एक ठळक चित्र
(गॅलरीतील गमती जमती)
तेव्हा दररोजचे दूध काचेच्या बाटल्यांतून मिळत असे . या बाटल्या ने-आण करण्याकरिता एक धातूचे शिंक मिळत असे , दोन बाटल्यांचे , चार बाटल्यांचे , सहा बाटल्यांचं . आमच्या कडे चार बाटल्यांचे होते . सकाळी चार बाटल्या आणल्या जात . एक बाटली अर्धा लिटरची असे . पहाटेच जावे लागे . तेव्हा आम्ही उठलेल्या नसू अजून आणि एव्हढ्या चार दुधाने भरलेल्या बाटल्या आम्हाला उचलून आणणे शक्यही नसे . पण संध्याकाळी एक किंवा दोन बाटली गरजेप्रमाणे आणली जात असे . हे मात्र आम्हाला नक्कीच शक्य असे . त्या चार बाटल्यांच्याच शिंक्यात गरजेप्रमाणे एक किंवा दोन रिकाम्या बाटल्या ठेवून ते घेऊन जायचे आणि एक किंवा दोन भरलेल्या बाटल्या घेऊन यायच्या . या बाटल्यांची एक गम्मत असे ! या बाटल्यांचे तोंड वरून , अल्युमिनियमच्या
एका पातळ पत्र्याच्या झाकणाने बंद केलेले असे . हे सहजच हातानेच उघडता येत असे . पण एकदाच वापरात येत असे , एकदा काढले की फेकून द्यायचे . तर हे झाकण काढले की त्याला आतल्या बाजूने छान घट्ट-घट्ट मलई चिटकलेली असे . मग ही मलई चाटून खायला फार मज्जा येत असे . यावरून सुद्धा आमची बऱ्याचदा भांडणं होत असत . आता सुद्धा ती चव आणि तो मुलायमपणा मला अगदी छान आठवतोय ! आणि नंतर ही झाकणं , खूप करपलेली किंवा चिकट भांडी घासायला वापरली जात .
कालांतराने या बाटल्या बंद झाल्या आणि आज जसे दूध प्लास्टिकच्या पिशवीतून मिळते , तसे मिळायला सुरुवात झाली . संध्याकाळच्या पिशव्या आणण्याचे काम आम्हा मुलींचे . मला मोठ्या बहिणी बरोबर जायला काही अडचण नसे . पण लहान बहिणी बरोबर जावे लागले , की मग आधी घरातच भांडण होत असे . ही म्हणजे ती थंडगार दुधाची पिशवी घेतली , की रस्त्याने चालतांना डोक्यावर ठेवत असे . काय मज्जा वाटायची तिला त्यात , ते तिला किंवा त्या देवालाच माहिती . पण मला मात्र हे अजिबात आवडत नसे . मी सांगून माझे ती अजिबात ऐकत नसे . मग मी घरून निघतांनाच मम्मीला सांगे , तिला बजावून सांगण्याबाबत . घरी ती हो म्हणे , पण रस्त्याने परत तिचे तेच चालू होई पुन्हा . मग घरी आली की माझी परत भुणभुण चालू होई मम्मीच्या कानाशी आणि मी मम्मीला सांगे उद्या तू गॅलरीतच उभी रहा , म्हणजे तुला दिसेल नीट ती काय करते ते . मग मम्मी सुद्धा माझ्या समाधानासाठी उभी राहत असे गॅलरीत .
घरापासून साधारण शंभर मीटर चालत गेले आणि डावीकडे वळले की दुधाची टपरी होती आणि उजवीकडे वळले की किराणा सामानाचे दुकान होते . गॅलरीत उभ्या असलेल्या व्यक्तीला सहजच दिसू शकत असे आम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळेपर्यंत . मग सुरवातीला जेव्हा , आम्हा मुलींना एकटे दूध किंवा काही किराणा सामान आणायला पाठवले तर कुणीतरी गॅलरीत उभे राहत असे आम्ही परत येईपर्यंत . आम्हाला पण आधार वाटत असे आणि घरातल्या लोकांना सुद्धा सुरक्षित वाटत असे . मग हळू हळू आम्हाला आणि घरातील मंडळींना आत्मविश्वास वाटू लागला काही दिवसात , मग कुणी गॅलरीत उभे राहण्याची गरज नसे .
एकदा असेच झाले , घरातील खायचे तेल संपले होते . तेव्हढी एकच गोष्ट आणायची होती , मग ताई आणि मला तेलाची बरणी एका कापडी पिशवीत घालून दिली आणि सोबत मोजून पैसे सुद्धा दिले . आम्ही नेहमीप्रमाणे गेलो दुकानात आणि हवे तितके तेल सांगितले द्यायला . पण ते म्हणाले दहा - पंधरा पैसे(आत्ता नक्की आकडा आठवत नाहीये दहा की पंधरा ) कमी आहेत . पण आम्ही त्यांचे नेहमीचे गिऱ्हाईक असल्याने , ते म्हणाले ठीक आहे आता घेऊन जा , पैसे नंतर आणून द्या . त्यांनी तेल मोजून दिले आम्ही ते घेऊन दुकानाच्या पायऱ्या उतरलो .
पायऱ्या उतरलो तेव्हढ्यातच एक माणूस आमच्या जवळ आला . तो बहुतेक आधीपासूनच तिथे उभा असावा . त्याने आम्हाला लगेच जे काय दहा - पंधरा पैसे कमी पडत होते ते दिले आणि दुकानात द्यायला सांगितले . पुढे म्हणाला मला तुमच्या वडिलांनी पाठवले आहे आणि थोडी फार वडिलांची माहिती सांगितली जेणे करून आम्हाला तो खरा वाटावा . आमचा लगेच विश्वास बसला . तो म्हणाला त्यांनी सांगितले हे तेल चांगले नाही , मी तुम्हाला दुसरे चांगले तेल घेऊन देतो . मग आम्हाला घेऊन फुले मार्केट ला घेऊन गेला . आम्हाला महात्मा फुलेंच्या पुतळ्यापाशी उभे केले . आम्हाला सांगितले तुम्ही इथेच थांबा , मी लगेच हे तेल बदलून चांगले तेल घेऊन येतो .
बराच वेळ निघून गेला , पण तो माणूस काही परत आला नाही . मग आम्हाला काहीतरी चुकीचे झाल्याची जाणीव झाली असावी आणि काय करावे न कळून आम्ही तिथेच भर बाजारात रडायला लागलो . ( रडायला सुरुवात आधी कोणी केली ते मात्र नाही आठवत😀😁😂🤣 ) भर बाजारात रस्त्यावर दोन छोट्या-छोट्या मुली रडत आहे पाहून थोडी गर्दी गोळा झाली . मग झाला प्रकार आम्ही त्यांना सांगितला आणि आमचे ते काका अजून परत आले नाही म्हणून आम्ही रडतोय . त्यांना लक्षात आले आम्ही फसवले गेलोय . मग त्यांनी विचारले घर कुठे आहे तुमचे माहित आहे का ? आम्हाला माहित होते , मग त्यापैकी एक काका त्यांची सायकल हातात धरून आमच्या बरोबर चालू लागले आणि म्हणाले मी येतो तुमच्या बरोबर तुमच्या घरापर्यंत . घर जसे दृष्टीक्षेपात आले तसे आम्हाला दिसले , गॅलरीत आई(आजी)आणि मम्म्यां आमची वाट बघत उभ्या आहेत . नेहमी लागतो त्यापेक्षा कितीतरी पटींनी वेळ निघून गेला तरी आम्ही घरी आलेलो नसल्याने सगळ्याजणी , काळजीने गॅलरीत उभे राहून आमची वाट बघत होत्या . आम्ही येतांना तर दिसलो पण आमच्या हातात तेलाची बरणी नव्हती आणि आमच्या सोबत कुणीतरी अनोळखी व्यक्ती चालत येत होती . त्यांच्या ताबडतोब लक्षात आलेच असणार काहीतरी गडबड आहे . मग सगळ्या जिन्यापाशी येऊन दार उघडून आमची वर यायची वाट बघत होत्या .
वर आल्यावर आमच्या सोबत त्या काकांना पण आत घेऊन गेल्या . त्या काकांना चहा पाणी करता करता त्यांच्या कडून त्यांना सगळी परिस्थिती समजली . मग त्या काकांचे आभार मानून त्यांना निरोप दिला . मग परत आम्हाला नीट विचारले , काय-काय आणि कसे-कसे झाले ते . या प्रसंगानंतर आम्हाला पहिल्यांदा कळले फसवणे असा काही प्रकार असतो आणि काही अशी फसवणारी माणसं सुद्धा असतात . या नंतर मात्र आम्हाला भीती बसली कुठेही एकटे जाण्याची ! , आणि घरातल्या मोठ्या मंडळींना सुद्धा ! मग या नंतर मात्र बराच काळ आम्हाला कुठेही एकटे बाहेर पाठविणे बंद झाले होते .
मला आजही इतक्या वर्षांनी एक एक प्रसंग अगदी नीट आठवत आहे आणि दिसत सुद्धा आहे . सगळ्यात स्पष्ट चित्र म्हणजे आम्ही त्या सायकल वाल्या काकांसोबत रडत रडत रस्त्याने चालत येतोय आणि समोर गॅलरीत सगळ्या आमची वाट बघत आहे चिंतातुर होऊन .........
आनंदी पाऊस
गॅलरीतील गमती जमती
२९ सप्टेंबर २०१९
दुधाच्या बाटल्या
सहा बाटल्यांच शिंक (स्टॅन्ड)
चार बाटल्यांच शिंक (स्टॅन्ड)
हीच ती आमची विकास दुधाची टपरी
अजूनही आहे . या ताळेबंदीतच हा फोटो
काढलाय हे न सांगताच समजतेय
तेलाची बरणी
महात्मा फुलेंचा पुतळा
अर्थातच हा आताचा आहे . त्याची जागा सुद्धा बदललीय आणि
तिथे आता भाजी बाजार सुद्धा नाही
मोठ्ठ शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेय .
आधीचा पुतळा बराच लहान होता आकाराने आणि
अगदी छोट्या आणि कमी उंचीच्या चौथऱ्यावर बसवून ,
त्याभोवती लोखंडी जाळीचे कुंपण घालून त्याला चंदेरी
रंग लावलेला होता .
एक ठळक चित्र (गॅलरीतील गमती जमती) दोन वेळा बारकाईने वाचले. शब्दांची अचूक निवड, प्रवाही लेखनशैली आणि मुद्दयांची योग्य मांडणी लेखिकेचे उत्कंठावर्धक लेखनकौशल्य अधोरेखित करते. ह. ना. आपट्यांचे लेखन ज्याप्रमाणे लिहिलेला प्रसंग हुबेहुब वाचकांच्या मन:चक्षुंसमोर उभा करते तद्वतच ह्या लेखात लेखिकेने उद्धृत केलेला तेलाच्या बरणीच्या फसवणुकीचा प्रसंग हुबेहुब समोर उभा राहतो.
ReplyDeleteइतक्या सगळ्या कौतुकास मी नक्कीच पात्र नाही रे ... खरंच ....... पण अशी छान दाद दिल्याबद्दल आभार !😊🙏
Deletechaan lihilas Varsha ...
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद ! 😍🤩
DeleteChhan lihles Varsha,
ReplyDeletePan aata tu tya prasangala ghabrat nasavis ase watte. bottleschya tya chaktyanchi amhi bhingri karaycho. maza motho bau ek akkhi kachhya dudhachi batli sampwaycha.
Aarti, chintan mach..
आता त्याच काय पण कुठल्याही प्रसंगाला घाबरत नाही😆😂 . तुमच्या आठवणी छानच , धन्यवाद शेअर केल्याबद्दल . 😊🙏
Deleteआम्ही त्या दुधाच्या बाटल्यांच्या झाकणांना पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून हवेत उडवायचो. ज्याचे झाकण सर्वात लांब जाईल तो जिंकायचा. मात्र त्यासाठी ते झाकण, त्याचा आकार बिघडू न देतां हलक्या हाताने काळजीपूर्वक काढावे लागायचे.
ReplyDeleteहा खेळ नवीनच माझ्यासाठी , आम्ही कधीच खेळलो नाही असा खेळ ! मस्तच ...... 😄
DeleteAgadi mast lihile aahes jnukahi tumhi dudh batlya gheun yetana dolyasamor aale v harvlelya nanter che radke chehare pan chanch aahe sarv mahiti ����
ReplyDeletegood����
रडके चेहेरे , हा हा हा 😂😂😆🤣🤣
DeleteExcellent
ReplyDeleteधन्यवाद ! कोण आपण , नाव कळेल ! 🙏😊
DeleteChan varnan hubehub
ReplyDeleteAni tula try prasangpan etake
barober athavtat👍
हो , ते सगळे आठवतेय म्हणून इतके सगळे लिखाण होतेय नाही तर शक्यच नव्हते हे सगळे लिखाण होऊच शकले नसते ! त्याबद्दल देवाचे मनःपूर्वक आभार !🙏🙏😇
Deleteफारच भारी लेख आहे मजा आली वाचताना
ReplyDeleteअगं ए , काय हे तुझ्या तायांना कोणीतरी फसवले आणि तुला मज्जा काय येतेय ??!!!
Delete😆😂😛
Hahahah
ReplyDeleteHa lekh saglyat jast aavdla mala karan khup goshtirup vatatoy vachayla
तुझ्या तायांना फसवल्याची गोष्ट ...😆😆😄
Deleteआणि आम्ही घाबरलेली कुठे गेल्या मुली....
ReplyDeleteमग काय , मला अजून आठवत आहे तुमचे चिंताक्रांत चेहेरे ....... 😢😢😰😰
Delete����बहुदा तुच आधी रडायला सुरुवात केली असणार
ReplyDeleteआताही आठवल्यावर कशीतरी च हालत होते
this is so obvious........😂😂😆
Delete������kharach maja ali ha lekh wachun
ReplyDeleteLahanpani mi baher Otyawar basleli Astana asech maze sonyache kanatle eka mansane kadhun nele hote he mala athwale
बापरे , हे फारच आश्चर्यकारक आहे आणि धक्कादायक सुद्धा .
Deleteव्वा.. मस्त.. फसल्याची गंमत एकदम भारी.. मला माझी अशी फजिती आठवली..
ReplyDeleteथंडीत सकाळच्या अंधार्या गार वेळी दूध आणायला बाबांबरोबर गेल्याची पण एक आठवण आहे..त्यावेळी बोलल्यावर तोंडातून येणार्या वाफा आजही आठवतात. खूप मजा वाटायची तेव्हा..
तुझे लेख वाचताना पॅरलली मी माझेही बालपण जगत असते.
ती संधी दिल्याबद्दल धन्यवाद..!
अरे मला आवडेल तुझा अनुभव वाचायला , सांग की . हो मला आठवतात थंडीच्या सकाळी तोंडातून निघणाऱ्या वाफ .....मज्जा यायची सप्रेम धन्यवाद !🤩😍😇
Deleteखूपच छान��
ReplyDelete��आपण कसे फसविलो जातो याच बालपणीच वास्तव उदाहरण शब्दरुपाने केलेले वर्णन खूपच सुंदर��बालपणातील बहिणी बहिणींनी केलेल्या खोड्या शब्दात वर्णन खूपच छान ��नवोदित लेखिका सौ.वर्षा चे अभिनंदन ����
सर खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏😇 ! अशाच तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असू द्या , खूप बळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मला पुढचे काम करण्यासाठी !!!😇🤩🙏
Deleteदूध पिणे हा माझा आवडता उद्योग असल्यामुळे ब्लॉगची सुरवात खूप आवडली. मी लहानपणी मुंबईत नव्हतो त्यामुळे ही दुधाच्या बाटल्यांची गम्मत तेंव्हा माहीत नव्हती. आमच्या गावात बाटल्या नव्हत्या त्यामुळे पहाटे उठून गवळ्याकडे जावं लागायचं. असो एकंदरीत लहानपणी खुप छोटी छोटी कामं तू करायची असं दिसतंय. तुझी लहान बहीण चावट होती असं पण दिसतय😜😜. तुला इतक्या लहानपणी फसवले गेल्याचा अनुभव आला ते एका परीने बरेच झाले. माणसांची खरी ओळख करायची तुला लवकर सवय लागली असेल त्यामुळे. तुझ्या लहानपणीचा काळ अणि तुमच गाव चांगले होते त्या मुळे एक परोपकारी काका तुमच्या बरोबर घरापर्यंत आले. हा लेख म्हणजे एक लहान मुलीचा हा प्रांजळ अनुभव आहे. गुड वर्क.
ReplyDeleteअरे बापरे ! तुमचे गाव गाव इतके का मागास होते . मी सुद्धा काही तेव्हा पुण्या-मुंबईत राहत नव्हते , पण आमच्याकडे मिळत दुधाच्या बाटल्या . असो . इतक्या लहानपणी फसवल्याचा अनुभव आला खरा , पण अजुनी सहजच कुणीही माझा उपयोग करून आपले करून घेते , त्याला पिंडच असावा लागतो असे वाटते हे मला . मनःपूर्वक धन्यवाद सविस्तर अभिप्रायाबद्दल !🙏🤩😇
Deleteमस्तच लेख रेखाटले आहे , while reading visualising experience journey.
ReplyDeleteLoved the Sequence and शब्दवर्णन.loved Milk and Oil बरणी. तेलावरुन घसरलेला अनुभव Chan mandalela ahe. भारीच...सनविवि
भारीच , तेलावरून घसरलेला अनुभव ! त्या दुधाच्या बाटल्या मला पण फार आवडतात अजूनही . खूप सारे धन्यवाद , अशा छान छान अभिप्रायाबद्दल !🙌🤩😇
DeleteVery nice. Kharch lahanpniche divas athvatat . Khedyat rahat hoto n batlichya dudhachi chav nahi mahit. But gharch dudh aslyane tyachich chav rengalte jibhevr. Thank you very much for such nice n lovely memories. ��
ReplyDeleteघराच्या दुधाची कशाशीच बरोबरी होऊ शकत नाही ! नशीबवान लोकांनाच ते मिळते . तू त्यापैकीच एक .
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !🙏😊
Shabdanchi gusalan agadi mast.khup chan
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!!🤩
Delete