek
ReplyDeleteKharach varnan chanch
Purvi je gavarani danger bhetaiche tyachi chavch kahi vegali atta ter sakharpeti, ostraliyan,... Vividh variety bhetate
Pics 👌
Biyan vishai mahit tyat etake kai aste hey mala prathamach mahit padale chan mahiti 👍
आता माहिती झाले ना बिया खाण्याचे फायदे, आता भरपूर खात जा, गरजेचे आहे या वातावरणात....
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
मस्त. मला याच्या आवरणावरील texture ani design सुद्धा, दोन्ही खूप आवडते...
ReplyDeleteअरे खरच की मला पण फार आवडते! पण मी विसरूनच गेले, लिहायचे.सप्रेम धन्यवाद 🙏 मी विसरून गेलेला मुद्दा नमूद केल्या बद्दल 😍
Deleteडांगर बियां बदल सुंदर लिहिलं आहे
ReplyDelete☺️😍 खुप सारे मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
DeleteKhup chhan lekh aahe. Tya divashich vachala pan comments lihayche rahun gele. Kharach aajkal purvisarkhe dangar milatach nahi. Agdi pot bharu asatat. Tu sarvach varnan khup chhan kele aahe ani lahanpanichya aathawani jagrut kelyaa
ReplyDeleteपूर्वी सारखे मिळत नाही हे खरे, पण आमचे डांगर मात्र कायमच गोड निघतात, फारच कधीतरी एखादे पोटभरू निघते 😍😇
Deleteडांगर बियांचे फायदे अफलातून ! मला माहिती नव्हते
ReplyDeleteयंदा तर आम्ही बियांसाठी म्हणून सुद्धा डांगर आणले हॉटेल मध्ये फ्रुट प्लेट मध्ये असतात तशा फोडी करून फ्रिजमध्ये गार करून खायला पण मजा येते बियांचा शेवटचा लॉट आता संपत आला घरी
मलाही सगळेच्या सगळे माहिती नव्हते!
Deleteअरे व्वा! आम्ही सुद्धा बिया साठी डांगर आणतोय अजुनही 😇 भारी!!!
वा.. डांगराच्या बिया सर्वात आवडीच्या.. मला सुध्धा खूप आवडते..खूप छान pics .pahunch Pani sutale tondala..😃
ReplyDeleteथोडक्यात डांगर बियांचे खुप पंखे आहेत तर!!! भारी! सगळ्यांची प्रतिकार शक्ति वाढत राहो😍😇
DeleteVery descriptive....i like the way you explain it...musk melon is my favourite....
ReplyDeleteThnks a tons.... Love 😍...
DeleteMast vately mahititi pan khup chan swach dhun kasae valyache ,Ani health chya dristine pan Kai mahavat aahe chan ������
ReplyDeleteकाकु स्नेहपूर्ण धन्यवाद 🙏 ☺
Deleteखुपच छान लेख जुन्या आठवणी भरत काम शिवन काम 40 वर्ष मागे गेल्या सारखे वाटते सौ सावऴे
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!!
Deleteछान!
ReplyDeleteबिया नाही खाल्ल्या पण कधी! आपल्या लहानपणी मीळणारे टरबूज आजकाल दिसत ही नाही. ( डोक्यावर टेंगुंळ असल्यासारखे एक छोटूसे टेंगूळ त्याच्या डोक्यावर रहायचे)
अरे नक्की खाऊन बघा , प्रेमातच पडाल त्या बियांच्या !
Deleteतेव्हा नदी काठची डांगर मिळत असल्याने खूपच गोड लागत असत, आणि वास पण खूप छान येत अस
ReplyDeleteहो ना , आता सगळी मजा गेलीच गेलीच .....
Deleteआमचंही आवडतं आहे डांगर, आताही घरात आहे
ReplyDeleteछान लेख 👍
एवढ्या कडक 'हाय गर्मी' मध्ये हा लेख ताजा ताजा थंडावा देणारा आहे.
ReplyDeleteडांगर= ट ट टरबूजाचा माला फार आवडतो कलिंगडापेक्षा जास्तच..
मस्कमेलनचा अबोली रंगाचा..आहाहा..सुखद चवच...बियांची प्र.ची. आवडली...
असो.. हनुमान जयंतीच्या वेळी नेहमी आपण न चुकता आणतओच...सरबत पण छानलागतं - संजिता
Musk melon म्हणजे डांगर हे माहीत नव्हते.खूप खूप छान लेख लिहिला आहेस वर्षा.डांगेरच्या बिया कधी खल्या नाही पण आत्ता नक्की खाऊन बघून.लेख अप्रतिम लिहिला आहेस.
ReplyDelete