आठवणीतले एक हळदीकुंकू
(घरातील गमती जमती)
आमच्याकडे हळदीकुंकू म्हणजे मकर संक्रांतीचे . आमच्याकडे तेव्हा अगदी नियमित होत असे , तेव्हा हे हळदीकुंकू . पण इतक्या सगळ्या वर्षांतील हळदीकुंकापैकी एकच ठळक आठवणीत राहिले आहे , माझ्यातरी आज त्याची गोष्ट !
संक्रांत जवळ आली की आमच्याकडे सुद्धा तिळीच्या लाडू-वड्यांची तसेच कुटलेल्या तिळगुळाची लगबग चाललेली असेच . पण अजून एक खास आणि खूप हवीहवीशी लगबग सुद्धा चालू होत असे बरीच आधीपासून , माझ्या खूप आवडीची आणि अगदी मनाच्या जवळची . ती म्हणजे काटेरी हलवा बनवण्याची ! त्याकाळी बऱ्याच वेळा हा काटेरी हलवा आमच्या घरीच बनवला जात असे . अगदी लहान असतांना मात्र , बाकी मैत्रिणींच्या डब्यातला हलवा पाहून वाटे काय हा आपला हलवा , त्यांच्या डब्यातील हलव्याचे रंग छान गडद असत . आयत्या हलव्याचे रंग एकदम गडद असतात आणि एकदम लक्ष वेधून घेतात आणि लहान वयात आधी रंगच जास्त आवडतात , त्याकडे सगळ्यात आधी लक्ष जाते . बाकी त्याचे काटेरी रूप वगैरे , याकडे तेव्हा फारसे लक्ष जात नसे , समजतही नसे . त्यामुळे त्या घराच्या छान काटेरी हलव्यापेक्षा मैत्रिणींच्या डब्यांतीलच गडद रंगाचाच हलवा जास्त आवडे तेव्हा . नंतर थोडे मोठं झाल्यावर हे सगळे समजू लागले आणि मग तो घरचाच हलवा जास्त आवडू लागला . मात्र ती हलवा तयार करण्याची पद्धत अगदी पहिले पासून आवडत होती आणि करूनही बघावा वाटत असे हलवा . पण हा खूप वेळ खाऊ आणि संयमाची परीक्षा बघणारा . त्यामुळे चौधरी सदनात असे पर्यंत हलवा करण्याची अर्थातच परवानगी नव्हती . मात्र थोडे मोठे झाल्यावर म्हणजे गांधी नगरच्या घरात मात्र मी केलाय २-३ वेळा हा हलवा . तेव्हा समजले , करतांना बघितले की एकदम सोप्पा वाटणारा हलवा , स्वतः करायला बसले की किती अवघड आहे ते . पण तरीही खूप छान आणि हवाहवासा वाटणारा अनुभव होता तो ! आताही कधीही आठवण आली तरी लगेच करावासा वाटतो , पण बऱ्याच कारणांमुळे शक्य होत नाही आणि वाईट वाटतं असते .
भरिताच्या लेखामध्ये लोखंडी शेगडीचा उल्लेख आलाय . अगदी तशीच एक अगदी छोटीशी शेगडी होती आमच्याकडे . एव्हढेच नाही तर एक छोटी लोखंडी चूल सुद्धा होती आमच्या भातुकली मध्ये . खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरी एक पांचाळीण बाई येत , घराजवळच एक वस्ती होती त्या वस्तीवर राहत होत्या त्या . त्या हे सगळे लोखंडी सामान बनवतं . घरातील बहुतेक सगळे लोखंडी सामान म्हणजे या शेगड्या , चूल , सराटे , तवे , साणशी(पकड) असे सगळे त्यांच्याकडूनच घेतलेले होते . तर ही छोटी शेगडी फारच गोड होती दिसायला . ती खास आमच्या भातुकलीसाठी बनवून दिलेली होती की हा हलवा बनवण्यासाठी ते नक्कीच आठवत / माहित नाही . तर हा काटेरी हलवा बनवण्यासाठी खूपच मंद आच लागते , त्यामुळे या छोट्या शेगडीत अगदी दोन-तीन लाकडी कोळसे ठेवून पेटवले की यावर हा काटेरी हलवा करता येत असे . तो ही अगदी संयमाने थोडा थोडा वेळ करून दहा-बारा दिवसात तयार होत असे . तो करतांना अगदी हळुवार हलवावे लागते , जोर-जोरात हलवले तर त्याचे काटे तुटून जातात . ज्या ताम्हणात हा हलवा केला जाई , ते जर थोडे जास्त तापवून गेले तर थोडा वेळ आचेवरून खाली उतरवून ठेवले जात असे . हलवा छान पांढरा स्वच्छ राहावा म्हणून आधी हात अगदी स्वच्छ साबणाने धुवून घ्यावे लागत . अन्यथा तो काळपट पडण्याची शक्यता . असे एक ना अनेक नखरे या हलव्याचे ! पण तय्यार झाला की फार भारी वाटे बघायला !
या दिवशीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सजावट . सजावटीचे दोन भाग , एक म्हणजे रांगोळी आणि दुसरा म्हणजे फुलांच्या रचना , अर्थातच आमच्या गच्चीवरील बागेतील फुलांच्या ! तेव्हा खरे तर ठिपक्यांची रांगोळी काढायची पद्धत होती सगळ्यांकडे . पण मम्मी छान छान गालिचे काढत असे रांगोळीचे . फारच सुंदर असत आणि दिसत हे गालिचे , अगदी बघत राहावेसे वाटे काढत असतांना आणि काढून झाल्यावर सुद्धा ! येणाऱ्या प्रत्येकालाही त्याचे कौतुक केल्याशिवाय घरात येणे शक्यच होत नसे .
दुसरा सजावटीचा भाग म्हणजे फुलांच्या वेगवेगळ्या रचना ! गच्चीवरील बाग या लेखात उल्लेख आलेलाच आहे त्याबद्दल . गच्चीवरील वेगवेगळी फुल पाने वापरून त्या लोखंडी खिळ्यांच्या पीनच्या मदतीने वेगवेगळ्या फुलांच्या रचना करून ठेवल्या जात असत . त्या नेहमीप्रमाणे केल्याच होत्या . पण यावर्षी अजून एक नवीन केला . ही नवीन कल्पना नक्की कुणाच्या डोक्यात आलेली माहित/आठवत नाही आता . तर त्या दिवशी घरात खूप कोथिंबीर होती . कुणी दिली होती की स्वस्त मिळाली म्हणून भरपूर आणली होती , हे सुद्धा नीट माहिती नाही . तेव्हा घरात फ्रीझ नव्हते , त्यामुळे तशीही कोथिंबीर ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवली जात असे किंवा मुळासकट असेल तर पेल्या मध्ये पाणी घालून त्यात कोथिंबिरीची मूळ बुडवून ठेवली जात असे . मग त्या दिवशीही मम्मीने तेच केले , दोन-तीन पेल्यात पाणी घालून त्यात ती कोथिंबीर ठेवली , तिची मूळ पाण्यात बुडतील अशा पद्धतीने . मग याचा छान हिरवा हिरवा गुच्छ तयार झाला . मग या हिरव्यागार गुच्छात , गच्चीवरच्या बागेतील छान रंगीत फुलं आणून , ती खोवली . काय भारी दिसत होते म्हणून ते सांगू ! आलेल्या प्रत्येकीचे लक्ष वेधून तर घेतलेच या नाविन्यपूर्ण रचनेने आणि प्रत्येकीने अगदी तोंड भरून कौतुकही केले या रचनेचे !
संक्रांतीचे हळदीकुंकू असल्याने सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यादिवशी दिले जाणारे वाण . या साठी अख्खा बाजार पालथा घातला जात असे आणि काहीतरी छानशी वस्तू आणली जाई . पण यावर्षी जरा गडबडच झाली . बाजारात छान आणि गोड-गोड वेगवेगळे प्राणी आणि पक्षी मिळाले . पण यापैकी एकही हव्या त्या संख्येत उपलब्ध नव्हते . त्यामुळे मोठाच प्रश्न उभा राहिला . मग मधला मार्ग म्हणून सगळे प्राणी आणि पक्षी सारख्या संख्येने आणले . एक छोटेसे कासव सुद्धा होते पण एकच होते . हेही आणले पण ठरवून की हे घराच्या शोकेस मध्ये ठेवायचे , वाण म्हणून नाही द्यायचे . बरे आता आणले तरी पुढे प्रश्न होताच , कुणाला काय द्यायचे ते ठरवायचे कसे ? मग यावर एक भारी तोडगा काढला गेला ! तर जितके प्राणी आणि पक्षी होते तितक्या त्या त्या नावांच्या चिठ्ठ्या लिहिल्या . म्हणजे जर पाच माऊ असतील तर पाच माऊ लिहिलेल्या चिठ्ठ्या , या प्रमाणे . मग ही प्रत्येक चिठ्ठी दुमडून ठेवली , जेणे करून त्या चिठ्ठीवर काय लिहिले आहे हे दिसू नये . मग या चिठ्ठ्या एका टोपलीत ठेवल्या गेल्या .
संध्याकाळी समारंभ सुरु झाल्यावर मग खरी मज्जा आली . आलेल्या प्रत्येकीला हळदीकुंकू आणि तिळगुळ वगैरे दिले गेले . त्यानंतर मात्र वाण द्यायच्या ऐवजी , ही चिठ्ठ्या ठेवलेली टोपली प्रत्येकीसमोर धरण्यात आली आणि त्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगितली . मग ही चिठ्ठी उघडल्यावर त्यात ज्या प्राण्याचे किंवा पक्षाचे नाव लिहिलेले असेल , ते वाण म्हणून देण्यात आलं . येणाऱ्या प्रत्येकीला या नाविन्यपूर्ण आणि नवख्या कल्पनेची मज्जा वाटली , एक वेगळाच आनंद वाटला . प्रत्येक वेळी कुतूहल , चिठ्ठीत काय लिहिले आहे याचे ! तेव्हा आमच्याकडे एक कामवाली येत असे , भांडे धुवायला , शांती तिचे नाव . तिला पण आमंत्रण दिले होते हळदीकुंकाचे . ती पण आली संध्याकाळी छान तयार होऊन . खूप आनंदी आणि तितकीच बावरलेली सुद्धा होती , या सगळ्या वातावरणात . कारण रोज कामासाठी येत असे , आज एक पाहुणी , आमंत्रित म्हणून आलेली होती . मग हिला सुद्धा हळदीकुंकू आणि तिळगुळ वगैरे दिला . मग ही चिठ्ठ्यांची टोपली तिच्यासमोर धरली आणि त्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगितली . पण ती इतकी उत्साहीत आणि बावरलेली होती की , तिला काय सांगितले ते कळलेच नाही . तिला वाटले तिची ओटी भरत आहे म्हणून तिने पदर पुढे केला . मग तिला परत नीट सांगितले काय ते आणि मग तिच्या लक्षात आले नक्की काय सांगितले ते . त्यानंतर तिने त्यातली एक चिठ्ठी उचलली . पण झाल्या गोंधळाने ती जास्तच बावरून गेलेली होती !
या सगळ्या प्राण्यांमध्ये एक कुत्रा आणि एक ससा सुद्धा होता . दोघेही फारच गोड होते . आम्हा मुलींना मनापासून वाटत होते ते एक-एक तरी शिल्लक राहावे घरी . अगदी मनापासून इच्छा असल्याने झालेही तसेच एक कुत्रा आणि एक ससा शिल्लक राहिला . ते एक कासव आणि सोबतीला हा एक कुत्रा आणि ससा , तिघेही कित्येक वर्ष आमच्या शोकेसची शोभा वाढवत होते !!!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
Bhari
ReplyDeletePanchalin bai mhanje..
Ani kateri halwa ghari karata yeto he mala navte mahtii
पांचाळीन बाई, लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे काम करीत असे यांचे कुटुंबीय
Deleteबारा बलुतापैकी एक म्हणजे पांचाळ!
काटेरी हलवा बहूतेक सगळ्यांनाच नविन असणार...
हो मस्त झाला आहे लेख लहानपणीचे ते परकर पोलंके आठवले घसरू नये म्हणून आई बॉडी शिवायची व मोठ्या बहिणी ना पोटीमा पोट दिसणारे मग खूप रांग यायचा व वाईट वाटायचे आमच्या पुढच्या एक मावशी खूप हुशार होत्या त्या काय करायच्या सर्वात शेवटच्या दिवशी हळदीकुंकू करायच्या का नंतर कळले सर्व मिळालेल्या गोष्टी चिठ्या ठेऊन त्या ठेवायच्या मस्त आयडिया ना?
ReplyDeleteती सुगडी तर किती मस्त असायची
अग बाई , असे पण करतात का लोक 🙄😨😳? आमच्याकडे फक्त या एकाच वर्षी केले होते हो असे , कारणही दिले आहेत लेखात . असो. सुगडी मला पण आवडतात , पण आमच्या प्रथा नव्हती . मनःपूर्वक धन्यवाद , हे तुमचे छान छान अनुभव शेअर केल्याबद्दल !🙏😀😇
Deleteमला वाटत तु अजुन दुसर ही लिहायला घे खुप छान लिहितेस ��
ReplyDeleteआनंदी पाऊस ही मस्त आहे
हो अग, बाकीही बरेच लिखाण झालेय पण वेळे अभावी मला ब्लॉग वर प्रकाशित करणे कठीण होत आहे पण लवकरच ते सुद्धा तुम्हा सगळ्यांना वाचायला मिळेल 😍😊
Deleteखुप छान. लहानपणी चर्या आठवणी जाग्या झाल्या. वाचन खुप छान होते. कुठे हळदी कुंकू ला गेले की त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही
ReplyDeleteखरंच कायम येण्यासारखीच आठवण आहे ही आपली ! 😍🤩😇
DeleteWa chan👌varnan
ReplyDeleteKateri halwa ghari banavine navinach mazhasathi tyache varnan chan ani ti kothimbirchi judi ani tyacha flowerpot sathi upayog chan idea...
काटेरी हलवा ! आम्ही त्याबाबतीत भाग्यवान होतो बघायला आणि करायलाही संधी मिळाली होती ! आणि कोथिंबीर जुडी सुद्धा माझ्या आवडीची पुष्प रचना !सप्रेम धन्यवाद !!😍🤩
DeleteMast lihiles sagle khshan ase najresamor ubhe rahile
ReplyDeleteखूप सारे सप्रेम धन्यवाद !!😍🙏
Deleteमस्तच आहे. लेख
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏
Deleteखूप छान लेख आहे वर्षा ताई तुझी RAM खूप strong आहे. Vilas Kinge
ReplyDelete😄मनःपूर्वक धन्यवाद 🙏!!!
Deleteवा..खूप छान.. तुमच्यासारख्या उत्साही चुणचुणीत मुली घरी असल्याने मम्मी-काकूंना पण खूप मजा येत असेल हळदीकुंकवाचे कार्यक्रम करायला..
ReplyDeleteचला तू तरी आम्हाला चुणचुणीत मुली म्हणालीस, भरून पावले मी! 😄😉
DeleteKhupch of Chan
ReplyDeleteAgadi shaj bolatoy ase lihiley tyamule te bhavte
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteतुला सर्व प्राणी आठवतात का पण तेव्हा फार मजा आली होती
ReplyDeleteहो आठवतात की , बघ सगळे आलेत की नाही , काही राहिले असेल तर सांग . 😀🤩
DeleteVava khupach chan
ReplyDeletePan mi kadhi pahila nahiye halwa kasa banavtat te
Mi aali aani sagli maja karaychi ti sodun dili tumhi lokanni
सगळे थांबवावेच लागले कारण....
Deleteहमारे घर आयी थी एक नन्हीसी परी..... 😄😍😇
Tilgul sarkhach god god lekha aahe mast ����sarv van chi mahiti pan sunder ����
ReplyDeleteअणि तुझ्या शुभेच्छाही नेहमीच अशाच गोड गोड असतात 😍😊
DeleteWow mastach vatle vachun
ReplyDeleteMe karach te samor chale ahe as imagine karat hote.Khup chaan.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏!!! कोण आपण?
Deleteमस्त आहे
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !🤩🙏
Deleteमी तर असं कधी काही बघितलं च नाही
ReplyDeleteNice writeup😍😍
भूमीनेच हे सगळे कधी बघितले नाही तर तू कुठून बघणार ?😔
Deleteanyways very very happy to c u here ! i must say thnk u to this lockdown 😂😆
tons of love bachcha !!!🤩😍❤🥰
तुझा प्रत्येक लेख म्हणजे आम्हाला लहानपणीच्या आठवणीत डुंबायला एक मस्त चान्स मिळतो. मला बहीण नसल्यामुळे हळदी कुंकवाची धावपळ मला आणी माझ्या भावाला अशीच करावी लागायची. पण तुमचं सगळच जायंट स्केल वर होत असल्यामुळे आणी तुमच्या सारख्या उत्साही मुली हाताशी असल्यामुळे तुमच्याकडे छान धम्माल होत असणार. हलवा करायला केवढी मेहेनत करायचे तुम्ही लोक. त्यांच्या patience la खरच salaam.
ReplyDeleteवाण देण्यासाठी चिठ्ठी टाकायची आयडिया त्या काळी तर एकदम मॉडर्न अँड novel होती. एकंदरीत हळदी कुंकू हा बायकांचा सण असल्यामुळे आणी आम्हाला त्यात प्रवेश नसल्यामुळे, तुझ्यामुळे सगळे सोहोळे आणी त्याची तयारी याची बित्तंबात खबर मिळते आहे त्याबद्दल आभार. तुझी स्मरणशक्ती आणी बारीक बारीक डिटेल्सची मांडणी अगदी थक्क करणारी आहे. तुझ्या मेहनतीला पण सलाम... 🙏🙏🙏🙏🙏
माझ्यासोबत वाचकांना सुद्धा त्यांच्या बालपणात छान रमता यावे हा तर मुख्य हेतू या सगळ्या प्रपंचामागचा ! जेव्हा-जेव्हा असे कोणी सांगते तेव्हा तर मला फारच आनंद होतो ! तुम्हाला खरं पाहता माझा patience काही नाही , चांगलाच अनुभव आहे की त्याचा . हे मात्र बरोब्बर ! पुरुषांनाही या निमित्ताने अशा काही सणावारांची छान माहिती मिळतेय या ब्लॉग च्या माध्यमातून😆😂😉 खूप सारे धन्यवाद !!!🤩😇🙏
DeleteYou should have been a film director ..you would have done a great job creating ditto scenes, ditto characters and extremely apt dialogues and expressions between the characters
ReplyDeleteYour consistency in releasing your article every Friday is something I highly respect.. I have never been so consistent in writing with such discipline��
बापरे खूपच जास्त आहे . आणि नियमितपणा मला आवडतो आणि माझ्या जगण्याचा एक भाग आहे ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏😀
DeleteApratim lihilay nehami pramanech... pramparik haladi kumkum ani sankrati chi aathvan karun dilis... Thank you��
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद प्राजक्ता !🙏🤩
Deleteवा... खूपच छान लेख आहे.
ReplyDeleteतुम्ही आमच्या हळदी कुंकवाच्या सोहळ्यात सामील झाल्याने खूपच आनंद झाला🤩 ! धन्यवाद !!🙏😍
DeleteKhupach chhan..junya haladi kunkuchya aylthwani tazya zalya..aani aata ya haladi kunkuche swaroop kiti paltale aahe he lakshyat sale..
ReplyDeleteखरच , हळदी कुंकूच नाही तर प्रत्येक गोष्ट बदलली आहे आता. त्या त्या काळानुसार चांगल्या वाईट गोष्टी आहेत.
Deleteआत्ता तरी काही वेळ तरी बालपणीच्या आठवणीत रमुन जाउन तो आनंद लुटुया 😍😊💃💃
संक्रांतीचे हळदीकुंकू आई लेख छान आहे... हा हलवा करायला किती स्वच्छता लागायची शेगडी मध्ये कोळसा चे मोठ्यांनी टाकायचा����
ReplyDeleteतुमच्या या लेखामुळे माझ्या आठवणी जागृत झाल्या ...छान����������������
सगळ्यात आधी खुप सारे धन्यवाद!
Deleteहलवा, आठवण आली की लगेच करुन बघावासा वाटतो..
पण सामुग्री अभावी शक्य होत नाही...
Chan, amhi pan ekda chiththi keli hoti.
ReplyDeleteअरे व्वा! तुम्ही पण आमच्या सारखे चिठ्ठी वालेच की !
Deleteछान छान 😇💃💃
खरंच तुमचे लेख खूपच सुंदर असतात अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात असे वाटते आत्ताच तर करत होतो आपण हे सगळं आणि माझ्या बहिणी
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद त्याबद्दल !
Deleteसंक्रांतीचे हळदीकुंकू खूप छान झाले . चिठ्ठी काढून वाण द्यायचा मजेशीर कार्यक्रम त्यावेळेस . लीला ताई वानखेडे
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !
Deletekhoopach Chan zalay, सारेच काही अदबीने मांडलय.. सर्व सणातील हळदी कुंकू काही. औरच..liked that chitthi uchaloon van lutne..It's like Secret Sankrant...
ReplyDeleteखरंय आईने हळदीकुंकू ठरवले की आम्हा मुलींच्यात पण खूप आनंद संचारत असे , आणि सगळी शक्य ती आणि झेपेल ती मदत करायला आवडे खुप !😍🤩
Deleteमस्तच जमलाय लेख. खूप छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeleteYour maximum articles always takes me back to my childhood....great efforts
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!!🙏🙏😇
Deleteगेले ते दिवस ... तू करच लेखक आहे ..वाचायला चांगल वाटत..
ReplyDeleteलेखक वगैरे काही नाही ! जे पूर्वी घडून गेले आहे ते आठवून तसेच्या तसे शब्दात मांडले आहे . सप्रेम धन्यवाद !😇🙏😊
Deleteमि लाहान असताना हलवा बनवला आहे
ReplyDeleteकाटे केव्हा येतिल याची वाट बघायची
मला सुद्धा लाहानपण चि आठवण झाली
लेख खूप मस्त्
खरंय काटे यायची खूप वाट बघावी लागते ! पण एकदा का आले की मग तो क्षण आणि आनंद अगदी अवर्णनीय असतो !खूप सारे प्रेम !😍🤩😇
DeleteHaladi kunku v tilgul banvaychi mahiti khup chan aahe v van pan sunder v mast��sunder lihile aahes ��
ReplyDeleteसुंदर आठवणींचा सुंदर ठेवा !
DeleteKhupach chhan..haldi kunku chi idea mastach..Tula halwa yeto?..👍👍
ReplyDeleteहो , शाळेत असतांना निदान दोन तीन वेळा केलाय मी , अगदी सुरवाती पासुन शेवटपर्यंत ! फक्त पाक मम्मीने करून दिला होता . आता पाक करायला केली तर मी छान अगदी सुबक काटेरी हलवा नक्कीच करू शकेन . करायची इच्छा पण खूप आहे . केला की दाखवेन !😇🤩
Delete"आठवणीच्या देशात,आपण वर्णिलेली संक्रांत,'
ReplyDelete"जशी हळदकुंकूवाची संध्याकाळ न्हाहुन निघाली चांदण्याच्या प्रकाशात'.
"तिळवड्या,लाडू,वाण आणि काटेरी हलवा,'
असाच मिळावा आपल्या लिखाणातील माला कायमचा गोडवा".-स.न.वि.वि.संजिता
आपल्या सारखे गोड गोड वाचक आहेत ना त्यामुळे लिखाणात गोडवा आहे! खूप सारे सप्रेम धन्यवाद!
DeleteKhup mast
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Deleteआत्ताच गमतीजमती मधले हळदी कुंकू वाचले. आता हळदी कुंकू हे आमच्याकरता असले तरी हा काही आमचा प्रांत नाही. आणि तसेही अभिप्राय सर्व स्त्री वर्गाचेच आहेत, परंतु जसजसा व याचा आलेख वाढत जातो तसतसं शैशवाकडे उतरावेसेही वाटणे सहाजिक आहे. म्हणून कुतुहलाने तुझीही लहानपणची आठवण वाचावीशी वाटली. काकू घरी नसल्याने शब्दाला शब्द वाढण्याची भीतीही नव्हती. पण शब्द कुठेतरी खर्च झालेच पाहिजेत, म्हणून अभिप्रायालाच लक्ष्य केले, अन् टाकलं वाचून 'हळदी कुंकू' ! नेहमीप्रमाणे तू अगदी " आंखों देखा हाल" प्रमाणे शेगडी, सराटा, चूल, हलवा, रांगोळी वगैरेंचं सुंदर असं इत्यंभूत वर्णन केलं आहे.
ReplyDeleteआजच सकाळी संक्रांतीच्या तोंडावर आम्हालाही "किरण" चहा कडून पंचवीस रुपये वाढीव किमतीच्या बदल्यात सुबक असा छोटा चहाचा चमचा वाण म्हणून मिळाला! तसं तर अशा प्रकारची वाणं दुकानदार वर्षभर देतच असतात. असो.
हलव्याचे आणि तिळगुळ वड्यांचे फोटो पाहून त्या पदार्थांचे कौतुक करावे का फोटोग्राफीचे, समजेनासे झाले. पण तिळाचे लाडू बघून माझ्या दातांनाही "काटा" आला. अशाच एका संक्रांतीच्या लाडूने माझ्या एका दातावर संक्रांत आणली आहे. ते काही असो,
लाखो रुपयांची पदरमोड करून जेवढा स्नेह निर्माण होत नाही तेवढा संक्रांतीच्या २५ पैशांच्या तिळगुळाने होतो, हे खरं आहे की खोटं माहित नाही परंतु मळलेल्या वाटेपासून दूर जाताना मधून मधून बरसणाऱ्या या तुझ्या 'आनंदी पावसा'मुळे हिवाळ्यात ऊब येते तर उन्हाळ्यात गारवा वाटतो आणि मन उल्हसित होते एवढे मात्र खरे. मजकूर एडिट करायला स्वातंत्र्य आहे बरं! तुझ्या आनंदी पावसाचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. 🌹(नाना)
खुप छान छान लिहिले आहे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.तते लहान ससा, कासव,हत्ती व छोटे पिल्ले मस्त👌👌
ReplyDeleteहो पिल्ले एकदम मस्त!!
Deleteखुप छान आहेत या आठवणी. वाण आणि ते देण्याची पद्धत मस्तं. फोटोतले प्राणीही छान आहेत
ReplyDeleteमनःपूर्वक खुप खुप धन्यवाद!
Deleteमस्त����
ReplyDeleteआपल्याकडे अशी चिठ्ठ्या टाकून वाण उचलायचू पध्दत हेाती , हे मी विसरलेच होते��, तुमचा लेख वाचल्यावर आठवले.
परत नव्याने तशी गंमत करुन पहायला हरकत नाही. पण सध्या सगळ्यांना सारखेच द्यावे लागते, उगीच हलके-भारी वाटायला नको��