लोणचं सोहळा
(घरातील गमती जमती)
एकत्र कुटुंब, भरपूर लोकांचं! त्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम म्हणजे एक मोठ्ठा सोहळाच होऊन जात असे. तर आज अशाच एका सोहळ्याची गोष्ट सांगणार आहे. कैरी लोणचं सोहळा!
भरपूर लोक घरात, त्यामुळे लोणचंही लागणार हे एक कारण तर होतेच, पण आम्हा मुलींना कैरीचे लोणचे म्हणजे जीव की प्राण! एका-एका दिवसाला कितीतरी लोणच्याच्या फोडी, जेवतांना आणि दिवसभरात येत जाता, खात असू. जेवतांना लोणच्याच्या फोडीला असलेला खार आणि मसाला खाल्ला जात असे भाजी आणि पोळी/भाकरीच्या काल्यात कालवून किंवा खायचा नसेल तर मम्मीला सांगत असू फोड चोकून/पुसून दे. एरव्ही दिवसभरात कुणाचे लक्ष नाही पाहून, लोणच्याची फोड घेऊन सरळ बाथरूम मध्ये नेवून सरळ नळाखाली धुवून टाकत असू, हो कारण स्वयंपाक घरातील सिंक मध्ये धुतले तर पटकन कुणाचेही लक्ष जाण्याची शक्यता असे. आणि मग खात असू ती लोणच्याची धुतलेली फोड. अहाहा! काय भारी लागे, ती धुतलेली फोड! शिवाय नंतर मम्मीच्या लक्षात आले, की लोणच्याची फोड धुतली आहे की मग तिचा भरपूर ओरडा सुद्धा खावा लागे . नवीन लोणचं घालतेवेळी, जर गेल्या वर्षीचे लोणचे शिल्लक असेल, तर आम्ही हट्ट करून ते धुवून वाळत घालायला लावत असू . पण ते पूर्णपणे वाळायच्या आतच फस्त होऊन जात असे!
तर अर्थातच, या लोणच्याचा कैऱ्यांची खरेदी सुद्धा शनिवारच्या आठवडे बाजारातूनच होत असे. साधारण पंचवीस ते तीस किलो कैऱ्या खरेदी केल्या जात. या फोडल्या की त्यात जवळ जवळ पाच-सहा किलो कोयी/बाठ्या निघत. मग उरलेल्या वीस-पंचवीस कैऱ्यांचे लोणचे होत असे. शनिवारी या कैऱ्या आणल्या जात आणि संध्याकाळच्या जेवणानंतरची आवराआवर झाली की मग या कैऱ्या मोठमोठ्या पितळी पातेल्यात पाणी घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या जात असत. दुसऱ्या दिवशी रविवार, त्यामुळे घरातील सगळी पुरुष मंडळी घरीच असत. ही फार महत्वाची आणि आवश्यक गोष्ट असे या दिवशी. आम्ही मुलीही या दिवशी खूप खुश असू, बरीच कारण होती याला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्हाला या सोहळ्यात मदत/लुडबुड करायला बराच वाव असे आणि छान संधीही मिळत असे. सकाळी मम्मी लोकांना नेहमीची सगळी कामं असतंच. ती सगळी आवरल्याशिवाय त्यांना लोणच्याला हात लावता येत नसे. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून स्वयंपाक, सगळ्यांची जेवणं आणि बाकीची सगळी काम. हा लोणचं सोहळा उन्हाळ्यातच होई, त्यावेळी आमच्या शाळेला सुट्टी, त्यामुळे आमच्या मागे अभ्यासाचे झेंगट नसे. फक्त उठून अंघोळ वगैरे आवरणे आणि जेवण करणे एव्हढे झाले म्हणजे आम्ही या सोहळ्यात सामील व्हायला मोकळ्या असू. मग त्या रात्रभर पाण्यात भिजवलेल्या कैऱ्या पाण्यातून काढून टोपल्यात ठेवत असू, त्याचे पाणी निथळून जाण्यासाठी. थोड्यावेळाने घरात आणून स्वच्छ फडक्याने पुसून एक-एक कैरी कोरडी केली जात असे.
मग या कैऱ्या फोडण्यासाठी एकदम तय्यार असत. कैऱ्या फोडणे म्हणजे त्या कापून त्याच्या हव्या तेव्हढ्या आकाराच्या फोडी करणे. पण आमच्याकडे लोणच्यासाठी कैऱ्या फोडल्याच जातात! हा 'कैरी फोडणे' सोहळा फारच छान आणि आमच्या एकदम आवडीचा. साधारणपणे हे काम हॉल मध्येच होत असे. जमिनीवर एक स्वच्छ धोतर किंवा सुती साडी/पातळ थोडी घडी घालून ठेवले जात असे. यावर दोन 'सुडे' विराजमान होत. सूडा म्हणजे खास कैऱ्या फोडण्याची विळी. आमच्या घरी एकच सूडा होता आणि दुसरा कुणाकडून तरी आणलेला असे एका दिवसांकरिता. याच प्रकारे आमचा सूडा सुद्धा कुणाकुणाकडे जात असे. या एकेका सूडयापाशी एक-एक पुरुष आणि एक-एक कैऱ्यांनी भरलेली टोपली. हो ह्या कैऱ्या फोडणे सोप्पे काम नाही, त्यासाठी पुरुषच हवेत. सोबतीला एक-एक सूडयाजवळ आम्ही एक-एक मुली मदतीला/लुडबुड करायला. मग सुरुवात होत असे कैऱ्या फोडायला. दादा, पप्पा, नाना आळीपाळीने बसत कैऱ्या फोडायला. आधी ते एकेका कैरीचे दोन-दोन तुकडे करून देत. मग आम्ही मुली त्यातील कोय/बाठी वेगळी काढून घेत असू. त्यानंतर त्या कैरीच्या हव्या त्या आकाराच्या फोडी केल्या जात. काही वेळा यातील कोयी निघत नसत मग त्या कैऱ्या कापताना, कापल्या जात, अशावेळी आम्हा मुलींना फार वाईट वाटे. कोयीचे बारीक बारीक तुकडे झाले म्हणून. या कापलेल्या कैरीच्या फोडी सुद्धा हाताने एक एक सुट्ट्या कराव्या लागतात. हे काम आम्ही मुली करत असू.
या दिवशी खाट गॅलरीतून हॉलमध्ये येत असे. मग या सुट्ट्या केलेल्या कैरीच्या फोडी या खाटेवर पसरवून ठेवल्या जात, हवा खायला. कैऱ्या फोडून, फोडी जमा झाल्या की त्या टोपलीमध्ये भरून खाटेवर टाकायच्या. या कैऱ्या फोडतांना आमच्या मनात एक तीव्र आणि सुप्त इच्छा असे, ती म्हणजे या कैऱ्यांमध्ये अर्धवट पिकलेल्या भरपूर कैऱ्या निघाव्या. या अशा कैऱ्या बऱ्यापैकी गोड असतात. ह्या आंबट गोड चवीच्या कैऱ्या फार भारी लागतात चवीला! आम्हा सगळ्यांनाच फार आवडत या अशा कैऱ्या. खूपच आवडीने खात असू, तेव्हा घरातील सगळेच लहान-मोठे सुद्धा. बऱ्याचदा तर बाबांनी सुद्धा खाल्ल्याच्या आठवत आहे मला! आता या सगळ्या आठवणी लिहिता-लिहिता सुद्धा त्या कैऱ्या डोळ्यासमोर आल्या आणि तोंडाला पाणी सुटले.
असा हा कैऱ्या फोडण्याचा कार्यक्रम काही तास चालत असे. कैऱ्या फोडणाऱ्यांच्या हातांची पार वाट लागत असे. एका बाजूला हॉल मध्ये हा कैऱ्या फोडण्याचा कार्यक्रम चाले आणि दुसरी कडे मम्मी लोकांची बाकी सगळी काम आटोपली की स्वयंपाक घरात लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी चालू होत असे. सगळा मसाला घरी तयार केला जात असे. तर हे लोणचे साधारण तीन प्रकारचे केले जात असे, माझ्या आठवणी प्रमाणे. एक म्हणजे थोडे आंबट लोणचे, यात गुळाचे प्रमाण एकदम कमी असे. दुसरे म्हणजे गोड लोणचे, यात बऱ्यापैकी गूळ घातलेला असे. तिसरे म्हणजे आम्हा मुलांना आवडते म्हणून आयत्या बेडेकर मसाल्याचे. पहिल्या दोन प्रकारांना मसाला सारखाच फक्त गुळाचे प्रमाण कमी-जास्त. हा गुळ सुद्धा वर्षभराचा घरात भरून ठेवलेला असे. माझ्या माहिती प्रमाणे एक भेली /ढेप साधारण पंधरा/वीस किलोची असावी. याप्रमाणे दोन-तीन लागत वर्षभर. या बाजारातून आणल्यावर नीटपणे तरटात गुंडाळून दाभण आणि सुतळीने शिवून बंद करून ठेवल्या जात असत. असं केल्याने त्या वर्षभर नीट टिकून रहात असत आणि मुंग्या/मुंगुळ्या पासून गुळाचा बचाव होत असे. लागेल तशी-तशी, गरजेप्रमाणे एक-एक भेली फोडून डब्यात भरून ठेवली जाई.
आमच्याकडे एक मोठ्ठी पितळेची परात होती, रोजच्या पोळ्या-भाकरी करण्याकरिता वापरली जात असे. घरातील बाकी पितळी भांड्यांसोबत वेळोवेळी कल्हई केली जात असे या परतीला सुद्धा. या परातीत लोणच्याच्या मसाल्यासाठी लागणारा एक-एक घटक हव्या त्या किंवा लागेल प्रमाणात काढून वेगवेगळा ठेवला जाई. दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले जाई. हे तेल छान कडकडीत तापले की क्रमाक्रमाने एक-एका घटकावर घातले जाई. याचा क्रम महत्वाचा, कारण काही घटक कडकडीत तेलाने जळून जातात, तर काहींना चांगले कडाकडीतच तेल लागते. तेल गरम व्हायला लागल्या पासूनच याचा एक छान वास घरात सगळीकडे पसरतो. एक-एका मसाल्यावर टाकायला लागल्यावर तर त्या मसाल्याची चव जीभेवरच जाणवू लागे आणि कधी एकदा खायला मिळते असे होऊन जाइ!
मसाल्याच्या सगळ्या घटकांवर तेल घालून झाले की मग हे सगळे घटक सराट्याने छानपैकी एकत्र मिसळ जात. थोड्याच वेळात सगळा मसाला खाली बसे आणि वर छान दाट लाल रंगाचा तेलाचा तवंग दिसू लागे. मग थोडा थोडा वेळाने हे सारखे हलवले जात असे, जेणे करून हे लवकर गार होईल. मला तर वाटे छान तो सराटा हातात घ्यावा आणि मस्त हलवत-हलवत त्याचे बदलते रंग आणि पोत बघत-बघत त्याच्याशी खेळत बसावे. पण तेव्हा तिथे जवळपासही फिरकण्याची मुभा नव्हती. कारण त्या कडकडीत तेलाचा एक थेंबही अंगावर पडला की संपलेच. पण जरा मोठं झाल्यावर मात्र संधी मिळेल तेव्हा मी हे सगळे करून घेतले आहे, भारीच मौज आली तेव्हा!
मग हा मसाला पूर्णपणे गार झाला की लोणचे घालण्याची क्रिया सुरु होत असे. आधीच धुवून कोरड्या केलेल्या चिनी मातीच्या बरण्या स्वयंपाक घरात आणल्या जात. सोबतच फोडलेला गुळ आणि खडी मीठ सुद्धा काढून ठेवले जात असे. तेव्हा आमच्याकडे फक्त टेबल वर वापरण्यासाठी बारीक मीठ वापरले जात असे, बाकी सगळे खडी मीठ. हे सुद्धा वर्षभराचे आणून ठेवले जात असे. चिनी मातीच्या जुन्या बरण्या ज्यांना टीच गेल्यामुळे, त्या लोणचे भरण्याच्या उपयोगाला येऊ शकत नसत, अशा बरणीत हे मीठ भरून ठेवले जात असे. तर तोपर्यंत खाटेवर पहुडलेल्या कैरीच्या फोडींची छान हवा खाऊन झालेली असे. मग या सुद्धा टोपलीत घालून स्वयंपाक घरात आणल्या जात. मग ह्या कैऱ्या, मसाला, गूळ आणि मीठ थोडे-थोडे मिसळून-मिसळून एकेका बरणीत भरले जात असे. जवळ-जवळ चार-पाच बरण्या भरत. हे सगळे चालू असतांना आम्हाला ताज्या-ताज्या मसाल्यात घोळवलेली एकदा-दुसरी फोड खायचीच असे. मग सगळ्या बरण्या भरल्या की त्यांची तोंड पांढऱ्या स्वच्छ खादीच्या कापडाने आणि सुती दोरी किंवा सुतळीने बांधली जात. आणि मग या सगळ्या बरण्या त्यांच्या नेहमीच्या जागी म्हणजे स्वयंपाकाच्या ओट्यावर असलेल्या खिडकीत, हवेशीर जागी विराजमान होत!
बरं, एव्हढ्यावर आमचे समाधान होत नसे. आमचे सगळे लक्ष कुकर कधी गॅस वर चढतो याकडे लागलेले असे. आता तुम्हाला वाटेल लोणचं आणि कुकरचा काय संबंध? तर आठवतंय का तुम्हाला?, कैऱ्या फोडतांना आम्ही त्यातील कोयी/बाठ्या बाजूला काढून ठेवत असू. या कोयी, मीठ आणि पाणी कुकर मध्ये घालून त्या उकडून घ्यायच्या. वाफ गेली की त्या एका टोपलीत घालायच्या, जेणे करून त्यातील पाणी निथळून जाईल. एकदा का यातील पाणी निथळले की, या कडकडीत उन्हात वाळत घालायच्या. छान कडक होई पर्यंत वाळवायच्या. काही वर्ष टिकतात, मुखशुद्धी म्हणून वापरायला. पण आम्हाला त्या इतक्या आवडतं, अजुनी खूप आवडतात, की एक वर्ष सुद्धा त्यांचा टिकाव लागत नसे. त्या कडकडीत वळेपर्यंतच अर्ध्या संपून जात. चुकून ज्या काही लोणच्यात जात, त्याही मुरल्यावर इतक्या भारी लागत की आमची त्यासाठी सुद्धा भांडण होत असत.
त्या किती आवडतात, तर मध्यन्तरी दोन-तीन वर्ष सलग माझे अहमदाबादला जाणे झाले. तिथे या उकडून वाळवलेल्या कोयी विकायला दिसल्या. लोक तिथून काय-काय खरेदी करून आणतात, मी मात्र या कोयीच दोन-दोन किलो आणल्या प्रत्येक भेटीच्यावेळी! घरी आले, तर माझी ही खरेदी बघून नवरा आणि लेक इतके खुश झाले की त्यांचा आनंद गगनात मावेना झाला!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
२१डिसें२०१९
पाण्यात भिवजून कोरड्या केलेल्या कैऱ्या
कैऱ्या फोडायचा सुडा
कैऱ्या अशा फोडल्या जातात
फोडलेल्या कैऱ्या
फोडून झाल्यावर धोतरावर
वाळत घातलेल्या कैऱ्या
लोणच्यासाठी काढलेला मसाला
परातीत मोहरी डाळ भरड , धने कूट , बडीशोप कूट , हींग
आणि मसाला (लवंग , मिरे , कपूरचीनी , वेलची , दालचीनी ,
तेजपान . सुंठ , दगडफूल एकत्र पावडर )
बाजूला मेथी दाणे , हळद , लालतिखट .
तेल कडकडीत तापल्यावर पहील्यांदा हींग , त्यानंतर मेथ्या वर घालावे
नंतर थोडी वाफ जाऊ द्यावी
मग मोहरी डाळ भरड ,धने कूट , बडीशोप कूट , मसाला या क्रमाने
तेल घालावे . मग परातीतच हळद आणि लाल तिखट घालून त्यावर सगळ्यात
शेवटी तेल घालावे म्हणजे ते जळून जात नाही .
कडकडीत तेल घालून
एकत्र कालवलेला मसाला
तेल घालून कालवून
थंड झालेला मसाला
असा मस्त तेलाचा तवंग येतो
गुळाची भेली
(आता तिचा आकार आणि रंग दोन्हीही
बदलले आहेत )
कैरीच्या फोडी आणि मसाला एकत्र कालवलेला
लोणच्याच्या बरणीत लोणचे
भरून वरून कापड बांधून ठेवलेली बरणी
मस्तच... एकदम स्वादिष्ट आणि चटकदार लेख. आमच्या घरी होणाऱ्या लोणचे सोहळ्याची आठवण झाली. मी आजच सकाळी मिरचीचे लोणचे घातले. मात्र माझे आपले आठ दिवसात संपणारे प्रकारातील आहे. आजकाल वर्षभरासाठी लोणचे घालायचे बंदच झाले आहे प्रवीण लोणच्यामुळे..
ReplyDeleteछान वाटले तुला इथे बघून , मधल्या काळात मी तुला बरेच मिस केले . पण आता नियमित भेटत जा इथे , छान वाटते मला🤩😍 ! खरंय घराघरातील हे नियमित होणारे सोहळे हल्ली या ना त्या कारणाने लुप्तच झाले आहे . पण समाधान इतकेच आहे आपण शक्य ते ते सगळे करताच असतो आपली काम , छंद आणि निरनिराळे उपक्रम सांभाळून !🤩😇
DeleteKhup chan .....lonche😋😋😋😋
ReplyDelete😋😋😜 खूप सारे धन्यवाद 😍
Deleteवा... तोंडाला पाणी सुटले. अगदी छान, आणि आता करोना संपल्यावर असे लोणचे करायची आठवण दिलीत����������
ReplyDeleteनक्की करा लोणचे, टाळेबंदी उठली की मी येते लगेचच चाखायला!😋😋
Deleteखूप खूप धन्यवाद!! 🙏 😇
Nanda wagle
ReplyDeleteKhoop suner lekh aambache lonche ghalnecha diwas ek sohlach wate
Punha maheri bhutkalati l
Aathwani lonchemule taje zale
Pics suner mast tondala pani sutle
काकू मस्तच तुम्ही लेख वाचून किती खुष असता अणि काही क्षण तरी माहेरी रमता , छान वाटते मला ते बघून. 😍 😍 मनःपूर्वक धन्यवाद!! 🙏
Deleteखूप सुंदर लिखाण आहे ... सगळे कसे डोळ्यासमोर उभे राहिले... लहानपणीच्या आठवणी जाग्या झालात....लहानपण देगा देवा असे वाटू लागले.
ReplyDeleteलोणचे बनवणे म्हणजे सोहळा असायचा.
ह्म्म्म माणसाला लहान असताना मोठे व्हायची घाई असते अणि मोठे झाले की सारखे बालपण देगा देवा चा जप.... असो
Deleteधन्यवाद 🙏
Mastaaa😋😋😋😋😋❤
ReplyDeleteमाझ लोणचे खाण्याचा किस्सा आठवला की नाही लेख बघून..... मी तर विसरू शकत नाही 😝
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
Ekatra kutumbatil ha chatkdar motha sohala kharach khoopach 👌👌
ReplyDeleteVarnan hubehub tyamule 😋tonadala panich sutale g
तू पण सहभागी होत असे की बर्याच सोहोळा मध्ये ,आठवतेय ना? 😚
Deleteखुप सारे धन्यवाद! 😍
खूपच छान ..जुन्या गोड आठवणी
DeleteKhup chan ani zanzanit lekh... Tondala pani sutale����.. Lonache ahhaha���� aata kuthe miltay bangalore madhe...
ReplyDeleteAai karun thevate dar varshi pan janech hot nahi lavkar ghavayala.. November/December ugavato... Toparyant tya lonchyachi majaj jate��
अग तिकडून कशाला आणायला हवे. ईकडे ये एक दिवस मी देते करून तुला, नाहीतर मी येते तुझ्याकडे अणि करून देते.
Deleteछान वाटते या निमित्ताने तरी आपण नियमित भेटतो! ❤ 😍
आरे वा...
ReplyDeleteकसं सुचतं..
लोणचं सोहळा..... गावी जाऊन आलो.. आठवणी ताज्या झाल्या...
माठातलं लोणचं आठवलं...
कारळाचं...
भाकरी...आणि लोणचं..
खरंच तोंडाला पाणी सुटलं..
सुचायचे काय त्यात! फक्त आठवायचे अणि लिहून काढायचे की झाले.
Deleteआम्हाला हे माठातील कारळाचे लोणच नवीनच!
कधी मिळेल आम्हाला चव घ्यायला?😜
खुप सारे धन्यवाद 🙏
Chatakdar v tondala pani sutnara testy lekh aahe janu kahi lonache samor ghalat aahat ase vatale khup mast ��������
ReplyDeleteyaveli lonche ghalayla milanar ki nahi yachi chinta padli aahe mala tar ��
अग ईतकी काळजी नको करूस, होईल तुझे लोणचे नक्की!!!
Deleteखुप खुप धन्यवाद 🙏 😊
So nice!!
ReplyDeleteThnk you 😊
Deleteलोणच मस्तच!
ReplyDeleteमस्त really good!
आनंदी पाऊस ����
मनःपूर्वक स्वागत तुमचे, दीक्षित, या चौधरी सदनात!!!
Deleteखूप खूप आनंद झाला तुम्हाला ईथे बघून !
खूप सारे धन्यवाद!!
Malapn हवय ������
ReplyDeleteकिती हवय सांग फक्त, लगेच पाठवते!! 😁😜
DeletePerfect description 💯💯💯
ReplyDeleteNicee
💃💃💃💃😍😇💖
Deleteसप्रेम धन्यवाद!!!
हळु हळु शब्दांकन प्रभावि होत चालल आहे तसेच विषयाचि मांडणि पण चांगलिच आवाक्यात आलेलि वाटते आहे
ReplyDeleteखूप सारे प्रेम, तुमच्या कायमच्या अणि सगळ्या गोष्टींसाठी च्या सानंद प्रोत्साहन बद्दल!!! ❤
Deleteखमंग मसालेदार कैरीचा सोहळा मंगलमय and lipsmacking आहे तर what about
ReplyDeleteM��ngo?
Mastlihalay
By d way, koyichi supari karta ka?
आंबे पण नक्की चाखायला मिळतील या चौधरी सदनातील!
Deleteसुपारी अशी नाही. उकडून वळवली की ती अगदी छान टणक होते सुपारी सारखी. मग ती चघळत चघळत खायची. 😍
खुप सारे धन्यवाद 😍!!!
Wa. .
ReplyDeleteKhup mast varnan.
Dolya samor ale sagale. .
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteTondala pani sodnara swadishta ani chatpatit lekh. Me tar ajunahi yellow kairi chya fodi khup khate.
ReplyDeleteबापरे, तुझे दात अजूनही चांगले आहेत असे दिसते, मला तर आंबट खाणे अगदी वर्ज्य आहे आता.
DeleteM so jealous now 😜😁
Mouth watering...nice description
ReplyDeleteThnk you so much 😊 🙏
Deleteकोण आपण नाव?
Yes
ReplyDeleteChatpatit ahe ��
तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत!!! 😍
Deleteछान वाटले तुला इथून!!! ❤
व्वा फारच छान वर्णन.....
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏
Deleteसुड झेंगट नवीन शब्द कळले
ReplyDeleteलेख मस्त झाला. आहे तोंडाला पाणी सुटले . आमच्या कडे पण उन्हाळ्यात असेच चालायचे खुप मजा यायची मग ज्या दिवशी लोणचे प्रोग्रॅम असेल त्या दिवशी रात्री भात असे व लोणच्या च्या पातेल्यात भात पुसून घ्यायची आई खूप मस्त वर्णन केले आहेस त्यामुळे जुने दिवस आठवले जुने लोणचे वाळवतात हे माहीत नव्हते नवीनच माहिती मिळाली मी करून बघेन
कैरी फोडणी पूर्वी एकमेकांच्या कडे नेण्याची पद्धत होती जितकं कापू तितकी धार चढते वाढते असे आई सांगायची
हो , सुडा हा खास खान्देशी शब्द ! मलाही कैरी फोडणी हा शब्द नवीन आहे😄 , पण अगदी शब्दशः अगदी बरोब्बर अर्थ आहे या शब्दाचा , छान शब्द ! हे भात पुसून घेणे हे पण नवीनच आहे मला , आम्ही कधीच हे केले नाही . लोणचे एकदा वाळवून बघाच जुने , फारच छान लागते . सुडयाच्या धार बद्दल मलाही असेच काहीतरी अंधुक आठवते आहे . छान वाटते असा सवांद साधला गेला की , या अभिप्रायाद्वारे ! सप्रेम धन्यवाद !🙏☺😍🤩
Deleteमुळात लोणचे हा एक चविष्ट तोंड लावणे प्रकार, त्यात तुझी एवढी रसदार मांडणी, त्यामुळे पूर्ण लेख वाचतांना कायम तोंडाला पाणी सुटलं होतं आणी संपूर्ण लेख संपेपर्यंत तो खळलं नाही. लेखाचा tempo तू कायम चविष्ट ठेवण्यात यशस्वी झाली आहेस. माझ्या लहानपणीच्या लोणचं सोहळ्याची याद या निमित्ताने आली आणी किती तंतोतंत सारखी निघाली. कैर्या फोडण्याची माझ्या वडिलांची मूर्ती डोळ्यापुढे आली अणि त्या निमित्ताने आलेल्या आजूबाजूच्या शेजारीणी, घरातली गडबड, धमाल आणी मनसोक्त ढापून खाल्लेल्या कैर्यांच्या फोडी, सगळा सोहोळा तुझ्या ह्या लेखामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेला. तुझं description इतकं detailed आणी नेमकं आहे की ते नुसतं वाचून पण एखाद्याला लोणचं घालता येईल. Nice टेस्टी लेख .... 😋😋😋😋😋
ReplyDeleteतुमच्या अभिप्रायातील प्रत्येक शब्द सांगतोय तुम्ही किती एन्जॉय केला हा लेख वाचतांना🤩 ! खूप खूप छान वाटले आणि आनंद झाला त्यामुळे मला😇 ! तुमचे वाक्य वाचून मलाही लगेच दिसली नानांची मूर्ती कैऱ्या फोडतांनाची , मी प्रत्यक्ष पहिले नसले तरी😊 . खूप सारे धन्यवाद इतक्या छान पद्धतीने माझ्या लिखाणाला दाद दिल्या बद्दल 🙏🙏🙏! याद शब्दाने अजूनच मज्जा आली या संवादाला !🤩😇
Delete🙏🙏🙏🙏🙏
Deleteज्या कैऱ्या किंचित पिकलेल्या असत त्यांचे वेगळे लोणचे केले जाई ते आधी संपवायचे
ReplyDeleteगुळाची ढेप (भेली) वर हुकला टांगली जायची त्यामुळे जमिनीवर पाणी, किडा, मुंगी यांचा संपर्क होत नसे खारा सकट वाळवलेले लोणचे काय भन्नाट लागते मी तर अजूनही ते मिळेल तेथून मागून आणतो
लोणच्याचा मसाला सुद्धा विशिष्ट दुकानातून उच्च प्रतिचाच लागायचा हिंग, मोहरी, तिखट इ
याच वेळेस पापड करण्यासाठी लागणारे मसाले पण आणले जात अक्कलकर आठवते? उडदाच्या पापडात टाकतात आता बऱ्याच जणांना त्याची जिभेवरील झिणझिण्या आणणारी चव आठवेल बघ
सुंदर लिखाण
पिकलेल्या कैऱ्यांचे लोणचं मला एकदम नवीन आहे , कधी ऐकले नव्हते यापूर्वी . आम्ही त्या सगळ्या कैऱ्या लगेच तिथल्या तिथे फस्त करत असू 😉. गुळाची भेळी टांगून ठेवायला आमच्याकडे सोया नव्हती . पण ती छान तरटाने गुंडाळून सुतळी आणि दाभणाने शिवून अगदी नीट बांधून ठेवली जात असे , माळ्यावर . बाकी मसाल्यांच्या गमती जमाती एका वेगळ्या खास लेखात येतीलच , त्याबद्दल तेव्हा बोलू . छान वाटले तू तुझ्या आठवणी शेअर केल्याने 🤩. मनःपूर्वक धन्यवाद !!🙏🙏😊
DeleteEkdum chatakdar ..aani swadisht lekh..mastach..
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteवा व गुऴाची भेली लोनच मस्त तोंडाला पानी सुटेल असच हे
ReplyDelete🤩😍😁 मस्तच ! तोंडाला पाणी सुटणे महत्वाचे ! मनःपूर्वक आभार !🙏
Deleteलोणचे खूप छान गमती जमती केलेल्या आहेत
ReplyDeleteअरे एकदम धम्माल ! 😍🤩💃😋
Deleteचटपटीत लोणचे व सोहळा वाचुन तोंडाला पाणी सुटले
ReplyDeleteरत्ना भोरे.
😍 लोणचे प्रकार आहेच असा, नुसत्या उल्लेखाने ही प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते.
Deleteखुप धन्यवाद 🙏
मस्त ����लोणच्याच् नुसत नाव काढल तरी तोंडाला पाणी सुटते राव. कैर्या फोडायच काम माझे बाबा करायचे अणि मला ते बघायला फार आवडायचे. खूप छान वर्णन केलय tumhi. ������
ReplyDeleteमनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!🙏😍
Deleteखुप मस्तच.. कैरीच्या parametric फोडी,cylindrical tapered अशी गुळाची ढेप..
ReplyDeleteमस्तच खमंग व मसालेदार लेख झालाय.
खर सांगू.. digital technology फारशी विकसित झाली नाही..झाली असती तर या लेखातूनही लोणच्याचा खमंग आमच्यापर्यंत दरवळला असता..
अगदी खरंय ! डिजिटल टेकनॉलॉगी फारशी विकसीत नाही झालीय . पण लवकरच होईल अशी आशा करूया , फक्त सुगंधच नाही तर चव सुद्धा चाखता येईल !😆😄😄
DeleteMummy k hath k achar ki ��
ReplyDeleteBat hi kuch aur h
बिलकुल १००% सही बात कही दीदी आपने ! बहुत सारा प्यार !💃😇💃😍
Deleteखूप छान. लहानपण एखाद्या फिल्म सारख डोळ्यासमोरून गेलं. हा सगळा प्रकार किती मस्त असे. �� वाचून वाटले की परत त्या काळात जाऊ शकत असते तर....
ReplyDeleteखूप छान लिहिता तुम्ही �� ��
मनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!🥰🤩😇
DeleteHello.
ReplyDeleteछान लिहिले आहे.
परतीमधील घटक पदार्थांची नावे द्याल का
आणि गरम तेलाचा क्रम पण.
Thank you
Gauri
मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद ! तुम्हाला हवी असलेली माहीती सविस्तरपणे त्या फोटो खाली आताच अपडेट केली आहे . कृपया बघा आणि अजूनही काही शंका असल्यास मोकळेपणे विचार . मी नक्कीच निरसन करेन . थोडी कामात असल्याने ही माहीती द्यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !
Deleteखुप छान लिहीले आहे.चटपटीत लोणचे खुप छान👌👌
ReplyDeleteचटपटीत धन्यवाद !!🤤😋😉
Deleteछान मांडणी।
ReplyDeleteआनंदी धन्यवाद! 🙏☺️
Deleteखुप छान माहिती आणि सुंदर वर्णन केले आहे, वाचून तोंडाला पाणी सुटले����
ReplyDeleteखूप सारे आनंदी धन्यवाद! 😋
Deleteतुमच्या कडचे जळगावचे कैरी लोणचे मला फार आवडते
ReplyDeleteपूर्वी तुम्ही पुण्यात असताना बऱ्याचवेळा खाल्ले आहे आता तुम्ही कोणी येत नाही त्या मुळे खायला मिळाले नाही बऱ्याच वर्ष्यात ��
आता सांगते, कुणी येणार असेल तर तुझ्यासाठी लोणच पाठवायला!
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍
लेखातील वर्णन तंतोतंत तसेच. मी कधीच लोणचं खात नाही म्हणजे ते करतांनाच मसाल्याचा सुटलेला घमघमाट खूप आवडायचा पण अजूनपर्यंत एकदाही खाल्ले नाही, अगदी गर्भारपणातही नाही. माझी धाकटी बहीण पण तशीच. माझी मधली बहीण मात्र खूप खायची, कोणाच्या लक्ष्यात येऊ नये म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे धुवून खायची आणि हात फ्रॅाकला / स्कर्टला पुसायची आणि पकडली जायची . मी उकडलेल्या कोयी मात्र ओल्या, उन्हात वाळवून खूप खायची.
ReplyDeleteमाझी आई फोडी एक दिवस हळद मिठात ठेवायची. मी पण तसेच करायची. आता मात्र एकट्या यजमानांसाठी आयते लोणचेच आणते.
लोणच न आवडणार्या अणि न खाणार्या व्यक्ति अस्तित्वात आहे ही माहीती अतिशय आश्चर्यकारक आहे माझ्यासाठी! पण शेवटी व्यक्ति तितक्या प्रकृती!
Deleteवाळवलेले आणि धूतलेले लोणचं खाण्याची, तेही चोरून, काही औरच असते!
खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍🙏
खुपच छान वर्णन केलेले आहे कैरीच्या लोणचायाचे.कुणाच्या ही तोंडाला पाणी सुटेल असे आहे. सौ.मंदा चौधरी.
ReplyDeleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍😍😍
Deleteबालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. खूप मस्त लिहले आहे.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद! 🙏
Deleteलोणचं सोहळा तर खूपच छान रंगला .अगदी तु तर बालपणात घेऊन गेली या सोहळ्यातून !खूपच छान दोन्ही लेख अप्रतिम !👌👌👍👍
ReplyDeleteकाकु, खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! असेच तुमचे प्रेम अणि आशिर्वाद यांचा प्रेमळ पाऊस कायमच बरसू द्या!! 🙏😍🤩😍
Deleteचौधरी सदनातील लोणच्याचा हा शाही सोहळा खमंग झालाय...अगदी कैरी खरेदी पासून..फोडी करणे.. चमचमीत मसाला तयार करणे cylindrical गुळाची अबब ढेप.मग .कालवणे.. पारंपरिक आदरणीय बरणी..(लोणच्यांना सामवणारी व टिकवणारी).....सारे capture केलेलं glimpses Ek Number...
ReplyDeleteउरलेल्या टणकदार कोयांपासूनची सुपारी..
अगदी मस्तच...
माला Terrace वरील अंगतपंगत मधे लोणच्याचा प्रकार खायलाआवडायचं.. just remembered.. especially Curd Rice बरोबर..आणि त्यात उपवासाचं लोणचे वेगळं-- संजिता
हो कैरीचे लोणचे मलाही आवडते. पणते घरीच बनवलेल्या मसाल्यात. खुप वर्षापुर्वी साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वी माझी आई कोकणातील आजी सगळ्या महिला वर्ग घरिच कैरिचे मिरचीचे लिंबाचे या सगळ्या लोणच्यांना घरगुतीच मसाला वापरायचे तसेच सांडगी मिरची पापड घरातील मसाले तयार करून होईच सगळ तेव्हा आतासारखे रेडिमेड काही मिळत नसे त्यामुळे त्याची चवच खास होती.
ReplyDeleteलोणचे सोहळा अप्रतिम.तोंडाला पाणी सुटले. सुडा हा नवीन शब्द कळला.लोणचे करण्याची पद्धत खूप छान आहे.त्यासाठी लागणारी तयारी,मेहनत आणि ते तयार झाल्यावर खाताना येणारा आनंद खूप छान असतो.तू अगदी आपल्या बालपणाची आठवण करून दिली.लोणचे करताना घरात आपण जी लुडबुड करायचो आणि त्यातून शिकायचो.हे कधी ही विसरू शकत नाही.अप्रतिम वर्णन केले आहेस.
ReplyDelete