बाप्पा मोरया!
(घरातील गमती-जमती)
लाडका बाप्पा ! कशाचीही सुरुवात करायची म्हणजे आधी बाप्पा हवाच . आणि हरतालिकेच्या नंतरचा दिवस म्हणजे बाप्पाचा ! त्यामुळे त्यावर लिहिल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नाही . आमच्याकडे बाप्पाचा मुक्काम पूर्ण दहा दिवस असे , खरे तर सगळ्यांकडेच . पुण्या-मुंबईत आल्यावर कळले मला , बाप्पा काहींकडे दीड , तीन, पाच , सात दिवसच सुद्धा असतात . या सगळ्या प्रकारचे खूप आश्चर्यही वाटले . असो .
तेव्हा गणेशोत्सवाला इतके हिडीस रूप आलेले नव्हते . छान आनंदात पार पडणारा सण होता , अगदी सार्वजनिक सुद्धा ! बऱ्याच वर्षांपासून मी पहाते , ऐकते आहे , खूप दिवस आधी जाऊन गणपतीच्या मूर्तीचे आरक्षण करून ठेवावे लागते , आदल्याच दिवशी बाप्पाला घरी घेऊन यावे लागते . पण तेव्हा तसे काही नव्हते , त्याच दिवशी सरळ बाजारात जायचे आणि आवडेल ती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन यायची . तसेच तेव्हा बाप्पा घरी तयार करण्याचे सुद्धा प्रस्थ नव्हते . मध्ये गेले दोन वर्ष मी एका शाळेत , एका खास शिक्षकेचे काम केले , तेव्हा मात्र मी सुद्धा एक बाप्पा तयार केला होता मुलांसोबत . आता हा बाप्पा माझ्या घरातील माझ्या वयक्तिक संकलनाचा एक भाग झालाय ! घरघुती बाप्पा शांतपणे घरी येत , तर सार्वजनिक बाप्पाच्या मिरवणुका असत . सकाळ पासूनच चौधरी सदनाच्या समोरच्या रस्त्यावरून मिरवणुका जाण्यास सुरवात होई . मग आमचा अख्खा दिवस मुक्काम गॅलरीतच या मिरवणूका बघण्यासाठी .
तेव्हा आम्ही फार लहान , त्यात तेव्हा घरघुती गणपतीच्या सजावटीची एव्हढी लहर नव्हती . आमच्याकडे एक छोटा लाकडी पाट करून घेतलेला होता . एक छोटा लाकडी देव्हारा भिंतीवर लावून घेतलेला होता , मोठ्या माणसांच्या डोळ्याच्या पातळीवर आणि त्याच भिंतीला लागून एक धान्याची लोखंडी , उंच कोठी ठेवलेली होती . बहुतेक गव्हाची असावी ही कोठी , कारण ही घरातील मोठ्ठी कोठी आणि गहू सगळ्यात जास्त लागत असे घरात . मग ह्या कोठीचा वरचा पृष्ठभाग टेबलाचे काम करी . आई पूजेच्या वेळी ताम्हण आणि तांब्या , त्यावरच ठेवीत असे आणि मग देवांची अंघोळ, या ताम्हणात होत असे . मग बाप्पांचा खास लाकडी पाट सुद्धा याच कोठीवर ठेवला जात असे आणि मग बाप्पा या पाटावर विराजमान होत असत . बाकी बाप्पाच्या मूर्तीबद्दल अगदी काहीच आठवत नाही . छोटीच असे मूर्ती . त्याबद्दल तेव्हा मात्र वाटे का अशी छान मोठ्ठी मूर्ती नाही आणत आपल्या घरी . आता मात्र अगदी विरुद्ध झालेय माझे , छोट्या-छोट्या गोड मुर्तीच जास्त आवडतात मला . मात्र आधी एक खात्री करून घ्यावी लागे , पुढच्या दहा दिवसात गहू तर लागणार नाहीत ना ? कारण पुढचे दहा दिवस कोठी उघडणे अगदीच शक्य नसे .
सकाळ , संध्याकाळ दिवसातून दोनदा बाप्पाची पूजा-आरती होत असे . आरती म्हणजे फक्त गणपतीची नाही , तर सोबत सगळ्याच म्हणजे महादेवाची , विठ्ठलाची , देवीची अशा सगळ्या आरत्या म्हणत असू . तेव्हा पाठ केलेल्या सगळ्या आरत्या आजतागायत अगदी छान पाठ आहे ! नंतर प्रसाद कायमच खिरापतीचा . खिरापत म्हणजे किसलेलं सुकं खोबर आणि पिठी साखर एकत्र मिसळलेली . बाप्पा घरघुती असो की सार्वजनिक , प्रसाद एकच तो म्हणजे खिरापत ! माझ्या अगदी खूप आवडीचा अगदी आजतागायत . आजही जेवणानंतर काही गोड नसेल खायला , तर खिरापतही चालते म्हणण्यापेक्षा धावते मला !!!
सकाळ , संध्याकाळ दिवसातून दोनदा बाप्पाची पूजा-आरती होत असे . आरती म्हणजे फक्त गणपतीची नाही , तर सोबत सगळ्याच म्हणजे महादेवाची , विठ्ठलाची , देवीची अशा सगळ्या आरत्या म्हणत असू . तेव्हा पाठ केलेल्या सगळ्या आरत्या आजतागायत अगदी छान पाठ आहे ! नंतर प्रसाद कायमच खिरापतीचा . खिरापत म्हणजे किसलेलं सुकं खोबर आणि पिठी साखर एकत्र मिसळलेली . बाप्पा घरघुती असो की सार्वजनिक , प्रसाद एकच तो म्हणजे खिरापत ! माझ्या अगदी खूप आवडीचा अगदी आजतागायत . आजही जेवणानंतर काही गोड नसेल खायला , तर खिरापतही चालते म्हणण्यापेक्षा धावते मला !!!
घरातल्या बाप्पा व्यतिरिक्त , एक छान कार्यक्रम असे आमचा , तो म्हणजे सार्वजनिक बाप्पांच्या छान-छान आरास बघायला जाणे . अगदी गल्लोगल्ली नाही , पण बरेच सार्वजनिक बाप्पा असत आणि त्यांच्या सजावटीचा भाग म्हणून छान छान स्थिर किंवा चलीत देखावे केलेले असत . फार मजा वाटायची हे सगळे बघायला आणि चलीत आरासचे फारच आश्चर्य , नवल वाटे ! कसे हे सगळे हलतेय वगैरे . आणि आमच्या नव्या पेठेचा तर फार भव्य , खूप वेगळा आणि अद्वितीय देखावा असे . अक्षरशः रांगा लागत , मग त्या रांगेत उभं राहावे लागे , तो देखावा बघण्यासाठी . आम्ही मुलं खूप लहान तेव्हा . त्यामुळे आमच्या गतीने आणि आम्ही गर्दीत हरवू नये म्हणून आम्हाला सांभाळत जाणे म्हणजे सोप्पे काम नव्हते . भरपूर वेळ लागे चालायला , त्यातच एखादा देखावा फार आवडला तर आम्ही तेथून हलायला तयार नसू . मग बऱ्याचदा एका दिवसात सगळे बाप्पा आणि देखावे बघून होणे शक्य नसे . मग हा कार्यक्रम दोन-तीन दिवस चाले . एकंदरीत खूप मज्जा येत असे . या सगळ्या गडबडीत एकदा आम्हा बहिणींपैकी कुणीतरी या गर्दीत थोडावेळ हरवून गेल्याचे पण अंधुक आठवते आहे . एक आणि आवडता भाग म्हणजे प्रसाद , खिरापत . मी तर कायम मनातल्या मनात कायम प्रार्थना करीत असे , जिथे आम्ही जाऊ तिथे नुकतीच आरती संपून प्रसाद वाटप सुरु असू दे ! म्हणजे आम्हाला हमखास प्रसाद मिळणार . पण एक अडचण येत असे आम्ही लहान त्यामुळे आमचे हातही लहान त्यामुळे प्रसादही अगदी थोडाच मिळे . तेव्हा तर मला वाटून जाई का मी मोठ्ठी नाही ? निव्वळ हात छोटा असल्याने प्रसादही थोडाच मिळतो . इतका मला आवडे तो खिरापतीला प्रसाद ! आणि आता हात मोठ्ठा आहे पण आता ही संधीच मिळत नाही . असो . पण हे दोन-तीन दिवस पाय चांगलेच दुखत एव्हढ्या सगळ्या पायपिटी नंतर .
मग बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस ! या दिवशीही सकाळ पासूनच विसर्जनाच्या मिरवणुका चौधरी सदनाच्या समोरच्या रस्त्यावरून जायला सुरुवात होत असे . मग याही दिवशी आमचा मुक्काम आमच्या लाडक्या गॅलरीतच असे . घरातल्या बाप्पाचेही विसर्जन असे . आमच्या बाबांचे (आजोबांचे ) एक मामे भाऊ(पंढरी नाना/मामा) होते . त्यांच्या घराच्या आवारात एक विहीर होती . त्यांचे घर पहिल्या मजल्यावर होते आणि वर जायला लाकडी जीना होता , एव्हढेच आठवते आहे आता . त्या इमारतींबद्दल आणि त्या आवाराबद्दल बाकी काहीच आठवत नाहीये . पण आत्ता वाटतेय त्या विहिरीचे पाणी वापरात नसावे म्हणून तिथे बाप्पाचे विसर्जन होत असावे . तर आम्ही सगळे , आमचा बाप्पा , कलश आणि घरातील सगळं निर्माल्य घेऊन तिथे जात असू . विसर्जनाचा दिवस असल्याने सगळ्याच रस्त्यांवर खूप गर्दी असे . खर तर ती गर्दी आजच्या मानाने पाच टक्केच असेल बहुतेक , पण तेव्हा ती सुद्धा खूप वाटे आणि अतिशय भीती वाटे मला त्या गर्दीची .
तिथे पोहोचल्यावर तिथे त्या विहिरीला असलेल्या गोलाकार कठड्यावर बाप्पांना ठेवले जात असे . मग तिथे शेवटची पूजा आणि आरती होत असे . नारळ फोडला जात असे . इतक्या वेळात तिथले आजूबाजूचे सगळेच या आरतीत सामील झालेले असत . मग या सगळ्यात खिरापत आणि फोडलेल्या नारळाचा प्रसाद वाटला जाई . सरते शेवटी बाप्पांचे विसर्जन त्या विहिरीत केले जात असे .
मग थोडा वेळ वर त्यांच्या घरी जात असू . तिथे लहान म्हणजे आमच्या वयाचे कुणी नव्हते . मग आम्ही आपले चुपचाप बसून राहत असू . त्यांच्या घराला रस्त्याच्या बाजूने गॅलरी होती , त्या गॅलरीत उभे राहून रस्त्यावरची गम्मत दिसत असे . मग आम्ही या गॅलरीत जाऊन उभे राहून रस्त्यावरची गम्मत बघत असू . तो पर्यंत घरात मोठ्या मंडळींच्या चहा पाणी आणि गप्पा टप्पा होत . मग थोडा वेळाने आम्ही परत घराच्या वाटेला लागत असू . घरी पोहोचल्यावर परत उरलेला वेळ गॅलरीतून विसर्जनाच्या मिरवणुका बघण्यात जात असे .
©आनंदी पाऊस
घरातील गमती जमती
८ सप्टेंबर २०१९
माझ्या व्यक्तिगत संकलनातील
काही बाप्पा !!!
हा बाप्पा अगदी गेल्या वाढदिवसाला
भेट मिळालाय
सार्वजनीक गणपती
सार्वजनीक गणपती
गणपती बाप्पा मोरया,🙏
ReplyDeleteगजानना श्री गणराया , आधी वंदू तुज मोरया ...... 🙏🙏🌸🌸
Deleteखुप छान
ReplyDeleteबाप्पाचे आशीर्वाद !🙏🙏🙏😇
Deleteवाचला मस्त�� पूर्वी किती मजा होती व छोटया छोट्या गोष्टी न मध्ये समाधान मधल्या काळात मोठं मोठया मुर्ती त्या पाण्यात विरघळत पण नसत आता इकोफ्रेंडली पण येतात
ReplyDeleteखिरापत �� सुखखोबर किंवा मग पंचखाद्य असे
आज सारखा डामदौल नव्हता
आरास पण फुल व पान
खरंय अगदी , आजच्या सारखा डामडौल , तामझाम काहीही नव्हते पण खूप सारे समाधान ......... 🤩😇🙏
Deleteगणपती बाप्पा मोरया मस्त
ReplyDeleteबाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ........ 👏🏻👏🏻👏🏻
DeleteWa chan varnan Ganpati bappa moraya🙏
ReplyDeleteKhirapat 😋
बाप्पा आणि खिरापत हे एक समीकरणच आहे ! गणपती बाप्पा मोरया !!!!👏🏻👏🏻👏🏻
DeleteGanapati Bappa chi mahiti yekadam zakas ���� chanch lihile aahes����
ReplyDeleteजय देव जय देव जय मंगल मूर्ती ...... 👏🏻👏🏻👏🏻🌸🌸🌸
Deleteलहानपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा...... मस्तच !!! गणपती बाप्पा मोरया!!! Eternal favourite!
ReplyDeleteबाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ........ 👏🏻👏🏻👏🏻
Deleteएका साध्या सोप्या आणि घरोघरी साजरा होणार्या उत्सवाला तू छान रंजक फोडणी देऊन एक रंजक माहितीपट तयार केला आहेस. बारीक सारीक detailing baddal आता तुझ पुनःपुन्हा कौतुक करण्यात अर्थ नाही कारण आता तुझ्या लेखांची ती एव्हांना speciality झाली आहे. एकंदरीत तो उत्सव एका लहान मुलीच्या नजरेतून कसा होता त्याची कल्पना ह्या ब्लॉग वरुन येते. छोट्या हातांनी मिळणारा कमी प्रसाद ही व्यथा खरच भावली. शिवाय त्या gavachya डब्यावर मूर्ती ठेवण्या आधी केलेल्या गव्हाच्या use च्या प्लॅनिंग chi पण आयडिया आवडली. तुझ्या व्यक्तिगत संकलनाचे बाप्पा पण आवडले.
ReplyDeleteगणपति बाप्पा मोरया
बाप्पाचे आपल्यावरील प्रेम आणि आपले बाप्पावरील प्रेम या गोष्टींमुळे सगळेच सर्वांग सुंदर होऊन जाते !!!🙏🙏🙏😇😇😇🤩
Deleteअतिशय सुंदर लेख ��������
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद ! बाप्पाची कृपा !🙏🙏🌸
DeleteTai, tujhe saglech blogs chan astat, ekdam flashback madhe jaun aalya sarkha vatata, keep it up, 👍
ReplyDeleteNikhil Mahajan
मनःपूर्वक धन्यवाद ! तुम्हा सगळ्यांचे प्रेम🤩 आणि बाप्पाची आशीर्वाद !🙏😇
Deleteमस्त गणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteप्रथम तुला वंदितो कृपाळा , गजानना गणराया.......🙏🌸
DeleteMast lihile aahe
ReplyDeleteMe vastralankar var nana barobar jaun baghitaleli miravanuk aathavali
वस्त्रालंकार वर जाऊन बाप्पाची मिरवणूक एकदा अंधुक पाहिल्याची आठवण आहे माझी . पण मला फारच भीती वाटते गर्दीची😥😨 . त्यामुळे आपली गॅलरी सगळ्यात मस्त 😇🤩!
Deleteईतक्या दिवसा नंतरहि पंढरि नाना वत्याचे घर आठवते म्हणजे कौतुकास्पद च आहे झकास
ReplyDelete😇 daaa m blessed soul !!! त्यामुळे हे सगळे काय काय अगदी स्पष्ट आठवतेय मला !🤩😍
DeleteGod is always present in small things and descriptions
ReplyDeleteyesss ! u said it ! 😇🤩
DeleteKKHUPACH CHHAN VARNAN JUNE TE SONE
ReplyDeleteछान वाटले तुला आज इकडे भेटून ,अजय , मनःपूर्वक धन्यवाद !
DeleteSurekh, Ganashchaturhiche te magalmay divas aathavle. Khup dhamal yaychi. Ata ti majja rahili nahi. But Bappa is Bappa. Ganapati Bappa Morya. ����
ReplyDeleteखरंय , मंगलमय दिवसांच्या , मंगलमय आठवणी ! गणपती बाप्पा मोरया !!!
Deleteखूप छान लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या गणपती बाप्पा मोरया������������
ReplyDeleteगणपती बाप्पा मोरया ! खुप सारे सप्रेम धन्यवाद !
DeleteKhup chan. Amhihi amchya lahanpani ganpati basvaycho. Khup majja yaych. Kharach khup miss krtoy te divas. Ata tshi majja yet nahi.
ReplyDeleteखरंय , बालपण आणि त्यातील कितीतरी छान छान गोष्टी हरवून गेल्यात काळाच्या ओघात . कधी कधी वाटून जाते येतील का ते दिवस परत ? पण ते शक्य नाही . त्यांची शिदोरी जवळ ठेवायची , जगण्याचे बळ निश्चितच मिळते त्यातून !! सप्रेम धन्यवाद !
Deleteआणि गणपतीचा लेख म्हणाल तर गणपतीविषयी किती पण लिहिलं तरी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना असतात गणपती हा प्रत्येकाच्या मनात वेगळे चित्र रेखाटन श्री हा a to z पर्यंत काल्पनिक रित्या वाटलेला आहे
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद !!🙏🙏
Deleteखुप छान लहाणपणीच्या आठवणी नव्याने आठवल्या खुप छान दिवस होते ते.गणपती बप्पा मोरया🙏🙏🌺🌺
ReplyDeleteखरंय , तेव्हा गणपती म्हणजे खरचंच मंगल आणि पवित्र सण होता ! खूप छान सण आणि खूप छान आठवणी ! मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteगणपती बाप्पांचे संकलनातील विविध "रूपं पाहता लोचनी होतयं. लहानपणीच्या आठवणी ,खिरापत,बाल्कनीतून आंनंद देणारी मिरवणूक, हे सारे खूपच कमाल. हलणारे देखावेवआरास फारच आवडली. (Especially गणपतीच्या सोंडेतून अलगद येणारा लाडू अजूनही आवडतो.)गणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteआदरणीय ताईसाहेब नमस्कार
ReplyDeleteआपण लिहिले गणरायाचे वर्णन लहानपणी खिरापत (प्रसाद) मिळवण्यासाठीची धावपळ प्रसाद कमी मिळाल्या मुळे होणारे दुःख अशी विविधता खरच बालपणीच्या आठवणीत रमल्या सारखे वाटले जुन्या आठवणी ताज्या झाली त्या वेळी आम्ही स्वतः गणरायाचे स्टेज बांबू लाकडी बल्या नारळाच्या दो-यानी बांधत असोत गणपती बसवायचा म्हणजे जवळ पास आमचा पुर्ण महिनाच जात असे वर्गणी मागण त्यावेळी आम्हाला 11, 21 रुपये वर्गणी देणारे एक दोन लोकच होती त्या मुळे सर्व प्रथम आम्ही त्याच्या कडे आग्रह करायचो मागे इतके दिले आता थोडे जास्त द्या अशा एक न अनेक गंमती जमती डोळ्यासमोर आपल्या लिखाण वाचल्यामुळे समोर आल्या अस वाटल आपण का मोठे लवकर झालो अजुन लहान पणच हवे होते
आपले आभार व धन्यवाद आपल्या लिखाणा मुळेच बालपणीची एक सहल घडली🙏
वाढदिवसाची भेट अप्रतिम आहे बाप्पाचा आनंद असाच तुम्हाला कायम मिळो👌🏼💐
ReplyDelete