इतर गमती जमती -२
(गच्चीवरील गमती जमती)
लहानपणापासून गच्ची तशी खूपच लाडकी आणि मनाच्या जवळची होतीच . पण हे सगळे लिखाण करायला घेतले आणि वाटतेय अख्ख आयुष्यच गच्चीवर गेलंय आपलं ! कितीही लिहीत गेलं तरी एक ना एक , काही ना काही आठवतच आहे आणि नीट आठवून लिहावेसेही वाटते आहेच. हा सगळा प्रवास इतका भारी होतोय , की मला तर हा भूतकाळ न वाटता हाच वर्तमानकाळ आहे असे वाटू लागले आहे . मी चौधरी सदन मध्येच राहतेय जणू आत्ता ! बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या , पण अगदी न टाळता येण्यासारख्या अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी , आठवणी या लेखात !
पाचवी-सहावीत असताना आम्हाला शाळेत काही विज्ञानाचे प्रयोग शिकविलेले . मग ते आम्हाला घरी पण करून बघायचे होते आणि ते शक्यही होते . कारण त्यासाठी लागणारे साहित्य सहज घरातच उपलब्ध होते आणि त्यातून काही धोकेदायक प्रकार होऊन इजा होण्याचीही शक्यता नव्हती . त्यामुळे घरातून पण कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही . मग आम्ही बहिणी-मैत्रिणींनी मिळून हे करायचे ठरविले . मग त्याप्रमाणे कुठलं साहित्य कुणी आणायचे , याची वाटणी करून घेतली . सुट्टीच्या दिवशी म्हणजे, रविवारच असणार , करायचे ठरविले . प्रयोग बहुतेक पाण्याच्या बाष्पीभवनाशी निगडीत होते . त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश हवा . त्यामुळे साहजिकच हे गच्चीवरच करावे लागणार होते आणि काही बटाट्याच्या कापाशी सुद्धा निगडीत असल्याचे आठवतेय पण नक्की काय ते नाही आठवत . पाण्याच्या बाष्पीभवनाचे मात्र नक्की नीट आठवतेय . ते म्हणजे , एक पेला , एक वाडगे , एक बशी यात सारखेच पाणी घालायचे आणि उन्हात ठेवायचे . बशी पसरट असल्याने बशीतील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते . दुसरे म्हणजे दोन सारख्या आकाराच्या बश्या घेऊन त्यात सारखेच पाणी घालायचे , एक बशी उन्हात आणि एक बशी सावलीत ठेवायची . उन्हातील बशीतील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते . तिसरे म्हणजे - मीठ पाण्यात विरघळवून त्याचे संपृक्त द्रावण तयार करायचे आणि हे उन्हात ठेवायचे , त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन फक्त मीठ शिल्लक राहते . वगैरे वगैरे . हे सगळे तेव्हा करून बघतानाही भारी वाटत होते , आणि आता आठवतानाही फारच भारी वाटतेय !
---------------
' जेवणाची संध्याकाळ' मध्ये सगळ्या कुटुंबाचा (पुरुष मंडळी सोडून ) सहभाग असे . तसाच मग आम्हा मैत्रिणी मैत्रिणींचा सुद्धा कार्यक्रम ठरे . समोरच्या बोथरा आजींच्या दोन भाच्या , तिरक्या रेषेत मम्मीची लांबची मामेबहीण राहते अजूनही तिच्या दोघी मुली आमच्याच वयाच्या आणि काही वेळा अजून इकडच्या तिकडच्या मैत्रिणी . आम्ही सगळ्या आपापल्या घरून डबे घेऊन येत असू . मग गच्चीवर भरपूर खेळायचे आणि मग सगळ्या सोबत बसून अंगत पंगत . या वेळी मात्र डब्यातून काय काय आणत असू हे अजिबातच आठवत नाहीये आणि मग अंधार पडायच्या आत सगळ्या आपापल्या घरी !
----------------
गच्चीमध्ये प्रवेश करायला जीन्याच्या तोंडाशी एक दार आहे . पण याला फक्त एक कडी लावलेली असे कुलूप वगैरे कधीच नव्हते . ही कडी उघडली की कुणालाही सहज गच्चीवर प्रवेश करता येत असे . पण हे दार कायमचे उघडेच असे . गच्चीच्या खालच्या मजल्यावर आमचे घर . या मजल्यावर मात्र जीन्याच्या तोंडाशी एक दार आहे . याला वरच्या अर्ध्या भागात जाळी लावलेली होती . त्यामुळे कोण आलय हे पटकन दिसत असे . ह्या दाराला मात्र कायम आतल्या बाजूने कडी लावलेली असे . बाहेरून येणाऱ्याला बेल वाजवावी लागे . मग घरातून कुणीतरी येऊन दार उघडत असे . पण हे दार जर का चुकून उघडे राहीले तर मात्र बाहेरून कुणीही आता शिरकाव करू शकत असे आणि गच्चीवर पण प्रवेश करू शकत असे . हे दार उघडे राहीले म्हणजे गच्चीवरील फुलांची नक्कीच चोरी होत असे .
पण एकदा हरभऱ्याची डाळ गच्चीवर वाळत घातलेली होती आणि डबा सुद्धा गच्चीवरच होता . उन्हात वाळल्यानंतर ती डब्यात भरून ठेवलेली होती . पण काही कारणाने डाळ भरलेला डबा गच्चीवरच होता . १०-१५ किलो तर नक्कीच असेल . डबा जड असल्याने मम्मी लोकांना खाली आणता आला नसावा आणि पप्पा लोकांना वेळ झाला नसावा म्हणून , तो डबा गच्चीवरच राहीला असावा . जेव्हा बघायला गेले तेव्हा तो डबा गच्चीवरून गायब . मग बरीच शोधाशोध, धावपळ , चर्चा वगैरे झाली . पण डब्याचा काही पत्ता लागला नाही . मग कसा कोण जाणे विषय समोरच्या बोथरा आजीपर्यंत गेला , त्या म्हणाल्या . अरे मी तर पाहिलं एका माणसाला तुमच्याकडून डबा घेऊन जाताना . मला वाटले तुम्हीच दिला असावा म्हणून मी त्याला काही विचारले , बोलले नाही आणि मग नक्कीचे कळले डबा चोरी झाल्याचे ......
------------------------------ ---
अशीच अजून एक आठवण आहे . पण ही काही गंमतीशीर किंवा आनंदी आठवण नाही . पण तरी लिहावीशी वाटली . चौधरी सदनच्या एका बाजूला मोठा रस्ता आहे , बँक रोड त्याचे नाव . दुसऱ्या बाजूने आमच्या गल्लीचा रस्ता , तो कॉटन मार्केटच्या ( आताचे गोलाणी मार्केट ) गेट पाशी जाऊन संपतो . तिसऱ्या बाजूने सर्विस लेन आहे . चौथ्या बाजूला एक इमारत आहे आणि त्यापलीकडे एक मुख्य रस्ता आहे . या रस्त्याने थोडे पुढे गेले , अगदी दोन-तीन प्लॉट नंतर एक लाकडाची वखार होती , आता माहित नाही, ती आहे की नाही ते मला . तर एका दुपारी एकदम कळले , की या वखारीला आग लागली . कसे , काय वगैरे आठवत नाही किंवा माहीतच नसावे मला . पण मग हे बघायला आम्ही सगळे गच्चीवर गेलो . आम्ही सगळे भट्टीच्या चौथऱ्यावर उभे राहून बघत होतो . एक तर जरा उंचीवर उभे राहिले म्हणजे नीट दिसेल म्हणून आणि दुसरे म्हणजे भट्टीवर मोठ्ठी पत्र्याची शेड असल्याने तिथे सावली असे . तेव्हा आमच्या भागात पिंपळाची मोठमोठी बरीच झाड होती . रात्रीच्या शांत वेळी पिंपळाच्या पानांची इतक्या जोरात सळसळ होत असे की भीतीच वाटे त्या आवाजाची . तसेच एक मोठ्ठे पिंपळाचे झाड त्या वखारीत सुद्धा होते आणि त्या लागलेल्या आगीमुळे त्याची पण होरपळून निघत होती आणि उडत उडत अगदी आमच्या गच्चीवर येत होती . प्रचंड भीती वाटत होती तेव्हा त्या सगळ्या प्रकारची . हा सगळा गोंधळ चालू होता आणि माझे लक्ष एकदम जिन्याकडे गेले . तर जिन्यापाशीच लहान आई(वडिलांची काकू ) उभी होती. ही चौधरी सदनात राहत नसे . लहान बाबा आणि लहान आई ( वडिलांचे काका काकू ) आमच्या मूळ गावी राहत असत . तसेच काही कारण असेल , तर येत ते , अधून मधून चौधरी सदनात . तेव्हा तशीच काही कारणाने ती आलेली असावी . ती सुद्धा हे सगळे पाहायला गच्चीवर आलेली, पण जिन्यापाशीच उभे राहून पाहत होती आणि हे सगळे बघता बघता , सारखे दोन्ही हात जोडून आकाशाकडे बघून नमस्कार करून , तोंडाने काहीतरी पुटपुटत होती . का ? , काय ? वगैरे माहित नाही आणि मी विचारलेही नाही तेव्हा तिला. पण बहुतेक देवाला नमस्कार करून , ती आग लवकरात लवकर विझावी आणि सगळे परत सुरळीत व्हावे यासाठी विनंती करत असावी असे वाटते .........
------------------------------ -----
त्या वेळी चौधरी सदनच्या आजूबाजूला बरीच गुजराथी कुटुंब राहत होती . यांचा मुख्य सण म्हणजे नवरात्र . मागच्या बाजूला थोड्या अंतरावर एक मोकळे मैदान होते . हे गच्चीवरून अगदी व्यवस्थित दिसत असे . तर या मोकळ्या मैदानात छान लाईट वगैरे लावत . नवरात्रीचे नऊ दिवस इथे ही सगळी मंडळी जमत आणि छान गरबा खेळत असतं . साधारण अंधार पडत आला की ही सगळी मंडळी छान मनमोहक , उत्फुल्ल , झळाळत्या रंगाचे पोशाख घालून येत . खूपच छान वाटतं असे हे सगळे रंग आणि पोशाख बघतांना . एकदम सुंदर , मनमोहक दृश्य ! आजच्या दृश्यांशी तुलनाच होऊ शकत नाही त्या दृश्यांशी . आजची दृश्य म्हणजे एकदम हिडीस , किळसवाणी आणि अगदी नकोशी वाटतात . पण ती दृश्य कित्ती सुंदर ! डोळ्यांना , मनाला , कानाला सुद्धा आनंद देणारे . कारण संगीत सुद्धा असेच, पण अगदी छान आणि ऐकावेसे वाटणारे . सगळ्याच दृष्टीने मनाला अगदी छान आणि निरागस आनंद देणारे !!!
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
👌mastach chan mandale mi pan chaudhari sadanatun phirun aale
ReplyDeletePrayog bharich
कोण आपण ? मनःपूर्वक धन्यवाद ! आपली इच्छा असेल तर मी आपल्याला खरोखरच चौधरी सदनाची सहल करून आणू शकते !🤩🤩🙏
Deletekhup chan ������sunder aathawni aahet kharech
ReplyDeleteरम्य त्या आठवणी ! धन्यवाद !
Deleteएवढ सगळ आठवते कसे
ReplyDeleteमला हल्ली सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न ! त्यामुळे असं वाटायला लागलेय खरंच माझी स्मरण शक्ती इतरांपेक्षा थोडी जास्त आहे . थोडक्यात I m blessed soul !!😇😇🤩🤩🤩
Delete��������लेख वाचला खूप छान आठवणी जाग्या होतात
ReplyDeleteहा ना , खरंच आठवणी जाग्या होतात सारख्याच जागा होतात आणि असे वाटतंय हाच वर्तमान काळ आहे आणि आपण आता चौधरी सदनातच राहतोय !🥰😍🤩😇
DeleteChan lekh aahe
ReplyDeleteMastach ������
मनापासून धन्यवाद ! 🙏🙏😎😎
Deleteसगळ्या आठवणी एकदम लिहील्या आहेत का
ReplyDeleteसगळ्या कशा एकदम होतील लिहून , इतक्या आठवणी आहेत की एकदम लिहिणे शक्यच नाही आणि सारखं अजून अजून आठवणी येतच आहेत ....... 🙄🙄🤩😇
Deleteलेख छान उतरलाय. गच्चीवरच्या आठवणी संपत नाही हे खरे आहे.
ReplyDeleteमैत्रिणीं बरोबर अंगत पंगत म्हणजे मज्जाच मज्जा.
चोरी ची गोष्ट वाचून नवल वाटले. चोर खरच हुशार असणार.
गच्चीवरुन आगीची भिषणता अधिकच जाणवली असणार.
पण गरबा बघायला खुप धमाल येत होती ना? तेव्हाचा गरबा खरच आल्हाददायक असे. आता त्याला फारच उथळ आणि भडक स्वरूप आले आहे.
सगळ्यात आधी मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏असा छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल ! अगदी प्रत्येक मुद्द्यांवर लिहिले आहे तुम्ही ! आणि अगदी प्रत्येक मुद्दा अगदी बरोब्बर , मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी !खूप सारे प्रेम !!!😇😍💖
Delete�� Goshti chhotyach asatat pan athawani mothya asatat
ReplyDeleteu SAID IT! अगदी १००% खरंय ! 😍
DeleteThis is also quite good... U r quite bold to remember n write about sad events. I managed to read it today itself
ReplyDeleteहम्म्म्म...... आठवत तर होते सगळे स्पष्ट , पण आठवण आनंदी नव्हती म्हणून बराच विचार केला लिहावे की नाही . पण शेवटी लिहून टाकले कारण आठवण तशी आनंदी नाहीये , पण घरातील एक व्यक्ती (लहान आई) होती या आठवणीत , ते जास्त महत्वाचे वाटले मला . आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचा एकदा तरी उल्लेख यावा असे वाटले ......
Deleteगच्चीतील प्रयाेगशाळा हा हाेमवर्क,डबापार्टी,गच्चीतून पाहिलेली आग,गरबा,यासर्वगाेष्टी तुला आज आठवतात?काय स्मरणशक्ति तुझी! नाकाला चुना लावून गेला डबाचाेर !! किती वास्तव वर्णन.
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद सर !🙏
DeleteGachhivarchya sarv aathavi khup chan sangitlya aahet daba party pan mast dalicha daba chori pan vachun hasu aale
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!!
DeleteGreat. खरच गच्ची वरील आठवण मस्तच. आम्ही उन्हाळ्यात झोपायला पन जायचो कधी कधी लाइट गेले की. धान्य valvayla., पापड bibde वाळत घालायला उपयोगाला यायची गच्ची. आम्ही tr लहानपणी आमच्या गच्ची वरुन शेजारच्या गच्चीवर udya मारायला पन कमी करायचो नाही. नुसती majja ����
Deleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!
Deleteगमती काय! आणि जमतीकाय! तुला सगळं छान लिहिता येतं, तुझी स्मरणशक्ती खरंच खूप छान, उत्तम लेख, आवडला,
ReplyDeleteखूप छान लेखन आहे लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या ☺️☺️
ReplyDeleteगच्चीवरील छान आठवणी तू लिहिल्या आहेस.
ReplyDelete