उपवासाची वाळवणं-१
(घरातील गमती जमती)
आजची गोष्ट आहे बटाट्याच्या वेफर्स आणि किसाची दोघांची करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. फक्त वेफर्स करायचे म्हणजे बटाटयाच्या गोल चकत्या करायच्या आणि किस करायचा म्हणजे किसणीच्या जाड जाड भोकातून बटाटा किसायचा. नेहमीप्रमाणे सगळी फळं आणि भाजीपाला जसा शनिवारच्या आठवडे बाजारातून खरेदी केला जात असे, तसेच हे बटाटे सुद्धा शनिवारच्या आठवडे बाजारातूनच खरेदी केले जात. तेव्हा आमच्याकडे साधारण दहा किलो बटाटे आणले जात खास वेफर्स करण्यासाठी. बटाटे लगेच खराब होत नाही किंवा पिकून जात नाही, त्यामुळे त्याचे वेफर्स अगदी त्याच दिवशी केले नाही तरी चालतात. पण हे काम सकाळी किंवा दुपारी सुरु करता येत नसत, कारण ते करण्याची आमच्याकडची पद्धत. तर हे वेफर्स करण्याची सुरुवात साधारण संध्याकाळी केली जात असे आमच्याकडे.
आता बटाट्याचे वेफर्स करायचे असो किंवा बटाट्याचा किस, किसणी आणि सोलण फारच आवश्यक गोष्ट. तेव्हा प्रत्येकाच्या घरात साधारण अशा सगळ्या गोष्टी एकेकच असत. एव्हढे वेफर्स करायचे म्हणजे साहजिकच एका किसणीवर आणि एका सोलण्यावर काम भागण्यासारखे नसे. मग इकडून तिकडून आणल्या जात जास्तीच्या किसण्या आणि सोलणे. तसेच त्यांच्याकडे जेव्हा वेफर्स करायचे असत, तेव्हा आमच्याकडचे सुद्धा सोलण आणि किसणी तिकडे जात असत. आता हे जर सगळे एकाच दिवशी येणार असेल तर मात्र कुणाला तरी एखादा दिवस पुढे मागे करावा लागे आणि या बाबतीत ते शक्यही असे.
या सगळ्या उपकरणांची जुळवाजुळव झाली की मग सगळ्यात आधी बटाटे धुवून घेतले जात . त्यानंतर वेळ येते ती या बटाट्यांची सालं काढण्याची. असतील तितक्या सोलाण्यांनी हे काम सुरु होत असे, हो कारण आम्हाला मुलींना पण लुडबुड करायची असे ना या सगळ्यात सुद्धा. मग एखाद सोलण आम्हला सुद्धा मिळे. हेच आम्ही मुलींनी आळीपाळीने वापरायचे असे. मग त्यातही तक्रारी सुरु होत, हे सोलण चांगलं नाही, दुसरे हवेय😂. कारण मम्मी फटाफट करत असे हे का, तसे आम्हाला जमत नसे. त्यामुळे आम्हाला वाटायचे तिच्या कडे असलेलं सोलण जास्त चांगलं आहे म्हणून तिचे फटाफट होते😜😝. मग काही वेळा मम्मी देतही असे तिच्या हातातील सोलण. ते मिळाल्यावर सुद्धा आमचे पहिले पाढे पंचावन्न! तेव्हा कुठे कळे, नुसते सोलण चांगले असून उपयोग नाही आणि आपल्याला मम्मी सारखे लगेच फटाफट करता येणे शक्य नाही. आजही सगळी कामं करतो पण तिच्या सारखं उत्तम काहीच जमत नाही... पण आता मात्र या आठवणी आल्यावर नक्की कळते किती छळत होतो आपण मम्मीला लहानपणी, खरतर अजूनही मी खूप छळत असते सारखीच.
यानंतर प्रत्यक्ष वेळ येते ती, वेफर्स करण्याची. हे पण काम तसेच दिसायला सोप्पे, पण दिसते तेव्हढे नक्कीच सोप्पे नसते. अर्थातच हे सुद्धा आम्हाला करायचे असे, पण बरंच मोठे होईपर्यंत मम्मीने आम्हाला किसणीला हात लावू दिला नव्हता. तोपर्यन्त प्रचंड राग येत असे. पण जेव्हाकेव्हा किसणीला हात लावू दिला आणि काही किसायची परवानगी दिली तेच याचे कारण कळले. कारण प्रत्येक वेळेला काहीही किसतांना आम्ही आमची बोटं सुद्धा किसत असू. तर हे बटाटे किसून वेफर करायला सुरुवात होत असे. पण एखाद्या किसणीतून जाड तर एखाद्या किसणीतून बारीक वेफर्स पडत. या किसण्यांना एक screw असे. याच्या साहाय्याने पाते वर-खाली करून वेफर ची जाडी कमी जास्त करता येत असे. दुसरे म्हणजे करणारा किती जोर देऊन वेफर्स करतोय त्यावर सुद्धा या वेफरची जाडी अवलंबून असते. हे सगळे नीट बघणे आवश्यक असते . सगळ्या वेफर्स ची जाडी सारखी असायला हवी साधारण. याचे कारण म्हणजे शिजवतांना सगळे वेफर्स सारखे शिजतात आणि तयार झाल्यावर तळतांना सगळे सारखे तळले जातात. नाही तर बारीक वेफर्स जळून जातात किंवा जाड वेफर्स कच्चे राहतात. तळलेल्या वेफर्सचा रंग सुद्धा सारखा येत नाही आणि खाताना एक जळका तर एक कच्चा लागतो. म्हणून सगळ्या वेफर्सची जाडी सारखी असणे फारच आवश्यक.
आता हे किसणीने पाडलेले वेफर्स सरळ पाण्यातच पडले पाहिजे. तसे केले नाही तर ते काळे पडतात. सगळे ताराया झाल्या नंतर परत हे वेफर्स दोनदा तुरटीच्या पाण्यातून काढायचे. आणि सरते शेवटी तिसऱ्या तुरटीच्या पाण्यात रात्रभर ठेवायचे. असे केल्याने हे एकदम पांढरे शुभ्र तर राहतातच पण छान मऊ सुद्धा होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी एका मोठ्या भांड्यात पाण्याला उकळी आणायची आणि त्यात परत तुरटी फिरवायची. त्यानंतरच त्या पाण्यात हे सगळे वेफर्स टाकायचे आणि शिजवायचे. एकदा का शिजवून झाले की मग ते टोपल्यांमध्ये काढून घ्यायचे आणि काहीवेळ तसेच ठेवायचे . म्हणजे त्यातील पाणी निथळून जाते .
मग हे वेफर्स, सुटी साडी, पातळ किंवा धोतर घेऊन गच्चीवर जायचे. पातळ/धोतर अंथरून त्यावर अक्षरशः एक एक वेफर मोकळा करून , धोतरावर सूटा सुटा वाळत टाकायचा. दिसतांना सोप्पे दिसते पण प्रत्यक्ष करायला गेल्यावर समजते की किती किचकट आणि संयमाचे काम आहे ते. आता आम्ही कशा मागे राहणार या कामात सुद्धा. मम्मी म्हणे, अग ऊन तापतंय, वेफर्स गरम आहेत चटका लागेल, नका करू हे उद्योग. पण आम्हाला करायचेच असे. मग डोक्यावर टोपी घालून किंवा रुमाल बांधून घेतला तरच हे काम करायला मुभा मिळे. जाम गरम लागे हाताला. पण सांगणार कोणाला? आमचीच हौस ना?! त्यात ते एक एक वेगवेगळे करून टाकायचे . थोड्यावेळ बरे वाटे पण नंतर कंटाळवाणे आणि थकवणारेही वाटे, त्यात हाताला चटके लागत ते वेगळेच . पण आम्ही सुद्धा हार न मानता नेटाने करत असे हे काम. दाखल्याचे असे ना मम्मीला आम्ही आता मोठ्या झालोय ते!!!😁😂
संध्याकाळी वाळलेले एक एक वेफर हळुवार हाताने काढायचे. छान कडकडीत वाळले नसतील, तर परत दुसऱ्या दिवशी गच्चीवर उन्हात वाळत घालायचे. एकदा का छान कडकडीत वाळले की हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. वर्षभर लागतील तेव्हा काढून, हवे तेव्हढे तळायचे, आणि आडवा हात मारायची!!🤤🤤🤤
(टीप-सगळ्या वाळवणांसाठी गच्चीवरील गमती जमती आणि घरातील गमती जमती या दोन्ही सदरात बघावे म्हणजे सगळी माहीती नीट आणि सविस्तर मिळेल)
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१९ मे २०२०
किसणीने पाडलेले वेफर्स
जाळीचे वेफर्स
वेफर्स शिजवतांना
पाणी निथळण्यासाठी
टोपलीत टाकलेले वेफर्स
वाळलेले वेफर्स
तळलेले वेफर्स
जाळीचे वेफर्स
मिरची पूड आणि मीठ
भुरकवलेले वेफर्स
वाळलेला बटाट्याचा किस
तळलेला बटाट्याचा किस
मिरची पूड आणि मीठ भुरकावलेला
बटाट्याचा किस
आज मी सकाळी बटाट्याचा किस केला. आणि आता तुझा लेख वाचुन सगळे आठवले ते दिवस
ReplyDeleteअरे व्वा छान मुहूर्त अणि योगायोग, धन्यवाद खूप सारे! ❤
Deleteहो ना खूप उस्थाह असायचा आपल्याया..खूप छान लेख आणि pics सुध्धा छानच..बघून पाणी सुटले
ReplyDeleteखरंय, सगळ्यात महत्वाचा उत्साह!!! तो असला की जग जिंकता येते!! ❤ ❤
Delete😋😋😋
ReplyDeleteMala khup aavadtat chips. Aata mahila hi aavadtat mhanun mi pan Keley chips n chakli.
आठवण आहे मला याची, किती मनापासून खायची तू याची!!
Deleteअणि सगळे करण्याच्या बाबतीत तर तू नंबर वन!!! Hats off to you बच्चा 😍❤️
सगळ्यांचा आवडता खाऊ आहे हा..आम्ही तर हे खाण्यासाठी उपवास करायचो😄
ReplyDeleteअगदी 💯 %✔️ he सगळे खायला मिळावेत भरपूर म्हणुन उपास करायचा 😉😉😂😍
DeleteChan varnan
ReplyDeleteKhaila chan, sope pan karaila thode kichkatach
Pic👌😋
खरंय खायला अणि करायलाही मज्जा येते!! 😃😊
Deleteमस्त, पानी सुटल tondala,संपूर्ण प्रक्रिया चांगली संगितली,।
ReplyDeleteKhupखुप सारे धन्यवाद 🙏 ☺
Deleteछान लेख. आणि अगदी बारकाईने केले ले वर्णन. खुप आवडतात मला पण. पण मला करायची वेळच येत नाही. आणि मी कधीच करून पाहिले नाही.
ReplyDeleteअरे आता काय करायची गरजच नाय, लहानपणीच सगळे करून झालेय आपले 😂😂😉😉
Deletevalvanache prakar v sarv mahiti khup chan aadhi mi pan karayache aata matr nahi karat vefars v kis chan lagato aapalya gharacha
ReplyDeleteखुप खुप सप्रेम धन्यवाद 😍 😇
Deleteबटाट्याचा खिस @nd Wafers lekh crispy zalay . Wafers is all time favorite than Chips
ReplyDelete||Jo खाईल वेफर्स |
Hotchips chi विसर तयास||
वावा, अगदी खरंय...
ReplyDeleteCrispy धन्यवाद 😉😝
लेखाचा vishay बटाट्याचे wafers आणी कीस असा बघितल्यावर लेख एकदम चटपटीत आणि चविष्ट असणार याची कल्पना होतीच. तसाच तो निघाला. एरवी ते कुरकुरीत wafers खातांना कल्पनाही नसते आम्हाला की त्यासाठी एवढी systematic मेहेनत करावी लागते ते. Wafers, आणी ते पण एवढ्या प्रमाणावर घरी करण्याची आयडिया पहिल्यांदाच कळाली. आमची आई पण बटाट्याचा कीस घरी करायची पण wafers नाही. अगदी बटाटा आणून त्याचा सगळा प्रोसेस, chopping, वाळवण वगैरे आता नेहेमी wafers खाताना मला आठवेल. (😄😄😄). बटाट्याचे काप कापताना इतक्या systematically आणी precision ने कापायचे असतात हे वाचून अचंबा वाटला. तुम्हा बच्चे कंपनीची लुडबुड फक्त बटाटा सोलण्यापर्यंतच होती एकंदरीत (🤓🤓🤓🤓). मला पण लहानपणी आईला बटाटे सोलून दिल्याचं आठवतं आहे. एकंदरीत तुझ्या आईला आणि सगळ्या तुमच्या घरातल्या महिलांना केवढ्या कला अवगत होत्या अणि त्या किती मनापासून सगळी मेहेनत घ्यावयाच्या ते मात्र ग्रेटच आहे. शिवाय हे सगळे मेगा programmes म्हणजे एक प्रकारचं तुमच्या जॉइन्ट फॅमिलीचं सोशल gathering असायचं . लहानपणी माझी आई उपवासाच्या दिवशी बटाट्याचा कीस तळायची आणि आम्ही त्याचे कण ना कण संपवायचो, त्याची आठवण झाली. लेखासोबतचे photoes फारच tempting आहेत. छान चविष्ट आणी माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला.. 👍👍👍👍
ReplyDeleteFirst of all, I must tell you, I just love to read ur miniature article on my article!
Deleteवेफर्सच नाही तर कुठलाही खाद्य पदार्थ खायला बसले की लगेचच त्याचा फडशा पडतो. पण तोच पदार्थ करायला खूप वेळ अणि मेहनत लागते, पण लक्ष देवून पाहिले किंवा करून पाहिले तरच कळते. त्यामुळे समोर तयार अन्न आले की अन्नदात्याच्या आनंद सुख चिंतन ते अन्न ग्रहण करावे, असे माझे स्पष्ट मत आहे. अणि नाव तर अजिबातच ठेवू नये.
हो हे मात्र खर आमच्या मम्मी लोकांना खूप कला अवगत आहेत आणि खूप उत्साह सुद्धा आहे. कंटाळा अणि आळस हे शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीच. त्यामुळे आम्हा मुलींना सुद्धा कुठले काम, हे काम वाटलेच नाही.
असो अशा सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल खूप सारे धन्यवाद 😇😇🙏
Batyatacha खिस ते वेफर्स safarnama भावला.
ReplyDeleteहॉट चिप्स ची सर नाही त्याला.
😇 अणि मला तुझा सफरनामा खुपच भावला!!! 😍❤️
Delete