Skip to main content

खेळ घरातील -१(घरातील गमती जमती)

खेळ घरातील -१
(घरातील गमती जमती)

                           आम्हाला साधारण उन्हाळ्यात मोठ्ठी सुट्टी असे. त्यातले काही दिवस आजोळी जाणार हे ठरलेले. बाकी दिवस घरातच, तेव्हा काही प्रवास करायची इतकी लहर नव्हती. फक्त लोक थोडं वय झालं की यात्रेला जात. आमची आई(आजी) सुद्धा यात्रेला गेल्याचे आठवते आहे मला. खान्देशातील उन्हाळ्याबाबत बोलायलाच नको. त्यामुळे बाहेर किंवा गच्चीवर जाऊन खेळण्याचा प्रश्नच नव्हता. अशा वेळी घरातच काय काय खेळ खेळत असू आम्ही. आज या काही खेळांच्या गमती जमती!
                                  पत्ते! अगदी लहानपणापासून ते आजतागायत माझा सगळ्यात आवडता खेळ. किती आवडतो, तर कामासाठी लॅपटॉप चालू केला की, आधी एक डाव टाकायचा, मगच पुढचे काम करायचे, कितीही घाई असली तरी! एव्हढेच नाही तर लॅपटॉप बंद करायच्या आधी सुद्धा एक डाव टाकल्याशिवाय होतंच नाही मला, अगदी अलिखित नियम असल्यासारखा! हे मी जेव्हा माझ्या मित्रांना बोलून दाखविले , तेव्हा कळले अजून माझ्यासारखे कुणीतरी आहे. शेवटी काय सख्खे मित्र तरी सारखेच ना, त्याशिवाय का इतकी जिवाभावाची मैत्री होते! खेळायला जितका आवडतो, तितकाच दुसरे कोणी खेळत असले, तर बघायलाही आवडतो. आम्ही तिघी बहिणी, त्यामुळे बऱ्याचदा पाच-तीन-दोन खेळत असू. याचा कंटाळा आलं की मग बदाम सात, झाकलेली बदाम सात, झब्बू, मुंगूस असे सुद्धा  काय काय बाकी खेळ खेळत असू. 
                               एक छान आणि खोडकर आठवण आहे माझी पत्ते खेळण्याबाबतची. रविवारी दुकानं बंद असत सगळी, साप्ताहिक सुट्टी. त्यामुळे आमचे बाबा(आजोबा) घरीच असतं. मग आम्ही हट्ट केला, की ते आमच्यासोबत पत्ते खेळत असत. त्यांना तेव्हा चष्मा लागलेला होता. पत्ते पिसून, वाटून झाले, की जो तो आपापले पत्ते हातात घेऊन नीट लावत असे. हे झाले की आम्ही बाबांकडे बघत असू, अगदी निरखून निरखून. त्यानंतरच खेळायला सुरुवात करत असू किंवा पुढची उतारी करत असू . त्यांना सुरवातीला हे काही कळत नसे. नंतर काही दिवसांनी त्यांनी आमची चोरी पकडली. त्यांना समजले कायम आम्ही सगळ्या त्यांच्याकडे सारखे निरखून का बघत असतो ते  आणि कायमच त्यांचे पत्ते कसे अडकून राहतात ते. आम्ही त्यांच्याकडे निरखून पहिले, की आम्हाला त्यांच्या चष्यात त्यांचे पत्ते दिसत असत. मग आम्ही त्याप्रमाणे उतारी करत असू. मग त्यानंतर ते थोडी काळजी घेऊ लागले. पण अर्थातच त्यांना चष्म्याशिवाय चालतच नसे. त्यामुळे आमच्या चोरून मारून पत्ते बघायच्या सवयी तशाच राहिल्या. पण तेव्हा आमचा हा खेळ जिंकण्या-हरण्याची पलीकडच्या आनंदाच्या सीमेवर पोहोचलेला असे! खूपच मस्त वाटायचे, ते आमच्यासोबत खेळत तेव्हा. ते घरातील सगळ्यात मोठ्ठे आणि आम्ही लिंबू-टींबू . जाम भाव वाढल्यासारखा वाटायचं आम्हाला, आमचा! पण आता कुणाला विश्वासही बसणार नाही, ते आमच्याबरोबर असे पत्ते वगैरे खेळत यावर!
                                अजून एक छान आठवण आहे, पत्त्यांच्या खेळाशी निगडित. काही वेळा घरातील मोठ्ठे, म्हणजे मम्मी लोक, दादा, पप्पा, नाना एखाद्या सुट्टीच्या दिवशी थोडावेळ मोकळे असले आणि सगळ्यांचा मूड असला की हे लोक पत्ते खेळत. यात आम्हाला खेळायची मुभा नसे. फक्त बघ्याची भूमिका किंवा फारतर कुणाची तरी पानं हातात मिळत त्याची फक्त उतारी करायची . पण मज्जा यायची, कधी कधी आम्ही एखाद्याचे पत्ते बोलून फोडून टाकायचो, मग दुसऱ्याचा फायदा आणि ज्याचे पत्ते फोडले असत, त्याचा ओरडा खावा लागे. कधी कधी यांचा फार अटीतटीचा डाव होत असे. एकमेकांची बरोब्बर पानं दाबून ठेवून, अगदी मेटाकुटीला आणत एकमेकांना. ते बघायला जाम मज्जा यायची आणि वाटायचे काय तरबेज आहेत ही सगळी लोकं, आपल्याला पण असेच खेळता  यायला हवे. यांच्यात आपापसात मजेशीर शब्दाशब्दी चाले, ती ऐकायलाही फार मज्जा वाटे. कधी संपूच नये यांचे खेळणे, असे वाटे.
                                असाच घरात खेळला जाणारा एक बैठा खेळ म्हणजे कॅरम. मी फार लहान असल्यापासून आमच्याकडे कॅरम होता. आम्ही मुली सुट्टीच्या खेळत असू कॅरम सुद्धा. तेव्हा आम्हाला स्ट्रायकर हा शब्द सुद्धा धडपणे माहिती नव्हता आणि म्हणताही येत नसे. आम्ही स्ट्रायगर, टायगर असे काय काय म्हणत असू तेव्हा . आमचे नखरेच जास्त, कॅरम बोर्डवर पावडर नाही, हा स्ट्रायकर चांगला नाही, कॅरम बोर्डचा उतार उलट्या बाजूने आहे, तो समतलच नाही. अशी एक ना अनेक कारण असत, गोटी न जाण्याची. मग काही वेळा मोठ्या लोकांपैकी कुणाला वेळ असेल तर ते सांगत आम्हाला इथे स्ट्रायकर ठेव, इकडे मार किंवा या गोटीला मार, म्हणजे ती गोटी जाईल, वगैरे वगैरे. पण माझे आपले पहिले पाढे पंचावन्न. आजतागायत मला फारसा आवडतही नाही आणि नीट खेळताही येत नाही कॅरम. पण लहानपणी मजा वाटे हे सगळे करतांना. 
                              कॅरमशी निगडित अजून एक छान आठवण आहे. अर्थातच ही सुद्धा घरातील मोठ्या मंडळींच्या कॅरम खेळण्याची! असेच कधीतरी या सगळ्यांना मोकळा वेळ आणि लहर असेल, तर मस्त डाव रंगे  कॅरमचा. सगळं अगदी पद्धतशीर होत असे. तेव्हा आमच्याकडे लाल रंगाच्या प्रवासी बॅग होत्या, पुठ्ठ्याच्या असत तेव्हा, तश्या. आजच्या सारख्या त्या बॅग वर बसायची सोय नव्हती. तर या बॅग आमच्या रोजच्या कपड्यांच्या कपाटावर ठेवलेल्या असत. त्यातील एक खाली उतरवली जात असे. ती आडवी करून जमिनीवर ठेवली जात असे . मग त्यावर कॅरम बोर्ड ठेवला जात असे . त्यानंतर बोर्डवर बोरिक पावडर टाकली जात असे. त्यात असणार गोळे स्ट्रायकरने फोडून, सर्वत्र सारखी पसरवली जात असे. मग गोट्या छानपैकी रचल्या जात. चार बाजूला चार जण बसतं. जो कोणी पाहिल्याने खेळ सुरु करुन डाव फोडणार असे, त्याचा विशिष्ट दिशेने ती मधली गोट्यांची रचना गोल फिरवून ठेवली जात असे. मग खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात होत असे. डाव फोडणारा बरोब्बर एका विशिष्ट गोटीला स्ट्रायकरने मारणार आणि पुढे दोन गोट्या दोन भोकातून सरळ खाली! एकदम अफलातून क्षण! जादू झाल्यासारखेच वाटे. उर्वरित खेळ सुद्धा अशाच एक से बढकर एक अचंबित करणाऱ्या क्षणांचा असायचा. एखाद्या अशाच महत्वाच्या क्षणी कुठे दुसरीकडे लक्ष गेले की हुकली ती संधी, रिप्ले बघायची सोय नव्हती ना तेव्हा. खूप मज्जा येत असे हा खेळ बघायला आणि वाटे, आपल्याला कधी जमणार असे खेळायला? 
                         काही डाव खेळून झाले की त्यांची खेळ थांबवून, आवारावरीची भाषा सुरु होई. मला मात्र वाटे यांनी असेच खेळत राहावे आणि आम्ही असेच बघत राहावे. दोन करणे होती असे वाटतेय आत्ता मला . एक म्हणजे त्यांचा खेळ फारच भारी असे. तो खेळ बघणे म्हणजे अगदी मेजवानीच वाटे. दुसरे कारण म्हणजे, आई वडिलांना जसे आपली मुले आनंदाने खेळत आहे, हे बघून खूप समाधान वाटते आणि त्यातून खूप आनंद वाटतो. पण मला तर वाटते आपल्या आईवडीलांना असे मनमोकळे आणि आनंदी काही क्षणही जगतांना पहिले की, मुलांना जो आनंद मिळतो, त्या आनंदाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. या क्षणांसाठी आणि या आनंदासाठी मला हा खेळ खूप जास्त आवडत असे. 
                         असाच अजून एक खेळ म्हणजे सागरगोटे. तेव्हा आमच्याकडे सागरगोटे होते. माझ्या आठवणी प्रमाणे हे सागरगोटे खरंतर मम्मीच्या माहेरून आणलेले होते, जे ती लग्नाआधी खेळत असे. आणले तर आम्हीच होते, आजोळी गेलेलो असतांना. पण आम्हाला काही हे नीट खेळता येत नव्हते आणि माहिती पण नव्हते कसे खेळायचे ते. मग मम्मीला जेव्हा मोकळा वेळ असे तेव्हा आम्ही हट्ट करून तिला, आमच्यासोबत खेळायला भाग पाडत असू. आमच्याबरोबर खेळणे म्हणण्यापेक्षा आम्हाला शिकविणे जास्त योग्य होईल. ती यापण खेळात चांगलीच तरबेज होती. ती आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करीत असे. ते शिकण्यापेक्षा, तिचा खेळ बघायलाच जास्त आवडे आणि मज्जा सुद्धा येत असे. 
                       ह्याची साधारण मला आठवते त्याप्रमाणे पद्धत अशी होती-सगळे सागरगोटे जमिनीवर टाकायचे. त्यातील एक एक सागरगोटा उजव्या हाताने उचलायचा आणि तसाच उंच फेकायचा. मग दोन्ही हाताने झेलून, डाव्या हातात जमा करायचे, असे अगदी न थांबता अखंडपणे करत राहायचे सगळे सागरगोटे संपेपर्यंत. आणि अगदी शक्य तितक्या जास्तीत जास्त वेगाने. सांगायला एकदम सोप्पा वाटतोय हा खेळ, पण प्रचंड कसब लागते हा खेळायला आणि खूप खूप सराव. मम्मी लग्नाच्या आधी हा खेळ खेळत असे आणि ती एकदम तरबेज होती हा खेळ खेळण्यात. ती खेळायला लागली की अगदी बघत रहावेसे वाटे तिचे खेळणे. अगदी वेगाने एक एक सागरगोटा उचलून हवेत उंच फेकत असे आणि दोन्ही हातांनी झेलून डाव्या हातात गोळा करत , लगेच पुढचा सागरगोटा उचलून हवेत फेकत असे! आजकाल मल्टीटास्किंग चे कसब शिकण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यशाळा घेतल्या जातात. पूर्वीच्या काळी मात्र हे सगळे अगदी सहजच शिकले/शिकविले जात असे, अशा छोट्याछोट्या खेळांमधून. दुसरा प्रकार म्हणजे हे सागरगोटे तळ हातात घेऊन उंच फेकायचे आणि पालथ्या हातावर झेलायचे. आम्हीही खूप प्रयत्न केला, हा खेळ शिकायचा पण तिच्या इतका उत्तम प्रकारे आम्हाला काही जमल नाही. हळूहळू एक एक सागरगोटा उचलून, हवेत फेकून झेलायचा प्रयत्न करत असू, कधी झेलता येत असे, तर कधी सुटून जात असे हातातून. आता हे लिखाण करताना जाणवते आहे, ते सागरगोटे केव्हा, कुठे हरवून गेले लक्षातच आले नाही. त्यामुळे तो खेळ पण खेळण्याचा प्रश्नच नाही. तेव्हाच तो खेळ आमच्यासाठी पडद्याआड गेला, त्यामुळे लहान भावंडांनी तर तो खेळणे आणि बघणे सुद्धा शक्य नव्हते आणि आजच्या पिढीची तर बातच सोडा. मला सुद्धा या लिखाणाच्या निमित्ताने या खेळाची आठवण झाली! 

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
२३ मे २०२०



पूर्वी ही काही दोन तीन डिझाईन असलेलेच 
पत्ते मिळत बाजारात 



पूर्वी ही काही दोन तीन डिझाईन असलेलेच 
पत्ते मिळत बाजारात 



एखादा डाव 



एखादा अर्धवट लागलेला डाव 




पत्त्यांचा रंगलेला डाव 





आमची लाल रंगाची 
पुठ्ठ्याची सुटकेस 



वेगवेगळे डिझाईन आणि रंगाचे 
स्ट्राइकर्स 


वेगवेगळे डिझाईन आणि रंगाचे 
स्ट्राइकर्स 



कॅरमच्या गोट्या साधारण पांढऱ्या आणि 
काळ्या दोन दोन गोट्या आणि एक 
राणी गोटी जास्तीची असे , जर कधी एखादी 
गोटी हरवली तर ह्या जास्तीच्या गोट्या वापरता येत 



कॅरम वर छान खेळण्यासाठी 
गोट्या रचून तय्यार 
असलेला डाव 






कॅरम 
एक रंगात आलेला डाव 




बच्चे मंडळी 
कॅरॅमच्या खेळात रमलेली 



झाडावर फळातील 
सागरगोटे 



सागरगोटे 



सागरगोटे खेळतांना 



सागरगोटे खेळतांना 















Comments

  1. हे सगळे वाचूनपरत एकदा खेळायला आवडेल सागरगोटे प्रमाणेच बीड्या आणि गोल खेडे सध्दा खेळता येतात

    ReplyDelete
    Replies
    1. ऑ हे काय? जरा सविस्तर सांगाल का कृपया?

      Delete
  2. Khup chhan kharach he sarw visyeshtha sagargote aani viti dandu parat khelayla khup aawadel..chhan lekh..aani thanx for remind it..

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्या जमल्या की खेळू या परत हे सगळे खेळ, 😊😍😇

      Delete
  3. Waa punha ekda lahapanitil patte carom sagaegote yaa khelachi aatwan zali bhawandasobat pach tin 2 laddies rummy khelne majjach hoti

    ReplyDelete
    Replies
    1. खेळ म्हटले की लगेचच आपण बालपणात शिरतो! जाम मज्जाच मज्जा!

      Delete
  4. Wa Kay sunder आठवणी! तो काळ परत यावासा वाटतो. आणि त्यांतच रममाण होऊन जावं असं वाटतं

    ReplyDelete
    Replies
    1. खरय! का मोठ्ठे झालो हाच प्रश्न पडतो.
      😃 😍😇

      Delete
  5. Tuzya sunder lekha mule mala pan mazya balpanachya aathavani jagya zalyat aamhi pan sagargote, kanherkhade, dagad ase khup khelaycho majja yaychi
    Aaj pahilyandach sagargote zadavarche pahilet thanks
    Khup chan

    ReplyDelete
    Replies
    1. वावा सगळेच आपापल्या बालपणात रमले आहेत, फारच छान वाटतेय हे बघून, हाच आनंद बघायचा होता अणि आहे अणि पुढेही बघायला आवडेल!!!
      खुप सारे धन्यवाद 😍

      Delete
  6. स्वाती प्रभुणेJune 13, 2020 1:28 pm

    मला लहानपण आठवलं विदर्भात पण असाच उन्हाळा असतो रखरखीत 9 वाजताच उन्हाच्या झळा चालू होतात व रात्री जरा बरे वातावरण होते मग दुपारी पत्ते सागरगोटे सागर गोटे झाड माहीत नव्हते ते बघायला मिळाले व आमच्या कडे लहान पणा पासून आम्हाला आत्मनिर्भर बनवले तर गहू निवडायला बसवायचे व 1पायली ला 10 पैसे द्यायचे मग आमच्यात स्पर्धा लागायची व त्यात पटापट करण्यात खडा जाऊ नये म्हणून ते आई लोक पुन्हा बघायचे व खडा सापडला तर 5 पैसे कमी�� खूप मजा यायची व बर्फाचे गोळे ऊसा चा रस पन्हे खूप मजा असायची व हे सर्व घरी करत असत
    लेख मस्त झाला आहे मोठ्या कुटूंबाची मजा काही वेगळीच असायची नाही का? मजा मस्ती कट्टी व नंतर बट्टी
    उन्हाळ्यात मग बाहुली च लग्न वरात असे पण खेळ खेळायचो

    ReplyDelete
    Replies
    1. सागर गोट्या चे मुद्दामच फोटो दिले झाडावरचे, सगळ्यांना बघायला मिळावेत म्हणून!
      निवडणे .. याबद्दल एका खास लेखात बोलू या!
      बाकी तुमचे सगळे खेळ धमाल!
      धन्यवाद 🙏

      Delete
  7. जितेंद्र महाजनJune 13, 2020 1:30 pm

    खूप छान वाटले वाचून पत्याचा डाव डोळ्या समोर उभा राहिला मस्त मजा आली

    ReplyDelete
  8. जनार्दन चौधरीJune 15, 2020 9:25 am

    फोटो सहित खेळांचि भुलावण ओळख छान जमलि आहे

    ReplyDelete
  9. स्वाती चौधरीJune 15, 2020 9:26 am

    बाबांच्या चेषमा मधून पत्ते पाहणे किती मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. आहे की नाही छान गम्मत! त्यामुळेच तर ती छान लक्षात राहिली!!! 😍🍕

      Delete
  10. Excellent and the image collection is too good ..

    ReplyDelete
    Replies
    1. Thnk you so much 😊 🙏
      नाव कळले तर खूप आनंद होईल

      Delete
  11. एकदम मनापासून appeal होणारा लेख. आमच्या पिढीने पण exactly ह्याच खेळांमधे महिनोंमहिने सुट्टय़ा पार पाडल्या आहेत. हल्लीच्या पिढीला हे खेळ का आवडत नाहीत ते कळतच नाही. आम्ही भावंडं तर कित्येकदा रात्र आणी दिवस पत्ते खेळत काढायचो. दुसर्‍यांचे पत्ते पाहणे मला वाटतं खूप कॉमन खोड(😜😜) असावी. तुमची ट्रिक मात्र खूप clever होती. कदाचित तुमच्या आजोबांना तुमची ट्रिक माहिती पण असेल पण ते कौतुकाने दुर्लक्ष करत असणार. मी पण अधून मधून लॅपटॉप वर पत्ते खेळतोच (😆😆). एक मात्र खरं आहे, मोठी माणसे पत्ते खेळताना प्रेक्षक म्हणून बसायला पण खूप मज्जा यायची. अशीच मज्जा कॅरम खेळायला पण यायची. क्वीन अणि तीच्या बरोबर cover घेतलं की अगदी जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. खेळातले sagle बारकावे अगदी meticulously तू वर्णन केले आहेस. Strikers चे इतके designs कुठून पैदा केलेस देव जाणे. सागरगोट्या हा मुलींचा खेळ असल्यामुळे मला त्या बद्दल जास्ती काही माहिती नाही. पण एकंदरीत तू आम्हा वाचकांना परत लहानपणीच्या आनंदी खेळात डुंबवल्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. 👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  12. खरंय आताची पिढी काही या खेळात रमत नाही.
    पत्ते चोरून बघण्यासारख्या दुसरा आनंद नाही या जगात! 😉
    कॅरम मधील राणी अणि तिच्या बरोबर एक गोटी काढली की अगदी जग जिंकल्याचा आनंद! अर्थातच हा आनंद माझ्या वाट्याला फार कमी वेळा आलेला आहे 😊
    सागर गोट्या बाबत मलाही फार थोडी माहिती आहे.
    खुप सारे धन्यवाद अगदी मनःपूर्वक! 😊😁🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...