पापड भाजणे
(घरातील गमती जमती)
आता तुम्हाला वाटेल, साधं पापड भाजणे, त्यात काय एव्हढे आणि त्यावर अख्खा एक लेख ?!?! हो, आता इतक्या सगळ्या प्रकारचे पापड आणि त्यांच्या करण्याच्या गमती जमती वाचून झाल्या आहेत ना? आणि काही बाकी आहेत अजून. मग आता ते भाजायचे कसे, खायचे कसे हे सुद्धा सगळ्यांना नीट समजायला हवे ना, त्यासाठी हा सगळा प्रपंच! परत जोडीला एक गोष्ट कायम... इतक्या सगळ्या लोकांचे एव्हढे मोठ्ठे एकत्र कुटुंब. त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप मोठ्ठ्या प्रमाणात लागणार आणि पर्यायाने या सगळ्याच कामांकरिता वेळ सुद्धा भरपूर लागणार. यात एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे, सगळीकडे पापड हा प्रकार म्हणजे जेवतांना लागणारे एक तोंडी लावणं असते. आमचे तसे नव्हते, किंबहुना सगळ्या खान्देशातच ते तसे नव्हते. पापड हे फक्त जेवतांना लागणारे तोंडी लावणं नव्हते तर मधल्या वेळातील खायचा खाऊ होता आणि काही घरांमध्ये जेवतांना भाजी नसेल तर या पैकी काही पापड भाजीचे सुद्धा काम करतात. पण आजच्या या लेखात फक्त पापड भाजण्याची गोष्ट! कसे खायचे ते नंतर परत कधीतरी अशाच एका खास लेखात.
साधारण सकाळची सगळी काम, जेवण वगैरे सगळं आटोपले की या पापड भाजण्याच्या सोहळ्याची सुरुवात होत असे. साधारण दुपारी दोन वाजेच्या आसपास. आता पापड भाजायचे म्हणजे शेगडी पेटविणे ओघाने आलेच. शेगडी कशी पेटवायची हे आता तुम्हा सगळ्यांना चांगलेच माहितीचे झालेय. आज परत नाही सांगत. तर एका बाजूला शेगडी पेटवायला ठेवली की घरात बाकी तयारी. तर सगळ्यात आधी म्हणजे जे जे पापड भाजायचे आहेत ते सगळे पापड साठवणुकीच्या कोठ्यांमधून मोठ्या मोठ्या घमेल्यांमध्ये काढून ते स्वयंपाक खोलीत आणून ठेवायचे. दुसरे म्हणजे पापड भाजून झाल्यावर , ते भाजलेले पापड भरून ठेवण्यासाठी डबे काढून ठेवायचे. आमच्याकडे हे भाजलेले पापड ठेवण्यासाठी मोठमोठे अल्युमिनिअमचे तीन-चार डबे होते. या डब्यांमध्ये जर चुकून माकून आधीचे थोडे पापड शिल्लक राहिले असतील तर ते दुसऱ्या छोट्या डब्यात काढून ठेवावे लागत . पण सहसा ही वेळ येत नसे, आमची टोळ धाड होती ना, सगळे सारखेच फस्त करून टाकायला. बऱ्याचदा तर सगळे डबे रिकामे होऊन जात , मग आम्ही मम्मीला विचारत असू, "अग, सगळे डबे रिकामे झालेत, कधी भाजणार आहेस पापड?"
या पापडांमध्ये मुख्य तीन प्रकारचे पापड असत. एक म्हणजे बिबडे, दुसरे ज्वारीचे पापड आणि तिसरे म्हणजे उडीद पापड. तर ही सगळी तयारी करेपर्यंत तिकडे शेगडी सुद्धा हवी तशी पेटलेली असे. मग ती पेटलेली शेगडी साणशीने(पकडणे) उचलून घरात आणून ठेवली जात असे. मग खरी पापड भाजायला सुरुवात होत असे. बिबड्यांना सगळ्यात जास्त धग लागते म्हणून सगळ्यात आधी बिबडे भाजायला घेतले जात. त्यानंतर ज्वारीचे आणि सरते शेवटी उडदाचे पापड. भरपूर पापड असत भाजायचे त्यामुळे एक-एक प्रकारचे पापड भाजून संपायला बराच वेळ लागत असे.
तर सगळ्यात आधी बिबडे. हे पापड भाजतांना काही वेळ तेलाचं भांड लागे. याच कारण म्हणजे गरम गरम नुकत्याच भाजलेल्या बिबड्यावर जर तेल घातले, प्रत्येक पापडावर सगळीकडे पसरून, तर त्या गरम गरम पापडावर ते तेल थोड्या वेळातच छान मुरते. म्हणून मग थोड्या गरम गरम पापडांवर छान सगळीकडे पसरवून तेल घातले जात असे. बाकीचे बिबडे नुसतेच भाजून ठेवले जात असत. मग ते नंतर हवे तसे किंवा हव्या त्या पद्धतीने खाता येतात. ते सगळे प्रकार कसे खायचे या लेखात सांगेनच सविस्तर.
त्यानंतर नंबर येतो तो ज्वारीच्या पापडांचा. इकडे सगळे बिबडे भाजेपर्यंत, शेगडीतील धग सुद्धा बरीच कमी होऊन गेलेली असते. मग त्यावर ज्वारीचे पापड भाजण्याचे काम चालू होत असे. बिबडे करतेवेळीच त्यात मिरची, लसूण, धने, तीळ, जिरे वगैरे वगैरे घातलेले असतेच. त्यामुळे त्यावर नुसतेच तेल घातले तरी भागते, छानही लागते. ज्वारीच्या पापडामध्ये फक्त मीठ घातलेलेअसते. मग या गरम गरम नुकत्याच भाजलेल्या ज्वारीच्या पापडांवर, सगळीकडे थोडी शेंगदाण्याची चटणी भुरकावयाची आणि त्यावर तेल घालायचे. छान मुरते हे सुद्धा थोड्यावेळातच! अर्थातच या सुद्धा थोड्या पापडांवरच चटणी आणि तेल घातले जात असे आणि बाकीचे सगळे नुसतेच भाजून ठेवले जात.
शेवटचा नंबर येतो तो उडदाच्या पापडांचा. साधारणपणे उडदाचे पापड तरी , सगळीकडे जेवणाच्यावेळी हवे तितके भाजून घेतले जातात. पण आमच्याकडे मात्र हे सुद्धा एकदाच भरपूर भाजून ठेवले जात. मग हेच पापड जेवतांना तोंडी लावणं म्हणून आणि मधल्या वेळेच्या खाण्याला सुद्धा होत असत. बरं आमच्याकडे उडीद पापड म्हणजे सुद्धा घरीच केलेले असत. पण ते इतके बारीक की जरा हात लागला की तुटून जाण्याची शक्यता. बर एकच पापड खाऊन कुणाचेच भागत नसे, प्रत्येकाला दोन-तीन तरी पापड लागत एकावेळी. मग हे इतके पापड डब्यात कसे भरून ठेवणार? अगदी अलगद एकावर एक ठेवले तर इतके पापड ठेवायला दोन तीन डबे मोठे मोठे लागणार. यावर आमच्या आईने(आजीने) एक नामी युक्ती काढली होती., छोट्या डब्यात भरपूर पापड ठेवता यावे म्हणून. उडदाचा पापड भाजल्या भाजल्या वातड असतो. थंड झाल्यावर मग कुरकुरीत होतो. तर पापड भाजून झाल्यावर, तो शेगडीवरून खाली उतरवल्या बरोब्बर त्याची पोळीसारखी घडी घालायची. आणि ती घडी खाली ठेवून त्यावर एक लोखंडी साणशी ठेवायची. असे केल्यानी ती घडी उकलून न जाता छान पोळीसारखी तशीच राहत असे. पुढचा पापड भाजून होईपर्यंत ती घडी चांगलीच नीट बसलेली असे. मग ती साणशी त्या पापडावरून उचलून, दुसऱ्या पापडाच्या घडीवर ठेवायची आणि तो घडी घातलेला पापड डब्यात ठेवायचा. शेवटचा पापड भाजून होईपर्यंत हे असेच चालत असे.
आमच्याकडे पोळीची घडी सुद्धा फक्त दोन ठिकाणी दुमडून घडी घातली जात नसे, तर तीन ठिकाणी दुमडून घातली जात असे. त्यामुळे त्या घडीचा आकार अगदी आयताकृती होत असे. त्यामुळे अगदी छोट्या डब्यात सुद्धा पन्नास-पन्नास पापड एकावेळी सहजच मावत असत. आता तसे होत नाही, याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे हल्ली जेवतांना लागेल तसे वेळच्या वेळी भाजले जातात हे पापड. दुसरे म्हणजे आता गॅसवर भाजले जातात पापड. त्यामुळे त्याला वेळ लागतो आणि तितक्या वेळात तो कुरकुरीत होऊन जातो आणि त्याची घडी घालता येत नाही. घातली तरी ती छान नीटनेटकी नाही होत.
तेल न लावलेले बिबडे, चटणी तेल लावलेले ज्वारीचे पापड, मोठाल्या अल्युमिनियमच्या डब्यांमध्ये भरले जात. अर्थातच ते सुद्धा मावत नसत, मग त्यावर हलकेच दाब देऊन, डबा थोडा रिकामा केला जाई आणि उरलेले पापड पण त्यात भरले जात. उडदाचे घड्या केलेले पापड पण त्या डब्यात भरून ठेवले जात . मग सगळे डबे आपल्या जागी जाऊन बसत. महिनाभर तरी पुरत असत मधल्या वेळेच्या खाण्यासाठी आणि तोंडी लावण्यासाठी. शेगडी बाहेर नेवून ठेवली जात असे. पण असे करतांना एक काळजी घ्यावी लागे. ते म्हणजे शेगडी ज्या ठिकाणी ठेवलेली असे तिथे एक मोठ्ठे तरट, चांगले ओले करून ठेवावे लागे. कारण इतके तास पेटलेली शेगडी तिथे ठेवल्याने ती जागा प्रचंड तापून निघालेली असे. अशा जागी कुणाचा चुकूनही पाय पडला तर, पायाची काय हालत होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
ही झाली पापड भाजण्याची गोष्ट! आता हे सगळे पापाड खायचे कसे? किंवा आम्ही कशा कशा पद्धतीने खात असू आणि त्याच्या गमती जमती नंतर कधीतरी अशाच एका खास लेखात, लवकरच वाचायला मिळतील!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
४ एप्रिल २०२०
लोखंडी शेगडी
शेगडीत जाळण्यासाठी
लाकडी कोळसा
शेणाच्या गौऱ्या
छान धगधगीत पेटलेले निखारे
कच्चे पापड (बिबडे)
कच्चे पापड
(ज्वारीचे पापड)
बाहेर बागेत जागा असेल तर
असेही भाजता येतात
भाजलेले पापड
तेल घातलेलं
गरम बिबडे
शेंगदाण्याची चटणी आणि तेल
घातलेला ज्वारीचा पापड
घडी केलेला उडदाचा पापड
घडी केलेले उडदाचा पापड
गॅस वर भाजल्याने घड्या
छान नीट आणि सुबक नाहीत
उडीद पापडाची घडी'
करण्याची पद्धत
पापड भरण्याचे अल्युमिनियम डबे
Wow तोंडाला पाणी सुटले व असे पापड भाजून ठेवतात हे पहिल्यादा च कळले आम्ही अजूनही कधीतरी चुली वर भाजतो पण लगेचच खाऊन टाकतो आता पुढच्या वेळी मी डब्यात ठेऊन बघेन
ReplyDeleteबिबळे जळगांव वरून आणायला हवेत
आम्ही अंगणात चूल केली आहे त्यावर रस्सा व खिचडी करतो व वांगी बटाटा कांदे व पापड भाजतो
त्याची चव खूपच वेगळी लागते
गॅस पेक्षा
मी नक्की येईन खिचडी अणि कांदा बटाटा रस्सा खायला !
Deleteबीबडे तुम्हाला मिळायची सोय करून देईन...
चवीने खाणार्याला ती गोष्ट मिळायलाच हवी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
चिकणीचे पापड विसरलीस की अक्का, हे भाजलेले पापड शेंगदाणे सुकवलेले बोरं, वाळवलेले लोणचे हा मधल्या वेळचा खाऊ व्हायचा (सुटले का तोंडाला पाणी)
ReplyDeleteभरीत भाजून झाल्यावर शेकोटी मध्ये मिरच्या भाजल्यावर सुद्धा छान निखारे असत मग हा पापड भाजणे कार्यक्रम असे नशिराबादला तुरखाटी व पयखाटी मुबलक असल्याने सरपण म्हणून वापरायचे
अरे अण्णा, विसरेन कशी ? 🤔 पण सुरुवातीला काही वर्ष करत नसत आमच्याकडे बहुतेक चिकणी मिळण्याची अडचण होती...
Deleteयेस्स भरीत झाले की पापड भाजले जात, तूर काठ्या वर, गच्चीवर भट्टीत चाले आमच्या कडे हा कार्यक्रम,
पापड खाण्याच्या गमती नंतर बोलू त्या लेखात 😊😁😀
खुप छान. ज्वारीचा तिखट तेल लावलेल्या पासुन खुप तोंडाला पाणी सुटले, खुप वर्षात खाल्ला नाही.
ReplyDeleteअरे हो ना, लगेचच खावेसे वाटत आहे 😊 😍
Deleteवा!! तोंडाला पाणी सुटले वाचून..आज संध्याकाळी पापड बिबड्याची भेळच करीन.
ReplyDeleteमी पण आईकडे जायचे तेव्हा आई असेच भाजून सोबत द्यायची त्याची आठवण आली.
हे पाहून अणि वाचून ज्याच्या तोंडाला पाणी नाही सुटणार तो माणूसच नाही... 😂😜😋
DeleteAaj varnan vachunach 😋 tondala pani sutale
ReplyDeletePan mi kadhich jwaricha papadala chatani tel lavun khalle nahi nakkich try katel
अरे लगेचच ट्राय कर, u have already missed too much by not trying this...
DeleteSo do it immediately n let me know how did you like it 😍
wa wa kay mast bibade papad chi ruchakar v tondala pani sutanari mahiti dili aahe khup chan tondala pani sutle aaple sadhe pan aawdanara prakar aahe lihiles pan bhari yekadam ��������
ReplyDeletePhoto pan mast
खरच सगळ्यांच्या अगदी मनाच्या जवळचा आहे हा vishay!!!
Delete😍 😍 धन्यवाद 🙏
अक्का पांढरा पापड बघून तोंडाला पाणी सुटले
ReplyDeleteखरच ग ... सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले, पांढरा पापड बघून.... 😍
DeleteTu khup chan lihite agadi vachun man trupt hota ani junya aathavani yaun tondala pani sutata����
ReplyDeleteआज पर्यंत ची सगळ्यात छान पावती माझ्या लिखाणाला मिळालेली!!! शतशः धन्यवाद 🙏 😊 😇😇
DeleteKhupach chhan..papad bhajnyawar suddha lekh howu shakato he aaj wachlyawar samjale...👍
ReplyDelete😊😍 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteसतीश
ReplyDeleteभाजायचा ...म्हणजे
कच्च्या पापड....पक्का पापड च की...
😁😁😜हा हा हा 😁..... True!!!
DeleteBibde ani shengdane wahhh kay bhari , pani sutlay tondala
ReplyDeleteEvening snack ...
vistavavar bhajlele papad khup chan ...
Khup chan lihilay.....
😁😁😋मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteWah Varsha ताई पापडाच्या जाडी नुसार sequence लाऊन कसे भाजायचे हे सुद्धा तुझे निरीक्षण आहे.... Great... Vilas Kinge
ReplyDelete😊😁मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😇
DeleteLuv this Crispi n कुरकुरीत लेख...like Papad..after sunroasting (drying) again roasting on charcoal stove gives tasty and khamang खमंग चव which give pure satisfaction of making efforts...
ReplyDeleteAlso liked geometry of lllustration for making Papad
Did you ever tried Rice Papad?
Gaddyawar milate te
Big one
Yes tried that too! I liked that even....
DeleteAs usual unique अभिप्राय..... Just loved😍 Thnk u!!! 😊😇
नुसते पापड भाजायची तर्हा सांगायला तुला एक अख्खा लेख लिहिता येतो, त्यावरून तूच कल्पना कर, केवढी लिखाण क्षमता तुझ्या मध्ये आहे. मी पण लेखाच्या शीर्षकावरुन जरा साशंकच होतो की हा भाजण्याचा मुद्दा तू कसा काय मांडणार? पण खरच तुझं भाज- वर्णन नेहेमीप्रमाणे तपशिलवार आणि मनोरंजक निघालं. सगळ्याच गोष्टी अगदी मेगा स्केल वर करणं ही आता तुम्हा कुटुंबीयांची speciality झाली आहे. पापड हे मधल्या वेळी खायची गम्मत आहे हे नव्यानेच कळले. अणि तुम्हा बच्चे लोकांची गँग म्हणजे टोळधाड हा अगदी समर्पक शब्द वापरलाय (😄😄😄). वेगवेगळ्या पापडांची भाजायची वेगवेगळी पद्धत ही पण एक माझ्या ज्ञानात एक भर (😉😉). पापड भाजून परत ते डब्यात कसे भरायचे हा पण उद्योग आहे याच अचंबा वाटला. एकंदरीत पापड भाजणे हा एक चविष्ट अणि कुरकुरीत अनुभव वाटला. आता प्रतीक्षा आहे ती पापड कसा खायचा त्या लेखाची. गुड लक... 👍👍👍
ReplyDeleteभरपूर प्रकार आहेत ना पापडाचे म्हणुन लिहिता आला अख्खा एक लेख... Mega scale ही आम्हा कुटुंबियांची speciality होती, आता नाही 😝
Deleteखरच आम्ही म्हणजे टोळ धाडच...! 😉
आता लवकरच कसे खायचे हे सुध्दा सांगेनच थोडी कळ काढ...
अणि लाख लाख धन्यवाद ईतक्या सगळ्या कौतुकाबद्दल! 😇😊
खरंच अप्रतिम आपले पापड बिबडे अप्रतिम तुमचे हे लेख , खुप छान
ReplyDeleteअगदी खरंय आपल्या पापड बिबड्यांना तोड नाही या जगात ! खूप सारे सप्रेम धन्यवाद !!!🤩😇
Deleteताई छान पण यात चिकणी चा पापड विसरली , निरीक्षण खुपच छान
ReplyDeleteखुप धन्यवाद !🤩🤩
Deletenice writing
ReplyDeleteghemeli madhe bibde,jondhala(jwari) , urd ani chikani ani nagli che papad disat aahet.
je dark brown ahet te chikani ani je light brown ahet te nagli che papad aahet
वाव फारच छान माहिती दिलीस ! नवीन माणसालाही लगेच कळेल ! खूप धन्यवाद !🤩🤩😇😇
Deleteपापडाचे तर खूपच सुंदर वर्णन झाले एवढे कोणी विचारही करू शकत नाही किती प्रकारचे पापड
ReplyDeleteचिकणी च्या पापडा सोबत शेंगदाणे सुद्धा खातात ना
तिखट मीठ लावलेल्या पापड तर खूपच छान दिसतोय
सध्याही पापड खायलाच मिळत नाही .
हे पापड खायला मिळाले असते तर बर झाल असत
सगळ्याच पापडांसोबत शेंगदाणे खातात , अपवाद फक्त उडीद पापड . हे सगळ्या प्रकारचे पापड मिळतात हल्ली . त्यामुळे तुम्ही नक्कीच खाऊ शकता . खूप धन्यवाद !🙏😊
Deleteखूपच सुंदर लिहिलं आहे
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Delete