Skip to main content

इतर गमती जमती (गॅलरीतील गमती जमती)

इतर गमती जमती 
(गॅलरीतील गमती जमती)

                                                                     चौधरी सदनाच्या समोर एका बाजूला कडुलिंब आणि दुसऱ्या बाजूला असलेले पिंपळाचे झाडं इतकी उंच होती की पार गच्चीच्यावर पर्यंत वाढलेली होती . त्यामुळे काही फांद्या गॅलरीच्या अगदी आत येत असत . कडुलिंबाच्या झाडाला साधारणपणे गुढीपाडव्याच्या आसपास नवीन पालवी फुटते . ही कोवळी-कोवळी पानं , त्यांचा आकार , रंग सगळेच खूपच छान असते . मला या कोवळ्या पानांचा रंग फार आवडतो ! आपल्याकडे पाडव्याच्या दिवशी ह्या झाडाची पानं खावी , हे शात्रच आहे . त्यादिवशी तर आम्ही ही पानं खाताच असू , पण जोपर्यंत ही कोवळी पानं झाडावर असत आणि आमचा हात पोहोचत असे , तोपर्यंत आम्ही ही पानं खातच असू ! 
                                                                    दुसऱ्या बाजूचे पिंपळाचे झाड सुद्धा असेच उंच आणि डेरेदार होते . पिंपळाची कोवळी पानं रंग-रूपाने तर कडुलिंबाच्या पानांपेक्षा कैक पटीने गोड दिसतात . आजतागायत मला ही पानं पण फार आवडतात . मग ही कोवळी कोवळी , लाल रंगाची एक वेगळीच छटा असलेली पानं , आम्ही झाडाची तोडून आमच्या पुस्तकांत ठेवत असू . एकेका वही-पुस्तकांत कितीतरी पानं असत ठेवलेली आमच्या ! या पानांची जाळी पडली , की फारच भारी दिसते हे जाळीदार पान . हल्ली बरेच कलाकार लोक या जाळीदार पानावर छान छान चित्र रंगवतात . तर काही कलाकार लोक या पानाचा काही भाग कापून काढून त्यातून छान चित्र निर्माण करतात . मी मात्र यातले काहीही करून पहिले नाही आजपर्यंत . 
                                                                                                                    --------------------------------------------------
                                                                    काही वेळा एखाद्या संध्याकाळी लहर आली , ऐनवेळी घरात जेवायचा कंटाळा आला आणि शक्यही असेल , तर अशा वेळी मग आम्ही या गॅलरीत जेवण करत असू . गॅलरीची रुंदी तशी फारच कमी आहे . त्यामुळे तिथे सगळ्यांनी जेवायला बसणे अजिबातच सोयीचे नसे . पण या गॅलरीत उघडणाऱ्या दारापाशी , अर्धी मंडळी गॅलरीत आणि अर्धी मंडळी दाराच्या आत घरात , असे बसून एक वेडावाकडा गोल करून बसून जेवण करत असू . सगळे एकमेकांना नीट दिसत नसत , वाढायला सुद्धा फार त्रास पडे . बेतही ठरलेला नसे ,त्यामुळे जो काय बेत शक्य असे , तोच केला जात असे . कधीतरी ठरवून चटणी-भाकरी , ठेचा-भाकरी असे बेत सुद्धा केले जात किंवा असा बेत ज्या दिवशी ठरलेला असे त्या दिवशीच आम्ही गॅलरीत जेवण करायचे ठरवत असू . फार पळापळ किंवा गडबड सुद्धा होत नसे , काही विसरले आणायचे तर लगेच उठून घेता येत असे , वर-खाली चढ-उतर करायची गरज नसे . जेवणं आटोपली की आवरायला सुद्धा सोप्पे , सगळे उचलून स्वयंपाक घरात नेवून ठेवले की झाले . पण एक वेगळीच मज्जा येत असे या संध्याकाळी सुद्धा !
                                                                                                                   ------------------------------------------------------
                                                                   चौधरी सदन आणि रस्ता या मध्ये  थोडी जागा , त्या जागेतच ही दोन झाडं होती . ह्या जागेत माती होती आणि या दोन झाडांची छान दाट , गर्द सावली असे . मग या सावलीत कधी गारुडी येत असे , झाकणाच्या टोपलीत नाग घेऊन आणि सोबत त्याची पुंगी घेऊन . मग  पुंगी वाजवून , तिच्या तालावर नागाला डोलवत असे . कधी मदारी सुद्धा येत असे , माकडं किंवा अस्वलं घेऊन . सोबत आणलेला छोटा डमरू वाजवून त्यांचे निरनिराळे खेळ दाखवत असत . कधी डोंबारी सुद्धा येत असे . मग तो स्वतः , त्याची बायको , मुलगा , मुलगी , सगळेच वेगवेगळ्या कसरती , करामती करून दाखवत . हे खेळ बघतांना फारच आश्चर्यचकीत तर होतच असे मी , पण भीती सुद्धा वाटायची . त्या उंच बारीक तारेवर चालता चालता ती मुलगी पडून गेली तर , त्या लोखंडी गोल रिंग मध्ये तशीच अडकून गेली तर , अशा एक ना अनेक भीती असायच्या मनात , डोंबाऱ्याचे खेळ बघता बघता . पण छान रंगायचे हे खेळ या दोन्ही झाडांच्या सावलीत ! हळू-हळू करत खूप लोकं जमत असत हे खेळ बघायला . आम्हालाही गॅलरीत बसल्या बसल्या किंवा उभे राहून ही सगळी गम्मत दिसत असे . मग सगळे खेळ झाल्यावर ही लोकं , एक टोपली घेऊन त्यांचे खेळ बघायला जमलेल्या सगळ्या लोकांतून फिरवत असतं . मग कुणी त्यात पाच पैसे , कुणी दहा पैसे , तर कुणी चार आणे किंवा आठ आणे सुद्धा टाकत त्या टोपलीत . त्यांचे लक्ष असेच , आम्ही वरूनच हा सगळा खेळ बघतोय , मग तो थोडं इमारती जवळ येऊन वर आमच्या कडे बघून सुद्धा ती टोपली पुढे करत असे . प्रत्येक वेळेला नाही पण कधी कधी मम्मी आमच्यापैकी कुणाला तरी एखाद नाणं देत असे , मग आम्ही ते वरूनच टाकत असू . पण ही मंडळी बरोब्बर त्या टोपलीत झेलून घेत ते नाणं ! ही एक वेगळीच दुनिया होती मनोरंजनाची !!! आता तर कुठेच बघायला मिळत नाही . 
                                                                                                                       ----------------------------------------------
                                                               महिन्यातून एका रविवारी आमच्या या गॅलरीत  एक खास कार्यक्रम पार पडत असे . घरात बरीच पुरुष मंडळी होती तेव्हा . मग या सगळ्यांचे केस कापायला आमचे बंडू न्हावी येत असत ! चांगलेच उंचपुरे , पांढरे धोतर , पांढरा लांब सदरा आणि काळी टोपी , सोबत त्यांची एक खास लोखंडी   पेटी घेऊन ! ती पेटी म्हणजे नेहमी सारखी पेटी पण त्याचे झाकण म्हणजे षट्कोनाचा अर्धा भाग आणि त्या झाकणाला मध्यभागी एक मूठ होती . त्या मुठीत हाताची बोटं घालून ती पकडून , ती पेटी उचलून घेता येत असे . बरीच जड असावी बहुतेक ती पेटी , नक्की माहिती नाही कारण कधी ती पेटी उचलून बघण्याची संधी नाही मिळाली . ही पेटी उघडली की एक आगळा वेगळाच खजिना बघायला मिळत असे . त्यात वेगवेगळे कंगवे , कात्र्या , वस्तरे , दाढीचा ब्रश , गोलाकार डबीत गोलाकार दाढीचा साबण , अशा एक ना अनेक प्रकारच्या गोष्टी एका विशिष्ट प्रकारे रचून ठेवलेल्या असत . प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे कप्पे होते . त्या-त्या कप्प्यात ती-ती गोष्ट ठेवलेली असे . हे सगळे बघायला फारच भारी वाटे ! अर्थातच आम्हाला त्या पेटीला हात लावायची मुभा नव्हती . लांबूनच बघता येत असे . 
                                                              आमच्याकडच्या जेवणाच्या लाकडी खुर्च्यांमध्ये एकच खुर्ची बाकी खुर्च्यांपेक्षा जरा उंच होती . मग तीचे नावच पडले "उंच खुर्ची" ! ही उंच खुर्ची या रविवारी गॅलरीत येत असे . त्यांना केस कापायला सोप्पे जात असावे बहुतेक या खुर्ची मुळे म्हणून तिचाच वापर होत असावा . मग घरातील एक-एक पुरुष त्या खुर्चीवर बसत आणि मग ते त्यांच्या अंगावर एक पांढरे स्वच्छ कापड सगळ्या बाजूने नीट गुंडाळून टाकत असत . हे कापड सुद्धा त्याच्या त्या पेटीतच ठेवलेले असे . हे कापड असे अंगावर सगळ्या बाजूने गुंडाळून टाकल्याने कापलेले केस या अंगावर न पडता , या कापडावर पडत . आणि केस कापून झाले की हे कापड झटकून टाकले की झाले . पुढच्या व्यक्तीच्या अंगावर हेच , झटकून स्वच्छ केलेले कापड टाकले जात असे . मग अशाच प्रकारे सगळ्या पुरुषांचे केस कापून होत . आम्ही लहान होतो तोपर्यंत आमचे सुद्धा केस हेच कापून देत . आम्हाला त्या खुर्चीत बसवून , त्यांना आमचे केस कापणे सोयीचे होत नसे . आमच्या घरात जेवायला टेबल-खुर्च्या असल्या तरी , लाकडाचे बरेच पाट तयार करून घेतलेले होते . काही खास कारणांनी घरात भरपूर मंडळी येत असत जेवायला . मग त्या वेळी जमिनीवर हे पाट ठेवून त्यावर जेवायला पंगती बसत . तर यापैकी एक पाट आणून तो उलटा करून खुर्चीच्या हातावर ठेवला जात असे आणि मग या पाटावर आम्हाला बसवले जाई केस कापण्यासाठी . नंतर हळू हळू आमची मम्मीच शिकली केस कापायला , मग तीच आमचे केस कापून देई छानसे ! मग सगळ्यांचे केस कापून झालं की तेच सगळे केस झाडून , गॅलरी स्वच्छ करून ठेवत असत . परत ते त्यांची सगळी हत्यारं नीट परत जशीच्या तशी त्यांच्या त्या पेटीत भरून ठेवत . तेव्हा सुद्धा आमची  लुडबुड चाले ते बघायला , शक्य झालं तर हात लावायला . पण कोणाकोणाचे लक्ष असेच आमच्यावर . मग ओरडा खावा लागे आणि तिथून बाजूला होण्यास सांगितले जाई . मग त्यांचे सगळे आवरले की हिशोब करून  पैसे घेऊन मार्गस्थ होत असत .                  
                                                                                                                      -------------------------------------------------
                                                               उन्हाळ्यात काही वेळा म्हणजे साधारण परीक्षा संपेपर्यंत , रात्री गॅलरीत  झोपत असू . तो जो गोलाकार कोपरा दिसतो ना गॅलरीचा , त्या गोलाकारात गादी नीट घालता येत नसे . मग या गोलाकारात आमचा पिण्याचा पाण्याचा तांब्या किंवा छोटेसे मडके ठेवले जात असे ! याच्या एका बाजूला आमच्या लाडक्या काकाची गादी आणि दुसऱ्या बाजूला आमची गादी , ज्यावर मी आणि माझी मोठी बहीण झोपत असू .त्यानंतर च्या गादीवर लहान बहीण आणि भाऊ ! मग रात्री बसल्या-बसल्या किंवा पडल्या-पडल्या काकाच्या आणि आमच्या गप्पागोष्टी चालत . सहसा पडल्या-पडल्या आणि अगदी बारीक आवाजात . याचे मुख्य कारण म्हणजे मम्मीला समजू नये , की आम्ही झोपायच्या ऐवजी गप्पा गोष्टी करतोय . बसून गप्पा गोष्टी केल्या म्हणजे तिच्या आयतेच लक्षात आणून दिल्यासारखे होणार . पण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिला नीट माहितीचे होते हे सगळे ! मग ती झोपायच्या आधी दोन-तीन वेळा चक्कर मारून जात असे आणि आम्हाला सांगत असे , झोपा लवकर सकाळी शाळा आहे ..... 
                                                                                                                        ----------------------------------------------------
                                                                आमचा काका त्या काळात छान कॅटी किंवा गलोल बनवत असे . झाडाची इंग्रजी वाय अक्षराच्या आकाराची काडी घ्यायची . त्याच्या वरच्या दोन टोकांना , सायकलच्या ट्यूबच्या रबराचा एक तुकडा कापून बांधायचा की झाली कॅटी तय्यार ! मग या रबराच्या मध्यभागी एक छोटा दगड ठेवून , डाव्या हाताने ती काडी घट्ट धरायची आणि उजव्या हाताने हा दगड शक्य तितका आपल्या बाजूला ताणून धरायचा त्या रबरासहीत आणि एकदम सोडायचा नेम धरून . एकदम लांबवर उडतो हा दगड आणि जोरात लागतो लक्षावर . एखादा छोटा पक्षी वगैरे सहजच मारू शकतो . मग गॅलरीत उभे राहून हा एक उद्योग चाले काही वेळा . अर्थातच आमचा काही नेम वगैरे लागतच नसे , काकाचा मात्र एकदम बरोब्बर लागत असे ! कधी त्याचे मित्र सुद्धा असत सोबतीला . 
                                                               आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो . मग त्याच्या मित्रांना प्रत्येक वेळा इतके मजले चढून येण्याचा कंटाळा येत असे . पण यांची सगळ्यांची एक मजेशीर भाषा होती . त्याचे मित्र खालूनच , तोंडाने टॉक-टॉक आवाज करत .जीभ तोंडात टाळूवर घट्ट धरायची आणि मग एकदम सोडायची , म्हणजे मग असा आवाज येतो .  हा घरात कुठेही असो याला बरोब्बर ऐकू येत असे आणि हा धावत गॅलरीत हजर होत असे . मग हा पण तसेच आवाज करून त्यांना काही सांगत असे , सगळे संभाषण त्यांचे याच भाषेत चाले ! मला तर फारच आश्चर्य आणि मजा पण वाटायची या सगळ्या प्रकारची . तसेच काहीसे वाटते मला , आता सुद्धा नवीन पिढीचे शॉर्टकट मध्ये टायपिंग करून केलेल्या चाटींगचे . अगदी ओ की ठो कळत नाही त्यातले सुद्धा !
                                                                                                                         
आनंदी पाऊस 
(गॅलरीतील गमती जमती) 
२९ सप्टेंबर २०१९


कडू निंबाचे झाड 



कडू निंबाची फुलं 



कडू निंबाची कोवळी पानं 



पिंपळाचे झाड 


पिंपळाची कोवळी पानं 



डोंबाऱ्याचे खेळ 



डोंबाऱ्याचे खेळ 



गारुडी 



गारुड्याच्या टोपलीतील नाग 



मदारी 
अस्वलाचे खेळ 



मदारी 
माकडाचे खेळ 



मदारी माकडाचे खेळ 


न्हाव्यांची लोखंडी पेटी 



पेटीतील सामान 



पेटीतील सामान 


आमचे बंडू न्हावी 



गलोल 


लाडका काका आणि मित्र मंडळी (तेव्हा)



लाडका काका आणि मित्र मंडळी (आता )







Comments

  1. Wa mast..agadi hubehub dolyasamor ubhe rahile sarw..mastach

    ReplyDelete
    Replies
    1. मनिषा , मस्तच लिंक मिळाली कि लगेच वाचून अभिप्राय देतेस , खूप सारे धन्यवाद ! 😍🤩🙏

      Delete
  2. मस्त खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद !🙏 कोण आपण ?

      Delete
  3. शीतल काळेMarch 06, 2020 10:19 pm

    खूप छान वर्णन. बालपणी चे दिवस आठवले

    ReplyDelete
    Replies
    1. काकू सगळ्यात आधी तुमचे सप्रेम स्वागत या चौधरी सदनात🙏 ! खूप आनंद झाला तुम्हाला इकडे बघून ! 🤩😍अगदी मनापासून धन्यवाद !🙏

      Delete
  4. निलिमा झोपेMarch 06, 2020 10:20 pm

    Farach chan khup aawade sarv varan vachun mastch lihile aahes ��������

    ReplyDelete
  5. स्वाती प्रभुणेMarch 06, 2020 10:22 pm

    मस्तच झाला आहे लेख आता माकडांचे अणि अस्वल चे खेळ दिसत च नाही व केस कापायला घरी येत नाही मस्तच झाला आहे लेख

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय तुम्ही म्हणता ते , न्हावी नाही पण निकडीच्या वेळी डॉक्टर्स घरी आले तर फार बरं होईल नाही का? धन्यवाद !

      Delete
  6. किशोरी मातेकरMarch 06, 2020 10:24 pm

    Mast , marathi shabd sangrah
    Wadhtoy

    ReplyDelete
    Replies
    1. 😍कुणाचं ? तुझं की माझं ?

      Delete
  7. संग्रहित फोटोंनचि मांडणि मुळे लेखाचे द्रुष्य रूप ऊजळून निघाले आहे

    ReplyDelete
  8. फ़ारच छान !! चौधरी सदन अनुभवताय वाचक ।

    ReplyDelete
  9. सीमंतिनीMarch 07, 2020 10:35 pm

    वा.. हा पण मस्त लेख. न्हावी घरी येण्याच्या माझ्या सगळ्या आठवणी दुःखद प्रसंगाच्या आहेत.
    रात्री गच्चीत आणि अंगणात झोपण्याच्या आठवणी मात्र फार सुखाच्या आहेत. गप्पा मारणे, गाणी म्हणणे, आकाशदर्शन हे आवडीचे कार्यक्रम.. कधी झोप लागायची ते कळायचं पण नाही.

    वर्षा..खूप छान. तुझ्या भाषेत पण छान बदल व्हायला लागलाय हळुहळू.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार तुझ्या आठवणी सांगितल्या बद्दल आणि अभिप्रायाबद्दल !🤩

      Delete
  10. Wa 👌varnan
    Ti navhachi peti ti dasamorch disli, kakacha mitranchi majeshir bhasha, to tiktok awaj tyache varnan fhrach surkh rita madale

    ReplyDelete
    Replies
    1. सगळे बारीक बारीक मुद्दे नीट लक्ष देऊन वाचतेस आणि बरोब्बर मला आवडलेल्या मुद्यावरच अभिप्राय देतेस🤩😇 ! खूप्पप्प्प सारे प्रेम !

      Delete
  11. जितेंद्र चौधरीMarch 08, 2020 10:36 am

    ���� khup chhan lekh ahe. Thank you for sharing your life story ����

    ReplyDelete
    Replies
    1. आणि तुझ्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद !

      Delete
  12. पूजा पाटीलMarch 08, 2020 7:07 pm

    सर्व लेख खुपच छान लिखाण केले आहे. अगदी बालपणात गेल्यासारखे वाटते.असेच लिखाण सुरू ठेवा.������������������

    ReplyDelete
    Replies
    1. काकू तुमचे या चौधरी सदनात अगदी सप्रेम स्वागत ! आणि खूप सारे धन्यवाद या छानशा अभिप्रायाबद्दल !🤩🤩😍🙏

      Delete
  13. प्रकाश पाटीलMarch 08, 2020 7:09 pm

    Yes,nice recall of old memories

    ReplyDelete
    Replies
    1. तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात🙏🙏 ! फार भारी वाटले आज तू इकडे आल्यामुळे💃💃 ! आभारी आहे !

      Delete
  14. Manish bhangaleMarch 27, 2020 9:56 pm

    Just finished reading this post. It makes you nostalgic in a very immersive way.... as children, our curiosity and observations revolved around all these things ..
    Its amazing how vividly you have captured those moments.. as you read, it feels like, you are reliving those moments.

    ReplyDelete
    Replies
    1. मनीष , तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! छान वाटले तुला इकडे भेटून🤩 , मनःपूर्वक  धन्यवाद !!!🙏😇

      Delete
  15. अबब केवढा मोठ्ठा हा लेख. वाचतांना दमछाक झाली माझी. Anyway इतके प्रसंग तुला include करायचे होते, तेंव्हा लेखाची लांबी वाढणार होतीच. जस्ट gammat केली, तू लेख लहान करू नकोस. 😉😉😉😉.

    असो, तर तू लिहिल्या प्रमाणे कडुलिंबाची आणी पिंपळाची कोवळी पानं खरच गोड दिसतात. पण कडूनिंबाची कोवळी पानं खाता येतात ते माहित नव्हतं. पुस्तकात पानं ठेवायची सवय सगळ्याना असतेच त्या मुळे सगळे तुझ्या सवयीला easily connect होतील.. आमच्या लहानपणी पण आम्ही डोंबारी आणी सगळे खेळ बघायचोच पण आता तसे खेळ कुठे होत ही नाहीत अणि असले तरी आपल्याला वेळ कुठे असतो बघायला 😁😁😁. घरात न्हावी येणं अणि त्याची स्पेशल पेटी असणः, हे मला नवं आहे. Galol वगरे सगळी आम्हा मुलांची monopoly होती, तुम्हाला पण खेळू द्यायचे म्हणजे आश्चर्य आहे. इतक्या कमी जागेत तू लहानपणीच्या खूप गोष्टी include करून जिवंत केल्या आहेस. हॅट्स off to you.
    Awaiting your new blog. 👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. this is very surprising for mi .....तुम्ही गुढीपाडव्याला शास्त्र म्हणून सुद्धा कधी कडू निंबाची पान खात नाही 😮😫??!!! हम्म्म्म्म त्याकाळातील हे मनोरंजक खेळ आणि त्यात्या लोकांची पोटापाण्याची सोया होती , पण आता त्यातील काही राहिले नाही , याचे फार दुःख आणि सल वाटतो . धाकटा लाडका काका असल्याने आम्हाला बरेचसे मुलांचे खेळ सुद्धा खेळता येत असत , त्याच्या आणि त्याच्या मित्रांसोबत😍🤩 ! मनःपूर्वक धन्यवाद , लिखाणाला अशी छान दाद दिल्याबद्दल !🙏😇

      Delete
  16. एल झेड कोल्हेMarch 31, 2020 12:10 pm

    २९मार्च च्या लेखात निंब, पिंपळ वर्णन पर्यावरण प्रेम दर्शविते. गारुडी, डोंबारी,विविध खेळ दाखवणार्‍यांचे शब्दचित्र छान. काकांची गुलेर भुतकाळात नेते. न्हाव्याचे वर्णनही वास्तव. आम्हीही गावाकडील न्हावी असेच बघितले आहेत. ��������

    ReplyDelete
    Replies
    1. खरं तर निसर्गावर प्रेम करण्याचा आणि निसर्गात रमण्याचा वारसा आम्हाला आमच्या आईवडिलांकडूनच मिळाला आहे😇 . इतक्या सगळ्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🤩

      Delete
  17. Just finished reading this post. It makes you nostalgic in a very immersive way.... as children, our curiosity and observations revolved around all these things ..
    Its amazing how vividly you have captured those moments.. as you read, it feels like, you are reliving those moments.

    ReplyDelete
    Replies
    1. Yeah! U said it! M reliving all these moments!!!
      Thnk you so much 😊

      Delete
  18. Khup Chan lekh lihilele ahe.junya aathvani yetat vachun.....

    ReplyDelete
  19. स्वाती चौधरीSeptember 08, 2020 2:55 pm

    फारच छान गुप फोटो मस्त!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  20. लीला वानखेडेSeptember 08, 2020 5:15 pm

    गॅलरी हा छान विषय निवडला गॅलरी हा घराचा वेळ घालवण्याचा एक पर्यायी कोपरा आहे
    आणि घर कितीही लहान असो पण घराला गॅलरी असणे त्याचे वैभवचा आहे
    आणि डोंबारी चा खेळत दिसतच नाही आता तो फक्त आपल्या मनात साठवलेल्या खेळापैकी एक आहेआहे
    खूपच छान

    ReplyDelete
    Replies
    1. आता या सगळया खेळा वर बंदी आहे ना, त्यामुळे दिसत नाहीत.
      हो, गॅलरी म्हणजे खुप आवडीचा विषय...
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😍

      Delete
  21. रंजना राणेSeptember 08, 2020 5:19 pm

    मला पण माझे लहानपण आठवले आम्ही पण असेच खेळ बघत बसत

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  22. गच्चीतील गमतीजमती आम्हीही अनुभवली..अंगतपंगत, सांस्कृतिक कार्यक्रम...etc.etc.
    ग्यालरी,गच्ची आणि गमतीजमती and connected street activities यांचा व्यक्तीसापेक्षमेळ छान साकारलाय.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे सप्रेम धन्यवाद !

      Delete
  23. Khup chan अप्रतिम लेख. खरच लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही तर गावांत जिथे खेळ असेल तिथे बघायला जायचो.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , कधी कधी तर आम्ही शाळेतून येतांना रस्त्यावरच हे खेळ बघायला थांबुन जायचो आणि घरी सगळे काळजीत , का उशीर  होत आहे आम्हाला घरी यायला ? धन्यवाद !

      Delete
  24. विकास गायकवाडSeptember 15, 2020 5:09 pm

    ताई खूप छान छान लिहिले आहे खाटेविषयी लिहिले खरंच खाटेचा मल्टी परंपर वापर केला जातो तुम्हाला कोणी नेल्या चा. प्रसंग गणपतीची मिरवणूक . निंबाच्या पिंपळाच्या झाडांचे वर्णन . खरंच खूप छान लिहिले आहे पपा व नाना हे काकांना ओळखतो ह्या काकांना कधी पाहिले नाही . तरी असो सर्व लेख छान आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. विकास , खुप सारे सप्रेम धन्यवाद !

      Delete
  25. छान लेख. लहानपणी घ्या आठवणींना उजाळा मिळाला. चार फोटोतला चौथा फोटो कुणाचा आहे काही लक्षात येत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...