Skip to main content

सुंदर ते घर (गॅलरीतील गमती जमती)


सुंदर ते घर 
(गॅलरीतील गमती जमती)

                                                                                   


                                                                                    आमच्या या गॅलरीत , दोन खाटा ठेवलेल्या असत . खाट म्हणजे एक आयताकृती लाकडाची चौकट आणि त्याला चार पाय असतात . या आयताकृती लाकडाच्या चौकटीत पांढऱ्या सुताच्या दोरीने एका विशिष्ट प्रकारे वीण घातलेली असते . या खाटेचा उपयोग बसायला , लोळायला , झोपायला करता येतो . आमची आई (आजी) रात्रीची कायमच , या खाटेवर झोपत असे . अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे वाळत घालणे . या खाटेवर पापड वगैरे सारखी वाळवणं वाळत घालता येत असत . तसेच काही खास कारणाने , एखादे धान्य आंबट ओले वाळवून हवे असेल , तर घरातच किंवा सावलीत या खाटेवर चादर किंवा त्यासारखेच काही कापड अंथरून त्यावर वाळवता येते . चादर किंवा काही कापड अगदी आवश्यक असते  , कारण खाट सुताच्या दोरीने विणलेली असल्याने , जाळीदार असते . चादर किंवा कापड नाही घातले तर , त्या दोरीच्या वीणेमधून सगळे धान्य खाली गळून जाईल . जेव्हा वापरात नसेल तेव्हा ही उभी करून ठेवली जाते म्हणजे तेव्हढी जागा मोकळी होते . दोन्ही बाजूने उभी करून ठेवता येते लांबीची बाजू जमीनीलगत किंवा रुंदीची बाजू जमीनीलगत . रुंदीची बाजू जमीनीलगत ठेवली तर ती पडून जाण्याची शक्यता असते . त्यामुळे अगदीच जागेची कमतरता असेल तरच तशी ठेवली जाते . अन्यथा लांबीची बाजू जमीनीलगत ठेवली जाते . पूर्ण सुरक्षित , पडण्याची जराही शक्यता नाही . आणि मग अशा या खाटेवर सहसा कपडे वळत घातले जातात . 
                                                                                        तर अशा या दोन खाटा आमच्या गॅलरीत ठेवलेल्या असत , लांबीची बाजू जमीनीलगत ठेवून . एक खाट आणि त्यापुढे दुसरी खाट . अशा ठेवल्या म्हणजे गॅलरीच्या रुंदीत , थोडी जागा शिल्लक राही आणि इकडून तिकडे जायला यायला शक्य होई . पण थोडे काळजीपूर्वक चालावे लागे नाहीतर त्या खाटेचे पाय लागण्याची हमखास शक्यता . 
                                                                                         सुट्टीच्या दिवशी आम्ही मुली , या दोन्ही खाटांची जागा आणि दिशा पार बदलून टाकत असू . दोन्ही खाटा सामोरासमोर ठेवत असू , जेणे करून दोन्ही खाटांचे पाय एकमेकांसमोर येतील . असे केले की खाटांच्या विणलेल्या बाजूंच्या मध्ये , एका पायाच्या उंची इतकी किंवा त्याच्या दुप्पट म्हणजे दोन पायांच्या उंचीची पोकळी तयार होई . मग या दोन विणलेल्या बाजू आम्हा मुलींच्या  घराच्या दोन भिंती होत असत . या खाटांवर साडी किंवा पातळ वाळत घातलेले असे . मग आम्ही तेच वरच्या बाजूला , एका खाटेपासून दुसऱ्या खाटेपर्यंत , संपूर्ण लांबीवर पसरवत असू .  मग हे आमच्या घराचे छप्पर होत असे . दोन्ही टोकांना या पातळावरुन आणि खाटेच्या वरच्या पायांवरून टॉवेल टाकत असू , ही खाटेच्या दोन टोकांना , दोन दार तयार होत असत , आमच्या घराची . पण ही दार उघडायची म्हणजे तो टॉवेल वर करावा लागे , (म्हणजे रोलिंग शटर सारखे) नेहमीच्या दारांसारखी नव्वद अंशात फिरवून उघडणारी नसत . आमच्याकडे हवामान कायम उष्णच . ह्या ओल्या साडी , पातळ आणि टॉवेल मुळे आमचे घर छान मध्यवर्ती वातानुकूलित होत असे ! काय भारी गारेगार वाटे आमच्या या घरात आणि सोबत साबणाचा मंद मंद , हवा हवासा वाटणारा सुगंध !! अहाहा अगदी स्वर्गाहून सुंदर !!!
                                                                                        मग आमच्या या घरात , आम्ही आमचा सगळा संसार मांडत असू . जी काय भातुकली असे आमच्याकडे ती सगळी इथे मांडली जात असे . आधीच्या लेखात उल्लेख आलाच आहे , समोर असलेल्या भल्या मोठ्या कडुनिंबाच्या झाडाचा . मग जर कडुलिंबाच्या निंबोळ्यांचा मौसम असेल तर काही पिकलेल्या निंबोळ्या तोडत असू . या पिकलेल्या निंबोळ्या , पिकलेल्या आंब्यासारख्या पिवळ्याधम्म आणि मऊ असतात . मग आम्ही त्या आंब्यासारख्या चोळून-चोळून त्याचा रस काढायचो . आंब्याप्रमाणेच यात सुद्धा एक लांबुळती बी असते , मग ती निपटून काढायची . अर्थातच हा रस खाणे शक्य नसे . कारण आंबा जितका गोड , तितक्याच या निंबोण्या कडू ! पण हे सगळं करायला खूप मज्जा येत असे !!
                                                                                    जेव्हा केव्हा या निंबोण्यांचा मौसम नसे , त्यावेळी मुरमुरे धावून येत , आमच्या मदतीला . मुरमुरे पाण्यात भिजवायचे आणि मग हे भिजवलेले मुरमुरे भांड्यात टाकले , की ती भाजी , तव्यावर टाकले की ती पोळी किंवा भाकरी , कुकर मध्ये टाकले की भात ! मग सगळा स्वयंपाक तयार झाला , की आम्ही अगदी येथेच्च आडवा हात मारून जेवत असू . अगदी काही क्षणात सगळ्या स्वयंपाकाचा फडशा पडत असे . मुरमुरे म्हणजे माझा एकदम आवडीचा खाऊ अगदी आजतागायत ! पण हे मुरमुरे पाण्यात भिजवूनच का , कुणी सांगितले , केव्हा कुणाच्या डोक्यात ही कल्पना आली  वगैरे वगैरे तपशील जराही आठवत नाहीये , माहिती नाहीये अगदी आजतागायत . पण आज लिहीतांना फार गम्मत वाटतेय आणि हसू येतेय या सगळ्या प्रकारची ! एक मात्र खूप आवडे मला . मुरमुरे पाण्यात भिजवले की एक विशिष्ट आवाज येतो , तो ऐकायला मला फार आवडे . आजही माझ्या कानात मला स्पष्ट ऐकू येतोय तो आवाज ! आता मात्र मला वाटतंय तो आवाज एकदा परत स्पष्ट ऐकण्यासाठी तरी थोडे मुरमुरे पाण्यात भिजवावे . 
                                                                                   हा अख्खा दिवस आमचा , या आमच्या घरातच जात असे . कधी शाळा चालू असतांना , मध्येच एखाद्या सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असे . अशा वेळी जर आमचा गृहपाठ करायचा बाकी असेल तर , तो सुद्धा या आमच्या घरात बसूनच पूर्ण होत असे . हल्ली मात्र वेगवेगळ्या आकाराची आणि त्यावर वेगवेगळे रंगीत चित्र छापलेली आयतीच घर(टेन्ट) मिळतात बाजारात . पण एकदा एक घेतले की त्याचा आकार आणि रंग एकच राहणार . आमच्या या घराचा आकार तोच राहत असे पण त्याचे रंग आणि त्यावरील चित्र प्रत्येक वेळी वेगवेगळी असत . असे ते आमचे , ...... 
                                                                                                    सुंदर ते घर........ 
उभे खाटेवरी ......!!!!



याच लेखाची ध्वनिफीत 



आनंदी पाऊस
गॅलरीतील गमती जमती 
१३ सप्टेंबर २०१९ 
   





लाकडी खाट 



लांबीची बाजू जमिनीला समांतर ठेवून 
उभी करून ठेवलेली खाट 
अशी एक खाट आणि त्याच्या अगदी समोर 
पायांच्या बाजूने दुसरी खाट अशीच उभी करून ठेवायची 
जेणे करून दोघी खाटेचे पाय समोरा-समोर येतील आणि 
त्यावरून साडी , पातळ , टॉवेल वगैरे घालायचे की तय्यार
आमचे घर ! 


रुंदीची बाजू जमिनीला समांतर 
ठेवून उभी करून ठेवलेली खाट 



निंबोण्या 




हल्ली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या आकाराची घर(टेन्ट)


हल्ली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या आकाराची घर(टेन्ट)



Comments

  1. आम्हाला आवडले तुमचे खाटांचे घर वर्षा. मस्तच.

    ReplyDelete
    Replies
    1. आता म्हणू शकत नाही ये आमच्या या खाटांच्या घरात . कारण एकतर खाटा उपलब्ध नाहीत आणि त्या उपलब्ध झाल्या तरी , आपल्या शरीराचे पसारे इतके वाढलेत की त्यात मावणे पण अवघड होऊन बसेल .....😆😆😂🤣

      Delete
  2. स्वाती प्रभुणेFebruary 21, 2020 11:51 am

    खूप मस्त मुरमुरे पाणी खरच मस्त आवाज होतो 1 दाण्यात थोडा गुल भरून लाडू भावला भाऊली च लग्न सर्व आठवले तसेच खाटेचा अजून एक उपयोग म्हणजे बाळ व बाळतीण ला शेक देणे व डोकं धुतल्या वर धूप द्यायची आई ते सर्व आठवले
    ��मस्त झाला आहे लेख

    ReplyDelete
    Replies
    1. हे बाहुला बाहुली चे लग्न आम्ही केल्याचे काही आठवत नाही . खाटेचे उपयोग मस्तच सांगितलेत तुम्हीं !

      Delete
  3. मस्त... माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. उपलब्ध साधनात सुद्धा खेळाचा मनमुराद आनंद घेणारे आपण... तुझे लिखाण सुद्धा एकदम भरी...

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय असेल त्यात समाधान मानणे , फारच जमेची बाजू होती आपल्या पिढीची ! धन्यवाद ! 😊

      Delete
  4. Vatanukulit thand ghar varun mand mand sabanacha sughandh ahaha swargahunhi sunder 👌👍
    Sunder varnan
    Murmurancha bhat, ras.. Ekandarit sangale varanan surekh

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच , त्या ओल्या साड्या , पातळ आणि पंच्यांनी मस्त थंडगार वाटत असे आमच्या घरात . सप्रेम धन्यवाद !🤩

      Delete
  5. Nanda wagle
    Hy vrushali jadugarache potditun sunder vastu nightach aapan aanandit hoto tadech tuzekun ekapathopathi ek sunder gacchiwaril gammati wachayala milat aahet
    Mirawnukitil gamti lekh apratim lekh pics sunder
    Bakawaril khane aani khatewril walwan bhatukli murmure gammat he sare mi pan lahanpani anubhawle
    Mast aasech likhan chalu rahun mala chan wachayala milu de
    Khoop shubhechha

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक आणि सप्रेम धन्यवाद !

      Delete
  6. खुपच छान. खाटेवर कोणी लिहिले असेल असे वाटले नव्हते. 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! आणि इतक्या छान अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😇

      Delete
  7. मला वाटतं हा लेख वाचनाऱ्या बहुतेकांनी असे घर लहानपणी एकदा तरी केले असेल. त्यांना त्यांचे बालपण आठवले असेल. मी पण करायचो. खरेच वाचून ते रम्य ,तसेच निरागस बालपण आठवले. त्या आठवणींना उजाळा मिळाला. मस्त लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !🙏 कोण आपण , नाव कळेल !

      Delete
  8. खूप छान वर्णन केलंय अक्का. लहानपणी आम्ही सुद्धा खेळालोय असे. ते सर्व आठवले.

    ReplyDelete
  9. किशोरीFebruary 21, 2020 9:30 pm

    बाज ������

    ReplyDelete
    Replies
    1. अरे , खरंच की , मी तर हा शब्द विसरूनच गेले होते , धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल !

      Delete
  10. मस्त लिहिलंय, पिकलेल्या निंबोळ्या गोड लागतात पूर्ण पिकलेल्या खाऊन बघ एकदा
    हिरव्या मात्र कडू तसेच बिया पण खूप कडू असतात

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच खाऊन बघाव्याश्या वाटत आहे , पण आता माझ्या जवळपास झाड नाही , तुझ्याकडेच यावे लागेल , पिकल्या की कळव मला , लगेच येते🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🤩

      Delete
  11. युवराज्ञीFebruary 22, 2020 10:48 am

    Chan ahe Khup

    ReplyDelete
  12. नीलिमा झोपेFebruary 22, 2020 5:41 pm

    Khatache ghar khup aawdale aamhi pan lahanpani karaycho tyachi aathavan zali mast vatale vachun khup sunder ������

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , छान वाटते ना या आठवणीत रमायला !🥰😍

      Delete
  13. वर्षा,
    छान लिहला अाहेस लेख. असं वाटले की अापण त्या खाटेवर लोळत गप्पा मारतोय.
    हरवलेल्या भातुकलीच्या.😍

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏 ! खूप आनंद झाला तुम्हाला इथे भेटून😍 ! असेच नियमित इथे भेटलात तर मला फारच आनंद होईल😇 . आणि इतक्या छान अभिप्रायाबद्दल सप्रेम धन्यवाद !!!🙏😊

      Delete
  14. मंदा चौधरीFebruary 23, 2020 2:21 pm

    सगळ्यानी प्रत्येकाच्या भातुकलीची चुणूक द्यायला काही हरकत नसावी. तुम्ही मुली गॅलरीत काय करीत ते मला कलत नसे आणि चुरमूरे पाण्यात टाकल्यावर त्याचा आवाज येतो हे मला माहीत नव्हते

    ReplyDelete
    Replies
    1. अगं , आता तू टाकूनच बघ मुरमुरे पाण्यात आणि एक आवाज . नंतर त्या भिजलेल्या मुरमुऱ्यांचा सुशीला करून टाक , फार सुंदर लागतो तो सुद्धा !

      Delete
  15. दिपाली चौधरीMarch 04, 2020 11:51 am

    खुप छान आहे घर आणि त्यातील भातुकली पण
    मस्त वाटले वाचून...

    ReplyDelete
    Replies
    1. आमच्यासोबत असतीस तर एकदम मस्त धमाल आली असती !!😍

      Delete
  16. खाट ह्या विषयावर एखादा blog लिहिला जाईल ह्याची कल्पनाच नव्हती. पण तुझ्या लेखन कौशल्यामुळे तू ते छान present केलं आहेस. विशेषतः खाट ठेवायची पद्धत तुझ्या आर्किटेक्ट बॅकग्राऊंड मुळे सुचलेली दिसतेय. मी इतके दिवस बघायचो पण हे कधी सुचलं नाही (😁😁). तुमच्या भातुकलीच्या खेळाच्या arrangements पण मस्त creative आहेत. आम्हा मुलांना खेळासाठी इतक्या arrangements करायचा patience नसतो 😎😎😎. इतक्या मस्त गारेगार घरात तुम्ही अभ्यास पण करायचे, कमाल आहे. मी तर मस्त झोपलो असतो. पिकलेल्या निंबोळ्यां आम्ही पण खेळायचो, पण मारामारी करायला. Anyway तुझ्या saglya blogs मुळे लहानपणाची मस्त सफर होते. Keep it up.... 👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. त्या गारेगार घरात आम्ही नेहमीच अभ्यास नव्हतो करत 😄, फारच कधीतरी राहून गेला  तरच 😉. बाकी कायम खेळ एके खेळ  खेळच . निंबोळ्यांची मारामारी मला नवीनच , पण आता नाही खेळून बघता येणार निंबोळ्यांची मारामारी , कारण निंबोणीची झाडंच बघायला मिळत नाही😢 , त्यामुळे निंबोण्या मिळणेच अशक्य . असो .मनःपूर्वक धन्यवाद अभिप्रायाबद्दल आणि तुमच्या आठवणी सांगितल्याबद्दल !🙏😇🤩

      Delete
  17. खुप सुंदर वर्णन केले आहे मला देखील माझं लहानपण आठवलं आणि भातुकली खेळताना येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आठवण झाली.लहानपणीचा सर्व काळ आणि लहानपण चे सारे सवंगडी आठवले. खुप खुप छान वाटले . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊 😍

      Delete
  18. Mesmerizing Memories ..which take to us childhood sweet moments..निबोण्या chi maramari ammhihi Keleli, आठवणीना उजाळा मिळाला.... अप्रतिम लिहिले आहे


    mostly खाट used to at Punjabi dhaba or some highway side hotel

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय खाट म्हटली पंजाबी ढाबा आठवतो सगळ्याना. पण खाट हा प्रकार खरतर अख्ख्या भारत भर सगळीकडे वापरला जातो
      माझी खुप प्रिय आठवणी पैकी ही एक आठवण आहे 😊
      खुप सारे धन्यवाद 😍 😇

      Delete
  19. Khat aani tiche upyog mast.....aaplya lahanpani mobile naslyamule aapan bharpur maja keliy.....mala tumachya gachhitil motiya CLR cha gulab ter far aawadaycha....tu june photo bare japun thevleyas...

    ReplyDelete
  20. खूप मस्तच...खाटेच्या आपल्या लहानपणीच्या आठवणी रमणीय आहेच...निंबोणी,मुरमुरे =चुरमुरे,‌पाण्यात भिजलेला तो आवाज..किती keen observations..माला‌ हे भारी‌ वाटतय सर्वच..
    हो‌ पण आजकाल agro tourism madhye पाहायला‌ मिळते खाट बरं..असो
    वाचून आनंद जाहला.. कळावे
    :- स.न.वि वि संजिता

    ReplyDelete
  21. भारती फेगडेMarch 03, 2024 6:38 am

    तुम्ही साधे विषय एवढे छान लिहीतात की प्रत्यक्ष अनुभवता येतात ते प्रसंग 👌🏻👏🏻

    ReplyDelete
  22. सुंदर लेखन, वाचन करून मला पण नांदेड येथील गंमतीदार प्रकार आणि प्रसंग आठवले 😀

    ReplyDelete
  23. गुलाबराव पाथरकरMarch 03, 2024 4:38 pm

    पूर्वी खाटा होत्या तेव्हा मने अभन्ग होती आता पलंग आले आणि मने सुद्धा भन्गून गेले .खाटेच्या घरातील आनंद आजच्या करोडो रूपयांच्या बंगल्यातही मिळत नाही .

    ReplyDelete
  24. Khup chhan
    Aplya gharatil sarv furniture kiti multipurpose hote he atta kalat ahe, khat can be used as a bed, to dry papad ,a toy house for u, useful for new mother n so many other uses,it's light weight,one can easily keep it in standing position,so thoughtful
    Aata aplya wooden bed var fakt zopata yete

    ReplyDelete
  25. उषा पाटीलMarch 03, 2024 4:43 pm

    खाट हा विषयच तू खूप छान घेत आमच्या वेळी खाटेवर झोपणं म्हणजे एवढं आरामदायी असायचं; खाट टाकली वर पसरवली गोधडी किंवा वाकड म्हणा आणि दिलं ताणून'० आताच्या स्लिपवेलला पण त्याची सर येणार नाही-मला तर वाटतं पुढे खाट ही इंटेरियर मध्ये एक शोपीस असणार आहे-मस्त छान विषय छान मांडणी आणि आठवण केवढी! ० चला खाट टाका आणि आनंदात झोपा

    ReplyDelete
  26. खुप छान लेख लिहिला आहे.लाकडी खाट खूप उपयुक्त असे .खरेच खाटेचा उपयोग करून आम्ही पण उन्हाळी वाळवण,खेळण्यासाठी घर अशा खूप साऱ्या कामासाठी याचा उपयोग होत असे. निंबोळी पण छान.लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.अप्रतिम लेख वर्षा.

    ReplyDelete
  27. प्रभात चौधरीMarch 08, 2024 1:53 pm

    खाट हा घरातील सांस्कृतिक ठेवा आहे.खाट विणायला सुताची दोरी,नारळाची दोरी किंवा नवार वापरतात.खाट विणणे हा कौशल्याचा तसेच कलेचा भाग आहे.
    1985 सालात खिरोद्याला ग्रामोत्सव केला होता.त्यात खाट विणायची स्पर्धा होती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...